Skip to main content

'शेड्यूल्ड कास्ट' आणि धर्मांतरित व्यक्तींचे आरक्षण

सध्या भारतात 'शेड्यूल्ड कास्ट'मध्ये फक्त हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मातल्या लोकांचाच समावेश होऊ शकतो. इतर धर्मांतल्या लोकांचाही त्यात समावेश करता यावा अशा याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सरकारनं त्या मागणीला विरोध करायचं ठरवलं आहे. कारणं -

  • जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता हे केवळ हिंदू धर्मातच आहेत.
  • पिढ्यानपिढ्या झालेल्या सामाजिक अन्यायाला उत्तर म्हणून SC/ST वर्गवारी निर्माण केली गेली होती. पण धर्मांतर केलेल्यांचा त्यात समावेश केला तर इतरांवर तो अन्याय होईल.

ऋषिकेश Tue, 31/03/2015 - 13:37

तांत्रिकदृष्ट्या सरकारची भुमिका योग्य वाटते.

===

यावरून आठवले की रे.टिळकांनीही हिंदू धर्म सोडण्याचे एक प्रमुख कारण होते की या धर्मात राहुन धर्माचारण करायचे तर त्यांना अस्पृश्यांची/दलितांची सेवा करता येणार नाही. मात्र ख्रिश्चन झाल्यावर धर्माचरण करूनही कोणी अस्पृश्य/दलित नाही.

जातीआधारीत आरक्षण या धर्मांव्यतिरिक्त इतर धर्मांत देता येणार नाही हे योग्यच आहे. धर्मांतर करताना नव्या धर्मासह येणारे फायदे-तोटे-रुढी-समज-गैरसमज सगळेच स्वीकारावे लागते. (बाहेरून हिंदु धर्मात येणार्‍यांची जात कशी ठरते याची कल्पना नाही. त्यांना मात्र अ‍ॅप्लिकेबल असल्यास जातीआधारीत आरक्षण मिळाले पाहिजे असे वाटते.)

अजो१२३ Tue, 31/03/2015 - 13:42

In reply to by ऋषिकेश

चिंजंना सरकार मुस्लिम आणि ख्रिश्चन विरोधी आहे असे म्हणायचे असावे. असे म्हणणे अशा प्रकारे मांडायची त्यांची जुनी पद्धत आहे. किंवा चिंज हे इंपॉसिबल "उजवे-विरोधक" आहेत असा माझा जुना ग्रह आहे.

चिंतातुर जंतू Wed, 01/04/2015 - 13:31

In reply to by अजो१२३

>> चिंज हे इंपॉसिबल "उजवे-विरोधक" आहेत असा माझा जुना ग्रह आहे.

आणि माझ्या परिचयातल्या अनेक डाव्यांचा / समाजवाद्यांचा असा जुना ग्रह आहे की मी इंपॉसिबल डावा / समाजवादी-विरोधक आहे. त्यामुळे एकंदरीत गंमत आहे. :-)

गब्बर सिंग Wed, 01/04/2015 - 13:57

In reply to by चिंतातुर जंतू

चिंज हे माझ्या निरिक्षणानुसार आग्रही मध्यममार्गी आहेत. म्हंजे - "आपण काय नाही ते आग्रहाने व्यक्त करणारे".

If you clearly express what you are "not" then you can be reasonably sure of what you are as well as what people think you are.

अनु राव Wed, 01/04/2015 - 14:50

In reply to by चिंतातुर जंतू

आणि माझ्या परिचयातल्या अनेक डाव्यांचा / समाजवाद्यांचा असा जुना ग्रह आहे की मी इंपॉसिबल डावा / समाजवादी-विरोधक आहे. त्यामुळे एकंदरीत गंमत आहे

ह्यात काही नवल नाही चींजं. प्रत्येक डावा, कम्युनिस्ट, समाजवादी दुसर्‍या डाव्या, कम्युनिस्ट, समाजवाद्याला उजवा आणि भांडवलशहांचा ह्स्तक समजत असतो.

अजो१२३ Wed, 01/04/2015 - 15:10

In reply to by चिंतातुर जंतू

मी इंपॉसिबल डावा / समाजवादी-विरोधक आहे.

असंच असेल तर आमचं आमच्या मर्यादित परीघावर नितांत प्रेम आहे. ज्यांच्यासाठी तुम्ही उजवे ते आमच्या जीवनात नाहीत ही ईश्वरकृपाच म्हणायची.

चिंतातुर जंतू Wed, 01/04/2015 - 15:37

In reply to by अजो१२३

>> असंच असेल तर आमचं आमच्या मर्यादित परीघावर नितांत प्रेम आहे. ज्यांच्यासाठी तुम्ही उजवे ते आमच्या जीवनात नाहीत ही ईश्वरकृपाच म्हणायची.

