Skip to main content

रस्त्यावर वाहन चालविणारे (रूपक कथा)

2 minutes

त्या दिवशी सुनीलला भेटायला त्याच्या घरी गेलो. बिछान्यावर पडलेला होता. डाव्या पायाच्या मांडीत लोखंडी रॉड टाकलेली होती. त्याला विचारले, कसं झाले हे सर्व. तो म्हणाला, तुझ्या सारख्या नियम पाळणाऱ्या एका मूर्ख माणसामुळे ही पाळी आली. मी म्हणालो, साला स्पष्ट बोल कि काय म्हणायचं आहे ते. उगाच माझ्या डोक्यावर खापर नको फोडू? तुला माहितच आहे, बाईक चालविताना मी ट्रफिकचे कुठलेच नियम-कायदे पाळत नाही. किक मारल्या बरोबर बाईक हवेत उडाली पाहिजे तरच चालविण्यात मजा. त्या रात्री घरी परतताना असेच हवेत उडत जात होतो. एका ट्रफिक सिग्नल वर लाल बत्ती होती. नेहमीप्रमाणे पर्वा केली नाही. दुसर्या बाजूने येणाऱ्या बाईक ने चक्क मिठी मारली. कदाचित त्या गाढवाला दिल्लीत बाईक कशी चालवावी हे कळत नसावे. अरे हिरवा दिवा झाला तरी काय झाले, सुसाट वेगाने जाणार्या बाईकला रस्ता दिला पाहिजे, एवढे तरी त्याला माहित असायला पाहिजे. त्यानी ब्रेक मारायला पाहिजे होता. आता भोगत असेल आपल्या कर्मांचे फळ म्हणत तो जोरात हसला. आपल्या कष्टापेक्षा दुसर्याचे कष्ट पाहून हसणारा असा हा औलिया. या माणसाला काय म्हणावे मलाच कळेनासे झाले.

रस्त्यावर वाहन चालकांच्या तीन श्रेणी आहेत. पहिल्या श्रेणीतले वाहन चालक ट्रफिकच्या सर्व नियमांचे पालन करतात. रस्ता रिकामा असला तरी कधी चुकूनही लाल बत्ती क्रास करीत नाही. पोहचायला उशीर झाला तरी त्यांना चालते. समर्थांच्या अखंड सावधान असावे या उक्तीवर त्यांचा विश्वास असतो. स्वत:च्या चुकीने असे वाहन चालक क्वचितच दुर्घटना ग्रस्त होतात. बाकींना सुनील सारख्या वाहन चालकांच्या कर्माचे फळे भोगावे लागतात.

दुसर्या श्रेणीतल्या वाहन चालकांच्या मनात कायदा, कानून नियम यांची भीती असते. पण गंतव्य स्थळी लवकर पोहचण्या करता संधी साधून ट्रफिक नियमांची उपेक्षा करतात. कुणी पाहत नाही पाहून लाल बत्ती क्रास करतात. कधी ट्रफिक पोलीस वाल्याने अडविले तर काय द्या वर त्यांचा विश्वास असतो. देवावर सव्वा रुपया टाकला कि देव क्षमा करतोच. गांधी छाप कागद पोलिसांच्या हातावर ठेऊन सुटका करण्याच्या प्रयत्न करतात. मुंबईचे ट्रफिक पोलीस या बाबतीत इमानदार असतील, पण दिल्ली ट्रफिक पोलीसवाले नोट ही खिशात टाकतात आणि घरी चालान ही पाठवून देतात. नमकहराम कुठले. त्याना पाहून लोकांना गुंडाळणाऱ्या बंगाली बाबांची आठवण येतेच.

तिसर्या श्रेणीचे वाहन चालक सुनील सारखे असतात. त्यांच्या मते नियम, कायदे- कानून यांचे पालन करणारे लोक मूर्ख/ मागासलेले असतात. ट्रफिक पोलीसला पाहून शक्यता बाईक थांविणार नाही आणि कधी थांबवावी लागली तर लगेच उगाच हुज्जत (भांडण) घालायला सुरवात करतील. त्यांच्या वर विना कारण शरीफ (?) लोकांना त्रास देण्याचा आरोप करतील. शिकायत करण्याची धमकी देतील किंवा तो मी नव्हेच असे दाखवतील. त्रासून ट्रफिक पोलीसवाला अधिकांश वेळी चालान न कापता त्यांना सोडून देतो.

