मार्च दिनवैशिष्ट्य

मार्च दिनवैशिष्ट्य

१०
११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३०
३१

१ मार्च
जन्मदिवस : चित्रकार सांद्रो बोतिचेल्ली (१४४५), संगीतकार शोपँ (१८१०), चित्रकार ऑस्कर कोकोश्का (१८८६), लेखक राल्फ एलिसन (१९१३), गायक हॅरी बेलाफाँते (१९२७), अभिनेता हाविएर बार्देम (१९६९), क्रिकेटपटू शाहीद अफ्रीदी (१९८०), आशियाई बॉक्सिंग विजेती, ऑलिंपिकपटू मुष्टियोध्दा मेरी कोम (१९८३)
मृत्युदिवस : लेखिका गौरी देशपांडे (२००३), सिनेदिग्दर्शक आलँ रेने (२०१४), चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर (२०१४)
---
स्वातंत्र्यदिन : बॉस्निया-हर्त्झगोविना
१६४० : ईस्ट इंडिया कंपनीने मद्रासमध्ये व्यापारी केंद्र सुरू केले.
१८६९ : रावजी श्रीधर गोंधळेकर यांनी ‘जगद्हितेच्छु’ नावाचे पत्र सुरू केले. शिवरामपंत परांजपे यांचे ‘काळ’ पत्र सुरुवातीला जगद्हितेच्छुच्या छापखान्यात छापले जायचे.
१८७२ : यलोस्टोन नॅशनल पार्क जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान झाले.
१८७३ : रेमिंग्टन कंपनीने पहिले टंकलेखन यंत्र विकण्यास सुरुवात केली.
१८९६ : हेन्री बेकरेलने किरणोत्सर्गाचा शोध लावला.
१९४६ : बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण.
१९५४ : अमेरिकेने बिकिनी बेटावर हायड्रोजन बॉम्बचा स्फोट घडवला. आसपासच्या भागात प्रचंड प्रमाणात किरणोत्सर्ग फैलावला.
१९६९ : नवी दिल्ली आणि कोलकातादरम्यान धावणारी पहिली सुपरफास्ट रेल्वेगाडी ‘राजधानी एक्सप्रेस’ सुरू झाली.
१९७१ : पाकिस्तानचे अध्यक्ष याह्या खान यांनी नॅशनल असेम्ब्लीची बैठक अनिश्चित काळासाठी तहकूब केली.
१९७६ : 'वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट' चित्रपट प्रदर्शित.
१९९५ : रवांडातील हिंसाचारात गाडलेली हजारो शवे सापडली.
१९९९ : भूसुरुंगांवर बंदी घालणारा करार १३३ देशांच्या संमतीने कार्यरत.
२००१ : भारताच्या लोकसंख्येने १०० कोटीची पायरी ओलांडली. ह्या बाबतीत भारत हा चीननंतर जगातील दुसरा देश ठरला.

२ मार्च
जन्मदिवस : संगीतकार कुर्ट वाईल (१९००), लेखक डॉ. स्यूस (१९०४), संगीतकार आनंदजी (१९३३), संगीतकार बॉन जोव्ही (१९६२), अभिनेता डॅनिएल क्रेग (१९६८)
मृत्युदिवस : लेखक होरास वॉलपोल (१७९७), चित्रकार बर्थ मोरिसो (१८९५), लेखक डी.एच. लॉरेन्स (१९३०), कवयित्री व स्वातंत्र्यसैनिक सरोजिनी नायडू (१९४९), लेखक फिलिप के. डिक (१९८२)
---
स्वातंत्र्यदिन : मोरोक्को
१७९१ : पॅरिसमध्ये सेमाफोर यंत्राचे प्रथम प्रात्यक्षिक.
१८०७ : आफ्रिका व अमेरिका खंडांदरम्यानच्या गुलामांच्या व्यापारावर ब्रिटनने बंदी घातली.
१८४४ : वीरेश्वर छत्रे यांनी ‘मित्रोदय’ पत्र सुरू केले.
१९६९ : स्वनातीत विमान काँकॉर्डचे पहिले उड्डाण.
१९८३ : आसामचे सात जिल्हे अशांत टापू म्हणून भारत सरकारने जाहीर केले.
१९९१ : तमिळ वाघांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यात श्रीलंकेचे संरक्षण उपमंत्री ठार.
२००४ : संयुक्त राष्ट्रांच्या शस्त्रनिरीक्षण संघाने जाहीर केले की १९९४ नंतर इराककडे अतिविनाशकारी शस्त्रास्त्रे नव्हती.
२००६ : पाकिस्तानच्या कराची शहरात बॉम्बस्फोट. अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्यासह ५ ठार, ५० जखमी.
२०११ : पाकिस्तानचे अल्पसंख्याक मंत्री राहिलेले सुधारणावादी ख्रिस्ती राजकारणी शाहबाज भट्टी यांची तालिबानींकडून हत्या.

३ मार्च
जन्मदिवस : उद्योजक जमशेटजी टाटा (१८३९), गणितज्ञ जॉर्ज कॅंटर (१८४५), संशोधक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल (१८४७), नाट्यकर्मी आरिआन मूश्किन (१९३९), अभिनेता जसपाल भट्टी (१९५५), गायक व संगीतकार शंकर महादेवन (१९६७), क्रिकेटपटू इंझमाम उल हक (१९७०)
मृत्युदिवस : शास्त्रज्ञ रॉबर्ट हूक (१७०३), मुघल सम्राट औरंगझेब (१७०७), लेखक ह.ना. आपटे (१९१९), अभिनेत्री व गायिका अमीरबाई कर्नाटकी (१९६५), लेखक जॉर्ज पेरेक (१९८२), कवी फिराक गोरखपुरी (१९८२), 'टिनटिन'कार हेर्जे (१९८३), अभिनेता डॅनी के (१९८७), लेखिका मार्गरित द्यूरास (१९९६), अभिनेत्री रंजना (२०००)
---
७८ : शक संवताचा आरंभ.
१८७३ : लुई पास्चरने पास्चराइज्ड बीअरचा शोध लावला.
१८७५ : जॉर्ज बिझेच्या 'कारमेन' ऑपेराचा पहिला प्रयोग.
१८८५ : AT&T कंपनीची स्थापना.
१९२३ : 'टाइम' नियतकालिक प्रथम उपलब्ध.
१९९१ : रॉडनी किंग या कृष्णवर्णीयास चोपताना लॉस अँजेलिस पोलिसांचे चित्रण. पोलिसांचे कृष्णवर्णीयांशी भेदभावाचे वर्तन हा यातून पुढे चर्चेचा विषय झाला आणि दंगलींचेही कारण बनले.
२००४ : धर्मनिरपेक्ष धोरणांचा एक भाग म्हणून फ्रान्सने शैक्षणिक संस्थांमध्ये उघडपणे धार्मिक चिन्हे बाळगण्यावर बंदी आणली.

४ मार्च
जन्मदिवस : संगीतकार विवाल्डी (१६७८), अभिनेत्री दीना पाठक (१९२२)
मृत्युदिवस : लेखक गोगोल (१८५२), नाट्यकर्मी ऑन्तोनँ आर्तो (१९४८), 'नॅशनल फिल्म आर्काईव्ह'चे संस्थापक पी.के. नायर (२०१६)
---
लैंगिक शोषणविरोधी दिन.
वर्धापनदिन : राष्ट्रीय सुरक्षा परिषद (१९६६)
१९३० - दांडीयात्रेच्या यशानंतर ब्रिटिश व्हाइसरॉय व महात्मा गांधी यांच्यात बैठक. देशी मिठाचा मुक्त वापर करू देण्याचा सरकारचा निर्णय तसेच दांडीयात्रा आंदोलनात सहभागी राजकैद्यांची मुक्तता करण्याचे आश्वासन.
१९५१ - पहिले आशियाई खेळ नवी दिल्लीत सुरू.

