Skip to main content

राजकीय

भारतीय राजकारण व लोकसभा निवडणूका - २०१४ (भाग २)

Taxonomy upgrade extras

सदर धागा तत्कालीन राजकीय चर्चा, मते व अन्य स्वरूपाचे लेखन करण्यासाठी काढत आहे.
विदा/संदर्भ देऊन केलेले दीर्घ-विश्लेषणात्मक लेखन सोडल्यास सदर विषयाशी संबंधीत सर्व लेखन या धाग्यावर करावे अशी विनंती करतो.

या विषयाशी समांतर लेखन नव्या धाग्यात काढल्यास ते लेखन या धाग्यावर हलवण्यात येईल याची नोंद घ्यावी!
कोणते लेखन या धाग्यात हलवायचे याचा निर्णय संपादकांचा असेल.

भाग १

============

नरेंद्र मोंदीना भिण्यात कितपत तथ्य आहे?

Taxonomy upgrade extras

मला राजकारणातलं फारसं काहीच कळत नाही. पण तसं कबूल करायची सोय नसते. कोणत्याही कारणास्तव राजकीय भूमिका घेण्याचं टाळणं हा पळपुटेपणा, आत्मघात, आळशीपणा (आणि बरंच काय काय) आहे, हे ऐकवून टपलीत मारण्याची संधी कुणीच सोडत नाही. त्यात तथ्यही असल्यानं ते निमूट ऐकून घेण्यावाचून पर्याय नसतो. त्यावर उपाय म्हणजे सजगता - आणि पर्यायानं - वाचन वाढवणे. माझ्या प्राधान्यक्रमातल्या वाचनाला वेळ काढताना सध्या पंचाईत होते आहे, तर हे अधिकचं वाचन कुठून नि कसं वाढवणार? वेळ खूपच कमी पडतो. अशा वेळी आपल्या वर्तुळातल्या जाणकार लोकांच्या मतांची चाचपणी करण्याचा एक शॉर्टकट उपलब्ध असतो.

भारतीय राजकारण व लोकसभा निवडणूका - २०१४

Taxonomy upgrade extras

सदर धागा तत्कालीन राजकीय चर्चा, मते व अन्य स्वरूपाचे लेखन करण्यासाठी काढत आहे.
विदा/संदर्भ देऊन केलेले दीर्घ-विश्लेषणात्मक लेखन सोडल्यास सदर विषयाशी संबंधीत सर्व लेखन या धाग्यावर करावे अशी विनंती करतो.

या विषयाशी समांतर लेखन नव्या धाग्यात काढल्यास ते लेखन या धाग्यावर हलवण्यात येईल याची नोंद घ्यावी!
कोणते लेखन या धाग्यात हलवायचे याचा निर्णय संपादकांचा असेल.

वेडा पप्पू

Taxonomy upgrade extras

सचीन यांना सकाळी सकाळी आपल्याकडे पाहून पिग्विजय महाराज खुश झाले. "या या अण्णा, अलभ्य लाभ, आज आमच्याकडे कस येणे केले. यावर सचीनभाऊ उतरले,"अहो काय सांगायचं तुम्हाला, आमचा पप्पू वेड्यासारखे वागतोय, इतका शिकला पण हुकलाहो. भलते सलते प्रश्न विचारतो. हे अमुक का? हे तमुक का?

मागे ३ महिन्यापूर्वी तुमच्याकडे चांगले दहा हजार कोटी खर्चून त्याची शांती केलीय. पण आता तर तो भलताच अशांत झालाय. तुम्ही खरेच न हो बरोबर शांती केली होती? "तर हो, आपल काम म्हणजे सोळा आणे खरे" "अहो आम्ही प्रवक्ते, म्हणजे पाँग्रेसमधले सर्वज्ञच हो.

प्रचाराची रणधुमाळी

Taxonomy upgrade extras

२०१४ च्या लोकसभा निवडणुका आता ४ महिन्यांवर आल्यात. सर्व पक्षात प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. प्रचाराचे पारडे सारखे खाली वर होत आहे. ह्या निवडणुकींचा निकाल काय लागेल ह्याबाबत साऱ्या देशात उत्सुकता आहे.कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर येईल का? आप ह्या निवडणुकीत काय चमत्कार घडवेल? तिसरी आघाडी सत्तेवर येईल का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे हि निवडनुकी नंतरच मिळतील.

आपने जे राजकारणात यशस्वी पदार्पण केले नि दिल्लीची सत्ता मिळवली त्याने देशाच्या राजकारणात नाही म्हटले तेरी थोडा फार फरक पडणारच पण तो किती पडणार हे होण्यासाठी निवडणूक होण्याची वाट बघणे भाग आहे.