Skip to main content

भारतीय अध्यात्मावरील चालू संशोधन

अध्यात्मावरचे संशोधन सध्याला बंद झालेले आहे (आणि अध्यात्म केवळ भूलथापा देणार्‍या प्रतिगाम्यांचे बाहुले म्हणून उरले आहे ) असा काहीसा सूर ऐसीवर दिसला.
त्यावर उत्तर म्हणून मी स्वतः काही न वाचता जनरल गुगल लिंक दिली. या धाग्यावर स्वतः वाचलेल्या ऐकलेल्या लिंका देत आहे.

सध्याला या लिंक मधे वि़ज्ञानाकडे आणि अध्यात्माकडे पाहण्याचा दृष्टीकोन आय आय टी मद्रासच्या या लिंकमधल्या भाषणात आहे. ते मी स्वतः ऐकले आहे. स्लो आणि रटाळ आहे. पण विज्ञान आणि अध्यात्म यांचेकडे पाहण्याचा दृष्टीकोन समत्ववादी कसा असावा याचे हे उत्तम आहे. शिवाय अध्यात्माकडे हिनतेने का पाहू नये हे देखिल कळेल.

पूर्वग्रहदोष ज्याला/जिला नाही त्यांच्यासाठी रोचक लिंक आहे.

http://www.vsc.iitm.ac.in/Home/?page_id=1638

धाग्यावर मधे मधे स्वतः वाचलेल्या, ऐकलेल्या गोष्टी मधे मधे टाकायचा विचार आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

वामा१००-वाचनमा… Fri, 12/12/2014 - 23:06

आज जर मला विचाराल तर,
"जगात परमेश्वर आहे का?" याचं उत्तर मी असं देऊ शकेन की,.....
'असावा! कारण अजूनही जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा सायन्सला उलगडा करता येत नाही....
या रॅन्डम विश्वातही अनेक पॅटर्नस दिसून येतात ते कशामुळे? त्या पॉवरलाच ईश्वर म्हणतात का?
पण जर ईश्वर असेलच तर तो एखाद्या मूर्तीच्या स्वरूपात तर नक्कीच असणार नाही. ती एक अमूर्त ऍबस्ट्रॅक्ट पॉवर असेल.......
माझ्यासारख्या एका क्षुद्र जीवाकडे लक्ष द्यायला त्याला मुळीच अवसर असणार नाही. मी त्याची प्रार्थना करीत आयुष्य घालवतोय की माझी कर्मं करीत जीवनकाल कंठतोय याला त्याच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही......
मुंग्यांच्या वारूळावर कुणी फ्लीट फवारल्यावर मरणार्‍या मुंग्या, आणि या अनंत विश्वाच्या पसार्‍यात मरणारा मी याच्यात त्याच्या दृष्टीने काहीच फरक नाही.....

पिवळा डँबीस यांचा - http://misalpav.com/node/2522
हा लेख सर्वांनी वाचावा. मला तरी लेख संतुलित वाटला.

वामा१००-वाचनमा… Sat, 13/12/2014 - 01:54

In reply to by पिवळा डांबिस

खी: खी: मला वाटलच तुमची अशा प्रकारची प्रतिक्रिया होणार :) (स्वाभाविक आहे एकदम दिव्याच्या झोतात आल्यासारखं वाटतं. सर्वांना ते आवडतच असं नाही. मलाही नक्कीच आवडणार नाही पण ....)
सॉरी पण मला तो लेख फार आवडतो.

पिवळा डांबिस Sat, 13/12/2014 - 02:04

In reply to by वामा१००-वाचनमा…

क्या है की, यहाँपर हम "मैं तुलसी, तेरे आंगन की" वाला रोल करते है!
(और वहाँपर, "बीडी जलाईलेऽऽ, जिगरसे पिया" वाला!!)
;)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 13/12/2014 - 02:05

In reply to by पिवळा डांबिस

"मैं तुलसी, तेरे आंगन की" म्हटल्यावर मला फारच अध्यात्मिक वगैरे वाटायला लागलंय या धाग्यावर.

वामा१००-वाचनमा… Sat, 13/12/2014 - 02:16

In reply to by पिवळा डांबिस

हाय!!
आता इथेही "बीडी जलाईलेऽऽ, जिगरसे पिया" वाला रोल करायला लागा पिडां.
आमच्यावर अन्याय का हो? आम्हाला नको "आँगनवाली तुलसी" ;)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 13/12/2014 - 02:38

In reply to by वामा१००-वाचनमा…

ऐसीअक्षरेचे नाव बदलून "अखिल ब्रह्मांडिक अध्यात्म, देव, धर्म , परंपराविरोधी मराठी फोरम" असे ठेवायला पाहिजे. अशी मागणी असल्यामुळे तुम्ही

तुलसी सोडून

बिडी जाळायला सुरूवात करा -

पिवळा डांबिस Sat, 13/12/2014 - 04:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

की तात्या खेचराच्या तमाशात खुल्ला "तुज्या ऊसाला लागंल कोल्हा" म्हणत दाणकिनी नाचायची सवय लागलीये!
हिथं मुसु-घासूच्या (काळू-बाळूच्या चालीवर!) वगामंदी ज्यास्तीत ज्यास्त "किसना मला जाऊदे बाजाराला" अशी गवळणच फकस्त गाता येतीये!!!!! :)
हरयेका स्थळाचं येक आपलं महात्म्य असतंय!!!!!
असो.
आता आयांनो, उरल्यालं खवमधी लिवा.
:)
ओ अरूणजोशीकाका, तुमच्या धाग्यावर इक्तं अवांतर केल्याबद्दल मापी करा हो!

'न'वी बाजू Sun, 14/12/2014 - 07:46

In reply to by वामा१००-वाचनमा…

माझ्यासारख्या एका क्षुद्र जीवाकडे लक्ष द्यायला त्याला मुळीच अवसर असणार नाही. मी त्याची प्रार्थना करीत आयुष्य घालवतोय की माझी कर्मं करीत जीवनकाल कंठतोय याला त्याच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही......
मुंग्यांच्या वारूळावर कुणी फ्लीट फवारल्यावर मरणार्‍या मुंग्या, आणि या अनंत विश्वाच्या पसार्‍यात मरणारा मी याच्यात त्याच्या दृष्टीने काहीच फरक नाही.....

क्या बात है!

(<स्वतःचे तुणतुणे मोड>आम्हीही इथे असेच काहीतरी म्हणून गेलेलो आहोत.</स्वतःचे तुणतुणे मोड> (अगदी हेच उदाहरण नाही, पण असेच काहीतरी.))

(पिडां के साथ बातां: पिडांशेठ, बायेनीचॅन्स, तुमच्याही डाव्या खांद्यावर तीळ नाहीयेका हो?)

पण जर ईश्वर असेलच तर तो एखाद्या मूर्तीच्या स्वरूपात तर नक्कीच असणार नाही. ती एक अमूर्त ऍबस्ट्रॅक्ट पॉवर असेल.......

इथे मात्र आमचे म्हणणे काहीसे वेगळे आहे... ;-)

अजो१२३ Fri, 12/12/2014 - 23:15

http://www.preksha.com/center/preksha247meditation.asp

RESEARCH

From the last four years, scientific research work has been in progress in reversing heart, diabetes and asthma disease with the cooperation and research projects taken by the doctors from AIIMS (All India Institute of Medical Sciences) New Delhi. The results are very encouraging and doctors are now convinced that yoga is not only prenatal but it is also curing. Every month one or two camps are being held to help the patients of the ailments. More and more people are now taking interest in our projects and offering themselves for such type of treatment and research work. After the first international conference on yogic life style change in Jan.1995, more & more doctors have shown interest in doing research in reversing the ailment through yoga & life style change.

अजो१२३ Sat, 13/12/2014 - 00:20

In reply to by अस्वल

भाषणातील अणु आणि ब्रह्म यांची चर्चा मला रोचक वाटली. तत्त्बज्ञानाचा "स्टार्टिंग पाँइंट" बद्दल दिलेले युक्लिडचे उदाहरण देखिल रोचक आहे.
---------
भाषणकाराच्या ऋग्वेदाबाबतच्या मतांशी मी सहमत आहे असे नाही, पण मी ते भाषण सन्मानपूर्वक ऐकतो इतके ते काय खरे आहे.

अजो१२३ Fri, 12/12/2014 - 23:44

http://www.goetheanum.org/Anthroposophical-Society.336.0.html?&L=1
General Anthroposophical Society

The Anthroposophical Society is to be... "an association of people whose will it is to nurture the life of the soul, both in the individual and in human society, on the basis of a true knowledge of the spiritual world." The Society is public, without political agenda or religious affiliation. Its activity is seen today in independent national societies and initiatives throughout the world, with members from all cultures and continents.

The aim of the Society, the School of Spiritual Science and the Goetheanum is to make a spiritually based contribution to the life of humanity in the world of today and tomorrow.

"The Anthroposophical Society is... an entirely public society. Without regard to ethnic or national origin, social standing, religion, scientific or artistic conviction, any person can become a member who sees as justified the existence of an institution such as the Goetheanum in Dornach in its capacity as a School of Spiritual Science."

(Statutes of the General Anthroposophical Society, Article 4).

----------------------
acts and Figures of the Anthroposophical Movement and Anthroposophical Society

Worldwide, there are 47,000 members in the General Anthroposophical Society in 94 countries.

The number of people interested in anthroposophy and anthroposophical services is approx. 10-20 times larger.

In December, 2010, the initiative ELIANT (www.eliant.eu) was able to collect, to maintain the freedom of anthroposophical services at EU level a million signatures.

In the Switzerland there are 36 Rudolf Steiner schools and 93 preschool facilities attended by 7100 students. There are over 1000 schools and 1300 kindergarden and 60 training institutions in 60 countries worldwide. (www.steinerschule.ch/medien-bildungsangebot/factsheet).

There are 238 Demeter farms, on the increace in the Switzerland: in 2009 there were 14 Demeter companies. In 2010, there were 94 Demeter dealers/processors, and, for example, 13 beekeepers in 2009 and 5 more in 2010.
Information from Susanna Küffer of Demeter Switzerland.

There are 200 anthroposophic based medical or dental clinics and 3 hospitals, and 2 departments in general hospitals within Switzerland. Overall, there is a slight growth, especially in primary care, by about 10% per year, in recent years.
www.wegman-klinik.ch

Weleda and Wala are the two pharmaceutical and cosmetic specialists. The sales of the Weleda Group grew in 2009, by 13%, reaching 400 Million CHF.
(Source: www.weleda.de/media/download/GB_Weleda_2009.pdf)

After the establishment of the GLS Gemeinschaftsbank Bochum for ethical banking and low-interest loans in the 70s, offshoots in other countries, such as Austria, England and Switzerland were added. Like the organic agriculture also the anthroposophic banks, have developed sustainable standards such as ethical Banking, which was previously, generally unknown. Now the banks are on 3 continents.

अस्वल Sat, 13/12/2014 - 00:33

ओके. ह्यावर एक झनरल प्रतिसाद. चालू संशोधनाशीच निगडीत आहे असं नाही, पण त्यासाठी दुसरा धागा सापडला नाही म्हणून ...
आणि मी अध्यात्म विरोधी नाही. मला त्याबद्दल अधिक माहिती तुम्ही दिलीत तर उत्तमच!

वैज्ञानिक संशोधन
विज्ञान विचारधारेमागचं मुख्य कारण सत्याचा शोध हे आहे. आणि हे सत्य व्यक्तीनिरपेक्ष आहे. उदा. गुरुत्वाकर्षणाचे नियम. तुम्ही, मी, माझ्यासमोरच्या कुत्र्याने, माशीने कुणीही तपासले, तरी ते तसेच असतील. त्यात व्यक्तीप्रमाणे बदल होत नाहीत. आता हे असे सत्य शोधताना चुका होणं सहाजिक आहे. पण नवी गृहीतके मांडताना जुनी गृहीतके त्याजली तर वैज्ञानिकांना आनंदच होतो- कारण आपण त्या सत्याच्या आणखी थोडे जवळ जातो. तेव्हा बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असा हा उघडानागडा मामला आहे.
तेव्हा
१.गृहितके
२. प्रयोग/पुरावा/सिद्धता
३.चुकीत सुधारणा
पुन्हा १- नवे गृहितक
अशी काहीशी feedback system इथे अस्तित्वात आहे. मग त्यात अनेक विषय असतील(गणित्,भौतिकशास्त्र, जीवशास्त्र). ह्या वेगवेगळ्या शाखांमध्ये तुम्ही विज्ञानविचार वापरून नवी सत्यं शोधू शकता, आणि आधीची चुकलेली सत्यं पुन्हा तपासून दुरूस्त करू शकता.

आध्यात्म
माझ्या तुटक माहितीप्रमाणे, आध्यात्मात अनुभूतीला सर्वाधिक महत्त्व आहे. एखाद्या गोष्टीची अनुभूती घेणं आणि त्यातून निष्कर्ष काढणं(?) असं आध्यात्माचं स्वरूप आहे.
किंवा, केवळ वैचारिकदृष्ट्या आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचा अर्थ लावणे असं काहीसं त्याचं स्वरूप असेल. म्हणजे theology? (हे चुकीचे असल्यास कृपया दुरूस्ती करा)
प्रश्न-:
मोठा प्रश्न - अध्यात्माचं नक्की लक्ष्य काय आहे?
मोठा प्रश्न- अध्यात्म ही विचारधारा(उदा. विज्ञान) आहे की एक विशिष्ट ज्ञानशाखा(उदा. गणित, जीवशास्त्र)?
छोटा प्रश्न- आध्यात्मात नवी दुरुस्ती होते काय? उदा. द्वैत अद्वैत ह्या अस्सल भारतीय संकल्पनेत गेल्या २०० वर्षांत नवी सुधारणा कशी काय झाली?
(आध्यात्मातील संशोधन काय आहे हा त्या पुढचा भाग झाला)

अजो१२३ Sat, 13/12/2014 - 00:55

In reply to by अस्वल

अस्वलजी, आपण फार मुद्द्याचं, तर्कसंगत आणि पूर्वग्रहदोषरहित बोलला आहात. आपण उचललेला प्रश्न अतिशय उचित आहे. त्याच्या उत्तराची बांधणी, ओघ आणि उदाहरणे हे एक क्लिष्ट काम आहे. याच प्रतिसादाला प्रतिसाद म्हणून तुकड्या तुकड्यांत मी "एकच आशय" मांडेन, दोहोंच्या तुलनेचा, महत्त्वाचा, पद्धतीचा, ओवर्लॅपचा, संघर्षाचा, इ इ.
------
शिवाय लक्षात घ्या कि मी स्वतः देखिल विज्ञान नि तंत्रज्ञानाचा प्रचंड फॅन आहे. पण व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, नैसर्गिक, इ इ मूल्ये जेव्हा विज्ञानाचे नियम इतरत्र अप्प्लाय वा सुपर्पोज केल्याने होरपळून निघतात तेव्हा वैज्ञानिक विधानांची सीमा दाखवायचा मी प्रयत्न करतो.इतकेच ते काय. ही मूल्ये मला इतकी का जवळची आहेत याचं उत्तर हमखास अध्यात्मात निघतं, म्हणून मी त्याचा संदर्भ देत असतो. अन्यथा विज्ञानाच्या उणिवांची चर्चा ही त्याच्या परीघातच व्हायला मला काहीही हरकत नाही.

