आगामी कार्यक्रम/उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - १

ऐसीचे कट्टे हा एक धमाल अनुभव असतो हे आत्तापर्यंत झालेल्या दोन मोठ्या कट्ट्यांमध्ये भाग घेतलेल्यांना आणि वृत्तांत वाचलेल्यांना समजलं असेलच. पण दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.

काही वेळा आपल्याला एखाद्या सिनेमाला, नाटकाला, भाषणाला जायची इच्छा असते. काही वेळा ऐसीवरचेच काही लोक एखादा कार्यक्रम सादर करणार असतील. आपल्या बरोबर कोणी जाणार असेल तर उत्तमच, नाहीतर आपला कार्यक्रम ठरलेला असतो. अशा वेळी 'मी/आम्ही अमुक अमुक कार्यक्रमाला जात आहोत' असं जाहीर आमंत्रण द्यायचं असेल तर या धाग्यावर टाका. ज्या काही लोकांना जमायचं असेल ते धाग्यावर जाहीर करून येतील - एकमेकांशी व्यनिसंपर्क करतील अशी अपेक्षा आहे. जमल्यास कार्यक्रम कसा झाला याबद्दल चार शब्द जर त्यांपैकी कोणी नंतर लिहिले तर ज्यांना यायला जमलं नाही त्यांनाही जळवण्याची संधी साधता येईल.

या धाग्यावरच्या प्रतिसादांत कार्यक्रम जाहीर करणारांनी खालील माहिती पुरवावी.
कार्यक्रम -
अपेक्षित शुल्क -
स्थळ -
तारीख व वेळ -
कुठे भेटायचं -

या प्रकारच्या धाग्यांवर १००हून अधिक प्रतिसाद झाले की नवीन धागा तयार करता येईल.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

लाँग विकएंड ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर आहे. तर ३१ ऑगस्टला मी ऑस्टिनजवळ कँपिंगला जाणार आहे. कोणी उत्सुक असेल तर सामील व्हा.
कार्यक्रम - नक्की ठरवलेला काही नाही.
अपेक्षित शुल्क - शून्य. मी ईंक्स लेक स्टेट पार्कमध्ये कँपिंग साईट आधीच बुक केली आहे.
स्थळ - ईंक्स लेक स्टेट पार्क
तारीख व वेळ - ३१ ऑगस्ट
कुठे भेटायचं - सकाळी आधी लाँगहॉर्न कॅव्हर्न स्टेट पार्कमध्ये जायचा विचार आहे आणि मग तिथून नंतर रात्री मुकाम ईंक्स लेक स्टेट पार्क. कुठेही भेटू शकता. अजून ५-६ जण सामील होऊ शकता. तुमच्याकडे टेंट नसतील तर माझ्याकडे २ आहेत आणि २ स्लीपिंग बॅग जास्तीच्या आहेत. इतरांना स्लीपिंग बॅग आणाव्या लागतील. आधी कधी कँपिंग केले नसेल तर ही यादी उपयोगी पडेल.

राघांची थीम छान आहे.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आजपासून काही नवेजुने जर्मन चित्रपट पुण्यात पाहायला मिळतील.
अपेक्षित शुल्क - शून्य
स्थळ - फिल्म इन्स्टिट्यूट, मेन थिएटर
वेळापत्रक :
१३ ऑगस्ट ५:३० वा. उद्घाटन व माहितीपट 'आय टू आय' - महत्त्वाचे समकालीन दिग्दर्शक जर्मन सिनेमाबद्दल ह्यात बोलतात.
१४ ऑगस्ट ४ वा. 'नॉसफरातू', ६ वा. 'द ब्लू एंजल' - जर्मन क्लासिक चित्रपट
१६ ऑगस्ट ४ वा. 'पीपल ऑन अ संडे', ६ वा. 'अंडर द ब्रिजेस' - जर्मन क्लासिक चित्रपट
१७ ऑगस्ट ४ वा. 'मॅरेज ऑफ मारिआ ब्राऊन', ६ वा. 'पॅरिस, टेक्सास' - जर्मन न्यू वेव्ह चित्रपट
१८ ऑगस्ट ४ वा. 'वन, टू, थ्री' - अमेरिकन चित्रपट, ६ वा. 'गुडबाय लेनिन' - समकालीन जर्मन चित्रपट
१९ ऑगस्ट ४ वा. 'रिमेंबरिंग विली ब्रॅन्ड', ६ वा. 'द लाइव्ह्ज ऑफ अदर्स' - ऑस्करविजेता जर्मन चित्रपट

अधिक माहिती
महोत्सवाचं वेळापत्रक

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Sad

असो.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

१९ ऑगस्ट ४ वा. 'रिमेंबरिंग विली ब्रॅन्ड', ६ वा. 'द लाइव्ह्ज ऑफ अदर्स' - ऑस्करविजेता जर्मन चित्रपट

'द लाइव्ह्ज ऑफ अदर्स' पहाण्याचा प्रयत्न केला जाईल.

सदाशिव पेठेत राहणार्‍या लोकांनी आमच्यासारख्या तळेगांव दाभाड्यात राहणार्‍यांना वाकुल्या दाखवण्याच्या जाहिर प्रयत्नाचा निषेध!

