ऑप्शन्स, डेरिव्हेटिव वगैरे..
नुकतेच एका परिचितांशी बोलताना डेरिव्हेटिव, ऑप्शन्स वगैरेचा विषय निघाला. त्यांनी एका पुस्तकाची शिफारस केली. हे ते पुस्तक: http://www.amazon.com/Option-Trading-Your-Spare-Time/dp/1572487089 सगळं पुस्तक अजून वाचले नाही, पण त्यातील एक उदाहरण ऑप्शन्स ह्या विषयाची ओळख करुन देण्यास उत्तम आहे असे वाटले. तदर्थ हा लहानसा लेख:
कल्पना करा की तुमच्या मित्रास त्याचे घर विकायचे आहे. घराची किंमत सुमारे $१००,००० (अमेरिकन उदाहरण असल्याने एक लाख हे शंभर हजार असे लिहिले आहेत.) इतकी अपेक्षित आहे. तुम्हाला हे घर विकत घ्यायला आवडेल पण तुमच्यापाशी आत्ता एवढे पैसे नाहीत. तुम्ही मित्रासमोर पुढील प्रस्ताव ठेवता:
“मी आत्ता हे घर विकत घेऊ शकत नाही, पण जर तू मला कागदावर असं लिहून दिलंस की, ‘मी (किंवा हा प्रस्ताव/ठराव घेऊन येणारा) तुझे घर पुढल्या १२ महिन्यात केव्हाही $१००,००० ला विकत घेऊ शकतो’ तर मी तुला त्यापोटी जास्तीचे $१०,००० देईन.”
समजा तुमच्या मित्रास घर विकायची तितकीशी निकड नाही. त्यामुळे तो या प्रस्तावास राजी होतो आणि तुम्ही त्यास $१०,००० देता. हा प्रस्ताव/ठराव एका प्रकारचा ‘ऑप्शन’ आहे. यामुळे तुम्हाला पुढील १२ महिन्यांत ते घर विकत घेण्याची मोकळीक (पण बंधन नाही) मिळाली आहे.
समजा पुढील सहा महिन्यांत त्या घराच्या आसपास एक नवीन मॉल बांधण्यास सुरुवात होते. परिणामत:, सगळ्या घरांच्या किंमती (आणि त्यांची मागणी) वाढू लागतात आणि आपल्या गोष्टीतील घराची किंमत आता $१२०,००० वर पोचते. साहजिकच तुमच्याकडील तो प्रस्तावाचा खर्डा तुम्ही त्या घराच्या नवीन इच्छुकांसमोर फडकवता आणि त्यांना सांगता की, “मी तुम्हांला हा प्रस्ताव $१५,००० ला विकेन, जेणेकरुन तुम्ही हे घर पुढील सहा महिन्यांत अवघ्या $१००,००० मध्ये विकत घेऊ शकाल.”
त्यातला कोणीतरी यास राजी होतो आणि तो ठराव तुमच्याकडून $१५,०००स विकत घेऊन ते घर तुमच्या मित्राकडून $१००,०००स विकत घेतो. या सगळ्या प्रक्रियेअंती काय घडलं ते पाहू या:
● तुमच्या मित्रास वायद्याप्रमाणे घराचे $१००,००० अधिक $१०,००० मिळाले.
● घराच्या नवीन मालकास ते $१२०,००० चे घर $११५,००० मध्ये मिळाले ($१००,००० घराची किंमत अधिक $१५,००० ठरावाची किंमत)
● तुमचा फायदा वट्ट $५,००० ($१५,००० वजा $१०,०००)
● महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही अवघ्या सहा महिन्यांत केवळ $१०,००० च्या गुंतवणुकीवर $५,००० चा परतावा (म्हणजे ५०%!) मिळवलात.
● त्याहून महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्हाला $१००,००० ची वस्तू विकायचा/विकत घ्यायची मोकळीक केवळ एक-दशांश किंमतीत मिळाली.
याच न्यायाने ऑप्शन्स ट्रेडिंगमधील आधारभूत मत्ता (asset) म्हणजे एखाद्या कंपनीचे समभाग असतात. दोन तर्हांचे ऑप्शन्स (कॉल आणि पुट) आपल्याला ते समभाग अमुक एका किंमतीस (अनुक्रमे) विकत घेण्याची किंवा विकायची मोकळीक देतात. त्याबद्दल पुढल्या लेखात पाहू.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
डेरिव्हेटिवमध्ये सेटल मेंट
डेरिव्हेटिवमध्ये सेटल मेंट डेटला जे काही असेल ते बोंबलत अॅक्सेप्ट करावे लागते.
