मनातील छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ३७

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------

छोटा प्रश्न.

मी बारावीला ठाण्याच्या कॉलेजात शिकलो. तिथे शाळेतल्याप्रमाणे वर्ग असे. आम्ही एका वर्गात बसत असू आणि विविध विषयाचे शिक्षक त्या वर्गात येऊन आम्हाला शिकवत.

इंजिनिअरिंगला सीओईपीला गेल्यावर तिथे वेगळी पद्धत दिसली. ज्या विषयाचे लेक्चर असेल त्याप्रमाने मुलांनी त्या त्या डिपार्टमेंटच्या क्लासरूममध्ये जाऊन बसायचे आणि तिथे लेक्चर होणार (मॅथ्स, फिजिक्सला नाही पण इलेक्ट्रिकल, मटेरिअल सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अशा विषयांना त्या त्या डिपार्टमेंटमध्ये जायचे). नंतर असे कळले की पुण्यातल्या इतर कॉलेजात उदा. फर्ग्युसन अशीच पद्धत होती. म्हणजे बारावीच्या मुलांनी फिजिक्सचा तास असेल तर फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये, केमिस्ट्रीचा तास असेल तर केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये जायचे.

मुंबईत व्हीजेटीआय, एसपी मध्ये किंवा रुइया, रुपारेलमध्ये अशी पद्धत होती का?

field_vote: 
0
No votes yet

सीओइपी इतकं भारी कॉलेज कि कॉलेजातून जलमार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेमार्ग तिन्ही जायचे. फक्त विमानतळ बांधायचे बाकी होते. लेक्चरसाठी रस्ता (पुणे -मुंबई रस्ता) ओलांडावा लागे म्हणून अपघातात मेलेल्या विद्यार्थ्यांचं स्टॅट मानानं जास्त होतं (अन्यथा नसतं) असं मी प्राध्यापकांना बोलताना ऐकलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरे आवाज कुणाचा....सीओईपीचा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

व्हि़क्टर युनिफॉर्म टू चार्ली ऑस्कर एको,
आवाजाचे माहीत नाही, पण सीओईपी एक चांगला ब्रँड मात्र आहे.
बाकी गधा घोडा सब बराबर.
ओव्हर अ‍ॅण्ड आउट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१८५६ सालचे कॉलेज आहे. इंग्रजांचे काय प्रचंड उपकार आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक करेक्शन. कॉलेजची स्थापना १८५४ सालची आहे. तेव्हा ते होतं भवानी पेठेत, जुन्या मोटर स्टँडजवळ. सध्याची इमारत बांधण्यास सुरुवात झाली ती १८६५ मध्ये अन १८६९ साली कंप्लीट झाली. अन ही इमारत आहे तो भाग म्हणजे संगमावरल्या ब्रिटिश रेसिडेन्सीचा भाग होता. सीओईपीच्या जरासाच पुढे जो जज्ज बंगला आहे तिथे वरिजिनली ब्रिटिशांचे पुणे दरबारातील रेसिडेंट रहायचे. मॉस्टिन, मॅलेट, एल्फिन्स्टन, इ. सर्व लोक तिथेच राहिलेले आहेत. कॉलेजच्या आवारात नोकरांची घरे, हत्तीघोड्यांचे तबेले, इ. वास्तू होत्या. १८१८ सालच्या इंग्रज-मराठा युद्धातल्या 'बॅटल ऑफ खडकी' मध्ये पेशव्यांचे सरदार (अन मिरजेचे राहणारे) बापू गोखले यांनी रेसिडेन्सीवर हल्ला करून तिची जाळपोळ केली व ती उद्ध्वस्त केली. अगोदरच खबर मिळालेली असल्याने एल्फिन्स्टन पुढे अगोदरच निघून गेला होता, सबब त्याला त्याने फरक पडला नाही.

ही इमारत बांधली तेव्हा मुंबई प्रांताचा गव्हर्नर बार्टल फ्रेअर हा होता. तो त्याकरिता इथे येऊन गेला होता. अजूनेक रोचक गोष्ट म्ह. इमारतीच्या बांधणीत आर्किटेक्ट व बिल्डर-सप्लायर यांची जाम भांडणे सुरू होती किंमतीबद्दल. माझे स्मरण बरोबर असेल तर बहुधा तेव्हाच्या दीड लाखाच्या आसपास खर्च आला सगळे बांधायला. कावसजी जहांगीर या धनिकांनी कॉलेजसाठी बरीच देणगी दिली होती. तेव्हा त्याचे नावही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नव्हते. डिप्लोमा व क्लास मेकॅनिकल स्कूल की असेच कायसेसे होते. पहिला डिग्री पासौट क्लास १९१२ साली बाहेर पडला. मेन हॉलमध्ये जो पुतळा आहे तो कॉलेजच्या दुसर्‍या डिरेक्टरचा- त्याचे नाव थिओडोर कूक. १८६५-१८९३ या काळात तो गव्हर्नर होता. २००८-०९ साली सध्या कॅनडात असणारा त्याचा पणतू की खापरपणतू सीओईपीत आला होता तेव्हा त्याच्याबरोबरच्या मेलामेलीत काही रोचक जुने फोटो हाती लागले.

सीओईपीचे जुने आवार अ‍ॅग्रिकल्चरल कॉलेजपर्यंत होते असे सांगतात. तिथपर्यंतचा सगळा भाग कॉलेजचाच होता. होस्टेल मात्र १९०८ साली बांधण्यात आले. सर्वांत जुना सी ब्लॉक, बाकी मग सगळे १९४०-५० साली बांधण्यात आले- अपवाद आय ब्लॉकचा. तो ८० च्या आसपास कधीतरी बांधला असे सांगतात.

