मनातील छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ३१
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
आधीचे सर्व धागे इथे वाचता येतील - मनातले छोटेमोठे प्रश्न/विचार.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
माझ्या आठवणीनुसार नुकतीच (गेल्या १-२ वर्षांत) नागपुरातल्या एका बाईंनी मराठीतल्या भाषांतरित साहित्याची सूची प्रसिद्ध केली होती. तो बहुधा त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाचाच भाग होता. त्या बाईंचं नाव आणि त्या सूचीचं नाव, प्रकाशन अशी काही माहिती मिळू शकेल का? मला त्या सूचीची तातडीनं गरज आहे, पण तपशील कळल्याशिवाय शोध घेता येत नाही.
३०० पानांचे पुस्तक
आता कोणत्याही विषयावरची मला ३०० पानांचे पुस्तक (कादंबरी) वाचायला ५-६ तास पुरतात पण रोमँटीक कादंबर्या / शरीरवर्णने असलेल्या कादंबर्या वाचतांना लग्न व्हायच्या अगोदर जास्त वेळ लागायचा.
चांगले कळून घेऊन वाचायचे पुस्तक असेल तर फक्त २ तास पुरतात.
(जास्त पृष्ठसंख्या असलेली डोक्याला जास्त त्रास देणारी पुस्तके मी सहसा वाचत नाही. वाचलीच तरी ती १०० ते १५० पानांच्या वर असणार नाही याची काळजी घेतो.त्यामुळे २ तास पुरतात)
अर्थात तुम्ही सलग ५-६ तास किंवा २ तास वाचता काय असा उपप्रश्न असेल तर त्याचे उत्तर खालीलप्रमाणे.
बिनडोक पुस्तके (म्हणजे डोके न लावता वाचायची पुस्तके) - इन वन सिटींग किंवा स्लीपींग म्हणा हवतर.
डोकेबाज पुस्तके ( म्हणजे अर्थ कळून घेऊन वाचायची पुस्तके ) - पहिली १०-१५ मिनिटे वाचन, मग त्यावर मनातल्या मनात (तोंड न हलवता) रवंथ करतो मग पुढील भाग. अन्न (विचार) पचायला जड असेल तर रवंथ करण्याचा कालावधी वाढतो.
सावकाश आणि फास्ट ( म्हणजे मराठीत वेगवान) वाचन ठरवून करता येत नाही. धार्मिक (नित्यनेमाची) पुस्तके आपोआप वेगाने वाचली जातात तर अधार्मिक पुस्तके सावकाश वाचली जातात.
कथा / कथासंग्रह वाचायला मला कादंबरीच्या तुलनेत (पर पेज / पर स्टोरी) जास्त वेळ लागतो. एका कथेतून दुसर्या कथेत शिरायला वेळ लागतो.
शाळा / कॉलेजात असताना पाठ्यक्रमाची पुस्तके एकदा वाचून प्रश्नोत्तरे लिहून बघीतल्याशिवाय डोक्यात राहत नसत त्यामुळे एकदा(च) वाचन व एकदा लिखाण असा क्रम असल्याने वेळ मोजला नाही.
वरील सर्व उत्तरे मराठी भाषेतील पुस्तकांसाठी लागू आहेत. वर्तमानपत्रांचे वाचन करतानाच्या मनोवस्थेचे अजून नीट अवलोकन करु शकलेलो नाहिये. कधीकधी शीर्षक आणि बातमीचा मजकूर एवढा विसंगत असतो की पूर्ण बातमी वाचल्यावर मी चु़कीचेच शीर्षक वाचले की काय असा भास होतो आणि मग पुन्हा वाचावे लागते.
३००/६ = ५० पाने प्रतितास. ही
३००/६ = ५० पाने प्रतितास. ही मला अफाट स्पीड वाटतेय. मी फक्त ऑफिसमधले करार इ इ या गतीने वाचतो. करारांची भाषा प्रचंड किचकट असते पण सवयीने गती आली आहे. वयाप्रमाणे वाचायची गती कमी होत असावी. पेशन्सपण कमी होत असावा. कॉलेजात मी पेपरात लेख डिटेलमधे वाचे. आता फक्त बहुसंख्य बातम्यांचे शीर्षक वाचतो. काही काही बातम्यांचा पहिला पॅरा वाचतो.
--------------------
गब्बर लिंका देतो, एवढी नावे सांगतो, ते त्याने स्वतः नक्कीच वाचलेलं असावं. स्वतःची सगळी कामं करून इतकं अवांतर वाचत राहावं हे कौतुकास्पद आहे.
माझा वाचन वेग- (विषयावर/ साहित्यप्रकारावर अवलंबून)
माझा वाचन वेग- (विषयावर/ साहित्यप्रकारावर अवलंबून)
मराठी- ६० ते ९० पृष्ठे प्रतितास
इंग्लिश- ३० ते ४० पृष्ठे प्रतितास
हिंदी ४० ते ५० पृष्ठे प्रतितास
एकदा माझ्या पत्नीसह माझ्या एका मेहुणीकडे गेलो असताना संध्याकाळी ७ ते ८ वाजता त्या दोघींच्या टीवीवरच्या मालिका पाहून होईपर्यंत माझी १८० पानाची एक छोटेखानी कादंबरी वाचून झाली होती!
वाचनाचा वेग चांगला असायला हवा तर या छोटाश्या मानवी आयुष्यात थोडंतरी वाचून होईल!
मला माझा वाचनवेग अजून दुप्पटतरी करायचा आहे, पण...
कादंबर्या इ. वाचताना तासाला
कादंबर्या इ. वाचताना तासाला शंभरेक पाने हा मराठीसाठी, तर इंग्लिशसाठी त्याच्या निम्म्याच्या आसपास असा वेग आहे.
तेच जडजंबाल कैतरी असेल (उदा. कुरुंदकर) तर मराठीसाठी हा वेग ताशी ५०-६० पाने असा होतो. इंग्लिशसाठी त्याच्या साधारणपणे निम्मा.
बंगाली वाचनाचा वेग अजून ताशी ५-६ पानांपलीकडे गेलेला नाही.
तसंच काहीसं
आकडे वेगळे असतील पण मराठी वाचताना गाडी भरधाव सुटते. इंग्रजीत जरा कमी.
सरळसोट असेल तर मराठीत बहुतेक तासाला १००-१५० नक्कीच. इंग्रजीत बघायला पाहिजे- पण ७०-८० असावं.
काही लेखक वाचताना वर्णनं सरळसोट उडवतो, ज्यामुळे काहीच फरक पडत नाही. उदा. डॅन ब्राऊन.
कविता वाचायला उलटं. जेवढी छोटी कविता तेवढा जास्त वेळ लागतो ;)
परिचयात
>> अमुक मनुष्य बीफ आणि बीफयुक्त पदार्थ खातो असं म्हटल्यावर तुम्हाला त्याच्याविषयी घृणा वाटते का किंवा परकेपणा वाटतो का?
एखादा मनुष्य हिंदू घरात जन्माला आला असेल आणि स्वेच्छेनं / आवडीनं गोमांसभक्षण करत असेल, तर त्याच्याविषयी असं वाटतं असं कबूल करणारे काही लोक माझ्या परिचयाचे आहेत.
