Skip to main content

गणपती : वारकर्‍यांनी त्याज्य ठरविलेली एक उपदेवता !

आपल्या धर्मात अनेक अंतर्विरोध आहेत. गणेशोत्सव सुरू झाला आहे. या पाश्र्वभूमीवर अंतर्विरोधाचे उदाहरण म्हणून गणपतीविषयी लिहितो. येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, असे अंतर्विरोध अनेक देवी-देवतांच्या बाबतीत आहेत.

गणपती ही आज महाराष्ट्राची प्रमुख पूजनीय देवता असली तरी वारकरी धर्मात गणपतीला कोणतेही स्थान नाही! वारकरी धर्माच्या दृष्टीने गणपती ही एक त्याज्य देवता आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या दोन संतांची वचने पाहिली तरी गणपतीचे वारकरी धर्मातील स्थान कोणते हे स्पष्ट होईल.

भारतीय धर्मपरंपरेत कुठल्याही ग्रंथाची सुरूवात ‘श्री गणेशाय नम' या पालुपदाने होते. ‘पहिल्या वंदनाचा मान गणेशाचा' हे रूढ मत यामागे आहे. ज्ञानेश्वरीची सुरूवात मात्र ‘श्रीगणेशाय नमः' या पालुपदाने होत नाही. ज्ञानेश्वर आपल्या ग्रंथाची सुरूवात करण्यासाठी ‘ओम नमोजी आद्या' असे पालुपद वापरतात.

ज्ञानेश्वरीची नमनाची ओवी अशी :

ओम नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या ।
जयजय स्ववेंद्या । आत्मरूपा ।।१।।

संत तुकाराम महाराजांनी तर गणपतीला मद्यमांस भक्षक त्याज्य देवतांच्या यादीत ढकलले आहे. यासंबंधीचा त्यांचा प्रसिद्ध अभंग खाली देत आहे.

नव्हे जोखाई । माय राणी मेसाबाई ।।१।।
बळिया माझा पंढरीराव । जो या देवांचाही देव ।।ध्रु।।
रंडीचंडी शक्ती । मद्यमांस भक्षिती ।।२।।
बहिरव खंडेराव । रोटीसुटी साटी देव ।।३।।
गणोबा विक्राळ । लाडू मोदकांचा काळ ।।४।।
मुंज्या म्हैशासुरे । हे तो कोण लेखी पोरे ।।५।।
वेताळे फेताळे । जळो त्यांचे तोंड काळे ।।६।।
तुका म्हणे चित्ती । धरा रखुमाईचा पती ।।७।।

या अभंगातील ‘गणोबा विक्राळ । लाडू मोदकांचा काळ' हे चरण तुकोबांनी गणपतीला उद्देशून लिहिले आहे. तुकोबा म्हणतात : खादाड गणपती लाडू आणि मोदक खाण्याशिवाय दुसरे काहीही करीत नाही. म्हणजेच अध्यात्म मार्गात तो निरुपयोगी आहे.

तुकोबांच्या काळी अनेक उपदेवतांचा महाराष्ट्रात उपद्रव होता. या उपदेवतांच्या नावाने अघोरी प्रकार केले जात होते. हे प्रकार बंद करायचे असतील, तर या उपदेवता संपविणे आवश्यक होते. म्हणून तुकोबांनी हा अभंग लिहिला. या अभंगात तुकोबांनी त्याज्य ठरविलेल्या बहुतांश उपदेवता या मौखिक परंपरेने चालत आलेल्या आहेत. ग्रंथाधार असलेली एकच देवता तुकोबांच्या या यादीत आहे. ती म्हणजे 'गणपती'! तुकोबांनी गणपतीला पार जोखाई-मसाईच्या पंक्तीत नेऊन बसविले आहे. इतकेच नव्हे तर, गणपतीला ते ‘गणोबा' म्हणतात आणि ‘लाडू मोदकांचा काळ' अशी त्याची टर उडवितात.

असो.

याविषयीचे सविस्तर विवेचन आपण येथे पाहू शकता.

बॅटमॅन Tue, 10/09/2013 - 16:16

गणपती मुळात विघ्नकर्ता असून त्याची आपल्या देव्हार्‍यातून हकालपट्टी केल्याचा लेख वाचला असेलच. च्यायला आता सापडत नैये. ऐसीवर त्याचे लेखक सदस्यही दिसेना झालेत कुठं. आयमीन सर्चवूनही सापडेनात. भौतेक रजणीकांताशी पंगा घेटलेला असावा.

ॲमी Tue, 10/09/2013 - 16:38

In reply to by बॅटमॅन

ब्याटमन अरे नवीन लेखनमधे थोड खाली स्क्रोल केलं तर दिसतात तू म्हणतोयस ते सदस्य. हा घे लेख www.aisiakshare.com/node/615

बॅटमॅन Tue, 10/09/2013 - 16:51

In reply to by ॲमी

अरे हो की, धन्यवाद! म्हायतीपुर्न श्रेनि दिल्याली हाये :)

बाकी ज्ञानेश्वरीतली फेमस ओवी न पाहिल्याचे वाचून डोळे पाणावले हेवेसांनल.

मेघना भुस्कुटे Tue, 10/09/2013 - 16:25

याबद्दल ढेर्‍यांनी लिहिलं आहे की. काळाच्या ओघात दैवतांचं उत्थानीकरण (शब्द चुकला असेल, तर सुधारा बॉ), एकमेकांत विलीनीकरण, लोकप्रियता कमी होणं, हे सगळं होतच असतं. यात नवीन काये?

'न'वी बाजू Tue, 10/09/2013 - 16:39

भारतीय धर्मपरंपरेत कुठल्याही ग्रंथाची सुरूवात ‘श्री गणेशाय नम' या पालुपदाने होते. ‘पहिल्या वंदनाचा मान गणेशाचा' हे रूढ मत यामागे आहे. ज्ञानेश्वरीची सुरूवात मात्र ‘श्रीगणेशाय नमः' या पालुपदाने होत नाही. ज्ञानेश्वर आपल्या ग्रंथाची सुरूवात करण्यासाठी ‘ओम नमोजी आद्या' असे पालुपद वापरतात.

