Skip to main content

पुढच्या पाच वर्षात काय होईल?

आधीच्या धाग्यात अरुण जोशींनी प्रश्न विचारला की मोदी सरकार आल्यावर काय होईल याबाबत स्केप्टिक लोकांना काय वाटतं हे खरोखर जाणून घेण्याची इच्छा आहे. त्याचा स्वतंत्र धागा करण्याऐवजी नवीन धागा काढतो आहे. याचं कारण नुसत्याच नकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित न करता सरकारच्या सर्वच धोरणांत कितपत बदल होईल (किंवा होणार नाही) आणि त्याचा परिणाम काय होईल यावर चर्चा व्हावी अशी इच्छा आहे. तेव्हा निव्वळ मोदींबाबत किंवा भाजपाबाबत स्केप्टिक असलेल्यांनीच नव्हे तर सर्वांनी या चर्चेत भाग घ्यावा ही विनंती. पाच वर्षांनी जेव्हा पुन्हा मत देण्याची वेळ येईल तेव्हा आपल्याला आपल्या अपेक्षा काय होत्या आणि त्या कितपत पूर्ण झाल्या हे तपासून बघता येईल.

१. भारताचा विकासदर (जीडीपी ग्रोथ रेट) काय असेल? विकासाची कुठची कामं सरकारतर्फे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली जातील?
२. भारताचं परराष्ट्रधोरण काय असेल? आहे त्यापेक्षा कसं वेगळं असेल?
३. साक्षरता, शिक्षण, यावर सरकार कितपत भर देईल? आरोग्यावर किती खर्च केला जाईल?
४. भारतात फॉरिन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढेल का?
५. हिंदू-मुस्लिम, किंवा एकंदरीत सामाजिक भेद वाढतील, कमी होतील की जैसे थे राहतील?
६. विरोधी पक्ष नक्की काय भूमिका घेतील?

माझे विचार
१. यूपीएच्या पहिल्या कारकीर्दीत तो ८ टक्क्यांच्या वर होता. दुसऱ्या कारकीर्दीत तो ६ टक्क्यांच्या थोडा पलिकडे होता. या पार्श्वभूमीवर असं दिसतं किमान ८ टक्के दर राखणं आवश्यक आहे. माझ्या मते ते शक्य होईल. कदाचित १० टक्क्यांपर्यंत तो पोचवण्याचे प्रयत्न होतील. जर विकासदर ९ टक्के किंवा वर राहिला तर पुढच्या वेळी सरकार बदलणं फार कठीण होईल. मला वाटतं सर्वसामान्य जनतेच्या डोळ्याला दिसणारी विकासाची कामं वेगात करण्यावर भर राहील. रस्ते गुळगुळीत व सुंदर, शक्य तितक्या ठिकाणी वीज अधिक काळ उपलब्ध - हे दिसून येईल. त्यासाठी अल्ट्रामेगा पॉवर प्लॅंट्स विकसित केले जातील. सौर ऊर्जेवर काम सुरू आहेच त्याचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्याचा प्रयत्न होईल. (या अर्थातच चांगल्याच गोष्टी आहेत)
२. परराष्ट्रधोरणाबाबत मला फार माहिती नाही. मला वाटतं की सर्वसामान्यांना दृश्य ठिकाणी बोटचेपेपणाऐवजी खंबीर भूमिका घेण्याचा प्रयत्न होईल. पाकिस्तानबरोबर काही ना काही वाद होईल.
३. शिक्षणावर फार वेगळा खर्च होईल असं वाटत नाही. वेगवेगळी पाठ्यपुस्तकं - विशेषतः इतिहासाची - बदलली जाऊन अधिक राष्ट्रवादी इतिहास शिकवला जाईल. जुने काही हिरो जातील, काहींचं उद्धरण होईल. आरोग्याबाबतही जास्त काही वेगळं होईल असं नाही.
४. भारतात एफडीआय वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. आकडे किती बदलतील हे माहीत नाही, पण गुजरातमध्ये ज्याप्रमाणे वायदे झाले तसे होताना दिसतील.
५. माझ्या मते सामाजिक भेद वाढतील. पण गोध्रा स्टाइल दृश्य रक्तरंजितपणा पुन्हा होईलसं वाटत नाही. (कदाचित विरोधी पक्षांना तसे दंगे निर्माण करण्यात रस असेल.) भेदभाव वाढतील ते 'अंडर द टेबल' स्वरूपात. म्हणजे मुस्लिमांना जागा मिळू न देणं, ते जिथे राहतात तिथे विकास पोचू न देणं वगैरे स्वरूपात.
६. शेवटच्या प्रश्नाबद्दल मला फार जाण नाही. इतरांचे विचार वाचायला आवडतील.

