Skip to main content

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग २२

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा

====

महाराष्ट्रात गेल्या एक हजार वर्षांत, समूह किंवा सरकार/राजा पातळीवर काही कलाविष्कार घडले आहेत काय? महाराष्ट्रातले भव्यदिव्य कलाविष्कार म्हटले तर अजिंठा, वेरूळ, घारापुरी अशी सातव्या शतकापर्यंत घडवलेली स्थानं आठवतात. त्या तुलनेत राजस्थान, दिल्ली-आग्रा असा मुघल सत्ताधारी रहायचे तो भाग समृद्ध आहे. दक्षिणेकडे असणारे हंपी, मदुरैसारखी शिल्पकला गेल्या हजार वर्षांत कितपत बहरली? मैसूरचा टिपूचा राजवाडाही फार सुरेख आहे म्हणतात.

हा प्रश्न पडण्याचं कारण काहीसं विचित्र आहे. मराठीतली क्रियापदं काहीशी हिंस्त्र वाटतात. धागा काढला, पेपर टाकला, अशी. एकीकडे चमकदार वाक्यांचं आकर्षण मराठी लोकांना असलं तरीही दुसऱ्या बाजूने लढाऊ वगैरे विशेषणं विशेष अभिमानकारक वाटतात.

हा संबंध कदाचित निरर्थकही असेल. पण या अशा संदर्भात कोणी काही अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे का?

कान्होजी पार्थसारथी Tue, 26/08/2014 - 00:42

शिलाहार राजांचे १२ व्या शतकातले खिद्रापूर, ता. शिरोळ, कोल्हापूर येथील (भव्य-दिव्य नसले तरी) कोपेश्वर हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आठवले. प्रवेशाच्या मंडपात मोकळ्या छताचा प्रयोग अनोखा आहे.
याच कालखडातले हेमांडपंती स्थापत्य एका अर्थी भव्य अविष्कार म्हणता येईल. या शैलीचा मोठ्या प्रमाणात, मोठ्या भूभागावर झालेला प्रयोग म्हणून हा मोठा अविष्कार ठरावा.

मन Tue, 26/08/2014 - 09:33

In reply to by कान्होजी पार्थसारथी

मागील आठवड्यात खिद्रापुरास जाणे झाले. वास्तू भन्नाट आहेच. मंदिराच्या मागील बाजूस वरती कोणत्या तरी लिपीमध्ये मजकूर लिहिलेला दिसला. मोडी लिपी असावी असे समजून समाधान करुन घेतले. खात्रीशीर माहिती सांगणारे कुणीच सोबत नसल्याने चिडचिड झाली.

मन Tue, 26/08/2014 - 12:09

In reply to by बॅटमॅन

शिलालेख नाय रे. म्हणजे मंदिराच्या टोटल उंचीच्या तीन चतुर्थांश उंचीवर काळ्या ब्याकग्राउंडवर पांढर्‍यात कुणीतरी कायतरी खरडलं होतं. "कोरलं " नव्हतं.
अजिंठ्याला कसे हाताने रंग मारलेत, तसे काहीतरी खरडले होते दोन ओळी.

बॅटमॅन Tue, 26/08/2014 - 12:19

In reply to by अनुप ढेरे

अजितो पिरेमस रिनुकु असं असेल ब्राह्मी मध्ये, नीट पाहिलं पाहिजे आता पुन्हा जाईन तेव्हा...

मन Tue, 26/08/2014 - 12:21

In reply to by अनुप ढेरे

यप्स. ते तसं नव्हतं.
अजितरावांना आपले प्रेमरहस्य लिहिण्यास इतर बर्‍याच सोप्या जागा होत्या. त्यासाठी दोन तीन मजले उंच असणार्‍या जागेत, कळसाच्या थोडेसेच खाली ते लिहून ठेवतील असे वाटत नाही.

यन्त्रमानव Tue, 26/08/2014 - 22:06

In reply to by मन

खिद्रापुर च्या कोपेश्वर मंदिराबददल स्थानिक लोकांना खुप कमी माहिती आहे. हे मंदिर कधी कोणी कसे बांधले या बद्दल एक आख्यायिका मात्र प्रसिद्ध आहे.आख्यायिकेनुसार हे मंदिर राक्षसांनी एका रात्रीत बांधले.मंदिर बांधताना पक्षांच्या , माणसांच्या आवाजाने दिवस उगवायला फार कमी अवधी आहे हे जाणुन त्यांनी बांधकाम अर्धवट सोडुन पलायन केले. त्यामुळे मंदिर अपुर्ण आहे याच्या खुणा आपल्याला दिसतात उदा. मंदिराच्या प्रवेश द्वारा समोर असलेला उघडा भाग, त्या भागावर बसवायची शिळा खालीच राहिली. गाभार्‍या बाहेरील स्तंभांवर कोरिवकाम करण्यासाठी केलेल्या खुणा, काही खांबांवर कोरिवकाम अर्धवट सोडलेले आहे. जाताना त्यांच्या पै़की एका राक्षणीने आपले मुल तेथेच सोडले त्याचा दगड झाला आहे.

१. विदा उपलब्ध नाही, लहानपणापासुन हेच ऐकत आलो आहे. भरपुर दिवस झाले जाणे जमले नाही. काही वर्षांपुर्वी मंदिर परिसरात घराच्या बांधकामासाठी पाया खोदताना काही पुरातन नाणी, वस्तु सापडल्या होत्या; तेंव्हापासुन गावात खुदाई वर बंदी आहे.
मंदिरासमोर शासनाकडुन वस्तु संग्रहालयाचे काम सुरु होते, वस्तु संग्रहालय आता सुरु असेल तर कल्पना नाही.

~यंत्रमानव.

स्वधर्म Wed, 27/08/2014 - 23:13

In reply to by मन

मी काही वर्‍षांपूर्वी तिथे गेलॉ होतो तेंव्हा मंदीराच्या बाहेरच हारवाल्याकडॅ विकत मिळत होते. पाने २०, रू. ६०. घेतले नाही. मंदीर व शिल्पे अप्रतिम!

-स्वधर्म

नितिन थत्ते Tue, 26/08/2014 - 07:18

समूह - सरकार यात ब्रिटिश अंतर्भूत आहेत का? ते असतील तर मुंबईच्या फोर्टात थोडं काही आहे.

मैसूरचा राजवाडा (टिपूचा नव्हे) हा सुद्धा ब्रिटिश काळातच उभारलेला आहे असे वाटते.

ऋषिकेश Tue, 26/08/2014 - 09:17

सहस्त्रक म्हटल्यावर अनेक किल्ले, राजवाडे, वाडे (उदा. शनिवार वाडा), मंदीरे, ब्रिटीश वास्तु, नवी विधानसभेची इमारतीपासून, हुतात्मा चौकातील पुतळ्यापर्यंत अनेक वास्तु/शिल्पे डोळ्यासमोर आली

मन Tue, 26/08/2014 - 09:28

In reply to by ऋषिकेश

सध्याचा शनिवार वाडा हा सध्याच्या मैसूरस्थित टिपू प्यालेस समोर अगदिच "ह्यॅ" वाटतो.
शनिवार वाडा ऐन वैभवाच्या काळात लय भारी असूही शकेल; पण टिपू प्यालेसमध्ये आजही युद्धाची रंगीत चित्रे आहेत त्या काळात काढलेली. नक्षीकाम वगैरे टिकून आहे.
वरती कुणीतरी म्हटल्याप्रमाणं खिद्रापूर हे कमी परिचित ठिकाणही त्या काळातल्या बांधकामाचा उत्तम नमुना मानता यावा.
(पण खिद्रापुरास गेल्यास स्वतःला गाइड समजणार्‍या/म्हणवणार्‍या स्थानिक लोकांना झेलायची तयारी ठेवून जा बॉ.)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 26/08/2014 - 19:18

In reply to by ऋषिकेश

किल्ले कोरीवकाम, शिल्पकला म्हणून फार आकर्षक वाटत नाहीत. उपयोग होता, भरभक्कम होते हे मान्य.