अन्य प्रश्न. मी काही
अन्य प्रश्न. मी काही काळापूर्वी एकदा परदेशात एका ठिकाणी ब्रेकफास्ट काउंटरवर प्लेट भरुन घेत असताना माझ्याबाजूला काही भारतीय मराठी फ्यामिलीतले शाकाहारी आणि (अबीफाहारी) मांसाहारी लोक आले. त्या काउंटरवर चीजचे काप, हॅम, काही सॅलडचे घटक वगैरे होते. त्यात बीफचे कापही होते. पण त्याला दिलेली नावं कुठेही सर्वसामान्य भारतीयाला ते बीफ आहे असं दर्शवणारी नव्हती. मी असामान्य भारतीय नसलो तरी पदार्थांची ओळख असल्याने, नावे माहीत असल्याने आणि असा काही खाद्यभेद करत नसल्याने अर्थातच इतर घटकांसोबत तेही घेतले. इतर लोकांपैकी काहीजणांनी माझ्यासोबत असल्याने म्हणा किंवा न समजून म्हणा ते घेतले तर काही प्युअर व्हेजवाल्यांनी एकाच चिमट्याने सर्व पदार्थ उचलले जात आहेत हे माहीत असून किंवा नसूनही ही ते बीफ आहे हे न समजल्याने तोच चिमटा वापरुन चीज वगैरे व्हेज घटक उचलून घेतले.
एरवी या लोकांना बीफ जिथे ठेवलेय तिथले जवळपासचे अन्नही कदाचित पोटात ढवळून येण्यास पुरेसं ठरलं असतं. कॉमन चिमटा / वाढणी / प्लेट तर दूरच.
त्या भीतीमुळे मी तत्क्षणी काहीच बोललो नाही.
अशा वेळी त्यांच्या प्रामाणिक समजुती गृहीत धरुन त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवे होते का की ते काय आहे?!
तुम्ही त्यांना सांगायला हवे
तुम्ही त्यांना सांगायला हवे होते असे वाटते. पण नाही सांगितल्याने तुम्ही फार मोठे गुन्हेगार झालात, तुम्हाला गिल्टी वाटलेच पाहिजे, प्रायश्चित्त म्हणून त्यासगळ्यांची माफी मागा वगैरे म्हणणे नाही. forget it as a past but i suggest की पुढे असाच प्रसंग आला तर त्यांना सांगा.
सॉर्ट ऑफ असाच किस्सा
सॉर्ट ऑफ असाच किस्सा माझ्यासोबत झालेला. पिझ्झा हटमधे अर्धा पिझ्झा शाकाहारी आणि त्याचाच दुसरा अर्धा भाग पोर्कचा असे ऑर्डर केले तर चालेल का विचाराल्यावर मी नकार दिलेला. चिकन, मटन चालेल पण पोर्क नको. मंजे त्यांची त्यांनी सेपरेट ऑर्डर करावी एकाच पिझ्झात अर्धेअर्धे नको.
आणि मीतर शुद्ध शाकाहारी आहे असेदेखील म्हणता येणार नाही. टीनएजपासून बाय चॉइस शाकाहारी झाले. आता मिलाक्रामधे आल्यावर फारफार रेअरली अंडी, चिकन खाते.
इतरांच्या श्रद्धांचा सन्मान
इतरांच्या श्रद्धांचा सन्मान करणे मूलभूत मानवी कर्तव्य आहे.
(Karl Popper's student mode on)
फॉलिफाएबिलिटी ची थियरी मांडणार्या कार्ल पॉपर च्या एका विद्यार्थ्याने असा प्रश्न विचारला होता की इज फॉलिफाएबिलिटी फॉल्सिफाएबल ?
तसे - माझी श्रद्धा ही नेमकी तुमच्या श्रद्धे विरोधी असेल तर माझ्या श्रद्धेचा सन्मान करणे हे देखिल तुमचे कर्तव्य असावे का ?
(Karl Popper's student mode off)
(कार्ल पॉपर चे बाकी काहीही साहित्य मी वाचलेले नाही. एवढी एकच ष्टोरी माहीती आहे.)
no number of confirming
no number of confirming observations can verify a universal generalization, such as All swans are white, yet it is logically possible to falsify it by observing a single black swan.
अतिशय रोचक आहे.
अशीच रोचक संकल्पना मी वाचली होती-
जर देव हा सर्वशक्तीमान, सुपर-पॉवर आहे असे मानले तर तो त्याला स्वतःला उचलता येणार नाही इतक्या वजनाचा दगड निर्माण करु शकेल का?
जर देव हा सर्वशक्तीमान,
जर देव हा सर्वशक्तीमान, सुपर-पॉवर आहे असे मानले तर तो त्याला स्वतःला उचलता येणार नाही इतक्या वजनाचा दगड निर्माण करु शकेल का?
अभावात्मक गोष्टींनाही क्षमता असे नाव देणे ही यातली मखलाशी१ आहे. मुळातच व्याख्येत ए आणि नॉट ए असे दोन्ही इन्क्लूड केल्यामुळे क्षमतेची अभिप्रेत व्याख्याच चूक आहे, सबब प्रश्नच चुकीचा आहे.
१हा हेत्वारोप नाही हे ध्यानी घेणे.
मुळातच व्याख्येत ए आणि नॉट ए
मुळातच व्याख्येत ए आणि नॉट ए असे दोन्ही इन्क्लूड केल्यामुळे क्षमतेची अभिप्रेत व्याख्याच चूक आहे, सबब प्रश्नच चुकीचा आहे.
हे समजून घेण्याचा यत्न करत आहे.
If A is defined as - A is equal to B AND A is NOT equal to B - Then the definition is wrong. - असे तुला म्हणायचे आहे का, ब्याट्या ?
प्रश्न आहे
उदाहरणार्थ इथे सुभाष खोत यांनी मांडलेलं यूनिक गेम्स कंजेक्चर दिलेलं आहे; त्यातला हा भाग -
If the ʻUnique Games Conjectureʼ is correct, then for many of the problems people would most like to solve, it’s hard not only to find an exact solution—finding even a good approximation of the solution is beyond the reach of a computer.
काही प्रश्न सोडवता येणं फार कठीण आहे, एवढंच नाही तर त्यांच्या उत्तरांसाठी चांगला अंदाज बांधणंही कठीण आहे असं या अटकळीमधलं (Conjecture) विधान आहे. क्षमतेचा अभाव शोधणं गणितामधला महत्त्वाचा टप्पा मानलं गेलं आहे (म्हणूनच या गणितज्ञाला महत्त्वाचं पारितोषिक मिळालं). हे प्रकरण या डोलाऱ्याच्या स्कीममध्ये कुठे बसवायचं?
१. अमुक एक गोष्ट करता न
१. अमुक एक गोष्ट करता न येणे
२. अमुक एक गोष्ट करता येत नाही असे सप्रमाण सिद्ध करणे
या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे गृहीतक जाणवतेय इथे. ते चूक आहे.
