Skip to main content

प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते

महाराष्ट्रात सध्या अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यावरून जोरदार धुमशान सुरू आहे.पण श्रद्धा म्हणजे काय? अंधश्रद्धा कशाला म्हणायचे? या प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीत. मुळात प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. अंध झाल्याशिवाय श्रद्धाळू होताच येत नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत ‘मामेकं शरणं’ असा स्पष्ट आदेशच दिला आहे. श्रीकृष्णाचा हा आदेश ‘फार बुद्धी चालवू नकोस' या पातळीवरचा आहे. श्रद्धेत बुद्धीवर भावनेचा कंट्रोल असतो. बुद्धी वापरली तर देवळातली मूतीं दगड ठरते. भावना वापरली तर मात्र हाच दगड ठेव ठरतो.

हे द्वंद्व तुकोबांनी फार सुंदर पद्धतीने मांडले आहे. तुकोबा म्हणतात :

पाषाण देव पाषाण पायरी ।
पूजा एका वरी पाय ठेवी ।।

मंदिराची पायरी आणि गाभा-यातील मूर्ती दोन्ही दगडाच्याच आहेत. पण, आपण एका दगडावर पाय ठेवतो आणि दुस-याची पूजा करतो. गाभा-यातील दगड हा दगड नसून देव आहे, असे "मानावे" लागते. याला श्रद्धा म्हणतात. ही श्रद्धा आंधळीच आहे. डोळस किंवा विज्ञानवादी श्रद्धा नावाचा काही प्रकारच अस्तित्वात नाही.

श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती हे ठरवायचे कोणी? त्याचे निकष काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा, या विष्यीच्या व्याख्या भ्रामक आहेत. आपल्या देवघरातील देवाला साजूक तुपातला नैवेद्य ठेवणे आणि गावकुसाबाहेरच्या मरी आईला बक-याच्या सागुतीचा नैवेद्य ठेवणे या दोन गोष्टींत ‘भावा’च्या पातळीवर कोणताही फरक नाही. पण, श्रद्धा-अंधश्रद्धेचा विषय येतो, तेव्हा यात आपण फरक करतो. देवघरातील देवाचा साजूक तुपातला नैवेद्य श्रद्धा ठरतो, तर म्हसोबाचा बोकडाचा नैवेद्य अंधश्रद्धा! हा दाभोळकर-मानव यांच्या प्रचार तंत्राचा परिणाम आहे का? नैवेद्य म्हणजे आपल्या नित्याच्या जेवणातील देवासाठी म्हणून बाजूला काढून ठेवलेला भाग. ज्याचा जो आहार असेल, तोच नैवेद्य म्हणून देवापुढे ठेवणे हे नैसगिंक आहे. प्रभूरामाने लंकेवर स्वारी करण्यापूवीं रामेश्वराला मांसाचाच नैवेद्य दाखविला होता.

जादूटोणा विरोधी कायदा श्रद्धेच्या विरोधात नाही; जादूटोणा, जारण-मारण, अंगात येणे, अंगारे-धुपारे करणे आदी गोष्टींच्या विरोधात आहे, असे म्हटले जाते. जादूटोणा, जारण-मारण, अंगात येणे, अंगारे-धुपारे आदि सर्व गोष्टी अंनिसने अंधश्रद्धेच्या यादीत टाकल्या आहेत. हा निकष तंतोतंत पाळायचे म्हटले तर आपले सगळे वेद, उपनिषदे, पुराणे अंधश्रद्धेच्या यादीत जाऊन निषिद्ध ठरतील. "अंगात संचार होणे" याचे एकच उदाहरण येथे आपण पाहू या. अंगात येणे, हा प्रकार भारतातील आदिवासी टोळ्यांतील एक प्रथा आहे, असे मानले जाते. पण, ते काही खरे नाही. वैदिक वाङ्मयात संचार होण्याशी संबंधित शेकडो कथा आहेत. बृहदारण्यक उपनिषदातली एक कथा येथे पुराव्यासाठी देतो.

गंधर्वगृहिता पतंचलकन्या!
विदेह देशाचा राजा जनक याने एकदा महायज्ञ केला. कुरू आणि पांचाल देशांतील ब्राह्मण यज्ञाला जमले. जमलेल्या ब्राह्मणांपैकी प्रश्नांची उत्तरे देण्यास समर्थ कोण आहे, हे जाणण्याची जनकाला इच्छा झाली. त्याने प्रत्येक शिंगाला एक पाद बांधलेल्या १ हजार गायी गोशाळेत बांधल्या. (पाद म्हणजे सोन्याचे नाणे.) जनक म्हणाला : ‘ब्राह्मणहो, तुमच्यामध्ये जो ब्रह्मिष्ठ (ब्राह्मणांत सर्वश्रेष्ठ) असेल त्याने या गायी घेऊन जावे!’ कोणाही ब्राह्मणास हिंमत होईना. तेव्हा याज्ञवल्क्याने आपल्या सामश्रवा नामक शिष्याला गायी घेऊन जाण्याची आज्ञा केली. तो गायी नेऊ लागला, तेव्हा इतर ब्राह्मणांना क्रोध आला. ते त्याची परीक्षा घेण्यासाठी धावले. प्रश्न विचारू लागले. जनकाचा होता अश्वल याने आधी प्रश्न केले. त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे याज्ञवल्क्याने दिली. नंतर जरत्कारूगोत्रोत्पन्न आर्तभाग याने प्रश्न केले. याज्ञवल्क्याने त्यालाही गप्प केले. त्यानंतर लह्याचा पुत्र भुज्यु याने प्रश्न केले. भुज्यु म्हणाला : ‘याज्ञवल्क्या, आम्ही मद्रदेशामध्ये प्रवास करीत होतो. आम्ही कपिगोत्री पतंचलाच्या घरी गेलो. त्याच्या मुलीच्या अंगामध्ये एक गंधर्व येत असे. आम्ही त्या गंधर्वाला विचारले की, तू कोण आहेस? तो म्हणाला, मी अंगिरसगोत्री सुधन्वा आहे.’

या कथेतील भुज्यूच्या निवेदनाशी संबंधित मूळ श्लोक असे :

अथ हैनं भुज्युर्लाह्यायनि पप्रच्छ याज्ञवल्क्येति होवाच ।
मद्रेषु चरका पर्यव्रजाम ते पतंचलस्य काप्यस्य गृहानैम ।
तस्यासीद्दुहिता गन्धर्वगृहिता, तमपृच्छाम कोऽसीति ।
सोऽब्रवीत सुधन्वाऽन्गिरस…।

-बृहदारण्यकोपनिषद. अध्याय तिसरा. ब्राह्मण तिसरे. श्लोक पहिला.

पतंचल ब्राह्मणाच्या मुलीच्या अंगात येत असे. ती ‘गन्धर्वगृहिता’ म्हणजे गंधर्वाने पछाडलेली होती. गंधर्व तिच्या मुखातून बोलत असे. असा हा कथाभाग आहे. अशा कथांचे काय करायचे? तुकोबांनी दिलेला दगडाचा दृष्टांत या कथांनाही लागू होतो. त्यांच्यावर पाय देऊन पुढे जायचे की पूजा करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण माझा देव दुसर्यासाठी दगड ठरतो, तेव्हा खरी समस्या निर्माण होते. अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यावरून जो वाद सुरु आहे, त्यच्या मुळाशी हीच समस्या आहे.

प्रकाश घाटपांडे Sun, 01/09/2013 - 20:01

मला गंमत वाटते कि मराठीत आपण अंधश्रद्धा म्हणतो पण हिंदीत त्याला अंधविश्वास म्हणतात. श्रद्धा हा शब्द खर तर हिंदीत देखील आहेच की!
दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पुस्तकात म्हणतात कि " श्रद्धा म्हणजे भावनेचे विचारामध्ये विकसित झालेले सत्याधिष्ठीत कृतीशील मूल्यात्मक रुप."
"उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात"
आता कुणी म्हणेल की या शाब्दिक कसरती आहेत. मला ते एका अर्थाने ते मान्यही आहे. जोपर्यंत आपल्या मेंदूत भावना नावाचा घटक आहे तो पर्यंत माणुस कमी अधिक प्रमाण अंधश्रद्ध असणार आहे.
[आपल्या तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने माझी ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा! माझी श्रद्धा ही समाजाला हानिकारक नाही म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या पद्धतीची मांडणीही समाजात होताना दिसते.
परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही]. ( उधृत अस्मादिकांचे मनोगत 'यंदा कर्तव्य आहे')
आता श्रद्धेची सर्वसमावेशक स्थल,काल,व्यक्ती निरपेक्ष अशी व्याख्या होउ शकत नाही हे मान्य केले पाहिजे. ती संकल्पना आहे. सतीची प्रथा हा एके काळी धर्मश्रद्धेचा भाग होता आता ती निखालस अंधश्रद्धा आहे. म्हणजे कालबाह्य व समाजविघातक असे ते क्रुर कृत्य आहे.
तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!

अरविंद कोल्हटकर Sun, 01/09/2013 - 20:46

एक शिकारी एकदा शिकारीसाठी जंगलात जातो. मचाणावर बसून खाली एक मेलेले रेडकू ठेवतो. त्याच्या अपेक्षेप्रमाणे काही वेळातच वाघ त्या रेडकाकडे लपतछपत येतो. तो समोर येताच शिकारी बार उडवितो आणि वाघाची शिकार होते.

ही गोष्ट म्हणजे ह्या धाग्याचे रूपकच म्हणता यावे. येथे शिकारी म्हणजे धागाकर्ते, रेडकू म्हणजे अंगात येण्याचे वर्णन असलेली वेदातील कथा आणि वाघ म्हणजे वेदविद्येचे अभिमानी. ही कथा सांगितल्याबरोबर ते अभिमानी आडोसा सोडून ह्या कथेचे समर्थन करायला बाहेर पडतील आणि मग त्यांच्यावर बार टाकून गंमत पाहता येईल ही शिकार.