तुमच्या प्रती त्यांच्याही अशाच भावना असतील असं वाटतं.

अजो१२३ Wed, 01/04/2015 - 16:05

In reply to by चिंतातुर जंतू

ईश्वरकृपा आणि इन्फ्रारेड डाव्यांवर? पुन्हा आमच्या मर्यादित परीघाची प्रचिती आली.

बॅटमॅन Wed, 01/04/2015 - 17:31

In reply to by अजो१२३

स्वतःच्या पार्श्वभागाला लावण्याकरिता लाल रंगाचे डबे बल्क पर्चेसने विकत घेणारे- नव्हे, ते डबे टाकीत ओतून त्यातच बसकण मारणारे ते डावे.

रेड बुल Tue, 31/03/2015 - 13:59

In reply to by ऋषिकेश

टिळकांनीही हिंदू धर्म सोडण्याचे एक प्रमुख कारण होते...

मला याबाबत माहिती न्हवती. किंबहुना टिळक हे मतांनी हिंदुकठोर होते, विषेश पुरोगामी न्हवते अशाच वावड्या कानी आल्या... अजुन जाणून घ्यायला आवडेल.

बाहेरून हिंदु धर्मात येणार्‍यांची जात कशी ठरते याची कल्पना नाही

ज्या व्यक्तीचा प्रभाव वाटुन हिंदु धर्माचा स्विकार केल्या गेल्या असेल बहुदा त्याचीच जात प्रवेशादरम्यान स्वि़कारली जात असावी ? तसही गेलेल्यांचीच उदाहरणे ठाउक आहेत आलेल्यांची नाही.

बॅटमॅन Tue, 31/03/2015 - 14:03

In reply to by रेड बुल

मला याबाबत माहिती न्हवती. किंबहुना टिळक हे मतांनी हिंदुकठोर होते, विषेश पुरोगामी न्हवते अशाच वावड्या कानी आल्या... अजुन जाणून घ्यायला आवडेल.

प्रतिसाद नीट वाचा. हे ते लोकमान्य टिळक नव्हेत. रे. टिळक अर्थात रेव्हरंड टिळक ऊर्फ ना.वा.टिळक. बा.गं.टिळक नव्हेत.

रेड बुल Tue, 31/03/2015 - 14:09

In reply to by बॅटमॅन

माझी वाचताना चुक झाली. निदर्शनास आणून दिल्याबद्दल मन:पुर्वक आभारी आहे.

धन्यवाद मन, धन्यवाद ऋषिकेश. माझी चुक झाली. स्पष्टीकरणाबद्दल सर्वांचेच आभार. :)

adam Tue, 31/03/2015 - 14:07

In reply to by रेड बुल

लोकमान्य टिळक ऊर्फ बाळ गंगाधर टिळक आणि रेवरंड/रेव्हरंड टिळक ऊर्फ ना वा टिळक ह्या दोन वेगळ्या व्यक्ती होत.
ना वा टिळक ह्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक. लक्ष्मीबाईंचं स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र प्रसिद्ध.
शाळेत बहुतेक स्मृतिचित्रेमधील काही भाग धडा म्हणून होता मराठीला.
अधिक माहिती :-
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE.%E0%A4%B5%E0%A4%BE._%E0…
.
.
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे रेव्हरंड टिळकांचच "फाइंड" मानलं जातं.

'न'वी बाजू Thu, 02/04/2015 - 16:11

In reply to by बॅटमॅन

ती तुलनादेखील मनात अगोदर चमकून गेली होती खरी, पण म्हटले महात्मा गांधींची पातळी इतकीही खाली आणायला नको - तुलना साधारणतः समतुल्यांची व्हावी, नाही का? - म्हणून त्यातल्या त्यात फिरोज गांधींचे नाव घेतले. (तुलनेने अननोन असले, तरी रिस्पेक्टेबल - प्रिन्सिपल्ड, ष्ट्रेटफॉर्वर्ड, अपराइट, इ.इ. - असावेत, असा का कोण जाणे, पण ग्रह आहे. चूभूद्याघ्या.) पण आता वाटते, की कॉण्ट्राष्ट दाखविण्याकरिता महात्मा गांधी-राहुल गांधी तुलना करावयासही प्रत्यवाय नसावा.

(ऑन द अदर ह्याण्ड, लो.टि.-रे.टि. ही तुलना साधारणतः समतुल्यांची असावी बहुधा. चूभूद्याघ्या. (कमीतकमी, रे.टिं.शी तुलना केल्याने लो.टिं.ची पातळी तरी खाली जाण्याचे भय नसावे. व्हाइसे व्हर्साबद्दल कल्पना नाही. पुन्हा चूभूद्याघ्या.) तेव्हा नकोच ते.)

आडकित्ता Sat, 04/04/2015 - 23:28

In reply to by अजो१२३

रेटी कोणाचेही नाव म्हणून अश्लील वाटतेय.

