प्रचाराची रणधुमाळी
२०१४ च्या लोकसभा निवडणुका आता ४ महिन्यांवर आल्यात. सर्व पक्षात प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. प्रचाराचे पारडे सारखे खाली वर होत आहे. ह्या निवडणुकींचा निकाल काय लागेल ह्याबाबत साऱ्या देशात उत्सुकता आहे.कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर येईल का? आप ह्या निवडणुकीत काय चमत्कार घडवेल? तिसरी आघाडी सत्तेवर येईल का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे हि निवडनुकी नंतरच मिळतील.
आपने जे राजकारणात यशस्वी पदार्पण केले नि दिल्लीची सत्ता मिळवली त्याने देशाच्या राजकारणात नाही म्हटले तेरी थोडा फार फरक पडणारच पण तो किती पडणार हे होण्यासाठी निवडणूक होण्याची वाट बघणे भाग आहे.
गेली दोन टर्म कॉंग्रेस ने देशाचा कारभार यशस्वी पणे सांभाळली देशाला विकासाच्या दिशेने नेले. आपल्या १० वर्षातील विकासकामे हि कॉंग्रेसची जमेची बाजू राहील. तर आप ज्या तऱ्हेने प्रचार करत आहे दिल्लीत निर्णय घेत आहे तेही कौतुकास्पद आहे. कॉंग्रेस आणि आप ह्या पक्षांकडून ह्या निवडणुकीत फार मोठ्या अपेक्षा आहेत. तिसरी आघाडी हा मुख्यत्वे करून प्रादेशिक पक्षांची आघाडी असेल हि आघाडी आपापल्या राज्यात कसे प्रदर्शन करते त्यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. मुलायम सिंग ह्यांच्या समाजवादी पक्षाने युपीत लोकसभेत चांगली कामगिरी केली तर त्यानाही सत्तेत येण्याची संधी आहे.मायावती ह्यांची दलित आणि अल्पसंख्यांक समाजात असलेली प्रतिमा ह्यामुळे बहुजन समाज पार्टीला हि कमी लेखून चालणार नाही.
येडीयुरप्पा हे भाजपात परतल्याने कॉंग्रेसला कर्नाटकात चांगलाच फायदा होईल असे वाटते . भाजपचा सुरवातीला प्रचारात जोर होता पण आप च्या झंझावातामुळे तो ओसरला . त्यातच आपल्या संयमी प्रतिमेसाठी प्रसिद्ध असलेल्या राहुलजी गांधी ह्यांनी सध्या आक्रमक रूप धारण केले आहे त्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. त्यांचे भाषण एकूण बऱ्याच जणांना इंदिराजींच्या आक्रमक पणाची बऱ्याच जणांना आठवण झाली.नेहरूंची हुशारी, इंदिराजींचा आक्रमकपणा नि राजीव जी ह्यांची विकासाची दृष्टी ह्यांचा अनोखा मिलाफ राहुलजी ह्यांच्या मध्ये आहे ह्याच जाणीव जनतेला त्यांच्या भाषणामुळे नक्कीच झाली. देशाचे नेतृत्व करण्यासाठी एक आश्वासक चेहरा तमाम भारतीय जनतेला त्यामुळे मिळाला ह्यात वाद नसावा.
विरोधकांनी नेहमीप्रमाणे भाषणावर टीका केली, गळे काढले पण त्यात जोर नव्हता हे स्पष्टपणे कळत होते.निवडणुका जिंकायच्या असतील तर प्रचारात जोर हा लावावाच लागतो. प्रचारात चढ उतार होत असतातच.त्यातूनच पक्षांचे पर्यायाने देशाचे भवितव्य ठरत असते…
http://www.loksatta.com/desh-videsh-news/oppsition-good-in-marketing-sa…
?
मराठी जालावर धर्मनिरपेक्षवादाला कितीतरी समर्थक असतात
विधान कै च्या कैच आहे.