रस्त्यावर वाहन कसे चालवावे हा ज्याच्या-त्याच्या व्यक्तिगत प्रश्न आहे. फक्त एकच बाब विचार करण्याची आहे, आपल्याला गंतव्य स्थळी सुरक्षित पोहोचायचं आहे का?

स्वामी त्रिकाळदर्शी म्हणतात ज्याला या लेखाचा अर्थ समजेल तो आयुष्यात कधीच दुर्घटनेचा शिकार होणार नाही.

टीप: चर्चा या प्रकारात टाकायला पाहिजे होता का? जरा डोकं खाजवा की????

Node read time
2 minutes

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/09/2014 - 19:41

In reply to by ऋषिकेश

जालीय ट्रोलांची व्याख्या वाचल्यावर हे ट्रोलिंग नाही याबद्दल खात्री पटत चालली आहे.

'एरवी विषयानुरूप चालणाऱ्या चर्चेत ठराविक प्रकाराने खोडा घालणं' हे ट्रोलिंग असतं. या धाग्यावर विषयानुरूप चर्चा म्हणजे (माझ्या लेखी) मनःपूत व्याख्या आणि त्यामुळे भावना उद्दीपित झालेले प्रतिसाद असंच दिसत आहे. या पकडापकडी*ला ट्रोलिंग कसं रे म्हणणार?

* या शब्दाबद्दल अतिशहाणा यांचं कौतुक करावं तेवढं कमीच.

अजो१२३ Mon, 08/09/2014 - 17:53

नास्तिक लोक हे अस्तिक लोकांपेक्षा विकृत असायचा चान्स जास्त आहे हे वाक्य गुणात्मक रित्या चर्चिण्यात काय गैर आहे? संस्थळाला काही विचारांचंच वावडं आहे का?

बॅटमॅन Mon, 08/09/2014 - 17:55

In reply to by अजो१२३

असेच म्हणतो. ज्यांना चर्चा करायची आहे त्यांना अवश्य करू द्यावी. त्याला ट्रोलिंग वगैरेचे लेबल लागले तर संस्थळाच्या पुरोगामी प्रतिमेशी ते विसंगत असेल.

मन Mon, 08/09/2014 - 17:59

In reply to by अजो१२३

वाक्य गुणात्मक रित्या चर्चिण्यात काय गैर आहे?

विदा न मागण्यात तर्कदोष संभवतो.
"अजोंनी माझे लाखभर रुपये घेतलेत, उसनवार परत करण्यास तयार नाहित " असे म्हणालो तर मी येडा तरी असेन किंवा बदमाष तरी.
तसे नसल्यास मी ते विधान करायला मोकळा आहे. त्याच्या खर्‍याखोट्याची शहानिशा करण्याची गरज नाही.
तुम्ही मला लाखभर रुपये द्या.

विदा देणे न देणे हा पुढचा भाग झाला.

पण त्याला डायरेक्ट ट्रोलिंग म्हणणे हा अतिशय निषेधार्ह प्रकार आहे. याचा निषेध असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/09/2014 - 18:05

मी, ऋषिकेश, 'न'वी बाजू, स्वरा आणि विवेक पटाईत यांचे इथले प्रतिसाद काढून टाकावेत अशी व्यवस्थापकांना विनंती.

अजो१२३ Mon, 08/09/2014 - 18:09

विदा मागण्याची चर्चेत एक अवस्था असते. वयाप्रमाणे केस पांढरे होतात म्हटले कि लगेच आरोग्य मंत्रालयाकडे तर असा काही विदा नै, किती वय? दोन्ही लिंगांचे, शिकलेले/अशिक्षित, असे बरेच उपप्रश्न निर्माण होतात. म्हणून मी विचारतो कि काय विदा देऊ? विदा नाही म्हणून विधानच करायचं नाही. पंजाबी मुली मराठी मुलींपेक्षा सुंदर असतात. काय विदा देऊ? कुठे याचं स्टअ‍ॅट आहे? सुंदर म्हणजे काय यावरच पंगा घेऊन मला कोणीही खाली बसवेल. गुणात्मक चर्चा म्हणजे किमान काही बेसिस दोन्ही बाजूंनी मान्य करणे. मी म्हणालो, अस्तिक निष्करण विश्वास ठेवतात, हे मान्य. आपण का ठेवता हे सांगाल काय? आता मला विषय नीटपणे मांडायला वेळ लागतो. तोपर्यंत पेशन्स पाहिजे.