हो ना!
स्पेशली आधी लोटी घेऊन बसायचं अन मग रेटी म्हणायचं म्हणजे...
कधी नव्हे ते शमत.

अतिशहाणा Tue, 31/03/2015 - 16:12

In reply to by ऋषिकेश

ख्रिश्चन - मुसलमानांमधील दलितांना आरक्षणाचा विचार न करणे ही अत्यंत चुकीची भूमिका आहे. भारतापुरते पाहिले तर धर्म कुठलाही असला तरी जात सुटत नाही.

अजो१२३ Tue, 31/03/2015 - 17:07

In reply to by अतिशहाणा

भारतापुरते पाहिले तर धर्म कुठलाही असला तरी जात सुटत नाही.

ही भारत हे हिंदू राष्ट्र असल्याची सिद्धता मानण्यात यावी.

अतिशहाणा Tue, 31/03/2015 - 17:36

In reply to by अजो१२३

मात्र हिंदूराष्ट्रवाल्यांना अभिप्रेत असलेल्या हिंदूंमध्ये भारतातल्या मुसलमान, ख्रिश्चन, बौद्धांचा समावेश होत नाही.

अजो१२३ Tue, 31/03/2015 - 17:44

In reply to by अतिशहाणा

आमच्या परिचयातल्या आर एस एस वाल्यांना (आम्ही २-३ कँप अटेंड केले, त्यातले सिनिअर लोक) मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध यांनी आपली प्राथमिक ओळख "हिंदू" अशी सांगावी असे अपेक्षित असते. त्यानंतर काहीही गाढवगोंधळ घातलेला त्यांना चालतो. त्यात नॉर्मल हिंदूंनी आपली द्वितीय ओळख मुसलमान म्हणून करून देणे देखिल आले.
प्राथमिक ओळखीला इतकं महत्त्व आणि नंतरच्या ओळखीला काहीच नाही हे अतार्किक आहे, but that impressed me and I liked it.

बॅटमॅन Tue, 31/03/2015 - 17:58

In reply to by अजो१२३

आमच्या परिचयातल्या आर एस एस वाल्यांना (आम्ही २-३ कँप अटेंड केले, त्यातले सिनिअर लोक) मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध यांनी आपली प्राथमिक ओळख "हिंदू" अशी सांगावी असे अपेक्षित असते. त्यानंतर काहीही गाढवगोंधळ घातलेला त्यांना चालतो. त्यात नॉर्मल हिंदूंनी आपली द्वितीय ओळख मुसलमान म्हणून करून देणे देखिल आले.

वरील परिच्छेदाचे सुलभ मराठी भाषांतर कुठे करून मिळेल?

ऋषिकेश Tue, 31/03/2015 - 18:25

In reply to by अजो१२३

हे बहुतांश संघिष्ठांचे खरेच मानणे असते तर धर्मांतर हा प्रकारच गैरलागू ठरला असता नी संघाने धर्मांतराविरुद्ध इतकी ओरड केली नसती.

अजो१२३ Tue, 31/03/2015 - 18:46

In reply to by ऋषिकेश

मी माझ्या मर्यादित परीघातले निरीक्षण मांडले आहे.
=================================================
मी = भारत हिंदूराष्ट्र असावे का?
संघी = मंजे काय ? अर्थातच!
कट्टर संघी = असावे मंजे काय? आहे!!!

मी = सगळे भारतीय हिंदू असावेत काय?
संघी = मंजे काय? अर्थातच!
कट्टर संघी = असावेत? आहेतच हो!!!

मी = भारत हिंदूराष्ट्र झाले तर अन्यधर्मीयांच्या जीवनात काय फरक येईल?
संघी आणि कट्टर संघी = त्यांचा (देखिल) अधिकृत लिखित सरकारी इ इ धर्म हिंदू असेल. बाकी काही फरक नाही.

मी = बाकी काही फरकच नसेल तर हिंदू शब्दाचा इतका अट्टाहास का?
संघी आणि कट्टर संघी = निरुत्तर.

विवेक पटाईत Sat, 04/04/2015 - 19:50

In reply to by अजो१२३

संघाची विचार सरणी: जो व्यक्ती आपल्या देशाला आपली मातृभूमी मानतो तो हिंदू, मग त्याची उपासना पद्धती कुठलीही का असेना. अर्थात मूर्तिपूजक जर देशाला आपली मातृभूमी मनात नाही तर तो हिंदू नाही. संघाच्या अनुषंगाने हिंदू धर्मात- मुस्लीम, क्रिशन, बौद्ध, जैन, सिख अर्थात सर्वच येतात.

नितिन थत्ते Sun, 05/04/2015 - 05:08

In reply to by adam

नाय ओ....

सावरकर* (ओरिजिनल हिंदुहृदयसम्राट) मातृभूमी ऐवजी पितृभू असा शब्द वापरतात.