-Nile

+१११

आमचे आंतरजालीय स्नेही आणि जनश्रमपरिहारोत्सुक कायमस्वरुपी यजमान श्री. प्रकाश घाटपांडे यांच्या सौजन्याने असे प्रासंगिक (आणि अप्रासंगिक) कट्टे बर्‍याच वेळा होत असतात. तथापि ते फक्त निमंत्रितांसाठी असल्याने त्यांचा तपशील जाहीर करता येणार नाही.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

२० ऑगस्ट रोजी नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होईल. त्या निमित्तानं पुण्यात आयोजित निषेध मोर्चा आणि रिंगणनाट्याच्या कार्यक्रमाविषयी आजच्या म.टा.मध्ये अतुल पेठ्यांचा लेख आला आहे.

तारीख व वेळ : २० ऑगस्ट, सकाळी ७:१५ वा.
स्थळ : विठ्ठल रामजी शिंदे उर्फ ओंकारेश्वर पूल
कार्यक्रम : निषेध मोर्चा

रिंगणनाट्य हा कार्यक्रम त्यापुढे दिवसभर मनोहर मंगल कार्यालय, मेहेंदळे गॅरेज इथे होईल.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बोले तो, कार्यक्रमाची माहिती म्हणून ठीकच आहे, परंतु ती या धाग्यात देण्याचे प्रयोजन समजले नाही.

हा उत्स्फूर्त 'कट्टा' आहे, की एखाद्या सिनेमाला, नाटकाला अथवा भाषणाला (किंवा तत्सम प्रेझेण्टेशन अथवा मनोरंजनाच्या कार्यक्रमाला) बरोबरीने यायचे आमंत्रण?

निषेधमोर्चे, नाटकशिनेमेभाषणे नि कट्टे एकाच तागडीत? त्याने निषेधमोर्चाचे गांभीर्य बाराच्या भावात जात नाही काय?

(अवांतर: कट्ट्यांना 'आमंत्रण' असते, नाटकशिनेमाभाषणादि कार्यक्रमांनासुद्धा 'आमी बी चाललो तुमी बी चलाना' छापाचे 'आमंत्रण' असू शकते, इथवर समजू शकतो - आणि म्हणूनच कट्ट्यांची किंवा नाटकशिनेमाभाषणांना जाण्याची आमंत्रणे एकाच धाग्यात समजू शकतो. पण निषेधमोर्चांनासुद्धा 'आमंत्रण'? 'आवाहन' नको काय?)

धागा केवळ कट्ट्यांसाठी नसावा - नाहीये
शीर्षकात म्हटल्याप्रमाणे "आगामी कार्यक्रम" आणि त्याची माहिती हा सुद्धा या धाग्याचा भाग असेल.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> बोले तो, कार्यक्रमाची माहिती म्हणून ठीकच आहे, परंतु ती या धाग्यात देण्याचे प्रयोजन समजले नाही. <<

आपल्या आस्थाविषयांनुसार सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणं, त्यांत सहभागी होणं आणि त्यांची माहिती इतरांना देणं हा कोणत्याही संस्कृतीचा एक आवश्यक भाग आहे. 'कट्टा' म्हणजे नेहमीच काही तरी 'धम्माल' गोष्टच असावी असा 'ऐसी'चा आग्रह नाही. सामाजिक उपक्रम किंवा गंभीर चर्चा ह्यांचं 'ऐसी'ला वावडं नाही. 'ऐसी'वर विविध प्रकारचे आणि प्रवृत्तींचे सदस्य आहेत. त्यामुळे गंभीर उपक्रमांचं ज्यांना वावडं आहे त्यांच्यावर अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं कोणतंही बंधन नाही. ज्यांना निव्वळ थट्टामस्करी किंवा 'धम्माल' करण्यात रस आहे त्यांनी तसे कट्टे आयोजित करावे, लोकांनी त्यांत सहभागी व्हावं आणि त्यांचे वृत्तांतही द्यावे. मात्र, त्याहून वेगळ्या प्रकृतीच्या दखलपात्र उपक्रमांची माहितीही इथे दिली-घेतली जावी, त्यातही लोक सहभागी व्हावेत आणि त्यांचं वृत्तांकनही इथे दिलं जावं अशी अपेक्षा आहे. ज्यांना त्यात रस नाही त्यांच्यावर हा ताशेरा किंवा टीका नाही.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

निषेधमोर्चे, नाटकशिनेमेभाषणे नि कट्टे एकाच तागडीत? त्याने निषेधमोर्चाचे गांभीर्य बाराच्या भावात जात नाही काय?

आगामी कार्यक्रम असल्याने माहिती देणे योग्यच आहे, गांभीर्य तसेही घेणार्‍यावर असल्याने त्याची चिंता करण्याचे माहिती देणार्‍याला कारण नाही. एकत्र येण्यासाठी म्हणून जे-जे शक्य असेल ते इथे सांगणे गैर नसावे.