५ मार्च
जन्मदिवस : भूगोलतज्ज्ञ जेरार्ड मर्कॅटर (१५१२), चित्रकार तिएपोलो (१६९६), मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासाचे अभ्यासक व कवी पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी (१८५६), क्रांतिकारी विचारवंत रोझा लक्झेंबर्ग (१८७१), अभिनेता रेक्स हॅरिसन (१९०८), गायिका गंगूबाई हंगल (१९१३), सिनेदिग्दर्शक पिएर पाओलो पासोलिनी (१९२२)
मृत्युदिवस : गणितज्ञ पिएर-सिमोन द लाप्लास (१८२७), भौतिकशास्त्रज्ञ अलेस्सांद्रो व्होल्टा (१८२७), संगीतकार सेर्गेई प्रोकोफिएव्ह (१९५३), कवयित्री आना आख्मातोव्हा (१९६६), लेखक आणि प्रवासवर्णनकार नारायण गोविंद चापेकर (१९६८), अभिनेता जलाल आगा (१९९५)
---
१६१६ : कोपर्निकसच्या On the Revolutions of the Heavenly Spheres ग्रंथावर कॅथॉलिक चर्चने बंदी घातली.
१७७१ : मराठय़ांनी म्हैसूरचा शासक हैदर याचा मोती तलावाच्या लढाईत पराभव केला.
१८५१ : भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या संस्थेची स्थापना.
१९३१ : गांधी-आयर्विन करारानुसार सविनय कायदेभंग आणि सत्याग्रहाची चळवळ गांधीजींनी थांबविली.
१९४० : २५,७०० पोलिश लोकांच्या कत्तलीस सोव्हिएत पॉलिटब्यूरोने मान्यता दिली. कातीन संहार या नावाने ही घटना ओळखली जाते.
१९४६ : 'Iron Curtain' ही संज्ञा चर्चिलने एका भाषणात प्रथम वापरली.
१९५३ : सोव्हिएत क्रूरकर्मा जोसेफ स्टालिनचा मृत्यू.
१९५६ : वंशभेदाधारित अलगतेच्या (segregation) धोरणावर अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी. वंशभेदविरोधी लढ्यातला महत्त्वाचा टप्पा.
१९८१ : ब्रिटिश बनावटीचा ZX81 हा वैयक्तिक संगणक ( home computer) उपलब्ध. यथावकाश त्याची जगभरात विक्री - १५ लाख.
१९९३ : निषिद्ध द्रव्यांच्या सेवनाबद्दल धावपटू बेन जॉन्सनवर आजीवन बंदी.

६ मार्च
जन्मदिवस : चित्रकार व शिल्पकार मायकेलँजेलो (१४७५), मुघल सम्राट हुमायूं (१५०८), कवयित्री एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग (१८०६), सिनेदिग्दर्शक आंद्रे वायदा (१९२६), नोबेलविजेता लेखक गाब्रिएल गार्सिया मार्केझ (१९२७), पहिली महिला अंतराळयात्री व्हॅलेंन्टिना तेरेश्कोव्हा (१९३७), क्रिकेटपटू अशोक पटेल (१९५७)
मृत्युदिवस : संस्कृतचे व्यासंगी पंडित व मराठी- इंग्रजी भाषांतरकार गोविंद शंकर बापट (१९०५), लेखिका पर्ल बक (१९७३), 'वैज्ञानिक परिभाषा व संज्ञा कोश' व विज्ञानविषयक पुस्तकांचे लेखक गोपाळ रामचंद्र परांजपे (१९८१), लेखिका एन रँड (१९८२), चित्रकार जॉर्जिया ओ'कीफ (१९८६), लेखक रणजित देसाई (१९९२), विचारवंत जाँ बोद्रियार (२००७), लेखक वसंत नरहर फेणे (२०१८)
---
स्वातंत्र्यदिन : घाना
१७७५ : सुरत येथे रघुनाथराव पेशवे आणि इंग्रज यांच्यात तह झाला. इंग्रजांना मोक्याचा प्रदेश देण्याचे मान्य करून रघुनाथरावांना पेशवेपदाची प्राप्ती इंग्रजांनी करवून द्यायची असे ठरले.
१८५३ : व्हर्दीच्या 'ला त्राव्हिआता' ऑपेराचा पहिला प्रयोग.
१८६९ : दिमित्री मेंडेलीएव्ह यांनी मूलद्रव्यांची आवर्त सारणी (Periodic table) प्रथम सादर केली.
१८९९ : 'बायर' कंपनीने 'अ‍ॅस्पिरिन' हे व्यापारचिन्ह (ट्रेडमार्क) म्हणून नोंदवले.
१९०२ : रेआल माद्रिद फूटबॉल क्लबची स्थापना.
१९५३ : साने गुरुजींच्या 'श्यामची आई' या कादंबरीवरील त्याच नावाचा आचार्य प्र. के. अत्रे यांनी निर्मिलेला चित्रपट प्रथम प्रदर्शित झाला.
१९९१ : भारताचे पंतप्रधान चंद्रशेखर यांनी राजीनामा दिला. काँग्रेसच्या पाठिंब्याने चंद्रशेखर यांनी पंतप्रधानपद मिळविले आणि राजीव गांधी यांनी पाठिंबा काढून घेताच चंद्रशेखर पदावरून दूर झाले.

७ मार्च
जन्मदिवस : गणितज्ज्ञ जॉन हर्शेल (१७९२), चित्रकार पिएट मोंद्रियान (१८७२), संगीतकार मॉरिस राव्हेल (१८७५), चित्रकार मिल्टन अ‍ॅव्हरी (१८८५), अभिनेत्री आना मान्यानी (१९०८), लेखक व संपादक सच्चिदानंद वात्स्यायन 'अज्ञेय' (१९११), क्रिकेटपटू नरी काँट्रॅक्टर (१९३४), लेखक जॉर्ज पेरेक (१९३६), क्रांतिकारक रुडी डुश्के (१९४०), क्रिकेटपटू व्हिव्हिअन रिचर्डस (१९५२), अभिनेता अनुपम खेर (१९५५), टेनिसपटू इव्हान लेंडल (१९६०), अभिनेत्री रेशल वाइज (१९७०)
मृत्युदिवस : तत्त्वज्ञ अ‍ॅरिस्टॉटल (ख्रि.पू. ३२२), धर्मज्ञ व तत्त्वज्ञ थॉमस अकिनास (१२७४), दादोजी कोंडदेव (१६४७), मराठय़ांच्या इतिहासाच्या साधनांचे इंग्रजीतील आद्य संशोधक नीळकंठ जनार्दन कीर्तने (१८९६), अभिनेता गणपतराव जोशी (१९२२), लेखिका अ‍ॅलिस टोकलास (१९६७), तत्त्वज्ञ मिखाइल बाख्तिन (१९७५), पोवाडेकार पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर (१९८८), सिनेदिग्दर्शक स्टॅन्ली क्युब्रिक (१९९९)
---
१८७६ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलला टेलिफोनच्या शोधासाठी पेटंट मिळाले.
१९१२ : रोआल्ड अमुंडसेनने आपले शोधपथक दक्षिण ध्रुवावर (१४ डिसेंबर १९११ रोजी) पोचले असल्याचे जाहीर केले.
१९१७ : 'डिक्सिलँड जाझ बँड'चे ध्वनिमुद्रण बाजारात उपलब्ध. ही जाझ संगीताची पहिली ध्वनिमुद्रिका होती.
१९३६ : व्हर्सायच्या तहाचे उल्लंघन करत हिटलरने ऱ्हाइनलँडवर कब्जा मिळवला.
१९५१ : आंध्र प्रदेशातील शिवरामपल्ली गावी पोहोचण्यासाठी आचार्य विनोबा भावे यांनी सेवाग्राम येथून पदयात्रा सुरू केली. या पदयात्रेदरम्यान दान म्हणून मिळालेली भूमी ही भूदान चळवळीची सुरुवात ठरली.
१९६५ : कृष्णवर्णीयांना मतदानासाठी नावनोंदणी करू दिली जात नसल्याच्या निषेधार्थ अमेरिकेत सेल्मा, अलाबामा येथे काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार व अश्रुधुराचा वापर केला. अखेर ऑगस्टमध्ये राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी 'Voting Rights Act' हा कायदा संमत करून हा भेद संपवला.
१९६९ : गोल्डा मायर इस्राएलच्या पहिल्या महिला पंतप्रधान.
१९७३ : स्वतंत्र झाल्यानंतर बांगलादेशमध्ये पहिल्या निवडणुका. शेख मुजिबूर रहमान निवडून आले.
१९८५ : इथिओपिआतील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी मायकेल जॅक्सन आणि लायोनेल रिची यांचे 'वी आर द वर्ल्ड' हे गाणे प्रकाशित. त्यातून ५० मिलिअन डॉलर्सची मदत मिळाली.
१९८९ : सलमान रश्दीच्या 'सॅटनिक व्हर्सेस' कादंबरीवरून इराण व ब्रिटन यांच्यातील राजनैतिक संबंध तुटले.
१९९४ : प्रताधिकार : उपहासासाठी मूळ लेखकाच्या संमतीशिवाय काही भाग वापरण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने 'fair use'अंतर्गत संमती दिली.
२००६ : वाराणसी येथे साखळी बाँबस्फोट. २८ मृत.
२००९ : केपलर अंतराळ निरीक्षणयान प्रक्षेपित.

