टीव्ही मालिका 'युद्ध'?
'युद्ध' नावाची मालिका इथे कुणी बघतंय का? अमिताभ बच्चन, अनुराग कश्यप, तिगमांशु धुलिया, केके, नवाझुद्दिन सिद्दिकी वगैरे बडी नावं असल्यामुळे मालिका चर्चेत आहे, पण लोकांना कशी वाटली ते जाणण्यात उत्सुकता आहे.
'युद्ध'
काही भाग पाहिल्यानंतर जाणवलेल्या काही गोष्टी -
साधारण हिंदी मालिकांपेक्षा कथानक अधिक गुंतागुंतीचं आहे. अनेक पात्रांना वेगवेगळ्या छटा आहेत. कॉर्पोरेट गैरव्यवहार, नक्षलवाद ते बाललैंगिकशोषण असे अनेक मुद्दे कथानकात गांभीर्यानं आणि गुंतागुंतीसह येत आहेत. हिंदी मालिका सहसा ह्या विषयांच्या वाटेला जात नाहीत. म्हणजे त्या अर्थानं मालिका धाडसी आहे. अनेकदा सेटबाहेर आणि आउटडोअर चित्रण केलेलं आहे. हेदेखील हिंदी मालिकांतल्या सरासरीहून अधिक असावं. कथानक नाट्यमय असलं आणि प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्याचे प्रयत्न उघड दिसत असले तरीही अभिनय आणि एकूण चित्रण वास्तवदर्शी आहे. खेडेगावातलं हॉस्पिटल किंवा गरीब माणसाची झोपडी वगैरे चकचकीत दिसत नाहीत. अनेक प्रसंग अंधारात किंवा कमी उजेडात घडतात. हिंदी मालिकांसारखी ढोबळ प्रकाशयोजना नाही. अनेक उपकथानकं, त्यांतली गुंतागुंत आणि तरीही सतत नव्या धाग्यांची उकल करत पुढे जाणारं वेगवान कथानक पाहता 'ब्रेकिंग बॅड' किंवा तत्सम मालिकांचा आदर्श ठेवला असावा.
ब्रेकिंग बॅड
त्यांतली गुंतागुंत आणि तरीही सतत नव्या धाग्यांची उकल करत पुढे जाणारं वेगवान कथानक पाहता 'ब्रेकिंग बॅड' किंवा तत्सम मालिकांचा आदर्श ठेवला असावा.
वेगवान आणि उपकथांच्या गुंत्यासह ब्रेकिंग बॅड किंवा तत्सम कुठलीही पाश्चिमात्य मालिका न-पाश्चिमात्य दर्शकांनाही खिळवून ठेवू शकते, त्यातला चकचकीतपणा सुद्धा इथे का नसावा असा प्रश्न पडतो, पिवळ्या प्रकाशयोजनेत वेगाने पुढे सरकणार्या गुंत्यात नेहमीच्या हिंदी मालिकांचा बत्थडपणा सापडला नाही तरी पुढच्या भागाची उत्सुकता अॅव्हरेज दर्शकाला खिळवून ठेवू शकत नाही, निश मालिका म्हणावे असे फारसे काही घडताना दिसत नाही, बर्याच पात्रांचा नैसर्गिक अभिनय हि एकमेव जमेची बाजु सध्यातरी वाटते आहे, पण ब्रेकिंग बॅडबरोबर तुलना म्हणजे एकप्रकारे समिक्षकाचे ब्रेकिंग बॅडच म्हणायला हवे ;)
युद्ध बहुदा बॉस मालिकेवर आधारीत आहे.
'चकचकीतपणा' म्हणजे इथे नक्की
'चकचकीतपणा' म्हणजे इथे नक्की काय अभिप्रेत आहे?
सिनेमॅटिक परिणाम साधला जाण्याला चकचकीतपणा म्हणेन, युद्धची सिनेमाटोग्राफी वास्तवदर्शी असेलही पण त्यात त्या पिवळ्या प्रकाशयोजनेमुळे आणि पात्रांचा अतिसाधा वावर परिणामकारकता कमी करते असे मला वाटते, असे प्रसंग सावधान इंडियाच्या नाट्यारुपांतरातही थोड्याफार फरकाने दिसतात, अपवाद असलाच तर अमिताभच्या स्किझोफ्रेनियाच्या प्रसंगात जरा बरेपणा जाणवतो तेही अमिताभचेच कौतुक आहे. ब्रेकिंग बॅडमधे अशा प्रसंगांची पेरणी बरीच आहे, पण वायर किंवा शेरलॉक मधे असा चकचकीतपणा कमी अढळला तरी त्यात पात्रसंख्या आणि उपकथानके कमी असतात आणि वेगाबरोबर सटल विनोद बर्याच प्रसंगामधे असतो, युद्ध कुठल्याच बाबतीत फार स्कोअर करत नाही असं मला वाटतं.
प्रकाशयोजना आणि पात्रांचा वावर
>> त्या पिवळ्या प्रकाशयोजनेमुळे आणि पात्रांचा अतिसाधा वावर परिणामकारकता कमी करते असे मला वाटते
मला वाटतं प्रकाशयोजना प्रसंगोचित आहे. नक्षलवादी भागातल्या खेड्यांत वेगळी आणि शहरांत वेगळी, पोलिस ठाण्यात वेगळी आणि कॉर्पोरेट ऑफिसमध्ये वेगळी, वगैरे. पात्रांचा वावर 'अतिसाधा' म्हणजे कळलं नाही. बडा कॉर्पोरेट बॉस आणि त्याचे साहाय्यक जसे वास्तवात दिसतील / वावरतील तसे दिसतात / वावरतात, आणि एक साधी शहरी मध्यमवर्गीय डॉक्टर मुलगी किंवा खेडवळ मुलं वास्तवदर्शी वाटावीत अशीच दिसतात / वावरतात. हिंदी मालिकांप्रमाणे भडक मेकअप किंवा प्रखर प्रकाशातून त्याला चकचकीत बेगडी नाट्यमय करणं टाळलेलं आहे.