अपेक्षित शुल्क: खरा दिल्लीकर कुठल्या ही कार्यक्रमाला शुल्क देऊन जात नाही. फ्री पास त्याला लागतोच.
अपेक्षित कार्यक्रम: कार्यक्रम कुठलाही असला तरी त्याला चालतो, अपेक्षा एकच कार्यक्रमाचा नंतर जंगी पार्टी ती ही बिना शुल्क असणे गरजेचे.

या जर फ्री पास आणि मुफ्त जेवण / डिनर नसेल तर कार्यक्रम यशस्वी होत नाही.

ROFL

दिल्ली आणि दिल्लीकरांचे किस्से वाचायला आवडतील. लिहा लिहा, वाट बघतोय

(गेल्या विकांताला दिल्लीकर सुधन्वा देशपांडे यांचा "केवळ नाटक वाचून दाखवायच्या कार्यक्रमाला तेही तिकीट काढून इतकी गर्दी दिल्लीत जमणे अशक्य आहे" हे उद्गार आठवले Smile )

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया (महाराष्ट्र शाखा) ह्यांनी संयुक्तरीत्या पुण्यात एक चित्रपट रसास्वाद शिबिर आयोजित केलं आहे. तपशील :

स्थळ : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI), पुणे
शुल्क : आहे
काळ : शुक्र. १२ सप्टेंबर ते गुरु. १८ सप्टें दिवसभर.
वक्ते : श्यामला वनारसे, समर नखाते, अनिल झणकर, गणेश मतकरी, अभिजीत देशपांडे, राहुल रानडे, विकास देसाई, इ.
शिबिरादरम्यान अनेक जागतिक व भारतीय अभिजात चित्रपट दाखवले जातील. व्याख्यानं मराठीत असतील. चित्रपटांना इंग्रजी सबटायटल्स असतील.

अधिक माहितीसाठी दुवा

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हिमाल प्रकाशनातर्फे काठमांडूमध्ये काही व्याख्यानांचं आयोजन केलं आहे. त्याचे तपशील -

Himal Southasian cordially invites you to the annual Ncell Nepal Literature Festival on 19-22 September, 2014. Himal will be hosting 'Conversations: Reporting Southasia' on 20 and 21 September.

'Chronicles of the Bush Bazaar' will focus on reporting on Afghanistan and its future. The year 2014 is pivotal for Afghanistan as it experiences the withdrawl of the international military coalition and the aftermath of a presidential election.

'Long-form journalism in the time of short attention spans' will explore long-form journalism and why it is important in an age of quick news bites. This discussion will also feature the politics and economics of writing and publishing long-form journalism.

Matthieu Aikins is well known for his reporting on the war in Afghanistan and as a critic of human rights abuses perpetrated by US allies. He is a recipient of the 2013 George Polk Award for magazine reporting and the 2014 Medill Medal for Courage in Journalism.

Hartosh Singh Bal is the political editor of The Caravan magazine and the author of Waters Close Over Us: A Journey Along the Narmada.

Rabi Thapa is the editor of La.Lit magazine and the author of Nothing to Declare.

This is a public event and admision is opent to all. Seating is on a first-come, first-served basis.

RSVP: Himal Southasian, Patan Dhoka, Lalitpur, info@himalmag.com (977-1) 5547279/5552141
Fine Prints, Kathmandu (977-1) 4443263

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नेपाळमधल्या ऐसीकरांसाठी पर्वणी आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा...

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

==))

चित्र-संवाद
(चित्रे, चित्रकार आणि आपण)

पुष्प : २५वे
विषय : चित्रकला आणि कुतूहल
(कविता, चित्रकलेचा प्रवास आणि कलांबद्दल असणाऱ्या कुतूहलाविषयी..)
वक्ते : गणेश विसपुते
तारीख : २८/०९/२०१४
वेळ : सकाळी ११. ०० वाजता.
स्थळ : सु-दर्शन कला मंच, शनिवार पेठ
प्रवेश विनामूल्य

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

उत्सुक आहे (निदान थोडा वेळ तरी येता येईलच), इतरजन येत असल्यास कळवणे. चहा, विषयाला धरुन चर्चा, अवांतर गप्पा असा कार्यक्रम करता येईल.

मी ही जमवायचे बघतो आहे. नक्की झाल्यास/जमल्यास भेटुच!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऐसीवर मध्यंतरी आयपीए लिपी या विषयावर थोडी चर्चा झाली होती. त्यावेळी मुंबई विद्यापीठाच्या भाषाविज्ञान विभागाशी बोलून या विषयावर एक कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरवले होते. परंतु कार्यबाहुल्य आणि तारखांची अनिश्चितता यांमुळे मी आधी ऐसीवर हे जाहीर केले नव्हते. असो. तर आता जाहीर करते आहे.