अमुक एक गोष्ट करता येत नाही असे सिद्ध करणे म्हणजे एक क्षमताच आहे. ती क्षमता वापरून 'दुसरी एखादी गोष्ट करता येत नाही' हे सिद्ध होणे म्हणजे अभावात्मक नाही. अजूनेक उदा. गोडेलच्या प्रमेयाचे विधान 'अमुक एका गृहीतकांवर आधारलेल्या व्यवस्थेत तमुक एक विधान सिद्ध करता येत नाही' अशा स्वरूपाचे आहे. जे सिद्ध करायचे ते विधान अभावात्मक आहे, पण तेवढ्यामुळे त्याची सिद्धताही अभावात्मक कशी ठरेल?
हे विधान गोडेलबद्दल असेल तर
हे विधान गोडेलबद्दल असेल तर ते चूक आहे.
For any given axiomatic system, there exists at least one true statement which can't be proven so within that system.
हे त्याच्या प्रमेयाचे स्टेटमेंट आहे. अटकळ सिद्ध/असिद्ध न होणे हे इथे लागू होत नाही. तसे उदाहरण पायजे असेल तर कंटिन्युअम हायपोथेसिसबद्दल वाचावं असं सुचवतो.
नाही.
इथे गोडेल का आला तिथपर्यंत मी अजून पोहोचलेले नाही. मी अजूनही युनिक गेम्स कंजेक्चरमध्येच अडकले आहे.
आपल्याला उचलता येणार नाही असा दगड = अंदाजे उत्तरं शोधता येणार नाहीत
असा दगड बनवणे = गणितज्ञाने अटकळ मांडून ती मान्य होणे. (ही अटकळ बहुमान्य आहे, सिद्ध/असिद्ध झालेली नाही.)
पुन्हा एकदा हा दुवा देते - The Unique Games Conjecture
तुम्हा सर्व महान लोकांना अगदी
तुम्हा सर्व महान लोकांना अगदी मनापासुन आणि खराखरा प्रश्न. हे विचारण्यात काही वाइट भाव नाहीत माझ्या मनात.
आश्चर्यातुन आलेला प्रश्न आहे.
हे जे काही वर तुम्ही लिहीत आहात ( गेम थियरी वगैरे ), ते तुम्हाला अगदी अगदी आत आत पर्यंत कळलेले असते का?
जर कळले असले तर तुम्ही लोक महान आहात.
कोणीतरी मला लगेचच खवचट श्रेणी
कोणीतरी मला लगेचच खवचट श्रेणी दिली आहे. असे होइल ह्या भितीनेच मी हा प्रश्न विचारायचे बरेच दिवस टाळत होते.
ह्यात काही खवचट पणा वगैरे नव्हता.
वर वर कळणे, परीक्षेपुरते कळणे आणि पार आतुन कळणे ह्यात फरक असतो.
जेंव्हा एखादी गोष्ट आतुन कळते तेंव्हा ती दुसर्या पूर्णपणे वेगळ्या ठीकाणी लावता येते. तितकी ती आत पर्यंत कळली आहे का असा प्रश्न होता.
Nash Equilibrium कळला, पेपर उत्तर पण लिहीता आले. त्याच बरोबर त्याचा उपयोग करुन काहीतरी Market Strategy करता येतिय का? असे काहीतरी....
'युनिक गेम्स कंजेक्चर'च्या
'युनिक गेम्स कंजेक्चर'च्या दुव्यात जे काही लिहिलं आहे ते मला समजलं. त्याचा वापर करून काहीतरी करण्याएवढी बुद्धी आणि/किंवा आवड असती तर मी गणितज्ञ म्हणूनच काम नसतं का केलं?
इतपत गणित आणि विज्ञान समजणं, त्याचा वापर करून काही व्यवहारातल्या गोष्टी बनवणं, त्यातल्या तत्त्वांचा वापर करून आणखी अधिक गणित/विज्ञान समजून घेणं, या सगळ्यात बराच फरक आहे. वर उल्लेखलेला दुवा समजून-उमजून वाचला तरीही तो फरक काही अंशी समजेल असा माझा ग्रह आहे.
ठीक. कंजेक्चरचं स्टेटमेंट जरा
ठीक.
कंजेक्चरचं स्टेटमेंट जरा नीट पाहिलं. 'अमुक एक प्रॉब्लेमचा काँप्लेक्सिटी क्लास एनपी हार्ड आहे' अशा छापाचे ते वाक्य आहे. याचा अर्थ इतकाच की या प्रॉब्लेमला सोडवण्याकरिता कुठलाही अल्गोरिदम वापरला तरी त्याची टाईम काँप्लेक्सिटी ही डिटरमिनिस्टिक पॉलिनॉमियल फंक्शन रूपात मांडता येणार नाही.
याचा अर्थ 'अंदाजे उत्तरे शोधता येणार नाहीत' असा कसा काय होतो? मुद्दाम खुस्पटे काढायची म्हणून नव्हे तर खराखुरा प्रामाणिक प्रश्न विचारतो आहे. ते एक असो. मुख्य मुद्याकडे येऊ.
आपल्याला उचलता येणार नाही असा दगड = अंदाजे उत्तरं शोधता येणार नाहीत
असा दगड बनवणे = गणितज्ञाने अटकळ मांडून ती मान्य होणे. (ही अटकळ बहुमान्य आहे, सिद्ध/असिद्ध झालेली नाही.)
अटकळ 'मान्य' होणे म्हणजे काय? सिद्ध/असिद्ध होणे आणि मान्य होणे हे शब्दप्रयोग वेगळे वापरलेत म्हणून यांमधील द्वैत अभिप्रेत आहे असे वाटते म्हणून विचारले. मान्य होणे म्हणजे त्याच्या सत्यतेचे प्रत्यंतर काही ठिकाणी मिळणे असा अर्थ अभिप्रेत असेल तर दगड बनवणे आणि अटकळ मान्य होणे हे समीकरण अंशतःच व्हॅलिड ठरेल- जर अटकळीची सत्यता निर्विवादपणे सिद्ध झाली नसेल तर, किंवा तिची सत्यता तपासावयाची उदाहरणे 'काउंटेबली' इन्फिनिट, किंवा प्रिफरेबली 'फायनाईट' असतील तर.
मुळात दगड बनवणे या पायरीचे स्टेटस नीट स्पेसिफाय केले तर या सगळ्या प्रतिपादनांमध्ये अजून जास्त नेमकेपणा येईल.
नवनीताचे नवनीत
याचा अर्थ इतकाच की या प्रॉब्लेमला सोडवण्याकरिता कुठलाही अल्गोरिदम वापरला तरी त्याची टाईम काँप्लेक्सिटी ही डिटरमिनिस्टिक पॉलिनॉमियल फंक्शन रूपात मांडता येणार नाही.
नाही.
याचा अर्थ असा की ठराविक प्रकारच्या प्रश्नांचं नेमकं उत्तर मिळणार नाही असा आहे. ते प्रश्न सोडवायला, उत्तर मिळवायला किती वेळ लागेल, किती प्रोसेसिंग पावर लागेल, ती सध्या उपलब्ध आहे का याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. (पॉप्युलर पातळीवर अधिक तपशील हवे असल्यास 'लोकसत्ता'च्या २०१४ च्या दिवाळी अंकात खोत यांची मुलाखत आहे.)