ब्रिटीश कालीन इमारतींबद्दल काय म्हणावं याबद्दल मी साशंक आहे. संस्कृती म्हणून ज्यांचा परिणाम महाराष्ट्रावर झाला आहे अशा दृष्टीने विचार करता मुघलांचा उत्तर भारतावर प्रभाव पडला तसा ब्रिटीशांचा पडला का? माझ्या दृष्टीने, नाही. (पण माझा अभ्यास फार नाही हे मान्य.)

ऋषिकेश Wed, 27/08/2014 - 09:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुघलांचा उत्तर भारतावर प्रभाव पडला तसा ब्रिटीशांचा पडला का? माझ्या दृष्टीने, नाही. (पण माझा अभ्यास फार नाही हे मान्य.)

माझ्या मते खूपच पडला. कित्येक मापे, जोडण्या (मेल फिमेल जॉइंटस), एकमेकांना जोडण्याची साधने (सिमेंटसारखे तत्कालीन) वगैरे अनेक पातळ्यांवर स्थापत्यात फरक पडला असे वाचले आहे. इतकेच नाही तर शैलीतही मुघल+रोमन/ब्रिटीश यांच्या संकरातून उभ्या राहिलेल्या इमारतींनी नवे जॉनर तर तयार केलेच, मुंबईतच नाहीत तर पुण्यातही तत्कालिन उभ्या राहिलेल्या इमारती/स्थापत्ये पूर्णतः वेगळी झाली

अर्थात माझाही अभ्यास नसल्याने मीही ठासून मत देऊ शकत नाहीच.

जाणकारांकडून/अभ्यासकांकडून/ज्याला माहिती आहे अशा कोणाकडूनही :) अधिक तपशीलात वाचायला आवडेल. याविषयी अधिक माहिती देऊ शकतील असे पटकन आठवणारे नाव @रामदास काका.
किंवा मकी/निदे/नंदन इत्यादी असे त्यांच्याबरोबर मुंबईत इमारती बघत फिरलेल्यांनीही आठवणीतून सांगायला हर्कत इल्लेच

एखादे पुस्तक/जालावरील लेख सुचवलात तरी चालेल.

बॅटमॅन Wed, 27/08/2014 - 10:20

In reply to by ऋषिकेश

मेल फीमेल जॉइंटबद्दल बोलायचे झाले तर तत्सदृश जॉइंट्स हे हेमाडपंथी देवळांतही सापडतात. जाणकारांना स्पेसिफिक उदा. विचारली पाहिजेत, पण तशी उदा. आहेत हे नक्की.

बॅटमॅन Tue, 26/08/2014 - 19:30

महाराष्ट्रात गेल्या एक हजार वर्षांत, समूह किंवा सरकार/राजा पातळीवर काही कलाविष्कार घडले आहेत काय? महाराष्ट्रातले भव्यदिव्य कलाविष्कार म्हटले तर अजिंठा, वेरूळ, घारापुरी अशी सातव्या शतकापर्यंत घडवलेली स्थानं आठवतात. त्या तुलनेत राजस्थान, दिल्ली-आग्रा असा मुघल सत्ताधारी रहायचे तो भाग समृद्ध आहे. दक्षिणेकडे असणारे हंपी, मदुरैसारखी शिल्पकला गेल्या हजार वर्षांत कितपत बहरली? मैसूरचा टिपूचा राजवाडाही फार सुरेख आहे म्हणतात.

हा प्रश्न पडण्याचं कारण काहीसं विचित्र आहे. मराठीतली क्रियापदं काहीशी हिंस्त्र वाटतात. धागा काढला, पेपर टाकला, अशी. एकीकडे चमकदार वाक्यांचं आकर्षण मराठी लोकांना असलं तरीही दुसऱ्या बाजूने लढाऊ वगैरे विशेषणं विशेष अभिमानकारक वाटतात.

हा संबंध कदाचित निरर्थकही असेल. पण या अशा संदर्भात कोणी काही अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे का?

अजिंठा-वेरूळ इ. खोदकामवाला प्रकार पुढे इतका राहिला नाही, कारण फोकस बदलला. पुढे पुढे शेप्रेट दगड आणून, ते एकमेकांवर रचून मग फ्री-स्टँडिंग देवळे बांधायची फ्याशन आली. हेमांडपंथी देवळे म्हंजे या प्रकाराचा प्री-मुसलमान काळातला शेवटचा वैभवशाली आविष्कार. पुढे मुसलमान काळात फोकस अजून बदलला. मशिदी, दर्गे, इ. मध्ये ट्रू आर्च नामक प्रकार आला, घुमट आला. त्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे देवळेही बदलली. आजही मराठाकालीन अन हेमांडपंथी देवळांत प्रचंड फरक नक्कीच दिसतो.

किमान दक्षिणेकडे ही शिल्पकला कायम वर्धिष्णू होती. उत्तरेबद्दल मला फारसं माहिती नाही. याबद्दल एक रोचक पेपर मी एका अभ्यासकाकडनं वाचलेला होता. म्हंजे मुसलमानपूर्व काळात बृहदीश्वर, इ. भवदिव्य मंदिरे तर होतीच. पुढे मुसलमान काळात मोठमोठ्या मशिदी, त्यांची ती अतिप्रचंड प्रशस्त आवारे, इ. पाहून आपल्या देवळांतही तसे फीचर्स आणण्याचे काही प्रयत्न झाले. अन हे सर्व दक्षिणेतच झाले हे उल्लेखनीय आहे, कारण देऊळ ही कन्सेप्ट दक्षिणेकडे खर्‍या अर्थाने सोशल इन्स्टिट्यूषन होती. अन्य ठिकाणापेक्षा सोषल पार्टिसिपेषन जास्त असे. टिपिकली, हिंदू देवळांचे मंडप लय मोठे नस्तात, कारण तिकडे फार लोकांनी फार वेळ घालवणे अपेक्षितच नस्ते. उत्तरेतली कलचुरी-चंदेल राजवटीतली नागर शैलीतली देवळे पाहिल्यास याचे लग्गेच प्रत्यंतर येईल. पण मुसलमान अंमलात हे अंमळ बदलले. कैक देवळांत १००० पिलर हॉल अर्थात सहस्रखांबी मंडप बांधण्यात आले. याची आत्ता मला दोन उदा. आठवताहेत, पैकी एक म्हंजे मदुरै इथले मीनाक्षी मंदिर. अ‍ॅक्च्युअल नंबर ऑफ पिलर्स हे ९५३ की ९८५ असे काहीसे आहेत. तर सांगण्याचा मुद्दा असा की ही शिल्पकला दक्षिणेत टिकून राहिली. माझ्या फेबु मित्रयादीत श्री. गुडिगार पुत्तस्वामी नामक एक शिल्पी आहेत, ते स्वतः पारंपरिक पद्धतीने चालुक्य-होयसळ इ. शैलीत मूर्ती अजूनही हुबेहूब बनवतात. गोव्यात त्यांचा शिल्पलोक नामक स्टुडिओ आहे.

तर सांगायचा मुद्दा असा, की येस- याबद्दल बरंच लेखन झालेलं आहे. दुवे जरा पाहून सांगतो.