*अर्थात सावरकर वेगळे आणि संघ वेगळा हे आहेच.

बॅटमॅन Sun, 05/04/2015 - 11:20

In reply to by नितिन थत्ते

फादरलँड असा शब्द वॉर & पीसच्या इंग्रजी भाषांतरात वापरल्याचे स्मरते. सावरकरांची शब्दयोजना कदाचित लेनिनादींच्या वाचनानेही प्रभावित झालेली असू शकते.

गब्बर सिंग Mon, 06/04/2015 - 06:25

In reply to by नितिन थत्ते

सावरकरांनी साम्यवादावर भाष्य केलेले आहे का ?

पहिले म्हंजे सावरकर हे बुद्धीप्रामाण्यवादी (रॅशनलिस्ट ??) होते हे ऐकलेले आहे. दुसरे - सावरकरांनी "जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते" अशी शब्दयोजना "स्वातंत्र्यदेवतेस" उद्देशून केलेली होती म्हंजे सावरकरांसाठी स्वातंत्र्य हे सर्वोच्च होते. ह्या दोन मुद्द्यांच्या आधारावर सुतावरून स्वर्ग गाठायचा प्लॅन करतोय मी. रशियातली "ऑक्टोबर रिव्होल्युशन" (२५ ऑक्टोबर १९१७) च्या वेळी सावरकर साधारण ३४ वर्षांचे होते. त्यानंतर पाच एक वर्षे रशियात सिव्हिल वॉर सदृश परिस्थिती होती. १९२२ मधे सोव्हियत युनियन (साम्यवादाची काशी/मक्का) निर्माण झाली. त्यानंतर १९२० - १९३० च्या कालात अमेरिकेत सोशॅलिस्ट कॅल्क्युलेशन डिबेट झाली. १९३७ मधे "द नेचर ऑफ द फर्म" प्रकाशित झाले. १९४५ मधे "रोड टू सर्फडम" प्रकाशित झाले. स्टॅलिन सत्तेवर असताना त्याच्याच सरकारच्या कर्मचार्‍यांकडून त्याच्याच देशाचे लक्षावधी निरपराध नागरीक मारले गेले (असा प्रॉपगेंडा अमेरिका करते). माओ चा उदय व साम्यवादी चीन ची स्थापना ची स्थापना सुद्धा १९१२ - १९४९ याच कालातली. माओ वर सुद्धा अनेक लक्ष मारल्यचा आरोप "पश्चिम पुरस्कृत" मानवाधिकार संघटनांनी केलेला आहे.

मुद्दा हा की कम्युनिस्ट रिव्होल्युशन्स चा सावरकरांच्या संवेदनक्षम मनावर काय प्रभाव पडला ? व त्यावर त्यांनी भाष्य केले का ? व केले असल्यास काय भाष्य केले ?

नितिन थत्ते Mon, 06/04/2015 - 08:54

In reply to by गब्बर सिंग

ऑक्टोबर रेव्होल्यूशन आणि सोव्हिएत युनियनची स्थापना झाली त्या काळात सावरकर अंदमानात होते. त्या काळात सावरकरांना त्यासंबंधीची माहिती कितपत मिळत असेल याबाबत कल्पना नाही. पण माहिती तुटक स्वरूपात मिळत असावी. त्यांनी कम्यूनिझमवर काही खास भाष्य केले होते असे वाचलेले नाही. (अर्थात माझे वाचन अपुरे असण्याची शक्यता आहे). परंतु १९२४ ते ३७ या काळात ते रत्नागिरीत स्थानबद्धतेत होते तेव्हा नक्कीच त्यांना याविषयी माहिती मिळत असणार.

एका दृष्टीने सावरकर आणि लेनिन दोघेही धर्मभंजक होते. तेव्हा त्यानिमित्ताने त्यांचे नाव एकत्र येऊ शकते.
परंतु दोघांच्या सध्याच्या भक्तांना ते नाव एकत्र घेणे रुचणार नाही.

'न'वी बाजू Sat, 04/04/2015 - 23:38

In reply to by विवेक पटाईत

अर्थात मूर्तिपूजक जर देशाला आपली मातृभूमी मनात नाही तर तो हिंदू नाही.

मी हिंदू नाही, त्याहीपेक्षासुद्धा माझा मुलगा हिंदू नाही, हे नव्याने कळले. त्याबद्दल - आणि आम्हांस धर्मबहिष्कृत केल्याबद्दल - आपले आणि संघाचे हार्दिक आभार. (गोमांस तसाही खात होतोच नि खातोच; आता बिनदिक्कतपणे खावयास हरकत नाही. आता तर मनाचे सोडा - ते तसेही येत नव्हतेच, पण - धर्माचेही सँक्शन आड येऊ नये.)

