Skip to main content

माझ्या लाडक्या प्र,

माझ्या लाडक्या प्र,

बघ ना रे माझ्या सोन्या. रात्रीचे दोन वाजून गेल्येत. आणि तुझ्या स्वप्नातल्या या नाजूक सोनपरीला निद्रादेवी कुशीतही घेत नाहीये. कधी ही कूस, कधी ती कूस. तडपत्ये तुझ्या जाळत जाणाऱ्या आठवणींत. ती वेड लावणारी, मंत्रमुग्ध फुललेली, रात्रीचं गान गाणारी रातराणी, बघ डोकावत्ये खिडकीतून. जणू सांगत्ये मला येईल गं तुझा प्र... असाच तुला फुलवायला. गंध उधळून देईल तुझ्यावर त्याच्या बहरलेल्या प्रेमाचा... त्याच्या अमृताच्या घड्याचा... (इश्श, मला लाज वाटते.) अरे ए वेड्या, माझाच ना तू. तू ही जागा असशील असाच माझ्या मयूरपंखी आठवांत. तुलाही होत असतील मऊमुलायम गुदगुल्या. तूही जाळत असशील एकेक क्षण. तूही असशील असाच वेडा होत. तुलाही मी हवी असेन तुझ्या मर्दानी बाहूंत. ही रात्र बघ ना कित्ती जीवघेणी, काळोखरात्र म्हणावी अश्शीच.

पण आता येईल तो घोड्याच्या रथात स्वार झालेला. करोडो किरणं उधळत येणारा राजा. तुझ्यातल्या 'प्र'काश बनून. तूही असाच ये ना माझ्या बाहूंमध्ये. सुवर्णरत्न बनून. न्हाऊन टाक मला तुझ्या सोन्याच्या प्रभेमध्ये. हे बघ, मी वाट बघत्ये. माझ्या पापण्या अंथरून तुझ्या येण्याच्या मार्गावर. ये हळूवार, ये अलवार, ये हो स्वार माझ्या स्वप्नांवर.

स्वप्नंतरी कित्ती सुंदर. तुझ्यासारखंच, माझ्यासारखंच, आपल्या मंदगंध प्रेमासारखंच. मातीलाही वेड लागते म्हणे सुगंधाचे. मग वीणेला लागणारच 'प्र'चे!!! तुझी वीणा झंकारत्ये रे. मन भूमी झालंय माझं. ये, बरस आभाळ होऊन. ये, बरस धारा होऊन. ये, उधळ वारा होऊन. ये... ये... ये...

येईल एक दिवस असा जेव्हा स्वप्न खरं होईल. आपण दोघे एकजीव असू. कधीही न तुटणारा बंध असेल प्र आणि वीणेचा. फुलेल आपलं घरटं. वाऱ्याच्या झोक्यावर झुलेल आपलं स्वप्न. गाईल सप्तसुरी गान आयुष्याचं. गाईल गान सुवर्णपंखी आनंदाचं. मी वाट बघत्ये रे राजा, माझ्या सोन्या... प्र... प्र... प्र!!!

तुझी वीणा!!!

Node read time
2 minutes
2 minutes

धर्मराजमुटके Tue, 10/02/2015 - 09:11

In reply to by मेघना भुस्कुटे

संपादकांना विनंती करुन श्रेणीमधे 'चावट', रोमँटीक, अश्लील अशा नवीन श्रेणी वाढवता येतील काय ?

गब्बर सिंग Tue, 10/02/2015 - 09:26

एकदम चार पाच गाणी आठवली. विकल मन आज झुरत असहाय (बकुळ पंडित), प्रीती सुरी दुधारी (बकुळ पंडित), का धरिला परदेस (बकुळ पंडित), प्रीतसागरी तुझ्या स्मृतीचे गर्जत आले वारेवादळ (सुमन कल्याणपूर).....

----

पहले से मरासिम ना सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रहे दुनिया ही निभाने के लिये आ
रंजिश ही सही...

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफा है तो ज़माने के लिये आ
रंजिश ही सही..

अस्वल Tue, 10/02/2015 - 09:30

तुम्ही लिहा वीणा ताई. लिहा. आम्ही वाचत राहू. चातकासारखे अविश्रांत वाट पाहू तुमच्या मंत्रमुग्ध लेखणीची.
बाय द वे, तुम्ही प्रेमपत्रं वगैरे लिहायच्या ऑर्डरी स्वीकारता का?
आपला फ्यान!
ता.क - "आठवांत" म्हणजे काय ते?

ऋषिकेश Tue, 10/02/2015 - 10:05

ए ए ए! पहिल्या धाग्यावरून वाटलेलं की खरंच कोणीतरी विव्हळतंय.. आता मात्र.. असो.
धमाल आली! नमस्कार स्वीकारा! __/\__

'न'वी बाजू Fri, 13/02/2015 - 17:39

In reply to by ऋषिकेश

पहिल्या धाग्यावरून वाटलेलं की खरंच कोणीतरी विव्हळतंय..