अजो१२३ Wed, 27/08/2014 - 11:05

सहसा औषधाच्या गोळ्या जेवणानंतर ५-१० मिनिटांनी का घेतात? जेवणात, लगेच वा उपाशी असताना का नाही? जेवण आधी असिमिलेट झाल्याने गोळ्यांमधील क्षार अनावश्यक ठरायची संभावना नाही का?
-----------------------------------
माझ्या लहानपणी नि अगदी परवापर्यंत डॉक्टर लोक पथ्ये सांगत. तापात वैगेरे हमखास. आजकाल कोणताही डॉक्टर (ऑपरेशन नसले तर) एकही पथ्य सांगत नाहीय. का? (डायेटिशियन ने डायट रिकमेंड करणे वेगळे)

अजो१२३ Wed, 27/08/2014 - 13:59

क्ष च्या अँड्रॉइड मोबाईलवरचे २ गीबीचे कार्ड आणि आंतरिक स्मृती जवळजवळ पूर्ण भरली तर तो सारा विदा संगणक न वापरता य च्या अँड्रॉइड मोबाईलवर कसा न्यायचा?
दोन्ही मोबाईलवर महिन्याला ८-१० जीबी डाउनलोडचा इंटरनेट प्लअ‍ॅन आहे.
१. ब्लू टूथने कनेक्ट केल्यावर पुढे काय करायचे? ही ट्रान्सफर स्पीड ठिक असते का?
२. गुगल ड्राईववर फाईल्स एक एक करून टाकाव्या लागतात. असं हजारो फोटोंचं इ अपलोड आणि डाउनलोड करणं बोरींग आहे.
३. कोणतं अ‍ॅप आहे.
४. क्लाऊड?
---------------------------
क्ष च्या फोनचे २ गीबीचे कार्ड काढून य च्या मोबाईलमधे घालता येईल. सार्‍या फाईल्स ट्रान्सफर करता येतील. पुन्हा इंटर्नल मेमरीच्या फाईल्स य च्या कार्डावर टाकता येतील. पण असे फिजिकल कार्डे बदलणे अभिप्रेत नाही.
--------------
अगदी संगणक, ब्लूटूथ, आणि फिजिकल कार्ड बदलणे न करता दूरच्या (समजा दूसर्‍या गावच्या, इ) फोनवरील जास्त मेमरी घेणार्‍या जास्त संख्येच्या फायली परवानगीने घेता येतात का? उदा. मी भावाच्या पुण्यातील मोबाईलमधून त्याच्या परवानगीने त्याच्या मुलाच्या वाढदिवसाचे १५० फोटो दिल्लीत बसून स्वतःच्या मोबाईलमधे(एका झटक्यात) घेणे.

ऋषिकेश Wed, 27/08/2014 - 14:08

हाफिसात असताना रडू आल्यावर मुली** रडायला (अख्ख्या फ्लोअरचे लक्ष वेधत) रेस्टरूममध्ये का पळतात?

त्यांना रडायला एकांत हवा असतो म्हटले तर त्यांच्या मागे त्यांच्या चार सख्याही पळतात (त्या त्यांना कशा चालतात!)?
का ही केवळ अटेंशन सिकिंग ट्रीक आहे?
का रेस्टरूममध्ये(च) छान रडता येते?
का पाण्याची सहज उपलब्धता हे कारण आहे?
का आरशांत बघुन एकीकडे रडत असताना आपला मेकप/केशरचना बिघडली तर नाहि ना हे त्या बघत असातात?
का आतमध्ये जाऊन चक्क हसून घेतात, चार मैत्रिणी मिळून टिवल्या बावल्या करतात नी पुन्हा लांब चेहरे करून बाहेर येतात?

==
** सदर प्रकार# करताना अजून तरी मुलाला बघितलेले नाही, म्हणून हे लिंगभेदी वर्गीकरण करतोय. तसा अनुभव असल्यास इथे व्यक्ती व पुढिल परिच्छेद लिंगनिरपेक्षतेने वाचावा. (पण प्रश्नांचे उत्तर द्यावे )
# म्हणजे रडताना पाहिले आहे, रडून/रडत रेस्टरूममध्ये धावताना नाही

बॅटमॅन Wed, 27/08/2014 - 14:13

In reply to by ऋषिकेश

रोचक निरीक्षण आहे. आजवर कुंपिणीत १-२ पोरी रडताना पाहिल्या, पण त्या रेष्टरूममध्ये नव्हत्या गेल्या. जे कै कारण असेल त्यावर मनःपूत समक्षच रडताना पाहिलेले आहे.

मेघना भुस्कुटे Wed, 27/08/2014 - 14:31

In reply to by ऋषिकेश

१. आपल्याला रडायला येतं आहे म्हणजे आपल्यात काहीतरी कमतरता आहे, अशी समजूत असते. चूक की बरोबर ते माहीत नाही. बहुधा चूकच. पण अशी समजूत असते. मलाही माझ्या पालकांनी अनेक वेळा समजावलं आहे, "रडायला आलं तर काय झालं? रड की बिनधास्त. पण तुला जे बोलायचं आहे, ते बोलायची राहू नकोस." पण तरीही रडण्याची लाज वाटू शकते. म्हणून बहुतेक मुली* तिकडे जाऊन रडत असाव्यात.

२. रडायला आल्यावर नाक-डोळे लालवटतात. नाकाला पाणी येतं. ते पूर्ववत करण्यासाठी चेहरा धुणे, पाणी पिणे हा प्राथमिक उपाय असतो. म्हणूनही तिकडे जाणं सोईचं जात असावं.

३. तिकडे गेल्यावर मोकळेपणानं मैत्रिणींशी बोलता येतं. शिव्या घालता येतात. अद्वातद्वा बोलता येतं, जे फ्लोअरवर शक्य नसतं. भडास काढून माणूस मोकळा होतो.

सांग, पुरेशी आहेत का ही कारणं?!

*मीही मुलांना रडून / रडत त्या दिशेनं धावताना पाहिलेलं नाही.

अनुप ढेरे Wed, 27/08/2014 - 14:36

In reply to by ऋषिकेश

माझ्या टीममध्ये मेकॅनिकल ब्रांचचा वर्ग स्वर्ग वाटेल असा सेक्स रेशो आहे. त्यामुळे असा प्रसंग मी तरी पाहिलेला नाही अजून.

चिंतातुर जंतू Wed, 27/08/2014 - 14:37

In reply to by ऋषिकेश

>> हाफिसात असताना रडू आल्यावर मुली रडायला (अख्ख्या फ्लोअरचे लक्ष वेधत) रेस्टरूममध्ये का पळतात?

माझ्या काही मैत्रिणींना आणि मित्रांना चारचौघांत रडायला अजिबात आवडत नाही. त्यांच्या स्व- प्रतिष्ठेच्या कल्पनेत ते बसत नाही. अशा वेळी अनेक ठिकाणी खाजगी अवकाश मिळू शकेल अशी जागा रेस्टरूम असते. मैत्रिणी मागे धावल्या तरी त्या 'चारचौघां'त गणल्या जात नसतात. त्यांच्या समोर खुशाल रडता येतं. अंत्ययात्रेसारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रयत्नपूर्वक रडू आवरणारे, पण आधी/नंतर खाजगीत मित्रांसोबत रडणारे पुष्कळ पुरुष मी पाहिले आहेत.

ऋषिकेश Wed, 27/08/2014 - 14:42

In reply to by ऋषिकेश

हॅट. मेघना आणि चिंजंने प्रामाणिक उत्तरे देऊन मजाच घालवली! :P ;)
असो. आभार! :)

मला रडु आले की मी सरळ रडु लागतो. माझे कित्येक मित्र-मैत्रीणींनाही मुक्तकंठाने/डोळ्याने अनेकदा रडताना पाहिले आहे.
मात्र हा प्रकार (रडत रडत तिथे धावत जाण्याचा) प्रकार गेल्या काहि वर्षातच मला दिसला आहे. रडण्याबद्दलच्या लोकांच्या कल्पना बदलल्या आहेत की हे आधीही होत होते फक्त माझे लक्ष जात नव्हते?

अजो१२३ Wed, 27/08/2014 - 15:27

In reply to by ऋषिकेश

लिंगनिरपेक्ष, लिंगनिरपेक्ष म्हणत तू बायकांवर कामापेक्षा जास्त नजर ठेवतोस. तू आहेस ना लिंगनिरपेक्ष? मग विसर ना त्यांना!

ऋषिकेश Wed, 27/08/2014 - 15:36

In reply to by अजो१२३

तू बायकांवर कामापेक्षा जास्त नजर ठेवतोस

मुळात मी पुरूषांपेक्षा बायकांवर नजर जास्त ठेवली असती तर लिंगनिरपेक्ष नसल्याचा आरोप ग्राह्य होता. (तरी योग्य नाहीच, कारण मी जैविक बाबतीत जसे आकर्षणात लिंगनिरपेक्ष असण्याचा आग्रह कधीही धरलेला नाही)

अन् ऑफिसचे काम हे लिंग नव्हे!

