.
.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
कम्युनिजम
कम्युनिजम हा समाजवादाचाच एक प्रकार, एक व्हर्शन आहे. फरक बरेच दाखवता येतात (तशीच साम्येही). मुख्य फरक असा की कम्युनिजम हा 'डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलटरिएट' (जी अखेरीस अपरिहार्यपणे मूठभरांची हुकूमशाही होऊन बसते.) ही व्यवस्था आणू पाहतो. लोकशाही व्यवस्थेवर बहुधा त्यांचा विश्वास नसतो. लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे हे देखील त्यांच्या दृष्टीने पुरेसे बळ मिळवण्यापुरते वापरलेले हत्यारच असते. कोणतीही व्यवस्था ही अखेरीस शोषकच असते असा त्यांचा ठाम विश्वास असतो. अगदी लग्नसंस्थेला देखील स्त्रीच्या शोषणाचे हत्यार मानतात ते. अर्थात उक्ती नि कृतीमधे नेहेमीच फरक असल्याने सारेच अनुसरले जात नाहीच.
या उलट ज्यांना मी इथे समाजवादी म्हणतो आहे ते प्रामुख्याने लोकशाही समाजवादी विचारधारेत लोकशाहीवरचा विश्वास अनुस्यूत असतो. समाजवादाचे हे प्रवाह विचार-मूल्यमापनाच्या मार्गाने पुरोगामित्वाची कास धरत असले तरी समाजात एकाच वेळी अन्य व्यवस्था अस्तित्त्वात असतात त्या मोडून काढून एकच व्यवस्था उभारायला हवी असा आग्रह यात असत नाही. त्यामुळे धर्मसंस्था, लग्नसंस्था, सामाजिक गट यांना त्यांचे स्वतंत्र अस्तित्व राखूनही समाजवादी विचारधारा स्वीकारणे शक्य होते. या विविध व्यवस्थांमधील सुट्या सुट्या भागांबद्दल समाजवादाचा आक्षेप असेल, त्यात बदल व्हावा/रद्द व्हावा अशी अपेक्षा असेल, आग्रह असेल पण सारी व्यवस्थाच मोडीत काढावी असा टोकाचा आग्रह बहुधा धरला जात नाही.
थोडक्यात सांगायचे तर लोकशाही समाजवादी अन्य व्यवस्थांचे सहअस्तित्व मान्य करू शकतात, कम्युनिस्टांना फक्त त्यांची एकच व्यवस्था हवी असते.
चोप्य पस्ते
कुरुंदकरांनी त्यांच्या एका पुस्तकात समाजवाद्यांच्या स्थितीची मीमांसा केली होती. त्यात त्यांनी "समाजवाद्यांना सत्तेत येण्याची प्रचंड घाई झालेली आहे. त्यामुळे नाही नाही त्या तडजोडी हा पअ करताना दिसतो". असे म्हटले आहे.
समाजवाद्यांची शोकांतिका होण्याचे मला वाटणारे एक कारण जेव्हा दोन वेळा त्यांना सत्ता मिळाली तेव्हा त्यांनी पूर्वीच्या कट्टर कॊंग्रेसी नेत्यांना नेतृत्व दिले. [मोरारजी देसाई आणि व्ही पी सिंग यांची समाजवादावर मुळीच निष्ठा नव्हती]. महाराष्ट्रात शरद पवारांना जवळ केले.
दुसरे कारण म्हणजे त्यांच्यातल्या चारित्र्यवानांनी सत्ता हाती घेतली नाही. त्यामुळे ती मुलायम-लालूंसारख्या गणंगांच्या हाती गेली. भाजपने (केंद्रात एकदा आणि अनेक राज्यात वेळोवेळी)
सत्ता मिळाल्यावर काही चांगले घडवण्याची शक्यता दाखवली म्हणून २००४ च्या पराभवानंतरसुद्धा भाजप स्पर्धेत टिकून राहिला. तशी शक्यता समाजवाद्यांनी दाखवली नाही. १९८९ मध्ये दुसर्यांदा सत्ता देऊन झाल्यावर पुन्हा संधी देण्याचा विचार जनता का करील?