बॅटमॅन Mon, 08/09/2014 - 18:14

In reply to by अजो१२३

म्हणजे शेवटी सगळी जबाबदारी समोरच्यांवरच लादल्या गेली आहे. विषय मांडताना नीटपणे मांडला नाही तर लोक त्रास देणारच. त्यावर लोकांना दोष देणे योग्य की आपण विषय नीटपणे मांडणे योग्य सो दॅट गैरसमज कमी होतील हे योग्य- हे आत्मपरीक्षण अवश्य आहे. असो.

ऋषिकेश Tue, 09/09/2014 - 08:41

In reply to by अजो१२३

आता मला विषय नीटपणे मांडायला वेळ लागतो. तोपर्यंत पेशन्स पाहिजे.

हे जर खरे असेल (हे खरे असण्याचा माझा विश्वास होता - जो आता उडत चालला आहे, बर्‍यापैकी उडाला आहे. तुम्ही असे प्रतिसाद मुद्दाम उचकवण्यासाठी देता असे माझे मत झाले आहे व त्यामुळे मी त्यास ट्रोलिंग म्हणत आहे - त्यात बदल नाही. पण ते असो.) तर अशी विनंती आहे की विषय नीटपणे आधी डोक्यात मांडून मगच प्रतिक्रीया द्या. जर काही गैरसमज होत असतील तर ते तसे केल्यास टळतील.
इतर अनेकांनी पेशन्स ठेवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा स्वतः प्रतिसाद टाकायच्या आधी पेशन्स दाखवला, वापरायचे श्ब्द, त्यातून ध्वनित होणारे/होऊ शकणारे अर्थ तुम्हाला जे म्हणायचे ते पूर्णपणे मांडतेय का? यावर विचार केलात तर तर अर्धे प्रश्न निकालात निघतील (नी असले प्रतिसाद कमी होतील) असे माझे मत आहे.

विचार करा!

बाकी, माझ्याकडून इत्यलम - अर्थात डु नॉट फीड द ट्रॉल्स

अजो१२३ Tue, 09/09/2014 - 10:51

In reply to by ऋषिकेश

किमान मी विषय नीटपणे मांडण्याचा यत्न माझ्या इतक्या सार्‍या प्रतिसादांतून केला आहे. पण मलाच ट्रोल म्हणत बोंबा ठोकणारांनी अगदी एका म्हणजे एका शब्दानेही विषयही मांडला नाही.

मेघना भुस्कुटे Mon, 08/09/2014 - 18:44

नेहमीप्रमाणे धागा एका बाजूला आणि प्रतिसादातून नेहमीचीच धुमश्चक्री असं चित्र दिसतं आहे. सध्या ऐसीवर हे फार नवं नाही. अस्मादिकांसकट सगळेच जण त्यात कमीअधिक दोषी. पण त्या निमित्तानं एक प्रश्न पडला.

ट्रोलिंग म्हणावं तरी कशाला?

आपण असं गृहित धरून चालू, की प्रश्न उपस्थित करणार्‍या व्यक्तीचा हेतू वाईट नाही. तिला कुणालाही मुद्दामहून दूषणं द्यायची नाहीत. वातावरण उद्मेखून बिघडवण्यात रस नाही. व्यक्तीला खरोखरच प्रश्न पडताहेत.

इतकं असलं की त्या व्यक्तीला सगळं माफ असतं? मग ती व्यक्ती ट्रोल नाही, असं प्रमाणपत्र तिला बहाल करून टाकावं काय?