असो.

अजो१२३ Wed, 27/08/2014 - 15:31

In reply to by ऋषिकेश

हाफिसात असताना रडू आल्यावर मुली** रडायला (अख्ख्या फ्लोअरचे लक्ष वेधत) रेस्टरूममध्ये का पळतात?

१. जास्त नाजूक प्रसंगी पुरुष जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करतात. ते टाळण्यासाठी.
२. लोकांना कामात व्यत्यय येऊ नये म्हणून.
३. बायकांचा आवाज हाय पिच असतो. सुदुरचे लोक आस्थेवाईकपणे येऊ नयेत म्हणून.

गवि Wed, 27/08/2014 - 15:40

In reply to by अजो१२३

स्त्रीचे अश्रू तातडीने थांबवलेच पाहिजेत हा नियमच आहे.

"क्या हुआ बेबी?"
"मैं अभ्भी घर छोड देता हूं.. चल छोड दे काम.."
"चलो .. तुम अभ्भी मेरे साथ एक कप कॉफी पी रही हो.. मैं कुछ नही सुननेवाला"
"सिर्फ बताओ, कौन हॅरॅस कर रहा है तुम्हे ?"

पोरगा रडला की:

"अब क्या हुआ भें**.. रोते ही रहियो हमेशा..दुखभरी.."

मी Wed, 27/08/2014 - 15:39

In reply to by ऋषिकेश

एकदा पर्फोर्मन्स रिव्ह्यू चालु असताना मुलगी रडायला लागली तेंव्हा रिव्ह्यू थांबवून 'आपण मिटींग रुमच्या बाहेरच' बसु असे मात्र मी सांगितले होते, त्यामुळे रडलेच तर चारचौघात रडा, एकांतात नको असे मला वाटते, उगाच मला रडायची वेळ यायला नको.

सुनील Wed, 27/08/2014 - 15:51

In reply to by ऋषिकेश

त्यांना रडायला एकांत हवा असतो म्हटले तर त्यांच्या मागे त्यांच्या चार सख्याही पळतात

एका मुलीला जास्तीत जास्त दोन 'सख्या' असू शकतात, असे नुकतेच वाचनात आले!

चार सख्या म्हणजे दोन ग्रूप्सचे अम्लग्मेशन झाले असे समजावे काय?

गवि Wed, 27/08/2014 - 15:58

In reply to by बॅटमॅन

( त्या मागे पळत गेलेल्या चारपैकी किती न्येमका माहितीरुपी भानगडऐवज हस्तगत करुन अन्यत्र गरजूंना त्याचे वाटप करण्याच्या हेतूने गेल्या असाव्यात हे कसे शोधता येईल ? )

बॅटमॅन Wed, 27/08/2014 - 16:01

In reply to by गवि

१. काय झालं? (बाळ?) रडत होतं का?
२. ती ना, &^%$ आहे.

अशा टिप्पण्यांचा मारा करोन पहावा. अनफेवरेबल उत्तर आले तर ती चि.वि.का. (चिरंजीव विदाकांक्षिणी) नाही, फेवरेबल उत्तर आले तर चिविका.

धर्मराजमुटके Thu, 28/08/2014 - 13:54

In reply to by बॅटमॅन

जमाना बदल गया है !

हम दो हमारी क्रिकेट टीम
हम दो हमारे दो
हम दो हमारा एक
सिर्फ हम और तुम
तु तेरा मै मेरा.

गवि Wed, 27/08/2014 - 16:07

In reply to by सुनील

चार सख्या म्हणजे दोन ग्रूप्सचे अम्लग्मेशन झाले असे समजावे काय?

सुनीलदा, काय हो असे अननुभवीसारखे प्रश्न विचारता.

कोणीतरी रडत पळत रेस्टरुमात गेलेली दिसली की दोनच काय, सार्‍याच उपस्थित ग्रुप्सची एकात्मता होऊन समग्र समाज एकत्र येतो.."काय ते कळले पाहिजे बॉ.." या आदिम प्रेरणेने..

पुलंच्या नारायणमधे नाही का? "अमुकच्या लग्नात झाली तशी भानगड व्हायला नको" म्हटल्यावर.. "भानगड" या एका शब्दाने समस्त मित्रशत्रूस्त्रीगट एकत्रितपणे "कसली भानगड SSS??" असं विचारतात.

पुरुष / मुलगा रडत रेस्टरुममधे गेला तर त्या त्याच्यामागे आत जाऊच शकणार नाहीत म्हणून.. नायतर..

;)

अस्वल Thu, 28/08/2014 - 10:05

https://www.youtube.com/watch?v=2w2qAm6KjZk
ह्या गाण्यात "पाव मे" तोडा -कमरी करगोटा असं म्हटलंय.
ते चूक वाट्तय.
पाउली तोडा हवं किंवा पाउले तोडा - ह्यातलं काही आहे का?
हा सध्याचा मनातील मोठा प्रश्न आहे

धर्मराजमुटके Thu, 28/08/2014 - 14:08

In reply to by अस्वल

पायात तोडा आणि कमरेला करगोटा. वाक्यरचना बरोबरच आह
बाय द वे आजकाल करगोटा वापरतात काय ?

धर्मराजमुटके Thu, 28/08/2014 - 13:51

पाश्चिमात्य देश किंवा भारतातील शहरांत राहणारे लोक तांत्रिकदृष्ट्या पुढारलेले असतात असे वाटते. मग बर्‍याच हॉलीवूड किंवा बॉलीवूड पटात जेव्हा व्हिलन हिरोला किंवा त्यांच्या कुटुंबाला मारायला येतो तेव्हा ते घराचा दरवाजा उघडतात आणि व्हिलन किंवा त्याचे कामगार आत घुसतात. हे हुशार घरमालक आपल्या दरवाज्याला पीपहोल का ठेवत॑ नाही ?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 29/08/2014 - 22:09

In reply to by धर्मराजमुटके

ते लोक बहुदा दोन दरवाजे बनवत असतील. गुंडांना तोडमोड करायला एक स्वस्तातला, पीपहोल शिवाय असणारा दर‌वाजा आणि दुसरा आलोकनाथ वगैरे लोकांसाठी, महागातला, सागवानी लाकडातला, पीपहोल असणारा.

(सदर प्रतिसाद एका मैत्रिणीला आणि मित्राला अर्पण.)

अस्वल Fri, 29/08/2014 - 22:12

In reply to by धर्मराजमुटके

व्हिलनसुद्धा तांत्रिकदृष्ट्या पुढारलेला असतोय की.
तो त्या पीपहोलवर बोट ठेवतो- मग हिरो काय करील?
आता एवढं सगळं दाखवण्यापेक्षा ते डायरेक्ट पुढे जाऊन मारामारी किडन्यापिंग वगैरे महत्त्वाच्या विषयांकडे वळतात.

धर्मराजमुटके Fri, 29/08/2014 - 22:18

In reply to by अस्वल

त्ये व्हिलनला हिरो गावत नसल जिता माराया तर तेच्या आयाभनींना पकडतयं. आय बा मरुन गेलं आस्तील तर हिरोच्या मयतरनीला पकडून नेतय. बाब्बो ! पार हिस्ट्री-ज्यॉग्रापी ठेवाया लागतीया हिरोची. बर शेवटाला हिरो गावला तर मारायची ना गोळी पटकनी. तर त्येच्यायला व्हिलनला डॉयलॉक मारायची खाज सुटतीया. आसा डॉयलॉक मारुनशान हिरो मरतोय व्हय ?

'न'वी बाजू Fri, 29/08/2014 - 22:21

In reply to by अस्वल

व्हिलनसुद्धा तांत्रिकदृष्ट्या पुढारलेला असतोय की.
तो त्या पीपहोलवर बोट ठेवतो

त्याकरिता व्हिलनास तांत्रिकदृष्ट्या पुढारलेले असण्याची काहीही गरज नाही. कॉमनसेन्स पुरेसा आहे.

