वीणेच्या मनीचे गुजगुपित
खरं सांगू प्र. तु केलिस नं मागणी ती चुक नाहि वाटलि मला.
तू थट्टेच्या (कोण रे तो "थत्तेच्या" असं वाचतोय ?) सुरात बोललास तेहि बरच.
पण ...
पण माझ्या कुंद धुंद भावना * समजून * न घेता तू त्यांची कशि रे थट्टा करतोस.
अरे आपल्या फुलपाखरी सोबतिच्या आठवणींनीच तर माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या चिळकांड्या उडाल्यात.
.
.
आता आहे प्रॉमिसडे. पडू ना मझ्या अलवार तरल प्रेमाचे तुझ्यावर सडे.
का रे कर्तोस तु असे? आपले जीवन जणु तरल मासे.
तुला हवय ते आहे माझ्याकडे. पण मला हवाय तुझा विश्वास (तुझा दारुडा विश्वास साठे नै बरं का)
मी चिंब चिंब बघ भिजले तुझ्या पारिजातकाच्या सड्यात.
वास येतो मला तुझा परसात, दारात आणि अगदि त्या तिथे....
.
.
तिथे त्या....
.
.
त्या मंदिरातही मला तुझाच वास येतो रे.
वेडि होइन रे मि.
.
.
भेटशिल न रे पुन्हा
.
.
हे मि माझ्या मनातलं लिहितेय. अगदि खर्र खर्र लिहितेय ;पेनाचा खर्र खर्र आवाज करत.
येशिल ना रे तु. जग्या मग्या नि टग्या नंतर तूच रे तू माझा.
.
.
मला माहितिये तुला सतार आवडते. पण कधीतरी वीणाही वाजवून बघ.
सुरेल झंकार येतील तुझ्या आयुश्यात वीणेने.
आपल्या नात्याची ही घट्ट वीण..तीच मी...वीणा.
.
.
आणि हो :-
वीणेच्या "मनीचे" असलं लिहिलं असलं तरी मी कै "तस्लि" नै.
माझी तशी कै "मनी" नै कोणी. तुच रे माझा बंड्या.
(तसा तुझ्याकडूनही मला बराचसा "मनी" हवाय, पण तो "हवा " आहे; "हवी" नाहिये. )
.
.
.
अवांतर
सदर लेखकाचा टवाळगिरी वगैरेचा पहिलाच जाणीवपूर्वक "प्र"यत्न आहे.
ओळींदरम्यानचे दोन-चार टिंब टिंब पाहून आपण केलेला तर्क योग्य आहे.
प्रतिक्रिया
"वीणेचे मन" अधिक प्रस(द?)वणीय
"वीणेचे मन" अधिक प्रस(द?)वणीय लिहू शकते याची खात्री आहे.
हे काय वरवरचं, छ्या!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
"वीणेचे मन" अधिक प्रस(द?)वणीय
"वीणेचे मन" अधिक प्रस(द?)वणीय लिहू शकते याची खात्री आहे. > +१.
पण बाकीच्यांनी प्र आणि वीणांच्या कबाबमधे हड्डी बनू नये असे वाटते. त्या दोघांनाच मज्जा करूदेत ;-).
वर्जिनल पी. डी. वीणाबाई कुठं
वर्जिनल पी. डी. वीणाबाई कुठं गेल्या? त्यांनी स्टेजवर यावं...
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
आल्यात की
आल्यात की त्याही
http://aisiakshare.com/node/3766
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मी आहे हो इथेच मेघना ताई.....
मी आहे हो इथेच मेघना ताई.... काय करु हो... आधीच प्र चा क्लेशदायी विरह आणि त्यात हे नवीन... नाही...नाही...नाही...नाही हो सहन होत आता या कोवळ्या जीवाला!!!
अरे वा! कोवळा जीवही आला का?
अरे वा! कोवळा जीवही आला का?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
नीट पहा. जिवात जीव आला असेल.
नीट पहा. जिवात जीव आला असेल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
Now,It is being stretched too
Now,It is being stretched too much.
:-B
सोन्याची तार
वीणेची तार (की तारा असतात??आम्ही अंमळ फिलिष्टाईनच)
सोन्याची असणार नक्कीच.
वर्धनीयता आणि तन्यता चांगलीच आहे.
ह्या वीणेत ती मजा नाय
ह्या वीणेत ती मजा नाय हो "मनोबा"
हे बघा, मझ्या आणि फक्त मझ्या
हे बघा, मझ्या आणि फक्त मझ्या "प्र" च्या निर्मळ प्रेमाची जीवघेणी थट्टा करणार्यानो तुम्हाला काय कळणार इथे मला काय होत असेल! इवलंसं काळीज दु:खानं तळमळ्तंय माझं!!! थांबाव हो हे सारं.......
थट्टा ?
ही नाही थट्टा.
स्वतःच्या मनाचा आवाज ऐक.
इथे काळीज पिळवटून निघत असताना अशी का मनाचा आवाज दाबतेस ?
ओघळून वाहू दे आज मनातलं सारं.
नाहीतर पी डी, लवकरच गाठशील ओ.पी.डी.
किंवा
नाहीतर पीडी, होईल तुझा के एल पी डी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पण.. पण..
पण... पण.. वीणेचा केएल्पीडी कसा होणार?