पण असे होण्याची शक्यता दिसत नाही. धागाकर्त्यानेच म्हटल्याप्रमाणे 'श्रद्धा आंधळीच आहे. डोळस किंवा विज्ञानवादी श्रद्धा नावाचा काही प्रकारच अस्तित्वात नाही.' त्यामुळे अंगात येण्याची कथा वेदांमध्ये असली काय किंवा कोणा देवऋषीच्या सांगण्यात आली काय, दोन्ही ठिकाणी तिच्यावर विश्वास ठेवणे ही अंधश्रद्धाच आहे आणि तिचे कसलेच समर्थन करण्याची आवश्यकता नाही. वेदांमध्ये ही कथा आहे, तिला आपण आता काढून टाकू शकत नाही. ती आहे तेथे राहणारच. वेदांचा भाषाशास्त्रीय, ऐतिहासिक, लोककथेतील मिथक वगैरे मार्गाने अभ्यास करणार्‍यांना तिचा काय उपयोग करायचा असेल तो करून द्यावा पण तिच्या संदर्भाने आणखी काही वाद निर्माण करण्याची आवश्यकता काय?

'अशा कथांचे काय करायचे?' ह्या धागाकर्त्याच्या प्रश्नाचे हे उत्तर आहे.

राजेश घासकडवी Sun, 01/09/2013 - 23:23

श्रद्धा विरुद्ध अंधश्रद्धा या शब्दच्छलातून नक्की काय साधलं जातं कोणास ठाऊक. 'बाळगायला हरकत नाही अशी ती श्रद्धा' आणि 'बाळगणं मूर्खपणाचं ठरेल ती अंधश्रद्धा' अशी काहीतरी मूल्यात्मक वर्गवारी या शब्दांतून होते. शब्दांचेच खेळ चालू झाले की मग विज्ञानवाद हीदेखील श्रद्धाच आहे वगैरे मुक्ताफळंही येतात. खरं तर पडताळून पाहिली गेलेली विधानं आणि पडताळून न पाहिली गेलेली विधानं असे दोनच खरे वर्ग आहेत. 'चेंडू सोडला की तो खाली जमिनीवर पडतो' हे विधान पडताळून पाहिलं गेलेलं आहे. सर्वसाधारण निरीक्षणांतून 'जड चेंडू आणि हलका चेंडू एकाच गतीने खाली येत असावेत' असं विधान करता येतं. जोपर्यंत ते पडताळलं जात नाही तोपर्यंत वादविवादाला वाव असतो. गॅलिलिओसारखा कोणीतरी ते पडताळून पहातो, तेव्हा इतर विधानं बाद होतात, आणि ज्ञानाची प्रगती होते. 'आकाशात कोणीतरी एक देवबाप्पा नावाचा गृहस्थ आहे आणि तो सर्व जगाचं काम पहातो' हे पडताळलं न गेलेलं विधान आहे. त्यामुळे ज्ञानाच्या आवाक्यात काहीही फरक पडत नाही.

स्वतःकडे कोणत्या ज्ञानमूलक विधानांचा संचय बाळगावा हे ज्याचं त्याने ठरवावं. जोपर्यंत इतरांना त्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष त्रास होत नाही तोपर्यंत कोणी काही का मानेनात? सध्याच्या भारतीय समाजात अशा साठून राहिलेल्या न पडताळून पाहिलेल्या विधानांचा प्रचंड साठा आहे. अनेक लोक त्या साठ्याचा गैरफायदा घेऊन लोकांची लुबाडणुक, लैंगिक शोषण इत्यादी करतात. जादूटोणाविरोधी बिलात या फसवणुकीवर बंदी घालण्याचा प्रयत्न आहे.

माचीवरला बुधा Mon, 02/09/2013 - 17:57

In reply to by राजेश घासकडवी

या (आणि तत्सम) चर्चेअंती 'मनुष्य प्राण्याने कसे वागावे? / कुठली गोष्ट नैतिक?' या प्रश्नावर प्रकाश पडला तर बरे होईल - नाही का? राजेशने सुचवलेला वरील निकष हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा आहे. काही लोक म्हणतात की `विज्ञान' नैतिकतेच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाही. पण 'वैज्ञानिक / विवेकवादी दृष्टिकोन' मात्र नैतिकतेसंबंधीच्या प्रश्नांना उत्तरे सुचवू शकतो. किंबहुना नैतिक काय हे ठरवण्याचा तो एकमेव मार्ग आहे असे मला वाटते. पदार्थाविज्ञानातून रसायनशास्त्र उद्भवते. रसायनशास्त्रातून जीवशास्त्र आणि जीवशास्त्रातून समाजशास्त्र आणि नैतिकता (उत्क्रांतीच्या प्रक्रियेकरवी). यापैकी प्रत्येक शास्त्र गणित आणि तर्कशास्त्राच्या नियमांनी बद्ध आहे. यात 'निरुद्देशता' (randomness) आणि 'संख्याशास्त्र / संभाव्यतेचे' (statistics and probability) नियम सुद्धा समाविष्ट. (सगळेच नियम विज्ञानाला सापडलेले नाहीत आणि जे सापडले आहेत तेही परिवर्तनीय आहेत. पण आपल्याला काय माहिती नाही हे विज्ञानाला पुष्कळसे माहिती असते. असो). उत्क्रांतीच्या शास्त्राची तोंडओळख प्रत्येकाला आवश्यक आहे असे मला वाटते, कारण त्याशिवाय नैतिकतेचे खरे आकलन होणार नाही. इथपर्यंत आपल्यात एकमत आहे असे समजून पुढे जाऊया : जनुकांची पुनरुत्पादानाची ओढ उत्क्रांतीच्या वाटेने आपल्याला उपयुक्तातावादाकडे घेउन जाईल (आत्मभान असलेल्या ज्यास्तीत-ज्यास्त जीवांचे ज्यास्तीत-ज्यास्त भले ज्यात आहे ते नैतिक - इत्यादि). या पायावर आधारित मूल्यविचार आजकाल बरीच प्रगती करतो आहे आणि त्यावर उत्तम वाचण्यासारखे खूप आहे. हा मार्ग परिपूर्ण नसू शकेल पण उपलब्ध पर्यायांपेकी तो सर्वोत्कृष्ट आहे अशी माझी खात्री आहे ('श्रद्धा' म्हणा हवे तर!). हा मार्ग 'okham's razor' चे शास्त्रीय तत्व मानतो. त्यामुळे कोणत्याही अतींद्रिय कल्पनेची येथे गरज नसते.

श्रद्धा / अंधश्रद्धा आणि यावरील मतामतांच्या गलाबल्यातून आपल्याला या मार्गाने बाहेर पडता येईल काय?

प्रकाश घाटपांडे Mon, 02/09/2013 - 20:52

In reply to by माचीवरला बुधा

श्रद्धा / अंधश्रद्धा आणि यावरील मतामतांच्या गलाबल्यातून आपल्याला या मार्गाने बाहेर पडता येईल काय?

आपल्यापुरता मार्ग काढण्यासाठी हा मार्ग चांगला आहे. अंधश्रद्धांचा जन्म केवळ अज्ञान व अगतिकतेतून झाला नाही तर तो उत्क्रांतीतूनही झाला. पहा मेंदूचे अंतरंग

माचीवरला बुधा Mon, 02/09/2013 - 21:14

In reply to by प्रकाश घाटपांडे

अगदी बरोबर.

अर्थात, उत्क्रांतीतून उपजलेले सगळेच आजच्या परिस्थितीत योग्य (appropriate) असते असे नाही. अंधश्रद्धा निसंशय त्यापैकीच, नव्हे का?

'न'वी बाजू Mon, 02/09/2013 - 04:09

In reply to by बॅटमॅन

कृपया 'डावी श्रद्धा' (किंवा एकंदरीतच 'डावे' काहीही) म्हणजे नक्की काय, ते विशद करू शकाल काय? नाही म्हणजे, आपल्या रागाचे मूळ / कारण समर्थनीय असेलही कदाचित, परंतु त्याचे लक्ष्य (मराठीत: टार्गेट) सुनिश्चित (मराठीत: वेल-डिफाइन्ड) नसावे - किंवा कदाचित आपल्याअपेक्षेहून अधिक रुंद (मराठीत: ब्रॉड) प्रतीत होत असावे - असे वाटले, म्हणून ही पृच्छा.

- (डावा(?)) 'न'वी बाजू.

मी Wed, 04/09/2013 - 14:28

In reply to by चिंतातुर जंतू

शब्दखेळ सोडल्यास, पर्यावरण मुलतत्त्ववादी हे डाव्यांच्या अंधश्रद्धेचे हक्काचे स्थान असल्याचे आरोप अनेक डाव्यांनीच केले आहेत.

प्रकाश घाटपांडे Mon, 02/09/2013 - 13:29

In reply to by बॅटमॅन

डाव्यांमधे कुणी श्रद्धा वगैरे असे काही म्हटले की त्याला बूर्झ्वा बूर्झ्वा असे म्हणुन उजवीकडे फेकतात म्हणे!

बॅटमॅन Mon, 02/09/2013 - 14:16

In reply to by प्रकाश घाटपांडे

बरोब्बर! भाव तोच असला तरी त्या शब्दाची मात्र अ‍ॅलर्जी असते असे निरीक्षण आहे.

ऋषिकेश Mon, 02/09/2013 - 14:33

In reply to by बॅटमॅन

डावी श्रद्धासुद्धा अशीच आहे.

डावी आणि श्रद्धा एकत्र वाचुनच 'दिन बन गया' :P
बाकी सहमत आहेच ;)

बॅटमॅन Mon, 02/09/2013 - 14:35

In reply to by ऋषिकेश

तुमचा दिन बन गया हे वाचून बरे वाटले. तदुपरि डाव्यांची श्रद्धा कशी नसते हे पहायला आवडेल ;)

बाकी सहमतीबद्दल धन्यवाद आहेतच ;)

ऋषिकेश Mon, 02/09/2013 - 14:37

In reply to by बॅटमॅन

डाव्यांना विचाराल तर त्यांची श्रद्धाच काय त्यआंचे काहीच नसते :)
"ब्लड म्हणून नाही अन् प्रेशर म्हणून नाही" अशी अवस्था असते त्यांची ;)

बॅटमॅन Mon, 02/09/2013 - 14:43

In reply to by ऋषिकेश

डाव्यांना विचाराल तर त्यांची श्रद्धाच काय त्यआंचे काहीच नसते

डाव्यांना विचाराल तर मिळणारे उत्तर आणि प्रत्यक्ष परिस्थिती यातले महदंतर ते अप्रिशिएटवू शकत नैत. विश्व देवाने निर्मिले तर देवाला कुणी निर्मिले या प्रश्नाप्रमाणेच सर्वांना लेबले चिकटवत फिरणार्‍या डाव्यांना लेबल कोण लावणार हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहेच ;)

बॅटमॅन Mon, 02/09/2013 - 15:01

In reply to by ऋषिकेश

एक "तिसरी आघाडी" पाहिजे. काये, अन्य सर्वांना लेबले चिकटवण्यातूनच डावे उदयाला आले आणि सध्या बळजोर होऊन बसलेत. शिवाय, सध्याच्या उजव्यांत इतका दमही नाहीये. तस्मात हे काम तूर्त तरी दुसर्‍या कुणाला सुपारी देऊन केल्या गेले तरच बरेय ;)

अरविंद कोल्हटकर Mon, 02/09/2013 - 02:30

धागाकर्त्याने उद्धृत केलेला बृहदारण्यकोपनिषदाचा भाग, त्याच्यावरील शांकरभाष्याच्या भाषान्तरासह,येथे छापील पान ४५९ ते ४६५ पर्यंत उपलब्ध आहे. इच्छा असल्यास ते मुळात वाचावे.