सविता Mon, 01/09/2014 - 13:56

In reply to by मी

बरोबर.. ते टक्कल करून, बिल्ल्य बिल्ल्याचा झँग ड्रेस आणि दहा बोटात दहा अंगठ्या घालून, "माय...मोगॅम्बोला दरवाजा उघडते का?" असे म्हणत येत नाहीत.

मी Mon, 01/09/2014 - 20:07

गाडी चालवताना रस्त्यावरचे सिग्नल तुम्ही पाळता काय? पाळत असाल तर का पाळता आणि नसाल तर का पाळत नाही? मी स्वतः रहदारी विस्कळीत होणार नाही ह्याची खात्री करूनच सिग्नल पाळतो किंवा तोडतो.

मन Mon, 01/09/2014 - 20:16

In reply to by मी

पाळतो.पण कधीकधी नियम पाळणेच जीवावर बेतू लागते, तेव्हा जीव वाचवण्यापुरते नियम तोडावे लागतात.
उदा :- सिग्नलवर दुचाकीवाला उभा असताना मागून प्रचंड हॉर्न वाजवत चारचाकी वाहन मागे येणे.
अशा वेळी जीव वाचवायचा असेल तर पुढे जाणं भाग पडतं. हे पुण्यात अनुभवलं आहे.

घाटावरचे भट Tue, 02/09/2014 - 10:40

In reply to by मन

परवाचीच गोष्ट. आमचे सर्व कुटुंब चारचाकी वाहनातून कर्वे रस्त्याने चालले होते. भाऊ गाडी चालवत होता. गरवारेच्या अलीकडच्या चौकात सिग्नल लागल्याने भावाने थोडा अर्जंट ब्रेक लावला. तर आमच्या गाडीला मागचे स्कार्प्यो, तिला मागची व्यागनार, तिला मागची स्विफ्ट अशी धडक झाली. आमच्या गाडीचं १०-१५ हजाराचं नुस्कान झालं. व्यागनार वाला तर पार गाळात गेला असणार याची खात्री आहे. सुदैवाने मधे स्कार्प्यो असल्याने आमच्या गाडीला मेजर काही झालं नाही (मला व्यागनार धडकल्याने मी तुम्हाला धडकलो असे स्कार्प्योवाला म्हणाला. जे प्रथमदर्शनी ड्यामेज पाहता खरे वाटले). असो.

मन Tue, 02/09/2014 - 11:05

In reply to by घाटावरचे भट

अशा अनुभवाच्या रिसिव्हिंग एण्डला कैकदा राहिलेलो आहे. वेदना समजू शकतो.

............सा… Tue, 02/09/2014 - 01:32

पहाटे उठलं की माझा पहीला "लुक फॉर्वर्ड" क्षण कोणता असतो? तर कागदी वर्तमानपत्र वाचनाचा. पुढची बस येइपर्यंत १५ मिनीटे, मॅक डीत, निवांत कॉफीचे घुटके घेत "USA today" चा व्हर्जिन, कोराकरकरीत अंक हाताळत/वाचण्याचा. अन मग तोच कार्यक्रम पुढे बसमध्ये कंटिन्यु करण्याचा, पहील्यांदा हेडलाइन बातम्या मग लगेच ओपिनिअन पोल आह्हा!!! हे २ विभाग सुभानल्ला! अन मग मनी, स्पोर्ट्स अन ग्लॅमर्/ड्रामा.

त्यासंदर्भात माझा एक प्रश्न आहे-

कागदी वर्तमान्पत्र वाचताना मेंदू इतका एक्साईट का होतो, ऑनलाइन बातम्या वाचताना का होत नाही? उदाहरणार्थ, एखादा चमकदार शब्द कागदी वर्तमानपत्रात वाचला की चटकन मेंदूत फायरी स्पार्क्स (मुद्दाम स्ट्रेस आणण्यासाठी द्विरुक्ती योजली आहे) उडतात याउलट तोच शब्द ऑनलाइन बातमीत वाचूनही एखाद्या अनोळखी वाटसरुसारखा समोरुन निघून जातो.
माझ्या पिढीतील लोकांचे पहीले प्रेम कागदी पुस्तकांवर असल्याने असे होते का?

यन्त्रमानव Tue, 02/09/2014 - 02:59

ह्या वर्षीचे ईन्कम टॅक्स रिटर्न्स भरणेची अंतीम मुदत संपली आहे का ? दंडा-सहित ईन्कम टॅक्स रिटर्न्स भरु शकत असल्यास:

१. मी भारतात असताना माझ्या पगारातुन Tax projection प्रमाणे TDS रक्कम ४-५ महिने कापली गेली.
२. मी परदेशी आल्याने, allowance, tax deductions यांची कपात करुन माझे उत्पन्न १.५ लाख रुपयांपेक्षा कमी भरले.
३. आयकर नियमानुसार माझे उत्पन्न १.५ लाखांपेक्षा जास्त नसलेने मला कर भरावा लागणार नाही.
४. TDS मध्ये कापले गेलेले पैसे कसे परत मिळवावेत ? :(

~यन्त्रमानव.

अतिशहाणा Tue, 02/09/2014 - 05:40

In reply to by यन्त्रमानव

जर तुमचा टीडीएस (नोकरीच्या पगारातून) कापला गेला असेल तर (रिफंड असो वा नसो) ट्याक्स रिटर्न भरावा लागेल असे वाटते. शिवाय ट्याक्स रिफंड मिळवण्यासाठीही ट्याक्स रिटर्न भरणे आवश्यक आहे. ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख होती असे वाटते. दंडासहित भरता येईल असे वाटते.

मन Tue, 02/09/2014 - 09:45

In reply to by यन्त्रमानव

अंतिम तारिख ठाउक नाही. (खरेतर दंड भरण्याची तयारी असल्यास अशी काही तारिख नसावी अशी माझी समजूत आहे.)

ट्याक्स रिटर्न भरलेला बरा. रिफंड असो वा नसो, ट्याक्स रिटार्न भरुन ठेवा. नंतर विविध ठिकाणी कामाला येतो.
सरकारी यंत्रणेच्या नजरेत तुमची विश्वासार्हता दोन आणे वाढते.(उदा :- ब्यांकांकडून कर्जे वगैरे मिळवताना. )
आणि जर रिफंड मिळवायचाच असेल तर ट्याक्स रिटर्न भरायला पर्याय नाही.
मी स्वतः चार दोन सी ए फर्मचे नम्बर जस्ट डायल/कॉल मी/आस्क मी वाल्यांकडून मिळवले.
त्यांच्याशी चर्चा करुन काय ते ठरवले. ट्याक्स रिटर्न भरायचा तर आताच काय डिसेम्बरातही भरणे शक्य असावे.
फक्त जितका उशीर कराल तितका दंड वाढत जाइल. (बहुतेक ती ब्रॅकॅत महिन्याची आहे. म्हणजे १ सप्टेंबरास रिटर्न भरले काय आणि ३० सप्टेंबरास भरले काय, दंडाची टक्केवारी तीच राहणार. पण ३० सप्टेंबरला जितके टक्के दंड लागेल, त्याहून थोडा अधिक दंड १ ऑक्टोबरला भरायला लागेल.)

सुनील Tue, 02/09/2014 - 10:26

In reply to by मन

माझ्या माहितीनुसार जर टॅक्स भरायचा बाकी नसेल तर दोन वर्षांपर्यंत रिटर्न्स (कोणत्याही दंडाशिवाय) भरता येतात. पण जर टॅक्स भरायचा असेल तर दंड अधिक व्याज दोन्ही भरावे लागेल आणि ते जेवढा उशीर कराल तेवढे वाढत जाईल.