अस्वल Sat, 13/12/2014 - 01:09

In reply to by अजो१२३

@मूल्यं- विज्ञान मूल्याधिष्ठीत नाही असा जर तुमचा आक्षेप असेल तर ते मान्यच आहे. विज्ञानविचार करून एखादं सत्य जर मानवी मूल्यांच्या आड येत असेल तर तिथे विज्ञान काहीच करू शकत नाही. मग तो प्रश्न सापेक्ष होतो(subjective to human interpretation and rules)
मूल्यांबद्दल जर तुम्ही विज्ञानावर ताषेरे ओढणार असाल तर aren't you solving the wrong problem with science as a tool?
----------------------------------------
पण मला अध्यात्मावरच्या तीन प्रश्नांची तुमची उत्तरं जाणून घ्यायला आवडेल.

नितिन थत्ते Sat, 13/12/2014 - 06:55

In reply to by अजो१२३

>>पण व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, नैसर्गिक, इ इ मूल्ये जेव्हा विज्ञानाचे नियम इतरत्र अप्प्लाय वा सुपर्पोज केल्याने होरपळून निघतात

हा एक गंभीर आरोप आहे.

अन्याय्य नसलेली कोणती व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, नैसर्गिक इ इ मूल्ये विज्ञानाचे नियम अप्प्लाय वा सुपर्पोज केल्याने होरपळून निघालेली तुम्हाला दिसली आहेत?

वामा१००-वाचनमा… Sat, 13/12/2014 - 14:02

In reply to by नितिन थत्ते

अजोंचा हा धागा निघाल्यानंतर, ऑफिसातून घरी गेल्यावर "विश्वास भिडे यांचा एकोहम ब्लॉग" (http://www.scribd.com) चाळण्यास सुरुवात केली. पैकी एक विज्ञान व अध्यात्म यातील कॉन्फ्लिक्टिंग (परस्पर-मारक) उदाहरण सापडले-
साभार - http://www.scribd.com/doc/243061070/Satsangati-Durlabha-Samsara

विश्वामित्रांनी खूप तप केले तेव्हा सर्वांनी "ब्रह्मर्षि" म्हणून त्यांना संबोधले. पण वसिष्ठांनी त्यांना "ब्रह्मर्षि" म्हटले नाही याचा त्यांना खूप राग आला व त्यांनी वसिष्ठांना मारायचे ठरविले व ते त्यांच्या पर्णकुटीजवळ लपून बसले. त्यावेळी रात्री पिठूर चांदणे पडले होते व वसिष्ठ व अरुंधती अंगणात गप्पा मारीत बसली होती. तेव्हा सौ. अरुंधती म्हणाली "काय सुरेख चांदणे पडले आहे." तेव्हा वसिष्ठ म्हणाले की "अगदी विश्वामित्राच्या तपासारखे सुरेख चांदणे पडले आहे." विश्वामित्रांच्या कानी हे पडल्यावर त्यांना आश्चर्य वाटले व आनंदही झाला व आपण यांना मारायला आलो होतो या चा पश्चात्ताप होऊन ते अत्यंत लज्जितही झाले व धावत जाऊन त्यांनी वसिष्ठांच्या पायावर लोळण घेतली. तेव्हा वसिष्ठ म्हणाले "ऊठा ब्रह्मर्षि!" मग ते म्हणाले की कोणाचीही तोंडावर स्तुती करु नये त्यायोगे त्याला गर्व, अहंकार होण्याची शक्यता असते

आता behavioral science ला हे मूल्य पटेल का?

अशा अहंकार विसर्जित अगदी नामशेष करण्याच्या अनंत गोष्टी अध्यात्मात सापडतात याऊलट "Ego boosting" हे मानसशास्त्रात relatively healthy मानले जाते.

अशा मूल्यांकडे अजोंचा रोख असावा असे वाट्ते.

अजो१२३ Sat, 13/12/2014 - 01:07

In reply to by अस्वल

अस्वलजी, आपण फार मुद्द्याचं, तर्कसंगत आणि पूर्वग्रहदोषरहित बोलला आहात. आपण उचललेला प्रश्न अतिशय उचित आहे. त्याच्या उत्तराची बांधणी, ओघ आणि उदाहरणे हे एक क्लिष्ट काम आहे. याच प्रतिसादाला प्रतिसाद म्हणून तुकड्या तुकड्यांत मी "एकच आशय" मांडेन, दोहोंच्या तुलनेचा, महत्त्वाचा, पद्धतीचा, ओवर्लॅपचा, संघर्षाचा, इ इ.
------
शिवाय लक्षात घ्या कि मी स्वतः देखिल विज्ञान नि तंत्रज्ञानाचा प्रचंड फॅन आहे. पण व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, नैसर्गिक, इ इ मूल्ये जेव्हा विज्ञानाचे नियम इतरत्र अप्प्लाय वा सुपर्पोज केल्याने होरपळून निघतात तेव्हा वैज्ञानिक विधानांची सीमा दाखवायचा मी प्रयत्न करतो.इतकेच ते काय. ही मूल्ये मला इतकी का जवळची आहेत याचं उत्तर हमखास अध्यात्मात निघतं, म्हणून मी त्याचा संदर्भ देत असतो. अन्यथा विज्ञानाच्या उणिवांची चर्चा ही त्याच्या परीघातच व्हायला मला काहीही हरकत नाही.

अजो१२३ Sat, 13/12/2014 - 21:10

In reply to by अस्वल

विज्ञान विचारधारेमागचं मुख्य कारण सत्याचा शोध हे आहे. आणि हे सत्य व्यक्तीनिरपेक्ष आहे. उदा. गुरुत्वाकर्षणाचे नियम. तुम्ही, मी, माझ्यासमोरच्या कुत्र्याने, माशीने कुणीही तपासले, तरी ते तसेच असतील. त्यात व्यक्तीप्रमाणे बदल होत नाहीत. आता हे असे सत्य शोधताना चुका होणं सहाजिक आहे. पण नवी गृहीतके मांडताना जुनी गृहीतके त्याजली तर वैज्ञानिकांना आनंदच होतो- कारण आपण त्या सत्याच्या आणखी थोडे जवळ जातो. तेव्हा बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असा हा उघडानागडा मामला आहे.
तेव्हा
१.गृहितके
२. प्रयोग/पुरावा/सिद्धता
३.चुकीत सुधारणा
पुन्हा १- नवे गृहितक
अशी काहीशी feedback system इथे अस्तित्वात आहे. मग त्यात अनेक विषय असतील(गणित्,भौतिकशास्त्र, जीवशास्त्र). ह्या वेगवेगळ्या शाखांमध्ये तुम्ही विज्ञानविचार वापरून नवी सत्यं शोधू शकता, आणि आधीची चुकलेली सत्यं पुन्हा तपासून दुरूस्त करू शकता.

------------------------
सत्याचा शोध या संकल्पनेचे विज्ञानात आणि अध्यात्मात काय काय अर्थ होतात हे तुकड्या तुकड्यातून सांगेन. त्यातला हा पहिला भाग. वैज्ञानिक अप्रोच मधे असे काय कमी आहे जेणेकरून मला अध्यात्मिक अप्रोच सुद्धा अपिल करतो असा जनरल सुर इथे असेल. नक्की किती तुकडे असतील सांगू शकत नाही.
------------------------
सत्य हे नाम नाही.
सत्य या शब्दाला इन आयसोलेशन काहीही अर्थ नाही. सत्य ही विधानांची, बाबींची, संकल्पनांची किंवा अस्तित्वांची एक कसोटी, गुणधर्म आहे. त्यांच्याशी जोडल्याशिवाय त्या शब्दाला अर्थ नाही. (केवल सत्य नावाचा "स्टँडालोन" प्रकार निरर्थक आहे. सत्य हे एक "शुद्ध विशेषण" आहे. त्याचा शोध घेता येत नाही. दुसर्‍या वाक्याला त्याच्याशी निगडीत नाम उच्चारणे आपण टाळतो, पण तेव्हा देखिल ते निगडित नाम तितकेच महत्त्वाचे असते.) उदा. "मॉडेम चालू आहे" हे "विधान" सत्य वा असत्य असेल. किंवा मॉडेम ही संकल्पना (वा एक अस्तित्व म्हणा) सत्य असेल वा असत्य असेल. नुसतेच सत्य नावाची सत्य संकल्पना जगात कुठे नसते.

सत्य काय काय असते?
केवळ विधानच सत्य नसते तर एखाद्या गोष्टीचे भौतिक अस्तित्वही सत्य असते. याशिवाय सर्व संकल्पनांचे स्वतःचे अस्तित्व सत्य असते मात्र त्या संकल्पनेतील वस्तू रियल/वास्तव्/सत्य नसू शकते. मी इथे वापरलेला प्रत्येक जनरल सत्य हा शब्द नाम असताना १. सत्य विधान २. सत्य भौतिक बाब ३. सत्य संकल्पना ४. संकल्पनेतील वास्तव या चारही अर्थांनी आहे. हे भान विसरले तर सत्याच्या ज्या दोन छटा शेवटी सांगीतल्या आहेत, त्या निरर्थक वाटतील.

सत्य आणि दृष्टा
एक रोचक गोष्ट म्हणजे सत्कृतदर्शनी तरी सत्य विधानाला वा सत्य संकल्पनेला एक दृष्टा असतोच असतो असे वाटते. शेवटी ते सत्य विधान वा सत्य संकल्पना मांडणारा माणूस दृष्टा असतो असे म्हटले तर चालेल, त्या सत्य विधानास वा सत्य संकल्पनेस असा दृष्टा आवश्यक असो वा नसो! "या दृष्ट्याच्या दृष्टीकोनातून" एक विधान वा एक संकल्पना सत्य वा असत्य असते. म्हणजे गुरुत्वाकर्षणाने चेंडू खाली येतो हे विधान तुम्हाला सत्य वाटले तरी अन्य कोणास ते विधान असत्य वाटू शकते.

नियमाची संकल्पना
हा विरोधाभास आहे का माहित नाही पण आपण म्हणालात तसे विज्ञान सत्याला दृष्ट्यापासून वेगळे करते आणि शाश्वत सत्य अशी संकल्पना शोधते किंवा शाश्वत सत्य विधान मांडू पाहते.(इथे केवल/शाश्वत सत्याचा उल्लेख निरर्थक/उपहासात्मक नाही. पहिल्या उतार्‍यात उल्लेखलेले केवल सत्य कोणत्याही संकल्पनेशी निगडीत नव्हते. विज्ञानाचे केवल सत्य मात्र अनेक संकल्पनांशी निगडीत असते. असे वैज्ञानिक केवल सत्य निदर्शक विधान म्हणजे वैज्ञानिक नियम. विज्ञान अशा नियमांचा शोध घेते आणि त्यास मनुष्योपयुक्त कारणांस वाहू पाहते. किमान असे ते मानते. त्याला मानणारे मानतात. यात "गैर" काही नाही.

निसर्गाचा कोणताही नियम हे एक शाश्वत सत्य आहे असे मानायला हरकत नाही. दिलेल्या संदर्भात, दिलेल्या गृहितकांखाली निसर्गाचा नियम अकारण बदलू शकतो असे म्हणणे अनरिजनेबल वाटते. म्हणून विज्ञानाचा शोध हा शाश्वत अचूक सत्याचा शोध वा निसर्गनियमांचा शोध असतो. आपले हे म्हणणे योग्य आहे आणि विज्ञानाचे असे उद्दिष्टही कोणास आपत्तीजनक वाटू नये.

ऐच्छिक आणि शाश्वत सत्यासत्याच्या संकल्पना
सत्य या शब्दास भाषेत दोन अर्थछटा आहेत. त्या कशा ते पहा.
आपण क्षणभर विज्ञानाच्या, अंततः सिद्ध झालेल्या, शाश्वत आणि "दृष्टा नसलेल्या किंवा तो महत्त्वाचा नसलेल्या" सत्यांच्या (इथे पुन्हा सत्य म्हणजे काय काय इकडे ध्यान वेधू इच्छितो) संचाकडे पाहू यात.दृष्टा महत्त्वाचा नसताना निसर्गात म्हणा वा प्रत्यक्षात म्हणा वा वास्तवात म्हणा वा जगात म्हणा, सगळी सत्येच असतात. अशा वेळी सत्ये कशी मांडली जातात (जसे आता), जातात कि नाही (जसे विश्व लौकिकर्थाने मृत असताना) हे अवांतर आहे पण निसर्गाचे जे काही मूळ नियम/सत्ये अस्तित्वात आहेत ते शाश्वत आहेत. दिलेल्या संदर्भात नियमच नाहीत, वा नियम अकारण बदलतात म्हणणे इररॅशनल आहे. त्या अर्थाने दृष्टा नसलेल्या किंवा दृष्टा महत्त्वाचा नसलेल्या जगात असत्य असे काही नाही. असूच शकत नाही. एक शाश्वत असत्य जगात फंक्शनिंग आहे म्हटले तर इतर सगळी सत्ये निरर्थक ठरतात. खूप मोठमोठ्या संख्यांच्या गुणाकारात एक शून्याचा गुणाकार समाविष्ट केल्यासारखा प्रकार होतो. मग असत्याचा उद्गम कोठे होतो? तर फक्त दृष्ट्याच्या परिप्रेक्ष्यात असत्य या संकल्पनेचा उदय होतो. जगात सगळी शाश्वत सत्ये, शाश्वत नियम करकच्चपणे आपापले काम पाहत असतात. दृष्टा फक्त अशा काही नियमांना वा त्याच्या काही निरीक्षणांना सत्य वा असत्य मानत असतो. भाषेचे दौर्बल्य हेरून मी असे म्हणेन कि सत्य या शब्दाचे भाषेत दोन कनोटेशन्स आहेत.
१. सत्य = विश्वातील शाश्वत सत्ये वा नियम. या अर्थाने सत्य शब्द वापरला तर असत्य हा शब्द निरर्थक ठरतो. म्हणजे असले असत्य अस्तित्वात असू शकत नाही. नसते. उदा. डेड यूनिवर्समधे* असत्य नावाची संकल्पना देखिल नसेल, अस्सल असत्य तर जाऊच द्या.
२. सत्य = मानवी कल्पनेतले, विचारांतले सत्य वा नियम. या अर्थाने मानव आपल्या ईच्छास्वातंत्र्याचा** वापर करून काहीही (विधान, संकल्पना, वास्तव, बाब, इ इ इ) सत्य वा असत्य मानू शकतो. यातली काही सत्ये वरील प्रकार १ मधील सत्ये या प्रकारात मोडणारी असू शकतात.

वैज्ञानिकांनी मांडलेली सत्ये, नियम हमखास प्रकार २ चे सत्य असते. ते प्रकार १ चे ही सत्य असू शकते. आता वैज्ञानिकांनी मांडलेल्या सत्यांना, नियमांना महत्त्व केव्हा देता येईल? एक तर ती प्रकार १ ची सत्ये आहे हे सिद्ध झालेले असावे वा शोधप्रक्रिया प्रकार १ च्या दिशेने असावी. वैज्ञानिकांचे उद्दिष्ट तरी असे आहे यात कोणालाच वाद नसावा. त्याचे क्रेडिट त्यांना देता येईलच. पण खरोखरीच (उद्दिष्ट सोडून सगळे, प्रत्यक्ष काय होत आहे ते) असे आहे का हा प्रश्न महत्त्वाचा नाही का?

* एका परिने दृष्टा हटविल्यावर म्हणता यावे.
---------------------------------------------
या सगळ्याचा अध्यात्मिक अप्रोचशी काय संबंध येतो ते पुढे येईलच.