'तस्यासीद्दुहिता गन्धर्वगृहीता' ह्या २-४ शब्दात तिच्यामध्ये कोणी गंधर्व वास करत होता अशी पृच्छक, लाह्याचा नातू भुज्यु' ह्याची समजूत दर्शविली आहे. ह्यापलीकडे ह्या अंगात येण्याचे काहीहि अवडंबर वा कौतुक माजवलेले नाही. पुढचे विस्तृत लिखाण विश्वाचा विस्तार किती आहे ह्याविषयी त्या गंधर्वाचे उत्तर आणि त्यावर याज्ञवल्क्याचे प्रत्युत्तर ह्यांनी व्यापलेला आहे. इच्छा असल्यास त्यावर विस्तृत चर्चा होऊ शकते आणि ते उत्तर आजच्या विज्ञानाला न पटणारे आहे असेहि म्हणणे चुकीचे होणार नाही. वेदांचे तत्त्वज्ञान तुम्हास कितपत पटते ह्यावर ते अवलंबून असेल. उपनिषदातील ह्या सर्व उतार्‍याचा गाभा ही चर्चा आहे.

तो गाभा बाजूस ठेवून वेदातील अंधश्रद्धेचे उदाहरण म्हणून हा उतारा त्याच्यातील 'तस्यासीद्दुहिता गन्धर्वगृहीता' ह्या चार शब्दांसाठी केवळ पुढे आणणे म्हणजे टरबुजाचा गर फेकून देऊन बिया खाण्यासारखे आहे.

Missing the wood for the trees!

मी Mon, 02/09/2013 - 14:02

In reply to by अरविंद कोल्हटकर

उत्तम प्रतिसाद.

पुढचे विस्तृत लिखाण विश्वाचा विस्तार किती आहे ह्याविषयी त्या गंधर्वाचे उत्तर आणि त्यावर याज्ञवल्क्याचे प्रत्युत्तर ह्यांनी व्यापलेला आहे. इच्छा असल्यास त्यावर विस्तृत चर्चा होऊ शकते.

हा भाग रोचक वाटतो आहे, ह्यावर कोल्हटकरांनी थोडे लेखन करावे ही नम्र विनंती.

तिरशिंगराव Mon, 02/09/2013 - 18:22

एका प्रख्यात फलंदाजाला अजुनही आपण चांगले खेळू शकतो असे वाटणे,ही त्याची अंधश्रद्धा आहे. प्रत्यक्षांत 'रिफ्लेक्सेस' कमी झाल्यामुळे, बॅट व पॅडमधून बॉल स्टंपवर जातो हे विज्ञान आहे.

तेजा Mon, 02/09/2013 - 19:21

In reply to by तिरशिंगराव

एका प्रख्यात फलंदाजाला अजुनही आपण चांगले खेळू शकतो असे वाटणे,ही त्याची अंधश्रद्धा आहे.

हा प्रख्यात फलंदाज म्हणजे सचिन तेंडुलकर आहे का?

सूर्यकान्त पळसकर Tue, 03/09/2013 - 16:46

अरविंद कोल्हटकर यांच्या प्रमाणे मला सुद्धा एक रूपक सुचले आहे.

"एक शिकारी एकदा शिकारीसाठी जंगलात जातो. मचाणावर बसून खाली एक मेलेले रेडकू ठेवतो. त्याच्या अपेक्षेप्रमाणे काही वेळातच वाघ त्या रेडकाकडे लपतछपत येतो. तो समोर येताच शिकारी बार उडवितो आणि वाघाची शिकार होते."

  • येथे शिकारी म्हणजे अरविंद कोल्हटकर.
  • रेडकू म्हणजे कोल्हटकर यांनी वर लिहिलेली प्रतिक्रिया.
  • आणि वाघ म्हणजे या लेखाचे लेखक अर्थात मी स्वत:.
  • हे रूपक सांगितल्याबरोबर लेखक आडोसा सोडून ह्या लेखाचे समर्थन करायला बाहेर पडतील आणि मग त्यांच्यावर बार टाकून गंमत पाहता येईल ही शिकार.

पण असे होण्याची शक्यता नाही. कारण हा लेख लिहिताना लेखकाने कुठलाही अभिनिवेश बाळगलेला नाही. सध्या अंधश्रद्धा विरोधी कायद्यावर वाद-विवाद सुरू आहे. त्या संदर्भाने हा लेख लिहिलेला आहे. कोणावर शरसंधान करता यावे, यासाठी नाही. शंकासुरांनी अकारण शंका घेऊन शरसंधान करू नये.

अजो१२३ Wed, 04/09/2013 - 12:04

In reply to by सूर्यकान्त पळसकर

माझ्यावर जर कोणी निष्कारण टिका केली तर मी काय बोलावे याची बर्‍यापैकी ट्रेनिंग या प्रतिसादातून मिळते. एरवी उद्देशाबद्दलच टिका झाली तर मला माफी मागण्याखेरीज दुसरा पर्याय सुचत नसे.

तेजा Wed, 04/09/2013 - 15:33

In reply to by सूर्यकान्त पळसकर

पाव्हण्याचे गहू, अन् पाव्हण्यालाच घातले जेऊ!

जुनी म्हण आहे. पळसकर साहेबांचा प्रतिसाद वाचून आठवली.

अजो१२३ Tue, 03/09/2013 - 17:42

प्रतिसादाच्या शीर्षकाची धुन 'सर्वसंगपरित्याग' च्या धुनेवर बेतलेली आहे.

अंधश्रद्धा म्हणून काय काय त्यागले पाहिजे यासाठी संगीताविरुद्ध आणि कपड्यांविरुद्ध कोणी बोलले तर उत्तरादाखल माझ्याकडे चांगला युक्तिवाद उरत नाही. (असे विरुद्ध बोलायची भूमिका खाली मीच घेतली आहे.)

१. संगीत , गाणी ऐकणे - काहीही कशावरही घासून, बडवून आवाज काढायचे आणि त्याला सुरम्य संगीत म्हणून ऐकायचे ही मानवाची एक जुनी परंपरा आहे. संगीत बनवणार्‍या लोकांनी संगीताने माणसाला प्रसन्न वाटते, इ इ म्हणून त्याला चांगलेच मूर्खात काढले आहे. आणि माणसाला असे 'बनवून' ते कितीतरी काळापासून पैसा उकळत आहेत. मी लहानपणापासून बरीच गाणी ऐकली आहेत. उदा.- "ऊडता आवळी मज, ढगाची सावली..." हे गाणे मला कधी उमगले नाही. या गाण्याचा एकूण अर्थ जाउच द्या, उडणारा कोण? मी कि ढग? इतकेही हे गाणे ऐकून कळले नाही. बाकीचे कळण्याचा प्रश्नच नव्हता. जे काही सांगायचे आहे ते नीट सोप्या गद्यात सांगता येत नाही का? गाऊन, वाजवून, ढोल बडवून सांगीतले तर मन इतके प्रसन्न होते, कोणता तरी गर्भितार्थ कळतो असे का वाटते? हे परंपरा म्हणून आपल्या मनावर बिंबवले आहे आणि पुरोगामीत्वाच्या शोधात कोणालाही हे त्यागले पाहिजे.

चला, गाण्यात काही शब्द तरी असतात. शास्त्रीय संगीतात? कॉलेजात माझ्या पार्टनरचा रेडिओ होता. त्याच्यावर दुपारी अगोदर गाणी लागायची. ती ऐकत आम्हाला डुलकी लागायची. तेवढ्यात शास्त्रीय संगीत लागायचे. आम्ही लगेच उठून रेडिओ बंद करायचो. (घरात माकड शिरले तर ते अगोदर हुसकाऊन मगच झोपायचे ना? असा आमचा त्याबद्दल पावित्रा होता.) मग नंतर उठण्याचाच कंटाळा यायला लागला. होस्टेलमधे कडक उन्हाळ्यात पोटापेक्षा जास्त खाऊन, क्लास बंक करून दुपारी पहुडलेले असताना उठून रेडिओ बंद करणे म्हणजे महाकंटाळवाणे काम! आम्ही तो तसाच सोडायचो. मग ते संगीतकार केकाटत राहायचे. दोन वर्षानी चक्क मला ओ कि ठो कळत नसताना, वास्तवात ते भयंकर कंटाळवाणे संगीत, क्लासिकल संगीताच्या आवडीचे 'प्रेस्टीज' मित्रांकडून ऐकल्यामुळे कानाला बरे वाटायला लागले. आजही मी एफ एम वर शास्त्रीय संगीत लागले, आणि कारमधले माझे कलिग मला 'अर्लि मॅन' म्हणायला लागले, तरी ते चालू ठेवतो.

सबब संगीत, गाणे हे परंपरा आहे, अंधश्रद्धा आहे आणि त्यात लूटही आहे.

२. कपडे घालणे - आता मानव प्रगत झाला आहे आणि पर्यावरणापासून रक्षणासाठी त्याने कपडे घातले पाहिजे....ब्ला ब्ला ब्ला... हे ठीक आहे. पण घरी पाहुणे आले तर घरातले वातावरण (met वाले) बदलते का? मग मी ते आले असताना थोडे वेगळे कपडे का घालतो? अगदी एकदाही न चूकता मी रोज ऑफिसमधे बूट घालून जातो. वास्तविक it does not make senses in hot, humid June, July. ह्या सगळ्या परंपरा आहेत. त्या मी बाकीचे पाळतात म्हणून पाळतो. शुद्ध अंधश्रद्धा. गैरसोयीच्या पण पुरोगाम्यांच्या रडारबाहेरच्या.