ॲमी Tue, 02/09/2014 - 11:12

In reply to by सुनील

माझ्या माहितीनुसार
* जर रिटर्न मिळणार असेल तर ३१जुलैपर्यंत,
* रिटर्न मिळणार नसेल तर पुढच्या ३१मार्चपर्यंत. मंजे FY १३-१४ चा रिटर्न ३१मार्च १५पर्यंत फाइल करता येतो.
* या तारखा नाही पाळल्या तर दंड &/ व्याज

सविता Tue, 02/09/2014 - 13:42

जिथेतिथे इंग्लिश वाप्रून डोक्यातले विचार पण आता त्याच भाषेत होतात असे लक्षात आलं. आजूबाजूचे मिंग्लिश नाहीतर हिंग्लिश ऐकून वैतागले होते मग मनातल्या मनात काहीतरी "मराठी वापरले पाहिजे" याचे स्पष्टीकरण म्हणून स्वगत, संवाद चालू असताना एक पुर्ण अगदी छोटं वाक्य मराठीत म्हणायला (मनातल्या मनात) मला तब्बल पाच वेळा (हो मोजून) प्रयत्न करावा लागला.

1. "Damn these people, feel inferior to talk in their mother tongue"

2. "And why the hell I am saying this in English then?"

3. "oops..not again"

4. "Shit...please...."

5. अर्र..काय आहे हे!!!!... (शेवटी जमलं)

हुश्श्य... कधीचं हे मला लिहायचं होतं!

असे स्वतःशी संवाद झाल्यानंतर मी माझ्या मराठीच्या एकूणच आग्रहाबद्दल साशंक आहे.

जिथे माझ्यासारख्या (सो कॉल्ड - आलंच परत इंग्लिश) मराठी अभिमानी व्यक्तीची ही कथा, तिथे ज्यांना मुळात विशेष प्रेम नाही त्यांना काय बोलणार?

ऋषिकेश Tue, 02/09/2014 - 14:11

In reply to by सविता

सो कॉल्ड - आलंच परत इंग्लिश

तुम्ही जालावरील प्राणप्रिय "तथाकथित" हा शब्द विसरलात! हा हन्त हन्त! जालीय हाणामारीत कसा निभाव लागणार ;)

अनुप ढेरे Tue, 02/09/2014 - 14:39

In reply to by ऋषिकेश

हा हा हा.
तथाकथित हा शब्द खरच पावरबाज आहे. 'बेगडी' हा शब्दही पावरबाज आहे. वापरायला सुरुवात केली पाहिजे. :)

गवि Tue, 02/09/2014 - 14:49

In reply to by बॅटमॅन

अमुक हे विधान वाचून:

"गंमत वाटली", "करमणूक झाली", "विधान रोचक वाटले"

(इत्यादि सर्वाचा अर्थ म्हणजे वाचून पुरेसे वर्मी लागले, मनस्ताप झाला, बोचले, टोचले, आग झाली, चीड आली इ इ.)

हेही अ‍ॅडवा..

मेघना भुस्कुटे Tue, 02/09/2014 - 14:43

In reply to by सविता

मी त्या त्या वेळी जे वाचत किंवा बघत असेन, त्याबरहुकूम माझ्या डोक्यातली भाषा बदलते. सध्या (म्हणजे गेले अनेक महिने) इंग्रजीतून शेरलॉकीय फॅनफिक्शन वाचत असल्यामुळे तोंडात फार इंग्रजी येतं. पण म्हणजे लगेच मी माझा भाषिक आग्रह सोडून द्यावा की काय? इंग्रजीचंच कशाला, ऐतिहासिक कादंबरी वाचताना भाषा भारदस्त होते. 'राडा' नाहीतर 'वासूनाका' वाचताना आपोआप तोंडात भकार येतात.

त्यानं आपलं भाषाप्रेम वा भाषाद्वेष का बरं सिद्ध व्हावा?

सविता Tue, 02/09/2014 - 14:51

In reply to by मेघना भुस्कुटे

माझा मुद्दा इतकाच की:
मी मुख्यत्वेकरून जर इंग्रजी वापरत असताना माझे विचार त्या भाषेत येत असतील तर तीच भाषा बहुतांश रित्या वापरणार्‍या मित्रमंडळात वावरल्याने जेव्हा आजूबाजूच्या मराठी मंडळींची पुढची पिढी एक्मेकांत गप्पा मारताना इंग्रजीच फाडू लागली तर त्यांना हटकायचा अथवा हिणवायचा नैतिक अधिकार मला नाही हे माझ्या लक्षात आले.

माझे मराठीप्रेम बदलले नाही पण त्या फूटपट्टीवर दुसर्‍याला मोजणे चूक वाटतेय.

गवि Tue, 02/09/2014 - 15:01

In reply to by सविता

विचार भाषेत येतात असे कितीही भासले तरी असं होऊ शकत असण्याविषयी मला जबरदस्त शंका आहे.

स्वप्ने रंगीत की ब्लॅक अँड व्हाईट यासारखा हा मुद्दा आहे.

स्वप्ने ही प्रत्यक्ष दृश्ये नसतात तर मनाच्या आतच उद्भवलेल्या सिग्नल्सची इंटरप्रिटेशन्स असतात. त्यांना मुळात रंग आहेत की नाहीत हा मुद्दा अप्रस्तुत ठरतो कारण बाह्य व्हिज्युअल स्टिम्युलसशिवायच (ती पायरी गाळून) "थेट" इंटरप्रिटेशनचा भाग घडत असतो. त्यामुळे स्वप्नातला गालिचा लाल आहे की हिरवा हे अप्रस्तुत ठरतं.

स्वप्नं पडत नाहीत तर जाणवतात.

तसंच मनातले विचार हे कोणत्यातरी अ‍ॅबस्ट्रॅक्ट संकेतांच्या स्वरुपात येत असून ते मनात येत असतानाची "भाषा" ही इंग्रजी, मराठी अशा स्पोकन किंवा रिटन लॅन्ग्वेजेसपैकी एक असणे शक्य नाही.

विचाराच्या आधारे त्याचं एक युनिट संपल्यावर, आपण स्वतःशी बाह्यप्रकारे काहीतरी बळंच, कृत्रिमपणे स्वगत "बोलतो" तेव्हाच भाषा हा भाग उद्भवतो.आणि त्यालाच आपण विचाराची भाषा समजतो.

असं माझं मत आहे. खखोदेजा.

ऋषिकेश Tue, 02/09/2014 - 15:06

In reply to by गवि

स्वप्ने ही प्रत्यक्ष दृश्ये नसतात तर मनाच्या आतच उद्भवलेल्या सिग्नल्सची इंटरप्रिटेशन्स असतात. त्यांना मुळात रंग आहेत की नाहीत हा मुद्दा अप्रस्तुत ठरतो कारण बाह्य व्हिज्युअल स्टिम्युलसशिवायच (ती पायरी गाळून) "थेट" इंटरप्रिटेशनचा भाग घडत असतो. त्यामुळे स्वप्नातला गालिचा लाल आहे की हिरवा हे अप्रस्तुत ठरतं.

सध्या काय पाहिलंत मध्ये जो मी बनी अँड द बुल्स म्हटलंय ना तिथे याचाच (एग्झॅक्टली हा प्र्कार नाही पण तत्सम) दृश्य अविष्कार दाखवला आहे.
नायकाच्या आठवणीतल्या बहुतांश प्रसंगाच्या आठवणीत वृतपात्रांच्या टेक्श्चरचे ढोबळ नेपथ्य पार्श्वभूमी म्हणून वापरले आहे (लाईव्ह अ‍ॅनिमेशन वापरून) तर जो "लाईफ चेंजिंग" प्रसंग आहे, फक्त तोच प्रत्यक्ष शूट केलाय

आठवणीतील व्यक्ती, संवाद स्पष्ट आठवताहेत, परिसर हलकासा आठवतोय हे अगदी छान दाखवलेय. मात्र महत्त्वाच्या प्रसंगातील प्रत्येक तपशील मेंदूतून पुसला गेलेला नाहिये हे मात्र प्रत्यक्ष शुटिंगने दर्शवले आहे! मला हा प्रकार तुफान आवल्डा!

