आयसिस = "धर्मोध्दारक भाईबंदांचे बंड" (इखवान)
https://www.yahoo.com/news/suicide-blast-outside-prophets-mosque-111719…
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे जिथे दफन झाले आहे त्या मशिदीशेजारीच बॉम्ब ब्लास्ट घडवून (4 + 1 ठार) आयसिस ने दहशतवादाचीच नाही तर मुस्लिम जगतात पाठिंबा घालविण्याचीही एक नवी पायरी गाठली आहे . 'या लोकांच्या दृष्टीने काहीही पवित्र नाही" अशी मुस्लिम जगतात प्रतिक्रिया आहे .
आयसिसची "धर्मोध्दारक भाईबंदांचे बंड" (इखवान) अशी एक प्रतिमा सुन्नी मुसलमानात आहे . पाश्चिमात्य आधुनिकतेच्या नादी लागलेल्या सौदी सत्ताधारक परिवारास खलास करून , मक्का , मदिना जिंकून ते परत शुद्ध इस्लामची पुनर्स्थापना करतील असा त्यांच्या पाठिराख्यांचा विश्वास आहे . पण आयसिसचे खरे , अंतिम ध्येय जर मक्का-मदिना असेल, तर त्याच देशातली माणसे मारून लोकांचा पाठिंबा गमावणे ही मूर्खतेची हद्द मानवी लागेल !
दाबिक - आयसिसचे अधिकृत इंग्रजी मासिक
आयसिसचे विचार त्यांच्याच शब्दात वाचायचे असतील तर 'दाबिक' नावाचे त्यांचे मासिक वाचा. त्याचे आतापर्यंतचे सर्व १४ अंक येथे पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत.
ह्या अंकांमधून वेळोवेळी आयसिसने जगभर घडवून आणलेले दहशतवादी हल्ले, कैद्यांचे शिरच्छेद, त्याना जाळून मारणे, जिंकलेल्या मुलखातील अ-मुस्लिम स्त्रियांना लैंगिक गुलाम म्हणून ठेवणे अशा, अन्य जगाच्या दृष्टीने घृणास्पद, गोष्टींचे इस्लामच्या दृष्टिकोनातून समर्थन केलेले आढळते. चारापर्यंत बायका आणि हव्या तेवढ्या रखेल्या ठेवणे हे कसे कुराणमान्य आहे हेहि एका अंकात वाचायला मिळाले.
जगाचा कारभार कसा चालावा हे कुराणात आधीच लिहून ठेवलेले असल्याने (शरियाचा कायदा आणि त्याची अंमलबजावणी करणार एक खलिफा) दुसर्या सर्व प्रणाली - उदा. लोकशाही - ह्या पाखंडी आहेत. ह्या नियमाने सर्व लोकशाही मानणारी राष्ट्रे, तसेच सौदी अरेबियासारख्या राजशाह्या ह्या पाखंडी आहेत. अल-कायदाहि पाखंडीच आहे कारण ते आयसिसच्या खलिफाच्या झेंड्याखाली न येता आपला सवतसुभा चालवत आहेत.
मासिकाचे नाव 'दाबिक' असे ठेवण्यामागे एक श्रद्धा आहे. तिच्यानुसार क्रुसेडर्स - सर्व पाश्चात्य राष्टे - आणि आयसिसची इस्लामी शक्ति ह्यांच्यातील अखेरची लढाई, पूर्वी भाकित केल्याप्रमाणे, दाबिक नावाच्या गावात होणार आहे. हे छोटे गाव सध्याच्या आयसिसच्या सध्या ताब्यात असलेल्या भागातच आहे. ह्या लढाईत अर्थातच इस्लामी शक्तीचा पूर्ण विजय होईल आणि जितांच्या सैन्यांना इस्लाम स्वीकारणे वा मृत्युदंड हे दोनच पर्याय उरतील. त्यांच्या स्त्रिया-मुलांना गुलाम म्हणून विकले जाईल.
मला मिलिन्द्पद यांबद्दल शंका
मला मिलिन्द्पद यांबद्दल शंका आहे,
सारखं असल्याच विषयावर धागे काढत्यात अन् बाकिचे चवीने चर्वण करत्यात,कोणी प्रांजळ मते मांडत्यात,अन् कोणी मुखवटे चढवून दिखावा करत्यात.अन् प्रोटोकाॅल म्हणून दिखावेवाल्यांना मार्मिक वगैरे श्रेण्या देत्यात,अन् गंमत म्हणजे श्रेण्या देण्यारे बी त्यातलेच म्हणजे दिखावेवाले.
.
.
.
सदस्य डाव्या फुरोगामी संस्थळाचा
हा व्हिडीओ मस्त आहे.... बाकी
हा व्हिडीओ मस्त आहे.... बाकी काही बोलयचे नाही...
इसीस इस्त्रायलच्या सपोर्टने
इसीस इस्त्रायलच्या सपोर्टने उभं राहिलेलं भूत आहे अशीही एक कॉन्स्पिरसी थियरी वाचलेली आहे