नितिन थत्ते Wed, 04/09/2013 - 13:00

In reply to by अजो१२३

शास्त्रीय संगीत आवडणे किंवा ते ऐकल्यावर बरे वाटणे, शांत वाटणे हे श्रद्धा/अंधश्रद्धेच्या कक्षेत येणार नाही. कारण बरे वाटणे हे सब्जेक्टिव आहे आणि बरे वाटते असे म्हणणार्‍या व्यक्तीला खरोखरच बरे वाटते की नाही हे तपासता येणार नाही. पण शास्त्रीय संगीत ऐकल्यावर गायी जास्त दूध देतात किंवा शौचास साफ होते वगैरे समजुती/दावे मात्र श्रद्धेच्या कक्षेत येतील.

संगीत आवडणे हे एखादी भाजी आवडण्या/न आवडण्यासारखेच आहे.

अजो१२३ Wed, 04/09/2013 - 16:20

In reply to by नितिन थत्ते

नितिनजी,
मला मूलतः बरी न वाटणारी गोष्ट संस्कारांमुळे कशी बरी वाटायला लागली याकरिता शास्त्रीय संगीताचे उदाहरण घेतले आहे. तसे साध्या संगीताचे उदाहरण घेतले तरी चालेल. 'चंदनाशी परिमल आम्हा काय त्याचे...' असे आळवून आळवून न म्हणता गद्यात 'चंदनाच्या सुगंधाचे मला अप्रूप नाही. त्यापेक्षा मी ईश्वराचे गोड नाम घेईन.' असे म्हणायला काय हरकत आहे?

बरे वाटणे व्यक्तिसापेक्ष आहे म्हणून बर्‍यानबर्‍याचा मूळ मुद्दाच श्रद्धा/अंधश्रद्धा कक्षेबाहेर कसा जाईल? एसी लावून तापमान २४ डीग्री केले आणि आर्द्रता ५०% केली तर बरे वाटते. ही अंधश्रद्धा नाही याची मी ग्वाही देऊ शकतो. इथे तपासणी करायची गरज नाही. मला दरवर्षी एक सूर्यप्रदक्षिणा घालावी लागते. हे मला आवडते, न आवडते याचा संबंध काय? घालावी लागते हे सत्य आहे, त्यात काही अंधश्रद्धा नाही. म्हणून व्यक्तिसाक्षेपतेचा आणि श्रद्धा/अंधश्रद्धा असण्या नसण्याचा काही संबंध नाही. Subjectivity and superstition are unrelated concepts.

शिवाय संगीत ऐकून बरे वाटणे व्यक्तिसापेक्ष असेल तर , मोजता येत नसेल तर आणि म्हणून अंधश्रद्धा आहे का हे सांगता येत नसेल तर गायीच्या लॅक्टेटींग प्रणालीवर संगीताचा काय परिणाम होतो हे ही मोजता येत नाही. गाय संगीतामुळे जास्त दुध देते ही जितकी मोठी अंधश्रद्धा आहे तितकीच मोठी अंधश्रद्धा संगीताने माणसाला बरे वाटते हीही आहे.

आता भाजी बद्दल. अन्नच न आवडणारा माणूस पाहिला आहे का? नाही. कारण अन्नसेवन माणसाच्या जीवनाचा नैसर्गिक, अविभाज्य भाग आहे. तसेच झोपेचे. पण संगीत? गाणे? ते पूर्णतः अनैसर्गिक आहे. अन्नातली एखादी भाजी आणि संगीत यांची तुलना म्हणजे 'तुला मोबाईल हवा कि कान?' सारखे आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 04/09/2013 - 17:30

In reply to by नितिन थत्ते

बरे वाटते असे म्हणणार्‍या व्यक्तीला खरोखरच बरे वाटते की नाही हे तपासता येणार नाही.

अगदीच असं नाही. मेंदूत काय बदल होतात हे मॉनिटर करून हे तपासता येईल. पण असं तपासता आलं की मग तिथे श्रद्धा/अंधश्रद्धा यांचा प्रश्नच येणार नाही. ते अगदीच प्रयोगातून विज्ञान होईल.

शास्त्रीय संगीत ऐकल्यावर गायी जास्त दूध देतात किंवा शौचास साफ होते वगैरे समजुती/दावे मात्र श्रद्धेच्या कक्षेत येतील.

सहमत.
शिवाय सनातनच्या संस्थळावर धुंडाळल्यास पाश्चात्य संगीत ऐकण्याचे तोटे आणि भारतीय* शास्त्रीय संगीत ऐकण्याचे फायदे, स्त्रिया-पुरुषांनी कसं बसावं याची जंत्रीही "सचित्र" मिळू शकेल.

*भारतीय शास्त्रीय संगीत असं काही नसून हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीत असतं याची कल्पना आहे. पण सनातनवाल्यांकडून एवढी अपेक्षा नाही.

बॅटमॅन Wed, 04/09/2013 - 17:33

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भारतीय शास्त्रीय संगीत असं काही नसून हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीत असतं याची कल्पना आहे. पण सनातनवाल्यांकडून एवढी अपेक्षा नाही.

नाही पण ते दोन्हीही एका भारतीय संगीताचेच प्रकार/उपप्रकार आहेत ना? दोहोंत भेदभाव न केल्याबद्दल सनातनने खरे तर डोके चालवले असेच म्हणायला पाहिजे. =))

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 04/09/2013 - 19:51

In reply to by बॅटमॅन

आता हे माझ्यासमोर म्हणाल तर खपून जाईल. मला प्रॉग रॉक, हेवी मेटल ते हिंदुस्थानी, कर्नाटक संगीत असे सगळे प्रकार आवडतात. (काही मेलं स्टँडर्डच नाही!) पण एखाद्या सनातन्यासमोर म्हणू नका. पुढचा अर्धा-एक तास प्रवचन ऐकण्याचं नाटक करावं लागेल.

अनामिक Thu, 05/09/2013 - 08:37

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला प्रॉग रॉक, हेवी मेटल ते हिंदुस्थानी, कर्नाटक संगीत असे सगळे प्रकार आवडतात.

चर्चील गटातली ना तू, मग बरोबर आहे!

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 05/09/2013 - 21:57

In reply to by अनामिक

एका गटात असण्याएवढं पातिव्रत्य असतं आणखी काय हवं होतं. तिथेच तर मेलं आमचं घोडं अडतं ना!

बॅटमॅन Thu, 05/09/2013 - 15:54

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पण एखाद्या सनातन्यासमोर म्हणू नका. पुढचा अर्धा-एक तास प्रवचन ऐकण्याचं नाटक करावं लागेल.

असल्या रेम्याडोक्यांना उलट प्रवचने ऐकवण्याचे महत्कार्य आम्ही बहुता दिवसांपासून करीत आहो. कल्जि नसवि.

'न'वी बाजू Thu, 05/09/2013 - 16:01

In reply to by बॅटमॅन

लग्न झालेले दिसत नाहीये, बहुतेक.

(पुढेमागे यथावकाश) तुमचे लग्न होवो, आणि सासरा सनातनी (ऑर ईक्विव्हॅलंट तत्सम) मिळो, अशा हार्दिक शुभेच्छा!

बॅटमॅन Thu, 05/09/2013 - 16:29

In reply to by 'न'वी बाजू

लग्न झाल्यावरही न बदलणारे कैक नमुने पाहिलेत. विशेषतः महिलांच्या मतांतील विखार हा लग्नाने कमी होत नाही असे निरीक्षण आहे.

तदुपरि शुभेच्छेचा द्वितीयार्ध फाट्यावर मारला आहे.

'न'वी बाजू Thu, 05/09/2013 - 16:46

In reply to by बॅटमॅन

तदुपरि शुभेच्छेचा द्वितीयार्ध फाट्यावर मारला आहे.

ते तुमच्या हातात नाही.

'मुट्ठी में है तकदीर हमारी' हे निखालस असत्य आहे.

आडकित्ता Sun, 08/09/2013 - 19:50

In reply to by बॅटमॅन

फार दिवसांपासून विचारू म्हणत होतो. खासगीत विचारण्याइतकी सलगी नाही म्हणून इथे विचारतो.
ब्याटम्यान भौ, तुमचे वय वर्षे किती?

उत्तर जाहीर/व्यनि/विरोप/विपू/खरड/इ. कसेही दिलेत तरी चालेल.

अ‍ॅडव्हान्स धन्यवाद!

Nile Sun, 08/09/2013 - 20:30

In reply to by आडकित्ता

काय हे डागदर!! अहो त्याचा जरा सायकॉलॉजीकल प्रॉब्लेम आहे वयाच्या बाबतीत. त्याला हा प्रश्न विचारायचा नसतो. (त्याचं खरं वय पाहता मी एकेरीत हाक मारणं सुद्धा चूक आहे, पण तसं केल्याने त्याला आराम पडतो असं दुसर्‍या डागदरांचं म्हणणं आहे!)

लै मोठा वांदा केलात ब्वॉ तुम्ही!

बॅटमॅन Sun, 08/09/2013 - 20:41

In reply to by Nile

अहो त्याचा जरा सायकॉलॉजीकल प्रॉब्लेम आहे वयाच्या बाबतीत. त्याला हा प्रश्न विचारायचा नसतो.

भलतेच इणोदी बॉ तुम्ही निळोजी.

Nile Sun, 08/09/2013 - 23:30

In reply to by आडकित्ता

चतकोरशे वयाला माहितीपूर्ण?? अरे कुठे गेले रे ते संपादक, फक्त सज्ञान लोकांना प्रवेश आहे ना इथे, जरा बघा की!!

तिरशिंगराव Wed, 04/09/2013 - 19:41

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मेंदूत काय बदल होतात हे मॉनिटर करून हे तपासता येईल. पण असं तपासता आलं की मग तिथे श्रद्धा/अंधश्रद्धा यांचा प्रश्नच येणार नाही. ते अगदीच प्रयोगातून विज्ञान होईल.

सुबोध जावडेकरांच्या मेंदुवरच्या पुस्तकात यावरचे प्रयोग वर्णन केले आहेत. ज्यांना संगीत आवडतं, अशांना, त्यांचे आवडते संगीत ऐकवल्यावर त्यांच्या मेंदूतले प्लेजर पॉइंटस उद्दीपित झालेले सिद्ध झाले आहे.