जाता जाता : अमिताभ स्कित्झोफ्रेनिक नाही. आणि सिनेमॅटिक परिणाम साधला जाण्याचा चकचकीतपणाशी संबंध अजूनही कळला नाही, पण असो.
असो
मला वाटतं प्रकाशयोजना प्रसंगोचित आहे. नक्षलवादी भागातल्या खेड्यांत वेगळी आणि शहरांत वेगळी, पोलिस ठाण्यात वेगळी आणि कॉर्पोरेट ऑफिसमध्ये वेगळी, वगैरे
परिणामकारक सिनेमाटोग्राफी आहे असं वाटलं नाही. अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी असू शकेल.
पात्रांचा वावर 'अतिसाधा' म्हणजे कळलं नाही.
आणि एक साधी शहरी मध्यमवर्गीय डॉक्टर मुलगी किंवा खेडवळ मुलं वास्तवदर्शी वाटावीत अशीच दिसतात / वावरतात
ह्या वास्तवदर्शी अभिनयातून नाट्य खुलून येत नाही, उदा. एका एपिसोड मधे खाणीत(?) काम करणार्या एका मजुराचा मृत्यू होतो, त्याचा मुलगा लहान असतो, अमिताभचा मुलगा खाणमालक ह्या नात्याने सेक्रेटरीशी बोलून मग मुलाशी फोनवर बोलतो, ह्यात कुठेही नेहमीच्या सिरिअलमधला मेलोड्रामा नाही हे मान्य पण त्या प्रसंगातून काहीच परिणाम जाणवत नाही, एकामागुन एक घटना घडत जातात, सीसीटिव्हीचं चित्रण 'थोडं' नाट्यमय पद्धतिने बघावं असं वाटत रहातं, अमिताभ सोडला तर इतर पात्रं अपिलच होत नाहीत.
जाता जाता : अमिताभ स्कित्झोफ्रेनिक नाही.
हो, त्याला हटिंग्टन आजार झालेला असतो, त्याबद्दल अधिक माहिती इथे मिळेल पण ती ह्या चर्चेला फारशी उपयोगी नाही.
आणि सिनेमॅटिक परिणाम साधला जाण्याचा चकचकीतपणाशी संबंध अजूनही कळला नाही, पण असो.
सध्या पाश्चिमेकडे दाखविल्या जाणार्या मालिकांमधे जणू सिनेमाच पहातो आहे असं फिलिंग येतं तो चकचकीतपणा इथे आढळत नाही, मालगुडी डेजमधे त्याकाळानुसार मला अपेक्षित असलेला चकचकीतपणा होता असं म्हणेन.
नाही चकचकीत म्हणून गमते उदास
>> परिणामकारक सिनेमाटोग्राफी आहे असं वाटलं नाही.
>> ह्या वास्तवदर्शी अभिनयातून नाट्य खुलून येत नाही
>> ह्यात कुठेही नेहमीच्या सिरिअलमधला मेलोड्रामा नाही हे मान्य पण त्या प्रसंगातून काहीच परिणाम जाणवत नाही, एकामागुन एक घटना घडत जातात
>> सध्या पाश्चिमेकडे दाखविल्या जाणार्या मालिकांमधे जणू सिनेमाच पहातो आहे असं फिलिंग येतं तो चकचकीतपणा इथे आढळत नाही
मला वाटतं 'ब्रेकिंग बॅड'सारख्या मालिकांमधल्या 'हॉलिवूडसारख्या' लूकमुळे त्या चकचकीत दिसतात, पण 'वायर'सारखी मालिका तशी चकचकीत नाही म्हणूनच आजही लक्षात यावी अशी उठून दिसते. त्यात उलट रोजच्या आयुष्यात भेटावीत अशी दिसणारी माणसं भेटतात; वास्तवदर्शी, पण काहीशी न्वार प्रकाशयोजना असते, वगैरे. इथे थोडा तसा प्रयत्न केलेला दिसतो.
(पुन्हा डिसक्लेमर : ही मालिका 'वायर'च्या दर्जाची आहे असा दावा इथे केलेला नाही; केवळ शैलीतलं साम्य आणि त्यामुळे प्रेरणेची शक्यता अधोरेखित केली आहे.)
थोडे हलकेच - पण काहीशी न्वार
थोडे हलकेच -
पण काहीशी न्वार प्रकाशयोजना असते, वगैरे. इथे थोडा तसा प्रयत्न केलेला दिसतो.
:) डोळे ताणुन बघावं लागतं इथे, हे असं मला अमेरिकेत पहिल्यांदा गेल्यावर तिथल्या पिवळ्या(गोल्डन/वॉर्म) प्रकाशामुळे झालं होतं. ट्यूबलाईटसाठी आसुसलो होतो.
ही मालिका 'वायर'च्या दर्जाची आहे असा दावा इथे केलेला नाही; केवळ शैलीतलं साम्य आणि त्यामुळे प्रेरणेची शक्यता अधोरेखित केली आहे.
आता अमिताभ, वायरचा दाखला आणि 'तुमची' थाप एवढा मसाला असताना इथे न बघणारेही एखादा एपिसोड नक्की बघतील. ;)
सुमार
दिड एपिसोड पाहिले, अमिताभचा (नेहमीचा) अभिनय वगळता इतर फारसे रोचक वाटले नाही, हताळणी फारच अमेचर आणि स्लो वाटली. पुढच्या आठवड्यात परत बघितली पाहिजे.