असो. या निमित्ताने "हिस्टरी क्लब सीओईपी" निमित्ताने केलेल्या अनेक उपद्व्यापांचे स्मरण झाले हेही नसे थोडके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्स - मला अंदाजे माहीती होती. १८५६ लिहीले कारण १८५७ च्या बंडा आधी कॉलेज काढले होते असे लिहायचे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सीओईपीचे जुने आवार अ‍ॅग्रिकल्चरल कॉलेजपर्यंत होते असे सांगतात.

सीओइपीच्या नावाचा एक माळ देखिल आहे. पण तो संलग्न नाही. तो नक्की कुठे आहे आठवत नाही पण एकदा तिथे सिविल इंजि च्या असाईनमेंटसाठी घेऊन गेलेले.
(वास्तविक पुण्याच्या दिशा मला कधीच कळल्या नाहीत. सगळं कोनात आहे. पुणे -मुबई रस्ता पूर्व -पश्चिम आहे पण तो देखिल ३० डीग्राने तिरका असावा. कारण मुंबई उत्तरेला आहे. शिवाय तो रस्ता इतका वळणावळणाचा आहे कि कुठेही थांबून ही दिशा असे म्हणता येत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सीओईपीचा माळ? अन असाइनमेंट? यू मीन डंपी लेव्हल & ऑल? आम्हांला तर ती मेन हॉलच्या मागच्या रस्त्यावर उभी करून दाखवलेली ती पण लांबूनच.

हा माळ कुठे आहे ते आता बघणे आले........अ‍ॅल्युम्नी सेलमध्ये १९१८ पासूनची म्यागेझिन्स आहेत. तिथे हा उल्लेख कै दिसला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बसने जावे लागलेले असे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ओह अच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आम्हांला तर ती मेन हॉलच्या मागच्या रस्त्यावर उभी करून दाखवलेली ती पण लांबूनच.

मेन हॉल कुठे आहे? तिथे लोक काय करतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आईच्या गावात. धन्य _/\_

अजो, सीओईपीत शिकून तिथला मेन हॉल माहिती नाही? हे म्हणजे:

१. शेरलॉक पाहून/वाचून बेकर स्ट्रीट माहिती नसणे.
२. मराठ्यांचा इतिहास वाचून शनवारवाडा माहिती नसणे.
३. आग्र्यात राहून ताजमहाल माहिती नसणे.

अहो महाराज, ती डायरेक्टर्स केबिन, स्टुडंट सेक्शन, व मेन हपिसे कुठल्या दगडी इमारतीत आहेत?????????????????? तोच तो मेन हॉल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आम्हाला पण सर्व्हेइंग चे प्रॅक्टिकल मेन बिल्डिंग आणि सिव्हिल डिपार्टमेंटमधल्या मोकळ्या जागेतच दाखवले. (तेव्हा त्या बिल्डिंगला मेन हॉल म्हणत नसत आणि प्रिन्सिपलना डायरेक्टर म्हणत नसत. ती ऑटॉनमस इन्स्टिट्यूटही नव्हती).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

(तेव्हा त्या बिल्डिंगला मेन हॉल म्हणत नसत आणि प्रिन्सिपलना डायरेक्टर म्हणत नसत. ती ऑटॉनमस इन्स्टिट्यूटही नव्हती).

पूर्वार्धाबद्दल धन्यवाद. तरी 'मेन' बिल्डिंग आहेच की Wink असो.

बाकी माहिती आहे. २००५ साली अ‍ॅडमिशन घेतली तेव्हा त्याचे नावही सीओईपी नव्हते. पी आय ई टी म्हणून होते- पुणे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग & टेक्नॉलॉजी. पुढे एफ वाय कंप्लीट झाल्यावरती अ‍ॅल्युम्नी प्रेशरमुळे परत सीओईपी असे नामकरण करण्यात आले. तेव्हा मेस समोरच्या स्टोअरमध्ये नवीन शिटा विकत आलेल्या होत्या ते आठवतेय अजून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ती मेन बिल्डींग, मेन हॉल नव्हे. आम्ही बाहेरून पाहायचो आणि तुम्ही आतून पाहायचा असे वाटते!!! आमच्या काळात तो हॉल प्रत्यक्ष फार अंधारलेला असे. उन्हाळ्यात फार थंड असे. त्याच्या भिंतीला बाहेरून काळे घट्ट तेल चोपलेले होते आणि ते हाताला चिटकत नसे हे मला फार आवडायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हो बरोबरे. पण "आमच्या वेळी" कैकजण मेन हॉल असेच म्हणायचे. मेन बिल्डिंग हा क्वचितच ऐकलेला शब्द. ते एक असो. आमच्या वेळीही तो अंधारलेलाच असे मोस्टलि, परंतु काही दिवे होते. आता रोषणाई वाढवलेली आहे जरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सीओईपी मेन बिल्डिंगवर दगडात कोरलेले वर्ष आहे. ते १८५४ आहे असे वाटते. २००४ मध्ये सेस्क्विसेंटेनिअल इअरच्या कार्यक्रमाला गेलो होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दगडात कोरलेले वर्ष आहे ते १८६५. ११ ऑगस्ट आहे बहुधा (की ५ ऑगस्ट?)

पण स्थापना १८५४ सालची हे नक्कीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओ, नॉन सीओईपीअन्स.... माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर कोण देईल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पुण्यातल्या इतर कॉलेजात उदा. फर्ग्युसन अशीच पद्धत होती.

खरय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

मी ११-१२वीत सप मध्ये होतो. आमचे सगळे तास वेगवेगळ्या कक्षांमध्ये व्हायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे ना?