८ मार्च
जन्मदिवस : लेखक केनेथ ग्रॅहम (१८५९), लेखक हरी नारायण आपटे (१८६४), नोबेलविजेता शास्त्रज्ञ ऑटो हान (१८७९), 'सिंधी भाषेचे लघुव्याकरण', 'मुंबई इलाख्याचा इतिहास आणि भूगोल' लिहिणारे, हस्तलिखित पोथ्यांतून तुकारामांच्या ४५०० अभंगांचे दोन खंड तयार करणारे संशोधक व सुधारक कायदेपंडित विश्वनाथ नारायण ऊर्फ रावसाहेब मंडलिक (१८३३), गीतकार साहिर लुधियानवी (१९२१), शिल्पकार अँथनी कारो (१९२४), कवी व लेखक आरती प्रभू उर्फ चिं. त्र्यं. खानोलकर (१९३०), चित्रकार अ‍ॅन्सेल्म कीफर (१९४५)
मृत्युदिवस : शास्त्रीय विषयांवर मराठीत लेखन करणारे बाळकृष्ण आत्माराम ऊर्फ भाईसाहेब गुप्ते (१९२५)
---
जागतिक महिला दिन
१०१० : फिरदौसीने 'शाहनामा' हे काव्य लिहून पूर्ण केले.
१६१८ : योहानस केपलरने ग्रहभ्रमणाचा तिसरा नियम शोधला.
१७७५ : अमेरिकेत गुलामगिरीविरोधातील पहिला लेख 'African Slavery in America' प्रकाशित. (लेखक अज्ञात. कदाचित थॉमस पेन.)
१८१७ : न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंजची स्थापना.
१९११ : बोटाच्या ठशांचा गुन्हेगार शोधून काढण्यास प्रथम वापर.
१९१७ : रशिआत 'फेब्रुवारी क्रांती' सुरू. या दिवशी आपल्या हक्कांसाठी मोर्चा काढणाऱ्या महिलांच्या स्मरणार्थ लेनिनने नंतर (१९२१) ८ मार्च 'महिला दिन' घोषित केला. पुढे १९७७ साली संयुक्त राष्ट्रांनी त्याला मान्यता दिली.
१९७८ : बीबीसी रेडिओने डग्लस अ‍ॅडम्सच्या 'हिचहायकर्स गाइड टू गॅलॅक्सी' या रेडिओ मालिकेचा पहिला भाग प्रसारित केला. यथावकाश ती कादंबरी म्हणून प्रकाशित झाली.
१९७९ : फिलिप्स कंपनीने 'काँपॅक्ट डिस्क'चे (सीडी) प्रात्यक्षिक दाखवले.

९ मार्च
जन्मदिवस : दर्यावर्दी अमेरिगो व्हेस्पुची (१४५४), राजकवी यशवंत (१८९९), संतसाहित्याचे अभ्यासक यु. म. पठाण (१९३०), लेखक सदा कऱ्हाडे (१९३१), बुद्धिबळपटू बॉबी फिशर (१९४३), तबलावादक झाकीर हुसेन (१९५१), अभिनेत्री ज्यूलिएत बिनोश (१९६४), क्रिकेटपटू पार्थिव पटेल (१९८५)
मृत्युदिवस : संत तुकाराम (१६५०), सिनेदिग्दर्शक के. आसिफ (१९७१), छायाचित्रकार रॉबर्ट मॅपलथॉर्प (१९८९), अभिनेत्री देविका राणी (१९९४), अभिनेता जॉर्ज बर्न्स (१९९६), अभिनेता जॉय मुखर्जी (२०१२)
---
१८४१ : 'अ‍ॅमिस्टाड' जहाजावर बंड करणाऱ्या कृष्णवर्णीयांना बेकायदेशीररीत्या गुलाम करण्यात आले होते असा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय.
१९०८ : 'इंटर मिलान' फूटबॉल क्लबची स्थापना.
१९४५ : दुसरे महायुद्ध : 'ऑपरेशन मीटिंगहाउस' अभियानाअंतर्गत अमेरिकी विमानांतून टोकिओवर बाँबहल्ले सुरू. सुमारे लाख मृत. इतिहासातील सर्वाधिक विध्वंसक हवाई बाँबहल्ला.
१९५९ : बार्बी बाहुली बाजारात उपलब्ध.
१९६७ : रशिअन क्रूरकर्मा जोसेफ स्टालिनची कन्या स्व्हेतलाना हिने भारतातील अमेरिकी राजदूतावासाकडे राजकीय आश्रय मागितला. अमेरिकेत गेल्यावर तिने पित्याची राजवट जुलमी असल्याचे सांगून तिचा निषेध केला. यथावकाश तिने अमेरिकन नागरिकत्व घेतले.
१९७३ : मतदान करून उत्तर आयर्लंडने युनायटेड किंग्डममध्ये राहण्याचा निर्णय घेतला.
२०२० : कोव्हिड-१९चा भारतातील पहिला रुग्ण पुण्यात आढळला.

१० मार्च
जन्मदिवस : लेखक बोरिस व्हिआँ (१९२०), नाटककार मनोरंजन दास (१९२३), कवी मंगेश पाडगावकर (१९२९), शास्त्रज्ञ यू.आर. राव (१९३२), समाजसुधारक असगर अली इंजिनिअर (१९३९), अभिनेत्री शॅरन स्टोन (१९५८)
मृत्युदिवस : समाजसुधारक सावित्रीबाई फुले (१८९७), लेखक मिखाईल बुल्गाकोव्ह (१९४०), पुणे विद्यापीठाचे प्रथम प्र-कुलगुरू बॅरिस्टर जयकर (१९५९), ज्ञानपीठविजेते कवी कुसुमाग्रज (१९९९)
---
राष्ट्रकुल दिन.
१५२७ : कनवाह येथील विजय व गंगेच्या खोऱ्यावरील नियंत्रण याद्वारे बाबर याने भारतातील आपले साम्राज्य स्थापले.
१८७६ : अ‍ॅलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी आपल्या सहाय्यकासमवेत जगातील पहिले दूरध्वनी संभाषण केले.
१९२२ : ब्रिटिश सरकारविरुद्ध असंतोष पसरवणे (देशद्रोह), जनतेत अप्रीती निर्माण करणे या आरोपांवरून इंग्रज सरकारने महात्मा गांधी यांना साबरमतीनजीक प्रथमच अटक केली. त्यांना सहा वर्षांचा तुरुंगवास झाला, पण दोन वर्षांनंतर आरोग्याच्या कारणास्तव सोडून देण्यात आले.
१९३३ : डाखाऊ येथे नाझींनी पहिली छळछावणी उभारली.
१९५९ : ल्हासा येथे तिबेटींचे आंदोलन चीनने दडपले. हजारो मृत.
२००० : NASDAQ सूची ५१३२वर पोहोचली. 'डॉटकॉम बूम'ची सुरुवात.

