आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ५
मला वाटतं की १७ मूव्हनंतर
मला वाटतं की १७ मूव्हनंतर बोर्ड कसा असेल याची गणितं प्रत्येक इंजिन कसं करतं यात फरक असावा. किती मोहरे आहेत, त्यांचा एकमेकांना जोर कसा आहे, डेव्हलपमेंट किती आहे, वजीर होऊ शकणारं मोकळं प्यादं, राजाची सुरक्षितता वगैरे अनेक बाबींवर हे ठरतं. त्यामुळे फरक असावा.
त्यातही स्टॉकफिश जरा जास्त सेन्सिटिव्ह आहे. ते नेहमीच बारीक अॅडव्हांटेज मोठा म्हणून दाखवतं. आता हे फायद्याचं आहे की नाही माहीत नाही. कारण हुदिनी जेव्हा ०.२ ते -०.२ देतो तेव्हा परिस्थिती समसमान असंच म्हणावं लागतं. स्टॉकफिशची ही रेंज मोठी असावी. त्यामुळे स्टॉकफिशचा अॅम्प्लिफायर मोठा आहे एवढंच म्हणता येतं. त्यातून कधीकधी नॉइजही अॅम्प्लिफाय होत असावा.
पहिल्या वीस मूव्हज
आत्तापर्यंत झालेला खेळ हा दोघांकडूनही पूर्णपणे बचावात्मक झालेला दिसतो. गेल्या अनेक डावांप्रमाणे, एकमेकांचे घोडे आणि उंट नष्ट करायचे आणि दोन हत्ती आणि वजिराच्या जोरावर एकमेकांशी मारामारी करायची, हेच झालेलं आहे. या डावात जरा जास्तच वेगाने. आनंदने आपलं डी प्यादं पुढे सरकवून पाचव्या - सहाव्या ओळीपर्यंत नेत असल्यासारखं दाखवलं खरं, पण त्यात काही दम नव्हता. त्यामुळे आता मधले चार कॉलम जवळपास रिकामे झालेले आहेत. दोघांचेही राजे सुरक्षित आहेत. त्यामुळे कोणी काही चूक केली नाही तर गेम ड्रॉ होणार असंच आत्ता तरी वाटतं आहे.
डाव ड्रॉकडे जातोय असं वाटत
डाव ड्रॉकडे जातोय असं वाटत असतानाच आनंदने विसाव्या मूव्हला आपला घोडा डी५ वर टाकून बी२ वरचं प्यादं वजिराला देऊ केलं. घोड्यासाठी उंट देऊन कार्लसेनने ते स्वीकारलं. आता आनंदकडे एक प्यादं कमी असलं तरी संपूर्ण पटावर ताबा आहे, आणि आक्रमणाचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. हत्ती इ७ वर आणि वजीर एच५ वर नेले तर राजावरचा दबाव गंभीर होऊ शकतो. कार्लसेनचा घोडा पटाच्या एका बाजूला बांधून पडला आहे.
क्वीन्स इंडियन डिफेन्स