प्रादेशिक पक्ष आणि फाजिल अस्मिता
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कॉंग्रेस-मुक्त भारताचे स्वप्न साकार होताना दिसत आहे,ही अभिनंदनीय गोष्ट आहे. त्याचबरोबर फाजील प्रादेशिक अस्मिताना पायबंद घालून प्रादेशिक पक्षांचे कंबरडे मोडणे देखील अपेक्षित आहे . याचे कारण गेल्या 20-25 वर्षात प्रादेशिक पक्षांच्या लांगूलचालन करीत कसेबसे केंद्रसरकार् चे पांगूळगाडे हाकणारे दुर्बल पंतप्रधान भारताला पहावे लागले .
दक्षिणेतील प्रादेशिक पक्षांचा सुद्धा नायनाट झालाच पाहिजे . करुणानिधी आणि जयललिता आपल्या बापाची जहागीर असल्यासारखे तामिळनाडू ला लुटत आहेत , मला भेटलेले कित्येक तामिळी त्याबद्दल खंत व्यक्त करतात , त्यात पुन्हा हिन्दी-द्वेष ,त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला सुरुंग लागतो तो निराळाच ! प्रादेशिक पक्षांचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन होऊ शकत नाही !
भारत देश म्हणून टिकवायचा आणि वाढवायचा असेल तर फाजील प्रादेशिक अस्मिताना खतपाणी घालून चालणार नाही ,आज ईशान्येकडील राज्यांमध्ये भारताविषयी भावनिक दुरावा आहे ,उद्या त्याची परिणीती वेगळे राष्ट्र मागण्यात होऊ शकते . केरळ मध्ये तर इस्लामिक स्टेट वाले सक्रिय आहेतच ,त्यात आता औवेसी महाराष्ट्रात देखील हातपाय पसरू लागला आहे. ह्या धोकादायक परिस्थिति चा विचार करता एक देश आणि राष्ट्रीय पक्ष यांना महत्त्व दिलेच पाहिजे. अन्यथा भारताचा रशिया व्हायला वेळ लागणार नाही...
(आधारित )
काही अंशी सहमत..... प्रादेशिक
काही अंशी सहमत..... प्रादेशिक पक्ष हे असणारच...... राष्ट्रीय पक्ष बनण्याचे बिजच जर खुंटून टाकले तर कसं होणार.....