Skip to main content

आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ८

राजेश घासकडवी Tue, 18/11/2014 - 17:41

आनंदने पांढऱ्या सोंगट्या घेऊन डाव ३ प्रमाणेच सुरूवात केली. मात्र यावेळी कार्लसेनने आनंदचं सी प्यादं पुढे येऊ दिलं नाही. त्यानेही आक्रमकपणे सी५ प्यादं पुढे ढकललं. आता नवव्या खेळीला मध्यभागातल्या सोळा चौकोनात सहा मोहरे आणि चार प्याद्यांची दाटी झालेली आहे.

राजेश घासकडवी Tue, 18/11/2014 - 19:19

आनंदने पहिल्या वीसेक चालींमध्ये आक्रमणाची तयारी केली. बी१ आणि सी२ वर उंट आणि वजीर आणून राजाच्या बाजूच्या एच७ घरावर नेम धरला होता. घोडेदेखील चांगल्या जागी आणलेले होते. मात्र तिथून पुढे त्याला आक्रमणाचा दबाव कायम राखता आला नाही. कार्लसेनने उंट आणि घोडा तसंच वजीरांची अदलाबदली करून ताण कमी केला आहे. आता आनंदचा नेम सी कॉलम ताब्यात घेऊन हत्ती सी७ वर नेण्याचा आहे. तर कार्लसेनने त्यापासूनचा धोका कमी करण्यासाठी बी७ मधला उंट मोकळा केलेला आहे.

आत्ता तरी दोघांचीही परिस्थिती बरोबरीची वाटते आहे. आत्ता अंदाज बांधायचा तर मॅच ड्रॉ होईल असं वाटतं.