असेच काही नाही, पोझिशन्स पुढच्या महीन्यात ढकलता येतात.
सर्कीटरावांना फायदा होण्यासाठी कोणाला तरी तोटा होणे गरजेचे आहे
असेच असणे गरजेचे नाही. डेरीव्हेटीव्ह काही लोक आपल्या दुसर्या पोझीशन्स ला हेज म्हणुन घेतात.
यात जितके मोठे रिटर्न दिसतात तितक्या मोठ्या प्रमाणात तोटा पण होऊ शकतो. कॅपिटलवर पन्नास टक्के झालेला तोटा भरून काढायला शंभर टक्के प्रॉफिट लागतं.
उलट ऑप्शन्स खरेदी करुन तुम्ही होणारा तोटा आधीच ठरवून ठेवू शकता. सामान्य माणुस ऑप्शन विकण्याच्या भानगडीत सहसा पडत नाही.
अनु राव - सांगत रहा. पोझिशन्स
अनु राव - सांगत रहा.
पोझिशन्स कितीकाळ ढकलता येतात? त्याचे काही वेगळे चार्जेस असतात काय???
डेरीव्हेटीव्ह काही लोक आपल्या दुसर्या पोझीशन्सला हेज म्हणुन घेतात. याबद्दल माहीती नाहीये, सविस्तर लिहा.
ऑप्शन्स खरेदी करुन तुम्ही होणारा तोटा आधीच ठरवून ठेवू शकता. हे खरं तर दोन्हीकडून बेट लावण्यासारखं वाटतं आहे.
डेरीव्हेटीव्ह काही लोक आपल्या
डेरीव्हेटीव्ह काही लोक आपल्या दुसर्या पोझीशन्सला हेज म्हणुन घेतात. याबद्दल माहीती नाहीये, सविस्तर लिहा.
उदाहरण म्हणुन - तुमच्या कडे बँकांचे बरेच शेयर आहेत आणि राजन साहेबांचा द्वीमासिक बैठक आहे. जर रेपो रेट कमी केला तर तुमच्या शेयर ची किंमत वाढेल. जर रेपो रेट वाढवला किंवा तेव्हडाच ठेवला तर तुमच्या शेयर ची किंमत कमी होइल. आता राजन काय करणार आपल्याला माहीती नाही. अश्या वेळेला ही रिस्क कशी हाताळायची?
तेंव्हा तुम्ही Bank Nifty चे पुट विकत घेउन ठेवाल ( तुमच्या कडे असलेल्या शेयर च्या प्रमाणात ). जर रेपो रेट कमी झाला तर तुमचे पुट चे पैसे जातील पण शेयर चा भाव वाढल्या मुळे तिथे जास्त फायदा होइल. जर रेपो रेट वाढला तर तुमच्या शेयर चा भाव कमी होइल पण तुमचे नुकसान काही प्रमाणात पुट चा भाव वाढल्यामुळे भरुन निघेल.
घराबद्दलचा ऑप्शन
५०% परतावा हे पेपरवर छान वाटेल, पण प्रत्यक्षात हे वाटते तितके सोपे नाही.
घराबद्दलचे ऑप्शन बहुतेक वेळा घराचा मालक देतो, ग्राहक नाही. याला Lease option असे पण म्हणतात. याचे कारण म्हणजे खरेदी करणार्याकडे चांगले क्रेडिट आणि/अथवा डाऊन पेमेंटसाठी पैसे नसतात. ग्राहकाला वाटत असते की काही दिवसांनी तो ते घर घेऊ शकेल. ऑप्शनचे पैसे म्हणून मालक १-२ महिन्याचे अधिक भाडे घेतात किंवा वाढीव भाडे घेतात (ज्यामधून थोडे-थोडे पैसे ऑप्शनमध्ये जातात.) बहुतेक वेळा ग्राहकाला घर घेणे शक्य होत नाही आणि ऑप्शनचे पैसे मालक खिशात टाकतो. subprime rental market मध्ये बहुतेकदा हा प्रकार चालतो. माझ्या माहितीत उत्तम आर्थिक स्थिती असलेल्या कोणीही ऑप्शन देऊन घर घेतलेले नाही (मी investment म्हणत नाहीये, त्यात असे होते). मालक सुद्धा अशा अनिश्चित परिस्थितीत घर विकेल, असे वाटत नाही.