समाजवादीच विचार करत नाहीत असे
समाजवादीच विचार करत नाहीत असे नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर ९५ सालच्या युतीच्या सरकारनंतर पुन्हा सत्ता मिळाली नाही याचे कारण सत्ता मिळाल्यावर काही चांगले घडवण्याची शक्यता त्या सरकारमध्ये जनतेला दिसली नाही.
मुंबईतले उड्डाणपूल हा एकमेव सांगण्यासारखा कार्यक्रम त्या काळात घडला. पण त्यापाठोपाठ आलेले 'टोल'धाडीचे भूतसुद्धा जनतेस दिसलेच.
जनता आपल्याला मते का देत नाही याचा विचार सेना-भाजपने सुद्धा केला नाही.
एका उत्तम लेखमालेची भरभक्कम
एका उत्तम लेखमालेची भरभक्कम सुरूवात. पुढच्या लेखांची आवर्जून वाट बघतो आहे.
राजकारणाविषयी येणाऱ्या विश्लेषणात नेहमीच हा पक्ष विरुद्ध तो पक्ष, या नेत्याच्या चुका, त्या नेत्याची पॉवर वगैरे टॉप डाउन स्वरूपात मांडणी असते. जिच्या बळावर पक्ष आणि नेते उभे असतात ती जनता म्हणजे मुकी बिचारी कुणी हाका या स्वरूपाची असते. फार तर ती जातीत विभागली गेलेली असते, आणि मग या नेत्याने/पक्षाने या जातीचं डेमोग्राफिक कसं मिळवलं, कसं गमावलं वगैरे ढोबळ विश्लेषण होताना दिसतं.
मला या लेखमालेतून काही ग्राउंड अप सत्यं शोधलेली आवडतील. म्हणजे, समाजवादाची इमारत कोसळली याचं कारण कदाचित तिला आधार देणारी जमीनच खचली असा असू शकेल. एके काळी असलेली समाजवादी मनोवृत्तीच बदलली का? समाजवादाने दाखवलेली स्वप्नं जुनाट झाली का? नव्या समाजाच्या मनोवृत्तीप्रमाणे ती बदलली का? अशा प्रश्नांची काहीशी लोकाभिमुखी उत्तरं आलेली आवडतील.
थॅंक्स
राजेश तुझ्या अपेक्षांबदल आभार. पण त्या पुर्या होण्याची शक्यता निदान या लेखमालिकेत तरी कमीच आहे. काही मुद्दे स्पर्श केलेले आहेत, पण एक लेख म्हणून आधी विचार केलेला असल्याने फार खोलात शिरलेलो नाही. विश्लेषण कमी, परिणामांची नोंदणी मुख्य नि त्याबाबत उपलब्ध असलेले पर्याय अधिक विस्ताराने मांडणे (हा शेवटचा मुख्य हेतू होता, अर्थात बदलत्या परिस्थितीत हे वेटेज बदलायला हरकत नाही. बघू या.) अशी मांडणी आहे.
सुंदर लेख . माझा प्रतिसाद
सुंदर लेख . माझा प्रतिसाद या धाग्यावर relevant आहे कि नाही याची खात्री नाही तरी पण टंकत आहे ( लेखकाची माफी मागून ). मुळात या खंडप्राय देशाला सरसकट असा एक 'ism ' लागू पडू शकतो का ? मग तो समाजवाद असो , हिंदुत्व वाद असो , साम्यवाद असो का भांडवल वाद असो . मुळात कुठला तरी एक 'ism ' अंगीकारून धोरण आखण या खंडप्राय आणि वैविध्य असणार्या देशाला परवडणार आहे का ? या कारणामुळेच 'घोंगडी ' (सर्व प्रकारच्या 'ism ' चे समर्थक ज्या पक्षात आहेत असा पक्ष ) असणारा कॉंग्रेस पक्ष इतकी वर्ष या देशात टिकला का ? वाजपेयी सरकार ने पण कुठलाही एक 'ism ' न अंगीकारता हाच कॉंग्रेस pattern अंगिकारला होता .
