Skip to main content

थांबा आणि वाट पहा !

थांबा आणि वाट पहा !

भारताचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी शपथग्रहण करून पदभार स्वीकारण्यापुर्वीच त्यांच्या सार्क राष्ट्रप्रमुखाना बोलावण्याच्या निर्णयावरून उलटसुलट निष्कर्ष काढून रणकंदन करणार्या मंडळीना सांगावेसे वाटते ते इतकेच् की जरा थांबा आणि वाट पहा !

पाकिस्तानशी युद्ध पुकारून लढण्या ऐवजी गनिमी काव्याचा वापर करून आर्थिक कोंडी करणे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या बाजूने दबावगट निर्माण करणे / बलुचिस्तान वझिरीस्तान फुटीरतावादाला सहाय्य करून पाकिस्तानला अंतर्गत वादात व्यस्त ठेवणे / अफघाणिस्तानला सर्वतोपरी मदत करून आपले मित्र व पाकिस्तानचे शत्रू वाढवणे व पाकिस्तान ला दुर्बल /जर्जर करून सोडणे असे अनेक कूटनीतिक उपाय उपलब्ध आहेत . परंतु आजतागायत भ्रष्ट अन लुळ्या -पांगळ्या काँग्रेसी सरकारच्या लकवा मारलेल्या परदेशी धोरणामुळे ते उपाय अमलात आणले गेले नव्हते , पण आता चित्र पालटले आहे .

भारतात मोदींच्या रूपाने समर्थ , स्वाभिमानी अन राष्ट्रभक्त नेतृत्वाचा उदय झाला आहे…,त्यामुळे आता वर उल्लेख केल्याप्रमाणे कूटनीतिक उपाय वापरून पाकिस्तान ची नाकाबंदी केली जाइल . व त्यातूनच दबावतंत्राचा वापर करून काश्मीर आणि दहशतवादा सारख्या समस्यांची सोडवणूक केली जाऊ शकते …….

यास्तव ………… थांबा आणि वाट पहा !

गब्बर सिंग Sun, 25/05/2014 - 06:43

पाकिस्तानशी युद्ध पुकारून लढण्या ऐवजी गनिमी काव्याचा वापर करून आर्थिक कोंडी करणे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या बाजूने दबावगट निर्माण करणे / बलुचिस्तान वझिरीस्तान फुटीरतावादाला सहाय्य करून पाकिस्तानला अंतर्गत वादात व्यस्त ठेवणे / अफघाणिस्तानला सर्वतोपरी मदत करून आपले मित्र व पाकिस्तानचे शत्रू वाढवणे व पाकिस्तान ला दुर्बल /जर्जर करून सोडणे असे अनेक कूटनीतिक उपाय उपलब्ध आहेत

अगदी सहमत.

इतके दिवस भारतात दहशतवादी कारवाया चालू असताना पाकिस्तानी जनतेने "look the other way" चे धोरण राबवले होते. त्याची किंमत त्यांना मोजायला लावलीच पायजे. पाकिस्तानचे "सोव्हियट युनियन" करणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक चांगले उद्दिष्ट होऊ शकते. Acquire a number of high value military assets and deploy them on Indo-pak border. Force them to up their military budget. Screw them internally. Make sure Pakistan disintegrates. Implodes.

Stop the nonsense of - a stable and prosperous Pakistan is in India's interest.

इकॉनॉमिक सँक्शन्स चा मार्ग ही खुला आहे.

उडन खटोला Sun, 25/05/2014 - 10:51

असा विचारपूर्वक विचार करणारी आणि योग्य परिस्थिती जाणून घेणारी लोकं आहेत तर … , great …! छान वाटल हि पोस्ट वाचून …कारण आजकाल सगळीकडे मोदींच्या सल्लागारांची संख्या शेकड्यात झालीय । कीव येते अशा लोकांच्या पोस्ट न comnt वाचून …। धन्यवाद हि पोस्ट टाकल्याबद्दल …। !

नितिन थत्ते Sun, 25/05/2014 - 18:00

मान्य आहे......

>>पाकिस्तानशी युद्ध पुकारून लढण्या ऐवजी गनिमी काव्याचा वापर करून आर्थिक कोंडी करणे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या बाजूने दबावगट निर्माण करणे / बलुचिस्तान वझिरीस्तान फुटीरतावादाला सहाय्य करून पाकिस्तानला अंतर्गत वादात व्यस्त ठेवणे / अफघाणिस्तानला सर्वतोपरी मदत करून आपले मित्र व पाकिस्तानचे शत्रू वाढवणे व पाकिस्तान ला दुर्बल /जर्जर करून सोडणे असे अनेक कूटनीतिक उपाय उपलब्ध आहेत .

छ्या... याच्यासाठी का आम्ही मोदींना निवडून दिलंय? हे सगळं करायला काय ५६ इंची छाती लागते?

अरविंद कोल्हटकर Sun, 25/05/2014 - 20:49

भारताचा कमालीचा द्वेष हे पाकिस्तानच्या अनेक प्रश्नांचे मूळ आहे असे आपणच इतके दिवस सांगत आलो आहोत आणि ते योग्यहि आहे.