ग्राहक सुद्धा ऑप्शन देऊन घर घेतात, पण ती परिस्थिती साधारणतः अशी. इंन्वेस्टरना घरे विकत घ्यायची असतात, पण त्यांच्याकडे वेळ नसतो. मग ते Bird Dog ना जवळ करतात. Bird Dog चे काम म्हणजे ऑप्शन देऊन घरे विकत घेणे आणि ती लगेच इंन्वेस्टरना विकणे. ऑप्शनला खूप कमी पैसे लागतात, म्हणून बर्ड डॉगिंग हा प्रकार नवशिके/खिसा गरम नसणारे लोक करतात. कधीकधी ऑप्शनचे पैसे पण बर्ड डॉगला इंन्वेस्टर देतो आणि होणार्या फायद्यातील हिस्सा ते वाटून घेतात.
घराजवळ नवीन मॉल बांधला तर ट्रॅफिक वाढेल म्हणून किंमत वाढण्याऐवजी कमी पण होऊ शकते.
डिस्क्लेमरः हा रिअल इस्टेटबद्दल सल्ला समजू नये.
तुम्हाला निराश करण्याचे
तुम्हाला निराश करण्याचे इच्छा नाही पण जी माहीती गुगल केल्यावर किंवा अगदी बेसिक पाठ्य पुस्तकात आहे ती देण्याचे प्रयोजन समजत नाही.
ऑप्शन्स बद्दल अशी काही माहीती जी सहजा सहजी उपलब्ध नाही आणि ज्या गोष्टी ट्रेडर वापरतात त्या फोड करुन सांगीतल्या तर मजा येइल. आणि तुमचे स्वताचे विचार आणि मते आली बरोबरीने तर जास्तच बरे.
वाचतो आहे
वाचतो आहे.
अवांतर - या बाबत थोडी प्रतिकूल मतं आहेत. याचं कारण लहानच्या टप्प्यात मार्केट इफिशीयंट नसते. बॅलन्स शीटवर प्रचंड कॅश असलेली कंपनी मिसप्राईस्ड असू शकते. ती कंपनी योग्य किंम्मत गाठायला किती वेळ घेइल हे सांगता येणे अशक्य असते. (समजा पाच वर्ष अबक कंपनीचे प्रॉफिट वार्षीक तीस टक्के दराने वाढलेत तर पाच वर्षाचा सीएजीआर तीस टक्के मिळेल (पीई रेश्यो सेम राहील्यास), पण पाच वर्षातली प्रत्येक क्षणाची किंम्मत किंवा महीन्याभरातील सरासरी किंम्मत सांगता येणे अशक्य असते).
डेरिव्हेटिवमध्ये सेटल मेंट डेटला जे काही असेल ते बोंबलत अॅक्सेप्ट करावे लागते.
I view derivatives as time bombs, both for the parties that deal in them and the economic system- warren buffett 2002 letter to shareholders
डेरिव्हेटिव झीरो सम गेम होतो. सर्कीटरावांना फायदा होण्यासाठी कोणाला तरी तोटा होणे गरजेचे आहे अशा प्रकारचा. त्याने फक्त ब्रोकर श्रीमंत होईल. ब्रोकरच होऊ ना मग.
यात जितके मोठे रिटर्न दिसतात तितक्या मोठ्या प्रमाणात तोटा पण होऊ शकतो. कॅपिटलवर पन्नास टक्के झालेला तोटा भरून काढायला शंभर टक्के प्रॉफिट लागतं.
आर्बिट्राज ट्रेडींग शक्य आहे असं वाचनात आलं आहे. तपशीलात शिरल्यावर त्या बद्दल लिहालच. यात खेळणारे काही मित्र कंपनीच्या सेल्सनंबर वरून तिमाही रिझल्ट प्रेडीक्ट करतात (साधारण ३०% अंदाज येतो). मेजर सेफ वाटलं तरच करतात.