अटकळ 'मान्य' होणे म्हणजे काय? सिद्ध/असिद्ध होणे आणि मान्य होणे हे शब्दप्रयोग वेगळे वापरलेत म्हणून यांमधील द्वैत अभिप्रेत आहे असे वाटते म्हणून विचारले
बरोबर, असं द्वैत आहे. ठराविक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत अशी अटकळ आहे, त्याला सिद्धता नाही. हे conjecture आहे, theorem नाही. ही अटकळ ग्राह्य असावी असं गणितज्ञांना वाटतं, त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. (म्हणून ती मांडणाऱ्या खोतांना रॉल्फ नेव्हनलिना पदकही मिळालेलं आहे.)
दगड = ठराविक प्रश्न
तो न उचलणे = प्रश्नांची नेमकी उत्तरं न मिळणे
आपल्याला ज्यांची नेमकी उत्तरं मिळणार नाहीत अशी अटकळ बांधली गेलेली आहे१, असे गणिती प्रश्न मनुष्याने उपस्थित केलेले आहेत. पुन्हा मूळ प्रतिसादाकडे जायचं तर देव असं काही करू शकतो का?
१ ही अटकळ असिद्ध झाली तर माझ्या प्रश्नाला अर्थ उरणार नाही. पण सध्या ही अटकळ सिद्ध वा असिद्ध झालेली नाही.
नाही. याचा अर्थ असा की ठराविक
नाही.
याचा अर्थ असा की ठराविक प्रकारच्या प्रश्नांचं नेमकं उत्तर मिळणार नाही असा आहे. ते प्रश्न सोडवायला, उत्तर मिळवायला किती वेळ लागेल, किती प्रोसेसिंग पावर लागेल, ती सध्या उपलब्ध आहे का याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. (पॉप्युलर पातळीवर अधिक तपशील हवे असल्यास 'लोकसत्ता'च्या २०१४ च्या दिवाळी अंकात खोत यांची मुलाखत आहे.)
विकीवर जाऊन पाहिले, मी म्हणतो तशाच धर्तीचे स्टेटमेंट आहे.
The conjecture postulates that the problem of determining the approximate value of a certain type of game, known as a unique game, has NP-hard algorithmic complexity.
यात प्रोसेसिंग पॉवरचा संबंध आलाच कुठे?
आपल्याला ज्यांची नेमकी उत्तरं मिळणार नाहीत अशी अटकळ बांधली गेलेली आहे१, असे गणिती प्रश्न मनुष्याने उपस्थित केलेले आहेत. पुन्हा मूळ प्रतिसादाकडे जायचं तर देव असं काही करू शकतो का?
देव म्हणजे सर्वशक्तिमान अशी व्याख्या असेल तर तो असे करू शकणार नाही, कारण देव असे करू शकतो असे म्हटल्यास किमान एक गोष्ट तो करू शकत नाही असे सिद्ध होते. स्वतः उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर स्वतःला माहिती नसणे हे 'सर्वशक्तिमान' मानल्या जाणार्या देवाने करणे म्हणजे तार्किक विसंगती आहे.
एकत्र उत्तर
अटकळ हा शब्द वापरण्यात येइल आता. म्हणजे कोणी पुरावे, विदा विचारायचा प्रश्न उद्भवणार नाही.
ही अटकळ सिद्ध वा असिद्ध होऊ शकते. (है कोई माई का लाल? :प) हे काम पुढच्या पाच वर्षांत होईल, का दोनशे वर्षांत होईल का कधीच होणार नाही हे आत्ता सांगता येत नाही एवढाच त्याचा अर्थ आहे. सध्याची विदा पाहता "ठराविक गणिती प्रश्नांची नेमकी उत्तरं मिळणार नाहीत" हेच सिद्ध होतंय.
... देव असे करू शकतो असे म्हटल्यास किमान एक गोष्ट तो करू शकत नाही असे सिद्ध होते.
योग्य.
या धडपडीचं मला समजलेलं तात्पर्य - सर्वशक्तिमान असण्याने सगळे प्रश्न सुटू शकत नाहीत, कुठल्यातरी लफड्यात सहज पाय अडकवता येतो; आणि क्षमता नसण्यातूनही बरंच काही समजून घेता येतं ... इत्यादी इत्यादी
क्षमतेच्या ऑरवाल्या
क्षमतेच्या ऑरवाल्या व्याख्येसाठी टाळ्या. एक नंबर. पूर्ण सहमत. माझ्या आक्षेपापेक्षा हे अधिक नेमके आहे. क्षमतेची अभावात्मक व्याख्याही समाविष्ट केलीये सबब त्यावरचा माझा आक्षेप रद्दबातल.
अँडिंग न येता ऑरिंग आल्यामुळे नेहमी खोटे ठरणार नाही असे एतत्सदृश वाक्य रचता येईल का पहा. मजा येईल.
धन्यु
धन्यु :)
अँडिंग न येता ऑरिंग आल्यामुळे नेहमी खोटे ठरणार नाही असे एतत्सदृश वाक्य रचता येईल का पहा. मजा येईल.
ऐका बॅट्मॅन, एक स्वार्थी (स्वान्ताय सुखाय) विचार- :)
देव सर्वव्यापक आहे = आपल्या आत Union आपल्या बाहेर
मग स्वतःवर प्रेम करा अथवा = OR अन्य कोणावर देव तर सुखावणारच. मग प्रेम्/त्याग आदि फक्त स्वतःवर/स्वतःसाठीच का करु नये? :D :D :D
मग हे अध्यात्म, परोपकार, दुसर्यासाठी त्याग, कणव, सहानुभूती वगैरे लांबचे अन क्लिष्ट मार्ग झाले. स्वार्थ हाच परमार्थ गाठायचा सोपा/शॉर्ट्कट आहे अन त्यानेही आपण तितकेच देवाच्या कृपेस पात्र ठरतो. मग शॉर्ट्कटच का आचरु नये?
इथे प्लीज नैतिकतेचे डोस आणू नयेत, तर मॅथेमॅटिकली माझे विधान खोडून काढावे.
मग स्वतःवर प्रेम करा अथवा =
मग स्वतःवर प्रेम करा अथवा = OR अन्य कोणावर देव तर सुखावणारच. मग प्रेम्/त्याग आदि फक्त स्वतःवर/स्वतःसाठीच का करु नये?
प्रश्न उचित आहे. आवडला.
१) देव सर्वव्यापी आहे असे असेल तर कोणतीही कृती का करावी ? प्रेम करणे ही कृती आहे. त्याग करणे ही देखील कृति आहे. देव सर्वव्यापी असेल तर देवानेच देवावर प्रेम केले व देवानेच देवासाठी त्याग केला असे होईल. पण असे का होईल ? असे का व्हावे ?