बॅटमॅन Thu, 22/05/2014 - 15:59

In reply to by राजेश घासकडवी

मराठ्यांच्या ताब्यात अगदी १७९५ पर्यंत 'ओढ्या प्रांत' असल्याने मराठी पद्धतीने अनेकवचन होणे क्रमप्राप्तच आहे.

Nile Thu, 22/05/2014 - 22:27

अरूणजोशी, मन, बॅटमॅन, ऋषिकेश आणि थत्तेचाचांना कॅबिनेटात जागा द्याव्यात (जोशींना तर गृहमंत्रीच करावं) अशी आमची जोरदार अपेक्षा आहे!

नवीबाजूंना अर्थातच विरोधी पक्षनेता करावे. घासू गुर्जींना 'स्पीकर ऑफ द हाऊस'.

मन Fri, 23/05/2014 - 09:49

In reply to by Nile

संपूर्ण धाग्यावर मी मोदींबद्दल चांगलं/वाईट काहिच बोल्लो नै.
तरी नायल्याच्या हिट लिष्टवर आम्हीच.
"आक्रमण मंत्री" ही नवी क्याबिनेट पोष्ट तयार करुन नायल्याला द्यावी अशी सुचवणी करतो.

Nile Fri, 23/05/2014 - 10:10

In reply to by मन

अहो, देशाबद्दल कळवळा असणा-या लोकांची नावं आदरानं लिहली तर म्हणे हिटलीस्ट! भलाईचा जमानाच नाही राहिला राव!

गब्बर सिंग Tue, 27/05/2014 - 04:58

http://www.tavleensingh.com/article_detail.php?aid=38

(ओरिजिनल / पर्यायी दुवा - http://archive.indianexpress.com/news/towards-literacy-then-scholarship…)

लेख जुनाच आहे. पण याबद्दल जाणकारांची (उदा. बॅटमन) मते अपेक्षित आहेत. तवलीन बाई म्हणतात ते खरे आहे का ? कितपत खरे आहे ? कोर्स करेक्शन इष्ट आहे का ? असल्यास - आशेचा काही किरण दिसतोय का (पुढच्या ५ वर्षांत) ?

बॅटमॅन Tue, 27/05/2014 - 22:34

In reply to by गब्बर सिंग

तवलीन म्याडमनी पोलॉकचेच मत मांडलेले दिसते. तो वरिजिनल दुवा इथे पहावा.

http://www.columbia.edu/cu/mesaas/faculty/directory/pollock_pub/classic…

http://www.columbia.edu/cu/mesaas/faculty/directory/pollock_pub/real_cl…

त्याचे म्हणणे कै अगदीच खोटे नाही. वरील लिंकांमधून पाहिले तर स्वातंत्र्योत्तर काळातला सायन्स-टेक्नॉलॉजीवरचा फोकस, झालंच तर संस्कृत=ब्राह्मणी अन्याय्य व्यवस्थेचे प्रतीक अशी मान्यता, इ.इ. अनेक कारणांमुळे क्लासिकल स्कॉलरशिप ढासळत गेली असावी. पहिला दुवा जर पाहिला तर भीतीच वाटते. अमुक एक स्कॉलर मेला-ते फील्ड संपले इ.इ. यद्यपि ते पूर्णांशाने खरे नसले तरी बर्‍याच अंशी खरे आहे.

आता यावर उपाय काय? भारतासारख्या गरीब देशात असली घटापटाची चर्चा कशाला? इ.इ. अर्ग्युमेंट्सना उत्तर द्यायच्या आधी आकडेवारी अवश्यमेव आहे.

मराठ्यांशी संबंधित सर्वाधिक मोडी कागदपत्र पुण्यात आहेत. पुणे आर्काईव्हमध्ये ३ कोटी, भारत इतिहास संशोधक मंडळात १५ लाख. झालंच तर मुंबै, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणीही अनेक दफ्तरे आहेत. या खेरीज प्रायव्हेट कलेक्शन्समध्येही अख्ख्या महाराष्ट्रभर पाहिले तर १० लाखापर्यंत आरामात कागदपत्रे असावीत.