म्हणजे उदाहरणार्थ: गणपतीच्या देवळात सगळे भाविक जमतात. आरती करतात. प्रसाद खातात. त्यांना गणपती नामक दगडात काय दिसतं, असा खरोखरचा प्रश्न मला पडला. माझ्या मते मी भाविकांची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी म्हणजे चांगल्या हेतूनं, देवळात गेले. कुणालाही मूर्ख वा महामूर्ख असं थेट विशेषण बहाल केलं नाही. वातावरण कलुषित करायसाठी काही काड्या केल्या नाहीत. हे सगळं गृहित. भाविकांना एकदा, दोनदा, पाचदा - असं म्हटलं की, बाबांनो, हे बरोबर नाही. याहून तुम्ही झोप काढा, गप्पा मारा, प्रेम करा. परोपरीनं सांगितलं. पण लोक ऐकेनात. उलट माझ्यावर चिडायला लागले. स्वच्छ आणि शांतपणे म्हणाले, की आम्हांला हेच करायचं आहे. आमचं मतपरिवर्तन करायला येऊ नका. आपले मार्ग वेगळे आहेत. पुन्हा यायचं, तर पुरावे आणा. नाहीतर येऊ नका.

तरीही मी सहाव्यांदा मी देवळात गेले आणि पुन्हा तेच केलं.

आता मी ट्रोल आहे की नाही?

अनुप ढेरे Mon, 08/09/2014 - 18:48

In reply to by मेघना भुस्कुटे

ठरवून एखाद्या अ‍ॅडल्टच मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणारे लोक मला तरी नाही आवडत. त्यांना ट्रॉल म्हणायचं का काय ते नाही माहीत. पण त्यांना श्या द्यायच्या असतील तर ट्रॉल म्हणायला काही हरकत नाही.

मन Mon, 08/09/2014 - 19:01

In reply to by अनुप ढेरे

बाउंडरी केसवरील मूलतत्ववाद्यांशी चर्चा वगैरे करावी की नाही ?
त्यातील लोकांना विचार करायला प्रवृत्त करावं का ?
जोतिबा फुले, र धो ,आगरकर आणि इतरांचं कार्य योग्य दिशेला होतं का ?
त्यांनी अ‍ॅडल्टचं मतपरिवर्तन करायचा अजिबातच प्रयत्न केला नाही का ?

अजो१२३ Mon, 08/09/2014 - 19:07

In reply to by मेघना भुस्कुटे

मी हा प्रश्न (देवळात ट्रोलिंग) मागे कितींदा विचारला आहे. मी इथे पुन्हा लिहितो. इथले आयडी मुख्यतः दारू पिणारे असतील आणि माझे तत्त्वज्ञान मला 'दारू पिऊ नये. दूध प्यावे' असे सांगते, तर मी माझे तत्त्वज्ञान इथे विकून इथल्या लोकांना त्रास द्यायला आलेलो नाही. इथला माहौल बिघडवण्यात, दारूचा रसभंग करण्यात मला रस नाही. मी दूध पिणार्‍या लोकांत जाऊन दूध पीत बसेन. पण असं मी स्पष्ट केलं असताना, आमच्या कोणत्या पेयाशी निष्ठा नाहीत म्हणत फक्त दुधाला झोडणे गैर आहे. जी काय भूमिका आहे ती स्पष्ट असावी.
---------------
आणि किमान मला ट्रोल म्हणताना एका तरी सदस्याने मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले असते तर बरे झाले असते. बॅटमॅनने प्रतिसाद दिले आहेत, उत्तरे नाही. पण त्याने किमान संवाद तरी केला आहे. अगदी पहिल्या प्रतिसादापासून वाचा, माझ्या सगळ्या प्रतिसादांत एक आर्ग्यूमेंट आहे. त्याबद्दल कोणी काहीही न म्हणता ट्रोल वैगेरे म्हणजे 'दरवाजे बंद' असल्याचे लक्षण आहे.

