आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ९
राजेश घासकडवी
लिहेलिहेपर्यंत मॅच ड्रॉ
लिहेलिहेपर्यंत मॅच ड्रॉ झालीसुद्धा. आज खेळात काही मजा आली नाही. मला वाटतं कार्लसेनने या मूव्ह्जचा प्रचंड अभ्यास करून आनंद कुठली चूक करतो आहे का हे खडा टाकून पाहिलं. आनंदनेही पुरेसा अभ्यास केलेला आहे, आणि त्यामुळे पुढे जाण्यात अर्थ नाही हे त्याच्या लक्षात आलं असावं.
कार्लसेनच्या पांढऱ्या सोंगट्या असताना डाव सहज ड्रॉ करता आला हे त्यातल्या त्यात आनंदचं यश. आता शेवटच्या तीन डावांत आनंदकडे दोनदा पांढऱ्या सोंगट्या आहेत. त्यातल्या एखाद्या डावात आनंदची सरशी झाली तर मॅच पुन्हा जीवंत होईल.
रुय लोपेझने सुरूवात झाली.
रुय लोपेझने सुरूवात झाली. वजिरावजिरी लवकरच झाली. सातव्या डाव्याप्रमाणे पहिल्या काही मूव्हज खेळ चालू होता. सातव्या मूव्हपासून कार्लसेनने त्या डावापासून फारकत घेतली. आनंदच्या खेळी अतिशय वेगाने होत आहेत. त्यावरून त्याने आणि त्याच्या टीमने या पोझिशनचा चांगला अभ्यास केलेला आहे असं दिसतंय.