Skip to main content

आप आणी केजरीवाल

नुकताच एक इमेल फिरतफिरत मला आला .त्याचा सारान्श असा की-

दिल्लीतील निवड्णुकानन्तर निर्माण झालेली त्रिशन्कू स्थिती पाहता कोन्ग्रेस हतबल झाली ,परन्तु मोदीन्च्या वाढत्या प्रभावाने गळितगात्र झालेल्या सोनिया बाइना व्हॅटिकन मधुन सुचना आली की तुम्ही मोदीना रोखण्यासाठी केजरीवाल याना पाठिम्बा द्यावा. त्यामुळे आपोआप मिडिया चा रोख मोदी वरुन केजरीवाल आणि आप कडे वळेल . लोक्सभा निवडणुका होइपर्यन्त पाठिम्बा चालू ठेवा ,नन्तर कधिही ते आपचे सरकार कोसळवता येइल.

सध्या आप आणि केजरीवाल याना मिडियात मिळनारी अवास्तव प्रसिद्धी आणि मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट क्षेत्रातिल आकर्शित होत असलेले दिग्गज इत्यादि स्थिती पाहुन वर मोदी व भाजप ची मते फोडुन कोन्ग्रेस विरोधी मतविभाजन करुन भाजप ला सत्तेपासुन रोखण्यासाठी ही चाल आहे असा सन्शय येतो ,त्याच प्रमाने उपरोल्लेखित व्हॅटिकन- सोनिया प्रकरण देखिल खरे असावे असा सन्शय येतो कारण आग असल्याशिवाय धूर येत नाही !

Taxonomy upgrade extras

नितिन थत्ते Sat, 04/01/2014 - 17:45

बॉऽऽऽऽऽऽर्र....

पण मग आता काय करावे त्याचा आदेश नागपूर किंवा अमेरिकेतून आला नाही का?

अतिशहाणा Sat, 04/01/2014 - 18:18

In reply to by नितिन थत्ते

अमेरिका आपली धोरणे आजकाल तिस्ता सेटलवाड व/वा तथाकथित स्युडोसेक्युलरांना विचारुन ठरवते हे खात्रीलायकरीत्या कळले आहे. उदा. विहिंपच्या एका कार्यकर्त्रीला ओबामा प्रशासनात घेण्यासाठी विरोध केल्याने ओबामाने तिच्यावर अन्याय केला. (यात स्युडोसेक्युलरिस्टांवर विश्वास ठेवणारा ओबामा दोषी की तथाकथित स्युडोसेक्युलरिस्ट हा मुद्दा तात्पुरता सोडून देऊ)

राजेश घासकडवी Sat, 04/01/2014 - 18:07

'सारान्श'?

मिपावरील एका चर्चेत आलेला प्रतिसाद खाली शब्दशः दिलेला आहे.

आप आणि केजरीवाल याना मिडियात मिळनारी अवास्तव प्रसिद्धी आणि मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट क्षेत्रातिल आकर्शित होत असलेले दिग्गज इत्यादि स्थिती पाहुन वर मोदी व भाजप ची मते फोडुन कोन्ग्रेस विरोधी मतविभाजन करुन भाजप ला सत्तेपासुन रोखण्यासाठी ही चाल आहे

मोदीन्च्या वाढत्या प्रभावाने गळितगात्र झालेल्या सोनिया बाइना व्हॅटिकन मधुन सुचना आली की तुम्ही मोदीना रोखण्यासाठी केजरीवाल याना पाठिम्बा द्यावा. त्यामुळे आपोआप मिडिया चा रोख मोदी वरुन केजरीवाल आणि आप कडे वळेल . लोक्सभा निवडणुका होइपर्यन्त पाठिम्बा चालू ठेवा ,नन्तर कधिही ते आपचे सरकार कोसळवता येइल.

यातल्या शब्दांचं अक्षर न् अक्षर त्यातल्या शुद्धलेखनाच्या चुकांसकट तुमच्या 'सारान्शा'शी मिळतंजुळतं आहे. कृपा करून कुठल्यातरी भिरभिरत आलेल्या इमेलमधून आलेला भंपक मसूदा कॉपी पेस्ट करून इथे टाकत जाऊ नये. चर्चाप्रस्ताव मांडण्यासाठी ऐसी अक्षरेची उद्दिष्टे व मार्गदर्शक तत्त्वे पहावीत. आदर्श चर्चाप्रस्ताव कसे असावेत हे पहायचं असेल तर ऋषिकेश यांनी मांडलेले चर्चाप्रस्ताव पहावेत.

