Skip to main content

ब्राह्मण समाजाला खरेच 'अँट्रॉसिटी कायद्या'चे संरक्षण द्यावे काय?

आजच्या लोकमतमध्ये प्रसिध्द झालेली बातमी खाली देत आहे. आपणास काय वाटते :

ब्राह्मण समाजालाही 'अँट्रॉसिटी अँक्ट' लागू करा : ब्राह्मण महासंघाची मागणी

ब्राह्मण हा टिंगलीचा विषय झाला आहे

पुणे : ब्राह्मण हा टिंगलीचा विषय झाला आहे. त्यांना पोलीस संरक्षण देण्याऐवजी कायद्यानेच संरक्षण मिळावे यासाठी ब्राह्मणांचा समावेश 'अँट्रॉसिटी अँक्ट'लागू होणार्‍या समुदायांत केला जावा, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
उद्योजक डी. एस. कुलकर्णी, प्रदेश प्रवक्ते रविकिरण साने, सरचिटणीस विश्‍वजित देशपांडे, चित्पावन फाउंडेशनचे अशोक वझे आदी यावेळी उपस्थित होते. ''ब्राह्मणांना अत्याचार प्रतिबंधक कायदा लागू व्हावा यासाठी महाराष्ट्रातील विविध नेत्यांची भेट घेऊन मागणी करण्यात आली आहे. जे पक्ष आमच्या मागणीच्या बाजूने आहेत, त्यांना वेगवेगळय़ा ठिकाणी पाठिंबा दिला जात आहे,'' असे साने यांनी नमूद केले. देशात ब्राह्मणांची संख्या ३.५टक्के असल्याची माहिती चुकीची आहे. महाराष्ट्रात दीड हजार वर्षांपूर्वी येऊन स्थायिक झालेल्या अन्य भाषकांमुळे निर्माण झालेल्या ३१ पोटशाखांसह एकूण लोकसंख्येच्या १८ टक्के ब्राह्मण महाराष्ट्रात आहेत, असा दावा साने यांनी केला.
...............

मी Tue, 15/04/2014 - 17:37

पुरेशी टिंगल झालेली नाही, ह्यापेक्षा तर सरदारांची टिंगल अधिक झाली आहे.

मी Tue, 15/04/2014 - 19:44

In reply to by तेजा

सध्याच्या कायद्यात असलेल्या तरतुदी ज्या प्रमाणात टिंगल(अ‍ॅट्रॉसिटीच्या) व्याख्येप्रमाणे झाल्यावर लागू होतात त्याप्रमाणात झाल्यावर.

तेजा Tue, 15/04/2014 - 18:14

In reply to by अतिशहाणा

अॅट्रॉसिटी म्हणजे टिंगल नव्हे. टिंगल होते म्हणून अॅट्रॉसिटी पाहिजे, असे त्यांना म्हणायचे आहे.

अतिशहाणा Tue, 15/04/2014 - 18:23

In reply to by तेजा

atrocity च्या दोन व्याख्या मिळाल्या

1. an extremely wicked or cruel act, typically one involving physical violence or injury.
2. a highly unpleasant or distasteful object.

माझ्यामते महाराष्ट्रातील दलित अत्याचारप्रतिबंधक कायदा हा पहिल्या व्याख्येसंदर्भात आहे. ब्राम्हणांची टिंगल होते तेव्हा कोणत्या स्वरुपाची अतिक्रूर वा शारीरिक हिंसा होते याचे स्पष्टीकरण ब्राम्हण महासंघाने दिले पाहिजे.

बॅटमॅन Tue, 15/04/2014 - 18:53

In reply to by अतिशहाणा

जर महाराष्ट्रातील कायदा पहिल्या व्याख्येसंदर्भात असेल तर मग जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल खटला भरण्याच्या धमक्या तसेच किस्से वाचतो त्याचं काय? फक्त फिजिकल गोष्टींसाठी तो कायदा नैये.