बॅटमॅन Tue, 02/09/2014 - 15:00

In reply to by सविता

हँ, किन्तु एखाने आरो अ‍ॅकटा ब्यापार आछे. प्रोत्तेक ब्याक्तिर कोन भाषाय बोलार ओभ्भास आछे तॅमोन शे शेइ भाषाय बोलबे. किन्तु प्रोतिष्ठा, शॉम्मान, गॉर्बो, हॅन-तॅन भेबेचिन्ते जोदि निजेर भाषार त्याग कोरे इंग्राजी बा ऑन्नो कोनो भाषाय बोलबे ताहोले शेइ ब्यॅक्ति-टा के की निजेर भाषार भालोबाशी बोलबे? एटा तो ओद्भुत जिनिश. आर ऑनेक शॉमोय देखेछि जे एराकोम लोकेरा इ शॉबशोमोय इंग्राजीते कॉथा बॉले, सेजोन्नो एइ आर्गुमेंट-टा भूल मोने होच्चे.

घाटावरचे भट Tue, 02/09/2014 - 14:53

In reply to by मेघना भुस्कुटे

मी त्या त्या वेळी जे वाचत किंवा बघत असेन, त्याबरहुकूम माझ्या डोक्यातली भाषा बदलते.

सहमत. यह मेरे साथ भी होता हय.

मन Wed, 03/09/2014 - 19:39

कधी मांढरदेवी, कधी काळूबाईची यात्रा कधी मक्क्याची हजयात्रा ह्या सगळ्यात भयानक चेंगराचेंगरी होउन लोकांचे जीव गेले होते.
अधून मधून अशा बातम्या येत असतात.
क्वचित विचार करु लागल्यावर; ह्या घटना घडणार हे ठाउक असतानाही तिथे जाउन गर्दी वाढवणार्‍या भाविक मंडळींबद्दल सहानुभूती वाटत नाही.
अत्यंत हाल वगैरे सोसून , गर्दी वाढवत स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणार्‍या लोकांबद्दल तितकसं वाईट वाटत नाही.
वाटलच तर आश्चर्य वाटतं.

तुम्ही ह्या भाविक लोकांकडे कसे पाहता ?
.
.
.

आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपुरास, किरणोत्सवाच्या वेळी कोल्हापूरास वगैरे जाणार्‍या लोकांचं सरकार आणि एकूणातच समाज "भाविक लोक"(सज्जन, चांगले लोक ह्या अर्थानं) , "भाविकांची सोय पाहिली पाहिजे" असं गौरवीकरण का करतो ?
सरकारनं आणि विविध संस्थांनी ह्या मंडळींना गर्दी करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करायला नको का ?
निदान गौरवीकरण तरी थांबवता येइल ना ?
वारकरी जायला लागले की लगेच "भाबडी आणि चांगली माणसं वारीला निघाली" ,"किती किती ती चांगली वारी" ह्या सुरात का बोलतात ?
वारीचा मुक्काम पडून गेल्यानंतर दुसर्‍या दिवशी त्या जागेचं काय होतं ह्याची कुणालाच कल्पना नाहिये की बोलायचं नाहिये ?
पंढरपुराच्या वाळवंटावरही इतक्या गर्दीचा ताण पडत असणारच.
तुम्ही ह्या भाविक लोकांकडे कसे पाहता ?
.
.
.

आता ह्याची तुलना प्लीझ मुंबैसारख्या शहरातील लोकल,मेट्रो ह्यांच्याशी नको.
त्यांना लटकणं ऐच्छिक नाही.लोकलला लटकून प्रवास करणं टाळता येण्यासारखं नाही.
लोकल टाळणं प्रत्यक्षात possible असलच तरी सर्वांसाठी feasible असेलच असं नाही.

ता क :-
मला अं नि स चं विशेष कौतुक वाटतं ते त्यांनी हाती घेतलेल्या प्रश्नाबद्दल.
समाजाच्या भल्यासाठी ही मंडळी वाईटपणा घ्यायला तयार आहेत.
ही खरच मोठी गोष्ट आहे. व्यसनमुक्ती, शिक्षणास अर्थसहाय्य वगैरे गोष्टी करुनही "आपण समाजाचं ऋण फेडतो आहोत" असं वाटणं चूक नाहिच.
पण वाईटपणा घेउन चार भल्याच्या गोष्टी सांगणे; ह्यासाठी जबरदस्त धैर्य लागतं.
अर्थात अं नि स सुद्धा पुष्कळच मवाळ म्हटली पाहिजे. कारण त्यांना लोकांमध्ये राहून ,मिसळून प्रत्यक्ष ऑन ग्राउंड काम करायचं आहे.
त्यामुळे ते "धर्माबद्दल आमचं काही म्हणणं नाही. देवाबद्दलही आम्हाला आक्षेप नाही. पण अंधश्रद्धांना विरोध आहे." अशी सौम्य भूमिका घेतात.
"देवाला रिटायर करा" अशी भूमिका अं नि स घेत नाही.
समजू शकतो. पण ह्या यात्रांच्या आणि गर्दीच्या गौरवीकरणाचं काहीतरी करणं नितांत आवश्यक आहे; गर्दित सामील होणार्‍यांच्याच भल्यासाठी!

मी Wed, 03/09/2014 - 19:52

In reply to by मन

हे सगळं एकंदर उत्सवाच्या ठिकाणी होऊ शकतं (उदा. जर्मनीमधे लव्हपरेड संगीत उत्सवात चेंगरा-चेंगरी झाली), उत्सव धार्मिक किंवा इतर कारणांसाठी असु शकतो, जनतेला एकत्र येण्यापासुन थांबवण्यापेक्षा त्यासाठी पुरक सोयी करणे अधिक महत्त्वाचे ठरते, उत्सवाच्या निमित्ताने अनेक चांगल्या गोष्टी समाजात घडु शकतात, ते थांबविण्या एवजी त्याला अधिक सकारात्मक स्वरुप देणे चांगले.

गर्दी वाढवत स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणार्‍या लोकांबद्दल तितकसं वाईट वाटत नाही.

शहरांमधे(पुणे/मुंबई) वाहनांच्या गर्दीत जीव धोक्यात घालणार्‍या लोकांबद्दलही असेच वाटेल काय?

मन Wed, 03/09/2014 - 20:07

In reply to by मी

शहरांमधे(पुणे/मुंबई) वाहनांच्या गर्दीत जीव धोक्यात घालणार्‍या लोकांबद्दलही असेच वाटेल काय?

ह्यास नाइलाज असे वरती म्हटलेच आहे. (लोकलच्या उदाहरणात)
.
.
जनतेला एकत्र येण्यापासुन थांबवण्यापेक्षा त्यासाठी पुरक सोयी करणे अधिक महत्त्वाचे ठरते, उत्सवाच्या निमित्ताने अनेक चांगल्या गोष्टी समाजात घडु शकतात, ते थांबविण्या एवजी त्याला अधिक सकारात्मक स्वरुप देणे चांगले.

हे विधान मान्य करता येतं. पण पुन्हा ती गोष्ट आवाक्यातली आहे का, झेपणेबल आहे का हा प्रश्न राहतोच.
(सध्या सरकार ते पुरेशा प्रमाणावर करत आहे का ? सरकारला कधीही विचारलं अमुक का करत नाही तर ते काम करण्याचा ताण किती आहे,
काम किती अवघड आहे वगैरे सांगितलं जातं.)
त्यापेक्षा सतत प्रबोधन करत राहून ह्यापासून लोकांना परावृत्त करता येणं दूरगामी हिताचं नाही का?
लोकं चित्रपटगृहातही गर्दीने जमतात. पण तिथे निदान प्राथमिक तरी आर्किटेक्चरचे नियम पाळलेले असतात.
(entry exit दरवाजे वेगळे असणे. वेळप्रसंगी emergency exit असणे वगैरे.)
शिवाय क्षमतासुद्धा मर्यादितच असते. दोनशे तिकिट म्हणजे दोनशे तिकिट. दोनशे लोकांच्या जागेत साताठशे लोकं कोंबणं नाही.
इतक्या पातळीवर सरकार स्ट्रीमलाइन करु शकतं का ? इतक्या पूरक सोयी सरकार किम्वा अजून कुणी उपलब्ध करुन देउ शकतं का ?
त्या कधीही मागितल्या की "गर्दीच इतकी आहे की काहीही कोलमडणारच" असं उत्तर येतं.
बरं. ह्या सगळ्या ठिकाणी जाण्यासाठी जीव धोक्यात घातला जातो आहे.
तेही "इथे गेलो नाही तर उपाशी मरु " अशी काही स्थिती नसताना.
जाणे भागच आहे, असे काही आहे का?