मेघना भुस्कुटे Mon, 08/09/2014 - 19:26

In reply to by अजो१२३

'फक्त' दुधाला झोडणं गैर आहे? असेलही. असंही शक्य आहे, की इथल्या लोकांना 'आधी' दुधाला झोडायचं असेल आणि 'नंतर' बाकीच्या पेयांचा नंबर लागणार असेल. इथले लोक 'फक्त' दुधाला झोडून गप्प होणार आहेत, असा काहीतरी पुरावा हवा. तरच त्यांनी 'दूध' किंवा 'कशालाही' झोडणं गैर आहे की नाही, हे ठरवण्याचा हक्क इतरांना मिळेल. शिवाय जोवर इथले लोक 'इथे'च दुधाला झोडताहेत, बाहेर जाऊन कुणाच्या हातातले दुधाचे पेले हिसकावून घेऊन फेकून देत नाहीयेत, तोवर त्यांनी कशाला झोडणं गैर आहे, हे सांगणारे बाकीचे कोण?

तर ट्रोल.

बरं, सांगितलं तर सांगितलं. त्यावर अनेकदा वाद झाले. तरीही परत परत तेच तेच करायचं आणि स्वतःच्या भावना उद्दीपित करून घ्यायच्या, हे कोण करतं?

तर ट्रोल.

अजून महत्त्वाचं. समजा - 'मी मला हवं ते हव्या त्या तीव्रतेनं बरळणार. वाट्टेल तशा कोलांट्या उड्या मारणार. आणि शिवाय माझं लेखन संदर्भ म्हणून वापरू नका. कारण मला त्याची जबाबदारी स्वीकारायची नाही, फक्त मी सर्वश्रेष्ठ आहे हे ठसवायचं आहे.' असं मी सांगत फिरले आणि परिणामी लोकांनी त्यांच्या स्वास्थ्यासाठी माझ्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. आता, 'लोक मला उत्तर देत नाहीत. माझ्याशी संवाद करत नाहीत. त्यांचेच दरवाजे बंद आहेत की...' अशी बोंब मी कितीही जोरात मारली, तरी त्यामुळे माझं म्हणणं सिद्ध, लोकमान्य, योग्य ठरतं का? नाही. मी कोण ठरते?

तर ट्रोल.

तरीही इथले लोक बिचारे भले आहेत. 'ट्रोलांवर बंदी घालू नये' या तत्त्वावर त्यांची निष्ठा आहे. म्हणून ते ट्रोलांची बोंबाबोंब चालवून घेताहेत. आता यावर मी 'जितं मया...' अशी आरोळी ठोकावी की शहाणपण आठवावं, हा शेवटी माझा प्रश्न आहे.

अजो१२३ Tue, 09/09/2014 - 10:46

In reply to by मेघना भुस्कुटे

ट्रोल प्रतिसादाचे मार्मिक उदाहरण.
१. चालू विषयावर एकही विधान न करणे.
२. स्वतः ट्रोल असून दुसर्‍यांनाच ट्रोल म्हणणे.
३. भावना वैगेरे चर्चेत आणणे.
४. केलेल्या विधानांचा नको तो अर्थ काढणे.
५. निरर्थक विधाने करणे.
६. सामान्य व्यवहारातील शिष्टाचाराचे नियम न पाळणे.
७. अहंवादी भाषा वापरणे.
८. सारा जोर विषयवाचक विधाने न करता व्यक्तिवाचक विधानांवर असणे.
-----------------
"नास्तिक अस्तिकांपेक्षा विकृत असण्याची संभावना जास्त आहे" हे विधान ऐकताक्षणी बहुतांश ऐसीकरांच्या डोक्यात तिडिक जाऊन संताप येण्याचे काय कारण असावे? इथे अस्तिकांवर कितीतरी विधाने त्यांचा उच्चकोटीचा उपमर्द करणारी असतात. कधीकधी मी प्रतिवाद करतो, पण ९९% वेळा दुर्लक्ष करतो. मला कधी अशी संतापाची शिरशिरी येत नाही. तुम्ही असले कसले 'संवेदनशील' नास्तिक?

बॅटमॅन Tue, 09/09/2014 - 11:28

In reply to by अजो१२३

"नास्तिक अस्तिकांपेक्षा विकृत असण्याची संभावना जास्त आहे" हे विधान ऐकताक्षणी बहुतांश ऐसीकरांच्या डोक्यात तिडिक जाऊन संताप येण्याचे काय कारण असावे? इथे अस्तिकांवर कितीतरी विधाने त्यांचा उच्चकोटीचा उपमर्द करणारी असतात. कधीकधी मी प्रतिवाद करतो, पण ९९% वेळा दुर्लक्ष करतो. मला कधी अशी संतापाची शिरशिरी येत नाही. तुम्ही असले कसले 'संवेदनशील' नास्तिक?