वाजवी
तुमचा प्रश्न १००% वाजवी आहे. मी स्वतःला 'व्यामिश्रतावादी' म्हणवतो (जरी मोदीभक्तांना मला समाजवादी म्हणून हिणवायला आवडत असलं तरी :) ) एकच इजम हा कालातीत तसंच सामाजिक वा भौगोलिक दृष्ट्या सर्वव्यापी असू शकत नाही असे माझे ठाम मत आहे. विशिष्ट समाजात, विशिष्ट वेळी, विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत निवडलेला एक इजम वा एकाहुन अधिक इजम्सची यथायोग्य जोड ही उपयुक्त वा परिणामकारक ठरली तरी काही काळानंतर नवी निवड करावी लागते कारण परिस्थिती बदलत असते. त्यामुळे 'माझं मत एकदा बनलं की बनलं, त्यात काडीचाही बदल संभवत नाही' म्हणणार्यांबद्दल मला खरंच सहानुभूती वाटते. :)
छान सुरूवात
पुढे वाचायला आवडेल. समाजवादाचे अमेरिकन टीकाकारांच्या भाषेत जे सोपे रूप समोर येते - श्रीमंत लोकांकडून जास्त कर घेणे, व गरीब लोकांच्या स्कीम्स करता तो वापरणे, सर्वसामान्य लोकांकरता सरकारने सरकारच्या (म्हणजे करदात्यांच्या) पैशातून राबवलेल्या योजना ई- हे त्याचा अविभाज्य भाग आहे असा माझा समज आहे. ते खरे आहे का?
दुसरे म्हणजे समाजवादातील काही तत्त्वे - श्रीमंत लोकांकडून गरीबांकडे संपत्तीचे वितरण- हे माणसाच्या नैसर्गिक उर्मीच्या विरूद्ध वाटते (जर जास्त पैसा कमावल्यावर तो इतरांना दिला जाणार असेल तर लोकांचे पैसा कमवायचे मोटिवेशन कमी होईल व त्यामुळे देशाच्या एकूण प्रगतीवर परिणाम होईल, या अर्थाने. ते "ग्रीड इज गुड" ई.). यावरून अनेक वर्षे समाजवाद राबवलेले देश किती प्रगत आहेत याची माहिती कोठे मिळाली तर ते ही आवडेल वाचायला. त्यावर तुमचे विश्लेषणही.
समाजवादाचे अमेरिकन
समाजवादाचे अमेरिकन टीकाकारांच्या भाषेत जे सोपे रूप समोर येते - श्रीमंत लोकांकडून जास्त कर घेणे, व गरीब लोकांच्या स्कीम्स करता तो वापरणे, सर्वसामान्य लोकांकरता सरकारने सरकारच्या (म्हणजे करदात्यांच्या) पैशातून राबवलेल्या योजना ई- हे त्याचा अविभाज्य भाग आहे असा माझा समज आहे. ते खरे आहे का?
नॉट ऑलवेज.
श्रीमंत लोकांकडून जास्त कर घेणे, व गरीब लोकांच्या स्कीम्स करता तो वापरणे - याला वेल्थ रीडिस्ट्रिब्युशन म्हणतात. किंवा कल्याणकारी योजना म्हणतात. डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द स्कीम. श्रीमंत व्यक्ती स्वतः अशा स्कीम्स ला पैसे देत असेल तर त्यास खरोखर समाजवाद म्हणता येईल का ? त्यास चॅरिटी म्हणता येऊ शकते.