"धर्मनिरपेक्ष" हा शब्द जनरली काँग्रेसींना , कम्युनिस्टांना कीम्वा भाजपेतरांना लावतात.
मराठी जालावर बीजेपी समर्थक अतिप्रचंड आहेत.
त्यातले कैक भंपक असले, तरी कित्येक संयत किंवा सविदामिमांसकही आहेत,सेन्सिबल आहेत.
गैरबीजेपीचा स्पष्ट झेंडा थत्ते,सुनील व अशीच तुरळक मंड़ळी मिरवतात.
फक्त ऐसीपुरतं बोलायचं तर इथं बीजेपीवाले इतर सायटींपेक्षा तुलनेनं कमी आहेत.
तरी ते ऐसीवरील नॉन बीजेपीवाल्यांपेक्षा जास्तच आहेत.
नाही मनोबा. मला नक्की
नाही मनोबा. मला नक्की म्हणायचं होतं तेच मी म्हटलं आहे.
बर्याच लोकांना भाजपचे पूर्ण वावडे आहे. त्यांना काँग्रेसही आवडत नाही. पण ते प्रो=काँग्रेस अशी भूमिका न घेता धर्मनिरपेक्षवादी भूमिका घेतात. म्हणजे टिका जास्तीत जास्त भाजपवरच करायची. लक्षात घ्या - भाजपच्या बाजूने जे ऐसीकर आहेत/असावेत त्यांना त्या पक्षाची विचारसरणी (हिंदुत्ववाद, इ ) मान्य नाही. काँग्रेसच्या बाजूने जे आहेत त्यांना पक्षाचे काम, नीती, चरित्र डळमळित आहे हे मान्य आहे पण त्याच वेळी त्यांचा मुख्य आधार आहे काँग्रेसचे तत्त्वज्ञान (धर्मनिरपेक्ष, इ).
ऐसीवर प्रो-बीजेपी वातावरण नाही असे आरामात म्हणता येईल. मी घेतलेल्या "कोणाचे सरकार यावे (असे आपल्याला वाटते, येईल नव्हे)" या सर्वेत दोहोंची बरोबरी होती.
भारताच्या आणि भाजपच्या
भारताच्या आणि भाजपच्या झेंड्यातले रंग सायटीवर लावणाऱ्या सायटीवर भाजपवाले कमी! अरे हां, कॉंग्रेसच्या झेंड्यातही हेच रंग आहेत. मनोबा, तुला माहित नसेल पण एका व्यवस्थापकाचं फेसबुक पहात जा. त्यांचा मोदीराग एवढा जास्त आहे की मोदींवर प्रेमच करतो का काय अशी शंका येईल.
मराठी जालावर बीजेपी समर्थक अतिप्रचंड आहेत.
हे मान्य आहे. फेसबुकावरही साधारणतः हे असंच दिसतं. या संदर्भातली, व्हायरल होणारी पोस्ट्सही साधारणतः अधार्मिक राजकारण्यांची खिल्ली उडवणारी दिसतात. (अपवाद All India Bakchod यांच्या यूट्यूब व्हीडीओचा.) अलिकडे काही प्रमाणात धर्मविरोधकांचं प्रमाण वाढलेलं दिसतं, पण त्यामागे कॉंग्रेसप्रेमापेक्षा, पिढ्यानपिढ्या केल्या गेलेल्या जातीय अन्यायाचं कारण अधिक असावं असं वाटतं.
नेहरूंची हुशारी, इंदिराजींचा
नेहरूंची हुशारी, इंदिराजींचा आक्रमकपणा नि राजीव जी ह्यांची विकासाची दृष्टी ह्यांचा अनोखा मिलाफ राहुलजी ह्यांच्या मध्ये आहे ह्याच जाणीव जनतेला त्यांच्या भाषणामुळे नक्कीच झाली.
अगा...गा......गा...... ज्योक ऑफ द डे झाला हा!