ज्ञानेश्वरीची नमनाची ओवी अशी :

ओम नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या ।
जयजय स्ववेंद्या । आत्मरूपा ।।१।।

Hold On! Not so fast!

त्याच्या पुढचीच ओवी

देवा तूचि गणेशु । सकलमतिप्रकाशु ।
म्हणे निवृत्तीदासु । अवधारिजोजी ॥

अशी नाहीये काय?

सांदीपनी Tue, 10/09/2013 - 16:42

ज्ञानेश्वरी ची सुरुवात गणेश वंदनेने नाही हे वाचून आश्चर्य वाटले. श्री गणेशाय नम: हा श्लोक नसल्यास गणेश वंदना नाहीच असे कसे म्हणता येईल?

ज्ञानेश्वरीचा फॉर्म ओवीबद्ध आहे. आणि ती सुसंगती ठेवण्यासाठीच अशा पद्धतीने गणेश वंदना केली आहे -

ओम नमो जी आद्या | वेद प्रतिपाद्या |

जय जय स्वसंवेद्या | आत्मरूपा |

देवा तूची गणेशु | सकल मतिप्रकाशु |

म्हणे श्री निवृत्ती दासू | अवधारिजो जी ||

अकार चरण युगुल | उकार उदर विशाल |

मकार महामंडल | मस्तकाकारे |

हे तिन्ही एकवटले | तेथ शब्द ब्रह्म कवळले |

ते मिया श्री गुरुकृपा नमिले | आदिबीज ||

'न'वी बाजू Tue, 10/09/2013 - 16:51

संत तुकाराम महाराजांनी तर गणपतीला मद्यमांस भक्षक त्याज्य देवतांच्या यादीत ढकलले आहे. यासंबंधीचा त्यांचा प्रसिद्ध अभंग खाली देत आहे. ... तुकोबांच्या काळी अनेक उपदेवतांचा महाराष्ट्रात उपद्रव होता. या उपदेवतांच्या नावाने अघोरी प्रकार केले जात होते. हे प्रकार बंद करायचे असतील, तर या उपदेवता संपविणे आवश्यक होते. म्हणून तुकोबांनी हा अभंग लिहिला. या अभंगात तुकोबांनी त्याज्य ठरविलेल्या बहुतांश उपदेवता या मौखिक परंपरेने चालत आलेल्या आहेत. ग्रंथाधार असलेली एकच देवता तुकोबांच्या या यादीत आहे. ती म्हणजे 'गणपती'! तुकोबांनी गणपतीला पार जोखाई-मसाईच्या पंक्तीत नेऊन बसविले आहे. इतकेच नव्हे तर, गणपतीला ते ‘गणोबा' म्हणतात आणि ‘लाडू मोदकांचा काळ' अशी त्याची टर उडवितात.

रोचक! इथे काही वेगळाच दाखला दिलेला आहे.

अर्थात, दोन्ही ठिकाणी (म्हणजे त्या विकीदाखल्यात अ‍ॅज़ वेल अ‍ॅज़ या लेखातसुद्धा) ज्याच्यात्याच्या बायसचा भाग असू शकतो, म्हणा!

मी Tue, 10/09/2013 - 17:47

इथले वाचक त्यामानाने सहिष्णू आहेत, त्यांनी अजुन असले काही ताज्य ठरविले नाहिये.

अवांतर - विनायक आणि गणपती ह्या दोन वेगळ्या देवता आहेत अशी एक विचारधारा आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/09/2013 - 18:41

In reply to by मी

भलतेच ब्वॉ तुम्ही सहिष्णू! :प

मी तर आता नवा लेखच लिहीते आहे "जीजस क्राईस्ट - इंग्लिशभाषकांनी त्याज्य ठरवलेला एक देवदूत." संदर्भ: *** *** ***
-- जै जै भडकमकर मास्तर.

सूर्यकान्त पळसकर Tue, 10/09/2013 - 18:25

मित्रहो,

श्री. 'न'वी बाजू यांनी वर ज्याचा धागा दिला आहे, त्या विकिपीडियावरील गणपतीविषयक लेखात तुकोबांच्या नावे खालील अभंग दिला आहे.

गणराया लौकरी येई । भेटी सकलांसी देई ।।
अंगी सिंदूराची उटी । केशरकस्तुरी लल्लाटी ।।
पायी घागर्या वाजती । नाचत आला गणपती ।।
तुका म्हणे पाही । विठ्ठल गणपती दुजा नाही ।।

हा अभंग बोगस आहे. असा कोणताही अभंग तुकाराम महाराजांच्या गाथ्यात नाही. देहू संस्थानने तुकोबांचा गाथा प्रसिद्ध केला आहे. तुकोबांचे वंशज सदानंद मोरे यांनी या गाथ्याचे संपादन केले आहे. त्यात हा अभंग नाही. देहू संस्थानचा गाथा हा सर्वाधिक विश्वसनीय समजला जातो. देहू संस्थानाव्यतिरिक्त सुमारे डझनभर संस्था वारकरी सांप्रदायांसाठी ग्रंथ निर्मिती करतात. मजकडे अशा चार-पाच संस्थांचे गाथे आहेत. त्यापैकी कोणत्याही गाथ्यात हा अभंग नाही.

महाराष्ट्र सरकारनेही गाथा प्रसिद्ध केला आहे. तथापि, तो विश्वसनीय समजला जात नाही. संपादकांनी अनेक ठिकाणांहून अभंग गोळा करून हा गाथा सिद्ध केला आहे. त्यामुळे त्यात बनावट अभंगांची संख्या मोठी आहे. वर दिलेला अभंग सरकारी गाथ्यात आहे किंवा कसे हे मला माहिती नाही. मी तपासून सांगतो.