अस्वल Tue, 16/12/2014 - 00:10

In reply to by अजो१२३

वैज्ञानिकांनी मांडलेली सत्ये, नियम हमखास प्रकार २ चे सत्य असते.

मला हे उलट वाटते. वैज्ञानिकांचा रोख नेहेमीच प्रकार १ चे सत्य शोधण्यामागे असतो. प्रकार २ ची सत्ये विज्ञान मांडू देत नाही.
(पण हे सोडून बाकी विवेचन बर्यापैकी पटले)

अजो१२३ Sun, 14/12/2014 - 03:08

In reply to by अस्वल

मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीचे भविष्य आजघडीला पाहताना मला अध्यात्मालाही का सन्मानाने पाहावे वाटते हे सांगण्याचा इथे प्रयत्न केला आहे.
------------------------------------
भौतिकतेच्या क्षेत्रात मानवाची आपल्या बुद्धीची कल्पना व्यवहार्य असावी:
मानवाला बुद्धिमत्ता आहे. तिच्याद्वारे त्याने विश्वातली अनेक सत्ये जाणली आहेत असे एका अर्थाने म्हणता यावे. पण थेट मानवी बुद्धिच्या मर्यादाच नाहीत असे म्हणता येते काय? मानवाच्या बुद्धिला मर्यादा नाही असे सिद्ध झाले आहे काय? इथे मानवी बुद्धी म्हणजे मानवाची स्वतःची बुद्धी, इंद्रीये, इ इ तसेच मानवाने आपल्या शरीराने, मनाने बुद्धीने जी यंत्रे बनवून घेतली आहेत ती मानवाला जी काही माहिती देतात ती सारी माहिती. मानवाची बौद्धिक क्षमता आणि विश्वातल्या सर्व ज्ञानाचे असे कोणते समीकरण आज नसावे कि ही बुद्धी ब्रह्मांडाची सत्ये जाणून घेण्यासाठी पुरेशी, जास्त किंवा कमी आहे. मानवाला भविष्यात किती आणि काय काय शोध लागू शकतात याचे उत्तर "सगळेच" असे असू शकते पण असे किमान आजतरी सिद्ध झालेले नाही. तेव्हा तसा अभिमान अनाठायी आहे. निसर्गात नक्की अजून काय काय आहे ज्याचं नावही आज मानवाला माहित नाही असं बरंच काही असू शकतं. हे नाकारावंच असं काही सिद्ध झालं नाही. मानव प्रत्यक्षपणे, इंद्रियांकरवी वा त्याच्या उपकरणांकरवी निसर्गातली सगळीच सत्ये, नियम "किमान जाणून घेईल" असे सिद्ध झाले आहे काय? भविष्यात स्वतःत जैविक बदल करून घेऊन माणूस विश्वाचे सारे ज्ञान आत्मसात करेल असे देखिल आज म्हणता येत नाही. आशा करणे वेगळे आणि खात्री वेगळी.

सद्य ज्ञानाचे रिकंसिलिएशन
मॅक्रोलेवलवर आज मानव (त्याचे उपकरण) सूर्यमालेच्या जस्ट बाहेर गेले आहे. आज आपण "आपले विश्व" जे ५० बिलियन लाइट इअर्स त्रिज्येचे आहे त्याचा नकाशा बनवला आहे. त्यापलिकडेही इतर "विश्वे" असावीत असा एक अंदाज आपण करीत आहोत. मल्टीवर्स असावे असा एक दुसरा अंदाज आहे. डार्क मॅटर, डार्क एनर्जी नावाचे प्रकार असावेत असा अंदाजही आहे. जेव्हा आपण विश्वाच्या खोलात शिरू तेव्हा आपण नॅनोस्केलवर बांधकाम करू लागलो आहोत. मायक्रोलेवलवर आपल्या माहितीत सध्याला क्वार्क्स्,इलेक्टॉन्स्,फोटॉन्स, बॉसॉन्स आणि कॉस्मिक किरणांतून येणारे काही कण, इ इ हे लहानात लहान कण आहेत. कणांची रुपांतरणे आणि हायरार्की सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे. मूळात सर्व कणांना, उर्जांना रचणारे एकच मूलभूत पार्टिकल असावेच का असा जुना प्रश्न अजून किचकट झाला आहे. स्ट्राँग फोर्स्,विक फोर्स, विद्युत बल, चुंबकीय बल, आणि गुरुत्वाकर्षण ही पाच बले सध्याला आपल्याला मूलभूत बले म्हणून ठाऊक आहेत. मानवाला आज माहित नसलेली अन्य एकूण मूभूत बले आहेत का,असली तर ती कोणत्या स्वरुपाची असावीत आणि कशी रडार खाली आणावीत, अभ्यासावीत हा प्रश्न आहे तर आहेच. सध्याला ज्ञात बले, विश्वाचे मायक्रो मॉडेल आणि विश्वाचे मॅक्रो मॉडेल ही मानवाला लवकरच रिकन्साईल होतील असे मानून चालू.

पण १०^-९ च्याखाली १०^-९ ट्रिलियनवर आपला चांगलाच कंट्रोल आला असला तरी, प्लँक लेंग्थ म्हणजे १०^-३५ च्या खाली सगळा अंधार आहे. पण एखादे पार्टिकल अनंतापर्यंत झूम करायची संकल्पना - तिचे काय? तिथे काय आढळेल? ५० बिलियन लाईट इअर्सच्या पुढे अनंताकडे भिन्नता नाही असे आपण खात्रीपूर्वक म्हणू शकतो काय? काय आहे हे सांगू शकतो काय? भविष्यात कधी ना कधी काय आहे हे सांगू शकतोच असे म्हणायला आज काय आधार आहे? भविष्यात आपण काय काय सांगू शकतो हे सांगायला भविष्यात आपल्याकडे काय स्रोत असतील आज कोणी समीकरण मांडले आहे काय? सजीवतेच्या बाबतीत तर अजूनच समस्या आहेत. उत्क्रांतीचा आज मांडलेला आलेख हा एक्सपोनेंशिअल आहे. त्याला लिनिअर स्केलवर मांडण्याइतका डेटा मानवाकडे नाही. उत्क्रांतीचे मूळ, अबायोजेनेसिस, जिथे सजीवतेचा उद्गम होतो, तिथे तर उत्क्रांतीची थेरी प्रचंड "अजून कितीतरी मैल जायचे आहे" याच नव्हे तर अजून "आरंभाचे ठिकाण सापडले आहे काय?" या अवस्थेत आहे. पृथ्वी आणि कॉमेटस वरचे निर्जीव द्रव्य ते सुसंस्कृत, सभ्य, बुद्धिमान मनुष्य हा उत्क्रांतीचा इतिहासप्रवास झाला आहेच असेच मानले तरी त्याची डिटेलवारी इतक्या असमाधानकारक प्रतीची आहे कि त्याच्या मूलभूत गृहितकांवरच प्रश्न उठावेत. मनुष्याला भविष्यात सध्याला दिसणार्‍या सजीवांचे सजीवत्व संपूर्ण रुपाने कळणारच आहे असे म्हणण्याजोगे आज समोर काय आहे? आणि समजा ते कळेलच असे मानले स्वतःचेच सजीवत्व कसे आहे आणि नव्याने कसे काँफिगर करावे, करावे की नाही याची समस्या मनुष्य हाताळू शकतोच असे म्हणण्याजोगे आज काय आहे? म्हणून सुज्ञ वैज्ञानिक जेव्हा आम्हाला हे हे सत्य गवसले आहे असे सांगतात तेव्हा त्यांना त्यांनी केलेल्या विधानाला अनेक अभिप्रेत सीमा असतात.
शिवाय विज्ञानाच्या अनेक उपशाखांत अनंत नाकी नऊ आणणारे फु़टकळ प्रश्न आहेत. पण असो.

मला जे जाणून घ्यायचे आहे ते विज्ञान प्रॉमिस करते आहे काय?
मानव जेव्हा आपल्या सभोवतालची भौतिकता जाणून घेत आहे तेव्हा त्यास जे एकूण प्रश्न पडतात ते सोडवण्यास तो क्षम आहे असे आज मानण्यास काय आधार आहे? सुक्ष्मामधे पाहू जाता अनसर्टेंटी प्रिन्सिपलनुसार एखादी गोष्ट मोजू जाता उपकरणीय हस्तक्षेपाने मापनातच फरक होतो किंवा एखाद्या पदार्थाचे दोन गुणधर्म मोजताना एक जितका अचूकपणे मोजायला जाऊ तितका दुसर्‍याचा अंदाज चूकत जातो. ईलेक्ट्रॉनचे स्थान किंवा उर्जा दोहोंपैकी एकच काहीतरी जास्त अचूकपणे मोजता येते. आणि दुर्दैवाने दुसर्‍याची अचूकता पूर्ण दुर्लक्षिली तरी पहिले निरीक्षण १००% पर्फेक्ट करता येत नाही.

मनुष्याची निरीक्षण क्षमता जशी जशी वाढली आहे तसे तसे त्याच्यासमोरच्या भौतिक प्रश्नांचे स्वरुप अतिशय क्लिष्ट बनत गेले आहे. अस्तित्व, काळ, स्पेस, उर्जा, द्रव्य, बदल, समत्व हे मूलभूत प्रतलावरचे अतिशय किचकट प्रश्न आहेत. मानवाने जी बरीच उत्तरे दिली आहेत त्याचे बरेच प्रश्न अर्धवट सोडून दिले आहेत. काय चे उत्तर मिळाले, किती चे उत्तर मिळाले, केव्हाचे उत्तर मिळाले, कूठेचे उत्तर मिळाले, कसे चे उत्तर मिळाले, का चे उत्तर मिळाले, होय/नाही चे उत्तर मिळाले याचा प्रचंड आनंद विज्ञान मानवाला देऊन गेलेले आहे. पण हे आनंद क्षणिक ठरले आहेत. तेच प्रश्न पुढच्या प्रतलावर नेले कि विज्ञान पुन्हा निरुत्तर होते. खासकरून वैज्ञानिक निरीक्षणातले सत्य तस्सेच का आहे हा प्रश्न भंडावून सोडतो. "असंतुलित बाह्य बलाच्या अनुपस्थिती पदार्थ आपली एकदिशीय गती कायम ठेवतो" हे ठिक - पण का म्हटले कि निरुत्तर. वरच्या भाषणाच्या फितीमधे भाषणकर्ता "बल हे सेकंड ऑर्डर ऑफ चेंज" इथेच का सोडून द्यायचे हा प्रश्न विचारतो. गतीची अनंतापर्यंत डिफरंशिअशन्स करता येतात, मग बल फक्त त्वरणाशीच निगडीत का? हा तर साधा प्रश्न आहे. मूळात ब्रह्मांड आहेच का? ते नसते असे झाले नसते का? स्पेस ही असते का नसते? जी गोष्ट नसतेच मूळी तिला आपण व्हॉइड म्हणतो ना! स्पेस म्हणजे काहीच नसणे नव्हे का? जर स्पेस म्हणजे काहीच नाही तर मूळातच नसलेल्या गोष्टीला गुणधर्म (स्थान, आकार, मिती) कसे काय असू शकतात? आणि तो ब्रह्मांडविषयक प्रश्न स्पेसबद्दलही विचारता येतो. स्पेस मूळात असतेच का? ती नसायला काय हरकत होती? हा प्रश्न द्रव्य, उर्जा यांच्याबाबतीत देखिल विचारता येईल. हे प्रश्न वैज्ञानिक प्रश्न नव्हेत काय? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी प्रयोग आवश्यक असू शकतात हे मी नाकारत नाही पण हे प्रयोग करायला लागणारी कंविंसिंग पार्श्वभूमी, फिलॉसॉफी आज विज्ञानाकडे आहे असे मानायला कारण नाही.

प्रश्न केवळ डब्ल्यूएच आणि बायनरी टाईपचे नाहीत. काळ नावाचा स्वतंत्र कोणी मुळी असतोच का कि इतर बाबींच्या बदलच्या निरीक्षणाशिवाय त्याचे निरीक्षण, मापन करता येत नाही कि काय असेही प्रश्न आहेत. पदार्थ हा उर्जेतून कणांत आणि कणांतून उर्जेत रुपांतर करतो हे समजू शकतो पण पदार्थ एकदाच, एकाच वेळी, एकाच कालखंडात कण आणि उर्जा दोन्ही असतो म्हणजे काय? स्पेसही नसते, टाईम नसतो, तर स्पेसटाईम वाकतो कसा? कि एका लोकल इव्हंटसाठी सारे ब्रह्मांड वाकते? काल नसतोच तर थांबतो कसा? एकच पार्टिकल एकाच वेळी दोन भिन्न जागी कसे काय असू शकते? या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर असू द्यात, समाधानकारक तत्त्वज्ञानही विज्ञानाच्या शाखांकडे आज उपलब्ध नाही.

विज्ञान कि योगायोगवाद?
विश्व, निसर्ग सम्यक नाही असे एकिकडे म्हणताना, वैज्ञानिक, कोणताही वैश्विक स्थिरांक त्याच्या सद्य मूल्यापासून अंशभरानेही इकडे तिकडे असता तर विश्व कसे वेगळे (खरेखुरे असम्यक) दिसले हे दुसरीकडे सांगतात. ब्रह्मांडाची आणि खासकडून मानवाची आज असण्याची आणि आजसारखे असण्याची एकूण संभावना (प्रोबेबिलिटी) किती आहे? १. मूळात ब्रह्मांड असण्याची शक्यता (१००% वा शून्य% पैकी एक) गुणिले २. स्पेस अस्तित्वात असण्याची शक्यता (१००% वा शून्य% पैकी एक) गुणिले ३. बिंग बँग पार्टिकल अस्तित्वात असण्याची/येण्याची शक्यता (१००% वा शून्य% पैकी एक) गुणिले ४. या पार्टीकलचा स्फोट होण्याची शक्यता (म्हणजे तसा गुणधर्म असण्याची शक्यता. १००% ते शून्य% पैकी एक. ही शक्यता शून्यही असू शकत होती. शून्यातून अस्तित्वात येऊन आल्याआल्याच स्फोट व्हावा हे गरजेचे नाही. "कारणाच्या आगमानासाठी" हे पार्टिकल अनंत काळ वाट पाहत बसू शकले असते) गुणिले ५. त्याचे विभाजन किती प्रकारच्या कणांत, उर्जांत करायचे त्याच्या शक्यता (प्रत्येकी एक ते अनंत यांच्यातून येणारी काँबीनेशन्स) गुणिले ६. या प्रत्येक पार्टीकलचे आणि उर्जेचे सारे गुणधर्म जसे आढळले आहेत तसे असण्याशी शक्यता (गुणधर्म काय काय असू शकतात त्याच्या अनंत शक्यता आहेत, त्यांमधून एक काँबेनेशन)गुणिले ६. त्या प्रत्येक गुणधर्माचे गणितीय मूल्ये आजवरपर्यंतच्या सारखे असण्याची शक्यता (ऋण अनंत ते धन अनंत मधून) गुणिले ७. या पार्टिकलांवर, उर्जांवर, अन्य बाबींवर काही महत्त्वाचे रँडम इव्हंट घडले असतील तर त्यांची शक्यता (असे रँडम इव्हंट अनंत अनंतदा, अनंत प्रकारे घडू शकतात.) इथे प्रत्येक संभावनेच्या गणितात विभाजक अनंत आहे. म्हणजे एक शून्य संभावनेची घटना घडली आहे आणि बुद्धीमान मानव आज अस्तित्वात आला. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे कि संभावना किती का कमी असेना, संभावना आहे आणि ती घडली. यातले काहीही थोडे इकडे तिकडे झाले असते, तर कदाचित आजचा मानव नसता पण विश्व कोणत्या ना कोणत्या (कदाचित आपल्यामते निर्जीव वा भिन्नप्रकारे सजीव) राहिले असते. पण या म्हणण्यात काही तथ्य नाही. कारण या गुणाकारात पहिल्या चार या संभावना नसून अनसर्टेटिज आहेत. माझा शब्द चूकत असतेल. नक्की काय म्हणायचे आहे ते सांगतो - मूळात एकदा ब्रह्मांड असावे कि नसावे हे ठरवायचे म्हटले आणि असावे असे म्हटले कि "अगोदर" पुढचे सगळे ते काय काय, कसे कसे, इ इ असावे यावरचे प्रश्न उत्तरावे लागतात. यात सब्जेक्टीवीटी येते. म्हणून स्रोत शोधताना विज्ञानाने स्वीकारलेली ही टॉपडाउन अप्रोच एक संभ्रम निर्माण करते. इथे एक सर्क्यूलर काँप्रेहेन्सिव अप्रोच अधिक उचित वाटते.
------------------------------------------------------
म्हणून भौतिकताच सर्व काही आहे असे मानले तरी आम्ही नाही तरी आमची सुदूर संतती का होईना ती सर्व जाणून घेईल असे मानणे अतिउत्साह ठरावा. आता हे सर्व विज्ञान जाणणे अनावश्यक आहे असेही खात्रीलायकरित्या म्हणता येत नाही कारण कशातून काय मिळणार आहे आणि काय नाही, काय सिद्ध होणार आहे काय नाही, हे सिद्ध झाले आहे असे आज मानायचे काही कारण नाही. म्हणून हे प्रश्न दुर्लक्ष करायचे वा टाळायचे प्रश्न नाहीत. हे प्रश्न जे वि़ज्ञानाच्या रडावर दिसत नाहीत ते अध्यात्माच्या रडारावर दिसतात.