११ मार्च
जन्मदिवस : नाटककार शं.गो. साठे (१९१२), क्रिकेटपटू विजय हजारे (१९१५), लेखक डग्लस अ‍ॅडम्स (१९५२)
मृत्युदिवस : छत्रपती संभाजीराजे भोसले (१६८९), सिनेदिग्दर्शक एफ. डब्ल्यू. मुर्नो (१९३१), पेनिसिलिनचे जनक अलेक्झांडर फ्लेमिंग (१९५५), लेखक अर्ल स्टॅनले गार्डनर (१९७०), 'नवाकाळ'चे संपादक यशवंत कृष्ण खाडिलकर (१९७९), कवी मनोहर ओक उर्फ 'मन्या ओक' (१९९३), सिनेदिग्दर्शक पीटर बाशो (२००९)
---
स्वातंत्र्यदिन : लिथुएनिआ
१७०२ : पहिले इंग्लिश दैनिक 'डेली कुराँ' फ्लीट स्ट्रीट, लंडन येथून प्रकाशित.
१८१८ : मेरी शेलीची 'फ्रँकेनस्टाईन' कादंबरी प्रकाशित.
१८८६ : भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना M.D. पदवी बहाल करण्यात आली.
१८९१ : बास्केटबॉलचा पहिला सार्वजनिक सामना खेळला गेला.
१९८५ : मिखाईल गोर्बाचेव्ह सोव्हिएत रशिआच्या प्रमुखपदी. कम्युनिस्ट राजवट खुली करून अखेर तिच्या जोखडातून पूर्व युरोपला मुक्त करण्यात त्यांचा मोठा हातभार लागला.
१९९१ : सतराव्या वर्षी WTAचे प्रथम मानांकन मिळवून मोनिका सेलेस सर्वात लहान प्रथम मानांकित महिला टेनिस खेळाडू ठरली.
१९९९ : अमेरिकेतल्या NASDAQ सूचीवर येणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी ठरली.
२००४ : माद्रिदमध्ये दहशतवादी बाँबस्फोट. १९१ ठार; १७०० जखमी.
२०११ : जपानमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ९ तीव्रतेचा भूकंप, त्सुनामी. शेकडो ठार. फुकुशिमा अणुभट्टीला अपघात. सर्वाधिक तीव्रतेच्या आण्विक अपघातांपैकी हा द्वितीय क्रमांकाचा आहे.
२०२० : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोव्हिड-१९ विषाणूची साथ ही महासाथ (pandemic) असल्याचे घोषित केले.

१२ मार्च
जन्मदिवस : विज्ञानविषयक लेखक बाळाजी प्रभाकर मोडक (१८४७), लेखक गाब्रिएल द'आनुंझिओ (१८६३), नर्तक वास्लाव निजिन्स्की (१८८९), अभिनेते आणि नाटय़दिग्दर्शक चिंतामणराव कोल्हटकर (१८९१), महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (१९१४), लेखक जॅक केरुआक (१९२२), नाटककार एडवर्ड अल्बी (१९२८), गायिका, अभिनेत्री व नर्तिका लिझा मिनेली (१९४६), कलाकार अनीश कपूर (१९५४), गायिका श्रेया घोशाल (१९८४)
मृत्युदिवस : जाझ सॅक्सोफोनिस्ट चार्ली 'बर्ड' पार्कर (१९५५), तबलावादक वसंतराव आचरेकर (१९८०), व्हायोलिनवादक यहुदी मेनुहिन (१९९९), लेखक रॉबर्ट लुडलम (२००१), चित्रकार गणेश पाईने (२०१३), सिनेदिग्दर्शिका व्हेरा चितिलोव्हा (२०१४)
---
सायबर सेन्सॉरशिपविरोधी जागतिक दिन
स्वातंत्र्यदिन - मॉरिशस
१९३० : ब्रिटिश सरकारने मिठावर लादलेल्या कराविरुद्ध महात्मा गांधींनी दांडी यात्रा सुरू केली.
१९४५ : अ‍ॅन फ्रॅकचा बेल्सेन या छळछावणीत मृत्यू. युद्धानंतर तिची रोजनिशी प्रसिद्ध झाली. ती खूप गाजली.
१९८९ : टिम बर्नर्स ली यांनी इंटरनेटची संकल्पना प्रथम मांडली.
१९९३ : मुंबईत साखळी बाँबस्फोट. ३०० ठार; हजाराहून अधिक जखमी. बाँबस्फोटानंतरचा खटला हा भारताच्या इतिहासातील अत्यंत लांबलेल्या खटल्यांपैकी आहे.

१३ मार्च
जन्मदिवस : शास्त्रज्ञ जोसेफ प्रिस्टली (१७३३), वास्तुविशारद कार्ल शिंकेल (१७८१), खगोलज्ञ पर्सिव्हल लॉवेल (१८५५), चित्रकार अलेक्सी जॉलेन्स्की (१८६४), लेखक व कलासंग्राहक ह्यू वॉलपोल (१८८४), प्राच्यविद्या संशोधक वासुदेव विष्णू मिराशी (१८९३), लेखक रवींद्र पिंगे (१९२६), लेखक महमूद दरविश (१९४१), कवी वामन सुदामा निंबाळकर (१९४३)
मृत्युदिवस : मुत्सद्दी नाना फडणवीस (१८००), सिनेदिग्दर्शक क्रिस्तॉफ किस्लॉव्स्की (१९९६), अभिनेता शफी इनामदार (१९९६), कॉमिक्सचा निर्माता ली फॉक (१९९९), निर्माता, दिग्दर्शक व पटकथा लेखक नासिर हुसेन (२००२), सतारवादक उस्ताद विलायत खाँ (२००४), गंगा शुद्धीकरणाचा प्रणेता वीरभद्र मिश्र (२०१३)
---
६२४ : बद्रच्या लढाईत प्रेषित मुहंमदाच्या सैन्याने मक्केतील कुरेशींचा पाडाव केला. इस्लामच्या इतिहासात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
१७८१ : विल्यम हर्शेल यांनी युरेनस ग्रहाचा शोध लावला.
१८४५ : फीलिक्स मेंडेलसनच्या व्हायोलिन कन्चेर्टोचे पहिले सादरीकरण.
१९४० : अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या पंजाबचा माजी गव्हर्नर ओडवायरवर उधमसिंग यांनी गोळीबार करून त्यास ठार मारले.
१९६३ : अर्जुन पुरस्काराची सुरुवात
२००१ : ‘तहलका डॉट कॉम’ने संरक्षण खात्यातील भ्रष्टाचार उघड केला. परिणामी भाजपचे अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांनी राजीनामा दिला. पुढे ते दोषी सिद्ध झाले.
२०१३ : अटाकामाच्या वाळवंटात 'अल्मा' ही जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण कार्यान्वित.

१४ मार्च
जन्मदिवस : चित्रकार जॉर्ज द ला तूर (१५९३), अल्बर्ट आईनस्टाईन (१८७९), तत्त्वज्ञ रेमंड एरन (१९०५), तत्त्वज्ञ मॉरिस मर्लो-पाँटी (१९०८), छायाचित्रकार डायान आरब्यूस (१९२३), ट्रंपेटवादक व संगीतकार क्विन्सी जोन्स (१९३३), अभिनेता मायकेल केन (१९३३), अभिनेता बिली क्रिस्टल (१९४८), अभिनेता आमिर खान (१९६५)
मृत्युदिवस : विचारवंत कार्ल मार्क्स (१८८३), ईस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक जनक जॉर्ज ईस्टमन (१९३२), स्त्रीरोग चिकित्सक डॉ. ताराबाई लिमये (१९९४), अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते दादा कोंडके (१९९८), कवी सुरेश भट (२००३), ज्ञानपीठविजेते कवी विंदा करंदीकर (२०१०), शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग (२०१८)
---
पाय (π) दिन.
१८७८ : ‘व्हर्नाक्युलर प्रेस अ‍ॅक्ट’न्वये प्रकाशनांवर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा आणून भारतीय भाषांतील वृत्तपत्रांची गळचेपी ब्रिटिश सरकारने सुरू केली.
१९३१ : ‘आलमआरा’ हा पहिला हिंदी बोलपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
१९६५ : इस्राएलने पश्चिम जर्मनीशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास संमती दिली.
१९९४ : लिनक्स १.० आवृत्ती प्रकाशित.
१९९८ : सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी.
२००० : कलकत्ता येथील टेक्निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
२००३ : १९९९मध्ये परवेझ मुशर्रफ यांनी सत्ता हस्तगत केल्यापासून अमेरिकेने पाकिस्तानवर लादलेले निर्बंध बुश सरकारने उठवले.
२००७ : नंदीग्राममधे पोलिस-निदर्शक चकमकीत १४ मृत