अतिशहाणा Tue, 15/04/2014 - 18:58

In reply to by बॅटमॅन

शिवीगाळ केल्याबद्दल या अॅक्टांतर्गत खटला भरुन शिक्षा झाल्याच्या बातम्या आहेत काय? शालिनीताई पाटील व तत्सम नेत्यांनी या कायद्याविरोधात सहेतुक पसरवलेले गैरसमज या किश्श्यांच्या मागे असावेत. अॅट्रॉसिटीचे निकष येथे पाहा.

http://en.wikipedia.org/wiki/Scheduled_Caste_and_Scheduled_Tribe_%28Pre…

बॅटमॅन Tue, 15/04/2014 - 19:05

In reply to by अतिशहाणा

ही पीडीएफ बघा.

http://tribal.nic.in/WriteReadData/CMS/Documents/201303131039493105468p…

पान क्र. २ वरती मुद्दा क्र. १०.

" intentionally insults or intimidates with intent to humiliate a member of a Scheduled Caste or a Scheduled Tribe in any place within public view; "

हा त्या गुन्ह्यांमध्ये येतो. तस्मात तशी तरतूद तरी आहेच. तदुपरि असे खटले भरलेले वाचले आहे- आत्ता या क्षणी आठवत नाही.

अतिशहाणा Tue, 15/04/2014 - 19:09

In reply to by बॅटमॅन

केवळ जातिवाचक अपमान करण्याच्या उद्देशाने केलेली शिवीगाळ शिक्षेस पात्र असावी असे वैयक्तिकरीत्या वाटते मात्र अशा शिवीगाळीमुळे कोणाला तुरुंगवास किंवा शिक्षा झाल्याचे वाचनात आलेले नाही. असे खटले कोर्टात टिकले नसावेत.

बॅटमॅन Tue, 15/04/2014 - 19:30

In reply to by अतिशहाणा

फेसबुकवर एक ग्रूप होता, त्यावर असा काही इश्श्यू झाल्यावर काही मूर्खागमनी लोकांनी अ‍ॅट्रॉसिटीचे भय दाखवले-यद्यपि तसे काही झाले नसले तरीही. विषय ढसाळ व त्यांचे साहित्यिक योगदान एट ऑल बद्दल होता, त्यात काही 'ढसाळी' उगा भडकले. ग्रूप अ‍ॅडमिन बिचारे घाबरले अन ग्रूपच बंद केला.

एका दलित व्यक्तीने एका ब्राह्मण व्यक्तीवर असा खटला दाखल केला होता- कारण इतकेच की दलित व्यक्तीने कर्ज घेतले होते आणि ब्राह्मण व्यक्तीने (जी ब्यांक हपिसर होती) कर्जफेडीच्या मुदतवाढीस नकार दिल्हा. मग उट्टे काढायचे म्हणून पोलिसात जातिवाचक शिवीगाळीची तक्रार केली. परिणाम? प्रत्येक सणावाराच्या आधी त्या निवृत्तीस आलेल्या ब्राह्मण व्यक्तीस पोलीस ठेसनात जाऊन हजेरी द्यावी लागे- एखाद्या गुन्हेगारासारखी. हा किस्सा सांगणारे गृहस्थ परिचयाचे असून उगी तिखटमीठ लावून सांगतील अशी शक्यता नाही.

बाकी अजून काही असेल तर ठाऊक नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 15/04/2014 - 20:01

In reply to by बॅटमॅन

१. "फेसबुकवर एक ग्रूप होता" - तुम्ही दिलेल्या वर्णनावरून कशात काही नाही आणि लोक उगाच घाबरले असं दिसतंय. (मला माहित आहे तोच प्रसंग आणि त्याच फेसबुक समूहाबद्दल सांगत असलात तर त्यात अट्रोसिटी कायद्याचा, बादरायण या पलिकडे, संबंध नाही.)
२. पोलिसातल्या तक्रारीचं पुढे काय होतं? न्यायालयीन खटला वगैरे काही होऊन गुन्हा/चूक सिद्ध किंवा असिद्ध होत नाहीत काय?
(न्यायालयात 'तारीख पे तारीख' चालतं हे मान्य आहे. फक्त कायद्यान्वये तक्रार केली तर आदर्श परिस्थितीत काय व्हायला पाहिजे याची माहिती हवी आहे. प्रश्न ज्यांना माहिती आहे त्या सगळ्याच वाचकांसाठी आहे, फक्त बॅटमॅन यांच्यासाठी नाही.)

