2014 ...पंतप्रधान पद आणि भाजप
आजच्या घडीला नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे अतिशय योग्य उमेदवार आहेत ,हे 1000% सत्य आहे.परंतु काहीवेळा सत्य आणि परिस्थितीनुरूप वास्तव यात फरक असतो. आज शिवसेनेने पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यापूर्वि एनडीए च्या सर्व घटकपक्षांना विश्वासात घ्या असे आवाहन केले आहे. भाजपचे पक्ष पातळी वरील विस्कळीत संघटन आणि सुसूत्रतेचा अभाव , कर्नाटकातील खेळखंडोबा आणि मोदींच्या नावाला असलेला नितीशकुमारचा विरोध यासारख्या बाबी विचारात घेता 2014 च्या निवडणुकीत नक्की काय होईल,याबाबत शंकेची पाल चुकचुकते. त्यातच कॉंग्रेस नितीशकुमारचा वापर प्यादया प्रमाणे करून तिसर्या आघाडीचे पिल्लू काढील ,आणि बाहेरून पाठिंबा देवून आपले नेहमीचे त्रिशंकु राजकारण खेळू पाहिल ,यात संशय नाही.
यास्तव निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी भाजपने कुशलतापूर्वक व्यूहरचना करून पक्षपातळीवरील गोंधळ निस्तारणे गरजेचे आहे. आधीच मोदींचे नाव पुढे केल्याने इतर इच्छुकांच्या गोटात नाराजी /अस्वस्थता असू शकते. यास्तव माझ्या मते सुषमा स्वराज यांचे नाव प्रधानमंत्री पदासाठी निश्चित केल्यास बरेच प्रश्न सुटतील.मोदी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते देवून मोदींच्या सल्ल्यानुसार त्यांच्या गुजरात मॉडेल वर आधारित राज्यकारभार केल्यास मोदीप्रेमींना जे अपेक्षित आहे,तसा भारत घडू शकतो. त्याचप्रमाणे भविष्यकाळात विरोध मावळल्यास मोदी प्रधानमंत्री बनू शकतात .पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मतांच्या आणि सीट्स च्या बेरजेच्या राजकरणात बाजी मारण्यासाठी सुषमा स्वराज उपयोगी पडू शकतील , कारण त्यांच्या नावावर सर्वमान्यता होण्याची जास्त शक्यता वाटते .
मंदार कात्रे
25 एप्रिल 2013
मुळात आपल्या संसदिय लोकशाहीत
मुळात आपल्या संसदिय लोकशाहीत "पंतप्रधानपदाचा उमेदवार" या टर्मला काहीही अर्थ नाही.
देशी, सहिष्णू वाजपेयी विरूद्ध विदेशी सोनिया गांधी असे लढाईला रूप मिळावे म्हणून भाजपाने/NDAने त्यांना 'पंतप्रधानपदाचे अधिकृत उमेदवार' म्हणून घोषित केले होते. त्यावेळी काँग्रेसने सोनिया गांधींना असा उमेदवार घोषित करणे टाळले होते.
२००४ च्या निवडणूकीतही सोनिया गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावे (आणि त्यांना च्यानेलांवर डिबेट्स साठी बोलवावे)यासाठी मिडीया + भाजपाने भरपूर प्रयत्न केल्याचे आठवते. पण त्याला यश आले नाही.
शक्यता १: आता यावेळी भाजपा अधिकृत उमेदवार घोषित करणार नाही असा माझा अंदाज आहे. ही निवडणूक अडवाणी, सुषमा स्वराज, अरूण जेटली, मोदी आणि अध्यक्ष म्हणून राजनाथ सिंह यांच्या संयुक्त नेतृत्त्वाखाली लढवली जाईल. तर एन्डीएचे अधिकृत नेतृत्त्व निमंत्रक या नात्याने शरद यादव यांना दिले जाईल असे वाटते. निवडणूकीनंतर भाजपा स्वबळावर १८० पर्यंत पोचली तर मोदींना मुकुट चढवला जाईल, अन्यथा इतर चारपैकी एकाचा नंबर लागु शकेल
शक्यता २: निवडणूक अडवाणींच्या नेट्रुत्त्वाखाली लढवली जाईल मात्र त्यांचे नाव स्वतः मोदी प्रस्तावित करतील. शिवाय मोदी लखनौ सारख्या उत्तरप्रदेशातील एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील जेणेकरून ते अप्रत्यक्षरित्या स्पर्धेत राहतील. पुन्हा एनडीए विजयी झाली तर अडवाणी पंतप्रधान आणि मोदी गृहमंत्री वगैरे असेच एखादे महत्त्वाचे खाते घेतील. आणि २०१७ मध्ये किंवा असेक कधीतरी अडवाणी निवृत्ती घेतील आणि तरूण रक्ताकडे म्हणजे मोदींकडे पंतप्रधानपद दिले जाईल.
मला तरी सध्या तरी भाजपाच्या दृष्टिने शक्यता १ अधिक उपयुक्त वाटते, परंतु अंतर्गत लाथाळ्या बघता शक्यता २ प्रत्यक्षात येणे अपरिहार्य वाटते.
कॉर्पोरेट्स आणि मीडियाने हाईप
कॉर्पोरेट्स आणि मीडियाने हाईप केलेला असल्याने मोदी हेच भाजपसाठी Best Bet आहेत यात शंका नाही.
[प्रत्यक्षात इतका हाईप असूनही विधानसभा निवडणुकीत मागच्यापेक्षा दोन जागा कमी पडल्या हे मीडिया विसरून गेली आहे]
(उमेदवार उभा राहिला तर आणि लोकपालाच्या पलिकडे काय हे सांगता आले तर) आपले मत आम आदमी पार्टीला.