आपल्या दैवतांचा महिमा वाढविण्यासाठी साधू संतांच्या नावे बनावट अभंग रचना करण्याचे प्रकार फार पूर्वीपासून महाराष्ट्रात सुरू आहेत. विकिपीडियावरील हा अभंग याच प्रकारातील असावा असे दिसते. किंवा विकीपीडियासाठी लेखन करणार्‍या लेखकरावांनीही तो रचला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विकिपीडिया कोणीही संपादित करू शकतो. त्यामुळे तेथील संदर्भ विश्वसनीय समजले जात नाहीत. मराठी विकिपीडियाबाबत तर बोलायलाच नको.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/09/2013 - 18:39

In reply to by सूर्यकान्त पळसकर

मित्रहो,

एवढा स्त्रीद्वेष बरा नव्हे. कधीतरी मैत्रिणींनाही बुद्धी आहे, वाचन करता येतं हे लक्षात घेऊन मैत्रिणींनाही लिहा की ... गडे!

अजो१२३ Tue, 10/09/2013 - 18:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खरेच, 'हा प्रतिसाद स्त्रीयांसाठी नाही' असे स्पष्ट का लिहित नाहीत हे सूर्यकांतजी.

राजेश घासकडवी Tue, 10/09/2013 - 19:06

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कधीतरी मैत्रिणींनाही बुद्धी आहे, वाचन करता येतं हे लक्षात घेऊन मैत्रिणींनाही लिहा की ... गडे!

इश्श! काहीतरी बै तुझं बोलणं. सगळ्यांनाच मैत्रिणी असतील असं कशावरून?

सूर्यकान्त पळसकर Tue, 10/09/2013 - 19:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मैत्रिणींनो म्हणायचे राहून गेले खरे. या संस्थळावर अदिती बै यांच्या सारख्या काही विद्वान स्त्रिया आहेत, हे आम्ही विसरूनच गेलो. यापुढे असा विसरभोळेपणा होणार नाही. ("विद्वान स्त्रिया" याऐवजी "विदूषी" असेच आम्ही म्हणणार होतो, पण का कोण जाणे या शब्दातून काही तरी "विदुषकी" अर्थ जातो, असे आम्हांस उगाच वाटते. म्हणून टाळले.)

हा प्रतिसाद मित्र आणि मैत्रिणी अशा दोघांसाठीही आहे, हे मी जाहीरच करून टाकतो एकदाचे.

अजो१२३ Tue, 10/09/2013 - 19:15

In reply to by सूर्यकान्त पळसकर

काही विद्वान स्त्रिया आहेत

पून्हा शब्दांत कोतेपणा!! अक्षम्य, अस्वीकार्य!!! 'काही विद्वान स्त्रिया आहेत' असे म्हटल्याने सर्वच स्त्रीया सुनिश्चितपणे विद्वान आहेत असे सुस्पष्ट होत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/09/2013 - 19:18

In reply to by अजो१२३

अं हं:!

विद्वान असा शब्द वापरल्यावर स्त्रिया हा शब्द वापरण्याची गरज नाही. अशी गरज वाटत असेल तर आपण स्त्रीद्वेष्टे आहोत हे पुन्हा एकदा लक्षात घ्यावं.

अजो१२३ Tue, 10/09/2013 - 19:23

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'विद्वान स्त्री' म्हणताना 'मुंबईचे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर' असे काहीतरी चूक होत असल्याचे वाटत होतेच. भाषेचे बोलण्याचे दौर्बल्य हो!

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/09/2013 - 19:32

In reply to by अजो१२३

संशोधक या प्रकाराला भाषेचे दौर्बल्य न म्हणता gender stereotyping असं म्हणतात.

अमुक Tue, 10/09/2013 - 19:40

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'नमस्कार मैत्रहो !' असे म्हणण्यास सुरूवात करावी, अशी एक नम्र सुचवणी.
'मैत्र' शब्दात सगळी सर्व प्रकारचे प्राणिमात्र आहेत असे ठरविले, की झाले.

'न'वी बाजू Tue, 10/09/2013 - 21:02

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'लोकहो', 'जनहो' किंवा 'पब्लिकहो' म्हणून तो टाळता येत असावा. म्हणजे, टाळायचा असेल तर.

तरीही, चालू पर्याय त्या मानाने पुष्कळच सुसह्य म्हणावयास हवा. 'बंधुभगिनींनो' वापरला नाही, ही मेहेरबानी नव्हे काय? (विवेकानंदा गॉट अवे विथ इट, टू लेट टू डू एनिथिंग अबौट इट नाउ, पण म्हणून कोणीही?)

अमुक Tue, 10/09/2013 - 21:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गळेपडूपणा ज्यांना वाटेल वा ज्यांना मैत्र नको आहे, ते तुमच्यासोबत येणार नाहीत. मी कुणास मैत्र म्हटले म्हणून लगेच मैत्र होत नाही. तशी अपेक्षाही नाही. ज्यांना रस आहे ते लक्ष देतील. इतर आपलेआप मागे राहतील. एकदा म्हणून तर बघा काय होते ते !
शब्द टिकला तर प्रतिसादाने टिकेल, नाहीतर नाही.. :)
शेवटी भाषा कुठल्या उद्देशाने वापरली आहे याला महत्त्व आहे.

'न'वी बाजू Tue, 10/09/2013 - 23:43

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणजे, 'मित्रहो' मधील उघड, ढोबळ स्त्रीद्वेष आपणांस दिसून आला, ते ठीकच आहे. (त्यात काय, कोणासही दिसून येईल.)

मात्र, संपूर्ण लेखात लेखकाने 'गाथा' हा शब्द पुल्लिंगी वापरलेला आहे, हे आपल्या ध्यानातून सुटलेले दिसते. ('गाथा' ही मराठीत स्त्रीलिंगी असते.)

हा सटल, सूक्ष्म स्त्रीद्वेष आपल्या चाणाक्ष नजरेतून सुटला, जो मस - एका यःकश्चित पुरुषास - दर्शवून द्यावा लागला, हे आपणांस शोभते काय?
===========================================================================================================================
'मला' अशा अर्थी.

बॅटमॅन Wed, 11/09/2013 - 00:19

In reply to by 'न'वी बाजू

पुरुष देवतांबद्दलचा लेख, पुरुष संतांचीच अवतरणे...स्त्रिया कुठेच नाहीत की हो त्यात.