थोड्या शिक्षकांनी फिरण्याऐवजी १०० विद्यार्थ्यांनी फिरायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नाही. उलट कॉलेजात फिरता फिरता इतर गमती जमती दिसायच्या. कंटाळा आला तर कल्टी मारता येते विनासायास. एकाच वर्गात तास असतील आणि दुसरे शिक्षक आधिचा तास संपायच्या आधीच हजर असतील तर त्यांच्या समोर वर्गातून कटणं अवघड असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

होय होय जरा पाय मोकळे करुन, फ्रेश व्हायची सुवर्णसंधी असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

आमच्या कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात एकाच वर्गात सगळे तास व्हायचे. वेगळे डिपार्टमेंट वगैरे भानगड फारशी नव्हती. Wink
आत्ताच्या कॉलेजात (आयसर पुणे) बॅचच्या सगळ्यांना समान विषय होते तोपर्यंत सगळे तास एकाच वर्गात व्हायचे. नंतर विषयवार वेगवेगळ्या वर्गात, पण एकाच इमारतीत व्हायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुइया, रुपारेलमध्ये अशी पद्धत होती का?

रुइयामध्ये एकाच वर्गात सर्व विषय शिकवले जात, पण इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थांना इलेक्ट्रॉनिक्सच्या विषयांसाठी वेगळ्या वर्गात (इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमध्ये) जावे लागे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

रुइया, रुपारेलमध्ये अशी पद्धत होती का?
...........११,१२ वी साठी पी.सी.एम्., पी.सी.बी., पी.सी. इलेक्ट्रॉनिक्स्, पी.सी. कम्प्यूटर्, पी.सी.एलेक्ट्रिकल मेन्टेनन्स् इ. प्रत्येकासाठीची मुले वेगळ्या वर्गात बसत कारण संख्याच तेवढी मोठी असे. मात्र ते त्यांच्या-त्यांच्या वर्गांत बसून सगळे विषय शिकीत.

बी.एस्.सी.च्या पहिल्या वर्षासाठीही तीच पद्धत होती. दुसर्‍या वर्षी, मुलांच्या संख्याबहुलत्वानुसार वर्ग ठरवले जात. उदा. पी.सी.एम् आणि पी.एम्.एस् (Physics, Maths, Statistics) वाल्यांसाठी पी. आणि एम्. हे विषय सामायिक आहेत आणि सी.वाले लोक संख्येने जास्त आहेत तर ते लोक सामायिक वर्गातच बसून राहत नि एस्.वाल्यांना एस्. शिकण्यासाठी दुसरीकडे जावे लागे. तिसर्‍या वर्षी एकच विशेष निवडलेला (उदा. एम्) विषय असे, त्यामुळे पुन्हा एकाच वर्गात बसणे होई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुनी नवी गाणी ऐकताना या गाण्याचा ताल काय असेल याबद्दल उत्सुकता असते. ही माहिती मिळण्याचा काही रिसोर्स उपलब्ध आहे का ? (इथे अर्थातच भारतीय पद्धतीची गाणी मला अभिप्रेत आहेत. उदाहरणार्थ हिंदी/मराठी सिनेमातली डिस्को गाणी इथे विचारात घेतलेली नाहीत.)

कालपरवा आशा भोसले यांचं "रवी मी" ऐकत असताना हा ताल कुठला असावा असा प्रश्न पडला होता. त्यावरून हा प्रश्न सुचला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

सहसा गाण्यांच्या नोटेशनची पुस्तकं मिळतात त्यात राग आणि ताल दिलेला असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुसु - सोप्पे उत्तर - मला विचारा.

नाहीतर थोडासा तबला शिकणे गरजेचे आहे. आणि त्याच बरोबर खुप ऐकणे. ताल कानात इतका भिनलेला पाहीजे की काहीही माहीती नसताना गाणे चालू झाले की ताल आपोपाप उमटला पाहीजे. ( पूर्वी तबलजीला कमी कींमत असल्यामुळे शास्त्रीय गायक वादक कुठला ताल आहे बंदिशीचा हे मुद्दामच सांगत नसत, तबलजीने ओळखुन वाजवायचा).

थोडा तबला शिका आणि आपला आपण ताल ओळखायला शिका.

सध्याही तुम्हाला बीट ( मात्रा ) तर कळतच असतील. तसेच सम पण कळतच असेल. ताल ओळखण्यासाठी दोन समे मधले बीट मोजा.

जनरली गाण्यांना दादरा ( ६ मात्रा ), केरवा ( ४ किंवा ८ मात्रा ), रुपक ( ७ मात्रा ) , त्रिताल ( ८ मात्रा ) , एकताल ( ६ मात्रा ), झपताल ( १० मात्रा ) , भजनी ( ४-८ मात्रा ), आद्धा ( १६ मात्रा ) एव्हडेच ताल असतात. तुमचे बीट कोणत्या तालांच्या मात्रांच्या पटीत येतात ते बघा. म्हणजे अंदाजे ताल कळेल. मग तालाचे स्वरुप माहीती असेल तर नक्की कोणता ताल कळेल.

रवि मी साठी आधा ताल आहे. १६ च मात्रांचा असला तरी वजने वेगळी असल्यामुळे त्रिताला पेक्षा वेगळा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हरहुन्नरी आहात अनु राव. तुमचे प्रतिसाद वैचारीक असतातच पण रोखठोकही असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

धन्स. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही सांगितलेल्या पद्धतीसाठी धन्यवाद !
पुढील दोन गाण्यांत किती मात्रा येतात ते कृपया सांगाल का ? माझ्या हिशेबाशी ताडून पाहायचे आहे.
'जा रे जा, मैं तोसे, ना बोलूं' आणि 'आँखों से क्या, इस दिल से पूछो जरा'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जा रे जा, मै तोसे ना बोलू - दादरा आहे ६ मात्रांचा.