वरच्या धाग्यातील विचार त्याच मार्गाने जात आहेत. इतक्या टोकाचा पाकिस्तानद्वेष आपल्यालाहि अशाच खोडयात अडकवून ठेवू शकेल. भारतापुढे पाकिस्तानला 'खतम' करण्यापेक्षा अधिक महत्त्वाची बरीच उद्दिष्टे आहेत तिकडे आपण प्राधान्याने लक्ष द्यावे. पाकिस्तानचे त्याच्या स्वतःच्या नशिबाने जे व्हायचे असेल ते होऊ द्यावे, पाकिस्तान disintegrate अथवा implode व्हावा ह्यासाठी प्रयत्न करण्यात आपण आपला वेळ आणि शक्ति वाया घालवावी काय?

वरील धाग्याशी सहमति इतक्यापुरतीच दर्शवावी वाटते की पाकिस्तानातील घटनांचा आपल्यावर दुष्परिणाम होणार नाही इतपतच पावले आपण उचलावीत अणि बाकी benign disinterest हे आपले धोरण असावे.

मंदार कात्रे Sun, 25/05/2014 - 21:48

In reply to by अरविंद कोल्हटकर

तसे नाही कोल्हटकर जी . काश्मीरात शांतता आणि विस्थापित काश्मिरी हिन्दून्चे काश्मिरातच पुनर्वसन करण्याच्या मार्गात पाकिस्तान पुरस्कॄत दहशतवाद हा फार मोठा अडथळा आहे. तसेच अनधिकॄत रीत्या पाक ने बळकावलेला काश्मीर चा भाग परत घेणे १९७१ च्या युद्धानंतरच्या तहाच्या वेळी शक्य होते ,कारण तेव्हा पाकिस्तान पराभूत देश होता अन सुमारे १ लाख पाकी सैन्य युद्धबन्दी म्हणून भारताच्या ताब्यात होते .

पण तरीही मुत्सद्देगिरीत कमी पडल्याने असेल किंवा आन्तरराष्ट्रीय दबावाला बळी पडल्याने असेल, पण इन्दिराजी पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आणन्यास असमर्थ ठरल्या होत्या . तसे आता होता नये. यासाठी भारताला कूटनीतिक दबावतंत्र वापरून पाकिस्तानचा काटा काढावाच लागेल !

अस्वल Tue, 27/05/2014 - 23:09

पाकिस्तानशी युद्ध पुकारून लढण्या ऐवजी गनिमी काव्याचा वापर करून आर्थिक कोंडी करणे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या बाजूने दबावगट निर्माण करणे / बलुचिस्तान वझिरीस्तान फुटीरतावादाला सहाय्य करून पाकिस्तानला अंतर्गत वादात व्यस्त ठेवणे / अफघाणिस्तानला सर्वतोपरी मदत करून आपले मित्र व पाकिस्तानचे शत्रू वाढवणे व पाकिस्तान ला दुर्बल /जर्जर करून सोडणे असे अनेक कूटनीतिक उपाय उपलब्ध आहेत . परंतु आजतागायत भ्रष्ट अन लुळ्या -पांगळ्या काँग्रेसी सरकारच्या लकवा मारलेल्या परदेशी धोरणामुळे ते उपाय अमलात आणले गेले नव्हते ,

असं मानायला काय सबळ कारण आहे आपल्याकडे? बहुतेक वेळा आपण ज्या "कूटनीतिक उपायां"बद्दल बोलत आहात, ते सरकारी आणि गुप्त पातळीवर चालतच असतात. त्यातील इत्यंभूत माहिती असेल तरच कदाचित त्यातली गोम समजू शकते (joining the dots). तेव्हा निव्वळ भारतातील या सत्तापालटाच्या उन्मादात, गेली १०-१५ वर्षे काहीच झालं नाही असं म्हणणं अयोग्यच. त्यातून आपल्यासारख्या सामान्य लोकांना जर हे पटलंय (एक ते उद्धव ठाकरे सोडून द्या.) तर देश चालवणारया लोकांना त्याचं नक्कीच भान असावं, नाही का?

अतिशहाणा Wed, 28/05/2014 - 01:49

In reply to by अस्वल

तेव्हा निव्वळ भारतातील या सत्तापालटाच्या उन्मादात, गेली १०-१५ वर्षे काहीच झालं नाही असं म्हणणं अयोग्यच

केवळ दहा पंधरा वर्षे नव्हे तर गेल्या साठ वर्षात काहीच झाले नाही असा अनेक आंतरजालीय तज्ज्ञांचा दावा असतो.

गब्बर सिंग Wed, 28/05/2014 - 02:35

In reply to by अस्वल

त्यातून आपल्यासारख्या सामान्य लोकांना जर हे पटलंय (एक ते उद्धव ठाकरे सोडून द्या.) तर देश चालवणारया लोकांना त्याचं नक्कीच भान असावं, नाही का?

हे पटत नाही.