कार्यशाळेचा विषय : भाषांतील ध्वनी आणि आयपीए लिपी
थोडक्यात माहिती : आपल्याला येणार्‍या भाषांतल्या, आपल्या सवयीच्या ध्वनींखेरीज इतर अनेक ध्वनी इतर भाषांत वापरले जातात. हे ध्वनी आणि त्यांतील भेदाभेद, तसेच ध्वनी आणि लिपी यांतील संबंध यांवर बारकाईने अभ्यास करण्याची गरज वेगवेगळ्या कारणांसाठी भासते. या अभ्यासासाठी साह्यभूत ठरणारे एक साधन म्हणून आयपीए ही लिपी विकसित केली गेली आहे. या कार्यशाळेत भाषांतील ध्वनी, त्यांतील भेदाभेद, आयपीए लिपी या विषयांवर तर चर्चा होईलच, याखेरीज ध्वनी आणि देवनागरी लिपी यांतील संबंध यावरही चर्चा होईल.
स्थळ : भाषाविज्ञान विभाग, रानडे भवन, मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, मुंबई. (पश्चिम रेल्वेचे जवळचे स्थानक : सांताक्रुझ. मध्य रेल्वेचे जवळचे स्थानक : कुर्ला)
कालावधी : सकाळी ९ ते संध्याकाळी ५ असे ४ दिवस.
तारीख : लगतचे दोन शनि-रवि किंवा लागोपाठचे चार रविवार आपण सर्वांच्या सोयीने ठरवू शकतो. नोव्हेंबर/डिसेंबर. (१ ते १२ नोव्हेंबर हा कालावधी आणि डिसेंबरचा नाताळचा आठवडा उपलब्ध नाहीत.)
शुल्क : ५०० रु. (भोजन वगैरे अंतर्भूत नाही)

कोणाला येण्यात रस आहे, येणे शक्य आहे, कोणत्या तारखा चालतील, शुल्काविषयी काही बरेवाईट मत हे सर्व कृपया कळवावे, जेणेकरून कोरम जमला तर कार्यशाळा निश्चित करता येईल.

राधिका

लागोपाठच्या चार रविवारांपेक्षा लगतचे दोन शनि-रवि बरे पडतील. शुल्क रु. ५०० वाजवी वाटताहेत.

परंतु, सदर कार्यशाळेसाठी काही किमान भाषिक शैक्षणिक अर्हता आहे काय? "भाषा" ह्या विषयात पदवी/पदविका केलेली नसल्यास कार्यशाळा दुर्बोध वाटण्याची कितपत शक्यता आहे?

आपल्याकडे 'भाषा' या विषयात साहित्य शिकवतात. त्याचा इथे फारसा संबंध नाही. आम्ही हे विषय इयत्ता ८वीच्या मुलांनाही शिकवले आहेत व त्यांना ते कळले होते. तेव्हा इ.८ वी ही किमान अर्हता धरता येईल.

राधिका

+१ लगतचे / दुरचेही पण शनि रवि बरे पडतील
अर्थात पुण्याहून उठून चारही वर्गाला येता येईल की नाही हे कुटुंबसंस्थेवर अवलंबुन असले, तरी प्रयत्न केला जाईल

फी वाजवी वाटते.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शुल्क रु. ५०० वाजवी असेल अथवा नसेल. पण मदिरेचे सेपरेट बिल करावे. व फक्त पिणार्‍यांनीच ते विभागून्/डच (व्हॉटेव्हर) द्यावे.

यायला आवडेल. पण तारखा निश्चित असतील तरच कन्फर्म सांगता येईल. सलग आठवड्याभरापेक्षा चार रवीवार सोईचे. किंवा लागोपाठचे शनीवार रवीवार. रु ५०० वाजवी आहेत.

लागोपाठचे चार रविवार असे नसेल तर मला जमेल.
सलगचे दोन शनि-रवि माझ्यासाठी योग्य आहे.
ह्या कार्यशालेचे नियोजन आणि विषय-अभ्यासक्रम असे प्राथमिक अथवा विस्तृत सादरीकरण (किंवा पूर्वीचे) उपलब्ध करून देता येण्यासरखे असेल तर जरुर द्या.

व्यवस्थापकः आगामी दिवाळी कट्ट्याशी संबंधित प्राथमिक चर्चा इथे हलवली आहे.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

`आसक्त कलामंच’च्या’ ‘रिंगण’ उपक्रमात ह्या वेळी द. ग. गोडसे ह्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांच्या ‘नांगी असलेले फ़ुलपाखरु’ ह्या पुस्तकातल्या निवडक भागांचं अभिवाचन -

कलाकार - माधुरी पुरंदरे आणि प्रमोद काळे.
शनिवार ११ ऑक्टोबर संध्या. ७:३० वा.

रविवार १२ ऑक्टोबर संध्या ७:३० वा.
'गोष्टी आदिवासी गाण्यांच्या'
कलाकार - प्राची दुबळे

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

यातील शनिवारच्या कार्यक्रमाला नक्की आणि रविवारच्याला कदाचित जाणार आहे.
अजुन माझे १-२ ऐसीकरांशी बोलणे झाले आहे ते येणार आहेत.