२) दुसर्या शब्दात - देव सर्वव्यापी आहे पण व्यक्ती देवापेक्षा भिन्न आहेत असे असेल तर कृति करण्याचा प्रश्न उद्भवेल. नाही का ? जर व्यक्ती देवापेक्षा भिन्न असतील तर देव सर्वव्यापी नाही.
निरुत्तर झाले आहे. विचार करते
निरुत्तर झाले आहे. विचार करते आहे.
ते इज फॉल्सिफिकेशन, फॉल्सिएबल ही प्रचंड आवडले आहे. काहीतरी विचीत्र लूप होतय :(
_________________
गब्बर तुम्हाला ते ब्लु आयलँडर पझल माहीत आहे का? अतिशय रोचक आहे.
https://terrytao.wordpress.com/2008/02/05/the-blue-eyed-islanders-puzzl… (आधी पाहू नका)
(१) एक बेट आहे जिथे एक जमात रहाते.
(२) त्या जमातीमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या डोळ्यांचे (१०० जणांचे नीळे डोळे, ९०० जणांचे पिंगे) १००० लोक आहेत.
(३) त्यांच्यामध्ये एकमेकांच्या डोळ्याच्या रंगाबद्दल बोअलणे निषिद्ध आहे. जर एखाद्याला त्याच्या स्वतःच्या डोळ्याचा रंग कळला तर आत्महत्या करावी लागते.
(४)सगळे जण तर्कसम्राट आहेत = तर्काने कळेल ते सगळं सगळ्यांना ताबडतोब कळतं
(५) एकदा एक नीळ्या डोळ्याचा माणूस येतो.
(६)चुकून तो म्हणतो अरे वा इथे माझ्यासारखे नीळे डोळे असलेली एक व्यक्ती आहे.
या लहानशा विधानाचा त्या जमातीवर काय परीणाम होईल? एनीवे यावर पूर्वी चर्चा झालेली आहे, तेव्हा प्रयत्न करुन मग, पाहीलत तरी हरकत नाही.
यात खोडण्यासारखे काही
यात खोडण्यासारखे काही नाही.
फक्त स्वतःवर प्रेम वा स्वतःसाठी त्याग करण्यानेच प्रत्येकाला जास्ती सुख मिळेल असे नाही. ज्यात जास्ती सुख मिळेल ते ते त्याने करावे. कुणाला फक्त स्वतःवर प्रेम इ. करण्याने जास्त सुख मिळेल, तर कुणाला बाकी लोकांची काळजी करण्याने जास्त सुख मिळेल. शेवटी हा शॉर्टकट अन तो लाँगकट हे ठरवणार तरी कोण नैका? याचे ऑब्जेक्टिव्ह मानक नाहीये.
विद्यार्थ्याचे म्हणणे नाही समजले
विद्यार्थ्याचे म्हणणे नाही समजले.
फॉल्सिफायेबिलिटी विधानांबाबत (statements) असते, (विधानाशिवाय सुट्या) संकल्पनांबाबत (concept) नसते.
थियरी ही विधान (स्टेटमेंट) स्वरूपाची असते. उदाहरणार्थ : "जर दोन पिंडांना M आणि m इतके वस्तुमान आहे, आणि त्यांच्यातील अंतर r इतके आहे, तर प्रत्येक पिंडावर GmM/r2 इतके बल एकमेकांच्या दिशेने मोजता येते"
G = 6.673×10−11 N·(m/kg)2
तशी परिस्थिती शोधून/रचून बल मोजले, आणि थियरी म्हणते तितके भरले नाही तर थियरी खोटी पडते, म्हणून ही थियरी खोटी-म्हणून-दाखवता-येण्यासारखी (फॉल्सिफायेबल) आहे.
परंतु नुसती "बल" ही संकल्पना, वा "वस्तुमान" ही संकल्पना खरीही नसते किंवा खोटीही नसते. त्यामुळे ती खोटी-म्हणून-दाखवणे (फॉल्सिफायेबिलिटी) असे म्हणण्याला काही अर्थच राहात नाही.
"फॉल्सिफायेबिलिटी" हा सुटा शब्द, ही संकल्पना घेतली, तर ती खोटीही नसते आणि खरीही नसते. त्यामुळे तीसुद्धा खोटी-म्हणून-दाखवणे (फॉल्सिफायेबिलिटी) असे म्हणण्याला काही अर्थच राहात नाही.
कदाचित विद्यार्थ्याला असे म्हणायचे असेल की पॉपर वाक्य/विधान बोलला की
"Universal statements are never derivable from singular statements, but can be contradicted by singular statements (All universal statements have falsifiability)."
तर हे विधान अर्थातच फॉल्सिफायेबल आहे. जर असे एकही सामान्यविधान (universal statement) दाखवले, जे की कुठल्याही संभाव्य विवक्षित विधानाने (singular statementने) खंडित होत नाही, तर पॉपरचे विधान खोटे पडते. ते फॉल्सिफायेबल आहे. आणि यात कुठलेच ग्यडेलियन त्रांगडे उद्भवत नाही. त्याचे विधान खोटे पडले, तर ते खोटे पडते, इतकेच, चक्रतर्काने ते खरे-मग-खोटे वगैरे काही होत नाही.
त्यामुळे विद्यार्थ्याचा प्रश्न एक तर नि:संदर्भ होता; आणि आपण benefit of doubt देऊन तो दुरुस्त करून सुसंदर्भ केला, तर त्याचे उत्तर "होय" असे सहज निघते.
जर असे एकही सामान्यविधान
जर असे एकही सामान्यविधान (universal statement) दाखवले, जे की कुठल्याही संभाव्य विवक्षित विधानाने (singular statementने) खंडित होत नाही, तर पॉपरचे विधान खोटे पडते.
विधान अ- जर एका जंगलात ना कोणी सजीव ऐकणारा जीव आहे ना रेकॉर्डिंग डिव्हाइस, अन एक झाड पडले तर आवाज होत नाही.
हे विधान खोटे आहे.
अन कोणत्याही पुराव्याने, विधानाने ते खंडीत होत नाही.
इथे फॉल्सिफायेबिलिटी थिअरी फॉल्स साबीत होते.
=> पॉपरचे विधान खोटे पडते. ते फॉल्सिफायेबल आहे.
होय एकापेक्षा अधिकदा पटकन
होय एकापेक्षा अधिकदा
पटकन आठवणारे मत समान नागरी कायद्याबद्दल. मी आधी त्याच्या पूर्ण विरोधात होतो आता धर्म व लिंगनिरपेक्ष समान नागरी कायद्याच्या बाजुने आहे.
दुसरे उदाहरण आरक्षणाबद्दल. मी त्याच्या विरोधात नव्हतो मात्र मत क्रिस्टलाइज झाले नव्हते. इथल्या चर्चेतून ते का आवश्यक आहे त्याबद्दल बरेच इन्साईट मिळाले.
तिसरे वादग्रस्त भुमींबद्दल, तेथील मिल्ट्रीच्या भुमिकेबद्दल श्रामोंशी वगैरे मागे आफ्स्पाच्या निमित्ताने इथे व ऑफलाइन झालेल्या चर्चेमुळे माझ्या विचारांवर असलेल्या राष्ट्रवादाच्या काचा फुटून अधिक तथ्याधारित मत बनवण्यास मदत झाली
अजूनही कैक उदाहरणे आहेत.
