Skip to main content

ऑफिसस्पीक

जॉर्ज ऑर्वेल या ब्रिटिश लेखकाच्या नायंटीन एटीफोर या गाजलेल्या कादंबरीत 'न्यूस्पीक' या काल्पनिक भाषेचा उल्लेख आहे. भाषेतील नेहमीच्या शब्दांना या न्यूस्पीकमध्ये वेगळाच अर्थ बहाल केलेला असतो. (एका मराठी लेखकानेसुद्धा शब्दांशी असाच खेळ खेळला आहे. पाणी या सर्वमान्य शब्दाचा इंग्रजीतील समीपार्थ (?) Soiled water or turbulent water cannot produce the true replica असा काही होऊ शकतो. त्याचप्रकारे उत्तम म्हणजे the spirit which is transcending the impure & is superior to pure is the Active manifestation of God viz. Benevolent Controller. ऐश्वर्य याचा अर्थ divine glory. स्वार्थ याचा अर्थ want-sense, मुद्दे याचा अर्थ variables (issues नव्हे)!) कादंबरीतील एकाधिकारशाहीवर विश्वास ठेवलेला गट या न्यूस्पीकचा वापर करून सर्व सामान्यांची दिशाभूल करत असतो. यांच्या राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जागा नाही; व्यक्तिमत्वाला कवडीमोल किंमत असते; व शांतीची व्याख्याच बदललेली असते.

परंतु आताच्या आधुनिक जगातसुद्धा या न्यूस्पीकचा वापर होत आहे असे म्हटल्यास आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. फक्त आता या नवीन भाषेला न्यूस्पीक असे न म्हणता 'ऑफिसस्पीक' असे म्हटले जात आहे.

आधुनिक व्यवस्थापन तंत्रामध्ये ऑफिसचे कुठलेही काम असो, ते प्रकल्पाच्या स्वरूपातच सादर करायला हवे असा एक अलिखित नियम असावा. कुठल्याही प्रकल्पाच्या अहवालाची पानं उघडल्यास या ऑफिसस्पीकच्या शब्दांची मुबलक प्रमाणात पेरणी केलेली दिसेल. उदाहरणार्थ, deliverables, upskill, learnings, drill-down, value-add, catch-up, moving forward, enablers and barriers, quick wins इ.इ.

मूळ इंग्रजी भाषा अशी कधीच नव्हती. परंतु आताच्या व्यवस्थापनाला भाषेची मोडतोड करण्याचे वेड(?) लागल्यामुळे अनेक वेळा भाषा, शब्द/वाक्य व त्यातून निघणारा अर्थ यांचा एकमेकाशी संबंध नसतो. परंतु शब्दांचे बुडबुडे ऐकायला छान वाटतात (व ऐकणार्‍यांच्या/ वाचणार्‍यांच्या मनातला गोंधळ तसाच राहतो.) rightsizing, streamlining, restructuring, numbersay, landscaping, the competitive environment, change agents इ.इ. प्रकारचे शब्द वापरून केलेले वाक्य नसल्यास अहवाल पूर्ण होत नाही.

ऑफिसस्पीकच्या संदर्भातील आणखी काही शब्द/वाक्य:
going forward, (brain storming ऐवजी) idea showers, cradle to grave approach, predict evangelist, platform atheists, incentivise, loop back, holistic, on my radar, low hanging fruit, pre-prepare, forward planning, conversate (converse चे भ्रष्ट रूप), in this space, 360 degree thinking, get all my ducks in a row, auspiced by (auspice चे क्रियापदीकरण) actioning, 110% (101% का नको, 200%, 500%... का नको,) not enough bandwidth, paradigm shift, stakeholders, cascading, granularity, leverage, living the values, strategic staircase, drill down etc.

यात आपणही भर घालू शकता.

(लेखाच्या विस्तारभयामुळे या शब्दांचा वापर कसा होत असतो हे सांगणे टाळलेले आहे. ऑफिसस्पीकमधील अशा शब्दांची यादी बघितल्यावर कुठलाही सुज्ञ वाचक याचा द्वेष केल्याशिवाय राहणार नाही.)