आंखोसे क्या ... हे गाणे माहीती नव्हते, यु ट्युब वर आखॉमे क्या हे समलानचे गाणे सापडले. तेच तुम्हाला म्हणायचे असेल तर ते गाणे ५/१० मात्रांच्या पटीत आहे. १०,२०,३० मात्रांवर सम आहे. चमत्कारीक ठेका आहे पण कोडे म्हणुन छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आंखोमें क्या' हेच गाणे म्हणायचे होते. टंकताना में चा से झाला.
धन्यवाद. माझं गणित चुकतंय. बहुधा 'सम' म्हणजे काय ते मला नीट कळाले नसावे. पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुराव यांनी "आँखोमें क्या" या गाण्याची सम दाखवण्याचा एक डेमो युट्युबवर टाकावा नि इथे द्यावा. Smile

अवांतर : हे म्हणजे आम्हा पामरांना आमची जागा दाखवण्यासारखं आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

ताल धरला असे म्हणतात तेव्हा पुल्लिंगी शब्द असावा असे वाटले.
------------
ते एक असो, तालांना नावे देखिल असतात हे पहिल्यांदा ऐकले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अवांतर - रुपक ताल हा भारतीय संगीताने जगाला दिलेली अप्रतिम देणगी असावी असे माझे मत आहे. रुपक ७ मात्रांचा असतो आणि जगात कुठे अश्या ऑड बीट चा ताल असेल असे वाटत नाही. तीच केस झपतालची ( १० मात्रा म्हणजे पुन्हा ऑड ).

रुपक असा अर्धवट ७ मात्रांचा असुन त्याची काय मजा येते. कीती सुंदर गाणी रुपक मधे बसवली आहेत जसे शुक्रतारा मंदवारा

झपतालात तर फारच कमी असतात पण एक लगेच आठवते आहे ते म्हणजे आसु भरी है जीवन की राहें

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुगम संगीत बहुधा दादरा (६), रुपक (७), केरवा/अध्धा/त्रिताल (८/१६) एवढ्यावरच थांबते. झपताल कधी कधी.

रुपक मधे चटकन आठवलेली काही गाणी - आपकी नजरों ने समझा, पिया तोसे नैना लागे रे, इशारों इशारों में दिल लेने वाले, चंद्रिका ही जणू (हे रुपक आणि त्रिताल/अध्धा दोन्हीत गातात), मम सुखाची ठेव वगैरे वगैरे.

बादवे आपला रुपक ७ मात्रांचा आहे. कर्नाटकी रुपक (किंवा रुपकम्) ६ मात्रांचा आहे (काहींच्या मते ३ मात्रांचा).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बावरा मन देखने... देखील रूपक मधले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

प्रस्तुत धाग्यामार्फत अनुरावांनी आम्हाला खिशात टाकलेले आहे हे आम्ही जाहीर करून टाकतो आणि अनुरावांना जोरदार दंडवत ठोकतो. जियो.

अनुराव, तुम्ही सांगितलेल्या सूचना पाळायचा यत्न करतो नक्की.

आता पटकन सुरेश वाडकरांच्या "धरिला वृथा छंद"चा ताल पण सांगून टाका Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

Smile

"धरिला वृथा छंद" चा ताल भजनी आहे. जनरली बर्‍याच भजनांना हाच ठेका असतो.

अजुन अवांतर : "रवि मी" वसंतराव दिपचंदी तालात ( १४ मात्रा) पण गायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'रवि मी' बहुधा मास्टर दीनानाथही रुपक/दीपचंदी मध्ये गायचे, म्हणूनच वसंतरावही गायचे. फॉर द्याट म्याटर मानापमानातल्या मूळ गंधर्व कंपनीच्या बर्‍याचशा चाली/ताल बलवंत कंपनीत बदलल्या गेल्या. काही ठळक उदाहरणे - चंद्रिका ही जणू (गंधर्व कंपनीत हे गाणं अध्धा तालात गायले जायचे, मा. दीनानाथ रुपक तालात गायचे), प्रेम सेवा शरण (गं.कं. - भीमपलासातली चाल, मा.दी. - मुलतानीतली चाल), रवि मी (चालीत किंवा तालात फरक आहे, नक्की पाहून सांगतो), भाळी चंद्र असे धरिला (चालीत फरक. मूळ गं.कं.ची चाल ओवी किंवा जात्यावरच्या गाण्यासारखी आहे, ते मा.दी.नी थोडा फरक करून अजून तेज केली - इति वसंतराव). जिज्ञासूंनी वसंतरावांच्या 'मराठी नाट्यसंगीताची वाटचाल' या कार्यक्रमाचे ३३० मिनिटांचे भले मोठे रेकॉर्डिंग आहे ते ऐकून पहावे. पैकी मा. दीनानाथांनी गायलेली/त्या चालींमधली 'प्रेम सेवा शरण' आणि 'रवि मी' ही पदे आज जास्त लोकप्रिय आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यु ट्युबवरती रसभंग करणार्‍या ज्या भरमसाठ जाहीराती असतात, त्यांचे पैसे, कोणाला मिळतात? - ज्या व्यक्तीने व्हिडीओ टाकला त्याला की यु ट्युबला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

प्रश्नाचे उत्तर माहीत नाही. पण युट्युब अॅड ब्लॉकर वापरा, रसभंग बराच कमी होईल असे सुचवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. नक्की करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

अत्यंत मंजूळ आणि लांबलचक (३० मिनिटे प्लस) सितारवादन ऐकायचे असले तर कोणते, कोणाचे ऐकावे? नुसते वाद्यसंगीत हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उस्ताद विलायत खांसाहेबांची सतार ऐका. छान आणि गोडगोड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुजात हुसैन खान-
बाझीचा-ए-अतफाल - https://www.youtube.com/watch?v=uH0TlI90iXo .........स्वर्गीय
छप तिलक सब छीन ली - https://www.youtube.com/watch?v=hSOEQjMT738 ......... आहाहा!
मै तो पिया से नैना - https://www.youtube.com/watch?v=LPvtpXtv0Lg ........गोड

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

युट्यूबवर व्हिडिओ मिनिमाईज केला तर कमी मेमरी डाउनलोड होते का? म्हणजे फक्त गाणे ऐकण्याने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

युट्यूबवर व्हिडिओ मिनिमाईज केला तर कमी मेमरी डाउनलोड होते का?

नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धरणाचा जोता म्हणजे काय? पाणी जोत्याखाली गेले म्हणजे नक्की काय झाले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जोता म्हणजे प्लिंथ?

पाणी जोत्याखाली गेले म्हणजे बहुधा पाण्याची पातळी खूपच कमी झाली, असे असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जोते या शब्दाचे दोन अर्थ इथे आहेत.

http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%9C%E0%A5%...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित धरणाच्या बांधीव भिंतीच्या खाली असा अर्थ असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केशकर्तनालयात (म्हणजे सलूनमध्ये) मुख्य श्मश्रू , क्षौरकर्म (म्हंजे दाढी-कटिंग ) वगैरे झाल्यावर बगलेतले केस काढायला खूपदा सांगितलं जातं.
तेही वस्तर्‍यानच काढले जातात, कात्रीने नाही.
मग ते दाढीसारखे कडक का होत नाहित ?
माझ्या माहितीप्रमाणे दाढी सुरुवातीला कोवळी असते (नवीन आलेली, बोकड दाढी) ; पण पुनः पुनः वस्तर्‍यानं काढल्यानं ती कडक होते.
मग काखेतले/बगलेतले केसही कडक अथवा जाड व्हायला हवेत ना.
ते कसे काय साध्या केसांसारखे राहतात ?
.
.
उत्क्रांतीने माणसाचे चांगले/भले होत असेल तर उत्क्रांती होत होत केस गळण्याच्या कटकटीपासून सुटका व्हायला हवी ना.
डोक्याच्या सुरक्षेसाठी भरघोस केस असणं केव्हाही चांगलच. (शीख पगडी वापरतात; ती हेल्मेटसारखे डोक्याच्या रक्षणाचे काम करते. )
मग हा फ्याक्टर निसर्गाने का सोडून दिलेला असावा ?
.
.
ह्याउलट शरीरातील इतर काही महत्वाच्या ठिकाणी केस नसणं जास्त फायद्याचं ठरु शकतं नाही का;
काही विशिष्ट ठिकाणी केस नसणं आकर्षकतेत भर घालू शकत असेल तर उत्क्रांतीदरम्यान ते फीचर दुर्लक्षिलं का जातं ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग काखेतले/बगलेतले केसही कडक अथवा जाड व्हायला हवेत ना.
ते कसे काय साध्या केसांसारखे राहतात ?

.
दाढी किमान काखेतल्या केसांइतकी (वा अधिक) वाढवा. चांगली मऊ सूत होईल

उत्क्रांतीने माणसाचे चांगले/भले होत असेल तर उत्क्रांती होत होत केस गळण्याच्या कटकटीपासून सुटका व्हायला हवी ना.

केस गळणे/पांढरे वगैरेत वाईट काय आहे? माझ्या मते हा मुळात डिफेक्ट नाही (फक्त विविध प्रकारांपैकी एक प्रकारची 'केशीय प्रवृत्ती' आहे Wink ) त्यामुळे त्याला क्युअर करणे किंवा त्यापासून "सुटका" वगैरे गैरलागू ठरते.

काही विशिष्ट ठिकाणी केस नसणं आकर्षकतेत भर घालू शकत असेल तर उत्क्रांतीदरम्यान ते फीचर दुर्लक्षिलं का जातं ?

आकर्षकता सापेक्ष आहे. स्थळ, काल, व्यक्ती, प्रसंग व उपयोगिता या इतक्या पातळीवर सापेक्ष गोष्ट "गरजेची" कशी ठरेल आणि उत्क्रांत का होईल?

.--मनोबा
(मनोबांचा हा प्रतिसाद्-ओन्ली आय डी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्क्रांती आता कसं वाट्टंय आता कसं वाट्टंय असं म्हणत होत नसते. नाव उत्क्रांती असले तरी उत्क्रांती, अधःक्रांती, बाजूक्रांती, हीदिशाक्रांती, तीदिशाक्रांती अशी सर्वच असते. उत्क्रांतीमधे सर्व उत्तम होते वा झाले आहे असं वाटत असेल तर तो शुद्ध गैरसमज समजावा. असं संभव आहे कि आपण आपल्यालाच गैरसोयीचे ठरावे असे चिकार गुण, दुर्गुण आणि उणिवा घेऊन निर्माण होतो आणि हे ही संभव आहे कि त्या पिढीगणिक वाढल्या आहेत.
=============
थोडके में - Utkranti is not liable (बांधील) and responsible (मंजे कारणीभूत नव्हे, रिस्पॉन्सिबल मंजे जबाबदार) for your welfare.
=======================
(मनोबा, हे शुद्ध स्वगत आहे. Please don't read into it something I don't mean to mean) केशसमस्यांमुळे थेट उत्क्रांतीला वळसा घालून यायचे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>माझ्या माहितीप्रमाणे दाढी सुरुवातीला कोवळी असते (नवीन आलेली, बोकड दाढी) ; पण पुनः पुनः वस्तर्‍यानं काढल्यानं ती कडक होते.
मग काखेतले/बगलेतले केसही कडक अथवा जाड व्हायला हवेत ना.
ते कसे काय साध्या केसांसारखे राहतात ?

जाड ठसा माझा.
असे प्रत्येक तरुण मुलाला सांगितले जाते पण ते खरे नसावे/नाही. विशिष्ठ भागातले केस राठ होतातच.