'विव्हळतंय' इज़ रैट्ट.

अजो१२३ Tue, 10/02/2015 - 16:06

आता तुम्हाला प्र लवकर भेटला नाही तर सगळं इंटरनेट शॉर्टसर्किट होणार असं वाटतंय.
--------------
लै भारी रोमँटिक लिखाण.
-------------
लै भारी विडंबन.
-----------------
जे काय ते. वाचायला मज्जा आली.

अस्वल Wed, 11/02/2015 - 05:58

In reply to by अजो१२३

प्रतिसाद विनोदी वाटला म्हणून विनोदी देतो आहे, नसेल तर भडकाऊ द्यायला न्.बा. आहेतच.
श्रेण्यांच्या बाबतीत आम्ही आज काल "आधी सांगितले, मग केले".

'न'वी बाजू Wed, 11/02/2015 - 06:27

In reply to by अस्वल

नसेल तर भडकाऊ द्यायला न्.बा. आहेतच.

मी अनेकांना अनेकदा (आणि त्यातही अनेकदा काहीही कारण नसताना/उगाच गंमत म्हणून/केवळ त्यातून माझी प्रचंड करमणूक होते म्हणून) 'भडकाऊ' देतो, हे खरे आहे. मात्र, याचा व्यत्यास खरा नाही.

प्रत्येक वेळेस 'भडकाऊ' देणारा मीच असेन, असे नाही.

किंबहुना, आजकाल हे वारंवार, अनेकदा लक्षात येऊ लागलेले आहे. सबब, मंडळी, बिवेअर ऑफ इमिटेसन.

..........

'द ग्रेटेष्ट फॉर्म ऑफ फ्ल्याटरी' असे कायसेसे ऐकून आहे ब्वॉ.

वृन्दा Tue, 10/02/2015 - 16:58

किती अलवार, मृदू अन तरल लिहीता हो तुम्ही वीणाताई. वाचताना, शरीरावरती अगदी रोमांच उठतात. मन झंकारुन उठतं.
पण ती "पी.डी." अशी अरसिक आद्याक्षरं का घेतलीत?
"ले.ले." किंवा "चुं.बा." अशी का नाही घेतलीत गडे :)

बॅटमॅन Tue, 10/02/2015 - 17:38

In reply to by वृन्दा

पण ती "पी.डी." अशी अरसिक आद्याक्षरं का घेतलीत?

हाउ डू यू नो की 'के एल' ही दोन अक्षरे अध्याहृत अँड/ऑर सायलेंट नसतील?

अतिअवांतरः खालीलप्रमाणे संवाद असलेल्या एखाद्या हॉलिवुडी अ‍ॅक्षनपटाची वाट पाहतोय.

गुन्हेगारांना पिस्तुलांचा धाक दाखवत क्वालालंपूरचे पोलीसखाते येते आणि म्हणते- "धिस इज़ के एल पी डी. फ्रीझ नाउ!"

'न'वी बाजू Tue, 10/02/2015 - 17:45

In reply to by बॅटमॅन

'मार्मिक' द्यावी, की 'विनोदी', कळेना. शेवटी (हीही नको, नि तीही नको, म्हणून) 'भडकाऊ'वर समाधान मानले.

'न'वी बाजू Tue, 10/02/2015 - 17:32

बाई पेटलीय!

अजो१२३ Tue, 10/02/2015 - 17:33

In reply to by 'न'वी बाजू

पुढे?

'न'वी बाजू Tue, 10/02/2015 - 17:36

In reply to by अजो१२३

(नाही, 'टिपिकल दिल्लीष्टाइल हुंडाबळी केस' अशा अर्थाने नव्हे.)

(अर्थात, तरीही रन-ऑफ-द-मिल केस वाटणे शक्य आहे म्हणा.)

अजो१२३ Tue, 10/02/2015 - 18:11

In reply to by 'न'वी बाजू

बाई पेटणे ही अतिशय सामान्य प्रक्रिया आहे. नव्हे का? मग पुढे काही अ‍ॅक्शन घ्यायची गरज नाही असे सुचवित होतो.

बॅटमॅन Tue, 10/02/2015 - 18:16

In reply to by अजो१२३

यूजर आयडी अरुणजोशी दिसला की प्रतिसाद न पाहता भडकाऊ, खोडसाळ अशा श्रेण्या देणार्‍यांची कीव येते. वरील प्रतिसादात असे काय आक्षेपार्ह आहे म्हणून तो प्रतिसाद बिनकामी दाबून टाकला? मी वर आणला तो प्रतिसाद.

(पुन्हा एखाद्या ग्राम्य मूल्यांवरील प्रवचनाच्या प्रतीक्षेत.)