ब्लडी पुरुषांनी लिहिल्यावर असंच होणार की हो. अदितीच्या नजरेतून हे सुटलं कसं म्हंटो मी. फ़र्ज़ी स्त्रीद्वेषचिकित्सक आहे भौतेक =))

याचे मराठी भाषांतर कोणीतरी सांगा. (मॉडर्न न्हवे. मॉडर्न मराठीत तो शब्द ब्लडी असाच आहे. जरा ओह-सो-जुनाट मराठीतला पाहिजे.)

इथे 'न'वी बाजू यांचे आभार मानणे हे आमचे फर्ज़ आहे.

तळटीपा द्यायला मज्जा येते खास.

त्या फर्ज़ामुळे येणारी जबाबदारी फर्ज़ी असे नाही.

सूर्यकान्त पळसकर Thu, 12/09/2013 - 15:52

In reply to by सूर्यकान्त पळसकर

ता. क. (दि. १२-०९-२०१३)

महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेला गाथाही तपासला. त्यामध्येही हा अभंग नाही.

विकिपीडियाच्या सदरील लेखात इतरही वारकरी संतांच्या नावे काही अभंगांचे चरण दिले आहेत. तेही कदाचित असेच बोगस असण्याची शक्यता आहे.

साधूसंतांच्या नावे बोगस अभंग रचून खपवणे हा प्रकार निंद्य आहे.

बॅटमॅन Thu, 12/09/2013 - 16:01

In reply to by सूर्यकान्त पळसकर

साधूसंतांच्या नावे बोगस अभंग रचून खपवणे हा प्रकार निंद्य आहे.

साधुसंतांचे सिलेक्टिव्ह रीडिंग करणे हा त्याहून अधिक निंद्य प्रकार आहे. ज्ञानेश्वरांनी गणेशाला वंदन केल्याची फ्याक्ट नजरेआड करणे हे किती वंद्य? की त्या ओव्या प्रक्षिप्त आहेत?

सूर्यकान्त पळसकर Thu, 12/09/2013 - 16:40

In reply to by बॅटमॅन

ज्ञानेश्वरांनी गणेशाला वंदन केल्याची फ्याक्ट नजरेआड करणे हे किती वंद्य? की त्या ओव्या प्रक्षिप्त आहेत?

श्री. बॅटमॅन,

संत ज्ञानेश्वरांनी गणेशाला वंदन केलेले नाही. त्यांना गणेश वंदावयाचा असता, तर रूढ अर्थाने "श्रीगणेशाय नम:" अशी सुरूवात त्यांनी केली असती. पण त्या ऐवजी ते "ओम नमोजी आद्या" अशी सुरूवात करतात. ज्ञानेश्वर "ओमकारा"ला वंदन करीत आहेत. "ओमकार" हाच "आद्य" आहे, असे ते म्हणतात. ते ओमकाराला उद्देशून म्हणतात की, तूच गणेश आहेस. या पुढच्या ओव्या वाचल्या म्हणजे आपल्या सारे लक्षात येईल. ओमकारात अ उ आणि म हे तीन शब्द आहेत. त्याची फोड ज्ञानेश्वरांनी पुढच्या ओव्यांत केलेली आहे.

ज्ञानेश्वरीच नव्हे, तर चांगदेव पासस्टी आणि अमृतानुभव या इतर ग्रंथांतही ज्ञानेश्वर गणेश वंदना करीत नाहीत. ही बाबही येथे लक्षात घ्यायला हवी.

आणखी महत्त्वाची गोष्ट अशी की, ज्ञानेश्वर ज्या वारकरी परंपरेचा पुरस्कार करतात, त्या परंपरेतही "श्रीगणेशाय नम:" हे पालुपद वापरले जात नाही. वारकरी फडातील भजनांची सुरूवात "रामकृष्ण-हरी" या पालुपदाने होते. माझ्या ब्लॉगवर थोडेसे विस्ताराने लिहिले आहे. लेखात लिन्क दिलेली आहे, कृपया पाहावी.

बॅटमॅन Thu, 12/09/2013 - 17:24

In reply to by सूर्यकान्त पळसकर

ओक्के. पण मग त्यांनी गणेशाला त्याज्य कुठे ठरवले आहे??? "देवा तूचि गणेशु" असे म्हटले आहे ते काय उगीच? ग्यानबा-तुकाराम या वारकरी पंथाच्या सुप्रीम द्वयीपैकी एकाने जर असे गणपतीला उचलून धरले असेल, तर तुमच्या लेखाचे शीर्षकच गंडले की मग. कृपया त्याचे स्पष्टीकरण करा.

रमताराम Tue, 10/09/2013 - 19:13

बहिरव खंडेराव । रोटीसुटी साटी देव ।।३।। >> गणपतीबद्दल लिहिताना या चरणातील पहिल्या दोन देवांचा उल्लेख सफाईने वगळला म्हणावा की तो फारसा महत्त्वाचा नाही असा लेखकाचा समज आहे की मु़ळातच अनवधानाने राहिला की 'सध्या मुद्दा फक्त गणपतीबाबत आहे' असा दृष्टीकोन आहे?

यात बहिरव => भैरोबा => पक्षी: भैरव असा माझा समज आहे, चुकीचा असल्यास कृपया दुरुस्त करणे. खंडेराव या देवतेबाबत कोणतेही अधिकचे स्पष्टीकरण देण्याची गरज नसावी.

सूर्यकान्त पळसकर Tue, 10/09/2013 - 21:31

In reply to by रमताराम

बहिरव खंडेराव । रोटीसुटी साटी देव ।।३।। >> गणपतीबद्दल लिहिताना या चरणातील पहिल्या दोन देवांचा उल्लेख सफाईने वगळला म्हणावा की तो फारसा महत्त्वाचा नाही असा लेखकाचा समज आहे की मु़ळातच अनवधानाने राहिला की 'सध्या मुद्दा फक्त गणपतीबाबत आहे' असा दृष्टीकोन आहे?

गणेशोत्सवाच्या संदर्भाने हा लेख लिहिला आहे. म्हणऊन फ्क्त गण्पतीचा विचार केला आहे.