यु ट्युब वर राहुल गांधी च्या भाषणातल्या चुकांचे व्हिडीओ फिरतायेत आणि तुम्ही हे काय बोलता आहात?
- भाषणात थोड्या फार चुका
- भाषणात थोड्या फार चुका झाल्या (म्हणजे प्रभावी वक्ता नाहीत)
- आजपर्यंत भरिव कामगिरी अशी फार शी नाही. खास्दार म्हणून स्वतःच्या मतदार संघाचे प्रश्न कधी संसदेत मांडताना दिसले नाहीत तुमचे राहुल"जी"!!! (म्हणजे कार्यक्षम असल्याचे पुरावे सुद्धा नाहीत)
मग जनतेला त्यांच्यात "नेहरूंची हुशारी, इंदिराजींचा आक्रमकपणा नि राजीव जी ह्यांची विकासाची दृष्टी ह्यांचा अनोखा मिलाफ" असल्याची जाणिव कशी आणि कधी झाली म्हणे?
मनोबा म्हणतात तसे तुमचे
मनोबा म्हणतात तसे तुमचे ट्रोलिंग सुरू आहे त्यामुळे माझ्याकडून हा या धाग्यवरचा शेवटचा प्रतिसाद.>>>>> मनोबा त्यांच्या मनातले काहीही म्हणतील.पण हे ट्रोलिंग नाही. देश हा विकासाच्या दिशेने वेगाने चालला आहे. हा वेग कमी करायचा नसेल तर राहुलजी ह्यांच्या शिवाय पर्याय नाही हे माझे स्पष्ट मत आहे
देशाचे नेतृत्व करण्यासाठी एक
देशाचे नेतृत्व करण्यासाठी एक आश्वासक चेहरा तमाम भारतीय जनतेला त्यामुळे मिळाला ह्यात वाद नसावा
च्यामारी, म्हणजे इतके दिवस आश्वासक चेहरा नव्हताच की काय? पण मिळाला हे बरें झाले, आता नेतृत्व आश्वासक चेहेर्याच्या हातात असल्याने भारत महासत्ता होण्यास २०२० ची वाट बघावी लागणार नाही तर, व्वा! चला, आश्वस्त होऊन आंजावर हुंदडायला मोकळा झालो.
- (आश्वासक चेहरा नसलेला) सोकाजी
सातत्यानं ट्रोलिंग
सदर धाग्यावर सातत्यानं ट्रोलिंग सुरु आहे.
थत्ते, सिफर्,अरुण जोशी, सविता , सोत्रि आणि काही प्रमाणात मीही ह्या ट्रोलिंगला बळी पडलो आहोत.
जागो मोहन प्यारे हा जुना आंतरजाल आय्डीही लोकांची नस पकडून त्यांना उचकावण्यात अगदि तरबेज होता.
त्यांच्यानंतर प्रथमच इतकय ताकतीचं ट्रोलिंग, लोकांना उचकावणं पाहिलं.
तिकडे सुप्रिया जोशीही असले धागे कादह्तात, पब्लिकही प्रतिसाद देते.
पण ते ट्रोलिंग आहे अशी शंका वाटत असली तरी ते ट्रोलिंगच आहे अशी खात्री वाटत नाही.
नेहरूंच्या काळात अर्धा
नेहरूंच्या काळात अर्धा काश्मिर पाकिस्तानने घेतला. तो अजूनही तिकडेच आहे.
संसद काही अतिरेक्यांच्या ताब्यात गेली नाही. २००१ मधे अमेरिकेत ट्विन टोवर अतिरेक्यांनी पाडले. त्यावेळेस अमेरिकेची सुरक्षा कमजोर होती? आज कॅपिटॉल वर हल्ला झाला तर कोणते सरकार सर्वात अधिक कमजोर? - १. पर्ल हार्बरवर वाले २ ट्विन टॉवर वाले ३. कॅपिटॉल वाले
संसद काही अतिरेक्यांच्या
संसद काही अतिरेक्यांच्या ताब्यात गेली नाही. >>>>>> त्याबद्दल जवानांना धन्यवाद.