सर्वसामान्य लोकांकरता सरकारने सरकारच्या (म्हणजे करदात्यांच्या) पैशातून राबवलेल्या योजना - यात पब्लिक गुड्स / सर्व्हिसेस प्रोव्हिजन सुद्धा येते. न्यायव्यवस्था ही सरकारने करदात्यांच्या पैशातूनच राबवलेली असते. मग तिला बरं समाजवाद म्हणत नाही आपण ??? समाजवादाचे टीकाकार तिला समाजवाद म्हणतात असे मलातरी आढळलेले नैय्ये.
दुसर्या बाजूला - "सामाजिक सुरक्षा" (सोशल सिक्युरिटी) हे मात्र सोशॅलिझमचे स्वरूप आहे असे किमान एक अर्थशास्त्री (तो सुद्द्धा दिग्गज) म्हणतो. पण ती ही जनतेवर कर लावूनच राबवली जाते. तुम्ही योजना हा शब्द वर वापरलेला आहेच. पण योजना तर कॉर्पोरेशन्स सुद्धा बनवतात. तुमच्या कंपनीत प्रोजेक्ट प्लॅन बनवतात की नाही !!! तो सुद्धा शेअरहोल्डर्स नी दिलेल्या पैश्यातूनच व त्यापैश्याच्या विनिमयासाठीच बनवलेला असतो ना !!! मग त्याला सोशॅलिझम का म्हणू नये ??
सोशॅलिझम या इंग्रजी शब्दाचा अर्थ समाजवाद आहे असे गृहित धरून वर मी ते दोन शब्द इंटरचेंजेबली वापरलेले आहेत.
समाजवादाच्या समस्यांचे वर्णन करताना फ्रेडरिक हायेक ने Fatal Conceit असा शब्द प्रयोग केला होता. हायेक ने समाजवादावर टीका करणार्या त्याच्या १९४५ च्या आसपास प्रकाशित झालेल्या (व अधिक सुप्रसिद्ध) पुस्तकाचे नावच मुळी रोड टू सर्फडम असे ठेवले होते. समाजवादाचा हायेक पेक्षा जास्त दणकट प्रतिवाद इतर कोणीही केलेला नैय्ये असे माझे मत आहे. याची कारणे अनेक आहेत. त्याने वेगळ्या लेन्स मधून सोशॅलिझम चे परिक्षण केले. वेगळे म्हंजे प्रत्येकवेळी सुयोग्यच असे कोणीच म्हणणार नाही. पण त्याने एपिस्टेमिक्स चा आधार घेतला. दुसरे कारण म्हंजे सोशॅलिझम ला असलेला पर्याय शब्दबद्ध केला. व तो पर्याय भांडवलवादाशी कसा मिळताजुळता आहे हे तर सांगितलेच पण त्याच बरोबर व्यक्तीस्वातंत्र्याच्या भक्कम पायावर उभा नसेल तर तो गुलामगिरी (Serfdom) कडे नेणारा कसा आहे ते सांगितले. फक्त या गुलामगिरीचे स्वरूप वेगळे असेल की ज्यात गुलामांचे मालक हे ब्युरोक्रॅट्स व राजकीय नेते असतील. मग ते नेते प्रजातांत्रिक मार्गाने निवडून १ आलेले का असेनात. सर्वात शेवटी, हायेक ने सत्तेचे विकेंद्रीकरण (जे प्रजातंत्राचे बलस्थान आहे) ही संकल्पना का व कशी सुयोग्य आहे ते ही अप्रत्यक्षपणे दाखवून दिले.
फारएण्ड, तुमचा मूळ प्रश्न समाजवाद म्हंजे नेमके काय - असा आहे असे मला वाटते. व म्हणून इथे उत्तर द्यायचा यत्न करतो.
हायेक ने फेटल कन्सीट मधे वापरलेली - सोशॅलिझम ची - अतिसंक्षिप्त व्याख्या ही आहे - deliberate arrangement of human interaction by central authority based on collective command over available resources.