अजो१२३ Wed, 04/09/2013 - 20:44

In reply to by तिरशिंगराव

बरे वाटते का नाही हे ठरवायला विज्ञान सक्षम आहे कि नाही हा मुद्दा नाही. कशाने बरे वाटते ती प्रत्येक बाब 'डोळस' असेलच असे नाही. उदा. नरबळी देताना कुणाला बरे वाटेल. मग ?
उद्या संगीताने फार बरे वाटते असे सिद्ध झाले (लोक सांगतात तितकं पुरे आहे मला) तरी तसे वाटणे एक मूर्खपणाचा संस्कार नाही असे म्हणता येत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 04/09/2013 - 22:01

In reply to by अजो१२३

कशाने बरे वाटते ती प्रत्येक बाब 'डोळस' असेलच असे नाही. उदा. नरबळी देताना कुणाला बरे वाटेल. मग ?

डोळस आणि आंधळेपणा हा मुद्दा अंनिसकडून किंवा अन्य पुरोगाम्यांकडून आल्याचं दिसत नाही. 'दुसर्‍याला त्रास न देणे' हा मुद्दा आहे. मग त्यात नरबळी, जबरदस्तीने लैंगिक संबंध, धिंड काढणे इ. सगळे प्रकार त्याज्य होतात. स्वतःच्या घरातच २०० डीबी आवाज करायला ना नाही, त्याने भले कान का फाटेनात. पण त्याची दुसर्‍यावर सक्ती करण्याला विरोध आहे. स्पीकरच्या भिंतीवर भीमसेन जोशी लावा किंवा उर्मिला धनगर, विरोधाचा मुद्दा कायम रहातो.

'न'वी बाजू Wed, 04/09/2013 - 22:29

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्पीकरच्या भिंतीवर भीमसेन जोशी लावा किंवा उर्मिला धनगर, विरोधाचा मुद्दा कायम रहातो.

या वाक्यातून, भीमसेन जोशी आणि उर्मिला धनगर (ही जी कोणी असेल ती) यांच्याबाबत उच्चनीच भेदभाव व्यक्त होणे अपेक्षित आहे किंवा कसे, ते नीटसे वा खात्रीलायकरीत्या कळू शकले नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 04/09/2013 - 22:46

In reply to by 'न'वी बाजू

भीमसेन जोशींचे सनातन, सगळे नाही, फॅन्स उर्मिला धनगर ज्या प्रकारची गाणी म्हणते ते कमी दर्जाचं समजतात. मला उर्मिला धनगरची काही गाणी मला आवडतात, आतातरी मला जाऊ दे.

शिवोऽहम् Thu, 05/09/2013 - 11:51

In reply to by 'न'वी बाजू

सगळीकडे पोलिटिकली करेक्ट असलेच पाहिजे असे नाही.

अभिरुची व्यक्तीसापेक्ष असली तरी गुणवत्ता ही गोष्ट लोकशाहीने ठरत नाही, ठरू नये.

नितिन थत्ते Thu, 05/09/2013 - 13:03

In reply to by शिवोऽहम्

गुणवत्ता लोकशाहीने ठरू नये हे बरोबर. पण पॉलिटिकल करेक्टनेसचा प्रश्न नाही. गुणवत्ता ठरवण्याच्या बाबतीत भेदभाव असण्यामागे क्वालिटी हे एकच कारण नसावे असे निरीक्षण आहे.

["मालवून टाक दीप चेतवून अंग अंग" हे अभिजात समजले जाते आणि "चल गवतात शिरू नि गंमत करू" हे अश्लील समजले जाते]

पहिल्या ओळीत काय करायचे आहे त्याचा स्पष्ट संकेत आहे दुसर्‍या ओळीत तशी सूचकता नाही. गंमत करू यात पुष्कळ शक्यता आहेत. पहिल्या ओळीत अशा शक्यता नाहीत. तरीही पहिल्याला अश्लील म्हटले जात नाही.

शिवोऽहम् Thu, 05/09/2013 - 15:35

In reply to by नितिन थत्ते

["मालवून टाक दीप चेतवून अंग अंग" हे अभिजात समजले जाते आणि "चल गवतात शिरू नि गंमत करू" हे अश्लील समजले जाते]

उदाहरण पटले नाही. एक गीत(गायले गेलेले या अर्थाने) म्हणुन तुलना होते आहे की केवळ शब्दरचना म्हणुन? एखादे काव्य किंवा त्याची दृश्य प्रस्तुती अभिजात/अश्लील समजले जाणे याला अनेक पैलु असु शकतात.

केवळ शब्दरचना म्हणुन जरी दोघांची तुलना केली तरी काव्यगुणांत डावे/उजवे कोणते ते समजायला हरकत नसावी.

'न'वी बाजू Thu, 05/09/2013 - 16:42

In reply to by शिवोऽहम्

उदाहरण पटले नाही. एक गीत(गायले गेलेले या अर्थाने) म्हणुन तुलना होते आहे की केवळ शब्दरचना म्हणुन? एखादे काव्य किंवा त्याची दृश्य प्रस्तुती अभिजात/अश्लील समजले जाणे याला अनेक पैलु असु शकतात.

हे म्हणणे पटले नाही. सादरकर्त्याच्या कल्पकतेनुसार एखादे मुळात बीभत्स अथवा अश्लील नसलेले गीतही दृश्य प्रस्तुतीतून बीभत्स किंवा अश्लील पद्धतीने सादर केले जाऊ शकते.

फारा वर्षांपूर्वी पेपरांतून छापून आलेली एक जुनी बातमी या निमित्ताने आठवते. तेव्हा दावूद इब्राहीमचे वास्तव्य दुबईत असे. एकदा दावूद इब्राहीमच्या वाढदिवससोहळ्याचे प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात परफॉर्म करायला जॉनी लीवरला बोलावण्यात आले होते. त्या प्रसंगी जॉनी लीवरने 'कॉमेडी' म्हणून भारताचे राष्ट्रगीत साभिनय सादर केले होते. ('पंजाब सिंधु गुजरात मराठा' मधील 'पंजाब' म्हणताना भांगड्याचा अभिनय, 'मराठा' म्हणताना बोटांनी तंबाखू चोळण्याचा अभिनय, इ.) भारतात परत आल्यावर जॉनी लीवरला त्याकरिता 'राष्ट्रगीताचा अपमान केल्या'च्या आरोपाखाली अटकही करण्यात आली होती, असे अंधुकसे आठवते.

यावरून भारताच्या राष्ट्रगीतास बीभत्स ठरवता येईल काय? (मुळात त्याची शब्दरचना तर बीभत्स नसावी; किमान ती तशी असणे अपेक्षित नसावे.)

किंवा, दुसरे उदाहरण घ्यायचे, तर "नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है", "मुट्ठी में है तकदीर हमारी" हे गाणेही काही विशिष्ट शालेय सेटिंगमध्ये भयंकर अश्लील वाटू शकते, भयंकर अश्लीलरीत्या म्हटलेही जाऊ शकते. मूळ कवीच्या मनात तशी कल्पनाही नसावी, असे मानण्यास जागा आहे. शिवाय, ज्या कोठल्या चित्रपटात हे गाणे असेल, तेथील त्याचे मूळ सादरीकरणही अश्लील नसावे, याबाबत खात्री आहे. (अश्लीलता लाइज़ इन द आय ऑफ द बिहोल्डर?)

केवळ शब्दरचना म्हणुन जरी दोघांची तुलना केली तरी काव्यगुणांत डावे/उजवे कोणते ते समजायला हरकत नसावी.

पुन्हा, पटले नाही.

शॉर्न ऑफ एनी प्रेझेंटेशन्स अ‍ॅंड सिच्युएशनल रेफरन्सेस, "नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है", "मुट्ठी में है तकदीर हमारी" हे गाणे (केवळ शब्दरचना म्हणून) अभिजात, की अश्लील?

आडकित्ता Sun, 08/09/2013 - 19:57

In reply to by 'न'वी बाजू

इफ यू रीड ओन्ली वर्ड्स,
"नन्हे मुन्ने बच्चे" हे प्रीटीन - पौगंडपूर्व - एजग्रूपात - वयोगटात - येत असल्याने मुठ्ठी बद्दलच्या कल्पनेच्या इतर भरार्‍यांचे गुलाबी कुरळे पंख अद्याप उगवलेलेच नसल्याने, मी तरी या गाण्याला अभिजात म्हणेन :)

नुसत्याच शब्दांवरून 'आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ' हे देखिल अश्लिल ठरवता येईल ;)

'न'वी बाजू Thu, 05/09/2013 - 16:42

In reply to by नितिन थत्ते

["मालवून टाक दीप चेतवून अंग अंग" हे अभिजात समजले जाते आणि "चल गवतात शिरू नि गंमत करू" हे अश्लील समजले जाते]

कण्डिशनिंग हो, कण्डिशनिंग! दुसरे काऽही नाही.

"मालवून टाक दीप चेतवून अंग अंग" हे अभिजात समजले जाते...

कारण शेवटी ती "भटे"च... त्याला काय करणार?

गंमत करू यात पुष्कळ शक्यता आहेत.

खरे आहे. उदाहरणार्थ, दोन लहान मुले गवतात शिरून नाकतोडे आणि इतर यकीएस्ट पॉसिबल संकीर्ण कीटक पकडून बाटलीत भरून त्यांचा संग्रह करू शकतात. लहान मुलांची (गवतात शिरून) "गंमत करण्या"ची बालसुलभ कन्सेप्ट टिपिकली अशाच धर्तीवरची असते.

प्रस्तुत गीताचे नायक आणि नायिका (किंवा नायक-१ आणि नायक-२, किंवा नायिका-अ आणि नायिका-ब, व्हॉटेवर) आपले बालपण री-लिव्ह, रीइनव्हेण्ट करण्याचा प्रयत्न करत नसतील कशावरून?

पहिल्या ओळीत काय करायचे आहे त्याचा स्पष्ट संकेत आहे

खरे आहे. साटल्य नावाचीही काही चीज असते, हे यांना कोण सांगणार?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 05/09/2013 - 21:42

In reply to by शिवोऽहम्

इथे थोडी गडबड वाटते.

(माझा) मूळ मुद्दा गुणवत्ता, अभिजातता असा नसून कोणतं संगीत ऐकून लोकांच्या मेंदूत आनंद वाटेल अशी रसायनं तयार होतात, असा काहीसा आहे. यात संगीतात डावं-उजवं करण्याचा संबंध नाही. (स्पीकरच्या भिंतीवर माझ्या आवडीचं कोणतंही गाणं लावलं तरी माझं डोकं फिरेल. तिथे संबंध संगीताच्या गुणवत्तेशी नसून डेसिबलचा आहे.)