सहमत आहे. हे असंवेदनशील आणि इम्मॅच्युअर इ.इ. नास्तिकांचेच उदा. आहे. एरवी तार्किकता, विदा, ह्यांव त्यांव इ. च्या नावाने गळे काढणार्‍यांची इम्मॅच्युरिटी उघडी पडते. अजोंच्या लेखी नास्तिक लोक विकृत असण्याची शक्यता आहे म्हणून त्या शक्यतेच्या ओझ्याचा बाँड्रीवरून पिचपरेंत पळत येऊन क्याच का बरे घेऊ पाहतात हे नास्तिक लोक? आणि म्हणे आम्ही र्‍याशनल. माय फुट!

बाकी अजो आणि मेघना यांची पकडापकडीदेखील रोचक आहे =))

मेघना भुस्कुटे Tue, 09/09/2014 - 12:21

In reply to by बॅटमॅन

अजोंच्या लेखी नास्तिक लोक विकृत असण्याची शक्यता आहे म्हणून त्या शक्यतेच्या ओझ्याचा बाँड्रीवरून पिचपरेंत पळत येऊन क्याच का बरे घेऊ पाहतात हे नास्तिक लोक?

मान्य आहे. वेळ असेल तेव्हा, इच्छा असेल तेव्हाच क्याचक्याच खेळू. आत्ता मरू देत.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/09/2014 - 19:10

In reply to by मेघना भुस्कुटे

जालावरचे ट्रोल कोण -
In Internet slang, a troll (/ˈtroʊl/, /ˈtrɒl/) is a person who sows discord on the Internet by starting arguments or upsetting people,[1] by posting inflammatory,[2] extraneous, or off-topic messages in an online community (such as a newsgroup, forum, chat room, or blog) with the deliberate intent of provoking readers into an emotional response[3] or of otherwise disrupting normal on-topic discussion.[4]

व्याख्या विकीपिडीयावरून.

---

इथे शिव्यांची देवाणघेवाण झालेली नाही. (च्यु*चा अपवाद आहे.) पण नास्तिक या शब्दाची व्याख्याच बदलून, स्वयंघोषित* नास्तिक लोक जसे नाहीत तसे ते आहेत असं मानून त्यांच्या वर्तनातल्या नैतिकतेबद्दल प्रश्न विचारले गेले आहेत. असं करताना त्यात काही लोकांच्या भावना उद्दीपित झाल्याचं दिसतंय. असा कोणाचा उद्देश होता का? माहित नाही. हा उद्देश महत्त्वाचा असतो का? बहुदा नाही. सतत भावना उद्दीपित करून घ्याव्यात का? माहित नाही. पण वरची जी चर्चा दिसत आहे ती मात्र महाबोअरिंग आहे.

आणि ही असली महाबोअरिंग, कुचकामी आणि भीषण चर्चा सुरू करण्याचं पातक माझ्या प्रतिसादावर आलेलं दिसत आहे. त्याबद्दल माफी.

*कधीचा हा शब्द, कोणाचीही खोडी न काढता, वापरायचा होता. नास्तिक स्वयंघोषितच असणार ना, शंकराचार्य किंवा पोपकडून थोडीच प्रमाणपत्र मिळवायला लागतं!

अजो१२३ Mon, 08/09/2014 - 18:52

राजेश घासकडवी - मानवाची जशजशी प्रगती होत जाते, तसतशी त्यास ईश्वर या संकल्पनेची गरज पडत नाही. (हे ट्रोलिंग नाही)
अरुणजोशी - ईश्वर न मानल्याने, धर्मव्यवस्थानिहित मूल्ये त्यागली जाऊन मनुष्य विकृत वर्तन करणे संभव आहे. ( हे मात्र ट्रोलिंग आहे)
-------------
वाह री दुनिया.

Nile Mon, 08/09/2014 - 22:14

म्हणजे, (या लेखानुसार) भारतातील रस्त्यांवरील अपघात पाहता, भारतातील बहुसंख्य लोक नास्तिक असावेत तर! कमाल आहे!