सवंग व्याख्या व अतिसोप्या शब्दात - A and B deciding what C should do for D.
समाजवादाचे मूर्त रूप - नियोजन आयोग (प्लॅनिंग कमीशन).
---
सोशॅलिझम ह्या इंग्रजी शब्दाचा अर्थ समाजवाद असा आहे हे गब्बर ने गृहित धरलेले आहेच. व (Gabbar admits that) ते गृहितक चुकीचे असू शकतेच. व म्हणून असे म्हणायला जागा आहे की आणखी ही अशीच चुकीची गृहितके असू शकतात व मिस-इंटरप्रिटेशन असू शकते. तेव्हा खरा प्रश्न इंटरप्रिटेशन चा आहे - असा प्रतिवाद करायचा मोह अनेकांना होईलच.
१ - समाजवादावर टीका करणार्यांचा/भांडवलशहांचा लोकशाही मूल्यांवर विश्वास नस्तो असाही फोल प्रतिवाद केला जाईल.
धन्यवाद
धन्यवाद डीटेल उत्तराबद्दल. मी 'योजना' जे म्हंटले ते खूप व्यापक अर्थाने होऊ शकते हे आता लक्षात आले. मला योजना म्हणजे स्वस्त दरात धान्य, कमी दराने कर्ज, कर्जमाफी ई गोष्टी म्हणायच्या होत्या. ज्या सर्वांसाठी नसतात. तसा अर्थ धरला तर तुम्ही त्याबद्दल लिहीलेले काही बदलेल का?
नियोजन आयोग - माझी कल्पना आहे की नियोजन हा सरकारच्या सर्व योजनांबद्दल प्लॅनिंग करतो, फक्त त्यातील 'समाजवादी' ठरतील अशाच नव्हे. म्हणजे रेशनिंग वर किती खर्च करावा हा त्यातील समाजवादी भाग झाला, तर इन्फ्रास्ट्रक्चर वर किती, हा सर्वसमावेशक गोष्टीवर. अर्थात मला तेवढी अचूक माहिती नाही.
deliberate arrangement of human interaction by central authority based on collective command over available resources. >> ही जर व्याख्या धरली तर अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशातही थोड्याफार प्रमाणात समाजवाद असतोच असे दिसते.
+
>>अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशातही थोड्याफार प्रमाणात समाजवाद असतोच असे दिसते
+१.
आपण "सरकारने पायाभूत सुविधांवर लक्ष द्यावे" असे म्हणतो तेव्हा जरी सरकारने रस्ते बांधावे असे म्हणालो नाही तरी धोरणे/इन्सेन्टिव्ह* अशी ठेवावीत की त्यात फायदा दिसून त्या उद्योगात भांडवल आकर्षित होईल.
इथे सुद्धा देशातले उपलब्ध भांडवल 'केंद्रित नियंत्रकांच्या इच्छेनुसार' पाहिजे त्या ठिकाणी वळवले जात असते.
*इन्सेन्टिव्ह शब्द वापरला की ती सबसिडी नाही असे घोषित करता येते.
इन्सेन्टिव्ह शब्द वापरला की
इन्सेन्टिव्ह शब्द वापरला की ती सबसिडी नाही असे घोषित करता येते. >> पर्फेक्ट. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी इतर जगाकडून उचललेल्या अनेक गोष्टींची नावे बदलून ती आपलीच असल्याची चलाखी केल्याची उदाहरणे अनेक देता येतील. विषयांतर नको म्हणून सध्या चूप बसतो.
अमेरिकेतच नव्हे तर भांडवलशाहीच्या पोटातच समाजवाद आहे असे आमचे लाडके मत आहे. पण त्याबाबत पुन्हा केव्हातरी.