अजो१२३ Wed, 04/09/2013 - 22:41

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बहुतेक आपली चर्चा अंधश्रद्धा काय आहे यावर आहे. लेखकाने सर्व श्रद्धा अंधश्रद्धा असतात असे म्हटले आहे. 'संगीत' बरे वाटते ही अंधश्रद्धा आहे. संगीत नैसर्गिक नाही. त्यात दुसर्‍यांना त्रास देखिल होतो. मी दारु पिल्याने घरातले पैसे संपून बायका मूलांना जसा त्रास होतो तसा मुझिक सिस्टिम, सीड्या विकत घेतल्यानेही होतो. संगीतात 'उपजाऊ' वेळ घातल्याने होतो. त्रास असा ऑनलाईन, भौतिकच व्हावा असे नाही. कालांतराने, आर्थिक, इ इ झालेला त्रासही त्रासच असतो.

तथाकथित आणि खर्‍या सर्व पुरोगाम्यांना संगीत आवडते असे वाटते. नाहीतर आजपावेतो त्यांनी हा उद्योग बंद पाडला असता. ज्या विज्ञानाला 'मानवी आवाजाचे मूलभूत एकक' नावाचा प्रकार माकड असतो कि माणूस हे माहित त्याने 'संगीत हे मानवाची मूलभूत, इ गरज आहे' असा तात्विक वा तांत्रिक शोध लावला असण्याची सुतराम शक्यता नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 05/09/2013 - 17:22

In reply to by अजो१२३

आपली चर्चा अंधश्रद्धा काय आहे यावर आहे. लेखकाने सर्व श्रद्धा अंधश्रद्धा असतात असे म्हटले आहे.

सापाच्या नावाखाली अंगण चोपून घेण्याचा भले लेखकाचा बेत असेल; प्रत्येकाने तसंच केलं पाहिजे असं काही नाही.

तथाकथित आणि खर्‍या सर्व पुरोगाम्यांना संगीत आवडते असे वाटते. नाहीतर आजपावेतो त्यांनी हा उद्योग बंद पाडला असता.

न आवडणारे उद्योग बंद पाडणं हे काम धर्मरक्षकांचं असतं असं जुना-नवा इतिहास पाहिला तर दिसतं. पुरोगामी संख्येने कमीच दिसतात, एवढी दंडेली करणार कुठून? जादूटोणा विरोधी कायद्याला १७ वर्षात 'मुहूर्त' निघाला नाही, पुरोगामी काय (कप्पाळ!) इतर काही बंद पाडणार?

अवांतर: 'मानवी आवाजाचे मूलभूत एकक' नावाचा प्रकार असतो की नाही माहित नाही. पण काही लोक असे असतात ज्यांना बोलता येत नाही पण गाता येतं.

बॅटमॅन Thu, 05/09/2013 - 17:30

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

न आवडणारे उद्योग बंद पाडणं हे काम धर्मरक्षकांचं असतं असं जुना-नवा इतिहास पाहिला तर दिसतं.

अगदी बरोबर. फक्त "रक्षावयाचा धर्मु" कोणता हे प्रसंगपरत्त्वे बदलते. उदा. चीनमधली सांस्कृतिक क्रांती ही तथाकथित पुरोगाम्यांनी लादलेली होती.

या ठिकाणी असे न आवडणारे उद्योग बंद पाडण्याची कामे तथाकथित पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या विचारप्रणालींचे पालन करणार्‍यांनी केलेली आहेत त्यांचे वर्णन पाहता येईल.

थोडक्यात, ज्याचे हाती ससा तो पारधी. आजपर्यंत या पुरोगाम्यांच्या हातात ताकद नव्हती म्हणून ते हिंसा घडवू शकले नाहीत इतकेच.

ऋषिकेश Thu, 05/09/2013 - 17:36

In reply to by बॅटमॅन

आजपर्यंत या पुरोगाम्यांच्या हातात ताकद नव्हती म्हणून ते हिंसा घडवू शकले नाहीत इतकेच

तितकेसे खरे नसावे.
विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळात काही पुरोगामी सुधारकांच्या हातात राजकीय/न्यायिक ताकद होती व त्याचा उपयोग विधायक कामांसाठी झालेला दिसतो.
महात्मा गांधी हे मला कितीही आदरणीय असले तरी त्यांना पुरोगामी म्हणता येणार नाही बहुदा म्हणून ते उदा सोडून देत आहे ;)

मुळात आपला मुद्दा पटवण्यासाठी हिंसेचा मार्ग अवलंबणे हेच प्रतिगामित्वाचे मुख्य लक्षणांपैकी एक नै का?

बॅटमॅन Thu, 05/09/2013 - 17:43

In reply to by ऋषिकेश

विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळात काही पुरोगामी सुधारकांच्या हातात राजकीय/न्यायिक ताकद होती व त्याचा उपयोग विधायक कामांसाठी झालेला दिसतो.

याबद्दल असहमती नाहीच. न आवडणारे उद्योग बंद पाडायला ताकद लागते ती पुरोगाम्यांकडे हल्लीच आलेली असल्याने त्यांना एकूणच विधायक आणि विघातक मूल्य अलीकडे जास्त आले असे म्हणायचे होते. तदुपरि त्यांनी ताकदीचा दुरुपयोगही कैकवेळेस तेवढ्याच चिरडीने केला हे दुर्लक्षिले जाऊ नये एवढाच मुद्दा होता.

मुळात हिंसेचा मार्ग अवलंबणे हेच प्रतिगामित्वाचे मुख्य लक्षणांपैकी एक नै का?

याला एकच एक गोळीबंद उत्तर माझ्याकडे नाही. कितीही काही म्हटले तरी जगण्यासाठी काहीएक प्रमाणात हिंसा अनिवार्य आहे. तिचे निर्मूलन अज्जीच होणे केवळ अशक्य. बाकी या वाक्याचे "काकूमूल्य" जबरी आहे हे जाताजाता नमूद करतो ;) हा विचार भाबडा जास्त अन प्रॅक्टिकल कमी वाटतो.

'न'वी बाजू Thu, 05/09/2013 - 20:20

In reply to by अरविंद कोल्हटकर

जे कुटले जाते, त्यास कूटच म्हटले जाते. ('जो डर गया, समझो मर गया'च्या चालीवर.)

अजो१२३ Fri, 06/09/2013 - 11:06

In reply to by ऋषिकेश

तितकेसे खरे नसावे.

पाश्चात्य देश आपल्या भारताच्या पुढे आहेत हे तितकेसे खरे नाही का?

पुरोगामी लोकांनीच आज जग जेथे आहे तेथे आणले आहे. आज जितकी प्रगती झाली आहे ती त्यांच्याच खाती जमा आहे.

अजूनही एक गोष्ट. पुरोगाम्यांचे काम प्रतिगाम्यांना ठेचणे इतकेच नसते. त्यांचे अशी बरीच मते असतात जी प्रतिगाम्यांच्या विरोधात येत नाहीत (उदा. शत्रूवर तलवार किंवा बाण चालवण्यापेक्षा तोफ चालवा. घोड्यावर जाण्यापेक्षा मोटारगाडीत जा. 'पृथ्वी विश्वाच्या केंद्राशी नाही.' ला विरोध झाला पण 'बाह्य असंतुलित बल लागले नसताना पदार्थ आपली सरळ रेषेतली समान गती किंवा निश्चलता कायम ठेवतो.' ला विरोध झाला नाही. वास्तविक हा दुसरा शोध सर्वच 'माया, जादू, इ' प्रकारांवर आणि 'जादूई वि़ज्ञानावर' महाभयंकर आघात होता.)

सत्ताधीश नेहमीच पुरोगामी असतात. १००% गोष्टींत नसले तर ६०% गोष्टींत असतात. आजही भारतातल्या प्रत्येक माणसाला सवते सवते घेऊन 'तू अगोदर हिंदू, इ कि अगोदर धर्मनिरपेक्ष?' असा प्रश्न विचारला तर जवळजवळ प्रत्येक जण आपल्या व्यक्तिगत जीवनात 'आपण एका विशिष्ट धर्माचे' असेच सांगेल. तरीही गांधींनी, नेहरूंनी सेक्यूलर भारत बनवला, बनवू शकले. हिजड्यांची समाजात काय प्रतिष्ठा आहे हे सर्वाना माहित असावे. सर्वोच्च न्यायालयाने जसा घटनेचा अर्थ लावला तसा लावायची हिंमत आजपावेतो कुणाला झाली होती?

सबब सत्ता नेहमी पुरोगाम्यांच्या हातात असते, असत आली आहे, असावी (हे माझ्याकडून).

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 05/09/2013 - 18:52

In reply to by बॅटमॅन

ताज्या आणि (भौगोलिक स्थानदृष्ट्या) जवळच्या इतिहासातली ही काही उदाहरणं माझ्या डोक्यात होती:

Gujarat model? Saffron sainiks ransack Gufa. Again
Asaram Bapu's men threatened, tried to bribe cops: Rajasthan police

समाजातल्या लोकांची विभागणी काही गटात करायची असेल तर पुरोगामी आणि धर्मरक्षक हे दोनच गट पुरणार नाहीत; तेव्हा मुळात हा वाद कशासाठी हे काही समजलं नाही. हे एक.

दुसरं असं की बहुसंख्य समाजाची मूल्यं मागच्या काळापेक्षा पुरोगामी आहेत म्हणून बहुसंख्य समाज पुरोगामी आहे असं ठोसपणे म्हणता येणार नाही. उलट बहुसंख्य समाजाची जी काही मूल्यं आहेत त्यापेक्षा वेगळा, open-minded आणि सामाजिक प्रगतीचा विचार देणार्‍यांना त्या-त्या समाजातले पुरोगामी म्हणता येईल. पुरोगामीपण सिद्ध होण्यासाठी एक ठराविक असा साचा नाही. व्याख्येनुसार हे लोक अल्पसंख्य असणार. म्हणजे कोणत्याही समाजातल्या पुरोगाम्यांच्या हातात ताकद असणं शक्य नाही; दुबळ्या लोकांनी हिंसा केलेली मला तरी माहित नाही.