मी अगदी अलिकडेपर्यंत मिशी ठेवत होतो. दाढी मात्र रेग्युलरली करत होतो. वर्ष दीड वर्षापूर्वी मिशी काढली तोपर्यंत मिशीच्या भागात कधीही ब्लेड/वस्तरा लागलेला नव्हता. कात्रीने फक्त ट्रिम करत असे. पण मिशी काढली तेव्हा मिशीचे केस दाढी इतकेच राठ होते. आणि ओठावरचा मिशीचा भाग तितकाच रफ होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एक हास्यास्पद विचार ऐका.
सध्या बलात्कार हा विषय चर्चेत असणे याचे कारण हिलरी क्लिंटन या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की कोणी अन का दिलेत ५ स्टार?
वरील प्रश्नाशी निगडीत नसलेला प्रश्न - स्वतःच्या लेखाला स्वतः स्टार देण्याची सुविधा बंद करता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

एकोळी धाग्याच्या बंदीचे काय झाले ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही बातमी ऐकली का या सिरीजला मनातले छोटे मोठे विचार आणि प्रश्न ही सिरीज उशिरा सुरु होऊनही चांगले कंपिटिशन देत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कोणाची आयडीया होती ही? मन? ऋ? की अन्य कोणी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

अन्य कोणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>मनातले छोटे मोठे विचार आणि प्रश्न

ही नक्कीच मनोबांची आयड्या असणार, नाही का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरूण-अल्-जोशी(द) आडून आडून सुचवू र्‍हायले की ही त्यांचीच ऐड्या आहे. आणि सगळे कुणाकुणा भलत्याचीच नावं घेतेत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ह्याला अशा धाग्यांचा संपादकांकडून कचराकुंडीसारखा होणारा वापर जास्त कारणीभूत असावा असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजिबात नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

(१) एखाद्या व्यक्तीला आपण "जज" करतो मग भले अथवा बुरे काहीही, तेव्हा आपला फायदा किती होतो अन तोटा किती होतो? म्हणजे सरासरी.
(२) रस्त्यावरचे लोकही आपण उगाचच जज करत नसतो का? कपड्यांवरुन, चेहेर्‍यावरच्या तजेल्यावरुन, चेहेर्‍यावरील भावांवरुन. त्यामधुन काय मिळतं की ती एक प्रतिक्षिप्त क्रिया असते , अंगवळणी पडलेली.
(३) जितके जज करु तितके आपण जजमेन्टच्या कौशल्यात निपुण होतो का?
(४) अति जजमेन्ट अन अगदी नो जजमेन्ट यामध्ये आपण कुठेतरी असतो. हे अतिरेक वाईटच. असल्यास का, नसल्यास का नाही?
(५) जजमेन्ट मुळे आपण सुरक्षित किती रहातो अन दु:खी व एकलकोंडे, पॅरेनॉइड किती होतो?
(६) आपल्याला कोणी वाईट जज केले तर किती दु:ख होते आपल्याला, मग तेच इतरांसाठीही खरे असणारच. का नाही आपण काळजी घेत मग?

मी चालत होतो रस्त्यातून अनवाणी
डोळ्यात माझियां म्हणून आले पाणी
रडणेच संपले परंतू माझे जेव्हा
पाहीला मी माणूस, पायच नव्हते त्याला.

या चारोळीमध्येही जजमेन्ट आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

काही वर्षांपूर्वी सकाळमधे बातमी वाचल्याचं आठवतं, की पुण्यात स्वयपाकघरातल्या सांडपाण्याचा बागकामासाठी स्वच्छ करून पुनर्वापर करण्याचे पुण्यात यशस्वी प्रयत्न झाले आहेत. नीट आठवत नाही, पण पूर्ण सेटप करून देणार्‍या एका छोट्या कंपनीचा ही उल्लेख होता. या बद्दल कोणी काही माहिती देऊ शकेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हिडिओ प्ले करताना, उदा यूट्यूबवर, ग्रे स्ट्रीप किती डाउनलोड झाला आहे ते दाखवते, लाल स्ट्रीप किती गाणे प्ले झाले आहे ते दाखवते. पण त्या पट्टीवर कधी कधी पिवळे ठिपके असतात, ते कशाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्या पिवळ्या ठिपक्यापर्यंत लोड झाले की तिथे एक अ‍ॅडव्हर्टाईझमेंट असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पिवळ्या ब्यांडला जाहीरात आहे हे दर्शवण्याकरता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

सहजच मनात आलेले प्रश्न:
* आजकालचे पालक आपल्या पाल्यांना सेक्स एज्युकेशन देतात का? कोणत्या वयात?
* शाळकरी प्रेमप्रकरणं कशी हँडल करतात? करावीत?

व्यक्तीशः मला वाटतं की १८+ होइपर्यंत मुलांनी सेक्शुअली अॅक्टीव न झालेलं बरं. यामागे शारीरीक, मानसीक वाढ पुर्ण झालेली नसते या कारणापेक्षा त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होइल ही भिती जास्त आहे. जर तसं होणार नाही याची खात्री मिळत असेल तर साधारण १५ एक वय ठीक आहे आपापल्या वयाच्या रेंजमधल्यांसोबत सेफ सेक्ससाठी. अर्थात याबाबतीत कायदा सुटेबल नाहीचय पण तरी...
मराठी आंतरजालावर याविषयी चर्चा झाली आहे का याचा शोध घेताना www.maayboli.com/node/43577 हा एक धागा सापडला. इतर काही चर्चा माहीत असल्यास त्याच्या लिंक किंवा तुमची स्वतःची मते ऐकायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

* आजकालचे पालक आपल्या पाल्यांना सेक्स एज्युकेशन देतात का? कोणत्या वयात?

द्यायला हवे असे मानून चॅप्टर क्लोज करू. १०-११ व्या वर्षी सुरुवात केली पाहिजे.
---------------------
पालकांकडून किती सिलॅबस शिकवणे अपेक्षित आहे? आणि तो एका निवांत दुपारी वैगेरे वैगेरे न शिकवता आयुष्यभर आस्ते आस्ते शिकवायचा असतो का?
=======================

* शाळकरी प्रेमप्रकरणं कशी हँडल करतात? करावीत?