१५ मार्च
जन्मदिवस : कवी केशवसुत (१८६६), गिटारिस्ट राय कूडर (१९४७)
मृत्युदिवस : ‘मुंबईचे वर्णन’कार लेखक गोविंद नारायण माडगावकर (१८६५), 'विविधज्ञानविस्तार'चे संपादक, समीक्षक, निबंधकार हरि माधव पंडित (१८९९), चित्रकार अलेक्सी जॉलेन्स्की (१९४१), सिनेदिग्दर्शक रने क्लेअर (१९८१), गीतकार सुधीर मोघे (२०१४), गायिका कृष्णा कल्ले (२०१५)
---
राष्ट्रीय दिन : हंगेरी
ग्राहक दिन
पोलीस क्रौर्यविरोधी दिन
इ.स.पू. ४४ : रोमन सम्राट ज्युलियस सीझरची हत्या.
१४९३ : 'नव्या जगा'हून ख्रिस्तोफर कोलंबस परतला.
१५६४ : सम्राट अकबराने जिझिया कर रद्द केला
१६७० : शिवरायांनी कल्याण-भिवंडीवर अचानक छापा टाकून हा भाग सर केला. शाहिस्तेखानाच्या स्वारीपासूनच हा भाग मोगलांच्या ताब्यात गेला होता.
१८३१ : व्हिक्टर ह्यूगोची कादंबरी 'नोत्र दाम अॉफ पॅरिस' प्रकाशित.
१८३१ : रखमाजी देवजी मुळे यांनी नवीन संवत्सराचे संपूर्ण पंचांग तयार केले. ही छापील पंचांगांची सुरुवात होती.
१८७७ : पहिला कसोटी क्रिकेट सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान सुरू झाला.
१९०६ : रोल्स रॉइस कंपनीची स्थापना.
१९४५ : 'बिलबोर्ड'ची पहिली 'हिट लिस्ट' प्रकाशित. नॅट किंग कोल प्रथम स्थानावर.
१९५६ : 'माय फेअर लेडी' संगीतिकेचा ब्रॉडवेवर पहिला प्रयोग.
१९६५ : अमेरिकेत कृष्णवर्णीयांना मतदानाच्या हक्कासाठीच्या Voting Rights Actच्या बाजूने बोलताना राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी "We shall overcome" हे मार्टिन ल्यूथर किंग यांनी अजरामर केलेले शब्द वापरले.
१९७२ : 'गॉडफादर' चित्रपट प्रदर्शित.
१९८५ : पहिले इंटरनेट डोमेन रजिस्टर झाले (symbolics.com).
१९८८ : सद्दाम हुसेनने हलाब्जा या कुर्द गावावर केलेल्या रासायनिक शस्त्रांच्या हल्ल्यात तीन ते पाच हजार मृत.
२०१९ : ख्राइस्टचर्च न्यू झीलंड येथे मशिदीवर कट्टर ख्रिस्ती युवकाचा अतिरेकी हल्ला; ५१ ठार.

१६ मार्च
जन्मदिवस : भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम (१७८९), वनस्पतिशास्त्रज्ञ, छायाचित्रकार, छायाचित्रं असणारं पहिलं पुस्तक प्रकाशित करणारी अॅना अॅटकिन्स (१७९९), पहिला नोबेलविजेता साहित्यिक सली प्रुडहोम (१८३९), कवी सेझार वालेहो (१८९२), सरन्यायाधीश प्रल्हाद बाळाचार्य गजेंद्रगडकर (१९०१), संगीतकार भास्कर चंदावरकर (१९३६), चित्रकार प्रभाकर बरवे (१९३६), सिनेदिग्दर्शक बर्नार्डो बर्तोलुची (१९४०), अभिनेत्री इजाबेल ह्यूपेर (१९५३), फ्री सॉफ्टवेअर चळवळीचा जनक रिचर्ड स्टॉलमन (१९५३)
मृत्युदिवस : चित्रकार अॉब्री बीअर्डस्ली (१८९८), चित्रकार निकोलास द श्टाएल (१९५५), शिल्पकार कॉन्स्टंटिन ब्रांकुशी (१९५७), गिटारिस्ट, गायक व संगीतकार टी बोन वॉकर (१९७५), सिनेदिग्दर्शक जी. अरविंदन (१९९१)
---
११९० : ख्रिश्चनधर्मीयांनी इंग्लंडच्या यॉर्क शहरात ज्यू व्यक्तींचे सक्तीने धर्मांतर सुरू केले. धर्मांतर न करून घेणाऱ्यांना मृत्यूदंड दिला गेला. अनेक ज्यूंनी ख्रिश्चन होण्यापेक्षा आत्महत्त्या करणे पसंत केले.
१५३४ : इंग्लंडने कॅथॉलिक चर्चशी संबंध तोडले.
१६६२ : शास्त्रज्ञ ब्लेज पास्कालने सार्वजनिक वाहतुकीस सुरुवात केली. ही वाहतूक बग्गीतून होत असे.
१८७७ : इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.
१९११ : भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे असा ठराव नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी मांडला.
१९३७ : महाड येथील चवदार तळय़ाचे पाणी पिण्याचा सर्व जातींना हक्क असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
१९६० : जॉं-ल्यूक गोदारचा चित्रपट 'ब्रेथलेस' प्रदर्शित. 'फ्रेंच न्यू वेव्ह'मधला एक महत्त्वाचा टप्पा.
१९७७ : आणीबाणीनंतरच्या निवडणुकांत इंदिरा गांधींचा पराभव.
१९९२ : सत्यजित राय यांना ऑस्कर पारितोषिक प्रदान करण्यात आले.
१९९५ : गुलामगिरीची प्रथा रद्द करणारी १८६५ सालची अमेरिकन घटनेतली १३वी दुरुस्ती मिसिसिपी राज्याने मान्य केली. असे करणारे ते अखेरचे राज्य ठरले.
१९९८ : दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यूंचे शिरकाण सुरू असताना त्याविरुद्ध आवाज न उठवल्याबद्दल पोप जॉन पॉल दुसऱ्याने ख्रिश्चन धर्मीयांच्या वतीने जाहीर माफी मागितली.

१७ मार्च
जन्मदिवस : सुधारणावादी संस्थानिक सयाजीराव गायकवाड (१८६३), 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे' ही घोषणा टिळकांना सुचवणारे जोसेफ बाप्टिस्टा (१८६४), प्राच्यविद्या पंडित रा. ना. दांडेकर (१९०९), शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ (१९१०), गायक नॅट किंग कोल (१९१९), नर्तक रुडॉल्फ न्यूरेयेव्ह (१९३८), बॅडमिंटनपटू साईना नेहवाल (१९९०)
मृत्युदिवस : लेखक रोशफूको (१६८०), भौतिकशास्त्रज्ञ डॉपलर (१८५३), अर्वाचीन मराठी वाङमयातील प्रसिद्ध निबंधलेखक व टीकाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर (१८८२), नोबेलविजेती भौतिकशास्त्रज्ञ इरेन जोलिओ-क्यूरी (१९५६), संगीतकार गुलाम मोहम्मद (१९६८), वास्तुविशारद लुई कान (१९७४), सिनेदिग्दर्शक लुकिनो व्हिस्काँती (१९७६), हिंदी चित्रपटातील पहिली पार्श्वगायिका राजकुमारी (२०००)
---
१८०० : अलेसांद्रो व्होल्टाने विद्युत बॅटरीचा पहिला यशस्वी प्रयोग केला.
१८३० : संगीतकार शोपँची पहिली मैफिल.
१९४१ : वॉशिंग्टन डी.सी. येथे अमेरिकेच्या नॅशनल गॅलरी ऑफ आर्टचे उद्घाटन.
१९४४ : भारतीय नौदल अभियांत्रिकी संस्था आय. एन. एस. शिवाजीची लोणावळा येथे स्थापना.
१९४८ : फ्रान्स आणि ब्रिटनदरम्यान ब्रसेल्स करार संमत. ही 'नाटो'ची सुरुवात होती.
१९७० : व्हिएतनाम युद्धादरम्यानच्या माय लाई हिंसाचाराबद्दलची माहिती दडवून ठेवण्याच्या प्रकरणात १४ सैन्याधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल.
१९९२ : वंशभेदाचे धोरण (apartheid) ठेवावे का, याविषयी दक्षिण आफ्रिकेतील श्वेतवर्णीयांत जनमत चाचणी. ६८.७% लोकांनी धोरणाच्या विरोधात मतदान करून वंशभेदाची अखेर निश्चित केली.