शिवाय ऋषिकेशशी सहमती. स्वतःचं मत लोकांवर लादण्यासाठी हिंसा करणार्‍यांना पुरोगामी म्हणणं मला तरी जमणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा, यदाकदाचित ह्या नाटकात कर्णाचं पात्र सारखं "हा आपला अपमान आहे" असं बोलतं; तेव्हा दुर्योधन त्याला आठवण करुन देतो की हा आपला नाही तुझा अपमान आहे. (संदर्भ)

बॅटमॅन Thu, 05/09/2013 - 19:46

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

समाजातल्या लोकांची विभागणी काही गटात करायची असेल तर पुरोगामी आणि धर्मरक्षक हे दोनच गट पुरणार नाहीत; तेव्हा मुळात हा वाद कशासाठी हे काही समजलं नाही. हे एक.

बायनरीकरणाचा वास आला, जो नेहमी येतोच. त्यामुळे म्हणालो.

उलट बहुसंख्य समाजाची जी काही मूल्यं आहेत त्यापेक्षा वेगळा, open-minded आणि सामाजिक प्रगतीचा विचार देणार्‍यांना त्या-त्या समाजातले पुरोगामी म्हणता येईल. पुरोगामीपण सिद्ध होण्यासाठी एक ठराविक असा साचा नाही. व्याख्येनुसार हे लोक अल्पसंख्य असणार. म्हणजे कोणत्याही समाजातल्या पुरोगाम्यांच्या हातात ताकद असणं शक्य नाही; दुबळ्या लोकांनी हिंसा केलेली मला तरी माहित नाही.

बहुसंख्य समाजाच्या मूल्यांपेक्षा वेगळी मूल्ये असणे हा प्रीरेक्विसिट असेल तर व्याख्या चुकीची होईल. समजा बहुसंख्य समाज काही उपकारक मूल्ये बव्हंशी पाळतो तर पुरोगामित्त्वाच्या व्याख्येत ते इन्क्लूड पाहिजे. एकच एक साचा नसला तरी तो दरवेळेस समाजाशी फटकून असतो असे म्हणण्यापेक्षा समाजातल्या ऑर्थोडॉक्सीशी फटकून असतो असे म्हटले तर जास्त योग्य होईल. काही लोक पुरोगामी असल्याने समाजाला जसे एकहाती पुरोगामी म्हणता येणार नाही तसेच काही लोकांच्या ऑर्थोडॉक्सीमुळे समाजालाही दोष देता येणार नाही. लोक आचारांपेक्षा विचारांत कधीही जास्त कट्टर असतात. नेटवर ते लै बघावयास मिळते.

(आता इथे नेहमीचा कर्कशतेला प्रपोर्शनल विवेकवाद सुरू न व्हावा अशी भाबडी इच्छा आहे, पण ती एक अंधश्रद्धाच ठरेल बहुतेक.)

त्यामुळे पुन्हा एकदा, यदाकदाचित ह्या नाटकात कर्णाचं पात्र सारखं "हा आपला अपमान आहे" असं बोलतं; तेव्हा दुर्योधन त्याला आठवण करुन देतो की हा आपला नाही तुझा अपमान आहे.

त्याच न्यायाने, आसारामसमर्थक हेही खरे धर्मरक्षक नव्हेतच. असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 05/09/2013 - 21:39

In reply to by बॅटमॅन

बहुसंख्य समाज सनातनी किंवा प्रतिगामी असल्याचं वगैरे मी म्हटलेलं नाही.

लोक आचारांपेक्षा विचारांत कधीही जास्त कट्टर असतात. नेटवर ते लै बघावयास मिळते.

याची काही उदाहरणं वाचायला आवडतील. (स्वगतः कच्चा माल काय, कुठेही शोधावा!)

त्याच न्यायाने, आसारामसमर्थक हेही खरे धर्मरक्षक नव्हेतच. असो.

सनातनावाले काही वेगळंच सुचवत आहेत. सनातनवाले स्वतःचं वर्णन "शास्त्रीय परिभाषेत धर्मशिक्षणाचा प्रसार अन् हिंदूहित यांसाठी कार्यरत" असं करतात. आता सनातन, आसाराम इ. लोक तथाकथित का खरे धर्मरक्षक असा काही वाद असेल तर त्याबद्दल काहीही विचार मांडायला मी असमर्थ आहे.

अजो१२३ Fri, 06/09/2013 - 10:38

In reply to by बॅटमॅन

बहुसंख्य समाजाच्या मूल्यांपेक्षा वेगळी मूल्ये असणे हा प्रीरेक्विसिट असेल तर व्याख्या चुकीची होईल. समजा बहुसंख्य समाज काही उपकारक मूल्ये बव्हंशी पाळतो तर पुरोगामित्त्वाच्या व्याख्येत ते इन्क्लूड पाहिजे. एकच एक साचा नसला तरी तो दरवेळेस समाजाशी फटकून असतो असे म्हणण्यापेक्षा समाजातल्या ऑर्थोडॉक्सीशी फटकून असतो असे म्हटले तर जास्त योग्य होईल. काही लोक पुरोगामी असल्याने समाजाला जसे एकहाती पुरोगामी म्हणता येणार नाही तसेच काही लोकांच्या ऑर्थोडॉक्सीमुळे समाजालाही दोष देता येणार नाही.

आपल्या वैचारिक प्रगल्भतेपुढे साष्टांग दंडवत!
पण लोकांना इतकं स्पष्टीकरण द्यावं लागावं हेही दुर्दैव आहे.

चिंतातुर जंतू Fri, 06/09/2013 - 10:59

In reply to by बॅटमॅन

>> बहुसंख्य समाजाच्या मूल्यांपेक्षा वेगळी मूल्ये असणे हा प्रीरेक्विसिट असेल तर व्याख्या चुकीची होईल. समजा बहुसंख्य समाज काही उपकारक मूल्ये बव्हंशी पाळतो तर पुरोगामित्त्वाच्या व्याख्येत ते इन्क्लूड पाहिजे. एकच एक साचा नसला तरी तो दरवेळेस समाजाशी फटकून असतो असे म्हणण्यापेक्षा समाजातल्या ऑर्थोडॉक्सीशी फटकून असतो असे म्हटले तर जास्त योग्य होईल.

बहुसंख्य समाजाच्या मानानं पुढचा* विचार करणं पुरोगामित्वात अंतर्भूत असावं असं वाटतं. उदाहरणार्थ, धर्मसंस्था-राज्यसंस्था ह्यांचं विलग होणं (सेक्युलर स्टेट) किंवा स्त्री-पुरुष समानता, समलिंगी नातेसंबंध वगैरे जिथे आता बहुसंख्यांच्या अंगवळणी पडलेलं आहे (उदा : युरोपातले नॉर्डिक देश) तिथले पुरोगामी आता (गेल्या काही वर्षांत) वेगळ्या मुद्द्यांवर लढताहेत. उदा : समलिंगी विवाह, इच्छामरण वगैरे. त्यामुळे आपापल्या समाजात पुरोगामी अल्पसंख्य असणार असं वाटतं. तसे ते नसते, तर त्यांना पुरोगामी म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही बहुतेक. बहुसंख्य समाज उदारमतवादी असू शकतो, पण पुरोगामी नाही असं वाटतं.

* - पुढचा म्हणजे नक्की काय काय ह्याविषयी अर्थात मतभेद असू शकतात.

Nile Sat, 07/09/2013 - 05:25

कृपया 'डावी श्रद्धा' (किंवा एकंदरीतच 'डावे' काहीही) म्हणजे नक्की काय,

या प्रश्नाचं उत्तर कुठायं? च्यायला इथे पाऊणशे प्रतिसाद वाचावे लागले त्यामुळे! एकतर हाफिसातून यायला मिळत नाही आजकाल, (ररा आजोबांनी चावटपणा करून आमच्या हाफिसात कळवलेलं दिसतंय! हे पुणेरी लोक काय सुधरायचे नाहीत!) आणि स्वतःचा महत्त्वाचा वेळ घालवून आम्ही इथे प्रतिसाद पहायला यावं तर प्रतिसादच नाहीत! जरा जबाबदारीनं वागत चला की राव!!

प्रकाश घाटपांडे Sat, 07/09/2013 - 08:54

In reply to by Nile

कृपया 'डावी श्रद्धा' (किंवा एकंदरीतच 'डावे' काहीही) म्हणजे नक्की काय,

डावी श्रद्धा म्हणजे उजवी अश्रद्धा.

वामा१००-वाचनमा… Tue, 16/09/2014 - 18:32

In reply to by प्रकाश घाटपांडे

आज मी जिवंत आहे हे सत्य आहे पण मी उद्या श्वास घेणार आहे - ही श्रद्धा नव्हे तर काय आहे? मग प्रत्येक श्रद्धा नाकारायची तर हीदेखील नाकारा ;)

धनंजय Tue, 16/09/2014 - 20:29

In reply to by वामा१००-वाचनमा…

> आज मी जिवंत आहे हे सत्य आहे पण मी उद्या श्वास घेणार आहे
> - ही श्रद्धा नव्हे तर काय आहे? मग प्रत्येक श्रद्धा नाकारायची तर
> हीदेखील नाकारा. (डोळा मिचकावत)
हा नकारगर्भ अलंकारिक प्रश्न (र्‍हेटॉरिकल क्वेश्चन) आहे खास. म्हणजे असे म्हणायचे आहे, की ही श्रद्धा नाकारता येत नाही.

परंतु ही श्रद्धा नाकारणे सामान्य आहे. ती श्रद्धा नाकारल्यामुळेच लोक आयुर्विमा विकत घेतात. (नाकारणे म्हणजे काय? श्वास घेणार किंवा नाही दोन्ही शक्यता ग्राह्य धरायच्या. आजूबाजूचे अनुभव बघता, पुढील अमुक इतक्या दिवसांत/वर्षांत त्या शक्यतांची संभावनीयता साधारण "ह वा क्ष" इतपत आहे इतपत ठरवणे. आणि त्याबाबर "ज्ञ" इतके पैसे गुंतवण्यास ग्राहक तयार असतो.)

"अमुक इतक्या दिवसांत/वर्षांत" : दीर्घकाळाचा हिशोब करायचा ठरवला (उदाहरणार्थ >१५० वर्षे), तर श्वास घेणार नाही याची संभवनीयता खूपच जास्त होते. जवळजवळ शंभर टक्के. त्यामुळे काहीच कालमर्यादा दिली नाही, तर श्वास घेत राहू अशी श्रद्धा ठेवणे फारच चुकीचे वाटते.