उडन खटोला Sat, 04/01/2014 - 19:00

In reply to by राजेश घासकडवी

नमस्त्ते राजेश साहेब

मजकुराचे जावु द्या हो...त्यातुन काय ध्वनित होते ते महत्त्वाचे !

बाय द वे , तुम्हाला एवढ्या इन्गळ्या का डसल्या ?

का तुम्ही सोनिया -खान्ग्रेस -व्हॅटिकन आणि आप-केजरीवाल या अभद्र युतीचे छुपे / उघड समर्थक वा प्रवक्ता आहात?

;)

राजेश घासकडवी Sat, 04/01/2014 - 20:00

In reply to by उडन खटोला

मला राजकारणाशी काहीही देणं घेणं नाही. ऐसी अक्षरे वर येणाऱ्या मजकुराच्या दर्जाबद्दल मात्र माझ्या काही अपेक्षा आहेत. कुठेतरी काहीतरी वाचलं त्या दोन ओळी उगीच भिरकावून देण्याबद्दल तक्रार आहे. इथे अनेक लोक अभ्यासपूर्वक चर्चाप्रस्ताव मांडतात. तसे कष्ट घेण्याचा प्रयत्न करावा ही विनंती.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 04/01/2014 - 23:40

In reply to by राजेश घासकडवी

संपादकीय शक्ती वापरून, हा धागा मौजमजेत वर्ग करून टाका. हाय काय नाय काय.

राजेश घासकडवी Sat, 04/01/2014 - 23:43

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा धागा आता मौजमजेचा म्हणून जाहीर केलेला आहे.

कृपया येथे मौजमजा करावी.
-हुकुमावरून

अतिशहाणा Sat, 04/01/2014 - 19:09

माझे २.५ बिलियन पाऊंड एका नायजेरियन बँकेच्या खात्यात पडून असल्याचा एक इमेल मला आला आहे. मात्र ते पैसे क्लेम करण्यासाठी मला काही पैसे भरणे आवश्यक आहे. कृपया मदत करावी.

'न'वी बाजू Sat, 04/01/2014 - 20:02

In reply to by अतिशहाणा

मागे एकदा "आपल्या आत्याने वारस म्हणून आपल्या नावे केलेले आणि आत्याच्या खात्यात खितपत पडून असलेले लक्षावधी डॉलर्स बाहेर काढण्यासाठी मदत करावी, आणि त्याकरिता फूल ना फुलाची पाकळी म्हणून त्यातील एक मोठी रक्कम मी स्वतः घ्यावी", असे आवाहन करणारे एक ईमेल मला खुद्द दिवंगत श्रीमती बेनझीर भुट्टो यांच्या भाच्याकडून आले होते. अर्थात, "दुबळी माझी झोळी" अशीच आमची परिस्थिती असल्याकारणाने त्याबद्दल आम्हांस काहीही करता येण्यासारखे नसल्याने ऑफर सोडून दिली होती. कदाचित धागाकर्त्यास ऑफरबद्दल काही करता येऊन अडचणीत सापडलेल्या श्रीमती भुट्टो यांच्या भाच्यास मदत करणे शक्य असल्यास त्याने स्वतः श्रीमती भुट्टो यांच्या भाच्याशी संपर्क साधावा, असे कळकळीचे आवाहन आहे.

(अतिअवांतर: कोणे एके काळी मला वक्षवर्धनासंबंधी - आणि माझ्या पत्नीस शिश्नवर्धनासंबंधी - असंख्य ईमेले येत असत. त्यांचाही लाभ नेमका कसा घ्यावा हे न कळल्यामुळे ती सोडून देणे भाग पडत असे. हल्ली त्या लोकांनी ईमेले पाठवणे बंद केलेले आहे, याचे दु:ख होते. [एखाद्या गरजूस फॉर्वर्ड करता आली असती. माणसाने सदैव परोपकारी असावे.])