१८ मार्च
जन्मदिवस : शहाजीराजे भोसले (१५९४), कवी स्तेफान मालार्मे (१८४२), नाटककार, पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक वीर वामनराव जोशी (१८८१), कवी अक्कितम अच्युतन नंबूद्री (१९२६), लेखक जॉन अपडाइक (१९३२), सिनेदिग्दर्शक, निर्माता व अभिनेता शशी कपूर (१९३८), क्रिकेटपटू एकनाथ सोलकर (१९४८), गायिका व्हनेसा विलिअम्स (१९६३), अभिनेत्री रत्ना पाठक शाह (१९६३), बुद्धिबळपटू व्हासिली इव्हानचुक (१९६९)
मृत्युदिवस : मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम (१९८०), गायक पं. जगन्नाथ प्रसाद (१९९६), 'रॉक अँड रोल' संगीताचा प्रणेता चक बेरी (२०१७)
---
१९०२ : मेणाच्या सिलिंडरवर आपला आवाज ध्वनिमुद्रित करणारा एन्रिको कारुसो हा पहिला गायक ठरला. त्याची काही गीते ध्वनिमुद्रित केली गेली.
१९२२ : महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरुंगवास. (१९२४मध्ये त्यांची सुटका झाली.)
१९३१ : विजेवर चालणारे वस्तरे बाजारात उपलब्ध झाले.
१९४४ : सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.
१९६५ : अलेक्सेई लेओनोव्ह हा अवकाशात चालणारा पहिला मानव ठरला.
१९७२ : जागतिक ग्रंथ जत्रा दिल्ली येथे सुरू झाली. दर दोन वर्षानी ही जत्रा भरते.
१९९० : बॉस्टनच्या इजाबेला स्ट्यूअर्ट गार्डनर वस्तुसंग्रहालयात चोरी. रेम्ब्रॉ, व्हर्मीर, दगा, माने अशा मोठ्या चित्रकारांच्या कलाकृती चोरीस गेल्या.
२००३ : इराकवर अमेरिका आणि तिच्या दोस्त राष्ट्रांचा हल्ला.
२०१० : Poincaré conjecture सोडवल्याबद्दल ग्रिगोरी पेरेलमनला प्रतिष्ठेचे 'मिलेनिअम पारितोषिक' प्रदान. या पारितोषिकासाठी खुल्या असलेल्या सात प्रश्नांपैकी फक्त Poincaré conjecture आजवर सोडवले गेले आहे.
२०१३ : पाकिस्तानातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ व सोआझख्वानी या सांगीतिक काव्य सादरीकरणावरचे मूलगामी संशोधक उस्ताद सिब्ते जाफर झैदी यांची दहशतवाद्यांकडून हत्या.

१९ मार्च
जन्मदिवस : आफ्रिका खंडात शोधमोहिमा काढणारे डॉ. डेव्हिड लिव्हिंग्स्टन (१८१३), अरेबियन नाईट्स, कामसूत्र इत्यादी पौर्वात्य ग्रंथांचे भाषांतर करणारा साहसी विद्वान भाषाप्रभू रिचर्ड बर्टन (१८२१), गणितज्ज्ञ केरो लक्ष्मण छत्रे (१८२४), नोबेलविजेता शास्त्रज्ञ फ्रेदेरिक जोलिओ क्यूरी (१९००), लेखक फिलिप रॉथ (१९३३), नाट्यकर्मी सत्यदेव दुबे (१९३६), बालनाटय़ लेखिका आणि चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे (१९३६). अभिनेत्री उर्सुला अ‍ॅन्ड्रेस (१९३६), अभिनेता ब्रूस विलिस (१९५५)
मृत्युदिवस : अप्रसिद्ध संस्कृत ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या 'काव्येतिहाससंग्रह' या मासिकाचे एक संस्थापक-संस्थापक जनार्दन बाळाजी मोडक (१८९२), ‘टारझन’चा लेखक एडगर राईस बरोज (१९५०), गांधीवादी नेते आचार्य जे. बी. कृपलानी (१९८२), संगीतज्ज्ञ विनयचंद्र मौद्गल्य (१९९५), चित्रकार विल्यम डी कूनिंग (१९९७), लेखक आर्थर सी. क्लार्क (२००८)

---

१८४८ : 'लोकहितवादी' गोपाळराव हरी देशमुख यांच्या 'शतपत्रां'तील पहिले पत्र या दिवशी 'प्रभाकर' या वृत्तपत्रात छापून आले.
१८९५ : सिनेमाचे उद्गाते ल्यूमिए बंधूंनी आपले पहिले चित्रीकरण केले.
१९३२ : सिडनी हार्बर ब्रिजचे उद्घाटन.
१९६२ : गायक-संगीतकार बॉब डिलनची पहिली ध्वनिमुद्रिका निघाली.
१९७९ : सतीश आळेकर लिखित आणि दिग्दर्शित 'बेगम बर्वे' नाटकाचा पहिला प्रयोग.
१९८६ : साहेबराव करपे पाटील या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाणच्या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली. ही विदर्भातील पहिली शेतकरी आत्महत्या होती. नंतरच्या काळात आजवर हजारो शेतकरी आत्महत्या झाल्या.
२००२ : केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान मंडळ यांनी शिक्षकांच्या पदांमध्ये शारीरिक अपंग आणि अंध व्यक्तींसाठी तीन टक्के जागा राखून ठेवाव्यात असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश.

२० मार्च
जन्मदिवस : कवी ओव्हिड (इ.स.पूर्व ४३), लेखक गोगोल (१८०९), नाटककार हेन्रिक इब्सेन (१८२८), समीक्षक माधव मनोहर (१९११), नाटककार वसंत कानेटकर (१९२२), टेनिसपटू आनंद अमृतराज (१९५२), अभिनेत्री थेरेसा रसेल (१९५७), लेखक विलिअम डॅलरिंपल (१९६५)
मृत्युदिवस : सुलतान मुहम्मद बिन तुघलक (१३५१), शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन (१७२७), कवी बा. सी. मर्ढेकर (१९५६), सिनेदिग्दर्शक कार्ल थिओडोर ड्रेअर (१९६८), कॅम्लिन उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष शरद दांडेकर (२००३), लेखक व संपादक खुशवंत सिंह (२०१४), शाहीर साबळे (२०१५)

---

स्वातंत्र्यदिन : ट्यूनिशिया (१९५६)

जागतिक आनंद दिन
जागतिक मांसाहाररहित दिन
जागतिक चिमणी दिन
जागतिक फ्रेंचभाष दिन

१६०२ : डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना
१६६६ : जानेवारी १६६६मधील पन्हाळगडाच्या अपयशी स्वारीमुळे शिवरायांनी स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर यांस त्यांच्या पदावरून दूर केले. त्यांना विजापूरच्या आदिलशहाने तात्काळ स्वत:कडे चाकरीस घेतले. पुढे पश्चात्ताप झाल्यावर पालकर स्वराज्यात पुन्हा परतले.
१७३९ : नादिरशहाने दिल्ली लुटली. मयूरासनासहित नवरत्ने लुटून इराणला पाठविली. सुमारे ३०,००० मृत.
१८५२ : हॅरिएट बीचर स्टो लिखित कादंबरी 'अंकल टॉम्स केबिन' प्रकाशित. अमेरिकेतील कृष्णवर्णीय गुलामांच्या जिण्यावर तिने प्रकाशझोत टाकला.
१८५८ : भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील महान सेनानी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रज सत्तेला आव्हान दिले. 'मेरी झाँसी नहीं दूँगी’ असा पुकारा करताच इंग्रज सेनापती सर हय़ू रोज याने या दिवशी झाशीच्या किल्ल्याला वेढा दिला.
१९१६ : अल्बर्ट आइनस्टाइनने आपला सापेक्षतावादाचा सिद्धांत (general theory of relativity) प्रसिद्ध केला.
१९२७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाडच्या चवदार तळ्यावरील सत्याग्रह.
१९८७ : अमेरिकन FDAने एड्सविरोधात परिणामकारक ठरलेल्या AZT औषधप्रणालीला मान्यता दिली.
१९९५ : ओम शिनरिक्यो गटाने टोक्योच्या सबवेमध्ये केलेल्या सारिन वायूच्या दहशतवादी हल्ल्यात १३ ठार, १३०० जखमी.
२०२० : निर्भया बलात्कार प्रकरणातील ४ गुन्हेगारांना फाशी.