अजो१२३ Sun, 14/12/2014 - 19:09

In reply to by अस्वल

या भागात वैज्ञानिक संशोधन पद्धतीत, माणसाची स्वतःबद्दलची, निसर्गाबद्दलची आणि अज्ञाताबद्दलची मते काय असावीत हे ठरविण्याच्या दिशेने, काय उणिवा आहेत ते मी सांगायचा प्रयत्न करत आहे. अध्यात्मात मला काय काय दिसले आहे हे मी अजून लिहिलेले नाही, ते नंतर येईल. शिवाय ही चर्चा सध्याला विज्ञानाचा आयवोरी टॉवर ते अध्यात्माचा आयवोरी टॉवर अशी चालू आहे. म्हणून त्यात आलेल्या विकृती नंतर पाहू.

------------------------------------
थेट शास्त्रीय संशोधन पद्धतीत घुसण्यापूर्वी मानवी ज्ञानप्राप्तीचा, चिकित्सापूर्तीचा जो इतिहास आहे आणि पद्धती आहेत त्यांचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. इथे विकिपेडयावरील उतारे उद्धृत (वाचनसुलभ करून) करण्यावर जास्त भर राहिल. प्रथमतः खालील लिंक पाहा.

http://en.wikipedia.org/wiki/Models_of_scientific_inquiry

In the philosophy of science, models of scientific inquiry have two functions: first, to provide a descriptive account of how scientific inquiry is carried out in practice, and second, to provide an explanatory account of why.

A fundamental distinction should be drawn between two kinds of scientific knowledge — roughly, knowledge that and knowledge why. It is one thing to know that each planet periodically reverses the direction of its motion with respect to the background of fixed stars; it is quite a different matter to know why. Knowledge of the former type is descriptive; knowledge of why is explanatory. It is explanatory knowledge that provides scientific understanding of the world.

निसर्गातल्या सार्‍या यस/नो टाईप प्रश्नांचे उत्तर 'कसे' मधून देता येईल. थोडी कसरत करून इतर सारे डबल्यूएच टाइपचे प्रश्न यस/नो टाईपमधे मांडता येतात. उदा. सूर्य केव्हा उगवतो हा "केव्हा" वरील प्रश्न आता उगवतो का, तेव्हा उगवतो का, फल्यान्या वेळी उगवतो का अशा अनेक पण विशिष्ट* प्रश्नांमधून एक असते. पण का? चे उत्तर मात्र काहीही, अनप्रेडिक्टेबल असू शकते म्हणून त्याला वेगळी वागणूक दिली आहे.

* या विशिष्टांची रेंज कधी कधी अनंतापर्यंत पसरलेली असते हा भाग वेगळा!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
शास्त्रीय संशोधन पद्धतीचे तीन प्रकार आहेत -

१ Classical model

१. The classical model of scientific inquiry derives from Aristotle, who distinguished the forms of approximate and exact reasoning, set out the threefold scheme of abductive, deductive, and inductive inference.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
१.१ In abductive reasoning, unlike in deductive reasoning, the premises do not guarantee the conclusion. One can understand abductive reasoning as "inference to the best explanation".
It says that to abduce a hypothetical explanation अ from an observed circumstance ब is to surmise that अ may be true because then ब would be a matter of course.

For example, suppose we observe that the lawn is wet. If it rained last night, then it would be unsurprising that the lawn is wet. Therefore, by abductive reasoning, the possibility that it rained last night is reasonable. Moreover, abducing it rained last night from the observation of the wet lawn can lead to a false conclusion. In this example, dew, lawn sprinklers, or some other process may have resulted in the wet lawn, even in the absence of rain.
अर्थातच या प्रक्रियेत निष्कर्षाच्या अचूकपणाची काही शाश्वती नाही म्हणून आजकल ही पद्धत अवैज्ञानिक मानली जाते.

या पद्धतीला आपण तुक्का लावणे म्हणू यात.
--------------------------------
यानंतर दोन प्रकार मात्र विज्ञानाला मान्य आहेत. त्याची आकृती इथे पाहता येईल.
http://aragornyeh.blogspot.in/2009/11/models-of-scientific-inquiry.html

१.२ Deductive reasoning

Deductive reasoning a "top-down" logic,is the process of reasoning from one or more statements (premises) to reach a logically certain conclusion. Deductive reasoning links premises with conclusions. If all premises are true, the terms are clear, and the rules of deductive logic are followed, then the conclusion reached is "necessarily" true.

Deductive arguments are evaluated in terms of their validity and soundness. An argument is valid if it is impossible for its premises to be true while its conclusion is false. In other words, the conclusion must be true if the premises are true. An argument can be valid even though the premises are false. An argument is sound if it is valid and the premises are true.

An example of a deductive argument:
All men are mortal.
Socrates is a man.
Therefore, Socrates is mortal.
The first premise states that all objects classified as "men" have the attribute "mortal". The second premise states that "Socrates" is classified as a "man" – a member of the set "men". The conclusion then states that "Socrates"
must be "mortal" because he inherits this attribute from his classification as a "man".
या पद्धतीला आपण अनुमान पद्धती म्हणू या.
------------------

Inductive reasoning

Inductive reasoning (as opposed to deductive reasoning) is reasoning in which the premises seek to supply strong evidence for (not absolute proof of) the truth of the conclusion. While the conclusion of a deductive argument is supposed to be certain, the truth of the conclusion of an inductive argument is supposed to be probable, based upon the evidence given.

The philosophical definition of inductive reasoning is more nuanced than simple progression from particular/individual instances to broader generalizations. Rather, the premises of an inductive logical argument indicate some degree of support (inductive probability) for the conclusion but do not entail it; that is, they suggest truth but do not ensure it. In this manner, there is the possibility of moving from general statements to individual instances (for example statistical syllogisms).

An example of an inductive argument:
100% of biological life forms that we know of depend on liquid water to exist.
Therefore, if we discover a new biological life form it will probably depend on liquid water to exist.
This argument could have been made every time a new biological life form was found, and would have been correct every time; however, it is still possible that in the future a biological life form not requiring water could be discovered.

As a result, the argument may be stated less formally as:
All biological life forms that we know of depend on liquid water to exist.
All biological life probably depends on liquid water to exist.

Inductive reasoning is inherently uncertain. It only deals in degrees to which, given the premises, the conclusion is credible according to some theory of evidence. Examples include a many-valued logic, Dempster–Shafer theory, or probability theory with rules for inference such as Bayes' rule. Unlike deductive reasoning, it does not rely on universals holding over a closed domain of discourse to draw conclusions, so it can be applicable even in cases of epistemic uncertainty (technical issues with this may arise however; for example, the second axiom of probability is a closed-world assumption)

या पद्धतीला आपण अंदाज पद्धती म्हणू यात.
-------------------
अनुमान आणि अंदाज पद्धतीतील फरक:
Deductive reasoning (top-down logic) contrasts with inductive reasoning (bottom-up logic) in the following way: In deductive reasoning, a conclusion is reached reductively by applying general rules that hold over the entirety of a closed domain of discourse, narrowing the range under consideration until only the conclusion is left. In inductive reasoning, the conclusion is reached by generalizing or extrapolating from initial information. As a result, induction can be used even in an open domain, one where there is epistemic uncertainty.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------


२ Pragmatic model


http://en.wikipedia.org/wiki/Pragmatic_theory_of_truth

A pragmatic theory of truth is a theory of truth within the philosophies of pragmatism and pragmaticism. Pragmatic theories of truth were first posited by Charles Sanders Peirce, William James, and John Dewey. The common features of these theories are a reliance on the pragmatic maxim as a means of clarifying the meanings of difficult concepts such as truth; and an emphasis on the fact that belief, certainty, knowledge, or truth are the result of an inquiry.

Pragmatic ideas about truth are often confused with the quite distinct notions of "logic and inquiry", "judging what is true", and "truth predicates".

हा व्यवहारवाद अस्तित्वात येण्यापूर्वी अनुमान नि निष्कर्ष हे दोन वेगवेगळे स्कूल होते. जनरली शास्त्रज्ञ एक तर अनुमानवादी अन्यथा अंदाजवादी असत. आजची जी शास्त्ररिती (method of scientific inquiry) आहे ती या दोहोंची मिळून आहे, मिश्ररिती आहे.

विरोधाभास हा आहे कि विज्ञान इंपिरिकल (प्रयोगसिद्ध) आहे ही विज्ञानाची एक समस्या सुद्धा आहे. कारण प्रयोगसिद्ध असल्याने कसे ते सांगता येते पण का ते १००% नक्की सांगता येत नाही. मग भविष्यात दुसरे कोणते निरीक्षण नोंदवले गेले तर विज्ञानाचा (वैज्ञानिकांनी मान्य केलेला, निसर्गाचा नव्हे) नियम बदलावा लागतो. म्हणून व्यवहारवादालाच अनुमानवाद ठरवण्याचे प्रयत्न झालेले आहेत. विकिपेडीयावरचा खालील उतारा रोचक आहे.

.... In the late 19th century, Charles Sanders Peirce proposed a schema that would turn out to have considerable influence in the development of current scientific methodology generally. Peirce accelerated the progress on several fronts. Firstly, Peirce outlined an objectively verifiable method to test the truth of putative knowledge on a way that goes beyond mere foundational alternatives, focusing upon both deduction and induction. He thus placed induction and deduction in a complementary rather than competitive context. Secondly, and of more direct importance to modern method, Peirce put forth the basic schema for hypothesis/testing that continues to prevail today. Extracting the theory of inquiry from its raw materials in classical logic, he refined it in parallel with the early development of symbolic logic to address the then-current problems in scientific reasoning. Peirce examined and articulated the three fundamental modes of reasoning playing a role in inquiry today, the processes that are currently known as abductive, deductive, and inductive inference. Thirdly, he played a major role in the progress of symbolic logic itself – indeed this was his primary specialty.

Beginning in the 1930s, Karl Popper argued that there is no such thing as inductive reasoning. All inferences ever made, including in science, are purely deductive according to his view. Accordingly, he claimed that the empirical character of science has nothing to do with induction – but with the deductive property of falsifiability that scientific hypotheses have.

Contrasting his views with inductivism and positivism, he even denied the existence of the scientific method: (1) There is no method of discovering a scientific theory (2) There is no method for ascertaining the truth of a scientific hypothesis, i.e., no method of verification; (3) There is no method for ascertaining whether a hypothesis is 'probable', or probably true".

Instead, he held that there is only one universal method, a method not particular to science: The negative method of criticism, or colloquially termed trial and error. It covers not only all products of the human mind, including science, mathematics, philosophy, art and so on, but also the evolution of life. Following Peirce and others, Popper argued that science is fallible and has no authority. In contrast to empiricist-inductivist views, he welcomed metaphysics and philosophical discussion and even gave qualified support to myths and pseudosciences. Popper's view has become known as critical rationalism.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------
३ Logical empiricism (तर्कसिद्धता)
http://plato.stanford.edu/entries/logical-empiricism/
पार्श्वभूमी
Logical empiricism is a philosophic movement rather than a set of doctrines, and it flourished in the 1920s and 30s in several centers in Europe and in the 40s and 50s in the United States. It had several different leaders whose views changed considerably over time. Moreover, these thinkers differed from one another, often sharply. Because logical empiricism is here construed as a movement rather than as doctrine, there is probably no important position that all logical empiricists shared — including, surprisingly enough, empiricism. And while most participants in the movement were empiricists of one form or another, they disagreed on what the best form of empiricism was and on the cognitive status of empiricism. What held the group together was a common concern for scientific methodology and the important role that science could play in reshaping society. Within that scientific methodology the logical empiricists wanted to find a natural and important role for logic and mathematics and to find an understanding of philosophy according to which it was part of the scientific enterprise.

१९९० च्या दशकात कोणते नियम कोणकोणत्या पद्धतीने मांडले गेले आहेत, इ इ चा अभ्यास झाला. त्यात वैश्विक आणि सांख्यिकीय निरिक्षणांतील विशिष्ट नियम आणि नियमितता कोणत्या शास्त्रीय पद्धतीने संकलित झाल्या आहेत ते लिहिले आहे.
---------------------
One long-term process with profound implications was the steady departure of the various sciences from philosophy to form autonomous disciplines. The nature of philosophy was always a vexed philosophic question, but now it was particularly insistent. Surely there was no domain of empirical facts that philosophy could call its own. All that real estate had been parceled out. One answer that was available at the time that logical empiricism flourished was that the genuinely philosophic remainder after the departure of the sciences is somehow deeper than the empirical sciences and gets at matters, perhaps cultural ones, that are more profound and important than anything that empirical science even can address. This is either because on this conception philosophy has a mode of access or “evidence” that the empirical sciences do not and cannot have or because the very idea of fidelity to evidence and punctilious argument is somehow small-minded.The logical empiricists were eager to conceive of their enterprise as scientific and to engage in philosophy only insofar as it was also scientific.