थॉमस काहिल ने त्याच्या पुस्तकात - प्लेटो वर टीका करताना अप्रत्यक्षपणे ह्याच मुद्द्याचा प्रतिवाद केलेला आहे - Sailing the Wine-Dark Sea: Why the Greeks Matter _____ Thomas Cahill

Plato made the fatal error of equating knowledge with virtue and assuming that if one knows what is right he will do what is right. (पृष्ठ क्र. १८४)

---

राज्यशास्त्राचे कोणतेही पुस्तक घ्या किंवा कोणत्याही मुरलेल्या राजकारण्यास विचारा - पॉलिटिक्स इज मोस्टली लोकल. राजकारणात स्थानिक मुद्दे सगळ्यात जास्त मह्त्वाचे असतात. विशेषतः भारतासारख्या देशात. व त्यामुळे राजकारण्यांना परराष्ट्र व्यवहारात धाडसी पणा करायला फारसे इन्सेंटिव्ह्ज नसतात.

आता तुम्ही म्हणाल की - भारतीय राजकारण्यांना परराष्ट्र व्यवहारात धाडसी पणा करायला फारसे इन्सेंटिव्ह्ज नसतात तर मग पाकिस्तान्यांना (सत्ताधीशांना) हे चाळे करायला हे इन्सेंटिव्ह्ज कुठुन येतात ? बरोबर ????

अस्वल Wed, 28/05/2014 - 02:46

In reply to by गब्बर सिंग

"त्यातून आपल्यासारख्या सामान्य लोकांना जर हे पटलंय (एक ते उद्धव ठाकरे सोडून द्या.) तर देश चालवणारया लोकांना त्याचं नक्कीच भान असावं, नाही का?"
ह्म्म, हे गृहितक चूक असेल तर दुर्दैव!

आता तुम्ही म्हणाल की - भारतीय राजकारण्यांना परराष्ट्र व्यवहारात धाडसी पणा करायला फारसे इन्सेंटिव्ह्ज नसतात तर मग पाकिस्तान्यांना (सत्ताधीशांना) हे चाळे करायला हे इन्सेंटिव्ह्ज कुठुन येतात ? बरोबर ????

नाही, ते तुमचं मत आहे, नो कमेंट्स.

गब्बर सिंग Fri, 30/05/2014 - 15:21

In reply to by मन

आता तुम्ही म्हणाल की - भारतीय राजकारण्यांना परराष्ट्र व्यवहारात धाडसी पणा करायला फारसे इन्सेंटिव्ह्ज नसतात तर मग पाकिस्तान्यांना (सत्ताधीशांना) हे चाळे करायला हे इन्सेंटिव्ह्ज कुठुन येतात ? बरोबर ????

याचे उत्तर हे आहे की - पाकिस्तानी जनता हे इन्सेंटिव्ह्ज व डिस-इन्सेंटिव्हज देऊ शकतच नाही. पाकी जनतेचा हे इन्सेंटिव्ह्ज व डिस-इन्सेंटिव्हज देण्याचा व न देण्याचा विकल्प त्यांच्याकडून काढून घेऊन सत्ताधीशांनी तो स्वतःकडेच ठेवलेला आहे. पाकी आर्मी ही जनतेस अकाऊंटेबल नाही. सरकार सुद्धा आर्मीला प्रचंड टरकून असते. व हे नेमके उलटे आहे. आता आर्मीला या कारवाया करण्याचे इन्सेंटिव्ह्ज कुठुन येतात हा जर कळीचा प्रश्न मानला तर - Paki army needs to keep itself relevant and needs to make sure a steady inflow of funds for its officers. व त्याच्या जोरावर ते त्यांना जे हवे ते करतात.

प्रजातंत्रात हे नेमके उलट होते. आर्मी ही सरकारने निर्धारित केलेल्या उद्दिष्टांसाठी काम करते. व सरकारला आर्मीमधे कधीही, कुठेही व कसाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार असतो व असायला हवा. आर्मी ही थेट सरकारला व अप्रत्यक्षपणे जनतेस जबाबदार असते.

पाकिस्तानी जनतेस धडा शिकवून त्यांना हे जाणवून देणे गरजेचे आहे की त्यांनी त्यांची जबाबदारी ही अशी टाळून उपयोग नाही. Public is indeed equity stake-holder. आर्मी जर बेलगाम वागत असेल तर त्याचे परिणाम भोगायची तयारी जनतेची असायला हवी. You have a weapon. But if firing of the weapon results in killing of an innocent person then it is "you" who should be punished - not the weapon. तुलना पर्फेक्ट नाही पण ....

पाकीस्तानी जनतेकडे इन्सेंटिव्ह्ज व डिस-इन्सेंटिव्हज देण्याचा व न देण्याचा विकल्प नाही हे पाकी जनता एक्सक्युज म्हणून भारतास सांगू शकत नाही. India should not accept it as a legitimate excuse.

पाकी जनतेशी क्रूरपणे वागून त्यांना परिणामांची जाणीव करवून द्यायलाच हवी.