संदर्भ 1 आणि 2

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

वामन देशमुख Thu, 27/11/2014 - 16:40

या असल्या पोकळ शब्दांनी आणि त्यांच्या करण्यात येणाऱ्या बिनडोक प्रयोगांनी बऱ्याचदा हसावं कि रडावं हेच काळात नाही (हाही असलाच एक शब्दप्रयोग नाही का!)

माझा एक आइटी मार्केटिंगमधला तेलुगु सहकारी त्याच्या दिव्य शब्दप्रयोगांनी ऐकणाऱ्याच्या तोंडाला फेस आणतो.
उ.दा. "शेवटी, त्या उमेदवाराकडे योग्य ती कौशल्ये असायला हवीत, नाही का?" हे तो इंग्लिश मध्ये असं म्हणतो:
“End of, the candidate should have appropriate skills, no?”

यातलं “End of” हे मुळचं “At the end of the day” असं होतं, ते हळूहळू “End of the day” असं झालं आणि आता “End of” इतकंच उरलंय! पुढे काय होणारंय, देव जाणे!

अजून काही उदाहरणे:

  • Cosmetized
  • Input-throughput-output
  • “..and that’s how we add value to it and make a difference!”
  • “..and that’s how we make a difference and go to the next level!”

अनुप ढेरे Thu, 27/11/2014 - 16:41

हा हा. विषय आवडला. पण यातील काही शब्द तरी नुस्ते बुडबुडे नाहीत. ते त्यांचा अर्थ अगदी चपखलपणे कंन्वे करतात.
उदा: low hanging fruit, deliverables, bandwidth हे नुसते बुडबुडे नाहीत असं माझं मत.

वामा१००-वाचनमा… Fri, 12/12/2014 - 02:20

In reply to by नितिन थत्ते

मी चकाट्या पिटत रिकामी बसले आहे म्हणण्यापेक्षा - "I have bandwidth" म्हणणे बरे वाटते ;) =))

मिसळपाव Fri, 12/12/2014 - 20:58

In reply to by वामा१००-वाचनमा…

अंssssss, नाही. I have bandwidth म्हणजे "चकाट्या पिटत बसली आहे" नव्हे. I have bandwidth = "माझं काम चालू आहे पण जरा ऑप्टिमायझेशन करून एखादं बारकं टास्क करता येईल."
चकाट्या पिटत बसल्येय म्हणजे you are free.

घाटावरचे भट Thu, 27/11/2014 - 17:34

'I don't have visibility' हे वाक्य म्हैसमधल्या ऑर्डर्लीच्या 'आमाला पावर नाय...' सारखं वापरतात.

अजो१२३ Thu, 27/11/2014 - 22:18

जगाची संस्कृती व स्वरुप वेगाने बदलते. त्याची अभिव्यक्ति भाषेच्या माध्यमातून होते. पण भाषेत "नवसंकल्पनांचे बारसे" नावाची संकल्पनाच नाही. म्हणून स्वरुप अतिशय भिन्न असले तरी नव्या संकल्पना, नव्या गोष्टी जणू काही सामान्य नाम आहेत असे मानून अगोदरच्याच संकल्पनांची नावे उचलतात. त्यातून न्यूस्पीक, ऑफिसस्पीक, हीस्पीक, तीस्पीक भाषा बनत जातात. जिथे जिथे नाविन्य निपजत आहे, तिथे तिथे भाषाकारांनी नविन शब्दांचा व्यापक सप्लाय केला पाहिजे. एखादा शब्द एखाद्या कुटुंबातला म्हणून खपवायचे काही नियम बनवता येऊ शकतात. संधी आणि समासच नव्हे तर "अस्सेच" देखिल काही नविन शब्द हवेत. असे न झाल्यास भाषेचे दौर्बल्य वाढत जाईल.