त्याव्यतिरिक्त कोणी येणार असेल तर कळवावे. भेट होईल

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१६वा मुंबई फिल्म फेस्टीवल आजपासून सुरू होत आहे. १४-२१ ऑक्टोबरपर्यंत चालणा-या या फेस्टीवलची सुरूवात सुझान बिएरच्या 'सेरेना' या चित्रपटाने होईल आणि सांगता डेविड आजेरच्या 'फ्युरी'ने होईल. कॅथरीन देनव्हला भारतीय चित्रपट अभिनेत्री हेलनच्या जोडीने जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. 'अरब सिनेमा'अंतर्गत अरबी दिग्दर्शकांचे १२ चित्रपट, 'मोसफिल्म स्टुडियो'ला ९० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल दाखवले जाणारे १० सर्वोत्तम चित्रपट दाखवण्यात येतील. डिरेक्टर्स चॉईसमध्ये अनुराग कश्यपचा 'ब्लॅक फ्रायडे', श्याम बेनेगल यांचा 'जुनून', मृत्यूंजय देवव्रतचा 'चिल्ड्रन ऑफ वॉर' असे चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, या फेस्टीवलमध्ये 'न्यू फेसेस इन इंडियन सिनेमा', 'रॉन्देव्हू विथ फ्रेंच सिनेमा', 'रिस्टोअर्ड क्लासिक्स', 'रेट्रोस्पेक्टीव्ह ऑफ रशियन फिल्म्स' अशा वेगवेगळ्या भागांमध्ये उत्तम चित्रपट पाहायला मिळतील.

हे १६व्या मुंबई फिल्म फेस्टीवलचे संकेतस्थळ आहे.

फेस्टीवलसाठी नावनोंदणी इथे करता येईल.

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

बातमी छान. परंतु, दोन्ही दुवे कंपनी पॉलिसीनुसारे प्रतिबंधित असल्यामुळे पाहता आले नाहीत!

(च्यायला ह्या 'निळकोटा'खाली काय काय दडलय कोणास ठाऊक?)

+१
लेख प्रतिसादांतल्या ९०% लिंका उघडत नाहित.
अगदि फारेण्डनं जो धमाल लेख दिलाय दिवाळी अंकात त्यातल्याही उघडल्या नाहित;
म्ह़णून जास्तच वैताग येतोय.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'रिंगण'उपक्रमातला पुढचा कार्यक्रम जाहीर झाला आहे -

शनिवार ८ नोव्हें. सं. ७:३० - विजय तेंडुलकरांच्या लेखनाचे अभिवाचन.
रविवार ९ नोव्हें. सं. ७:३० - र.धों. कर्वे यांच्या निवडक लेखांचे वाचन.
स्थळ - सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नवी दिल्ली येथील दस्तकारी हात समितीचे 'दस्तकारी हात प्रदर्शन' ए.के.ए 'पुणे क्राफ्ट्स बझार' ७ ते १६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये मोनालिसा कलाग्राम, पिंगळे फार्म्स, साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क येथे भरणार आहे. हस्तकलेच्या वस्तूंची आवड असणार्‍यांनी आवर्जून भेट द्यावी. पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उडीशा येथील कारागिरांनी तयार केलेल्या मधुबनी आर्ट, गोंड आर्ट, बनारसी कलाकुसर, बीड ज्वेलरी, सिरॅमिक्स, पॉटरी अशा बर्‍याच गोष्टी प्रदर्शनार्थ आणि विक्रीकरिता उपलब्ध असतील. तसेच प्रदर्शनाला भेट देणार्‍यांच्या मनोरंजनाकरिता या प्रदर्शनात सहभागी झालेल्या राज्यांमधील लोकनृत्ये, कळ्सूत्री बाहुल्यांचे कार्यक्रम इ. असणार आहेत.

वेळः सकाळी ११ ते रात्री ८

या प्रदर्शनाचे निमित्त करून 'मोनालिसा कलाग्राम' पाहायला जा असे माझे तुम्हा सर्वांना सांगणे आहे. मोना आणि लिसा पिंगळे या माय-लेकींनी तयार केलेले टुमदार कलाग्राम, त्यातली छोटीशी आर्ट गॅलरी, त्यात नेहमीच पाहायला मिळ्णारी कुठल्या ना कुठल्या चित्रकाराची चित्रं, तिथे गॅलरीसमोर असलेला, बांबूच्या जाळीभोवती बांधलेला एक पार, बांबूवरून सोडलेले दिवे, तिथे लावलेल्या गुलाबांच्या असंख्य जाती हे सर्व पाहण्याजोगे आहे.

दस्तकारी हात समितीविषयी थोडेसे:
दस्तकारी हात समितीची स्थापना प्रख्यात हस्तकला तज्ज्ञ श्रीमती जया जेटली यांनी केली. भारतातील हस्तकला टिकून राहाव्यात आणि हस्तकला कारागिरांना उपजिविक मिळून प्रतिष्ठेचे आयुष्य जगता यावे याकरिता त्या गेली चार दशके प्रयत्न करत आहेत. ही समिती परदेशांमध्येही हस्तकला प्रदर्शनांचे आयोजन करते.

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

प्रदर्शन आणि कलाग्राम दोन्ही पाहून आलो.
दोन्ही आवडले.

माहितीबद्दल आभार!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रदर्शन अतिशय मस्त आहे. कालच लाकडी बाथटब घेऊन आलो. वाटले होते त्याहून वाजवीच मिळाले.

डुप्र.