खास लम्हे पे धोका तर कुणाचाही
खास लम्हे पे धोका तर कुणाचाही होऊ शकतोय की.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बट शी कॅन फेक .... अम्हीला
बट शी कॅन फेक .... म्हैला सबलीकरण
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
के एल पी डी आणि फेकिंगचा
के एल पी डी आणि फेकिंगचा संबंध आला कुठे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अरे नीट माहीत नाहीये काय विषय
अरे नीट माहीत नाहीये काय विषय आहे ते. जाऊ देत.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
अशी काळीकुट्ट वटवाघुळं
मनाच्या अवतीभोवती अशी काळीकुट्ट वटवाघुळं पिन्गा घालत असतांना मनाचा नाजुक अलवार आवाज दाबला जाणारच ना.......
डिस्क्लेमर सुरू
मनोबाच्या अवतीभोवती आम्ही पिंगा कधीच घातला नाही, घालत नाही अन घालणारही नाही.
डिस्क्लेमर समाप्त.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आर्त सादेला असे बेफिकिर
आर्त सादेला असे बेफिकिर प्रतिसाद पाहून आक्रंदून उठत असेल ना हळिवाच्या रोपासारखं हळवं मन..?
पहाटेच्या वेळी अजून साखरझोपेत असलेल्या गवताच्या पोपटी पात्यावरच्या दहिवरात वीणेचा कढत अश्रू मिसळल्यावर तो थेंब थरथरत असेल का वीणेच्या तारेसारखा ? की हलत असेल दुपट्यात लपेटलेल्या लहान बाळाने झोपेत अंग काढल्यासारखा?
आरं तिच्या... आता मला गविंचाच
आरं तिच्या... आता मला गविंचाच सौंशय येतोय. नंदनपाठोपाठ अमुकचीही गच्छंति का काय?!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
हाय रब्बा.. यात माहितीपूर्ण
हाय रब्बा.. यात माहितीपूर्ण काय आहे?
वीणेच्या मनाला जो तो हात लाऊ
वीणेच्या मनाला जो तो हात लाऊ लागलाय असे दिसते. पण वीणेचे मन 'प्र'साठी एकनिष्ठ आहे.
वीणेचे मन आणि प्र यांची जोडी प्र-बळ आहे!
हा निष्कर्ष चुकीचा आहे काय?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
एवढे डॉट्स = मन
एवढे डॉट्स = मन
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
ते शेवटच्या डिस्क्लेमरामुळे
ते शेवटच्या डिस्क्लेमरामुळे मनोबाची शक्यता जास्त वाटतेय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अगदी त्या डिस्क्लेमर मुळेच!!!
अगदी त्या डिस्क्लेमर मुळेच!!!
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
वीणेची आई
वीणेची आई - आमचं रत्न पहील्यापासूनच भारी. वयात काय आली दर ६ महीन्यांनी नव्या कोणीतरी पछाडलेलं असतं. हाताबाहेर गेलीय कार्टी. लवकर उजवावं म्हणते तर शिक्षण अडतय. काय करावं तेच कळत नाही. कधी जग्या कधी मग्या आता तर तो नाक्यावरचा "प्र". गेंडा आहे नुसता. (जीभ चावत) गेंड नको म्हणायला कोणी सांगावं जावई बनून मीरे वाटायचा डोक्यावर.
कितीदा सांगीतलं पुरषाच्या रुपाला काय चाटायचय, कर्तुत्व बघ, कुळ बघ, अन मुख्य पैसा बघ पण हीच्या डोक्यात शिरेल तर ना हिंदी सिनेमे पाहून पाहून पार वाट लागलीये. आरशासमोर तासन तास पाहून मुरडणं, कपडे , कानातले बदलणं यातच आख्खा दिवस जातोय मग ग्रेडस ची बोंब.
त्या "प्र" चं नाव निघाल्यावर गुदगुल्या झाल्यासारखी हसते काय. लवकर उजवावी म्हणते या भवानीला.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
उजवणे मंजे काय?
उजवणे मंजे काय?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
लग्न करून देणे, उदा. बापाने
लग्न करून देणे, उदा. बापाने मुलीला/मुलाला उजवतो/उजवून टाकले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मग "कुस उजवली" म्ह्णजे काय?
मग "कुस उजवली" म्ह्णजे काय?
नुस्ते उजवणे म्हणजे लग्न करून
नुस्ते उजवणे म्हणजे लग्न करून टाकणे असा अर्थ आहे तर कूस उजवणे म्हणजे मूल होणे हा अर्थ आहे. यापलीकडे माहिती नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
उजवण-णी-णूक—स्त्री. ऊर्जितदशा
उजवण-णी-णूक—स्त्री. ऊर्जितदशा (भूमि, वस्त्र, मनुष्य, इ॰ कांस). (संदर्भः दाते-कर्वे कोश)
म्हo
मुलगी उजवणे = लग्न करून देऊन तिचे कोटकल्याण करणे
कूस उजवणे = संतती जन्माला येऊन आयुष्याची परिपूर्ती होणे
ओह दोज प्रतिगामीज...
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
उलट 'प्रति'गामीपणा केला तर
उलट 'प्रति'गामीपणा केला तर संतती पैदा होणारच नाही....
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
उजवणे
कूस उजवणे = जीवांत जीव येणे = ओ.पी.डी. कडे न पळता मॅटर्निटी होम मधे दाखल होणे.
येग्झाक्टलि!
येग्झाक्टलि!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अहो अर्थ माहीती होता, मी फक्त
अहो अर्थ माहीती होता, मी फक्त दुसरा अर्थ पण आहे हे दाखवू इच्छित होते.
भाषा तरी साली किती दुर्बळ
भाषा तरी साली किती दुर्बळ असावी नै?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
तू थट्टेच्या (कोण रे तो
हाहाहा मस्त कोटी.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
तसेही आम्हाला अनेक अमराठी लोक
तसेही आम्हाला अनेक अमराठी लोक थट्टे नावानेच ओळखतात त्यामुळे चालतंय
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.