सावरकरांनी "धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर" असे म्हटले होते, हे ठाऊक होते. त्याचा व्यत्यास, अर्थात "राष्ट्रांतर म्हणजे धर्मांतर", हाही खरा असल्याबद्दल त्यांनी काही म्हटल्याचे ऐकिवात तरी नव्हते. वास्तविक सावरकर म्हणजे सपोज़ेडली अत्यंत बुद्धिमान आणि लॉजिकल माणूस. त्यातही बालिष्टर. बोले तो, वकील. तो हे असे स्पष्ट मांडणार नाही, याचे आश्चर्य वाटते.

एकंदरीत पण दळभद्री, हिंदुघातकी फिलॉसफी आहे म्हणायची. एखाद्याने राष्ट्र सोडले, की झाला तो धर्माच्या बाहेर. हिंदूंची संख्या रोडावायला आणखी काय पाहिजे? हिंदूच जर हिंदूंना असल्या फुसक्या कारणासाठी धर्मांतरित अत एव धर्मबाह्य मानू लागला, तर मग ते मुसलमान आपली संख्या वाढवताहेत, हिंदूंच्या संख्येला ओव्हरटेक करणारेत, वगैरे वगैरे का बोंबलायचे?

बादवे, आमच्यासारख्या राष्ट्रांतरित धर्मांतरितांचे पैसे बरे चालतात तुमच्या हिंदू संघटनांना? (बोले तो, मी स्वतः देत नाही, कधी देणारही नाही, पण इथे भूतपूर्व हिंदू राष्ट्रांतरित-म्हणून-धर्मांतरितांच्या संस्था आहेत, त्यांच्याकरवी बर्‍यापैकी पैसा फनेल होत असावा. त्यातले सगळेच एनाराय नसतात, बरेच पीआयओ नि ओसीआयसुद्धा असतात.)

नितिन थत्ते Sun, 05/04/2015 - 05:17

In reply to by 'न'वी बाजू

>>बादवे, आमच्यासारख्या राष्ट्रांतरित धर्मांतरितांचे पैसे बरे चालतात तुमच्या हिंदू संघटनांना? (बोले तो, मी स्वतः देत नाही, कधी देणारही नाही, पण इथे भूतपूर्व हिंदू राष्ट्रांतरित-म्हणून-धर्मांतरितांच्या संस्था आहेत, त्यांच्याकरवी बर्‍यापैकी पैसा फनेल होत असावा. त्यातले सगळेच एनाराय नसतात, बरेच पीआयओ नि ओसीआयसुद्धा असतात.)

त्या संस्थांची मेंबरं तिथे* राहून भारताला आपली मातृभूमी मानतात. त्यामुळे ते धर्मांतरित होत नाहीत.

*तिथे म्हणजे आम्रिका/इंग्लंड/ऑष्ट्रेलिया. आणि तिथले नागरिक झाल्यावरही त्या देशाविरुद्ध भारताने म्याच जिंकल्यास आनंदही साजरा करतात.

अजो१२३ Thu, 02/04/2015 - 19:23

In reply to by अंतराआनंद

संघ ही कंपनी आहे, का ट्रस्ट आहे, का एन जी ओ आहे, का सहकारी संस्था आहे, का सोसायटी का काय आहे ते सरसंघचालकांना देखिल माहित नसावे. मंजे माझा असा कयास आहे. संज्ञा, व्याख्या, इ इ कायद्याप्रमाणे त्यांना अभिप्रेत नाही.
======================================================================
संघ एक संघर्षात रत आहे किंवा हिंदूराष्ट्र बनवायच्या उद्योगात व्यग्र आहे अशी जनरल बाहेरच्या लोकांची कल्पना असते. पण सगळे संघी संघात कंप्लीट टाईमपास करत असतात. ना कोणती व्हिजन, मिशन, ऑब्जेक्टीवज, टाईमलाईनस, टार्गेट्स, रिस्पाँसिबल लोक, रिसोर्सेस, ....? कैच नाही!!!
=======================
प्राथमिक ओळख मंजे कोणत्याही भारतीयास (यात मिझो देखिल आला) तू हिंदू का म्हणून विचारले तर त्याने हो म्हणावे. याचा दुराग्रह. हिंदू नाही असे तर अज्जिबात म्हणू नये.
द्वितीय ओळख म्हणजे हिंदू हे काही माणसाचे परिपूर्ण वर्णन नसते. उरलेले सगळे जे काय महत्त्वाचे वाटते ते. त्यात काहीही असो.
संघाच्या सायटीवर हिंदू पुरुषांचे संघटन असे लिहिले आहे. अर्थात बायका मेंबर नाहीत. लॉजिक तेच जाणोत. पण "तू हिंदू का?" ला हो उत्तर देणारे मुसलमान शाखेत रिकाम्या वेळी नमाज पडू लागले तरी त्यांना आपत्ती नाही. मंजे कोण्या लोकलाने मनाई केली तर नागपूरला दाद मागीतली जाऊ शकते.