२१ मार्च
जन्मदिवस : संगीतकार योहान सेबॅस्टियन बाख (१६८५), स्वातंत्र्य चळवळीतील नेते समाजसुधारक मानवेंद्रनाथ रॉय (१८८७), सनईवादक बिस्मिल्ला खाँ (१९१६), सिनेदिग्दर्शक एरिक रोहमर (१९२०), नाट्य-सिनेदिग्दर्शक पीटर ब्रूक (१९२५), संपादक व लेखक राम पटवर्धन (१९२८), लेखक वेद मेहता (१९३४), समाजशास्त्रज्ञ व समीक्षक स्लावोई झिझेक (१९४९), फॉर्म्युला वन कारचालक एयर्टन सेना (१९६०), अभिनेत्री राणी मुखर्जी (१९७८)
मृत्युदिवस : कोशकार यशवंत दाते (१९७३), अभिनेते शंकर घाणेकर (१९७३), व्याकरणकार व साहित्यिक मो. रा. वाळंबे (१९९२), गायक, संगीतप्रसारक पं. गोविंदराव त्र्यंबकराव जळगावकर (१९९८), लेखक चिनुआ अचेबे (२०१३), साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर (२०१७)

---

स्वातंत्र्यदिन : नामिबिया
वंशभेद निर्मूलन दिन, वन दिन, काव्य दिन, कळसूत्री खेळ दिन, डाउन सिंड्रोम दिन

१८७२ : ठाणे येथून गोपाळ गोविंद दाबक यांनी ‘हिंदुपंच’ हे पत्र सुरू केले. इंग्लंडमधील पंच या व्यंगचित्र-पत्राचाच कित्ता या पत्राने स्वत:समोर ठेवला होता.
१८९० : ऑस्ट्रियन ज्यू समाजाला कायदेशीर मान्यता.
१९३५ : पर्शियाचे इराण हे अधिकृतरीत्या नामकरण.
१९४५ : दुसऱ्या महायुद्धात प्रथमच जपानी विमान दलाने आत्मघातकी कामिकाझे हल्ले सुरू केले. अशा ९०० विमानांनी आत्माहुती देऊन ३४ अमेरिकन जहाजे बुडवली.
१९६० : दक्षिण आफ्रिकेतील वंशवादाविरुद्ध निदर्शने करणाऱ्या निःशस्त्र आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार. ६९ ठार, १८० जखमी.
१९७१ : जॉर्जटाऊन येथे क्रिकेटपटू सुनील गावस्करचे त्याच्या विक्रमी ३४ कसोटी शतकांपैकी पहिलेवहिले शतक, ११६ धावा.
१९७७ : आणीबाणीनंतरची पहिली निवडणूक हरल्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा राजीनामा.
१९८० : शीतयुद्ध - अफगाणिस्तानमधील सोव्हिएत सैन्याच्या विरोधात अमेरिकेने मॉस्कोत होऊ घातलेल्या ऑलिंपिक खेळांवर बहिष्कार टाकला.
२००६ : सोशल नेटवर्क 'ट्विटर' सुरू झाले.

२२ मार्च
जन्मदिवस : फारसी खगोलशास्त्रज्ञ उलुग बेग (१३९४), इलेक्ट्रॉनवरचा विद्युतभार मोजणारा रॉबर्ट मिलीकन (१८६८), अभिनेत्री, निर्माती रीज विदरस्पून (१९७६)
मृत्युदिवस : पत्रकार, लेखक प्रभाकर पाध्ये (१९८४), 'टॉम अँड जेरी'चा सहनिर्माता विल्यम हाना (२००१)

---

जागतिक जल दिन

१८९५ : ल्यूमिए बंधूंनी आपला 'कारखान्यातून बाहेर पडणारे लोक' हा आपला पहिला चित्रपट लोकांना दाखवला.
१९१२ : बंगाल राज्यातून बिहार वेगळे काढले गेले.
१९१६ : चिनी राजा युआन शिकाईने राज्य सोडले आणि चिनी प्रजासत्ताकाची स्थापना झाली.
१९२८ : महाराष्ट्र साहित्य पत्रिकेची सुरुवात.
१९४५ : इजिप्तमध्ये अरब लीगची स्थापना झाली.
१९४९ : माध्यमिक शालांत परीक्षेची सुरुवात.
१९५४ : १९३९पासून बंद असलेले लंडनचे बुलियन मार्केट पुन्हा उघडले.
१९६० : आर्थर शॉलो आणि चार्ल्स टाऊन्स यांना लेझरचे पेटंट मिळाले.
१९६३ : बीटल्सचा पहिला अल्बम 'प्लीज प्लीज मी' प्रकाशित झाला.
१९७० : मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना.
१९९३ : इंटेलने पहिली पेंटियम चिप बाजारात आणली.
१९९७ : हेल-बॉप धूमकेतू पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आला होता.

२३ मार्च
जन्मदिवस : गणितज्ञ पिएर-सिमॉं लाप्लास (१७४९), लॉग टेबल्स प्रकाशित करणारा गणितज्ञ युर्यी वेगा (१७५४), पॉलिमर्सवर मूलभूत संशोधन करणारा नोबेलविजेता हर्मन स्टॉडिंजर (१८८१), अमूर्त गणितज्ञ, सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ एमी नथर (१८८२), भारतात पहिली विद्युत मोटर बनवणारा अभियंता जी. डी. नायडू (१८९३), मानसतज्ञ, तत्त्वज्ञ एरिक फ्रॉम (१९००), अॅलर्जीवर औषध शोधणारा नोबेलविजेता दानियेल बोवेत (१९०७), निर्माता, दिग्दर्शक अकीरा कुरोसावा (१९१०), स्वातंत्र्यसैनिक व विचारवंत डॉ. राम मनोहर लोहिया (१९१०), लेखक रविंद्र पिंगे (१९२६), औषध व्य‌ावसायिक किरण मजुमदार-शॉ (१९५३), अभिनेत्री कंगना राणावत (१९८७)
मृत्युदिवस : हुतात्मा स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू (१९३१), लेखक श्री. ना. पेंडसे (२००७), फील्ड्स मेडलविजेता गणितज्ञ पॉल कोहेन (२००७), अभिनेता गणपत पाटील (२००८), अभिनेत्री एलिझाबेथ टेलर (२०११)
---
प्रजासत्ताक दिन : पाकिस्तान (१९५६)
आंतरराष्ट्रीय हवामान दिन
१७५७ : कोलकात्याजवळचा चंदननगरचा किल्ला ब्रिटिशांनी फ्रेंचांकडून जिंकला.
१८३९ : बॉस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ.के. या शब्दाचा पहिला छापील वापर.
१८५७ : तार तुटली तरीही न कोसळणारी पहिली लिफ्ट न्यू यॉर्क शहरात ओटिस कंपनीने बसवली.
१८८९ : कादीयान (पंजाब) मध्ये अहमदिया पंथाची स्थापना.
१९१८ : भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळाच्या सहाय्याने मुंबईत अ. भा. अस्पृश्यता निवारण परिषद भरली.
१९१९ : मुसोलिनीने मिलानमध्ये फाशिस्ट चळवळीची स्थापना केली.
१९३३ : हिटलर जर्मनीचा सर्वेसर्वा झाला.
१९४० : मुस्लिमांसाठी स्वतंत्र राज्य मागणारा लाहोर ठराव ऑल इंडिया मुस्लिम लीगने मांडला.
१९४२ : दुसऱ्या महायुद्धात जपानने अंदमान बेटांवर कब्जा मिळवला.
२००१ : रश्यन अंतराळयान 'मीर' अंतराळात नष्ट केले गेले.

२४ मार्च
जन्मदिवस : आद्य कर्नाटक संगीतकारांपैकी एक मुथुस्वामी दिक्षीतार (१७७५), कागदी चलनाचा जनक थॉमस रुझवेल्ट (१७९३), फोटोव्होल्टाईक परिणाम शोधणारा, सौरअभ्यासक एदमाँ बेकरेल (१८२०), रेणूंच्या विद्युतचुंबकीय क्षेत्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पीटर देब्यं (१८८४), लैंगिक अंतस्रावांवर मूलभूत संशोधन करणारा नोबेलविजेता अॅडॉल्फ बुटेनांड्ट (१९०३), नोबेलविजेता लेखक, नाट्यदिग्दर्शक दारियो फो (१९२६), अभिनेता इम्रान हाश्मी (१९७९)
मृत्युदिवस : विज्ञान काल्पनिकांचा लेखक जूल्स व्हर्न (१९०५), रोगप्रतिकारशक्तीवर संशोधन करणारा नोबेलविजेता सीझर मिलस्टीन (२००२), 'ॲस्टेरिक्स'चा रेखाटनकार आणि लेखक अल्बर्ट उदेर्झो (२०२०)