डॉ. इरिना ग्लुश्कोव्हा ह्या रशियन विदुषी गेली अनेक वर्षं महाराष्ट्राविषयी संशोधन करत आहेत. त्यांचं एक व्याख्यान उद्या मुंबईत एशियाटिक सोसायटीमध्ये आहे.
विषय : 'Kashi Maharashtra: The Invent of Tristhali and the Advent of Marathas'
स्थळ : दरबार हॉल, एशियाटिक सोसायटी, मुंबई
वेळ : बुधवार १२ नोव्हेंबर. सं. ५:३० वा.

--
माहितगार

काय त्रास आहे. नेमके आम्ही पुण्यात असताना वीकडेला मुंबैस लेक्चर व्हावे! असो, जळजळजन्य निषेध नोंदवून गप्प बसतो झालं.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सर्कसचं अपेक्षित स्वरूप मोडून “Trois Fois rien” किंवा “Three Times Nothing” हा एक वेगळा प्रयोग तीन फ्रेंच सर्कस कलाकार (अ‍ॅक्रोबॅट्स) पुण्यात करणार आहेत.
स्थळ : शांताराम तलाव, फिल्म इन्स्टिट्यूट.
वेळ : १५ नोव्हेंबर. सं. ६:३० वा.
अधिक माहितीसाठी

--
माहितगार

रोचक!

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आम्ही पुण्याबाहेर जात असताना हे पुण्यात व्हावे! बॅट्याच्या जळफळाटी मोर्च्यात सामील आहे! Sad

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे फुकट आहे का? नसेल तर तिकीट कुठे मिळेल?

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फुकट असावे.

--
माहितगार

दिल्लीत इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये 'आधुनिक भारत आणि नेहरू' ह्या विषयावर एक व्याख्यानमाला आहे.

२२ नोव्हें. - इरफान हबीब
२९ नोव्हें. - यश पाल
६ डिसें. - प्रभात पटनाईक
१३ डिसें. - रोमी खोसला
वेळ : सं. ६ वा.
अधिक माहिती

--
माहितगार

माफ करा, तातडीने लक्ष वेधण्यासाठी वेगळा धागा काढते आहे. ऐसीच्या नियमांत बसत नसेल, तर संपादकांनी कृपया उडवावा.

आज सकाळी ९ वाजताच्या पीव्हीआर फिनीक्स मॉलच्या थेटरातच्या (परळ, मुंबई) इंटरस्टेलरच्या आयमॅक्स शोची २ तिकिटे मी काढली होती. त्यातलं माझं तिकिट मी वापरू शकणार नाहीये, कारण मला बरं नाहीये. तेव्हा ते तिकिट वापरून हा चित्रपट पाहण्याची कुणाला इच्छा असल्यास त्यांनी ताबडतोब कळवणे.

राधिका

दुसर्‍या तिकिटावर कोण सिनेमा पाहणार आहे? Biggrin

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सलिल.

राधिका

९ वाजून गेले असल्याने सदर धागा आगामी कार्यक्रमाच्या धाग्यात हलवत आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वेळ होऊन गेल्यानंतरही 'आगामी' कसे काय? Wink

Smile

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आदि अनंतचे 4थे पर्व मुंबईत एनसीपीएमध्ये पार पडणार आहे.
तारीख आणि वेळ: 7 आणि 14 डिसेंबर, 2014, एनसीपीए मुंबई, संध्याकाळी 6.30 वाजता

7 डिसेंबरला तबला उस्ताद झाकिर हुसेन जागतिक ख्यातीचे ड्रमर स्टीव्ह स्मिथ तसेच व्ही. सेल्व्हागणेश (कंजिरा आणि घटम), दीपक भट (ढोल), विजय चव्हाण (ढोलकी), दिलशाद खान (सारंगी) आणि निलाद्री कुमार (सितार) अशा नामवंत कलाकारांसोबत ’मास्टर्स ऑफ पर्कशन’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

14 डिसेंबरला या फेस्टीवलमध्ये पंडित जसराज आणि त्यांचे शिष्य संजीव अभ्यंकर ख्याल रचनांचे आणि मेवाती घराण्याच्या गायकीचा भाग असलेल्या दुर्मिळ रागदारीचे सादरीकरण करतील. त्यांना रत्तन मोहम शर्मा (गायन), अंकिता जोशी (गायन), मुकुंद पेटकर (हार्मोनियम), राम कुमार मिश्रा (तबला) आणि श्रीधर पार्थसारथी (मृदंगम) यांची साथ लाभणार आहे.

