वोट चोरी वर चर्चा
बगीच्यात फेरफटका मारताना निरनिराळ्या लोकांशी भेट होत असते. आजकाल ‘वोट चोरी’चा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. असाच एक तरुण मुलगा भेटला—आयटी क्षेत्रात काम करणारा, अमेरिकन कंपनीत नोकरी करणारा. साहजिकच, स्वतःला महाज्ञानी समजणारा.
गप्पा मारताना तो सहज म्हणाला, “ईव्हीएमच्या मदतीने वोट चोरी सहज शक्य आहे.” तो म्हणाला, “आज टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. इंटरनेट नसतानाही आकाशीय तरंगांच्या माध्यमातून ईव्हीएममध्ये फेरफार करता येतो.”त्याची गूढ भाषा मला काही समजली नाही. शेवटी मी त्याला म्हटलं, “मला तुझं सगळं पटतंय. ईव्हीएममध्ये वोट चोरी होऊ शकते.” तो खुश झाला. म्हणाला, “म्हणजे राहुल गांधींचे आरोप बरोबर आहेत!”
तेवढ्यात मला पार्कमधल्या एका बाकावर एक गृहस्थ टाइम्स ऑफ इंडिया वाचताना दिसले. मी त्याला विचारलं, “आकाशीय तरंगांच्या माध्यमातून या वर्तमानपत्राचं नाव बदलून हिंदुस्तान टाइम्स करता येईल का?”
ते माझ्याकडे पाहून म्हणाले, “काका, हे शक्य नाही. कागदावर छापलेले शब्द बदलता येत नाहीत.”
मी म्हणालो, “ईव्हीएमचा डेटा जर बदलला, आणि त्यानुसार छापील कागदी स्लिप्स बदलल्या नाहीत, तर चोरी सहज उघडकीस येईल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काही निवडणूक क्षेत्रांमध्ये ईव्हीएमसोबत छापील स्लिप्सची मोजणी केली जाते. त्यामुळे वोट चोरी शक्य नाही.” या शिवाय मतदान आधी पक्षाचे अधिकृत अजेंट मतदान करून स्लीप्स ही मोजतात. ते संतुष्ट झाल्यावर त्या ईव्हीएम वर मतदान घेतले जाते. ईव्हीएमला इंटरनेट कनेक्शन नसतं. शिवाय एकदा मतदान झालं की ती मशीन बंद केली जाते. बॅटरी काढल्या नंतर बिना वीज कोणतीही आकाशीय तरंग ईव्हीएम मध्ये नंतर हेराफेरी करू शकत नाही.
त्याचं तोंड अगदी लहान झालं. म्हणाला, “मला हे माहीत नव्हतं.” बहुतेक त्याने कधीच मतदान केलेलं नसावं.
Evm मशीन इंटरनेट वापरत नाही,…
Evm मशीन इंटरनेट वापरत नाही, evm मशीन कोणत्याच नेटवर्क ला कनेक्ट नसते
हे बरोबर आहे
मग evm हॅक च प्रश्न येतोच कुठे.
आणि evm हॅक केले जाते असा आरोप विरोधी पक्ष पण करत नाहीत. सत्तधारी लोक दिशाभूल करत आहेत.
हे अगदी बरोबर आहे.
राहुल गांधी चे व्होट चोरीचे आरोप आणि EC चे उत्तर याबद्दल पुढील ठिकाणी सविस्तर चर्चा केली आहे.
https://www.rediff.com/news/special/voter-deletions-ragas-charges-vs-ec…
चुकीच्या दिशेने विषय नेला जात आहे
Evm मशीन इंटरनेट वापरत नाही, evm मशीन कोणत्याच नेटवर्क ला कनेक्ट नसते
हे बरोबर आहे
मग evm हॅक च प्रश्न येतोच कुठे.
आणि evm हॅक केले जाते असा आरोप विरोधी पक्ष पण करत नाहीत. सत्तधारी लोक दिशाभूल करत आहेत.
Evm हॅक केले जाऊ शकत नाही पण evm मध्ये बिघाड नक्कीच निर्माण करू शकतो ज्या लोकांवर, यंत्रनेवर evm हाताळण्याची जबाबदारी आहे ते evm मध्ये बिघाड मात्र नक्की करू शकतात.
म्हणजे एका पक्षाला वोट दिले तरी ते दुसऱ्या पक्षाच्या नावावर जाऊ शकते.
जी चिट्ठी खाली पडते मशीन मधून त्यांची मोजणी आणि evm मशीन मिळालेला result हा जुळवून बघितला च पाहिजे.
पण नेमके हेच मतदान मोजणी वेळी केले जात नाही.
जो पर्यंत मागणी केली जात नाही तो पर्यंत त्या चिठ्या मोजल्या जात नाहीत हे चूक आहे.
आणि निवडून आयोग त्ता वर आडून बसला आहे.
मग कोणाला ही सहज शंका येईल evm मध्ये घोटाला करून वोट चोरी केली जात आहे.
. आपण बघितले तर असंख्य ठिकाणी 100 ते 5000 हजाराच्या फरकाने उमेदवार जिंकत असतात अशा ठिकाणी बोगस मतदान करून सहज पडणारा उमेदवार जिंकून आणला जाऊ शकतो.
आणि बोगस मतदार उभे केले जात आहेत असा आरोप विरोधी पक्ष करत आहेत त्या मध्ये तथ्य असू शकतो.
विरोधी पक्षांवर टीका करण्या पेक्षा निवडनुक आयोग नी विरोधी पक्षांच्या आरोप मध्ये तथ्य आहे असे मानून च योग्य ती काळजी घेतली पाहीज.
आरोप सरळ फेटाळून लावणे संशय वाढवतात