अनु राव Mon, 06/04/2015 - 13:27

In reply to by अजो१२३

संघाच्या सायटीवर हिंदू पुरुषांचे संघटन असे लिहिले आहे. अर्थात बायका मेंबर नाहीत. लॉजिक तेच जाणोत.

अजो ह्याचे उत्तर मला वाटते सर्वांना माहीती आहे. राष्ट्र सेविका संघ असा महीलांसाठी वेगळा संघ आहे. त्याच्या सायटीवर कदाचित "हिंदू स्त्रीयांचे संघटन" असे लिहीले असेल.

"Boys only School" मधे एकही विद्यार्थीनी का नाहीत अश्या टाइपचा हा प्रश्न आहे.

ऋषिकेश Tue, 31/03/2015 - 17:39

In reply to by अतिशहाणा

म्हणूनच म्हटले की 'तांत्रिकदृष्ट्या'!

अर्थात कायदा, घटना वगैरे गोष्टी तांत्रिक असल्याने त्यावरील भुमिका कोर्टात मांडताना सरकार केवळ तांत्रिक प्रतिसाद देईल. त्यामुळे हा प्रतिसाद सरकारी प्रतिसाद म्हणून योग्य वाटतो.

उद्या आरक्षण देण्यासाठी सरकारने दुसर्‍या धर्मात गेलेल्या व्यक्तीला जात कशी विचारावी? त्या धर्मात जात नाही तरी ती मांडण्यात तार्किक दोष येतो.

===

आणि धर्मबदल केल्यानंतर मुळ धर्मात जात असेल तर तीच कायम ठेवावी असे मत असेल तर मी सहमत नाहीव माझा त्याला विरोध असेल

प्रसन्ना१६११ Tue, 31/03/2015 - 18:32

In reply to by अतिशहाणा

'आरक्षण' गरिबी हटाव कार्यक्रम नाही. तो सामाजिक न्यायाचा विषय आहे. कल्याणकारी राज्य कल्पनेत प्रत्येक जातीतील गरीबाचा विकास अपेक्षितच आहे. त्याच्या कोणत्याही प्रयत्नाना विरोध नाहीच. मात्र हिन्दू धर्मान्तर्गतच्या विशिष्ट (जाती) सामाजिक रचनेमुळे ज्याना सन्मान आणि अधिकार मिळाले नाहीत, केवळ त्यानाच आरक्षण असले पाहीजे. म्हणूनच धर्मावर आधारित आरक्षण घटनेलाही मान्य नाही.

चार्वी Wed, 01/04/2015 - 00:43

* हिंदूंसारखी सविस्तर जातिव्यवस्था इतर धर्मांत नसली तरी हिंदूंच्या सहवासाने भारतातल्या इतर धर्मांनाही हा अवगुण लागला आहे. उदा. सय्यद, पठाण असे समूह जातिरूप पावले आहेत.
* अस्पृश्य मानल्या जाणा-या जातींनी धर्मांतर केले तरी त्यांची अस्पृश्यता कायम राहिली, अशी कित्येक उदाहरणे आहेत. धर्म बदलूनही त्यांच्यावर सामाजिक अन्याय होतच राहिला.

बॅटमॅन Wed, 01/04/2015 - 00:48

In reply to by चार्वी

हिंदूंसारखी सविस्तर जातिव्यवस्था इतर धर्मांत नसली तरी हिंदूंच्या सहवासाने भारतातल्या इतर धर्मांनाही हा अवगुण लागला आहे. उदा. सय्यद, पठाण असे समूह जातिरूप पावले आहेत.

पहिल्या आणि दुसर्‍या वाक्यांत परस्परसंबंध काय आहे? हे दोन्ही समूह भारताबाहेरच तयार झालेले आहेत.

चार्वी Thu, 02/04/2015 - 00:03

In reply to by बॅटमॅन

'....असे समूह भारतात जातिरूप पावले आहेत' असे लिहायला हवे होते. सॉरी. सय्यद, पठाण वगैरे (बाहेरून येऊन) भारतात स्थायिक झालेले समूह.

चिंतातुर जंतू Wed, 01/04/2015 - 13:28

In reply to by चार्वी

सहमत. नुकत्याच झालेल्या बीफबंदीच्या निर्णयामुळे कुरेशी/कसाब समाजाचे अनेक ठिकाणी उल्लेख झाले. महाराष्ट्रात तांबोळी मुस्लिम समाजासारखे समूहही एखाद्या जातीप्रमाणेच आहेत. इतरही अनेक उदाहरणं देता येतील.