अनुप ढेरे Sat, 04/01/2014 - 20:40

ते वॅटीकनची सूचना वगैरे हास्यास्पद भाग सोडला तरी 'आप'मुळे होणारं मतविभाजन कॉंग्रेसच्या पथ्यावर नक्की पडेल. प्रस्थापितांच्या विरोधातली मतं, जी भाजपची मोठी आशा असेल त्यातली भरपूर मतं निवडणूकांमध्ये 'आप'ला जातील असं वाटतयं. दिल्ली मध्ये जे झालं ते इतर शहरी भागांमध्ये पण होउ शकेल.

अजो१२३ Sat, 04/01/2014 - 20:52

काँग्रेसने आपला पाठींबा देण्याची घोडचूक करू नये. कारण लोक काँग्रेस आणि आप मधे काही फरक करणार नाहीत. सारी मते आपला जाणार. दिल्लीत जे झाले ते सर्वत्र होणार. काँग्रस पूर्ण धूतली जाणार.

राजेश घासकडवी Sat, 04/01/2014 - 23:55

या धाग्यात शुद्धलेखनाच्या किती चुका आहेत ते अचूकपणे शोधून दाखवा पाहू...

मला चोवीस चुका सापडल्या. त्याशिवाय 'नन्तर' 'पाठिम्बा' वगैरे पाच सापडल्या... १२५ शब्दांच्या 'लेखा'त २९ चुका! २२% हिट रेट! लेखकाने व्हॅटिकनमध्येच मराठी शिकली असावी.

राजेश घासकडवी Sun, 05/01/2014 - 01:34

In reply to by बॅटमॅन

नाही हो, टिळकांना ते माफ होतं, आपल्याला नाही.

नियम १.३

पर-सवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू (अनुस्वार) देऊनच लिहावेत.

उदाहरणार्थ: 'दंगा, झांज, बंड, खंत, संप' हे शब्द 'दङ्गा, झाञ्ज, बण्ड, खन्त, सम्प' असे लिहू नयेत.

बॅटमॅन Sun, 05/01/2014 - 02:02

In reply to by राजेश घासकडवी

हे अस्ले नियम् आम्म्हाला आजिबात् मान्य नाहीत्. सौंस्क्रुतप्रमाणेच़् आम्म्ही चालणार्. पायजे तर् सगळे शब्द सौंस्क्रुतात् घालतो, हाकानाका. विजैनगर्च्या राजान्नी सुल्तान् शब्दाचे सुरत्राण केले होते तसे तद्भवीकरण् करण्याऐवजी डैरेक्ट आहे तश्शेच घाल्नार्.

-ओबी बॅट् कनोबी, तेजदण्डासिधारी.

बॅटमॅन Sun, 05/01/2014 - 16:36

In reply to by नितिन थत्ते

सन्स्क्रित हा यवनाक्रांत उत्तरेतील उच्चार आहे. आमचा दक्षिणेचा मूळनिवासी उच्चारच बरोबर आहे- "सौं ह स्क्रु ह त ह"!!

'न'वी बाजू Mon, 06/01/2014 - 05:52

In reply to by राजेश घासकडवी

संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू (अनुस्वार) देऊनच लिहावेत.

या नियमाचा आमच्यावर ढिंम परिणाम झालेला नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

अतिशहाणा Sun, 05/01/2014 - 23:35

In reply to by राजेश घासकडवी

फक्त 24? मला आणखी जास्त सापडल्या. (नन्तर, पाठिम्बा वगैरे वगळूनही!)

चूकभूल द्यावी घ्यावी.

आप आणी1 केजरीवाल

नुकताच एक इमेल2 फिरतफिरत मला आला .त्याचा सारान्श असा की-

दिल्लीतील निवड्णुकानन्तर3 निर्माण झालेली त्रिशन्कू स्थिती पाहता कोन्ग्रेस4 हतबल झाली ,परन्तु मोदीन्च्या वाढत्या प्रभावाने गळितगात्र झालेल्या सोनिया बाइना5 व्हॅटिकन मधुन6 सुचना7 आली की तुम्ही मोदीना रोखण्यासाठी केजरीवाल याना8 पाठिम्बा द्यावा. त्यामुळे आपोआप मिडिया9 चा10 रोख मोदी वरुन11 केजरीवाल आणि आप कडे12 वळेल . लोक्सभा13 निवडणुका होइपर्यन्त14 पाठिम्बा चालू ठेवा ,नन्तर कधिही15 ते आपचे सरकार कोसळवता येइल16.