...The need is to understand how mathematics can be integrated into what is otherwise an empirical enterprise, i.e., physics, chemistry, biology, etc. Addressing this need was to be a major part of the logical empiricist program.
-----------------
तर्कसिद्धी पद्धती विज्ञानाची अधिकृत सामाजिक भूमिका देखिल मांडू पाहते
...The logical empiricists were no mere bystanders in all this; they, or at least the main leaders of the movement, were politically and culturally engaged. Even more important, this engagement was accompanied by the conviction that their cultures were incapable of the necessary reform and renewal because people were in effect enslaved by unscientific, metaphysical ways of thinking. Such ways of thinking might be exemplified in theology, in the racial hatreds of the day, in conceptions of property, and in traditional ideas about the “proper” roles of men and women in society. So to articulate a “scientific world conception” and to defend it against metaphysics was not just to express an academic position in the narrow sense. It was a political act as well; it was to strike a blow for the liberation of the mind.
-----------------
तर्कसिद्धी पद्धती मानणार्‍या शास्त्रज्ञांसमोर आलेला शास्त्रेय टिपिकल प्रश्न -
......... that raised questions for logical empiricism to address were developments in the sciences themselves, especially the rise of non-Euclidean geometries in mathematics and the establishment of relativity theory in physics. These posed a serious challenge to what would otherwise be an attractive scientific philosophy, namely some version of Kantianism. Kant had recognized that the best of modern science was often mathematical in character and had labored to integrate both geometry and arithmetic into our empirical picture of the world. He had held that we could not represent the world except as a Euclidean structure and hence Euclidean geometry was, a priori, a permanent feature of any future physics. The demonstration that non-Euclidean pure geometrical structures were as consistent as Euclidean ones and that spaces can indeed be represented as a non-Euclidean manifolds were one half of the problem. The other half came when Einstein argued convincingly that physical space was best described as a non-Euclidean manifold of non-constant curvature. Plainly Euclidean geometry was not a feature of any future physics.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

सायंटिफिक मेथडची आजची कल्पना

सायंटिफिक मेथड म्हणजे काय याची साधारणतः सर्वमान्य कल्पना येथे वाचता येईल. सामान्य माणसासाठी ते सुलभ शब्दांत इथे लिहिलेले आहे -
http://science.howstuffworks.com/innovation/scientific-experiments/scie…

ती व्यवहार्य, निरीक्षणाधारित, विदा गोळा करून केलेली, प्रयोगाने सिद्ध, संख्यांत मांडलेली, सजीव आणि सामाजिक शास्त्रात वापरता येते, मानवी बुद्धीवर भर असणारी, प्रामुख्याने अनुमानाधारित, रिपिट करता येईल अशी, पद्धतशीर किमान या सर्व अटी पाळून राबवायची असते.

http://s.hswstatic.com/gif/scientific-method-17.jpg
इथे तिची आकृती आहे.
--------------------
मला विशेष रुचि असलेला पॅरा.
Limitations of the Scientific Method:
१. .... The limitations are based on the fact that a hypothesis must be testable and falsifiable and that experiments and observations be repeatable. This places certain topics beyond the reach of the scientific method.
२. Science cannot prove or refute the existence of God or any other supernatural entity. Sometimes, scientific principles are used to try to lend credibility to certain nonscientific ideas, such as intelligent design. Intelligent design is the assertion that certain aspects of the origin of the universe and life can be explained only in the context of an intelligent, divine power. Proponents of intelligent design try to pass this concept off as a scientific theory to make it more palatable to developers of public school curriculums. But intelligent design is not science because the existence of a divine being cannot be tested with an experiment.

या वरच्या उतार्‍यात नक्की काय म्हणायचे आहे ते प्रचंड महत्त्वाचे आहे. काही विषय सायंटिफिक मेथडच्या पल्याडले असले तरी त्या कारणांमुळे जे विषय पल्याडले वाटत नाहीत अशा अधिभौतिक बाबींना विज्ञान स्पष्टपणे नाकारू शकतच नाही. परंतु विज्ञान नाकारू शकतच नाही या सत्याचा काही लोक दुबळा अर्थ लावून "विज्ञानाने नाकारू न शकणे म्हणजेच सिद्ध असणे" असा लावतात. वेल, मी या नियमाचा असा वापर करणारांत मोडत नाही.
३. Science is also incapable of making value judgments. It cannot say global warming is bad, for example. It can study the causes and effects of global warming and report on those results, but it cannot assert that driving SUVs is wrong or that people who haven't replaced their regular light bulbs with compact fluorescent bulbs are irresponsible. Occasionally, certain organizations use scientific data to advance their causes. This blurs the line between science and morality and encourages the creation of "pseudo-science," which tries to legitimize a product or idea with a claim that has not been subjected to rigorous testing.
सायन्स आणि मूल्ये यांचा काय संबंध आहे हे इथे अतिशय स्पष्ट आहे. काय चांगले व काय वाईट हे तर विज्ञानाला म्हणायचे नाहीच नाही पण त्यापुढे जाऊन चांगले आणि वाईट या संज्ञा देखिल त्याला माहित नाहीत.
And yet, used properly, the scientific method is one of the most valuable tools humans have ever created. It helps us solve everyday problems around the house and, at the same time, helps us understand profound questions about the world and universe in which we live.
म्हणून विज्ञान आणि परंपरागत मूल्ये यांचा योग्य मेळ जीवनात असावा.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
भारतीय अध्यात्मातही सत्य या विषयावर प्रचंड चिंतन झाले आहे. माझे ते क्षेत्र नाही पण योगशास्त्राचे विवेचन वाचताना प्रत्यक्ष, प्रमाण, अनुमान, इ इ सत्याची प्रतले वाचली होती. भारतीय अध्यात्माचे सुलभ भाषेतले "सुज्ञ" मराठीतले विवेचन दुर्देवाने जालावर नाही असे म्हणावे लागेल. संस्कृत मला येत नाही. पण भारतातही सत्यावर किती संशोधन झाले आहे ते मी चौकशी करून ढोबळमानाने मांडू शकतो. इथे काम फक्त ३-४ सायटींवरून पेस्टवायचे होते, भारतीय अध्यात्माच्या बाबतीत ते किती क्लिष्ट असेल याची कल्पना आपणांस असावी.
---------------------------------------------------
पुढच्या भागात "उघडा नागडा मामला" असताना देखिल भारतीय* अध्यात्माची गरज का वाटावी हे लिहिन.

* रिडंडंट वर्ड, पण इतर अध्यात्मे इन प्रॅक्टीस पाहिली नाहीत.

अजो१२३ Sat, 13/12/2014 - 00:41

http://www.swami-krishnananda.org/disc/disc_129.html

संशोधन हे ईंस्टिट्यूशनलच असावे का? व्यक्तिगतही असू शकते. वरील लेखातील प्रश्नांचा उहापोह हे संशोधन नव्हे काय? संशोधनामधे रसायने एक दुसर्‍यात मिसळणे, यान पृथ्वीबाहेर पाठवणे इतकेच येते ही पुरोगाम्यांची संकुचितता आहे. आज भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रचंड न्यूनगंड आल्याने नि शिवाय या क्षेत्रातले संशोधन हे उदरभरणासाठी हिन दर्जाचे ठरत असल्याने मागे पडत आहे. पण सुदैवाने ते अजून मेलेले नाही.

अस्वल Sat, 13/12/2014 - 00:44

In reply to by अजो१२३

तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकाल का? किंवा त्या लिंकमधील जो भाग तुम्हाला अभिप्रेत आहे तो इथे दिलंत तर मुद्देसुद मांडता येईल.
(मी वरील प्रतिसादाला अवांतर श्रेणी दिली आहे.)

अजो१२३ Sat, 13/12/2014 - 01:10

http://www.amazon.com/The-Science-Spirituality-Integrating-Psychology/d…

The Science of Spirituality: Integrating Science, Psychology, Philosophy, Spirituality & Religion हे पुस्तक मी वाचलेले नाही. पण त्याचे वर्णन रोचक आहे.
The Science of Spirituality is a ground-breaking book that integrates the individual systems of science, psychology, philosophy, spirituality and religion into a unified system that describes the multi-dimensional nature of man and the universe. It provides a more comprehensive description of reality than conventional science can offer and fully explains the mechanisms behind an array of paranormal phenomena that mainstream science chooses to ignore. It explains the science behind religious, spiritual and new-age belief systems, and sheds light on some common misconceptions. The Science of Spirituality systematically describes the mechanisms behind a diverse range of subject matter including: consciousness, sleep and dreams, reincarnation, religion, creation, evolution, space and time, higher dimensions, heaven and hell, ghosts, angels and demons, out of body experiences, near death experiences, clairvoyance, psychic abilities, personal development, meditation and the meaning of life.

अंतराआनंद Sat, 13/12/2014 - 10:10
अध्यात्मावरचे संशोधन सध्याला बंद झालेले आहे

म्हणजे काय? असं काय संशोधन चालू होतं का? मुळात अश्या संशोधनाला अध्यात्मिक क्षेत्रात काय वाव आहे? "श्रध्दा ठेवा, अनुभूती घ्या" असा मामला. जास्त चिकित्सा करायला गेलं तर कोणाच्या भावनिक शेपटावर पाय पडेल की काय ही भिती.
मुळात सायन्स आणि अध्यात्म यांची तुलना करायची गरज का भासते? दोन्ही आपापल्या जागी असूद्यात की.
मला एखाद्या गोष्टीची गरज वाटत नाही असं मी म्हणत असेन तर मी त्याकडे तुच्छतेने बघतेय असा अर्थ का निघावा? कित्येक शतकांपासून ( विविध धर्मातले) अध्यात्मवाले मान्यता देता आहेत की नाही ह्याचा विचार न करता सायन्सची प्रगती चालूय. मग अध्यात्माला सायन्सच्या सर्टीफिकेटची गरज काय ?

आता सायन्सचे मुलभूत प्रश्नांऐवजी ईतर क्षेत्रात संशोधन जास्त चालत असेल (असा तुमचा सूर तुमच्या या आणि आधीच्या लिखाणात जाणवतो जो मला अगदी पटतो) तर तो साय्न्सचा दोष कसा?

मलाही गारपीट, अवकाळी पाउस यावर सगळ्या शेतांवर एका ठिकाणाहून नियंत्रित होउ शकणारं, पाणी साठवणीच्या जागी आणून सोडणारं छप्पर का असू नये असं वाटतं. मंगळावर यान सोडणार्^यांना हे अशक्य बिलकूल नाही पण जोर लावणार कोण?
सरकार राजकारणात, आणि आपल्यासारखे शहाणे आंजावर (मी स्वतःलाही धरलय यात) एंन्ड्लेस चर्चा करत बसणार.

चिमणराव Sat, 13/12/2014 - 11:03

कोणतंही संशोधन करताना त्याचा एक आणि एकच प्रश्न स्पष्ट केलेला असतो आणि त्याअनुषंगाने निरीक्षणे नोंदवत जातात जमल्यास पुरावे (इथे फार असंभाव्य /अशक्य )देऊन अनुमान काढतात.तसं करायला काहीच हरकत नाही. परंतू --सांपलवाले रोख प्रश्नाचेच ठोक उत्तर देण्याचे टाळून सर्व संशोधन रटाळ होण्यास कारण होतात. 'मी'च सांगतो 'ते'च खरे नाहीतर फुटा हेच घोषवाक्य.

विवेक पटाईत Sat, 13/12/2014 - 19:37

जगातील प्रत्येक व्यक्ती स्वत:चा शोध घेतच असतो, त्या मुळे स्वत:च्या आत पाहणे अर्थात अध्यात्माचे संशोधन हे सतत सुरु असते. बंद पडण्याचा प्रश्नच येत नाही. प्रश्न स्वत:लाच विचार, उत्तर ही मिळेल.

अस्वल Tue, 16/12/2014 - 00:13

In reply to by विवेक पटाईत

उदा. मी एक अशिक्षित खेडूत आहे, आणि मला पान-तंबाखू आणि जुगार ह्याचीच आवड आहे. पण साहित्य, संगीत, चित्रकला, रोजचे वर्तमानपत्र, भक्ती, देव, विज्ञान ह्याबद्दल मला काडीइतकीही अक्कल नाही.
अशा वेळी मी स्वतःला प्रश्न विचारले, तर मला त्याची कशी आणि कितपत खरी उत्तरं मिळतील? मुळात, असा मनुष्य काही प्रश्न विचारू तरी शकेल का?

अजो१२३ Tue, 16/12/2014 - 01:16

In reply to by अस्वल

मुळात, असा मनुष्य काही प्रश्न विचारू तरी शकेल का?

"असा" या शब्दाला इथे फारसा काही अर्थ नाही. मी जितकी अनेक प्रकारची माणसे पाहिली आहेत, त्यांचेशी मनःपूर्वक, शांतपणे, सन्मानपूर्वक आणि अतिशय खोलात चर्चा केली असता चरित्र, सोशल क्लास, शिक्षण, बुद्धिमत्ता, संपत्ती, सुख, व्यसने, स्थान, एक्स्पोजर, इ इ काही का असेना, त्यातल्या प्रत्येकाचेच, ३५-४० ओलांडल्यानंतर, संसार झेललेल्या नंतर, जीवनविषयक तत्त्वज्ञान प्रचंड गहन असते.

दोन व्यक्ति जेव्हा संवाद करतात, तेव्हा अगदी मनीची गोष्ट त्यातला 'स्टॅटस कमी असणारा' बाहेर येऊ देत नाही. कारण दोन भिन्न स्टॅटस जिथे उघड आहेत, त्यांची प्रत्यक्ष आयुष्यात इम्प्लिकेशन्स आहेत तेव्हा कमी स्टॅटसचा माणूस "त्याच्यातला तत्त्वज्ञानी" जगासमोर येऊ देत नाही. तू एवढा शहाणा तर इतक्या खाली कसा असा समोरचा मनात उपहासाने म्हणत असेल, म्हणेल, असा विचार करून कमी स्टॅटसचा माणूस गांभीर्याने आपले तत्त्वज्ञान, ते त्याच्या स्वतःच्या मते किती का उच्च असेना, अगदी अत्युच्च स्टॅटसच्या लोकांच्या तत्त्वज्ञानापेक्षा का उच्च वाटत असेना, सांगत नाही.
कमी वा कनिष्ठ स्टॅटसच्या माणसाशी मृदूसंवाद केला, त्याच्या तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठत्व आपण मोकळेपणाने मान्य करू शकतो इतकेच नव्हे तर त्याने इंप्रेस होऊ शकतो असे जर 'आपण' दाखवून देऊ शकलो तर असा माणूस खरोखरीच चकित करणारे शहाणपण नि तत्त्वज्ञान बाळगून आहे हे कळते असा माझा साधारणतः अनुभव राहिला आहे. या तत्त्वज्ञानात काही अंधश्रद्धा, भावनिकता, इरॅशनॅलिटिज, अनरिजनॅबिलिटीज, इल्लॉजिकॅलिटिज आणि टू सम एक्स्टेंट अनइथिकॅलिटिज आहेत असे दिसले म्हणून टोटल पॅकेजचा चार्म कमी होत नाही.

माझं एक जनरल निरीक्षण राहिलं आहे कि कमी स्टॅटस घेऊन जगणार्‍या लोकांचं तत्त्वज्ञान जास्त गहिरं असतं. त्यामानाने पॅकेज्ड शिक्षण घेतलेले, पॅकेज्ड नोकरी करणारे आणि ज्यांच्या इगोची काळजी आईवडीलांनी नीट घेतली आहे म्हणून जो कधी टोकाला जाऊन टेस्ट झाला नाही असे मिडलक्लास लोक एक स्टँडर्ड पोथीवादी तत्त्वज्ञान बाळगून असतात. म्हणजे त्यात फॉर्मूले जास्त आणि सिद्धता कमी असतात. स्वतः, कुटुंब, समाज, देश, जग, देव, धर्म, रिती, नाती, गोती, मित्र, काम, कामाची जागा, तिथले लोक, तिथले व्यवहार, सवयी, छंद, इ इ बद्दलची संक्षिप्त सूत्रे म्हणजे आयुष्याचे तत्त्वज्ञान. ग्रामीण मिडलक्लास मधे ते थोडे भावनिकतेकडे झुकते. शहरांमधे सोशल क्लासप्रमाणे त्याची शुष्कता वाढत जाते असे माझे निरीक्षण आहे.