'न'वी बाजू Tue, 10/09/2013 - 19:54

नव्हे जोखाई । माय राणी मेसाबाई ।।१।।
बळिया माझा पंढरीराव । जो या देवांचाही देव ।।ध्रु।।
रंडीचंडी शक्ती । मद्यमांस भक्षिती ।।२।।
|
|
तुका म्हणे चित्ती । धरा रखुमाईचा पती ।।७।।

थोडक्यात, 'जगात एकच रखुमाईचा पती आहे, आणि तुका त्याचा संत आहे' असे एकदा(चे) म्हणून टाका की!

- (गणेशमूर्तिपूजक) 'न'वी बाजू.
========================================================================
कृपया शब्दरचना नीट ध्यानात घ्यावी. नंतर तक्रारी चालणार नाहीत. 'एकच रखुमाईचा पती' म्हटलेले आहे, 'रखुमाईचा एकच पती' नव्हे, याची कृपया नोंद घ्यावी. 'रखुमाईचा पती' बोले तो, विठ्ठल. (चूभूद्याघ्या.) थोडक्यात, 'जगात एकच विठ्ठल आहे', असा अर्थ यातून अपेक्षित आहे; 'जगात रखुमाईस एकच पती आहे', असा नव्हे.

'जगात रखुमाईस एकच पती आहे' हेही कर्मधर्मसंयोगाने खरे असण्यास प्रत्यवाय नाही, परंतु येथे तो मुद्दा नव्हे.

राजेश घासकडवी Tue, 10/09/2013 - 21:45

In reply to by सूर्यकान्त पळसकर

अहो, ते 'एकच' वर जोर देत आहेत हे त्यांनी दोन तळटिपा देऊन स्पष्ट केलेलं आहे. आणखीन किती तळटिपा द्यायला लावता त्यांना? आणि वाचकांना वाचायला लावता?

प्रकाश घाटपांडे Tue, 10/09/2013 - 21:49

थोडक्यात गणपती या उपदेवतेला वारकर्‍यांनी अगदी त्याज्य नसले तरी गौण ठरवले आहे असे म्हणता येईल.कारण त्यांच्या दृष्टीने विठ्ठल हाच तारणकर्ता.

फारएण्ड Tue, 10/09/2013 - 22:10

"ओंकार प्रधान रूप गणेशाचे" हा तुकोबांचा अभंग नाही का? "फॉर्म" वरून तरी वाटतो आणि तुका म्हणे सिग्नेचर ही आहे.

बाकी गणपतीबद्दल असे काहीतरी गणपती उत्सवातच वाचणे मला तरी औचित्यपूर्ण वाटले नाही. केवळ माझे मत.

'न'वी बाजू Tue, 10/09/2013 - 23:20

In reply to by फारएण्ड

बाकी गणपतीबद्दल असे काहीतरी गणपती उत्सवातच वाचणे मला तरी औचित्यपूर्ण वाटले नाही. केवळ माझे मत.

औचित्याबाबत नक्की सांगू शकत नाही. मात्र, यावरून एक विनोद आठवला.

===========================================================================================================
एकदा एक लहान मुलगी आपल्या वडिलांजवळ येऊन म्हणते, "बाबा, बाबा, तुमच्या डोक्यावर पहा काय आहे..."

वडील डोक्यावरून हात फिरवून पाहतात. तेथे अर्थात काहीच नसते.

मुलगी आनंदाने टाळ्या पिटत मोठ्याने ओरडते, "एप्रिल फूल!"

"एप्रिल फूल? पण आत्ता तर नोव्हेंबर आहे..."

"हॅट्! एक एप्रिलला एप्रिल फूल करण्यात काय मजा? तेव्हा सगळ्यांनाच माहीत असते, की दुसरा आपल्याला एप्रिल फूल करणार म्हणून, नि मग फारसे फसत नाही कोणी."
===========================================================================================================

गरजूंनी योग्य तो बोध घ्यावा.

बॅटमॅन Tue, 10/09/2013 - 23:30

बरं, तुकारामांनी गंपतीला त्याज्य ठरवले असेलही, पण मग ज्ञानेश्वरांचे काय? की वर दिलेल्या ओव्याही फर्जीच आहेत? (आयला ते नुक्ते देऊन वेलांट्या-उकार द्यायचं बघा राव कोणतरी हिकडे) बहुतेक बामणी कावाच असावा तो मग.

'न'वी बाजू Wed, 11/09/2013 - 00:22

In reply to by बॅटमॅन

कन्नडमध्ये काहीही होत असेल, परंतु मराठीतल्या 'गळू'मधला 'ळू' दीर्घच!

(अतिअतिअवांतर: तेवढी हिंदीतले चंद्रबिंदुयुक्त 'हूं'कार व्यवस्थित लिहिता येण्याची काही सोय झाल्यास बरे व्हावे.)

===================================================================================================

उदाहरणार्थ, 'मैं पाग़ल हूं|' या विधानातील 'हूं'कार.

मआंजावर अशी सुविधा आजतागायत केवळ 'मनोगत' या संस्थळावर अनुभवलेली आहे.

बॅटमॅन Wed, 11/09/2013 - 00:24

In reply to by 'न'वी बाजू

मराठीतील "गळू" दीर्घच असते, किंबहुना ते तसे झाल्याशिवाय गळूत्वाप्रत येत नाही.तदुपरि कन्नड अर्थाप्रमाणे र्‍हस्वच बरोबर आहे.

बाकी त्या हुंकाराशी सहमत आहे. तूर्तास गूगलमध्ये टैप इण हिंदी असे करून ते पेष्टवता येते.

बॅटमॅन Wed, 11/09/2013 - 14:34

In reply to by 'न'वी बाजू

बदला लूँगी-बदला लुङ्गी-लुङ्गी डॅन्स लुङ्गी डॅन्स लुङ्गी डॅन्स लुङ्गी डॅन्स लुङ्गी डॅन्स लुङ्गी डॅन्स....

