आनंद विरुद्ध कार्लसन - डाव १०
राजेश घासकडवी
डाव खरोखरच उत्कंठावर्धक
डाव खरोखरच उत्कंठावर्धक झालेला आहे. वजिरावजिरी झाल्यावरही अजून डी प्यादं बळकट आहे. तिसऱ्या डावात जितकं ते शक्तिवान होऊन आख्ख्या डावावरच लवकर पकड घेतली होती तितकं नाही, पण कार्लसेनला त्याचा त्रास निश्चित होणार आहे. काही मूव्ह्जमध्ये ते सहाव्या ओळीत जाईल आणि मग त्याचा दबाव जाणवायला लागेल. आत्ता आनंदचा उंट आणि घोडा मोक्याच्या जागी जाऊन बसले आहेत. त्यातला घोडा अर्थातच हलू शकेल. पण एकंदरीत आनंदचं पारडं किंचित वरचढ दिसतं आहे.
हा शेवटून तिसरा डाव. आनंदला
हा शेवटून तिसरा डाव. आनंदला दोन वेळा पांढऱ्या सोंगट्या घेण्याची संधी आहे. त्यातली ही पहिली. या डावात काहीतरी निर्णायक हालचाल करणं त्याला भाग आहे. तेव्हा हा डाव प्रेक्षणीय होणार हे निश्चित. पहिल्या दहा मूव्ह्जमध्येच दोघांनी आपापल्या स्ट्रॅटेजी स्पष्ट केलेल्या आहेत. आनंदने डी प्यादं पुढे सरकवायची तयारी केलेली आहे.