हे विधान मान्य करता येतं. पण पुन्हा ती गोष्ट आवाक्यातली आहे का, झेपणेबल आहे का हा प्रश्न राहतोच.

वारीसंदर्भात सकाळमधे लेख आला होता(दुवा सापडला तर देतो), ज्या गावात दिंडी/पालखी थांबते तिथे पुढचे काही दिवस अस्वच्छता असते, बर्‍याच गावांची तक्रार आहे पण अनेक गावे हा त्रास सहन करायला सध्या तरी तयार आहेत, पालखी/दिंडी गेल्यावर गावालाच स्वच्छता करावी लागते, काही दिंड्या स्वच्छतेच्या बाबतीत जागरुक झाल्यासारख्या गेल्या वारीच्या वेळेला काही जणांना वाटल्या, वारकर्‍याची जबाबदारी आहेच, तो ती पुर्णपणे पाळत नाही हेही खरेच, पण हे सर्वच नागरीकांच्या सिव्हिक सेन्सबद्दल बोलता यावे.

इतक्या पातळीवर सरकार स्ट्रीमलाइन करु शकतं का ? इतक्या पूरक सोयी सरकार किम्वा अजून कुणी उपलब्ध करुन देउ शकतं का ?

अमरनाथ यात्रा सरकारच चालवतं (लष्कराची मदत घेउनही चालवत असेल), न जमण्यासारखं नक्की कोणता फॅक्टर आहे?

तेही "इथे गेलो नाही तर उपाशी मरु " अशी काही स्थिती नसताना.
जाणे भागच आहे, असे काही आहे का?

उपाशी मरत नाही म्हणूनच जातात, सवाई बघायला जाणार्‍या सगळ्यांनाच सगळं कळतं असं नाही, पण फॅशन म्हणून जाणारेही आहेत, पुर्वी जागणारेही होते.

नितिन थत्ते Thu, 04/09/2014 - 05:51

In reply to by मी

>>शहरांमधे(पुणे/मुंबई) वाहनांच्या गर्दीत जीव धोक्यात घालणार्‍या लोकांबद्दलही असेच वाटेल काय?

लोकल ट्रेनच्या टपावरून प्रवास करण्याविषयी म्हणत असाल तर "हो"

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/09/2014 - 21:27

In reply to by मन

वारीचे फोटो म्हणून बरेच चांगले फोटो दिसतात; संदेश भंडारेंचं नावही या संदर्भात आठवतं. मनोबांना पडलेले प्रश्न एकदा पडल्यामुळे "कधीतरी वारी निघून गेल्यावर त्या गावाचे फोटो काढले पाहिजेत" असा विचार केला होता. पण लगेचच "तिथली अस्वच्छता झेपणारे का" असा प्रश्न स्वतःला विचारला गेला.

कोणा चिनी ब्लॉगधारकाने गंगेचे गलिच्छ फोटो प्रकाशित केल्यावर झालेला गोंधळही आठवला. मग वाटलं, कदाचित कोणा वारकऱ्यांच्या घरातल्या माणसानेच असे फोटो काढले आणि प्रकाशित केले तर कदाचित फरक पडेल. नाहीतर काय दाखवलं जातंय, त्यामागचा मुद्दा काय हे सोडून "अश्रद्ध लोकांना हेच दिसणार" याची पकडापकडी* सोडून काहीच निष्पन्न होणार नाही.

*श्रेय - अतिशहाणा.

विवेक पटाईत Wed, 03/09/2014 - 21:59

एक प्रश्न पुरोगामी म्हणजे काय ह्याच उत्तर मला अजून सापडले नाही. ????
१. पुरोगामी कोण?
२. पुरोगामी कसा दिसतो?
३. पुरोगामी काय म्हणतो?
४. पुरोगामी शब्दची व्याख्या.

राजेश घासकडवी Thu, 04/09/2014 - 08:08

In reply to by विवेक पटाईत

सोप्या मराठीत नितिन थत्तेंनी इथे लिहिलेलं आहे. त्यातली काही उद्धृतं.

मी लिबरल/पुरोगामी विचारसरणीचा आहे याचा अर्थ या 'फर्स्ट प्रिन्सिपल' पासून सुरुवात करून प्रत्येक नियमाचा विचार करतो.

प्रस्थापित नियमांमध्ये ते केवळ परंपरागत नियम आहेत, म्हणून ते पाळले गेले पाहिजेत या पद्धतीने विचार न करणारा तो पुरोगामी.

तिथेच लिखाळ यांनी एक उदाहरण दिलेलं आहे

एका मित्राचे आजोबा देवळात पोथी सांगणारे एकदम धार्मिक विचारांचे. त्यांच्या खेड्यातून अधी कधी बाहेर न पडलेले. ते एकदा बरेच वय झालेले असताना शहरात कुणाकडे गेले असता देहदानासंबंधी ऐकतात. आणि ताबडतोब देहनासाठी फॉर्म भरतात. आता जगातल्या घडामोडींचा फारसा गंध नसलेल्या वृद्ध माणसाकडून झालेले हे वर्तन मला अतिशय भावले. समाजाबद्दलची अशी समज, जीवनाबद्दलचा काही विशिष्ट हेतू माहित असणे हेच अंगभूत पुरोगामित्वाचे लक्षण मला वाटले.

नव्यामध्ये जे चांगलं दिसेल त्याचा उघड्या डोळ्यांनी आणि मनापासून स्वागत करणारा तो पुरोगामी.

इन्द्राची पूजा न करता तुम्हाला जो डोंगर अन्न पाणी देतो जो तुमच्या गाईगुरांचा सांभाळ करतो त्या डोंगराला महत्व द्या हे सांगणारा कृष्ण मला पुरोगामी वाटतो

आंधळेपणाने पूजा न करता कार्यकारणभाव तपासून पाहतो तो पुरोगामी.

आणि धनंजय यांचा हा प्रतिसाद वाचलात तर पुरोगामित्वावर घेतलेल्या काही आक्षेपांचं समाधान होईल. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकच जण थोड्याफार प्रमाणात पुरोगामी असतो, आणि पुरोगामी असणं म्हणजे जुनं ते सगळं टाकून देऊन सगळंच नवीन आणण्याचा प्रयत्न करणं नव्हे. इतक्या टोकाचं म्हणणं असण्याचा दावा करून ओरडणं म्हणजे साप समजून भुई धोपटणंच ठरतं.

माहितगारमराठी Sat, 06/09/2014 - 17:04

आपल्या माहितीतील आदर्श शिक्षक जमल्यास पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षकांची माहिती मराठी विकिपीडियासाठी हवी आहे.

खरेतर धागा वेगळा काढण्याची इच्छा होती पण मागच्या दोन धाग्यांच्या वेळी चर्चेची सुरवात मनातले छोटे मोठे प्रश्न पासून करावी असे सुचवले गेले तेव्हा सुरवात या धाग्यातून करतो आहे. या चर्चा प्रस्तावास (प्रतिसादास) आलेले प्रतिसाद खासकरून पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षकांबद्दलची माहिती नित्या प्रमाणे प्रताधिकारमुक्त गृहीत धरली जाईल.

प्रतिसादांसाठी धन्यवाद.

शहराजाद Sun, 07/09/2014 - 00:38

मुगाचा दाणा फोडून पाहिल्यास आत पांढरा / जवळपास पांढरा असतो. मुगाची सालासकट डाळदेखील सालाखाली तशाच रंगाची असते. तर मग साल काढलेली मूग डाळ पिवळी धम्मक कशी होते? काही वेळा रंग लावलेली असू शकते म्हणून मी खूप वेळ पाण्यात भिजवून खूपदा चोळून धुवून बघितली. रंग थोडा फिकटला तरी सालवाल्या डाळीसारखा कधी होत नाही. असे का होते?