@बॅटमॅन, ३०-६० अंश बदल होत
@बॅटमॅन, ३०-६० अंश बदल होत असेल तरी ठीकच आहे म्हणायच. अगदीच निष्फळ नाही :-).
@मनोबा, =)) कळतात हो असले टोमणे ;-)
@ऋ, हां हे रोचक आहे. आरक्षणाबद्दल मीदेखील कुंपणावरच होते (२००३ अखेरचा थोडाफार काळ सोडल्यास. तेव्हा मेडीकल पोस्ट ग्रेज्युएशनसाठी अँटीआरक्षण निदर्शन चालू होती) पण गेल्यावर्षी मराठा आरक्षण गदारोळादरम्यान मायबोलीवर एक धागा निघाला होता (जो दुर्दैवाने उडवला गेला). त्यातले प्रतिसाद वाचून मी एकदम प्रोआरक्षण झाले आहे.
बाकी आपल्या विदागुर्जींमुळे थोडाफार ऑप्टीमिझम आला.
मआंजावरच्यांनीच फेसबुकवर केलेल्या चर्चेतून झुफेलीया गुन्हा नसावा आणि भारतीय लग्नव्यवस्थेत सध्यातरी लग्नांतर्गत बलात्कार गुन्हा का होऊ शकत नाही वगैरेंची अर्ग्युमेंट पटल्या.
झुफेलीया म्हणजे? ...........
झुफेलीया
म्हणजे?
...........
मी मराठी आंतरजालावर येण्यापूर्वी प्रमाणबोली म्हणजेच केवळ शुद्ध आणि इतर बोली म्हणजे अशुद्ध अशा विचारांचा होतो. उपक्रम आणि मिपावरील धनंजय ह्यांचे लेख वाचून हा दृष्टिकोन बऱ्यापैकी बदलला. ह्या बाबीकडे बघण्यात थोडा डोळसपणा आला असे वाटते. भाषा, व्याकरण ह्या गोष्टी गंमतीदार वाटू लागल्या आणि त्यावर विचार करायला, कीस पाडायला मजा येऊ लागली. माझ्यातल्या ह्या आनंददायी बदलाला मराठी आंतरजाल मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे असे वाटते.
www.en.wikipedia.org/wiki/Zoo
www.en.wikipedia.org/wiki/Zoophilia
झूफिलीया मंजे मनुष्यप्राण्याने इतर प्राण्यांसोबत संभोग करणे. सध्या कायद्याने हा गुन्हा आहे. पहिल्यांदा हे ऐकतो तेव्हा स्कँडलाइज होतो. प्राण्यांच्या इच्छेविरूद्ध हा संभोग असतो म्हणून कायद्याने गुन्हा असणे बरोबरच आहे असे वाटते. माझेदेखील कित्येक वर्ष हेच मत होते. पण 'त्या' व्यक्तीने "माणसांच्या कायदाव्यवस्थेने प्राण्यांच्या कंसेंटचा विचार का करायचा" असे काहीसे अर्ग्युमेंट केले. अन् मी म्हणलं "अरे हो! खरंच की!"
प्रश्न सध्यातरी तात्विक वाटेल
प्रश्न सध्यातरी तात्विक वाटेल पण तात्विकता विदिन अॅक्सेप्टेबल लिमिट्स असेल असं मानून नोंदवत आहे. समलैंगिकता सर्वमान्य व्हावी हे उत्तमच. पण ती ऑफेन्सिव्ह प्रवृत्तींपासून आपोआप इन्सुलेटेड नसणार तेव्हा..:
एखाद्या व्यक्तीने प्रौढ समान लिंगाच्या व्यक्तीवर बलात्कार केला तर तो बलात्कार समजला जाईल का? विनयभंग केला तर विनयभंग समजला जाईल का? कायदेशीर अन समाजमान्यता मिळाल्यावर असे कायदे करावे लागतील की ते आधीच कव्हर्ड आहे?
सध्या दोन पुरुषांची मारामारी अथवा एकाने दुसर्यास मारहाण केल्यास मारहाणीचाच गुन्हा दाखल होतो..(जो बलात्कारापेक्षा किंवा प्रयत्नापेक्षा सौम्य गुन्हा असावा)
त्याच जागी शारिरीक जबरदस्तीचा गुन्हा दाखल होईल का?
यापुढचा प्रश्न आणखीन विचित्र आहे.
विरुद्धलिंगी व्यक्तीऐवजी आपल्याच लिंगाच्या व्यक्तीने छेडछाड, बळजबरी करणे हे भिन्नलिंगी व्यक्तींना अधिक मानसिक त्रासाचे ठरेल का? त्यासाठी अधिक कठोर कारवाई होण्याची मागणी झाली तर रास्त असेल का?
गवि, आपण नविन व्यवस्थेतील
गवि, आपण नविन व्यवस्थेतील गुन्ह्यांबद्दल बोलताय. एक मिनिट एकही गुन्हा होणार नाही असे माना.
=================
विवाह संस्थेत जे जे अंतर्भूत आहे त्या प्रत्येक गोष्टीचं काय काय होणार हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.
==================
समलैंगिकता हार्मोनल डिसबॅलँसमुळे असते असे म्हटले कि असहिष्णु पुरोगामी चिडतात. ते म्हणायची देखिल भिती आहे.
माझ्यामते एकदा कायद्याने
माझ्यामते एकदा कायद्याने समलैंगिकता हा लैंगिकतेचा एक प्रकार मानला, की विनयभंग, बलात्कार यांच्या व्याख्या आपोआप समलैंगिकतेला अंतर्भूत करून वाचतील. (कायद्याच्या ड्राफ्टिंगचं एक मार्गदर्शक तत्त्वः अगदी अपरिहार्य असेल तिथेच शाब्दिक फेरफार केले जातात.)
इंट्रेस्टिंग प्रश्न हा आहे:
विरुद्धलिंगी व्यक्तीऐवजी आपल्याच लिंगाच्या व्यक्तीने छेडछाड, बळजबरी करणे हे भिन्नलिंगी व्यक्तींना अधिक मानसिक त्रासाचे ठरेल का? त्यासाठी अधिक कठोर कारवाई होण्याची मागणी झाली तर रास्त असेल का?
काही लोकांना नक्कीच अधिक मानसिक त्रासाचं ठरू शकेल. पण त्यासाठी अधिक कठोर कारवाईची मागणी चूक आहे.
कारणः
एखाद्या गुन्ह्याच्या सबसेटमुळे जर मानसिक त्रास वाढत असेल, तर केवळ "मानसिक त्रास वाढला" या कारणास्तव गुन्ह्याच्या कमाल शिक्षेपेक्षा अधिक शिक्षा देणे गैर आहे.
उदा.