उदा. मी एक अशिक्षित खेडूत आहे, आणि मला पान-तंबाखू आणि जुगार ह्याचीच आवड आहे. पण साहित्य, संगीत, चित्रकला, रोजचे वर्तमानपत्र, भक्ती, देव, विज्ञान ह्याबद्दल मला काडीइतकीही अक्कल नाही.
अशा वेळी मी स्वतःला प्रश्न विचारले, तर मला त्याची कशी आणि कितपत खरी उत्तरं मिळतील?

"खरी उत्तरं" यावर नक्की काय रामायण असते ते वर सायंटिफिक मेथड या प्रतिसादात आले आहे. पण ते पूर्णतः बाजूला ठेउन, इथपर्यंत तुम्ही म्हणताय ते ठिक आहे. पण

मुळात, असा मनुष्य काही प्रश्न विचारू तरी शकेल का?

असा विचार करणे ...खरं तर...चूक आणि एक अर्थाने वाईट आहे. सोशल स्टॅटस नुसार माणसाचा प्रश्नांचा डोमन बदलतो, शिक्षणानुसार प्रश्न बदलतात. पण उत्क्रांतीने प्रत्येकाला समान प्रश्नशक्ती दिली आहे***. आज कितीही सामाजिक बदल झाले असतील, पण ते इतके नाहीत कि वेगळ्या सामाजिक स्तरातील माणसाची नैसर्गिक अंतःस्फूर्त प्रश्नबुद्धीच बदलून टाकतील. सबब "मी कोण आहे, हे जग कसे बनले" असा बुद्धिमान वैज्ञानिकांना पडलेला, महान संताना पडलेला आणि गरीब शेतकर्‍यांना पडलेला प्रश्न, प्रश्न म्हणून, एकाच दर्जाचा आहे.

अस्वल Tue, 16/12/2014 - 01:39

In reply to by अजो१२३

ह्यात स्टेटस वगैरे प्रश्नच येत नाही.
माझ्या उदाहरणात मी अशी एक व्यक्ती घेतली आहे, जिला जुगार, पान, तंबाखू ह्यातच रस आहे. आता "मुळात, असा मनुष्य काही प्रश्न विचारू तरी शकेल का?" ह्याचा रोख पटाईतांनी म्हटलेल्या उत्तरांकडे आहे.
त्यांनी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक जण स्वत:ला प्रश्न विचारत असतो आणि त्यातूनच त्याला उत्तरं मिळत जातात.
आता जर मी एक असा मनुष्य आहे (शहर, खेडं कुठेही) की मला बाकीच्या गोष्टींचा गंधही नाही, पण मला जुगारात खूप रस आहे तर-
मी स्वत:ला काय प्रश्न विचारेन?
आणि जर असे प्रश्न त्याला पडलेच, तर त्याच्या बुद्धीच्या आणि मुख्यतः अनुभवांच्या अतिशय मर्यादित परिघात त्याची कितपत खरी उत्तरं त्याला मिळू शकतील?

सबब, केवळ "स्वतःच्या मनालाच प्रश्न विचार म्हणजे सगळी उत्तरे मिळतील" हे प्रचंड subjective असेल. आडातच नाही तर पोहोर्यात कुठून येणार?*

*unless you have a hypothesis which states that everyone has equal knowledge within them by birth, and it is a matter whether or not they manage to reach
=============
तुम्ही इथे म्हटल्याप्रमाणे "मी कोण आहे? ह्या विश्वाचं रहस्य काय" वगैरे प्रश्न अशा माणसाला पडतीलच का?
-> नक्कीच पडतील, असे प्रश्न पडणार नाहीत हे माझं पूर्वीचं मत चूक आहे.

अजो१२३ Tue, 16/12/2014 - 01:43

In reply to by अस्वल

त्यांनी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक जण स्वत:ला प्रश्न विचारत असतो आणि त्यातूनच त्याला उत्तरं मिळत जातात.

पटाईत काका असं म्हणाले नि मी ही तेच म्हणत आहे. जुगारात खूप रस असलेला माणूस जुगारात डॉक्टरेट करेल. पण म्हणून तो स्वतः, निसर्ग आणि अधिभौतिक प्रश्न पाडूनच घेत नाही असे नाही. बालपणानंतर तिशी खाली चिकित्सा, प्रश्न प्रचंड असतात. चाळीशीनंतर माणूस 'या विषयावर' काही ना काही मत बाळगून आहे.
----------------
विवेककाका त्यांच्या मूळ प्रतिसादात मला म्हणाले संशोधन चालू काय म्हणून काय विचारतोस, तुझे स्वतःचेच पाहा ना. त्याअर्थाने ते खरे आहे.
-------------------
आता प्रत्येक माणसाचा काही ना काही अबस्ट्रॅक्ट शोध चालू असतो नि अधिक चौकशी केली असता तो अध्यात्मिक प्रतलाकडे सरकत असतो असे मला वाटले आहे.
-------------------------

अस्वल Tue, 16/12/2014 - 01:53

In reply to by अजो१२३

उदा. समजा मी जुगारात पीएच्डी केली.
आता माझा गहन प्रश्न आहे - मला हवे ते फासे कसे पडतील? भौतिकशास्त्राचा गंध नसल्याने मी असा ग्रह करून घेतलाय की जेव्हा मी चट्टेरी पट्टेरी शर्ट घालतो तेव्हा मला हवा तो डाव येतो. (कारण मी मागच्या ४ आठवड्यात ४ वेळा हा शर्ट घातला आणि ३ वेळा जिंकलो.) इथे मला पडलेला प्रश्न मी माझ्या आकलनशक्तीच्या मर्यादेतच सोडवला (माझ्या मनात गहन विचार करून).
त्याचं उत्तर किती बरोबर आहे हे आपल्याला माहिती आहे ( an unbiased dice throw, probability of each event is independent - so 0.5)

तर अशा वेळी आपण कितीहे गहन विचार "आतल्याआत" केले, तरी त्यांची उत्तरं बरेचदा subjective to our own interpretation असतात.
==================================================
प्रश्नांच्या qualityवर आणि उत्तरांच्या अचूकतेबद्दल माझा आक्षेप आहे :) पण ते एक असो.

अजो१२३ Tue, 16/12/2014 - 02:11

In reply to by अस्वल

जुगार्‍याच्या पीएच्डी वर ती केवळ मनातल्या मनात आहे म्हणून आक्षेप दिसत आहे.
ठिकै.

शास्त्रज्ञ काय करतात? त्यांचा प्रयोग एक जुगार मानू या (बहुतांश वेळा तो खरोखरच जुगार असतो, पण विषयांतर नको). त्यानंतर (जसे जुगारी जुगारानंतर) ते मनातल्या मनातच विचार करतात ना? आता त्यांच्या या पीएच्डीला नाकारावे का?
-----------------------------------
काकांना जे म्हणायचं आहे ते असं वाटतं कि अगदी चिल माडी माणसाला पण काही किडा असतो. नि तो त्याला चक्क चक्क जीवनविषयक तत्त्वज्ञानात गहरा बनवतो. माणसाचा देह हे हार्डवेर आहे, त्यात जीवनविषयक तत्त्वज्ञानाचे सॉफ्टवेर लोड केल्याशिवाय अर्थ येत नाही.

वामा१००-वाचनमा… Tue, 16/12/2014 - 02:24

In reply to by अजो१२३

ज्योतिष हे शास्त्र आहे की अध्यात्माची शाखा आहे? देवच जाणे ;)
पण त्यात बरच संशोधन होतं बरं का. नेपच्युन + reincarnation किंवा moon nodes + reincarnation वगैरे वगैरे शोधा. (knock & door will open - bibe) ;)
Evolutionary astrology म्हणूनही काहीतरी शाखा आहे.
मी हे असलेच लेख चाळत असते. पण एक आहे, त्यात नवीन नवीन संशोधन होतय.
metephysics मध्ये sylvia brown नावाच्या psychic व अन्य तशा प्रकारच्या लोकांची अनेक पुस्तके आहेत. "indigo children" वगैरे.
पण हे आडनिडे प्रकार ना धड अध्यात्मात येतात ना धड विज्ञानात.
near death experience वर खूप संशोधन होतं. Edgar Cayce फार पूर्वीचे झाले. सध्या http://www.near-death.com/ ही साइट पहावी. प्रचंड रोचक आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Past_life_regression - हा प्रकारही सध्या काही ठिकाणी आढळतो. म्हणजे लेख्/माहीती आदि. हे काय आहे नक्की विज्ञान आहे की अध्यात्माची उपशाखा? :(

अस्वल Tue, 16/12/2014 - 02:31

In reply to by वामा१००-वाचनमा…

पण हे आडनिडे प्रकार ना धड अध्यात्मात येतात ना धड विज्ञानात.

अगदी. मला तर अध्यात्म कुठे येतं आणि अध्यात्म म्हणजे काय हेसुद्धा माहिती नाहिये :ड

अजो१२३ Tue, 16/12/2014 - 13:51

In reply to by वामा१००-वाचनमा…

1. A science is made of assumptions, context, experiments, observations, inferences, abductions, deductions, inductions, beliefs, knowledge, information, method, and of course the inquiries and questions leading to all this.

2. Sciences are classified in two ways:
a. Based on the technical method of deriving scientific know-how.
b. Based on where they are used

3. For a science to be TRUE - 1. 100% complete context, 2. 100% clear assumptions, 3. 100% clear definitions and 4. deductive inference are all necessary conditions.

4. There is overlap in sciences, both in fields of applications and methods of knowledge.
-----------
अध्यात्म एक शास्त्र आहे. विज्ञान एक शास्त्र आहे. ज्योतिष एक शास्त्र आहे. त्या तिन्हींची सत्य शोधण्याची पद्धत वेगळी आहे म्हणून विश्वासार्हता कमी अधिक आहे.

नितिन थत्ते Tue, 16/12/2014 - 14:11

In reply to by अजो१२३

>>अध्यात्म एक शास्त्र आहे. विज्ञान एक शास्त्र आहे. ज्योतिष एक शास्त्र आहे.

आज जे विज्ञान म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्या विविध शाखांमधली इंटर्नल कन्सिस्टन्सी खूप घट्ट आहे. गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, अभियांत्रिकी, रसायनशास्त्र वगैरे.....

तशी अध्यात्माच्या विविध शाखांमधली नाही.

अजो१२३ Tue, 16/12/2014 - 14:26

In reply to by नितिन थत्ते

तुम्ही जितके विज्ञान आणि अध्यात्म अभ्यासले, पाहिले आहे त्यावरून तुमचे तसे मत झाले असावे.
माझ्या मते -
१. विज्ञानाच्या एकाही शास्त्रात आतल्या आत प्रचंड कमी सुसंगती आहे.
२. विज्ञानाच्या भिन्न शाखांत, एकमेकांशी सुसंगती नाही असे म्हणता यावे.
३. अध्यात्मातील सुसंगती उच्च प्रतलावर उच्च कोटीची आहे.
४. अध्यात्मात कनिष्ठ प्रतलावर प्रचंड मतभिन्नता आहे.
५. शुद्ध अध्यात्मिक लोकांच्या मूल्यांत प्रचंड सुसंगती आहे.
६. शुद्ध वैज्ञानिक विचारांच्या लोकांच्या मूल्यात प्रचंड विसंगती आहे.

प्रश्न फक्त चिकित्सा किती सकस होते आहे याचा आहे.

नितिन थत्ते Tue, 16/12/2014 - 14:36

In reply to by अजो१२३

१ मी अध्यात्म अभ्यासलेले नाही.

जितके विज्ञान अभ्यासले (शालेय + उच्च माध्यमिक + अभियांत्रिकी + अवांतर वैज्ञानिक वाचन) त्यात मला विविध शाखांमध्ये प्रचंड कन्सिस्टन्सी आढळली.

>>५. शुद्ध अध्यात्मिक लोकांच्या मूल्यांत प्रचंड सुसंगती आहे.
६. शुद्ध वैज्ञानिक विचारांच्या लोकांच्या मूल्यात प्रचंड विसंगती आहे.

क्र ५ चे वाक्य --- हॅ हॅ हॅ
क्र ६ चे वाक्य --- कुठल्या प्रकारची? वैज्ञानिक विचार आणि मानवीमूल्ये ही कन्सिस्टंट असू शकतात हे एका प्रतिसादात मी दाखवले आहे.

अस्वल Tue, 16/12/2014 - 02:19

In reply to by अजो१२३

मी वर दिलेल्या उदाहरणातील "आतल्या आत" केलेले विचार बरोबर आहेत, असं तुमचं म्हणणं आहे का?
ह्या उलट साधारण कालिजात गेलेला मनुष्य (शास्त्रज्ञ नव्हे) ज्याला बेसिक शक्याशक्यता ठाउक असते, ती वापरून तो चट्टेरी-पट्टेरी शर्ट आणि फासे ह्यातलं correlation जोडणार नाही. आणि जिंकण्यासाठी loaded dice बनवायच्या मागे लागेल.
आणि शास्त्रज्ञ,जुगार वगैरे तुम्ही नेहेमीसारखे सुटू नका हो एकदम.
-------------------------------------------------------------------------
पटाईतांनाच बोलू दे मग त्यावर आपण उगाच धुमशान करतोय ;)

अजो१२३ Tue, 16/12/2014 - 01:56

In reply to by अस्वल

सबब, केवळ "स्वतःच्या मनालाच प्रश्न विचार म्हणजे सगळी उत्तरे मिळतील" हे प्रचंड subjective असेल. आडातच नाही तर पोहोर्यात कुठून येणार?*

मनुष्य म्हटला कि जशी काही जैविक स्पेसिफिकेशन्स स्पष्टपणे सांगता येतात तसेच मनुष्य म्हटले (अल्लडपणानंतर) एक जीवनविषयक खोल तत्त्वज्ञान असतेच असते.

*unless you have a hypothesis which states that everyone has equal knowledge within them by birth, and it is a matter whether or not they manage to reach

Yes, there is such a hypothesis. I spoke of it in my first response itself: I agree that there have been huge social changes. But we all are largely at the same stage of evolution. And of course, the social changes on this planet due to civilization are hardly enough to segregate the innate ability of inquiry on some other social accounts, let alone to supress them.

अजो१२३ Tue, 16/12/2014 - 02:19

In reply to by अस्वल

तुम्ही कित्ती किती कृतघ्न हो. मी त्याचे तीन भाग लिहिले आहेत. अजून सात -आठ असतील. मी एक वेगळी धागामालिकाच काढतो.
------------------
तिसर्‍या (भाग ३) च्या खाली 'पुढे उघडा नागडा मामला वर लिहिन' असे लिहिले आहे. पण पैले विज्ञानाच्या संशोधन माहिती करून घ्या राव. नै तर चर्चा करता येत नाही.
--------------------------------
अध्यात्माची संशोधनाची पद्धत विज्ञानापेक्षा क्वालिटेटीवली श्रेष्ठ असू शकते. पण सध्याला तिन्ही भागांत मी फक्त मला समजलेली वैज्यानिक पद्धत लिहित आहे. त्यानंतर अध्यात्म. आणि त्यानंतर तुलना. मग पाहू उघडा नागडा मामला कय आहे.