भारतात प्रत्येक राज्यात एक याप्रमाणे तत्रस्थ आर्काईव्ह्ज असतात. सर्वांत मोठे फारसी भाषेतली पत्रे असलेले आर्काईव्ह बिकानेर येथे आहे, जिथे कमीतकमी १० कोटी कागदपत्रे आहेत.

ही झाली फक्त राजकीय कागदपत्रे. ती सोडून, फक्त संस्कृत हस्तलिखिते पाहिली तर शेल्डन पोलॉकच्याच अंदाजानुसार अख्ख्या भारतभर ३ कोटी तरी हस्तलिखित पोथ्या असतील. पैकी ८० लाखांच्या आसपास एकट्या राजस्थानात आहेत.

वरीलपैकी लक्षावधी, कोट्यावधी कागदपत्रे अन पोथ्या अजूनही अनपब्लिश्ड आहेत. या आर्काईव्हमध्ये जर जाऊन पाहिले तर यांची अवस्थाही कैकदा वाईट असते. क्वचित कुठे ही कागदपत्रे नीट व्यवस्थित ठेवली जातात, नैतर बिकानेरसारख्या ठिकाणी कबुतरमलाक्रांत होणे हे यांचे नशीब असतेसे कळते.

बरं, म्हणजे बाय & लार्ज यांची अवस्था वाईट आहे. पण मग संशोधकांप्रती यांचे अ‍ॅटिट्यूड कसे असते?

संशोधकांत २ प्रकारः व्यावसायिक युनवर्शिटीवाले अन हौशी किडेवाले.

व्यावसायिक युनवर्शिटीवाल्यांकडे सगळे पेपरवर्क तयार असते तर हौशी लोकांकडे कैकदा नसते. अन टिपिकल सर्कारी कारभार असतो. याबद्दलचा माझाच अनुभव सांगायला हरकत नाही. कोलकात्यात असताना तिथे एशियाटिक सोसायटी अन नॅशनल लायब्ररी या दोन संस्थांत एक जुने पत्र शोधण्याचे मला काम लागले होते. पहिल्यांदा गेलो एशियाटिकमध्ये. तिथे सदस्य व्हायला अडचण आली नाही-हस्तलिखितेही हाताळायला मिळाली, यद्यपि पाहिजे ते हस्तलिखित तिकडे नव्हते. पण तेव्हा कॉपीइंगचा एक नियम तिथे कळाला: समजा तुम्हाला बाबरनाम्यासारख्या ग्रंथाचे वरिजिनल पूर्ण हस्तलिखित पाहिजे आहे, तर ते तुम्हांला पूर्ण कधीच मिळणार नाही. जास्तीतजास्त १/३ पार्ट पर पर्सन इतकेच मिळते. त्यातही तुम्हांला मधला १/३ पाहिजे असेल अन तुमच्या आधीच्या माणसाने पहिला १/३ घेतला असेल तर अजून खळखळ करतात असेही कळाले. तो मूर्खपणाचा नियम ऐकून मी अवाक झालो.

त्यानंतर नॅशनल लाय्ब्ररीत गेलो. तिथला मेंबर झालो, अन ते हस्तलिखितही तिकडे असल्याचे कळाले. विचारायला गेलो तर कॉलेजचे नाव, पीएचडीचा विषय, अन रजिस्ट्रेशन नं. हे डीटेल्स दिल्याशिवाय झेरॉक्स देणार नाही असे कळाले अन मी पुनरेकवार अवाक झालो. भेंडी काय मूर्खपणा आहे हा? चार टाळकी सोडून त्या चिटोर्‍यांकडे कोणी कधी ढुंकूनही पाहणार नाही तरी इतका माज कशाला? न तुला न मला घाल कुत्र्याला?

असला माज सर्कारी ठिकाणी लै म्ह. लैच असतो. तुलनेने आम्रविकेत प्रेस्बिटेरियन हिस्टॉरिकल सोसायटीशी संपर्क साधला असताना त्यांनी मेलामेली करून लगेच काम केले. झेरॉक्स पाहिजे होती, पैशे घेतले पण रिमोट फोटोकॉपी लगेच दिली. फोनवर बोलतानाही लोक लै नम्रतेने अन तत्परतेने मदत करीत होते.