एका स्त्रीला दाढी असणारे पुरुष आवडत नाहीत. विनयभंग करण्याला क्ष वर्षं तुरुंगवासाची शिक्षा आहे. दाढीवाल्या पुरुषाने विनयभंग केल्यास त्या स्त्रीला जास्त मनस्ताप होईल. पण या कारणास्तव शिक्षा क्ष वर्षांपेक्षा वाढवणं लॉजिकल नाही.
वरच्या उदाहरणात सब्स्टिट्यूटिंगः
दाढी असणारे पुरुष = लेस्बियन स्त्रिया.
उत्तर बदलू नये.
माझ्या मर्यादित वकुबाने
माझ्या मर्यादित वकुबाने उत्तरांचा प्रयत्न करतो:
एखाद्या व्यक्तीने प्रौढ समान लिंगाच्या व्यक्तीवर बलात्कार केला तर तो बलात्कार समजला जाईल का? विनयभंग केला तर विनयभंग समजला जाईल का? कायदेशीर अन समाजमान्यता मिळाल्यावर असे कायदे करावे लागतील की ते आधीच कव्हर्ड आहे?
नाही. सध्याच्या अनेक कायद्यांत बदल करावे लागतील.
म्हणून तर बहुतांश नागरी/सामाजिक कायदे (व काही क्रिमिनल कायदे देखील) हे लिंगनिरपेक्ष असावेत अशा मताचा मी आहे. यात विवाह आला, विनयभंग, बलात्कार, घटस्फोट, छेडछाड, लैंगिक अपवर्तन, हरासमेंट, मोलेस्लेशन इत्यादी अनेक बाबी आल्या. एका व्यक्तीने दुसर्या प्रौढ व्यक्तीवर त्याच्या परवानगीविना संभोगास वा कोणत्याही इंद्रीयात काहीही शिरवण्यासाठी बलप्रयोग केल्यास त्यास बलात्कार म्हणता यावे (म्हणजे एखाद्या स्त्रीने पुरुषाच्या डोक्यावर बंदूक ठेऊन त्याची इच्छा नसताना आता माझ्याशी संभोग कर असे म्हटले तर तोही बलप्रयोग धरला जावा व त्यास स्त्रीने पुरूषावर केलेला बलात्कारच म्हटले जावे. व शिक्षा सारखीच असावी. - अर्थात हे टोकाचे उदा आहे अशी टिका होईलही पण मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पुरेसा आहे)
सध्या दोन पुरुषांची मारामारी अथवा एकाने दुसर्यास मारहाण केल्यास मारहाणीचाच गुन्हा दाखल होतो..(जो बलात्कारापेक्षा किंवा प्रयत्नापेक्षा सौम्य गुन्हा असावा) त्याच जागी शारिरीक जबरदस्तीचा गुन्हा दाखल होईल का?
हे मारहाणीच्या स्वरूपावर व कारणावर (मोटिव्ह) अवलंबून असेल. काही कन्फ्युझिंग प्रसंगात / कायद्याचा गैरवापर करताना तसा गुन्हा दाखल करताही येऊ शकेल् मात्र त्याची योग्यता न्यायालय ठरवेलच. कायद्याचा गैरवापर होईल म्हणून कायदाच बनवू नये असे तुमचे म्हणणे नक्कीच नसावे.
विरुद्धलिंगी व्यक्तीऐवजी आपल्याच लिंगाच्या व्यक्तीने छेडछाड, बळजबरी करणे हे भिन्नलिंगी व्यक्तींना अधिक मानसिक त्रासाचे ठरेल का? त्यासाठी अधिक कठोर कारवाई होण्याची मागणी झाली तर रास्त असेल का?
कारवाई व्हावीच. अधिक/कमी कठोर नको असे माझे मत आहे.
लिंगनिरपेक्ष कायदे झाल्यावर हा प्रश्न उद्भवणार नाही. कोणीही कोणत्याही लिंगाच्या व्यक्तीची छेडछाड व/वा बळजबरी केल्यास कायदा आपले काम करेल
म्हणून तर बहुतांश
म्हणून तर बहुतांश नागरी/सामाजिक कायदे (व काही क्रिमिनल कायदे देखील) हे लिंगनिरपेक्ष असावेत अशा मताचा मी आहे. यात विवाह आला, विनयभंग, बलात्कार, घटस्फोट, छेडछाड, लैंगिक अपवर्तन, हरासमेंट, मोलेस्लेशन इत्यादी अनेक बाबी आल्या
ही उदाहरणं घेउन लिंगनिरपेक्ष कायदा करावा का हे सांगा.
एखाद्या पुरुषावर स्त्रीने बलात्कार केला आणि एखाद्या पुरुषावर दुसर्या पुरुषाने बलात्कार केला तर दोन्ही बलात्कार सारखेच गुन्हे मानावेत का?
तसेच एखाद्या स्त्रीवर पुरुषाने बलात्कार केला आणि एखाद्या स्त्रीवर स्त्रीने बलात्कार केला तर पुन्हा समानच?
माझ्या वैयक्तीक मते दोन्ही उदाहरणातल्या दोन्ही ऑप्शन्स च्या डीग्री मधे प्रचंड फरक आहे.
एखाद्या पुरुषावर स्त्रीने
एखाद्या पुरुषावर स्त्रीने बलात्कार केला आणि एखाद्या पुरुषावर दुसर्या पुरुषाने बलात्कार केला तर दोन्ही बलात्कार सारखेच गुन्हे मानावेत का?
तसेच एखाद्या स्त्रीवर पुरुषाने बलात्कार केला आणि एखाद्या स्त्रीवर स्त्रीने बलात्कार केला तर पुन्हा समानच?
होय समानच. स्त्रीवर होवो नाहीतर पुरूषावर, होणार्या बलात्काराची वेदना सारखीच असेल.
स्त्रीवर होवो नाहीतर
स्त्रीवर होवो नाहीतर पुरूषावर,
"कोणावर" बलात्कार झाला हा मुद्दाच नव्हता. "कोणी" बलात्कार केला ह्यावर त्याची वेदना, गुन्ह्याची डीग्री वेगळी असु शकते का? हा मुद्दा होता.
पुरुषावर पुरुषाने बलात्कार केला तर माझ्या मते त्याची वेदना ही त्या पुरुषावर स्त्रीने बलात्कार केल्यापेक्षा प्रचंड जास्त असेल.
तसेच स्त्रीवर पुरुषाने बलात्कार केला तर त्याची डीग्री स्त्री ने स्त्री वर बलात्कार केल्यापेक्षा जास्त असेल.
ही माझी वैयक्तीक मते आहेत जी माझ्या भावना आणि धारणेतुन आली आहेत.
पुरुषावर पुरुषाने बलात्कार
पुरुषावर पुरुषाने बलात्कार केला तर माझ्या मते त्याची वेदना ही त्या पुरुषावर स्त्रीने बलात्कार केल्यापेक्षा प्रचंड जास्त असेल.
हे खरंच कळण्यासारखे नाहीये? पाहीजे तर ऐसी वरच्या पुरुषांचा पोल घ्या.
मला इतकेच म्हणायचे होते की लिंगनिरपेक्ष कायदा करण्याआधी वरील संभावनांचा विचार व्हावा.