अस्वल Tue, 16/12/2014 - 02:24

In reply to by अजो१२३

वाचले मी. पण मला माझ्या प्रश्नांची १:१ उत्तरं दिसली नाहीत. किंबहुना, तुमच्या उत्तरांत तुम्ही, अध्यात्माची गरज का आहे हे पुढे लिहिन असं म्हटलंय.
त्यामुळे हे प्रतिसाद precursor to actual statement वाटले मला.

अजो१२३ Tue, 16/12/2014 - 02:22

In reply to by अस्वल

तुमच्या तीन प्रश्नांची उत्तरे देण्याच्या नादात मी आधुनिक वैज्यानिक संशोधन पद्धतीवर जे काही ५०-६० भाष्ये केली आहेत, त्यापैकी एकाबद्दल तरी बोला.

अजो१२३ Tue, 16/12/2014 - 14:50

In reply to by अजो१२३

इथे भडकाऊ श्रेणी देणे म्हणजे वरच्या बाजूने दोन्ही साईडला तीन पिढ्यापासून ग्रे मॅटरसाठी मारामार आहे हे सिद्ध करणे !!!

नितिन थत्ते Tue, 16/12/2014 - 10:08

In reply to by अजो१२३

>>unless you have a hypothesis which states that everyone has equal knowledge within them by birth, and it is a matter whether or not they manage to reach

कालच हे तत्वज्ञान ऐकले. त्यानुसार शिवाजी महाराजांच्या अंतर्गतसुद्धा जावा प्रोग्रॅमिंगचे ज्ञान अस्तित्वात* होतेच. :)

*त्या व्यक्तीशी चर्चा करताना हे शिवाजी-जावा रिलेशन विचारायचं राहिलं. म्हणजे 'अस्तित्वात असलेलं तत्कालीन ज्ञान' की 'सार्वकालिक ज्ञान' प्रत्येक मनुष्याकडे* अगोदरच अस्तित्वात असतेच हे विचारायचं राहिलं.

आमच्या बोक्याला एसएपीमधल्या सर्व मॉड्यूलचं ज्ञान आधीच आहे का तेही तपासायला हवे.

नितिन थत्ते Tue, 16/12/2014 - 12:15

In reply to by अस्वल

शरीरे वेगळी असतात, मने ओव्हरलॅपिंग असतात आणि आत्मा एकच असतो असे ऐकून हा प्रश्न उभा राहिला.

अजो१२३ Tue, 16/12/2014 - 14:25

In reply to by नितिन थत्ते

असं आहेच असं नाही, असं सिद्ध झालं नाही, पण असं असू शकतं. म्हणून खर्‍या पुरोगाम्याने या विधानाचा तात्विक उपहास करू नये.
--------------
जास्त उबळ असेल तर असिद्ध करून दाखवावे नि मग वाटेल तितके हसावे.

नितिन थत्ते Tue, 16/12/2014 - 14:51

In reply to by अजो१२३

>>जास्त उबळ असेल तर असिद्ध करून दाखवावे नि मग वाटेल तितके हसावे.

हायपोथिसिस मांडणार्‍यांनी ते प्रायमा फेसी सिद्ध करावे.

हायपोथेसिस असिद्ध करण्यासाठी ते हायपोथेसिस "फॉल्सिफाएबल बाय टेस्ट" असायला हवे.

अजो१२३ Tue, 16/12/2014 - 17:18

In reply to by नितिन थत्ते

अगोदर हाय्पोथेसिस मांडायचा, मग तो सिद्ध वा असिद्ध ठरेल. "प्रायमा फेसी" म्हणजे वैज्ञानिक पद्धत बाजूला ठेउन असे होते. हायपोथेसिस सिद्ध करण्याच्या आधी, किंवा हातात घेण्याआधी, जंपिंग द गन प्रकार का करावा?
---------------
तुम्ही, म्हणजे जगरली प्रो-विज्ञान आणि अँटी-अध्यात्म लोक म्हणायचे आहे, एक पद्धत राबवता. हायपोथेसिस मांडायचा. सिद्ध झाला तर ते सत्य नाही तर नाही. अध्यात्मिक लोकांचे विधान तुम्ही हायपोथेसिस म्हणून घ्या. सिद्ध किंवा असिद्ध करा आणि मग सत्य कळल्यावर वाटेल ते म्हणा.
पण त्यांचा हायपोथेसिस मांडायचाच नाही किंवा तो तुमच्या सिद्धतापद्धतीच्या कक्षात येत नाही असे असले तरी वाटेल ते का म्हणायला चालू करायचे?
आता अध्यात्मिक लोकांची हायपोथिसिस, इ इ नसलेली एक पद्धत आहे, ती तुम्हाला मान्य नाही, ती वापरून ते कायनू बायनू म्हणतात. मग किमान तुमची ऑथेंटिक हायपोथेसिस पद्धत वापरून "का मान्य नाही, काय मान्य नाही, इ इ " बद्दल बोला. उगाच तुम्हाला वाटते म्हणून शिवाजीला जावा येत नव्हती हे कसे खरे होईल? तुम्हाला २०० वर्षापूर्वी जीन्स माहित नव्हते, म्हणून ते "वाटते" म्हणून जेनेटिक्स खोटे ठरते का? विज्यान तर पारंपारिक वाटण्यालाच छेद देत आले आहे ना?

अजो१२३ Tue, 16/12/2014 - 17:24

In reply to by अजो१२३

नंदन
अरुणजोशी
केतकी आकडे
मेघना भुस्कुटे
सव्यसाची
मिहिर
इरसाल म्हमईकर
अनुप ढेरे
चिंतातुर जंतू
प्रसाद
यांपैकी कोणाला हा प्रतिसाद निरर्थक वाटला?

चिंतातुर जंतू Tue, 16/12/2014 - 18:22

In reply to by अजो१२३

ह.घ्या. मोड सुरू>
मूळ प्रतिसाद तुम्ही भा.प्र.वेळेनुसार १७:१८ला दिला आणि वरचा प्रतिसाद तुम्ही १७:२४ला दिला असं दिसतंय. ह्या दरम्यान कुणी येऊन श्रेणी देऊन लॉगआउट झालं असेल, तर त्याचं नाव १७:२४ला दिसणार नाही. त्याउलट १७:२४ला लॉग्ड इन दिसणारे काही सदस्य श्रेणी मिळाल्यानंतर लॉग इन झालेले असू शकतात. त्यामुळे, वैज्ञानिक पद्धत वापरायची झाली, तर असं म्हणावं लागेल, की सध्या उपलब्ध माहितीवरून, वैज्ञानिकांच्या अंगभूत नम्रतेनुसार आणि प्रत्येक गोष्टीबद्दल साशंक असण्याच्या गुणधर्मानुसार असं खेदानं म्हणावं लागतं आहे, की वरच्या यादीतल्या कुणी तरी ती श्रेणी दिली असेल, असं खात्रीलायक सांगता येणार नाही. अर्थात, जोशींना हवं तर त्यांनी अध्यात्मिक पद्धत वापरून पाहावी.
ह.घ्या. मोड समाप्त>

अजो१२३ Tue, 16/12/2014 - 19:19

In reply to by चिंतातुर जंतू

वैज्ञानिक पद्धतीने मी त्या सात मिनिटांतले लॉगिन्स आणि लॉगआउट पाहिले आहेत नि मगच प्रश्न विचारला आहे.
---------------
बाय द वे, प्रश्न अध्यात्मिक पद्धतीने विचारला आहे. त्यात "अस्संच झालं आहे" (म्हणजे यांपैकीच कोणी एक आहे मला माहितच आहे, इ इ.) अशी पुरोगामी वैज्ञानिक श्रद्धा असा विचार मांडलेला नाही. झालेलं काहीही असू शकतं. अगदी मालवेरनी आयडीज घुसडलेली असू शकतात. मी पान रेफ्रेशच केलेले नसू शकते. खास लोकांसाठी ऐसीवर गुप्त श्रेणीदानाची सोय असू शकते. ... काय असू शकतं याचं उत्तर काहीही असू शकतं. काय असू शकतं पैकी जे एक सर्वात जास्त असू शकतं ते आहेच असं म्हणणे, समाजात पसरावणे हे आजची "अधिकृत विज्ञानचिकित्सा पद्धती*" आहे.

मी साधी भारतीय अध्यात्मिक पद्धत वापरली आहे. प्रश्न विचारणे. कोणी उत्तर दिले तर तेही दिशाभूल करणारे असू शकते, पण शेवटपर्यंत प्रश्नच विचारत राहायला लागू नयेत म्हणून अध्यात्मपद्धतीत श्रद्धेला स्थान आहे.

* नो जोक्स.

चिंतातुर जंतू Tue, 16/12/2014 - 20:01

In reply to by अजो१२३

>> प्रश्न अध्यात्मिक पद्धतीने विचारला आहे.

आध्यात्मिक पद्धत म्हणजे काय, ते एवढी चर्चा वाचूनही मला समजलेलं नसल्यामुळे ह्या मतिमंद जंतूचा पास.

अस्वल Tue, 16/12/2014 - 23:36

In reply to by अजो१२३

साधी गोष्ट आहे-> धागा तुम्ही सुरू केला अध्यात्मावर. त्यावर मी साधा प्रश्न विचारलाय अध्यात्म म्हणजे नक्की काय.
तर त्याला उत्तर द्यायचं सोडून तुम्ही विज्ञान काय आहे, शास्त्रज्ञ जुगार कसे खेळतात, मला लोक असल्या श्रेण्या का देतात वगैरे गोष्टींची चर्चा करताय.
आठवडाभर चर्चेचा रतीब घालूनही "अध्यात्म म्हणजे नक्की काय" हे तुम्ही सांगू शकत नसाल, तर मग काही अर्थ नाही.
मला असं म्हणायला आवडलं असतं की हे सांगणंं क्लिष्ट आहे म्हणून तुम्हाला वेळ लागतोय. पण आतापर्यंतची उत्तरं बघून असं वाटत नाही की तुम्हाला "अध्यात्म" ह्या विषयाबद्दल काही अधिक माहीती आहे.
तेव्हा असो. जर अध्यात्म ह्या विषयावर तुमची मतं मांडायची असतील तर मला पुढे काही चर्चेत अर्थ वाटतोय.

वामा१००-वाचनमा… Tue, 16/12/2014 - 23:54

In reply to by अस्वल

मला लोक असल्या श्रेण्या का देतात वगैरे गोष्टींची चर्चा करताय.

फक्त चर्चा नाही लोकांच्या ३ पीढ्यांच्या ग्रे मॅटरचा उद्धार करतायत ते. Very obnoxious!Ridiculous! संतापजनक आहे ते. आय-माय उद्धारायचा कोणी अधिकार दिलाय त्यांना. सभ्यपणाची पातळी सोडली आहे अजोंनी.

अन On second thought - असा पीढ्यांचा उद्धार करणे/संतापणे हेच अध्यात्मिक उंची गाठलेल्या महापुरषाचे व्यवच्छेदक लक्षण असूही शकेल ;)

आतापर्यंतची उत्तरं बघून असं वाटत नाही की तुम्हाला "अध्यात्म" ह्या विषयाबद्दल काही अधिक माहीती आहे.

हाहाहा लवकर समजलं तुम्हाला. ;)

अजो१२३ Wed, 17/12/2014 - 01:04

In reply to by वामा१००-वाचनमा…

श्रेणीदात्यास गुप्त श्रेणीदानाचा अधिकार ऐसीवर आहे. अशा श्रेणीवर आक्षेप घेण्याचा अधिकार मला आहे, ऐसीचे धोरण म्हणून नव्हे, जनरल तत्त्व म्हणून. अर्थातच माझा आक्षेप या फोरमच्या अधिकृत मर्यादा ओलांडत आहे असे वाटले तर व्यवस्थापक तसे कळवतील.
बाय द वे-
दोन प्रकारचे लोक असतात- आपल्या साईडचं ते सगळं समर्थिणारे आणि आपल्या साईडचं योग्य ते सगळं समर्थिणारे. (एक विज्ञानवादी म्हणू?) आपण कुणीकडे मोडता.
पार्श्वभूमी अशी आहे कि सत्य मांडण्याची विज्ञानाची पद्धत उघडीनागडी आहे असे अस्वल म्हणाले. मग सत्य म्हणजे काय आणि पद्धत म्हणजे काय आणि या दोहोंबद्दल विज्ञानाचं मत काय आहे याबद्दलचं जे वाचन आहे ते मी तीन भागांतून मांडलं. असं करण्यामागे "विज्ञानाने मांडलेले सत्य उघडेनागडे आहे (इन कॉन्ट्रास्ट विथ अध्यात्म)" या विधानाला एकूण किती मर्यादा आहेत हे मी समोर आणायचा प्रयत्न केला. नंतर लिहिले कि आता या मर्यादा डोळ्यासमोर ठेऊन अध्यात्मिक पद्धतीचं असं कोणतं अपिल आहे ज्या मुळे मी तिला समान सन्मान देतो ते पुढच्या भागात सांगेन. (आता संशोधनाच्या, सत्यांच्या, पद्धतीच्या, विचारसरणीच्या मर्यादा काय आहेत हे "जास्त (म्हणजे जास्त शब्दांत)" लिहिले म्हणजे अध्यात्मिक संशोधन नावाची पद्धतच नाही असे (वैज्ञानिकपणे?) मानायचे असेल माना बापुडे.)

मग मी सहज लिहिलं कि वैज्ञानिक सत्याच्या इतक्या मर्यादा लिहिल्या आहेत नि त्यावर इतके प्रश्न मी वैज्ञानिक विचारसरणी असणारांस विचारले आहेत त्यातल्या एकाचे तरी उत्तर द्या. कारण हे स्पष्ट आहे कि वैज्ञानिक संशोधन पद्धतीच्या मर्यादा माणसाला कळल्या नाहीत तोपर्यंत त्याला अन्य कोणत्याही पद्धतीत रस दाखवावेसे वाटणार नाही. आणि ही केस असा माणूस उत्साही पुरोगामी असला आणि अन्य पद्धत अध्यात्माची असली कि एकदम टोकाची होते.

लक्षात घ्या - मी अस्वल यांना प्रतिसाद म्हणून् "अध्यात्माची अनुभूती घ्या" असे काहीही स्पष्टीकरण देताना सांगत सुटलेलो नाही. मी एक लिमिटेड पॉइंट म्हणतोय - वैज्ञानिक सत्यांना ज्या पद्धती आहेत त्या पाहता किमान अधिभौतिक कक्षेत येणारे प्रश्न अध्यात्मात कसे हाताळले आहेत ते पाहायला हरकत नव्हती.

मग इथे भडकाऊ श्रेणी देण्याचा काय संबंध येतो? ऐसीवरची एक श्रेणी आहे म्हणून भडकावू शब्दाचा अर्थ सौम्य होतो का? ऐसीवर भडकावाभडकवी होताना मी पाहिलं आहे नि त्यातून तशी श्रेणी मी समजू शकतो. पण उगाच कोठेही काहीही? आणि एक गोष्ट मला रोचक वाटते - मुद्दा काय आहे ते न पाहाता फक्त भाषा काय आहे हे पाहणे.

या प्रश्नांचा कधी विचार केला आहे आहे काय?