अर्थात याला सणसणीत अपवादही आहेत म्हणा काही: उदा. पटना येथीक खुदाबक्ष लायब्ररी. त्यांचे काम खरेच जबरी आहे. चक्क जुनी ५ वरिजिनल हस्तलिखिते फ्री पीडीएफ डौनलोडला म्हणून दिलीत त्यांच्या वेबपेजवर. भारत इतिहास संशोधन मंडळातही ब्यूरोक्रसी अशी नाही. डेक्कन कॉलेजातही लोक चाम्गले आहेतसे ऐकून आहे. मंदसोरला नटनगर संस्थान म्हणून एक संस्था आहे त्यांचाही अनुभव उत्तम आहे.

भारतात मुख्य गरज आहे ती मोक्याच्या ठिकाणची ब्यूरोक्रसी नष्ट करण्याची आणि या क्षेत्रात पैसा ओतण्याची. पैसा ओतल्याखेरीज टॅलेंटेड लोक इथे येणार नाहीत आणि या क्षेत्राला प्रतिष्ठा मिळणार नाही. यातून मिळणारा फायदा असा, की आपल्या वारशाचे अनेक पातळ्यांवर जतन होऊ शकेल. निव्वळ फोटोकॉपीसाठी चार्ज आकारला तरी बर्‍याच संस्थांना जरा थोडे पैसे मिळतील.

अन असे करत करत मग नवे राजवाडे, नवे सुकथनकर कधी तयार होतील. आशेचे किरण भारतात अजूनही आहेत-पुण्यात डेक्कन, तसेच कोलकात्यात सीएसएसएससी हे कॉलेज उत्तम आहे असे ऐकून आहे. अशी अजून काही चांगली कॉलेजेस खोलणे मस्ट आहे अन एग्झिस्टिंग कॉलेजेसमधील मरगळ झटकली पाहिजे.

करण्यासारखे लै आहे, अन आपापल्या पातळीवर कामे करणारे लै लोक आहेत. पण यांचा नीट उपयोग करून घेणारा योजक नाही. आर्किऑलॉजिकल सर्व्हेचे कामही दांडगे आहे, यद्यपि ते नजरेत भरत नाही. त्यांचे व अन्य विद्वानांचे रिझल्ट्स सोप्या भाषेत कन्व्हे करणारा एक 'बौद्धिक मध्यमवर्ग' तयार झाला पाहिजे असे फार वाटते. त्यायोगे ज्ञान, आस्था, कळकळ, इ. समाजात भिनण्यास फार मदत होईल. सध्या भारतात (नेहमीप्रमाणेच) सगळे कंपार्टमेंटलाईझ्ड झालेले आहे. साधे उदा. देतो. प्राचीन भारतातील स्टील उत्पादनाबद्दल आय आय एस सी मधील अख्खे पुस्तक लिहिलेले आहे. पण हे मेनस्ट्रीमपर्यंत कधी पोचत नाही. असो.

करायला इतके कायबाय पाहिजे की त्याला तोड नाही. राजवाडे, खरे, इ. सारखे हजारो लोक किमान ५०-१०० वर्षे फक्त आणि फक्त त्यातच राबतील तेव्हा कुठे हे पश्चिमेच्या तोडीस तोड जरा तरी होऊ शकेल. याबद्दल अख्खा वेगळा लेख होऊ शकतो खरे तर.

जिव्हाळ्याचा विषय असल्याने बरेच लिहिले आहे, प्रसंगविशेषी विस्कळीत झाले असेल तरी मुद्दा समजला असेलशी आशा आहे. असो.

मेघना भुस्कुटे Wed, 28/05/2014 - 09:52

In reply to by बॅटमॅन

खवचट मोड ऑन>बाकीचे रिक्काम** वाद घालतोस, त्याहूनखवचट मोड ऑफ> या विषयावर अजून लिही. जाम आवडेल वाचायला. अजिबात माहिती नसणारं आणि रोचक विश्व आहे.