तिकिटबारी- (तिकिटे अंमळ महाग आहेत. दर्दी श्रोत्यांना याचा प्रत्यवाय होत नाही असा अनुभव आहे Blum 3 )
मास्टर्स ऑफ पर्कशन- रविवार, 7 डिसेंबर, 2014- संध्याकाळी 6.30 वाजता जमशेद भाभा थेटर, एनसीपीए
तिकिटांची किंमत 2,000 / 1800 /1500 /1000 /500 रूपये
पंडित जसराज आणि संजीव अभ्यंकर यांचे गायन- रविवार, 14 डिसेंबर, 2014 - संध्याकाळी 6.30 वाजता टाटा थेटर, एनसीपीए
तिकिटांची किंमत 1200/800/400 रूपये
तिकिटे एनसीपीए बॉक्स ऑफिस आणि www.bookmyshow.com वर उपलब्ध आहेत.
बॉक्स ऑफिस 29 नोव्हेंबर, 2014ला खुले होईल

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

7 डिसेंबरला तबला उस्ताद झाकिर हुसेन जागतिक ख्यातीचे ड्रमर स्टीव्ह स्मिथ तसेच व्ही. सेल्व्हागणेश (कंजिरा आणि घटम), दीपक भट (ढोल), विजय चव्हाण (ढोलकी), दिलशाद खान (सारंगी) आणि निलाद्री कुमार (सितार) अशा नामवंत कलाकारांसोबत ’मास्टर्स ऑफ पर्कशन’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

हा कार्यक्रम पुण्यातही आहे बहुदा फुडल्या आठवड्यात. बहुदा 'गणेश कला क्रीडा'मध्ये. निलाद्री कुमार भारी वाजवतात सतार.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आदि अनंत फेस्टीवलची सुरूवात चेन्नईमध्ये होते आणि सांगता पुण्यात. हा भाग एकदम बरोबर. पण पुण्यातली तारी़ख १० जानेवारी आहे. त्यामुळे, तू म्हणतोयेस तो कार्यक्रम वेगळा असावा असे वाटते. सवाईच्या आधी झाकिर हुसेन आणि इतर मंडळी पुण्यात बरेच कार्यक्रम करतात. मागच्या वेळी मी झाकिर हुसेन, सेल्वागणेश, यू. श्रीनिवास आणि शंकर महादेवनला एकत्र 'रिदम' मध्ये बघितलं होतं, गरवारेमध्ये, डिसेंबर, २००९मध्ये. शिवमणी देखील होते. तो पण सवाईच्या आधीचाच काळ होता.
निलाद्रींच्या बाबतीत एकदम सहमत. त्यांना तल्विन सिंगसोबतच्या फ्युज्ञनमध्ये वाजवताना ऐक. निलाद्रींची सतार आणि तल्विनचं ट्रान्स म्युझिक. तोड नाही. दिवस कारणी लागल्यासारखा होतो.

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

आजच पेप्रात जाहिरात पाहिली. ६ डिसेंबर्ला आहे पुण्यात.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

धर्मकीर्ती सुमंत लिखित आणि आलोक राजवाडे दिग्दर्शित 'बिनकामाचे संवाद' ह्या नाटकाचा पहिला प्रयोग आज पुण्यात तन्वीर लागू स्मृतीप्रीत्यर्थ आहे.
स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह
वेळ : सं. ६:३० वा.
कार्यक्रमाला प्रवेशमूल्य नाही. प्रवेशिका नावडीकर म्यूझिकल्स, कोथरुड इथे उपलब्ध आहेत.

नाटकाविषयी अधिक तपशील : https://www.facebook.com/natakcompany.pune

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

उद्यापासून शेक्सपिअरच्या नाट्यकृतींवर आधारित चित्रपटांचा महोत्सव नॅशनल फिल्म आर्काइव्ह, पुणे इथे सुरू होणार आहे. अंजुम राजबलींचं व्याख्यानही असेल. अधिक माहिती वरच्या चित्रात किंवा आर्काइव्हच्या फेसबुक पानावर मिळेल.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'साहित्यावर बोलू काही' हा कार्यक्रम २० व २१ डिसेंबर रोजी वेलिंगकर इन्स्टिट्यूट, माटुंगा इथे होणार आहे. इ-साहित्यव्यवहारावरील परिसंवादात मेघना भुस्कुटे आणि रामदास हे ऐसीकर सहभागी असतील.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मेघनाताई असलेल्या परिसंवादाला कोणकोण येणारे?

मी येणार आहे.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माहितीपूर्ण..

ती माहिती नसून इषारा असावा..

जाता जाता केलेला?

(अवांतरः परिसंवादाचा वृत्तांत टाकणे)

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सकाळीच मटा घेतला. प्रसन्न हसणारी भुस्कुटेताई आणि विचारमग्न रामदासकाकांना बघून खूष झालो.

पेपरात सविस्तरपणे छापून येण्याची (सुरुवात होण्याची) पार्टी भुस्कुटेंकडून हवी. रामदासकाकांना काय, हे नेहमीचेच आहे.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पार्टी ऐसीच्या मालकांकडून मागू या आपण. Wink

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तेच्यात काय मज्जा नाय.

ऐसीचे मालक पार्टी म्हणून पुस्तकं वाटतील. Sad

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ऐसीवरच्या श्रेण्या देण्याच्या सोयीबद्दल तू जे सांगितलंस, ते 'म.टा. खास प्रातिनिधीनी', एकंदर ई-साहित्यासंर्भात उपलब्ध असलेली सोय, असं जरा जास्तच जनरलाइज करून टाकलंय नाही का?! Smile

आणि तू तूझा 'लेखिका होण्याचा प्रवास' कधी ग 'उलगडून' दाखवलास? Biggrin

मटाच्या प्रतिनिधीस गाठावे. मी जबाबदार नाही. Wink

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नुसता नाही हो.. 'खास' प्रतिनिधी..