बॅटमॅन Tue, 15/04/2014 - 20:15

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

१. सहमत आहे, फक्त तशी धमकी दिली जाते हे सांगायचं होतं. असे कुणी करते काय इ.इ. प्रश्नांना ते एक उत्तर होते इतकेच.

२. तक्रारीचं काय होतं पुढे ते ठौक नै. मी सांगितलेल्या किश्श्यात त्या गृहस्थांना काही वर्षे हे भोगावं लागलं असं कळालं.

मन Wed, 16/04/2014 - 13:35

In reply to by अतिशहाणा

महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेल्या, सादरीकरणात गिनीज बुक वगैरे पातळीवरचे जागतिक विक्रम
करणार्‍या एका दिवंगत प्राध्यापकाशी वैयक्तिक परिचय होता.
त्यावेळी त्यांच्याबद्दल विनाकारण केलेल्या तक्रारीतून गोट्या कपाळात आल्या होत्या; हे आठवते.
त्यांचे नशीब थोर म्हणून किम्वा ती असामी थोर होती, चार ठिकाणी मोठ्या वर्तुळात ऊठबस होती म्हणून
ती असामी बचावली असे म्हणता येइल.
एरव्ही सामान्यांना वाली नाही हे खरेच.
त्यांना गोत्यात आणणारे त्यांचे जुनियर सहकारी प्राध्यापकही राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त आहेत.
त्यांच्याशीही बर्‍यापैकी परिचय होता; घटना घडली तेव्हा.

ऋषिकेश Wed, 16/04/2014 - 16:19

In reply to by मन

प्रत्येक कायद्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न हा होतच असतो. त्यात कायद्याचा दोष फारसा नाही, कार असे प्रयत्न कोर्टापुढे टिकल्याचे फारसे ऐसु येत नाही.
होय मनस्ताप खचितच होतो नी ते दुदैवी आहे! :(

सुनील Thu, 17/04/2014 - 09:14

In reply to by मन

विख्यात नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने यांच्यावर याच कलमांतर्गत सध्या गुन्हा दाखला आहे.

प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे अधिक भाष्य करीत नाही.

काळा मठ्ठ बैल … Tue, 15/04/2014 - 18:26

राहुल गांधी हा टिंगलीचा विषय झाला आहे.
त्यांना (वाय)झेड दर्जाची सुरक्षा देण्याऐवजी कायद्यानेच संरक्षण मिळावे यासाठी रागांचा समावेश 'अँट्रॉसिटी अँक्ट'लागू होणार्‍या समुदायांत केला जावा, अशी मागणी अखिल भारतीय बैल महासंघाने केली आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 15/04/2014 - 18:29

या अमेरिकन लोकांना काही काही समजत नाही हो भारतातल्या बहुसंख्य समाजाबद्दल. हे पहा. (दुव्यात विनोद केलेला आहे, पण तेजतर्रार अस्मिता असल्यास तो न झेपण्याची शक्यता आहे. दुवा आपापल्या जबाबदारीवर उघडावा.)

--

कायद्याचं नाव अट्रोसिटी किंवा अॅट्रोसिटी आहे, अँट्रोसिटी (अँथनीवाला किंवा उच्चारी अॅण्ट्रोसिटी) नाही.

अवांतर - मराठी भाषेलाही अट्रोसिटी कायद्यान्वये संरक्षण द्यावे अशी मागणी ऐसी महासंघातर्फे करण्यात यावी अशी मागणी करत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 15/04/2014 - 19:15

In reply to by आदूबाळ

ते बरंच आहे ना! माहित असती तर हाक काय नावाने मारली असती? रॉंर्बटचा उच्चार जमत नाही म्हणून मराठी बाणा जागवत रॉम्ब्या म्हणता आलं असतं म्हणा!