अरविंद कोल्हटकर Wed, 11/09/2013 - 01:41

गणपति ह्या देवतेबद्दल पळसकर जे म्हणतात त्यात काहीच चूक नाही. माझ्या वाचनानुसार ९व्या-१०व्या शतकात केव्हातरी ही मूळची 'मार्जिनल' देवता 'विद्यादाता', 'विघ्नहर्ता' अशा स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागली आणि 'मेनस्ट्रीम'मध्ये दाखल झाली. पेशवे घराणे गाणपत्य होते आणि गणपतीची उपासना आणि भाद्रपदात मृत्तिकागणपतीची स्थापना हा त्यांचा कौटुंबिक कुळाचार होता. (सुवासिनींच्या अंगात येणारा 'बोडण भरणे' हाहि एक चित्पावनी कुळाचार आहे, जो प्रत्येक लग्नमुंजीनंतर चित्पावनी कुटुंबांमधून केला जात असे. सुदैवाने त्याला सार्वजनिक रूप वा लग्नमुंजीमधील एक आवश्यक विधि असे स्वरूप आले नाही हे बरेच झाले म्हणायचे!) कुळाचारानुसार शनिवारवाडयात प्रतिवर्षी गणपति बसत असे आणि तो पेशवे कुटुंबाचा वैयक्तिक कुळाचार होता. माझ्या समजुतीनुसार मूळची कोकणातील चित्पावनी असलेली ही रीत'महाजनो ये न गतः स पन्था:' ह्या अनुसार पुण्यातील काही अन्य प्रतिष्ठित सरदार-सावकार कुटुंबांनी घेतली. तरीहि १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत ही प्रथा वैयक्तिक अर्चेची बाब म्हणून केवळ पुण्यात आणि कोकणस्थांमध्येच रूढ होती.

टिळकांनी सार्वजनिक चळवळीचे साधन म्हणून शिवजयंती आणि गणेशोत्सव हे सार्वजनिक उत्सव व्हावेत अशी प्रेरणा दिली. त्यांच्या त्या समाजकारणी हेतूपासून सुरुवात होऊन हे उत्सव बदलत बदलत आजच्या स्थितीला येऊन पोहोचले आहेत. सध्या ह्यामधे समाजकारण नावापुरते आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वाचे अर्थकारण अधिक अशी स्थिति आहे.

गणपतीच काय, कोठल्याच देवाचे देव्हारे माजविणे हे मी माझ्यापुरते अंधश्रद्धेचे निदर्शक मानतो.

ह्या माझ्या तत्त्वानुसार मला गणपतीहि पटत नाही आणि विठोबा आणि वारकर्‍यांच्या विठुरायावरील लाडिक भक्तीचे कौतुक हेहि मला पटत नाही. ह्यामुळे पळसकरांच्या लेखातील मला जाणवणारा 'गणपति त्याज्य पण विठोबा चालेल, नव्हे हवाच' हा विचार खटकतो.

(येथेच अवान्तर म्हणून सध्या डोकेदुखी ठरणारा 'गणपतिविसर्जन सोहळा' कसा निर्माण झाला असावा ह्याबाबत माझे विचार मांडतो. ह्या उत्सवातील गणेशमूर्ति ही मृत्तिकेचीच असावी अशी रूढि आहे. घरातील देव्हार्‍यात जरी तांब्यापितळ्याचा गणपति असला तरी ह्या उत्सवाला तो चालत नाही. मृत्तिकेची मूर्ति कितीही काळजी घेतली तरी आज ना उद्या झिजणार वा मोडणार वा फुटणार हे उघड आहे. तेव्हा पूजासोहळा यथास्थित पार पडल्यावर मूर्तीला काही इजा पोहोचण्याअगोदर तिची बोळवण करणे ओघानेच आले. सश्रद्ध भक्ताच्या मनाला सोहळ्यानंतर मूर्ति टाकून देणे वा फोडून टाकणे अर्थातच पटणारे नाही. क्लेशदायक नसलेल्या पद्धतीने ती नष्ट करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तिला पाण्यात सोडणे, जेणेकरून ती डोळ्याआड पाण्यात विरघळून नष्ट होईल.)

बॅटमॅन Wed, 11/09/2013 - 01:49

In reply to by अरविंद कोल्हटकर

तरीहि १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत ही प्रथा वैयक्तिक अर्चेची बाब म्हणून केवळ पुण्यात आणि कोकणस्थांमध्येच रूढ होती.

कोकणस्थांमध्येच ही प्रथा रूढ होती याबद्दल सहमत. परंतु फक्त पुण्यापुरती मर्यादित नव्हती. मिरज-सांगली-कुरुंदवाड-बुधगाव-जमखंडी या पट्ट्यात पटवर्धन संस्थानिकांचे राज्य होते तिथे बर्‍याच आधीपासून गणपतीउत्सव चालत असे. त्यासंबंधीची लेखमाला दै. तरुण भारतच्या सांगली आवृत्तीतून गेले ९ दिवस सलग प्रकाशित होत आहे.

मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या फेसबुक पेजवर यासंबंधीचे लेख पाहता येतील.

सांगली संस्थानच्या गणपतीउत्सवाबद्दल हा लेख पाहता येईल. स्क्रोल केल्यावर खालच्या बाजूस हा लेख आहे.

ऋषिकेश Wed, 11/09/2013 - 11:08

In reply to by अरविंद कोल्हटकर

त्यांच्या त्या समाजकारणी हेतूपासून सुरुवात होऊन हे उत्सव बदलत बदलत आजच्या स्थितीला येऊन पोहोचले आहेत. सध्या ह्यामधे समाजकारण नावापुरते आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वाचे अर्थकारण अधिक अशी स्थिति आहे.

सदर मुद्द्याबद्दल असहमत आहे.

टिळकांचा हेतू हा 'सामाजिक' पेक्षा 'राजकीय' अधिक होता असे वाटते. (अर्थात सामाजिक सुधारणा झाली तर चालेलच पण तो "मुख्य उद्देश" नसावा) या उत्सवाचे सांस्कृतिक अंग हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पहिल्या २०-२५ वर्षांत आलेले तत्त्कालिक स्वरूप होते असे म्हणावयास वाव आहे. राहता राहिला "आर्थिक" अंगाचा प्रश्न. आर्थिक बाजु सक्षम आणि फायदेशीर असल्याशिवाय हा उत्सव शतकभर टिकलाच नसता त्यामुळे टिळकांच्या काळी किंवा पूर्वी (म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात?) यात आर्थिक फायदा किंवा स्थानिक नेतृत्त्वाचे अर्थकारण नव्हते असे म्हणणे अयोग्य वाटते.