वामा१००-वाचनमा… Wed, 03/12/2014 - 01:55

हे खास ऑफीसी शब्द मुख्य म्हणजे आवडतात अन या शब्दांमुळे वातावरणनिर्मीतीही साधते त्यामुळे माझा पास.
___
ऑफीसांमध्ये/ऑफिसेस मध्ये खास भाषेप्रमाणे छुपे संकेतही असावेत असा माझा कयास आहे. कारण व्हरमाँट्च्या आमच्या एका ऑफीसात रँकप्रमाणे दारापासून ते खिडकीपर्यंत जागा दिली जाई. हे नीरीक्षणातून नीट कळलं होतं. ज्याची रँक सर्वाधिक वरची तो खिडकीपाशी असे व सर्वात कमी रँकचा दाराच्या बाजूस असे. मध्ये मधली लोकं.
तसेच एक विशिष्ठ डेस्क होता ज्यावर माणूस बदली झाला की काही दिवसात्/महीन्यात त्याला डच्चू मिळत असे :(

फारएण्ड Fri, 12/12/2014 - 05:26

यावरच एक "बुल** बिंगो" म्हणून गेम काही वर्षांपूर्वी लोकप्रिय होता. हापिसच्या मोठ्या मीटिंग्स मधे जे शब्द नेहमी येतात त्याचा बिंगो (हाउजी) तयार करायचा व लोकांनी वेगळी कॉम्बिनेशन्स असलेले कागद घेऊन मीटिंग मधे बसायचे. तो तो शब्द आला की मार्क करायचा :)

कान्होजी पार्थसारथी Fri, 12/12/2014 - 11:22

सर्वंच ऑफिसस्पीक शब्दसमूहांबाबत तिडीक वाटते असेच नाही. जी वाटते, तीत बहुतेकदा जार्गनसदृश्य फील असतो. मला टेक्नोस्पीक आणि ऑफिसस्पीक अत्यंत स्वाभाविक वाटतात. नाहीतरी त्यांना जो काही पर्याय असेल तो अंतिमत: ऑफिसस्पीकच ठरेल. अनुप यांच्या प्रतिसादाशी पुरेपूर सहमत.

ऑफिसस्पीक काही शब्दांना संजीवनी देऊ शकतो.
उदा. माझ्या जुन्या ऑफिसमध्ये सतत वापरला गेलेला cherry-picking हा शब्दसमूह. नव्या मोबाईल मॉडेल वर काम करण्याची सुरुवात cherry-picking ceremony ने होत असे. Cherry-picking म्हणजे या संदर्भात, नव्या मॉडेल मध्ये जुन्या मॉडेलमधले जे जे काही उपयुक्त आणि सारखे काम आहे ते उचलून घेणे. Cherry-picking या शब्द समूहाचा मूळ इंग्रजी लक्षणार्थ पाहिला तर बराच नकारात्मक आहे. याउलट त्या शब्द-समूहाचा ध्वन्यर्थ स्वतंत्ररित्या वेगळा वाटतो, कानाला गोडही वाटतो. तो दोनही अर्थांनी जेव्हा ऑफिसमध्ये वापरला जाई तेव्हा त्यातली नकारात्मक अर्थछटा कामासंदर्भात नाहीशीच व्हायची. हा शब्द ऑफिसस्पीक मध्ये किमान माझ्या ऑफिसमध्ये तरी सतत जिव्हारूढ असे.

आदूबाळ Sat, 13/12/2014 - 08:59

You will be leveraged by someone

माझ्या पार्श्वभागाखाली तरफ घालून कोणीतरी मला आभाळात उडवून देतं आहे असं चित्र दिसून डोले पानवाले.

मग कामात मदत करायला एक जूनियर सहकारीण आली, आणि तिच्या हातात तरफ न दिसल्याने सुटकेचा निःश्वास सोडला.

नचिकेत Sun, 28/12/2014 - 07:23

न्यूजवीक आणि जॉर्ज ऑर्वेलसंदर्भात बोलताना "Political Correctness" ला वगळून कसे चालेल :)

सध्या याचे प्रचंड स्तोम माजले आहे.
उदाहरणे -

Illegal aliens ना खुळचटपणे undocumented workers म्हणणे
George Carlin चे youtube videos ("rape victim - unwilling sperm recipient") किंवा

http://www.urbandictionary.com/define.php?term=political+correctness

http://tartanmarine.blogspot.com/2010/05/new-politically-correct-terms…

येथे आहेत.