पण अतिरेक्यांचा उत्साह भाजपच्या काळात एवढा वाढला होता कि संसदेवर हल्ला करण्याची त्यांची हिम्मत झाली.कुठलातरी समझोता एक्सप्रेस नावाचा वाह्यात प्रकार केला गेला होता त्याचा फायदा हा अतिरेक्यांनाच जास्त झाला.
नेहरूंनी अर्धा काश्मिर हरला
नेहरूंनी अर्धा काश्मिर हरला (अगदी जवानही हरले) त्याचं काय? आणि तेही तुच्छ टोळ्यांकडून, सैनिकही नीटसे नव्हते हल्लेखोर.>>>>>>> तीच परिस्तिथी सद्या भाजपचे राज्य आल्यावर येवू शकते. अशा परिस्तिथिचा अनुभव घेतलेला अनुभवाने परिपक्व असा कॉंग्रेसच देशाचे रक्षण करू शकतो
परिपक्व काँग्रेस
नेहरूंनी अर्धा काश्मिर हरला (अगदी जवानही हरले) त्याचं काय? आणि तेही तुच्छ टोळ्यांकडून, सैनिकही नीटसे नव्हते हल्लेखोर.>>>>>>> तीच परिस्तिथी सद्या भाजपचे राज्य आल्यावर येवू शकते. अशा परिस्तिथिचा अनुभव घेतलेला अनुभवाने परिपक्व असा कॉंग्रेसच देशाचे रक्षण करू शकतो
सचीनजी, भाजपला पाच वर्षे सत्तेचा अनुभव आहे जो आपण शून्यवत आहे असे म्हणता. काँग्रेसला ६० वर्षांचा अनुभव आहे. जर ५ वर्षे म्हणजे काहीच नाही आणि नेहमी परिपक्वच पक्ष सत्तेत राहावा म्हटले तर काँग्रेसच सत्तेत राहणार. मग निवडणूकीची गरज काय? लोकशाहीची गरज काय? आता कोणताच पक्ष काँग्रेसपेक्षा परिपक्व होऊ शकत नाही.
मोदी कदाचित चांगले
मोदी कदाचित चांगले प्रधानमंत्री बनुहि शकतील ते कठोर प्रशासक आहेत हे त्यांनी गुजरातेत दाखवूनही दिलाय. पण प्रश्न व्यक्तीचा नाही पक्षाचा आहे. मागे त्या पक्षाच्या हातात सत्ता असताना सर्वोच्च अशा संसदेवर हल्ला झाला होता. प्रधानमंत्र्यांना लपून बसावे लागले होते ह्याचे वाईट वाटते.
छंद
हा म्हणजे छंद आहे का? का फुल टाइम नोकरी आहे? या प्रकारच्या नोकरीसाठी काय शैक्षणिक अर्हता लागते ?
सी व्ही कुठे पाठवावेत?
आमची अर्हता:लिहण्यावाचण्यापुरते जरा जास्तच व्यवस्थित शिकलो आहोत.संगणकावरही लिहीता वाचता येते. काम सोडुन मराठी संकेतस्थळांवर तासनतास टीपी करण्याचे मुख्य कौशल्य. गरज असल्यास पार्ट टाइम संस्थळांवर लेख आणि कॉमेंटा पाडण्याबरोबर गणिती काम पण करू शकतो. आमच्या कडव्या "स्वामीनिष्ठे"बाबत काळजी नसावीच. जॉब बदलण्याचा व "पैशामागे धावाधाव" करुन स्विच मारण्याचा विचारही करणार नाही (हे सर्व डॉन्याकडून साभार).
सचिनजी, जनरली काँग्रेसला किती
सचिनजी, जनरली काँग्रेसला किती सीटस मिळणार असे वाटते तुम्हाला?