मला वाटतं हे प्रचंड किचकट प्रकरण आहे. काही करू देणं योग्य का अयोग्य हेच मूळात कळत नाही. वर हँडल करायला आपलं, नियंत्रण, वेळ, देखरेख तितकी आहे का नाही हे कळत नाही.
याची काहीतरी द्यायची म्हणून उत्तरं दिली आणि काही करू दिलं नाही तर काहीच्या आसपासचं करण्यात पोरं १० पट वेळ घालतात. काही करू दिलं तर त्याच्यापेक्षा पुढचं करायला पाहतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माबोवर नुकताच http://www.maayboli.com/node/53208 हा धागा आला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या ओळखीत कुणाला तरी मराठीत नवा ब्लॉग सुरू करायचा आहे. हा ब्लॉग अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा ह्यासाठी http://marathiblogs.net/ सारख्या मराठी ब्लॉग सिंडिकेट्सचा कितपत फायदा होतो? ज्यांचा फायदा होतो अशी तत्सम इतर ब्लॉग सिंडिकेट्स कोणती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

http://marathiblogs.net/ वरून बर्‍यापैकी लोक येतात.
दुसर्‍या मला ठाऊक असलेल्या साइट्स blogkatta.netbhet.com आणि www.blogadda.com.
फेसबुकावरूनही लोक येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धन्यवाद. ती साईट (http://marathiblogs.net/) कुणी मेंटेन करतंय का? कारण मी हा सल्ला दिला खरा, पण त्यामुळे मलाच तोंडघशी पडल्यासारखं झालं : त्यांच्या सूचनांनुसार ब्लॉगकर्त्यानं त्यांचं विजेट आपल्या साईटवर लावलं. ते दिसतं आहे. त्याला आपल्या 'मराठी ब्लॉग्ज'वरच्या सदस्य खात्यात असा संदेश दिसतोय की तुमच्या सदस्य खात्याशी हा ब्लॉग जोडला गेला आहे. पण त्यांच्या जोडलेल्या ब्लॉग्जच्या यादीत तो दिसत नाही. त्यामुळे अर्थात त्याच्या ब्लॉगवरच्या नोंदी तिथे येतच नाहीएत. त्यानं साईटशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण त्यांचं काहीच उत्तर नाही.

असो. दुसरे पर्याय वापरून पाहायला सांगतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काय की. विजेट जोडल्यापासून ब्लॉग दिसायला लागेस्तोवर मधे काही दिवस जात असत, हा साधारण ६ वर्षांपूर्वीचा अनुभव. पण तिथली ब्लॉगयादी अपडेटवलेली नाही, हे दिसतंच आहे. तसंच संपर्क साधल्यास काहीही उत्तर मिळत नाही, हाही अनुभव २-३ वर्षांपूर्वीपासूनचा आहे. पण तिथून अजूनही लोक येत असतात, हे मात्र खरं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मलाही मागे हीच अडचण आली होती. त्याविषयी मी संपर्कही केला होता, पण मलाही कोणते उत्तर आले नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

गूढ, रहस्य, हॉरर कथा वाचण्यासाठी हव्या आहेत कुठे सापडतील ते सांगावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंग्लिश की मराठी? फुकट की विकत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मराठी/हिंदी/इंग्लिश

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्पा यांनी काही कथा लिहील्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

ऐसी वरचे प्रतिसाद वाचत रहा. बरेसचे गुढ आणि रहस्यमय असतात.
गब्बरचे फडतुसांना जाळुन टाका वगैरे वाचुन तुम्हाला हॉरर वाचल्याचा अनुभव मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय ओ ? मी काय नारायणराव धारप वाटलो काय ???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोण कोण मॅच बघतं? कोण बघत नाही??

बघत असल्यास का बघता आणि नसल्यास का बघत नाही??

आधी बघत होतो आणि नंतर सोडून दिले असे होते काय??

अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या भविष्यात उगाचच सोडून देउ शकता??

मॅच न बघता स्कोर बघणे आवडते काय??

क्रिकेट सोडल्यास कोणकोणते खेळ पहाता??

फूटबॉल पहात असल्यास चेल्सी किंवा लिव्हरपूल असा कोणाला सपोर्ट करायचा ते कसं ठरवता??

असा सपोर्ट सगळीकडेच अ‍ॅप्लीकेबल असतो काय? म्हणजे मला नानासाहेबापेक्षा रघूनाथराव पेशवा जास्त आवडतो असं म्हणलं तर ते व्हॅलीड आहे काय?

सपोर्ट न करता खेळ पाहू शकता का??

तेंडूलकर मुंबईच्या टीम मध्ये नसता आणि तुम्ही समजा मुंबईत रहाता तर तेंडूलकरच्या टीमला सपोर्ट केला असता का मुंबईच्या??

मॅच बघायला रजा काढू शकता का??

मॅच बघणे , लै भारी शिनेमा बघणे, नाटक बघणे आणि उत्तम गायकाला लाईव्ह ऐकणे या पैकी एक ठरवायचे आहे. काय निवडाल??

चिकन खाणार्‍यांना - चिकन सोडून दे आणि पुढच्या दहा मॅच ची तिकीटे घे.