सध्या आप आणि केजरीवाल याना17मिडियात18 मिळनारी19 अवास्तव प्रसिद्धी आणि मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट क्षेत्रातिल20 आकर्शित21होत असलेले दिग्गज इत्यादि स्थिती पाहुन22 वर मोदी व भाजप ची23मते फोडुन24 कोन्ग्रेस25 विरोधी मतविभाजन करुन26 भाजप ला27 सत्तेपासुन28 रोखण्यासाठी ही चाल आहे असा सन्शय येतो ,त्याच प्रमाने29 उपरोल्लेखित30 व्हॅटिकन- सोनिया प्रकरण देखिल31 खरे असावे असा सन्शय येतो कारण आग असल्याशिवाय धूर येत नाही !

बॅटमॅन Sun, 05/01/2014 - 23:44

In reply to by मी

इथे व्याकरणाचे नियम पक्के असल्याशिवाय बसू नये

अधोरेखित शब्दांमुळे अंमळ भडभडून आले.

ही पाटी मसाप किंवा तत्सम संस्थेच्या विरेचनालयात जास्त शोभून दिसेल आणि भयंकर परिणामकारक होईल याची खात्री आहे.

बोले तो, मनात. पोटात नाही.

आयतेवेळी नक्की काय परिणामकारक होईल त्याचे हक्क हायजेनबर्गच्या स्वाधीन आहेत.

-'न'वी बॅटू.

मी Mon, 06/01/2014 - 10:31

In reply to by बॅटमॅन

:)तुमच्या ह्या तुफान प्रतिसादाने भडभडून आल्याने गडबडा लोळत आल्याची ती स्मायली द्यावी म्हणतो.

ही पाटी मसाप किंवा तत्सम संस्थेच्या विरेचनालयात जास्त शोभून दिसेल आणि भयंकर परिणामकारक३ होईल याची खात्री आहे.

छे, मसापवाल्यांचे कोठे भलतेच जड असतात, एका 'पाटीत' काम झाल्यास ते कसले सर्जनशील.

बॅटमॅन Mon, 06/01/2014 - 11:53

In reply to by मी

छे, मसापवाल्यांचे कोठे भलतेच जड असतात, एका 'पाटीत' काम झाल्यास ते कसले सर्जनशील.

कोष्ठरक्षणाबद्दल इतके दक्ष असलेल्यांचे असे मार्मिक वर्णन पाहोन निर्वाण पावल्या गेले आहे.

राजेश घासकडवी Mon, 06/01/2014 - 01:25

In reply to by मी

नाही हो, तशी व्याकरणाची/शुद्धलेखनाची काही पाटी वगैरे नाही. त्याबाबतीत 'ऐसीच्या सर्वसामान्य वाचकांच्या अपेक्षा' इतपत संदिग्ध निकष आहेत. आणि त्यातही वाचक थोडी माया ठेवतातच.

चर्चाप्रस्ताव मांडताना आणि चर्चा योग्य रीतीने चालवण्यासाठी थोडे कष्ट घ्या, लेखन करताना दर्जा आणि साहित्यमूल्य राखण्याचा प्रयत्न करा, चर्चेत विचारांवर टीका करा लोकांवर टीका करू नका वगैरे वगैरे पाट्या मात्र आहेत. प्रस्तुत चर्चाप्रस्तावाच्या लेखनाचा दर्जा उत्तम असता आणि इतर पाट्या मनापासून पाळल्या असत्या तर शुद्धलेखनाबद्दल कोणी तक्रार केली नसती. तशी, प्रसंगी आपल्या लेखनावर कठोर टीका होऊ शकते हे ध्यानात ठेवा ही पाटी आहेच.

'न'वी बाजू Mon, 06/01/2014 - 01:47

In reply to by राजेश घासकडवी

आणि त्यातही वाचक थोडी माया ठेवतातच.

अहो, पण इथे महामाया ठेवावी लागेल हो! :(

मी Mon, 06/01/2014 - 10:33

In reply to by राजेश घासकडवी

प्रस्तुत चर्चाप्रस्तावाच्या लेखनाचा दर्जा उत्तम असता आणि इतर पाट्या मनापासून पाळल्या असत्या तर शुद्धलेखनाबद्दल कोणी तक्रार केली नसती. तशी, प्रसंगी आपल्या लेखनावर कठोर टीका होऊ शकते हे ध्यानात ठेवा ही पाटी आहेच.