ऋषिकेश Wed, 01/04/2015 - 13:30

In reply to by चिंतातुर जंतू

ही ग्राउंड रिअ‍ॅलिटी आहे हे खरेच!
पण ते कायद्यात कसे आणावे? प्रत्यक्षात जेव्हा जनगणना होते तेव्हा धर्म हिंदू व्यतिरिक्त अन्य आला की जात नोंदवणे गैरलागू ठरते.

कायद्यासाठी इतर धर्मांत जात हा प्रकार नाहीच्चे तर त्यावर आधारीत नियम, जजमेंट वगैरे कसे पास करावे?

चार्वी Thu, 02/04/2015 - 00:28

In reply to by ऋषिकेश

तांत्रिकदृष्ट्या बघायचं झालं तर घटनेत म्हटलं आहे की 'सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गांच्या ('क्लास') प्रगतीसाठी सरकार (आरक्षणासारख्या) विशेष तरतुदी करू शकते'. (पहा. कलम १५ / १६) तो मागास वर्ग 'जात' या रूपातच असायला हवा असं काही इथे सुचवलेलं दिसत नाही. त्यामुळे एखादा अहिंदू मागास समूह जात म्हणण्यास पात्र नाही असं धरलं तरी आरक्षण वगैरे द्यायला घटनेची आडकाठी नाही, असं मला वाटतं.

ऋषिकेश Thu, 02/04/2015 - 09:40

In reply to by चार्वी

खरे आहे.
मात्र 'हिंदू आणि कंपनी' (एक्सटेंन्डेड फ्यामिली) वगळता इतर धर्मांमध्ये असा क्लास/वर्ग आखून दिलेला नाही. (हिंदू आणि कं मध्ये जातीच्या रुपात अशी एक स्पष्ट ओळख जन्मदत्त आहे)
मग सरकारने हे कसे ठरवावे की, हिंदू आणि कंपनी वगळता इतर धर्मांमधील नक्की कोण 'सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या' मागास (खरंतर वंचित) आहे?

घाटावरचे भट Thu, 02/04/2015 - 09:38

In reply to by आदूबाळ

'साक्षात म. पैगंबर या समूहातील होते. खलिफा निवडताना तो कु़रेशी असावा असा नियम आहे. सध्याचा आय एस आय एस चा प्रमुख (ज्याने स्वतःला खलिफा घोषित केलंय) तो कु़रेशी आहे, जे त्याचं खूप मोठं क्वालिफिकेशन आहे म्हणतात' असे मध्यंतरी चिंजंनी दिलेल्या एका दुव्यावर वाचल्याचे स्मरते.

तिरशिंगराव Thu, 02/04/2015 - 16:29

या देशांत जर कधीकाळी, कम्युनिस्टांचे सरकार आले तर ते आरक्षण चालू ठेवतील का ?

अरविंद कोल्हटकर Sun, 05/04/2015 - 06:23

वर सावरकरांच्या 'हिंदु'शब्दाच्या व्याख्येवरून काही चर्चा आहे आणि तिच्यामध्ये वापरलेला शब्द 'पितृभू' आहे की 'मातृभू' अशी थोडीशी चर्चा आहे. ह्या चर्चेमध्ये व्याख्येतील खर्‍या महत्त्वाचा शब्द कोणाच्या ध्यानात आलेला दिसत नाही.

व्याख्या अशी आहे:
आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका|
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिन्दुरितिस्मृतः||
सिन्धु (नदी)पासून सिन्धु (सागरा)पर्यंतची भूमि जो आपली मानतो, ती ज्याची पितृभू आहे आणि पुण्यभू आहे तो 'हिंदु' मानावा.

मला असे वाटते की ह्या व्याख्येमुळे सर्व सवर्ण हिन्दुधर्मीय, बौद्ध,जैन,शीख, एवढेच नाही तर शूद्र आणि वन्य आदिवासीहि 'हिंदु' ठरतात. ते 'पुण्यभू' म्हणून हिंदुस्तानबाहेर कोठेच नजर लावून बसलेले नाहीत. पारसीहि 'हिंदु' ठरतात कारण त्यांची कोणतीच धर्मस्थळे भारताबाहेर नाहीत. मात्र ह्याच 'पुण्यभू' कसोटीमुळे सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन अहिंदु ठरतात कारण त्यांच्या 'पुण्यभू' मध्यपूर्वेत भारताबाहेर आहेत.

भारत हे हिंदुराष्ट्र आहे असे जर प्रस्थापित झाले तर मुस्लिम आणि ख्रिश्चनांना बाहेर काढण्याला ह्या व्याख्येचा चपखल उपयोग करता येईल अशी ती बनविली आहे असे मला वाटते.

अजो१२३ Mon, 06/04/2015 - 12:02

In reply to by अरविंद कोल्हटकर

भारत हे हिंदुराष्ट्र आहे असे जर प्रस्थापित झाले तर मुस्लिम आणि ख्रिश्चनांना बाहेर काढण्याला ह्या व्याख्येचा चपखल उपयोग करता येईल अशी ती बनविली आहे असे मला वाटते.