चि.न.खा.- चि.खा आणि पु.द.मॅ.ति.घे. अशा छापाच्या ऑफर्स ना कितपत प्रतिसाद द्याल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मॅच चालू आहे असे कळ्ळे नि त्यात भारत असला तर बघतो.
-----------------
त्यात भारत असला तरच.
-------------
वन साइड झाली कि मधेच सोडतो. चांगला पिक्चर असला तरी सोडतो.
--------------
मॅन न बघता स्कोर? अज्जिबात नै. आजच्या घडीला तरी टीवीवरच (कमेंटरी समजत नाही. बॉल चांगला कमेंटेटर म्हणाला म्हणून चांगला. हे चूक केलं तर ते चूक. ते बरोबर तर ते बरोबर. खासकरून अगोदर बॉलिंग घेतली तर ते बरं केलं वाईट यावर मतांतर झालं नि चर्चा झाली तर ... आमचं कै मत नसतं). लेमॅनला आवडेल असा क्रिकेट टीवीवर पेश करतात. एच डी टीवीवर तर धम्माल!!!
-------------------------------
मुलगा, बायको, मित्र, नातेवाईक सोडून काही सोडू शकतो.
----------------
आनंद असला तर चेस बघतो.
---------------------------
क्रिकेट आणि चेस दोन्हीत, प्राथमिक प्रतलाच्या वर, काय चाललं आहे ते मला अजिबात कळत नाही. सोबतीला ज्ञानी, रुचीवंत असले तर मग जास्त मजा येते.
-------------------------
कोणत्याही अभारतीय टिमबद्दल भावना नाहीतच. पण फूटबॉल कप मधे इराण जिंकावा असे वाटले. अजून एक कंचीतरी आफ्रिकन टिम पण फार आवडली.
-----------------
मला तेंडल्या आणि मुंबई दोघेही आवडत नाहीत.
-------------------------
हाफिसात पायजे तेवड्या मॅच पाहू शकतो. रजेची गरज नाय.
-------------------
शास्त्रीय संगीत ऐकायला आवडेल. (वोकल फार वेळ सहन करू शकेल असं वाटत नाही). इंस्ट्रूमेम्टल. अजून असं कधी झालं नाही म्हणून.
-----------------
चिटींग करायची.
===================================================
फारच अवकाळी प्रश्न विचारलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला तेंडल्या आणि मुंबई दोघेही आवडत नाहीत.

ह्या वर एकमत आपले अजो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या ’मैत्रीपूर्ण’ नात्याचा उलगडा मला एका क्षणात झाला, अजो! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुमची (मेघनाची) नि माझी (अजोंची) पहिलेपासूनच मैत्री आहे असा माझा समज होता. पण ती आहे हे तुम्हाला आज कळले हे विचित्र वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अहो, मस्करी करीत आहे. माझं सचिनप्रेम जगजाहीर आहे, म्हणून! चिल माडी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

I wanna restore our frenship. Not that I don't like that chap. But when you say I like Sachin people think you like a real lot. Like mad, you know. And that is not the case. I like him a little bit, just like any other player, and it is not that that I don't like him and if there is something that I really don't like about him, it is that people like him a lot more than necessary.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सचिनच्या बाबतीत ही अडचण अनेकांची होते. पण लोक कसे वागतात, यामुळे सचिनच्या गुणावगुणांत फरक का बरं पडावा? हे अन्यायाचं नाहीये का? उद्या मी म्हटलं, मोदी तसा वाईट गृहस्थ वाटत नाही, पण लोक जो काही उदो-उदो करतात त्यामुळे तो डॉक्यात जातो, तर? मला मोदीबद्दल जे काही वाटतं, त्याचा आधार त्याचं स्वत:चं वागणं हाच असायला हवा. लोकांचं वागणं नव्हे.
अर्थात, हे सांगणं जितकं सोपं आहे तितकं आचरणात आणणं सोपं नाही, मान्य आहे.
माधुरी दीक्षित ही तशी नटी म्हणून वाईट नाही. नर्तकी म्हणून उत्तम आहे. दिसायला नि हसायला मधाळबिधाळ आहे (होती). पण लोक तिच्यावर जे काय प्रेम करत असत... काही वर्षांपूर्वी तर माधुरी दीक्षित न आवडणे हा एक गुन्हाच होता. त्यानं चिडचिड होत असे. (टिंकूची बहुतेक तशीच मधुबालाबद्दल होते! :प) पण त्याच सुमारास कधीतरी ’दिल तो पागल है’मधे माधुरीनं केलेला ड्रमबीट्सवरचा नाच पाहिला आणि मला तो खूप आवडला. भूमिका आचरटच होती, पण तो नाच सहज-सुरेख-मनापासून होता. मग लोकांना ती आवडते या एका कारणासाठी तिचा राग करणं जरा कमी झालं. लोक काय... वायझेडच असतात. त्यासाठी...
तसंच एक मित्र म्हणे, अनुराग कश्यपच्या सिनेमातली हिंसा आवश्यक आहे हे मान्य. पण प्रेक्षक त्यासाठी अजून तयार नाहीत, म्हणून त्यानं सिनेमा बनवता कामा नये. अरे? कलाकार कसा थांबेल लोकांसाठी? लोक काय... वाय.... Biggrin

असो. मैत्रीबद्दलच्या तुमच्या भावनांबद्दल मला आदर आहे हे सांगायला नकोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रतिसाद आवडला...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आर्र्र च्या मारी एवढच ना मग असं म्हणा की मला सचिन ठीकठाक वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

>>तेंडूलकर मुंबईच्या टीम मध्ये नसता आणि तुम्ही समजा मुंबईत रहाता तर तेंडूलकरच्या टीमला सपोर्ट केला असता का मुंबईच्या??
मॅच बघायला रजा काढू शकता का??
मॅच बघणे , लै भारी शिनेमा बघणे, नाटक बघणे आणि उत्तम गायकाला लाईव्ह ऐकणे या पैकी एक ठरवायचे आहे. काय निवडाल??

पहिल्या प्रश्नाविषयी....
पूर्वी सिद्धी "डबल ताकत सिमेंट" नावाचे सिमेंट होते. त्याच्या "डबल ताकत" शब्दावर एम आर टी पी ने आक्षेप घेतला. त्यावेळी सिमेंट डबल ताकत आहे असा आमचा दावा नाही. उत्पादनाचे नाव डबल ताकत सिमेंट आहे असा दावा कंपनीने केला.
तसेच मुंबई इंडियन हे टीमचे नाव आहे. मुंबई शहरशी तिचा काही संबंध नाही.

मॅच बघायला सुट्टी कधीही घेतली नाही. मॅच बघायला मैदानात कधीच जाणार नाही.

मॅच बघणे याला जी ऑप्शन दिली आहेत ती त्याहून बिनकामाची आहेत. त्यामुळे (क्रिकेटची*) मॅच बघणेच निवडेन.

*क्रिकेटच्या मॅचमध्ये आम्ही २०-२० धरत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0