चिंतातुर जंतू Thu, 12/09/2013 - 18:06

>> वारकरी धर्मात गणपतीला कोणतेही स्थान नाही!

हे खरं आहे असं तात्पुरतं धरलं तरीही एक मुद्दा शिल्लक राहतोच - कोणत्याही धर्माचं किंवा पंथाचं अनुसरण करणारे काळानुसार बदलत जातात. तसे वारकरीही बदलले. आज वारकऱ्यांमध्ये गणपतीविरोधात असा कोणताही आकस दिसत नाही. अनेक माळकरी आपल्या घरात गणपती आणतात आणि सार्वजनिक गणेशोत्सवातही भाग घेतात. हा एक प्रकारचा देवादिकांबाबतचा उदारमतवाद किंवा सहिष्णुता म्हणता येईल.

आणि उलट, वारकऱ्यांना तुम्ही आज जर शिकवायला गेलात की तुकोबाराय असं म्हणाले आहेत म्हणून तुम्ही गणपतीला त्यागा, तर तुम्हाला मार बसण्याचीसुद्धा शक्यता आहे.

असो.

सूर्यकान्त पळसकर Thu, 12/09/2013 - 19:27

In reply to by चिंतातुर जंतू

अनेक माळकरी आपल्या घरात गणपती आणतात आणि सार्वजनिक गणेशोत्सवातही भाग घेतात. हा एक प्रकारचा देवादिकांबाबतचा उदारमतवाद किंवा सहिष्णुता म्हणता येईल.

सहमत

वारकऱ्यांना तुम्ही आज जर शिकवायला गेलात की तुकोबाराय असं म्हणाले आहेत म्हणून तुम्ही गणपतीला त्यागा, तर तुम्हाला मार बसण्याचीसुद्धा शक्यता आहे.

आधीच्या परिच्छेदातील "उदारमतवाद किंवा सहिष्णुता" या टीप्पणीशी विसंगत. पण वारकर्‍यांच्या फडात सनातनी घुसल्याने "उदारमतवाद किंवा सहिष्णुता" संपुष्टात येत आहे, हे खरे.

बॅटमॅन Thu, 12/09/2013 - 19:30

In reply to by सूर्यकान्त पळसकर

असहिष्णुता जपा म्हणून सांगू गेल्यास मार बसला, तर निव्वळ मार बसला म्हणून मारणारे असहिष्णू/सनातनी ठरतील काय?

अक्षय पूर्णपात्रे Thu, 12/09/2013 - 19:58

कृपया वारी करण्याला त्याज्य ठरवणारी उपदेवता असल्यास त्याची माहिती द्यावी.

अजो१२३ Thu, 12/09/2013 - 20:03

अशा चर्चांचं औचित्य आणि उपयुक्तता काय हा प्रश्न मला नेहमी पडतो. अ ब क ड देव मानावेत य क्ष ज्ञ मानू नयेत असं स संप्रदायाचं क कारणाने मत असेल तर काय फरक पडतो?

शहराजाद Fri, 13/09/2013 - 02:26

In reply to by अजो१२३

कायतरीच ब्वॉ तुमचा प्वाइंट. वरील चर्चेत तुमचे, ते औचित्य का कायसे, नाही कसे? 'एडिट' व ''फाइंड' वर उंदीर टिचकवून नंतर 'औचित्य' शोधा, सापडेल. उगीच आपले जरासे, 'बदनामी के वास्ते', पण आहे.

उपयुक्ततेचे म्हणाल तर अशा काय, तशा काय, चर्चा ह्या उपयुक्त असतातच. ( अशांना नायतर तशांना. ) आणि आज ह्या चर्चेची उपयुक्तता काढलीत, उद्या हिमेसभायची काढाल! परवा मलयिका अरोडाची काढाल....
त्यापेक्षा हे थोडे पॉपकॉर्न घ्या, आणि करमणुकीचा लुत्फ लुटा.

आदूबाळ Sat, 14/09/2013 - 21:55

गणपती उत्सवाच्या काळात हा लेख पाहून

...क्रिकेटच्या सामन्याच्या वेळी देशी खेळांचा जाज्वल्य अभिमान, अशी त्या अभिमानांची व्यवस्थित वाटणी करता येईल.

याची आठवण झाली!

'न'वी बाजू Sun, 15/09/2013 - 01:18

In reply to by आदूबाळ

यानंतर, वारीच्या दिवसांत प्रेषित महंमदाची (पत्याशांदे) प्रशंसा करणारा (आणि त्याच वेळी विठ्ठलाची टर उडवणारा) लेखही जर याच लेखकाकडून आला, तर कदाचित असे म्हणता येईलही.

मात्र, असे काही होण्याबद्दल मी व्यक्तिशः साशंक आहे.

राजेश Tue, 20/06/2017 - 16:16

संत एकनाथांनी (इ.स. 1532-1599) एकनाथी भागवताच्या आरंभी सोळा ओव्यांतून मंगलमूर्तीला अभिवादन केले आहे.
"नमन श्री एकदंता ।
एकपणे

राजेश Tue, 20/06/2017 - 16:17

संत नामदेवराय (इ.स. 1270 ते 1350) भक्तांचे शिरोमणी, श्रीविठ्ठलाचे लाडके भक्त, त्यांनीसुद्धा श्रीगणेशाचे मंगलस्तवन केले आहे.

"लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड । करितसे खंड दुश्‍चिन्हाचा । चतुर्थ आयुधे शोभती हाती । भक्ताला रक्षति निरंतर ।।1।।

नामदेव गाथ्यातले चौतिसावे हे पद सहा कडव्यांचे आहे.

राजेश Tue, 20/06/2017 - 16:18

संत नामदेवराय (इ.स. 1270 ते 1350) भक्तांचे शिरोमणी, श्रीविठ्ठलाचे लाडके भक्त, त्यांनीसुद्धा श्रीगणेशाचे मंगलस्तवन केले आहे.

"लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड । करितसे खंड दुश्‍चिन्हाचा । चतुर्थ आयुधे शोभती हाती । भक्ताला रक्षति निरंतर ।।1।।

नामदेव गाथ्यातले चौतिसावे हे पद सहा कडव्यांचे आहे.

राजेश Tue, 20/06/2017 - 16:18

संत एकनाथांनी (इ.स. 1532-1599) एकनाथी भागवताच्या आरंभी सोळा ओव्यांतून मंगलमूर्तीला अभिवादन केले आहे.
"नमन श्री एकदंता ।
एकपणे तूचि आता ।
एकी दाविसी अनेकता ।
परि एकात्मता न मोडे'
आपल्या नमनात नाथांनी - गणेशाच्या अष्टनामाचे संबोधन वापरले आहे.

राजेश Tue, 20/06/2017 - 16:20

दासबोधाच्या प्रदीर्घ ग्रंथात पहिल्या दशकात समर्थ गणेशाला आमंत्रित करतात.
"ॐ नमोजि गणनायका ।
सर्वसिद्धी फलदायका ।
अज्ञान भ्रांति छेदका ।
बोधरूपा ।'
एकूण 30 ओव्यांचे मंगलचरण; मनाच्या श्‍लोकाचा आरंभ
"गणाधीश जो ईश सर्वगुणांचा - मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा...।।

राही Tue, 20/06/2017 - 20:00

'माझ्या समजुतीनुसार मूळची कोकणातील चित्पावनी असलेली ही रीत 'महाजनो ये न गतः स पन्था:' ह्या अनुसार पुण्यातील काही अन्य प्रतिष्ठित सरदार-सावकार कुटुंबांनी घेतली. तरीहि १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत ही प्रथा वैयक्तिक अर्चेची बाब म्हणून केवळ पुण्यात आणि कोकणस्थांमध्येच रूढ होती.'
लेख व‌र आल्यामुळे वाच‌ला गेला. त्यात व‌रील वाक्ये साप‌ड‌ली. गण‌प‌तीची पूजा स‌ंपूर्ण‌ कोंक‌ण‌प‌ट्ट्यात अग‌दी द‌म‌ण‌ग‌ंगेच्या द‌क्षिण तीरापासून कार‌वार‌प‌र्य‌ंत पूर्वापार मोठ्या भ‌क्तिभावाने स‌र्व‌ जातीज‌मातीत केली जाते अल‌ब‌त्ता त्यांची पूजाप‌द्ध‌ती ही चित्पाव‌नांपेक्षा वेग‌ळी आहे. गौरीग‌ण‌प‌तीच्या या उत्स‌वाचा चेह‌रामोह‌रा ब‌हुज‌न‌स‌माजाचाच आहे. अग‌दी ठाणे-राय‌ग‌ड‌म‌ध‌ले आदिवासीसुद्धा ग‌ण‌प‌ती पुज‌तात, प‌ण तो साख‌र‌चौथीला म्ह‌ण‌जे पितृप‌क्षात‌ल्या च‌तुर्थीला. मोठ्या आन‌न्दाने रात्र‌ जाग‌वून हा स‌ण साज‌रा होतो. यात म‌द्य‌मांस‌सुद्धा निषिद्ध‌ न‌व्ह‌ते. प‌ण आता या लोकांचे 'उन्न‌य‌न' का काय‌सेसे झाल्यामुळे ती प्र‌था मागे प‌ड‌त चाल‌ली आहे.
ख‌रे त‌र स‌माज‌शास्त्रीय‌ दृष्टीने आप‌ल्या स‌र्व‌ स‌णारीतींचा धांडोळा घेत‌ला गेला पाहिजे. एका छोट्याशा स‌माजाच्या प्र‌था याच ज‌णू स‌र्व‌ समाजाच्या प्र‌था असे ग‌ण‌ले जाऊ न‌ये.

१४टॅन Wed, 21/06/2017 - 10:17

In reply to by राही

ख‌रे त‌र स‌माज‌शास्त्रीय‌ दृष्टीने आप‌ल्या स‌र्व‌ स‌णारीतींचा धांडोळा घेत‌ला गेला पाहिजे. एका छोट्याशा स‌माजाच्या प्र‌था याच ज‌णू स‌र्व‌ समाजाच्या प्र‌था असे ग‌ण‌ले जाऊ न‌ये.

थ‌म्ब्स‌प!

१४टॅन Wed, 21/06/2017 - 10:08

मुळात लेखाची सुरुवात 'आप‌ला ध‌र्म'ने होऊन 'वार‌क‌री ध‌र्मा'व‌र लेख क‌सा जातो, ही गंम‌त आहे.
मूल‌त: एखाद्या विचार‌स‌र‌णीच्या ज्या शाखेला 'मास फॉलोइंग' अस‌त‌ं त्याच्याव‌र विरोधी विचार‌स‌र‌णीचा काय‌म डूख अस‌तो. तेव्हा त्या मासेस ना काही क‌ळ‌त नाही, त्यांना अक्क‌ल नाही, त्यांना त्यांच्या गुलाम‌गिरीची जाणीव नाही इ. टिपीक‌ल वाद घात‌ले जातात. ग‌ण‌पती हा ब्राह्म‌णांचा, ब्राह्म‌णांनी 'ओव्ह‌र‌रेट' केलेला देव हे स‌म‌स्त डाव्या लोकांम‌ध्ये गृहीत‌क आहे. आता ते असं विठ्ठ‌लाब‌द्द‌ल बोलाय‌ची हिंम‌त क‌र‌तील का, ही गंम‌तीची आणि पाह‌ण्यासारखी गोष्ट आहे. कार‌ण मूळ हिंदू देव/मूर्तीपूजेला विरोध असेल त‌र तो स‌र‌स‌क‌ट असाय‌ला ह‌वा. मागे एक‌दा ध‌न‌ंज‌य क‌र्णिक ह्या लोक‌स‌त्ताच्या ज्येष्ठ प‌त्र‌कारांब‌रोब‌र ह्या बाब‌तीत वाद झालेला. तो एक अजून वेग‌ळाच मुद्दा.