पार्टी तोह बनती है! एव्हढं पेप्रात नाव, फोटो, त्याउप्पर 'लेखिका' असा उल्लेख, आणि त्याहीपेक्षा 'धुरिणी'..
पार्टीला कधी आणि कुठे यायचं ते सांग आता.

प्रसिद्धीकरता - आणि तीही चुकीची! - पार्टी देण्याचे आमच्या तत्त्वात बसत नाही. Biggrin

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अय्यो! एकीकडे भिक्कार म्हणून हिणवायचं आणि तरीही त्यांच्या 'मैफिलींत' जायला हरकत ठेवायची नाही, हे तत्त्वात बसते म्हणजे...
दुटप्पी मेली!

माझ्या तोंडी शब्द घालून विकू नयेत. मी कुणालाही भिकार म्हटलेलं नाही. मैफिलीत जायला हरकत नाही. पण मैफिलीत जाण्याबद्दल पार्टी देणं मात्र... (तसंही कुणालाही फुकटच्या पार्ट्याबिर्ट्या देणं आमच्या तत्त्वात बसत नाही, हे एक मूलभूत तत्त्व ध्यानी ठेवा. म्हणजे घोळ व्हायचे नाहीत. ;-))

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मैफिलीत गेलीस म्हणून नाही गो पार्टी.. मैफल गाजवलीस म्हणून.. कार्यक्रमानंतर भारावून तुझ्याशी बोलायला आलेलं पब्लिक बघितलंय आम्ही .. नाव काढलंस हो घराण्याचं. Tongue

गंमत अलाहिदा. त्या चर्चेचं वार्तांकन नीट झालेलं नाही हे ठीकच. पण एकुणात चर्चा छान झाली.
मला जाणवलेल्या गोष्टी:
- लोकांना अशा फोरम्समध्ये खरंच रस आहे आणि त्यांना त्याबद्दल फारशी माहिती नाही.
- आपण लिहिलेल्या गोष्टींवर कुणीतरी संस्कार करून त्यांना हवे आहेत, किंवा त्याबद्दल किमान मार्गदर्शनाची तरी अपेक्षा आहे. प्रकाशनाकरता पैस आणि काही प्रमाणात मार्गदर्शन हे आपलं आपण मिळवू शकतो, हे अजून लोकांना कळलेलं नाही.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अरे वा! अभिनंदन!
फोटो छान आहे. व्हिडीओ आहे का? यूट्यूबवर?

लिंकवरुन छायाचित्र इथे डकवतोयः

पं. शरच्चंद्र आरोलकरांच्या गायकीवर दोन दिवसांचे सत्र.
२० व २१ डिसेंबर.
स्थळ : भारती निवास सोसायटीचे सहकार सदन सभागृह, पुणे.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कल्याणच्या 'अभिनय' संस्थेतर्फे अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित संजय कृष्णाजी पाटील यांच्या कवितांवर आधारित आणि अनेक पारितोषिकं मिळालेल्या 'लेझीम खेळणारी पोरं' ह्या नाटकाचा प्रयोग उद्या सुदर्शन रंगमंच, पुणे इथे सं. ६:३० वा. होणार आहे.

अधिक माहिती इथे मिळेल.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

.
.
.
.
शुल्क- ५०० रु.
नोंदणीसाठी plio.mumbai@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधा.
.
.
.
.
राधिका

राधिका

पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागाचं नाव रानडे इन्स्टिट्यूट आहे, आणि मुंबई विद्यापीठाचा भाषाविज्ञान विभाग "रानडे भवन" मध्ये आहे.

हे रानडे कोण? त्यांचा आणी भाषाविज्ञानाचा काही संबंध आहे का?

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अरे, जानेवारीत ठरत होतं ना हे? आता लगेच उद्यापासून सलग सुटी मिळणच कठीण (२३ ते २८ असंच आहे ना? का २३ आणि २८ ?). थोड आधी कळलं असतं तर जमवता अलं असतं. असो. येण्याची ईच्छा होती. पुढे कधीतरी ठरत असल्यास नक्की जमवेन.

जानेवारीत ठरते आहे ती IPA ची कार्यशाळा. चुभुद्याघ्या.

असं होय? स्वारी.

दि. २३, २४ व २५ तारखेला 'आसक्त'चे नवे नाटक सुदर्शन रंगमंचावर सादर होईल.
'एफ-१/१०५'
लेखक : आशुतोष पोतदार
दिग्दर्शक : मोहित टाकळकर
कलाकार : राजकुमार तांगडे, सागर देशमुख, मृण्मयी गोडबोले आणि इतर.
वेळ : सं. ७:३० वा.
अधिक माहिती इथे पाहता येईल.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे आशुतोष पोतदार म्हणजेच ऐसीवर काही काळापूर्वी लिहिणारे 'आशुतोष' हे आहेत का ? (उदा. 'आस्ताद नावाचे वस्ताद'चे लेखक)

पाने