मन Wed, 28/05/2014 - 11:04

In reply to by बॅटमॅन

तपशीलवार प्रतिसाद जपून ठेवावा असा आहे.
बादवे, crowd sourcing स्टाइल काहीतरी संशोधन क्षेत्रात शक्य आहे असं म्हणाला होतास ना मागे काहीतरी.
म्हणजे जी चिन्ह दिसताहेत ती इंटारनेटवर प्रकाशित करायची.
हौशी लोकांनी ती कशासारखी/कोणत्या अक्षरासारखी दिसतात ते मार्क करायचं.
बहुमताचा आधार घेत मग पुढचं प्रत्यक्ष विश्लेषणचं काम तेवढं तज्ञानं करायचं.
ह्याने अक्षर वाचत बसण्यातला तज्ञाचा वेळ वाचेल.
असलं काहीतरी लिहिलं होतस. बादवे, हे आम्रविकेत किंवा पाश्चात्त्य जगात सध्याही सुरु आहे काय ?
की तिथे फक्त प्रायोगिक पातळीवर केले गेले आहे?

बॅटमॅन Wed, 28/05/2014 - 12:54

In reply to by मन

होय, हे सध्या सुरू आहे. इजिप्तमध्ये ऑक्सिर्‍हिंचस नामक ठिकाणी इतक्या ग्रीक पपायरी सापडल्या की लोकांनी स्कॅन करून सरळ अपलोड केल्या.

विवेक पटाईत Sat, 19/12/2015 - 21:48

१. सामाजिक शांती राहील. मोदी आल्या पासून एक हि मोठा दंगा झाला नाही (भाग्य). बाकी देशात लहान सामाजिक तणावाच्या घटना हि गेल्या वर्षीच्या तुलनेत. २/३ कमी झाल्या. (संसदेत दिलेल्या उत्तरानुसार).
बाकी विरोधक अहिष्णूता अहिष्णूता करून दंगे धोपे करण्याचा प्रयत्न करतीलच.
२. DFC पूर्ण होईल. रस्त्यांच्ये काम मोठ्या प्रमाणावर सुरु झालेच आहे. आधारभूत सुविधा वाढतील. वीज उत्पादन हि वाढेल. नुकतेच वाचले होते, १ कोट सिमेंट बेग NHAI ने फक्त १२० रु किमंत मोजली आहे. छुट भैये नेता मोठ्याप्रमाणावर कांग्रेस मध्ये जातील (कमाई करायला काहीच मिळणार नाही)
३. निवडणूकीत मते कामाच्या आधारावर नाही दिल्या जात. अल्पसंख्यक कधीच भाजपला वोट देणार नाही. ओबीसी जातिगत आधारवरच वोट देतो.

५. पुढच्या निवडणूकीत कॉंग्रेस विजयी झाली तरी कुणाला आश्चर्य वाटले नाही पाहिजे. अल्पसंख्यक भाजपला पराजित करण्यासाठी कॉंग्रेसला मते देतील. शिवाय भाजप शाषित राज्य -गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड जिथे १५ वर्षांपेक्षा भाजप सत्तेत आहे. तिथे तिला नुकसान होईल. हिमाचल, उत्तराखंड, पंजाब हरयाणा, MP, CH, गुजरात, महाराष्ट्र, इथे कॉंग्रेसने १५० सीट्स जिंकल्या तरी आश्चर्य वाटले नाही पाहिजे.

६. बाकी देशाच्या नागरिकांनी खरोखरच विकासासाठी मते दिली तरच मोदी पुढची निवडणूक जिंकतील.

आडकित्ता Sat, 19/12/2015 - 22:00

In reply to by विवेक पटाईत

६. बाकी देशाच्या नागरिकांनी खरोखरच विकासासाठी मते दिली तरच मोदी पुढची निवडणूक जिंकतील.


या देशाचे नागरिक पुन्हा एकदा Auto-parrotism अर्थात, स्वतःचा पोपट करवून घेतील, असे वाटत नाही ;)

नगरीनिरंजन Sun, 20/12/2015 - 07:51

In reply to by विवेक पटाईत

अल्पसंख्यक काँग्रेसला मत देतील आणि बहुसंख्यक भाजपाला मत देतील म्हणून काँग्रेस जिंकेल? कसं काय? अल्पसंख्यक म्हणजे संख्येने कमी असलेले ना?
बहुतेक तुम्हाला भाजपेयी उच्चवर्णीय म्हणजे बहुसंख्यक आणि बाकीचे सगळे अल्पसंख्यक असे म्हणायचे आहे असे दिसतेय.