सहमत.

अरविंद कोल्हटकर Mon, 06/01/2014 - 03:44

वरील लेखनात मला ६८ चुका सापडल्या. त्यापैकी ५ चुका वैयक्तिकरीत्या मला सध्याचे शुद्धलेखननियम मान्य नाहीत अशामुळे मोजल्या गेल्या आहेत. त्या वगळल्या तरीहि ६३ उरतात. कशा ते खाली पहा.

प्रत्येक चुकीशेजारी मी कंसांमध्ये काय हवे होते ते दाखविले आहे. दोन शब्दांमध्ये नको असतांना अंतर टाकणे, स्पल्पविराम आणि पूर्णविराम चु़कीच्या अंतराने टाकणे अशा गोष्टींनाहि चुकांमध्ये मोजले आहे.

आप आणी(णि) केजरीवाल

नुकताच एक इमेल फिरतफिरत मला आला() .()त्याचा सारा(रां)न्श(श) असा की()()-दिल्लीतील निवड्(ड)णुकान(नं)न्तर निर्माण झालेली त्रिश(शं)न्कू(कु) स्थिती(ति) पाहता को(कॉं)न्ग्रे(ग्रे)स हतबल झाली() ,()परन्तु मोदी(दीं)न्च्या(च्या) वाढत्या प्रभावाने गळि(लि)तगात्र झालेल्या सोनिया बाइ(ईं)ना व्हॅटिकन() मधु(धू)न सु(सू)चना आली की तुम्ही मोदी(दीं)ना रोखण्यासाठी केजरीवाल या(ह्यां)ना पाठि(ठिं)म्बा(ब) द्यावा. त्यामुळे आपोआप मि(मी)डिया ()चा रोख मोदी(दीं)() वरुन केजरीवाल आणि आप कडे वळेल (). लोक्स(कस)भा निवडणुका होइ(ई)पर्य(र्यं)न्त(त) पाठि(ठिं)म्बा(ब) चालू ठेवा () ,()न(नं)न्त(त)र कधि(धी)ही(हि) ते आपचे सरकार कोसळवता येइ(ई)ल.

सध्या आप आणि केजरीवाल याना मि(मी)डियात मिळना(णा)री अवास्तव प्रसिद्धी(द्धि) आणि मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट क्षेत्राति(ती)ल आकर्शि(र्षि)त होत असलेले दिग्गज इत्यादि स्थिती(ति) पाहु(हू)न वर मोदी व भाजप()ची मते फोडु(डू)न को(कॉं)न्ग्रे(ग्रे)स विरोधी मतविभाजन करुन भाजप()ला सत्तेपासु(सू)न रोखण्यासाठी ही चाल आहे असा स(सं)न्श(श)य येतो(),()त्याच प्रमाने(णे) उपरो()ल्लेखित व्हॅटिकन- ()सोनिया प्रकरण देखि(खी)ल खरे असावे असा स(सं)न्श(श)य येतो कारण आग असल्याशिवाय धूर येत नाही() !>

'न'वी बाजू Mon, 06/01/2014 - 05:35

In reply to by अरविंद कोल्हटकर

त्या शुद्धलेखनाच्या चुका नाहीत; तो गनिमी कावा आहे.

म्हणजे असे, की त्या चुका शोधत तुम्ही लेख पुनःपुन्हा नीट वाचाल, झालेच तर त्या चुका दाखवून देण्यासाठी तो लेख स्वतः टंकून दाखवाल. या प्रक्रियेत लेख वारंवार तुमच्या डोळ्यांखालून नि हातांतून जाईल, नि परिणामी त्यातील 'संदेश' सब्लिमिनली तुमच्या मनःपटलावर नीट कोरला जाईल.

लहानपणी शाळेत असताना नाही का, बाई शिक्षा म्हणून आख्खा धडा तीनतीनदा लिहून आणायला लावीत? त्यातलाच प्रकार!

मिहिर Mon, 06/01/2014 - 09:57

In reply to by अरविंद कोल्हटकर

पाठि(ठिं)म्बा(ब)

हे काय आहे? पाठिंब असा शब्द पहिल्यांदाच पाहतो आहे.
बाकी 'मीडिया'ऐवजी 'मिडिया' लिहिणे ही मला शुद्धलेखनाची चूक वाटत नाही.