>>अमेरिकेतच नव्हे तर
>>अमेरिकेतच नव्हे तर भांडवलशाहीच्या पोटातच समाजवाद आहे असे आमचे लाडके मत आहे.
+१
आज अस्तित्वात असलेली भांडवलशाही ही क्लासिकल भांडवलशाही नाही. म्हणजे गब्बरसिंग हे सदस्य जशी विधाने करतात तशी विधाने ती करत नाही. परंतु तशी विधाने केली नाहीत तरी भांडवलशाहीचा परिणाम व्हायचा तोच (क्लासिकल भांडवलशाहीसारखा) होतो.
प्लीझ
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी इतर जगाकडून उचललेल्या अनेक गोष्टींची नावे बदलून ती आपलीच असल्याची चलाखी केल्याची उदाहरणे अनेक देता येतील. विषयांतर नको म्हणून सध्या चूप बसतो.
विषयांतर होत असले तर होउ द्यात. ही इतर उदाहरणे जाणून घेण्यास उत्सुक आहे. प्लीझ लिहाच.
एक महत्त्वाचा खुलासा
अनेक प्रतिसादांतून लेखांतून काय येऊ शकेल याबाबत अपेक्षा व्यक्त झाल्या आहेत. त्यांची नोंद घेतली आहे. परंतु पुन्हा एकदा लेखाच्या शीर्षकाकडे लक्ष वेधतो. त्यात लेखाची व्याप्ती निश्चित होते असं मला वाटतं. "नवे संदर्भ आणि आव्हाने" हे अधोरेखित करून ठेवतो. माझा रोख राजकारणावर, समाजवादी गटांच्या वा कार्यकर्त्यांच्या 'राजकीय' वाटचालीवर आहे, त्या इजमच्या मूल्यमापनावर नाही हे कृपया ध्यानात घ्यावे. अन्यथा अपेक्षित मुद्दे आले नाहीत तर 'हे तर वरवरचे आहे' असा समज होण्याची शक्यता आहे.
उत्तम! इथे(ही) ही लेखमाला
उत्तम! इथे(ही) ही लेखमाला येतेय हे प्रतिसाद द्यायला सोयीचं आहे - आभार!
रिपब्लिकन चळवळ, जनता दल उदय आणि र्हास, महाराष्ट्रापुरते बोलायचे तर शिवसेनेसारख्या उजव्यांची मदत घेऊन मध्याच्या डाव्याने राजकारण करणार्या काँग्रेसने डाव्यांची - विशेषतः जनता दलाची - उखडलेली मुळे, महाराष्ट्रातील रिपब्लिकन चळवळींची शकले त्याच वेळी उत्तर प्रदेशात मात्र उभी राहिलेली दलित शक्ती, उत्तरेकडील समाजवादी नेते, बंगाल, त्रिपुरा व केरळातील कम्युनिझम व त्यांच्या छटा, बंगाल मधील कम्युनिझमचा डाव्यांच्या डावीकडे जाऊन करण्यात आलेला र्हास, समाजवादावर विश्वास आहे असे सांगत काही अतिरेक्यांनी शस्त्रे हातात घेतल्याने समाजवादाची व त्याच्या इमेजची झालेली हानी, ख्रिश्चन मिशनरी/आरेसेस इत्यादींचा समाजवाद (होय होय बरोबर वाचताय :) ) अर्थात धार्मिक समाजवाद, रिडालोस चा प्रयत्न आणि शेवटी आआप. अशी वाटचाल नी आगामी शीर्षके डोळ्यापुढे तरळून गेली.
शुभेच्छा!
खूप छान ओळख. पुढच्या भागाची
खूप छान ओळख. पुढच्या भागाची वाट पहात आहे.
एक शंका: समाजवादी विचारसरणी आणि कम्युनिस्ट विचारसरणी यात काय फरक आहे? आणि हा फरक फक्त भारताच्या परिप्रेक्ष्यातच आहे का जगभर socialism आणि communism मध्ये फरक आहे?