बॅटमॅन Mon, 08/09/2014 - 22:17

पुरोगामीपासून आता ट्रोललक्षणांकडे धागा सरकू लागलेला आहे असे रा.रा.आम्ही (स्वयंघोषित ट्रोल) जाहीर करीत आहोत.

अस्वल Mon, 08/09/2014 - 22:30

काय चाललंय ?
मुळात लेख-रूपक कथा काय आहे आणि खाली प्रतिक्रिया कसल्या आहेत?
निषेध वगैरे काही बोलणार नाही- पण आजकाल प्रतिक्रियांकडे माउस् सरकवताना स्क्रोलबार फार वेगाने वापरावा लागतोय.

विवेक पटाईत Tue, 09/09/2014 - 10:31

In reply to by अस्वल

माझा एक मित्र तुफान बाईक चालवायचा. त्याचा अपघात झाला. त्याची विचारपूस करायला घरी गेल्या वर आलेल्या अनुभवावर लेख लिहिला. दुसर्या दिवशी लक्षात आले, जर रूपक कथा कंसात लिहिले तर या लेखाला वेगळे वळण येईल. झाले तसेच ऐसीतले विद्वानाना चर्चे करता खुराक पाहिजेच.

चिंतातुर जंतू Wed, 10/09/2014 - 13:26

>> तिसर्या श्रेणीचे वाहन चालक सुनील सारखे असतात. त्यांच्या मते नियम, कायदे- कानून यांचे पालन करणारे लोक मूर्ख/ मागासलेले असतात. ट्रफिक पोलीसला पाहून शक्यता बाईक थांविणार नाही आणि कधी थांबवावी लागली तर लगेच उगाच हुज्जत (भांडण) घालायला सुरवात करतील. त्यांच्या वर विना कारण शरीफ (?) लोकांना त्रास देण्याचा आरोप करतील. शिकायत करण्याची धमकी देतील किंवा तो मी नव्हेच असे दाखवतील. त्रासून ट्रफिक पोलीसवाला अधिकांश वेळी चालान न कापता त्यांना सोडून देतो.

ही रूपककथा असली, तर हे गुणधर्म अ‍ॅनार्किस्टला लागू होतील. पण मग अ‍ॅनार्किस्ट व्यक्तीच्या दृष्टीनं 'शरीफ' ही शिवी आहे. त्यामुळे तो स्वतःला 'शरीफ' म्हणवून घेणार नाही. शिवाय पुढे -

>> कदाचित त्या गाढवाला दिल्लीत बाईक कशी चालवावी हे कळत नसावे. अरे हिरवा दिवा झाला तरी काय झाले, सुसाट वेगाने जाणार्या बाईकला रस्ता दिला पाहिजे, एवढे तरी त्याला माहित असायला पाहिजे. त्यानी ब्रेक मारायला पाहिजे होता. आता भोगत असेल आपल्या कर्मांचे फळ म्हणत तो जोरात हसला.

अमुक एक गोष्ट नियम म्हणून पाळायला हवी असं अ‍ॅनार्किस्ट म्हणत नाही. त्यामुळे इथे लेखकाच्या डोक्यात रूपकविषयाविषयीच गोंधळ आहे.

>> रस्त्यावर वाहन कसे चालवावे हा ज्याच्या-त्याच्या व्यक्तिगत प्रश्न आहे. फक्त एकच बाब विचार करण्याची आहे, आपल्याला गंतव्य स्थळी सुरक्षित पोहोचायचं आहे का?

ह्यातला पहिला भाग अ‍ॅनार्किस्टपेक्षा खरं तर लिबर्टेरियन आहे, पण 'गंतव्य स्थळी सुरक्षित पोहोचणं' ज्याचं ध्येय आहे तो तर अ‍ॅनार्किस्ट असूच शकत नाही.

>> स्वामी त्रिकाळदर्शी म्हणतात ज्याला या लेखाचा अर्थ समजेल तो आयुष्यात कधीच दुर्घटनेचा शिकार होणार नाही.

असल्या संकल्पना कळून अपघात टाळता येत असते तर...