समजा उद्या एखाद्या स्त्रीने
समजा उद्या एखाद्या स्त्रीने मला माझ्या इच्छेविरुद्ध संभोग करायला लावला किंवा एखाद्या पुरूषाने करायला लावला (किंवा केला) तरी मला तितकेच दु:ख होईल
हे तुमचे मत असेल, काही हरकत नाही, पण बाकीच्यांसाठी डीग्री वेगवेगळी असु शकेल. काहींना तर पहील्या टाइप चा रेप पुन्हा पुन्हा व्हावा असे वाटेल :-)
मी मदत करू का? थांब! ते
मी मदत करू का? थांब! ते (बहुतेक) असं म्हणताहेत.
बलात्कारकर्ता: पुरुष | बळी: पुरुष -> गुन्ह्याची तीव्रता: १५ | बळीला वेदना: १५
बलात्कारकर्ता: पुरुष | बळी: स्त्री -> गुन्ह्याची तीव्रता: १० | बळीला वेदना: १०
बलात्कारकर्ती: स्त्री | बळी: पुरुष -> गुन्ह्याची तीव्रता: ५ | बळीला वेदना: ५
बलात्कारकर्ती: स्त्री | बळी: स्त्री -> गुन्ह्याची तीव्रता: २.५ | बळीला वेदना: २.५
=))
यावरून गुन्ह्याची तीव्रता
यावरून गुन्ह्याची तीव्रता ठरवणं हे मला नुसतंच विनोदी-हास्यास्पद नाही, तर मध्ययुगीन-रानटी वाटतं
तसा सध्याचा कायदा पण मानतो. गुन्हेगार गरीब आहे आणि त्याने १०० रुपये चोरले ह्या विरुद्ध पैसेवाल्यानी १०० कोटी चोरले तर होणारी शिक्षा वेगळी असते ( मी युरोप, अमेरिकेबद्दल बोलतो आहे ).
एखाद्या एकदा रेप झालेल्या बाईने जर तिला पुन्हा रेप होइल असे वाटले म्हणुन खुन केला तर ती गुन्ह्याची डीग्री कमी समजली जाते.
बेल देताना पण गुन्हेगाराचे आर्थिक, सामाजिक स्टेटस लक्षात घेतात.
माझ्या मते तर गुन्हेगाराप्रमाणे गुन्ह्याची त्रीव्रता ठरवली पाहीजे. कारकुनानी पैसे खाल्ले तर समजा ३ वर्ष शिक्षा, कमिशनर नी खाल्ले तर डायरेक्ट फाशीच.
Something like this. तुम्ही
Something like this. तुम्ही खवचट पणे स्त्रीयांवरच्या बलात्काराची त्रीव्रता कमी केली आहे, ती मी बदलली आहे.
प्रत्येका साठी ही त्रीव्रता वेगळी असेल पण बळीला होणार्या वेदना ह्या कोण बलात्कार करतोय त्यावर नक्की बदलतील. तसेच हे आकडे बळी गे आहे का स्ट्रेट आहे ह्या नुसार उलटे होतील ( कदाचित )
बलात्कारकर्ता: पुरुष | बळी: पुरुष -> गुन्ह्याची तीव्रता: १५ | बळीला वेदना: १५
बलात्कारकर्ता: पुरुष | बळी: स्त्री -> गुन्ह्याची तीव्रता: १० | बळीला वेदना: १०
बलात्कारकर्ती: स्त्री | बळी: पुरुष -> गुन्ह्याची तीव्रता: १५ | बळीला वेदना: १५
बलात्कारकर्ती: स्त्री | बळी: स्त्री -> गुन्ह्याची तीव्रता: १० | बळीला वेदना: १०
नाही नाही, ती माझी चुक झाली.
नाही नाही, ती माझी चुक झाली. मेघनाचे आकडे वाचताना. It was emotional reading. मुद्दामच फाटे फोडणारे आकडे मेघनानी दिले असतील असे मी धरुन चालले. क्षमस्व.
बळी कोणीही असो सर्वात जास्त त्रीव्रता सारखीच हवी.
तुम्ही प्रतिसाद दिल्या मुळे मला आता ते आकडे बदलता येत नाहीयेत.
हे आता माझे फायनल आकडे.
हे आता माझे फायनल आकडे. प्रत्येकाचे वेगवेगळे येउ शकतात. तुमचे सर्व सारखे असु शकतील.
बलात्कारकर्ता: पुरुष | बळी: पुरुष -> गुन्ह्याची तीव्रता: १५ | बळीला वेदना: १५
बलात्कारकर्ता: पुरुष | बळी: स्त्री -> गुन्ह्याची तीव्रता: १५ | बळीला वेदना: १५
बलात्कारकर्ती: स्त्री | बळी: पुरुष -> गुन्ह्याची तीव्रता: ५ | बळीला वेदना: ५
बलात्कारकर्ती: स्त्री | बळी: स्त्री -> गुन्ह्याची तीव्रता: १० | बळीला वेदना: १०
कम्मॉन ऋ.. यात न कळण्यासारखं
कम्मॉन ऋ.. यात न कळण्यासारखं खरंच काय आहे?
दोन प्रकारच्या आघातांमधेही फरक असतो यात शंका आहे का? बलात्कारामधेही गँगने मिळून करणे, उपकरणे वापरणे (निर्भया केस) इत्यादिमधे काहीच फरक नाही का (अधिक त्रास होण्याच्या दृष्टीने)?
तद्वतच एकूण रेप हा मुळातच अत्यंत ट्रॉमॅटिक प्रकार आहे हे मान्य करुनही, त्यातही ज्याच्या त्याच्या धारणेनुसार समलिंगी बलात्काराला सामोरे जाणे आणि विषमलिंगी बलात्काराला सामोरे जाणे हे एकच असे सिंप्लिफिकेशन शक्य आहे का?
पटत नसेल हे ठीक, पण कळतच नाही हे पटत नाहीये..!
बलात्कारामधेही गँगने मिळून
बलात्कारामधेही गँगने मिळून करणे, उपकरणे वापरणे (निर्भया केस) इत्यादिमधे काहीच फरक नाही का (अधिक त्रास होण्याच्या दृष्टीने)?
अर्थातच त्याब्द्दल बोलतच नाहिये. मी दोन व्यक्तींबद्दलच बोलतोय.
एकूण रेप हा मुळातच अत्यंत ट्रॉमॅटिक प्रकार आहे हे मान्य करुनही
तेच तर सांगतोय! मुळात बलात्कारच वेदनादायी आहे.
त्यावर झालेला बलात्कार माझ्यावर झालेल्या बलात्कारापेक्षा सौम्य/तीव्र आहे कारण त्याच्यावर बलात्कार करणार्याचे लिंग माझ्यावर ज्याने बलात्कार केला त्याच्यापेक्षा वेगळे आहे हे माझ्या कळण्यापलिकडचे आहे - पटणे जाउच द्या!

http://antarbharati.org/antar
http://antarbharati.org/antarbharati/index.aspह्या चा काही उपयोग होतोय का बघा. कदाचित मायमावशीचे अंक आहेत त्यात मिळेल.