अजो१२३ Tue, 10/02/2015 - 18:26

In reply to by बॅटमॅन

काही काळानं असं होणार नाही अशी आशा आहे. मी माझी विचारसरणी बदलली आहे. अगदी आत्ता आत्ता पर्यंत पुरोगामीत्वाचा कडवट विरोध केला असल्याने माझे म्हणणे लोकांना खोडसाळ, खवचट, इ इ वाटत आहे. असे होणे सामान्य आहे.

अजो१२३ Wed, 11/02/2015 - 15:51

In reply to by नितिन थत्ते

सारीच वर्तने उत्क्रांतीजन्य आहेत हे पहिल्याने मान्य करतो.
---------------
बाई पेटणे या स्पेसिफिक प्रोसेससाठी उत्क्रांतीजन्य वर्तन होणे हे मोघम, कॉमन नाउन वापरले असते तर मतितार्थ पोचला नसता.

अजो१२३ Wed, 11/02/2015 - 16:08

In reply to by नितिन थत्ते

आता यावर ऐसीकरांना अनेक कट्ट्यांवर प्रत्यक्ष भेटले असल्याने तुम्हाला वाईट श्रेण्या मिळणार नाहीत. आम्हांस ते भाग्य कोठचे?

ऋषिकेश Wed, 11/02/2015 - 16:59

In reply to by लॉरी टांगटूंगकर

मी सुधारलीये ती. माझ्या २५तल्या किमान २०-२२ श्रेण्या साधारणतः पॉसिटिव्हच असतात असे माझे निरिक्षण आहे.

ऋषिकेश Wed, 11/02/2015 - 17:22

In reply to by नितिन थत्ते

अहो तुम्ही कट्ट्याला भेटलायत ना मला ;)

ओन सिरीयस नोटः मला तो प्रतिसाद भडकाऊ वाटला नाही म्हणून सुधारली. :)

बॅटमॅन Wed, 11/02/2015 - 17:14

In reply to by नितिन थत्ते

अगदी अगदी. पण पुरुष इतके दुष्ट वैट्ट इ. असतानाही महिला आपल्या उत्क्रांतीजन्य स्वभावाला मुरड घालून पुरुषांशी संपर्क तोडू शकत नाहीत हे म्हणजे उदाहरणार्थ बहुत रोचक आहे.

आमच्या प्रतिसादांकडे इतक्या कटाक्षाने लक्ष पुरवल्याबद्दल त्या अनाम श्रेणीदात्याचे/दात्रीचे अनेक आभार.

बॅटमॅन Wed, 11/02/2015 - 19:33

In reply to by धर्मराजमुटके

ते तुमचे सायन्स सांगत असेल. इथे गरीब बिचार्‍या उत्क्रांतीच्या दावणीला बांधलेल्या स्त्रियांबद्दल बोलणे चाललेय.

धर्मराजमुटके Wed, 11/02/2015 - 19:38

In reply to by अजो१२३

आहेत ना. नक्कीच आहेत. आता खालील अर्थ पहा ना

To grow = to increase by natural development
To Rise = To increase in size, volume, or level

आता आम्ही अडाण्याने काय समजायचे बॉ ?

ॲमी Wed, 11/02/2015 - 02:33

ग्रेशस गॉड =)) खल्लास आहेत वीणाताई!
व्हॅलेन्टाईन्स डे स्पर्धेसाठी माझ्याकडून पयला नंबर! काँपीटीशनच नाय. परत एकदा ५ तारका.

बाबा बर्वे Wed, 11/02/2015 - 09:59

पहिला लेख / पत्र / स्वगत म्हणजे जे काही होतं ते वाचून असं वाटलं होतं की हा जो कोणी प्र आहे तो काही दिवसांसाठी परगावी वगैरे गेलेला वगैरे असावा आणि वीणाताई त्याच्या म्हणजे आठवणीत विव्हळ व्गैरे झाल्यात ..
पण आता हा दुसरा लेख / पत्र / स्वगत म्हणजे जे काही आहे ते वाचून म्हणजे असं वाटतय की विरह काही वर्षांचा व्गैरे असावा ..
परत पहिल्या लि़खाणात "प्र" चा फोन वगैरे पण आला होता ..

वीणाताई ... प्रेमपत्राच्या वळणाने जाणारी काही भयकथा वगैरे तर लिहीत नाही ना तुम्ही ???

गब्बर सिंग Wed, 11/02/2015 - 10:10

In reply to by बाबा बर्वे

पण आता हा दुसरा लेख / पत्र / स्वगत म्हणजे जे काही आहे ते वाचून म्हणजे असं वाटतय की विरह काही वर्षांचा व्गैरे असावा ..

वीणामॅडम, मिल्ट्रीत वगैरे आहेत का हो हे प्र-राव ?

----

पी डी वीणा यांना मी वीणामॅडम असे संबोधित केलेले आहे याची कृपया नोंद घ्यावी.

पिवळा डांबिस Wed, 11/02/2015 - 10:11

माझा मराठीचि गडी कौतुके
जरि अमृताने नारी जिंके,
मग त्वां अक्षरे अरसिके
का मेळवावी?
:)