वामा१००-वाचनमा… Wed, 17/12/2014 - 01:18

In reply to by अजो१२३

यापूर्वी आपण "इथे ऐसी चा आय क्यू खाली आणणारा कोण" आदि प्रश्न विचारलेले आहेत परंतु ते त्या श्रेणी "दात्या" पुरताच मर्यादित होते इथे म्हणजे तुम्ही ३ पीढ्यांचा उद्धार करताय. तुम्हाला असा सदस्यांच्या पूर्वजांचा उद्धार करणे समर्थनिय वाटतं का? व्यक्ती सर्वाधिक हळवी असते ती तिच्या रूटस बद्दल. तरी तुम्हाला असभ्य पातळी गाठायची असेल तर गाठा. तुम्हाला कोण अडवणार?
______
या धाग्यावरील माझ्या २ प्रतिसादात मी "अध्यात्माचा" बाजूने काही मुद्दे (कितीका फीबल अटेम्प्ट असेना) केलेले होते. पण या उद्धारानंतर कान पकडते. तुमची मते अन त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला लखलाभ होवो.
______

मग इथे भडकाऊ श्रेणी देण्याचा काय संबंध येतो?

मला वाटली ती श्रेणी द्यावीशी त्याकरता मला कोणाला स्पस्।टीकरण देणे अगत्याचे वाटत नाही. पिरीअड!

अजो१२३ Wed, 17/12/2014 - 10:41

In reply to by वामा१००-वाचनमा…

यापूर्वी आपण "इथे ऐसी चा आय क्यू खाली आणणारा कोण" आदि प्रश्न विचारलेले आहेत
असं विचारणं चूक आहे, विचारावं लागण दुर्भाग्यपूर्ण आहे.

तुम्ही ३ पीढ्यांचा उद्धार करताय.

माझ्या मते तसं (उद्धार्,इ) काही नसतं. पण न्यूसंस टाळण्याकरता हे करावं लागतं. जालावर गुप्तता असल्याने, आणि संपादक गुप्ततेच्या समर्थनासाठी काही कृती करत नसले तर हे आवश्यक आहे. इथले सगळे सदस्य सन्माननीय आहेत, तेव्हा असे शब्द योग्य त्या माणसाला बरोबर लागतात. "श्रेणी दानावरील आक्षेप" ही एक माझी स्ट्रॅटेजी आहे. अन्यथा संवाद अतिशय सभ्यपणे किंवा समोरच्याच टोनमधे करायची माझी इच्छ्हा असते. माझा मामला उघडानागडा असल्याने मला माझी प्रतिमा काय होईल याची काळजी विषय नीट मांडला जावा यापेक्षा कमी असते.

तरी तुम्हाला असभ्य पातळी गाठायची असेल तर गाठा. तुम्हाला कोण अडवणार?

तुम्हाला माझ्या विधानांत खरोखरच काही भडकाऊ वाटले असे तर काय ते सांगा. श्रेणी का दिली ते सांगा. तुम्ही मला (मंजे त्या विधानाला)उगाच भडकाऊ म्हणू शकत नाही. पण तरीही तुम्हाला प्रामाणिकपणे ते विधान भडकाऊ वाटलेले असले, तर काय मुद्दा होता ते सांगा. पटल्यास मी तुमची क्षमा मागेन. मी वैज्ञानिक सत्यशोधन पद्धतीवर २००१ पासून वाचन करत आहे आणि नंतर मला ती व्यक्तिगत जीवनात सामाजिक मते बनविण्यासाठी कुचकामी वाटली आहे. माझा कट्टर नास्तिक ते फेन्स सिट्टर हा प्रवास कसा झाला हे लांबलचक प्रकरण आहे. मी खिशातून काढून "अस्तिक गुटी" अस्वल यांना देऊ शकत नाही. इथे मी, आठवडाभर, आयुष्यात केलेल्या मननाचा पाया काय होता ते सांगत आहे. तुम्ही अशा टिकली लावून पळून जाऊ शकत नाही.

मी "अध्यात्माचा" बाजूने काही मुद्दे (कितीका फीबल अटेम्प्ट असेना) केलेले होते.

अगदी असलेच अध्यात्मिक लोक पाहून लोक अध्यात्मापासून फटकून राहतात. फल्ज्योतिष, कर्मकांडे , इ इ इ. मी अध्यात्माची आणि विज्ञानाची तात्विक मानवी बैठक काय आहे हे सांगत आहे.

वामा१००-वाचनमा… Wed, 17/12/2014 - 10:48

In reply to by अजो१२३

नाही नाही अजो प्लीज क्षमा मागू नका. खरं तर ..... हा विषयच जाऊ देत. :(
तुम्ही रागाने बोलला असाल. मी समजू शकते मी ही इतका आक्रस्ताळेपण आ नकोय करायला :(
___
हा विषय जाऊ देत. तुम्ही बोललात तेव्हा रागाला चेहरा नव्हता, समोर कोण आहे हे माहीत नव्हते. तेव्हा तुम्ही मलाच मुद्दाम बोललात असे नाही. हे मला १००% माहीत आहे.

अस्वल Wed, 17/12/2014 - 02:03

In reply to by अजो१२३

अजो,
भारंभार प्रतिसाद टंकून त्यात लोकांना "पुरोगामी" "विज्ञानवादी" वगैरे विशेषणं लावली म्हणजे काही ठोस मुद्दा मांडला असं होत नाही.
इतका उपद्व्याप करूनही - ""विज्ञानाने मांडलेले सत्य उघडेनागडे आहे (इन कॉन्ट्रास्ट विथ अध्यात्म)" असली न मांडलेली मतं तुम्ही माझ्या नावावर खुशाल खपवून त्याचा स्वत:च हिरीरीने प्रतिवाद करत आहात
माझ्यातर्फे मी तुम्हाला तुमचा मुद्दा स्पष्ट करायला संधी देऊनही त्याचं काहीही उत्तर तुम्ही दिलेलं नाही - त्याऊलट माझ्याकडूनच तुम्हाला उत्तरं अपेक्षित आहेत!
ह्यात वाईट होईल ते असं, की तुमच्या अशा विषेशणयुक्त बडबडीमुळे ज्यांना अध्यात्माबद्दल खरोखरच काही विचार करायचा होता तेही परावृत्त होतील.
तेव्हा अजून शोभा नको. एवढंच.

अजो१२३ Wed, 17/12/2014 - 09:41

In reply to by अस्वल

वैज्ञानिक संशोधन
विज्ञान विचारधारेमागचं मुख्य कारण सत्याचा शोध हे आहे. आणि हे सत्य व्यक्तीनिरपेक्ष आहे. उदा. गुरुत्वाकर्षणाचे नियम. तुम्ही, मी, माझ्यासमोरच्या कुत्र्याने, माशीने कुणीही तपासले, तरी ते तसेच असतील. त्यात व्यक्तीप्रमाणे बदल होत नाहीत. आता हे असे सत्य शोधताना चुका होणं सहाजिक आहे. पण नवी गृहीतके मांडताना जुनी गृहीतके त्याजली तर वैज्ञानिकांना आनंदच होतो- कारण आपण त्या सत्याच्या आणखी थोडे जवळ जातो. तेव्हा बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असा हा उघडानागडा मामला आहे.
तेव्हा
१.गृहितके
२. प्रयोग/पुरावा/सिद्धता
३.चुकीत सुधारणा
पुन्हा १- नवे गृहितक
अशी काहीशी feedback system इथे अस्तित्वात आहे. मग त्यात अनेक विषय असतील(गणित्,भौतिकशास्त्र, जीवशास्त्र). ह्या वेगवेगळ्या शाखांमध्ये तुम्ही विज्ञानविचार वापरून नवी सत्यं शोधू शकता, आणि आधीची चुकलेली सत्यं पुन्हा तपासून दुरूस्त करू शकता.

हे आप्लेच वचन आहेत.

अस्वल Wed, 17/12/2014 - 23:26

In reply to by अजो१२३

लाष्ट प्रतिसाद!
मी फक्त "विज्ञानाने मांडलेले सत्य उघडेनागडे आहे" एवढंच म्हटलेलं हो.
त्याला तुम्ही पुढे "विज्ञानाने मांडलेले सत्य उघडेनागडे आहे (इन कॉन्ट्रास्ट विथ अध्यात्म)" जोडून पार सांधाच बदललाय. असो! लगे रहो!

अजो१२३ Wed, 17/12/2014 - 01:09

In reply to by अस्वल

आठवडाभर चर्चेचा रतीब घालूनही "अध्यात्म म्हणजे नक्की काय" हे तुम्ही सांगू शकत नसाल, तर मग काही अर्थ नाही

ठिक आहे. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला, तुमच्या टर्म्सप्रमाणे, अक्षम आहे हे मला मान्य आहे. I thought there was discussion and on mutual terms.

अजो१२३ Wed, 17/12/2014 - 10:50

In reply to by अस्वल

धागा तुम्ही सुरू केला अध्यात्मावर. त्यावर मी साधा प्रश्न विचारलाय अध्यात्म म्हणजे नक्की काय.
तर त्याला उत्तर द्यायचं सोडून तुम्ही विज्ञान काय आहे, शास्त्रज्ञ जुगार कसे खेळतात, मला लोक असल्या श्रेण्या का देतात वगैरे गोष्टींची चर्चा करताय.
आठवडाभर चर्चेचा रतीब घालूनही "अध्यात्म म्हणजे नक्की काय" हे तुम्ही सांगू शकत नसाल, तर मग काही अर्थ नाही.
मला असं म्हणायला आवडलं असतं की हे सांगणंं क्लिष्ट आहे म्हणून तुम्हाला वेळ लागतोय. पण आतापर्यंतची उत्तरं बघून असं वाटत नाही की तुम्हाला "अध्यात्म" ह्या विषयाबद्दल काही अधिक माहीती आहे.
तेव्हा असो. जर अध्यात्म ह्या विषयावर तुमची मतं मांडायची असतील तर मला पुढे काही चर्चेत अर्थ वाटतोय.

चर्चा पर्सनल अंगाने जायला चालू आहे. तेव्हा हा विषय तुमच्या प्रश्नांची उत्तरे म्हणून संपवतो. \
---------------
अ‍ॅनिवे, हा मुद्दा क्लिष्ट आहे नि त्याचा फ्लो मी ९-१० भागांत लिहू शकलो असतो. ऑफिसात मिटिंगमधून वेळ काढून फटाफट मी दर्दिवशी इतकेच लिहू शकतो. शिवाय मी हा एकच धागा लिहित वाचत आहे.

अजो१२३ Tue, 16/12/2014 - 14:02

In reply to by नितिन थत्ते

वरचाच उतार इथे देत आहे.

सायंटिफिक मेथडची आजची कल्पना

सायंटिफिक मेथड म्हणजे काय याची साधारणतः सर्वमान्य कल्पना येथे वाचता येईल. सामान्य माणसासाठी ते सुलभ शब्दांत इथे लिहिलेले आहे -
http://science.howstuffworks.com/innovation/scientific-experiments/scien...

ती व्यवहार्य, निरीक्षणाधारित, विदा गोळा करून केलेली, प्रयोगाने सिद्ध, संख्यांत मांडलेली, सजीव आणि सामाजिक शास्त्रात वापरता येते, मानवी बुद्धीवर भर असणारी, प्रामुख्याने अनुमानाधारित, रिपिट करता येईल अशी, पद्धतशीर किमान या सर्व अटी पाळून राबवायची असते.

http://s.hswstatic.com/gif/scientific-method-17.jpg
इथे तिची आकृती आहे.
--------------------
मला विशेष रुचि असलेला पॅरा.
Limitations of the Scientific Method:
१. .... The limitations are based on the fact that a hypothesis must be testable and falsifiable and that experiments and observations be repeatable. This places certain topics beyond the reach of the scientific method.
२. Science cannot prove or refute the existence of God or any other supernatural entity. Sometimes, scientific principles are used to try to lend credibility to certain nonscientific ideas, such as intelligent design. Intelligent design is the assertion that certain aspects of the origin of the universe and life can be explained only in the context of an intelligent, divine power. Proponents of intelligent design try to pass this concept off as a scientific theory to make it more palatable to developers of public school curriculums. But intelligent design is not science because the existence of a divine being cannot be tested with an experiment.

या वरच्या उतार्‍यात नक्की काय म्हणायचे आहे ते प्रचंड महत्त्वाचे आहे. काही विषय सायंटिफिक मेथडच्या पल्याडले असले तरी त्या कारणांमुळे जे विषय पल्याडले वाटत नाहीत अशा अधिभौतिक बाबींना विज्ञान स्पष्टपणे नाकारू शकतच नाही. परंतु विज्ञान नाकारू शकतच नाही या सत्याचा काही लोक दुबळा अर्थ लावून "विज्ञानाने नाकारू न शकणे म्हणजेच सिद्ध असणे" असा लावतात. वेल, मी या नियमाचा असा वापर करणारांत मोडत नाही.
-------------------------------------
तर नितिनजी, वि़ज्ञानापल्याड गेल्याने किंवा विज्ञान स्पष्टपणे नाकारू शकत नसल्याने प्रतिगामी लोक जश्या अधिभौतिक संकल्पना सिद्धच झालेल्या आहेत असे मानून मिरवतात तितक्याच अज्ञपणे पुरोगामी लोक त्या असिद्धच झालेल्या आहेत म्हणून मिरवतात. सुज्ञपणाचे हे आहे कि तो विषय ज्या शाखेत मोडतो, त्या शाखेची चिकित्सापद्धती विज्ञानाच्या चिकित्सापद्धतीच्या तुलनेत कसे आहे रुचते का पाहणे, न रुचले तर सोडून देणे, रुचले तर पुढे अभ्यासणे.

पण या "असिद्धच झालेले आहे म्हणून मिरवणार्‍या" लोकांत समाविष्ट होण्याची इतकी हौस का?

अजो१२३ Tue, 16/12/2014 - 14:23

In reply to by नितिन थत्ते

शिवाजी महाराजांना जावा माहित नव्हतीच असे विज्ञान सिद्ध करू शकत नाही तेव्हा तुम्ही कशाच्या भरोश्यावर माहित नव्हतीच नव्हती हे ठासून सांगत आहात?
----------
आज जो जोक वाटतो, कल्पना वाटते, उद्या ते खरोखर जगात घडू शकते. मग अशा गोष्टीच्या सत्यतेवर मागे केलेला उपहास नंतर काय भावाने जातो?

नितिन थत्ते Tue, 16/12/2014 - 15:09

In reply to by अजो१२३

>>शिवाजी महाराजांना जावा माहित नव्हतीच असे विज्ञान सिद्ध करू शकत नाही तेव्हा तुम्ही कशाच्या भरोश्यावर माहित नव्हतीच नव्हती हे ठासून सांगत आहात?

शिवाजी आणि जावा हे काळातला फरक दाखवण्यासाठी म्हटले आहे. सर्व ज्ञान कालातीत आणि प्रत्येक मनुष्यास जन्मतः असतेच या विधानाला ताणलेले आहे. माझ्याकडे जावा प्रोग्रॅमिंगचे ज्ञान आहे हे सिद्ध करता येईल काय?

'न'वी बाजू Tue, 16/12/2014 - 16:06

In reply to by नितिन थत्ते

माझ्याकडे जावा प्रोग्रॅमिंगचे ज्ञान आहे हे सिद्ध करता येईल काय?

हा प्रश्न, "माझ्याकडे अध्यात्माचे ज्ञान आहे हे सिद्ध करता येईल काय?" अशा शब्दांत विचारला असतात, तर कदाचित अधिक सयुक्तिक झाला असता.

असो.

अजो१२३ Tue, 16/12/2014 - 17:20

In reply to by अजो१२३

इथे दिलेली निरर्थक श्रेणी मला मान्य आहे. कारण सर्वसाधारण डोक्याच्या माणसाला/बाईला खरोखरीच काय लिहिलं आहे ते निरर्थक वाटू शकतं आणि त्यात त्याचा/तिचा दोष नाही.