मुस्लिम व ख्रिश्चनांना भारताबाहेर काढण्यासाठी एक कूट व्याख्या रचण्यापलिकडे एक बराच मोठा ग्राउंड लेवल प्लॅन बनवून ठेवणे लॉजिकल वाटते. सावरकरांच्या लिखाणात* असा प्लॅन आढळत नसेल तर त्यांच्या लेखनाचा असा अर्थ काढणे तितकेसे योग्य न ठरावे.
==============================
*शाळेतल्या एखाद्या धड्यापलिकडे मी कै वाचलेलं नैयय.

बॅटमॅन Mon, 06/04/2015 - 11:54

In reply to by अरविंद कोल्हटकर

What the consequences of conversion will be to the country as a whole is well worth bearing in mind. Conversion to Islam or Christianity will denationalize the Depressed Classes. If they go over to Islam the number of Muslims would be doubled; and the danger of Muslim domination also becomes real. If they go over to Christianity, the numerical strength of the Christians becomes five to six crores. It will help to strengthen the hold of Britain on the country.

संदर्भः

Dr.Bhimrao Ramji Ambedkar, Times of India, 24-July-1936: quoted in Dhananjay Keer, Dr.Ambedkar: Life and Mission, Popular Prakashan, 1990, p.280

बाकी निव्वळ धर्मस्थळे भारतात नसल्यामुळे मुळे ख्रिश्चन आणि मुसलमान हे भारताला आपली पुण्यभू कधीच मानणार नाहीत असे गृहीतक तुमच्या प्रतिसादात आहे त्याला आधार काय असावा याचा विचार करतो आहे.

शिवाय इराणातील याझ्द प्रांतात पारशांचे एक अत्यंत जुने अन महत्त्वाचे धार्मिक केंद्र आहे हे नजरेतून निसटणेही रोचक आहे.

गब्बर सिंग Mon, 06/04/2015 - 12:20

In reply to by बॅटमॅन

and the danger of Muslim domination also becomes real

मुस्लिम डॉमिनेशन होणे हा एक भाग झाला (कितपत संभव आहे हा दुसरा भाग). पण तो धोका का व कसा आहे ते कै कळले नाही.

गब्बर सिंग Mon, 06/04/2015 - 12:37

In reply to by बॅटमॅन

आयला मजाय.

एकत्र असले तर डॉमिनेशन चा धोका. वेगळे होणार म्हणाले तर फाळणीचा धोका.

ख़ुदा ने काम दिए हैं जुदा जुदा सब को
सनम जफ़ा के लिए हैं तो हम वफ़ा के लिए ?????????????

बॅटमॅन Mon, 06/04/2015 - 12:41

In reply to by गब्बर सिंग

द्वितीयार्ध कळाला नाही. ते एक असो.

पण आंबेडकरांचे आणि भगव्यांचे विचार इतके कसे जुळतात हे एक महदाश्चर्यच आहे, नै?

गब्बर सिंग Mon, 06/04/2015 - 12:49

In reply to by बॅटमॅन

सनम जफ़ा के लिए हैं तो हम वफ़ा के लिए ?????????????

सनम जफ़ा के लिए हैं तो हम वफा के लिये - ही कवी शेख बीमार यांच्या शायरीतील ओळ आहे. प्रश्नचिन्हे मी लावलेली आहेत पुढे (गुस्ताखी माफ हो.). वफा म्हंजे निष्ठा. जफा हे त्याच्या उलट. मला असे म्हणायचेय की हिंदुंनी मुस्लीमांचे डॉमिनेशन केलेले नाहिये असे हिंदुंचे गृहितक आहे असा वास येतो. हिंदुंनी त्यांच्याशी नेहमीच सद्व्यवहार केलेला आहे असा "हम वफा करनेवाले" टाईप आविर्भाव का आहे ??

(स्युडो सेक्युलर बनण्याचा क्षीण प्रयत्न करीत आहे.)

बॅटमॅन Mon, 06/04/2015 - 12:53

In reply to by गब्बर सिंग

मला असे म्हणायचेय की हिंदुंनी मुस्लीमांचे डॉमिनेशन केलेले नाहिये असे हिंदुंचे गृहितक आहे असा वास येतो. हिंदुंनी त्यांच्याशी नेहमीच सद्व्यवहार केलेला आहे असा "हम वफा करनेवाले" टाईप आविर्भाव का आहे ??

भगव्यांबद्दल 'का' असा प्रश्न पडू नये.

पण नॉनभगवे आंबेडकरही असा विचार करतात तेव्हा भगवीकरणाची झळ त्यांना लागल्याशिवाय राहिली नसती असं वाटतंय.

(फीलिंग लैच सुडोसेकुलर फॉर अ चेंज- बट धिस सक्स लाईक एनीथिंग.)