अरविंद कोल्हटकर Tue, 16/09/2014 - 21:45

In reply to by वामा१००-वाचनमा…

आज मी जिवंत आहे हे सत्य आहे पण मी उद्या श्वास घेणार आहे - ही श्रद्धा नव्हे तर काय आहे? मग प्रत्येक श्रद्धा नाकारायची तर हीदेखील नाकारा.>

अपर्णाबाई हे पूर्ण गंभीरपणे म्हणत नाहीत असे मला वाटते कारण त्या असे म्हणतांनाच डोळा मिचकावतांना दिसत आहेत. हे पूर्ण गंभीरपणे कोणी म्हटलेच तर त्याला मी पुढील उत्तर देईन.

मी आज जिवंत आहे आणि उद्याहि श्वास घेणार आहे ही श्रद्धा नसून माझ्या स्वतःच्या आणि मी आसपास पाहतो त्या सर्वांच्या अनुभवावरून घेतलेली calculated risk आहे. उद्याचा दिवस मी कसा पाहणार आहे का अजिबात पाहणार नाही ह्याबाबत मला काहीतरी निर्णय प्रतिक्षणी घ्यावा लागतो. हा निर्णय घेण्यापासून मी पळू शकत नाही. गेली कित्येक वर्षे मी ज्या दिवशी जिवंत होतो त्याच्या दुसर्‍या दिवशीहि शिल्लक होतो, त्याच्या पुढच्या दिवशीहि मी श्वास घेतला हे मी स्वतः हजारो वेळा अनुभवले आहे. आसपासच्या लोकांकडे पाहून मला त्यांच्या बाबतीतहि हेच दिसत आहे आणि त्यावरून मी उद्याहि श्वास घेणार आहे ही risk घेणे मला योग्य वाटत आहे, उलटपक्षी ह्याविरुद्धची - म्हणजे मी उद्याच मरणार आहे असे मानण्याची risk आज घेण्याचे मला काहीच कारण दिसत नाही. पुढेमागे जेव्हा मला शेवटच्या आजारात घरघर लागेल तेव्हाहि मी जर असेच म्हणालो की मी आज जिवंत आहे म्हणजेच उद्याहि श्वास घेणार आहे तर ती मात्र calculated risk नसेल, तर श्रद्धा असेल. ह्याहि पलीकडे जाऊन मी किंवा आसपासच्या हितचिंतकांनी कोणा बाबाच्या अंगार्‍याने मी पुनः उठून बसेन असे सांगितले तर ती अंधश्रद्धा असेल. ही श्रद्धा वा अंधश्रद्धा अशामुळे असेल की कोणाचाच अनुभव तसे सांगत नाही.

मी घेतलेली calculated risk एखादेवेळी खोटीहि ठरेल. रस्त्याने मी साइडवॉकवरून नेमस्त माणसासारखा नाकासमोर बघून चालत असतांना एखादी कार तिच्या चालकाचा ताबा सुटल्याने रस्ता सोडून माझ्या अंगावरून जाऊन मला चिरडवून टाकू शकेल हेहि शक्य आहे. शेवटी ती calculated risk च, उलटू पण शकते!

वामा१००-वाचनमा… Tue, 16/09/2014 - 21:48

In reply to by अरविंद कोल्हटकर

नाही मी गंभीरपणे च म्हटलं होतं पण हे बॅकग्राऊंड कॅल्क्युलेशनच बरोबर वाटतय.
आपला अन अधनंजय यांचा दोन्ही प्रतिसाद आवडले.

आडकित्ता Tue, 16/09/2014 - 22:59

In reply to by अरविंद कोल्हटकर

पुढेमागे जेव्हा मला शेवटच्या आजारात घरघर लागेल तेव्हाहि मी जर असेच म्हणालो की मी आज जिवंत आहे म्हणजेच उद्याहि श्वास घेणार आहे तर ती मात्र calculated risk नसेल, तर श्रद्धा असेल. ह्याहि पलीकडे जाऊन मी किंवा आसपासच्या हितचिंतकांनी कोणा बाबाच्या अंगार्‍याने मी पुनः उठून बसेन असे सांगितले तर ती अंधश्रद्धा असेल.

याच्या पुढे जाऊन मी असे म्हणेन, की उद्या मी श्वास घेणारच, यापाठी श्रद्धा नाही तर आशा आहे. अन कधी ना कधी तो श्वास थांबणारच, ही सत्य परिस्थिती आहे.
या सत्याचा, अन त्या आशेचा एकत्र गैरफायदा घेत, तुला पुढचा जन्म मिळेल, अन श्वास तिथे सुरू राहील, असे सांगणारे "तत्वज्ञान" जास्त घातक आहे. कारण इथे एक प्लॉसिबल अल्टरनेटिव्ह देत, इन्शुरन्स एजंट तुमच्या कुटुंबाप्रति असलेलं तुमचं प्रेम जसं एक्स्प्लॉईट करतो, तसं तुमचं तुमच्या श्वासांवरचं/ असण्यावरचं प्रेम एक्स्प्लॉइट केलं जातं.
अन या पुनर्जन्म कन्सेप्टवरून तयार केलेलं सर्वात अल्टिमेट एक्स्प्लॉयटेशन = कर्मविपाक!

मन Tue, 16/09/2014 - 22:07

In reply to by वामा१००-वाचनमा…

आज मी जिवंत आहे हे सत्य आहे पण मी उद्या श्वास घेणार आहे - ही श्रद्धा नव्हे तर काय आहे?
मी उद्या श्वास घेणार आहे ही शक्यता आहे.
शिवाय "मी उद्या श्वास घेणार " ही शक्यता "मी उद्या श्वास घेणार नाही" ह्या शक्यतेहून बरीच जास्त आहे.

मी उद्या श्वास घेणार आहे ही शक्यता आहे.
शिवाय "मी उद्या श्वास घेणार " ही शक्यता "मी उद्या श्वास घेणार नाही" ह्या शक्यतेहून बरीच जास्त आहे.

"Jam tomorrow"सारखा काही न्याय लावल्यास या तर्कातील फोलपणा सहज ध्यानात यावा.

बोले तो, "उद्या तुम्ही श्वास घेणार" ही शक्यता, "उद्या" कधीही उजाडणार नसल्याकारणाने, शून्यवत् आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------

कारण, उजाडतो तो नेहमी "आज"च असतो.

सोपे आहे; जर मुळात "उद्या"च उगवला नाही, तर तुम्ही "उद्या" श्वास घेणार कसा?

यावरून (उगाचच) आठवले. आनुवंशिकतेचे एक उदाहरण देतात: "जर तुमच्या आईवडिलांना मुले झाली नाहीत, तर तुम्हालाही मुले होणार नाहीत, आणि तुमच्या मुलांना मुले होण्याची शक्यताही अतिशय कमी आहे." सरळ आहे; जर तुमच्या आईवडिलांना मुले झाली नाहीत, तर तुम्हाला मुले व्हायला तुम्ही मुळात येणार कुठून? म्हणजे मग तुम्हाला मुले होणार नाहीत, हे निश्चित. आणि तुम्हाला जर मुले झाली नाहीत, तर तुमच्या मुलांना मुले होण्यासाठी तुमची मुले मुळात येणार कुठून? म्हणजे तुमच्या मुलांनाही मुले होणार नाहीत, हेही निश्चित. अँड सो ऑन अँड सो फोर्थ. अ‍ॅड नॉशियम किंवा अ‍ॅड इन्फिनिटम, चवीप्रमाणे. तसेच आहे हे.

मन Wed, 17/09/2014 - 09:21

In reply to by 'न'वी बाजू

अशा काही मजेदार कमेंटांसाठी तुम्ही करत असलेला छळवादही माफ.
माफ करणे/ माफी असणे ह्याचा भावार्थ समजून घ्यावा. "तुला कोण माफी मागायला आलं रे चोच्या" असे म्हणत रसभंग करु नये.
माझे नाव अथवा आय डी "चोच्या" नसले तरी इथे संवादाच्या संदर्भाने तुम्ही ते विशेषण म्हणून वापरण्याची शक्यता असू शकते.
आता ह्या वाक्यातील "शक्यता" शब्दावरून नवीन खेळ सुरु करु नये.
"खेळ" ह्याचा अर्थ प्रत्यक्षात मैदानात खेळला जातो तोच खेळ इतका संकुचित नसावा. "नवीन प्रतिसादांचा भडिमार" हा अर्थ लावून पहा.
"अर्थ" हा शब्द मराथी-संस्कृतमध्ये घेतात त्या अर्थाने घ्यावा.earth असे स्पेलिंग असलेल्या शब्दाचा इथे संबंध नाही.
शिवाय मराठी-संस्कृतमधील रक्कम्/संपत्ती/मूल्य ह्या संबंधी जो "अर्थ" - "अर्थकारण " अपेक्षित असते, त्याबद्दल इथे बोलणे सुरु नाही, ह्याची नोंद घ्यावी.
त्याबद्दल गब्बर सिंग ह्यांचेशी कॉण्ट्याक्ट करावा.
गब्बर सिंग म्हणजे ऐसीवर जे गब्बर सिंग ह्या नावाने वावरतात ते. रामगढ मधील ठाकूर - वीरु - जय वगैरे मंडळींनी ज्याच्या विरोधात आघाडी उघडली होती,
ते गब्बर हे नव्हेत. त्या गब्बर भेटायला तुम्हाला चित्रपटाच्या पडद्यात घुसून भेटावे लागेल.
चित्रपटाच्या पडद्यात घुसण्याच्या कौशल्याचा आम्ही उल्लेख केला असला तरी ती विद्या आम्हास अवगत नाही. आमच्याकडे विचारणा करण्यात स्वतःचा आणि आमचा वेळ घालवू नये.
एका सरळ साध्या टिबालाही पोस्ट्-स्क्रिप्ट असू शकते असा विचार केल्याबद्दल आपले कौतुक करावेसे वाटते. इतक्या उत्सुकतेने इथवर वाचल्याबद्दल आभार.

वामा१००-वाचनमा… Wed, 17/09/2014 - 18:21

In reply to by बॅटमॅन

=))

मन Thu, 18/09/2014 - 09:39

In reply to by 'न'वी बाजू

सर्वांना थ्यांक्स!
साक्षात नवीबाजूंनी दखल घेतली म्हणजे खरच जमलय म्हणायचं थोडंफार का असेना. :)