Skip to main content

आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ४

चौथा डाव सुरू व्हायला केवळ दहा मिनिटं शिल्लक आहेत. कालच्या विजयानंतर आनंद आणि कार्लसेन या दोघांचंही पारडं समसमान झालेलं आहे. दुसऱ्या डावातली आनंदची एक चूक सोडली तर आत्तापर्यंत दोघांचाही खेळ चमकदार आणि विश्वविजेतेपदाच्या मॅचसाठी साजेसा झालेला आहे. आज काय होतं ते पाहू.

अनुप ढेरे Wed, 12/11/2014 - 19:14

मला नव्यानेच कळालेली माहिती शेअर करतोय. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी.
पटाखाली हुडिनी, कमोडो आणि स्टॉकफिश ही जी नावं आहेत त्यांना इंजिन्स म्हणतात. ते एक एक कॉप्युटर प्रोग्राम्स आहेत जे प्रत्येक खेळी नंतर पटाला अ‍ॅनालाईज करत असतात. त्यातून एक आकडा निघतो जो धन(positive) अथवा ऋण असू शकतो. धन आकडा पांढर्‍याच्या पारड्याला झुकणारा डाव आहे अस दर्शवतो. आकडा ऋण असेल तर डाव काळ्याच्या पारड्यात झुकणारा आहे. जेवढा मोठा आकडा डाव तितका जास्तं त्या पारड्यात झुकला आहे. -३ म्हणजे काळ्याच्या बाजूला झुकला आहे खूप. +३ म्हणजे पांढर्‍याच्या बाजूला.

राजेश घासकडवी Thu, 13/11/2014 - 01:42

In reply to by अनुप ढेरे

अगदी याविषयीच लिहिणार होतो आज, पण काही महत्त्वाच्या कामामुळे समालोचनाला वेळ देता आला नाही.

ही तीनही इंजिन्स अतिशय छान आहेत. सुमारे १७ ते २० मूव्हजपर्यंत विश्लेषण करून त्यातल्या त्यात चांगल्या मूव्हज सुचवतात. बहुतांश वेळा त्यांनी योग्य मूव्ह दिलेली असते. त्याचबरोबर चार सर्वोत्तम खेळींसाठी पुढच्या अनेक मूव्हज कशा होतील हेही देतात. डावीकडे त्या मूव्हजसाठीचा 'स्कोअर' दिलेला असतो. हा स्कोअर पांढऱ्यासाठीचा असतो. म्हणजे ही मूव्ह खेळून पुढे काय होईल यावरून कुठची चांगली वाईट आणि किती चांगली वा वाईट हे ते आकड्यांनी सांगतात. ही किंमत पांढऱ्यासाठी असते. त्यामुळे ०.८ म्हणजे पांढऱ्यासाठी चांगलं, तर -०.८ म्हणजे पांढऱ्यासाठी वाईट.

यापलिकडे त्यांचा आणखीन फायदा म्हणजे त्यांनी दिलेल्या लाइन्स आपल्याला तिथेच बोर्डावर खेळून बघता येतात. त्यातल्या एखाद्या लाइनवर क्लिक केलं की उजव्या बाजूला त्या मूव्हज उमटतात. मग आत्तापर्यंतच्या खेळात आपल्याला मागे पुढे जाऊन बघता येतं तसंच या शक्यतांमध्येही मागे पुढे जाऊन तपासून बघता येतं. मला सगळ्यात आवडलेलं फीचर म्हणजे या तीन इंजिन्सच्या नावांशेजारी ग्राफ असं लिहिलेलं आहे. त्यावर क्लिक केलं तर आत्तापर्यंत तीनही इंजिनांनी दिलेले स्कोअर्स झालेल्या मूव्हजबरोबर कसे बदलत गेले हे दिसून येतं. त्यावरून खेळाचा रोख कसा बदलत गेला हे दिसतं. डाव क्र. ३ मध्ये साधारणपणे १७ व्या मूव्हनंतर आधी स्कॉटफिशने पांढऱ्याच्या बाजूने कौल द्यायला सुरूवात केली. नंतर २४व्या मूव्हच्या आसपास झपाट्याने पांढऱ्याचा स्कोअर वाढत गेला. नक्की कुठच्या मूव्हपासून आनंदने 'जिंकायला' सुरूवात केली हे तपासून बघायला मजा वाटते. या डावातही अठराव्या मूव्हपर्यंत काळ्याची स्थिती हळूहळू सुधारत होती. त्यानंतर अचानक पांढरा पुढे गेला. आणि दहाएक मूव्हजपर्यंत त्याची पोझिशन चांगली होती. २९ व्या मूव्हच्या आसपास काळ्याने पुन्हा परिस्थिती नियंत्रणात आणली हे चित्र स्पष्ट दिसतं.

टॅक्टिकल अॅनालिसिससाठी इतकी सुंदर यंत्रणा अस्तित्वात असताना त्याबद्दल मी काही लिहिणं याला काही फारसा अर्थ राहात नाही. म्हणून शक्यतो मी लिहिताना (मला कळलेल्या) स्ट्रॅटेजीविषयी लिहितो.

'न'वी बाजू Thu, 13/11/2014 - 15:58

In reply to by बॅटमॅन

दोन सरदारजी बुद्धिबळे खेळत होते. तिकडून आणखी दोन आले, आणि म्हणाले, "चलो डबल्स खेलते हैं..."

......................................................................

ता. क.: बुद्धिबळांत कदाचित 'डबल्स' म्हणता यावे, असे खरोखरच काही असते, हे ज्ञानवर्धन मध्यंतरी चिरंजीवांनी करून दिले. ते कायसेसे म्हणतात ना, "बालादपि सुभाषितं ग्राह्यम्"... आयुष्यात काही गोष्टी समजण्यासाठी (आम्हाला) बाप बनावे लागते म्हणतात, ते खोटे नाही!

अजो१२३ Thu, 13/11/2014 - 13:58

राजेशजी, आपणांस या चॅम्पियनशिपबद्दलची बेसिक माहिती देणारा धागा काढायला आवडेल काय?
- कधीपासून होतायेत, ही कितवी आहे, खेळाडू कसे सिलेक्ट होतात, देशांचे /क्लबांचे प्रतिनिधित्व कसे असते, फ्रेइक्वेंसी, परितोषक काय आहे, ते कसे वाटले जाते, इ इ नि इतर रोचक माहिती.

अजो१२३ Thu, 13/11/2014 - 14:22

In reply to by अनुप ढेरे

१. अनुपजी, राजेशजींना मी भरलेली थाळी मागत असताना तुम्ही मधे येऊन शेती करायचा सल्ला का देताय? ;) *
२. तुम्ही तो व्हिडिओ रेकॉर्ड कसा केला?

* गैरसमज होऊ नयेत म्हणून मधे मधे अशा स्मायल्या टाकायची सवय करून घेतोय.