---

जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन

१८३७ : कॅनडात कृष्णवर्णीय पुरुषांना मतदानाचा हक्क मिळाला.
१८५५ : आग्रा आणि कलकत्ता यांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
१८८२ : क्षयाच्या जीवाणूंचा शोध रॉबर्ट कॉख याला लागला.
१८९६ : अलेक्झांडर पोपॉव्हने पहिले रेडिओ प्रक्षेपण केले.
१९४६ : स्टॅफर्ड क्रिप्स यांसकट त्रिमंत्री योजनेचे शिष्टमंडळ भारतात; योजना काँग्रेस आणि मुस्लीम लीगला अमान्य.
१९६५ : नासाच्या रेंजर-९ ने चंद्राचे फोटो अमेरिकन टीव्हीवर प्रसारित केले.
१९६८ : देशातल्या पहिल्या सहकारी सूतगिरणीचे उद्घाटन.
१९७२ : ब्रिटनने उत्तर आयर्लंडवर आपला हक्क लादला.
१९९३ : गुरूवर आदळलेला धूमकेतू - शूमेकर लेव्ही ९ - याचा शोध.
१९९८ : प. बंगालमध्ये चक्रीवादळाचे २५० बळी.
१९९९ : कोसोव्हो युद्धात युगोस्लाव्हियामध्ये बाँब टाकल्यामुळे नाटोचा युद्धात प्रथम प्रत्यक्ष समभाग.
२००१ : अॅपलची मॅक ओएस एक्स बाजारात उपलब्ध.
२००८ : भूतानमध्ये प्रथम सार्वजनिक मतदान होऊन लोकशाही स्थापन.
२०२० : करोना विषाणूच्या साथीला आळा घालण्यासाठी देशभर संचारबंदी (लॉकडाऊन) जाहीर.

२५ मार्च
जन्मदिवस : लेखक र.वा. दिघे (१८९६), लेखक व.पु.काळे (१९३२), संशोधक वसंत गोवारीकर (१९३३), हरितक्रांतीचे जनक, कृषितज्ञ नॉर्मन बोरलॉग (१९१४), अमेरिकन स्त्रीवादी लेखिका ग्लोरिया स्टायनम (१९३४), डॉमिनोज पिझाचा जनक टॉम मोनॅगम (१९३७), गायिका अरीथा फ्रॅन्कलिन (१९४२), गायक एल्टन जॉन (१९४७), अभिनेता फारूक शेख (१९४८)
मृत्युदिवस : संगीतकार क्लोद दब्यूसी (१९१८), लेखक मधुकर केचे (१९९३), अभिनेत्री नंदा (२०१४), अभिनेत्री निम्मी (२०२०)

---

टोल्कीयन वाचन दिन

१६५५ : ख्रिश्चियन हॉयगन्सने शनीचा उपग्रह टायटन शोधला.
१८०७ : ब्रिटिश साम्राज्यात गुलामांच्या व्यापारावर कायदेशीर बंदी.
१८०७ : ब्रिटनमध्ये जगात प्रथमच रेल्वेतून प्रवासी वाहतूक केली गेली.
१८११ : पर्सी शेलीने The Necessity of Atheism शीर्षकाचे पत्रक काढल्यामुळे त्याची ऑक्सफर्ड विद्यापीठातून हकालपट्टी झाली.
१८९८ : शिवराम परांजपे यांनी साप्ताहिक 'काळ'चा पहिला अंक काढला
१९५७ : काही युरोपीय देशांनी रोम करारावर सह्या करून युरोपियन संघाची पायाभरणी केली.
१९६५ : कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी मार्टिन ल्यूथर किंग, ज्यु. यांच्या नेतृत्वाखाली सेल्मा, अलाबामा येथून निघालेली शांततापूर्ण पदयात्रा ५ दिवसांचा आणि ५४ मैलांचा प्रवास करून मॉन्टेगोमेरी इथे समाप्त झाली.
१९७१ : पूर्व पाकिस्तानातील (आताचा बांग्लादेश) राष्ट्रवादी चळवळ नष्ट करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने ऑपरेशन सर्चलाईट सुरू केले. हजारो नागरिक त्यात मारले गेले आणि लाखो निर्वासित झाले.
१९९५ : पहिले विकी नेटवर्क वॉर्ड कनिंगहॅमने उपलब्ध करून दिले.

२६ मार्च
जन्मदिवस : कवी रॉबर्ट फ्रॉस्ट (१८७४), अभिनेता, दिग्दर्शक धीरेंद्र नाथ गांगुली (१८९३), ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक महादेवी वर्मा (१९०७), विचारवंत, समीक्षक व सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे (१९३९), जीवशास्त्रज्ञ, लेखक रिचर्ड डॉकिन्स (१९४१), गूगलचा सहनिर्माता लॅरी पेज (१९७३)
मृत्युदिवस : संगीतकार लुड्विग फान बेथोवन (१८२७), असमिया साहित्यिक लक्ष्मीनाथ बेझबरुआ (१९३८), एच.पी.चा सहनिर्मिता डेव्हिड पॅकार्ड (१९९६), चित्रकार के.के.हेब्बार (१९९६), गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया (१९९७), कन्नड साहित्यिक डॉ. शांतिनाथ देसाई (१९९८), कवी ग्रेस उर्फ माणिक गोडघाटे (२०१२)

---

स्वातंत्र्यदिन : बांगलादेश (१९७१)

१४९४ : इसापनीती इंग्लिशमध्ये छापली गेली.
१९१० : किर्लोस्करवाडीची स्थापना
१९३४ : यूकेमध्ये ड्रायव्हिंग टेस्टची सुरूवात.
१९७१ : पूर्व पाकिस्तानने पाकिस्तानपासून स्वातंत्र्य घोषित केल्यामुळे बांगलादेश मुक्ती युद्धाला सुरुवात.
१९७२ : पहिल्या आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषदेचे उद्घाटन.
१९७३ : गौरा देवींच्या नेतृत्त्वाखाली हिमाचलमध्ये चिपको आंदोलनाची सुरुवात.
१९७५ : जैविक अस्त्र करार अंमलात आणण्याची सुरुवात.
१९७९ : अन्वर सादात, मेनाचेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी इस्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.
१९९५ : शेनगेन करार प्रत्यक्षात आणायला सुरुवात.
२००० : ज्यूंच्या वंशविच्छेदाबद्दल (हॉलोकॉस्ट) पोपने माफी मागितली.

२७ मार्च
जन्मदिवस : क्ष किरणांचा जनक विल्हेम राँटजेन (१८४५), रॉल्स-रॉईसचा सहनिर्माता हेन्री रॉईस (१८६३), अभिनेत्री ग्लोरिया स्वान्सन (१८९९), सिनेदिग्दर्शक क्वेंटिन टारांटिनो (१९६३), गायिका मरायाह कॅरी (१९७०)
मृत्युदिवस : कवी, म्हैसूरचा महाराजा तिसरा कृष्णराज वाडियार (१८६८), शिक्षणतज्ज्ञ सय्यद अहमद खान (१८९८), पहिला अंतराळवीर युरी गागारीन (१९६८), चित्रकार एम. सी. एशर (१९७२), लेखक शरच्चंद्र चिरमुले (१९९२), रंगभूमी गायक-अभिनेता भार्गवराम आचरेकर (१९९७), दिग्दर्शक बिली वाईल्डर (२००२), एमाराय यंत्रासंदर्भात मूलभूत संशोधन करणारा नोबेलविजेता पॉल लॉटरबर (२००७)
---
जागतिक रंगभूमी दिवस
१८९३ : केशवसुतांनी 'तुतारी' ही कविता लिहिली.
१९७७ : भीषण विमान दुर्घटनेत तेनेरीफे बेटांवर दोन बोईंग ७४७ ची टक्कर, ५८३ ठार.
१९९८ : वायग्राला FDAने लिंगोद्दीपनासाठी औषध म्हणून मान्यता दिली.
२००० : कोर्टनी वॉल्शने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त बळींचा विक्रम प्रस्थापित केला.
२००४ : नासाने चालकरहित विमानाची निर्मिती केली.

२८ मार्च
जन्मदिन: पहिलं चित्रात्मक पाठ्यपुस्तक बनवणारा शिक्षणतज्ञ योहान कोमोनियस (१५९२), साहित्यिक मॅक्सिम गॉर्की (१८६८), भारतात स्त्रीवादी अभ्यासाची सुरूवात करणाऱ्या वीणा मजुमदार (१९२७), प्रोटॉनची अंतर्रचना शोधणारा नोबेलविजेता जेरोम फ्रीडमन (१९३०), अभिनेता अक्षय खन्ना (१९७५), अभिनेत्री चित्रांगदा सिंग (१९७६),
मृत्युदिवस: लेखिका, समीक्षक व्हर्जिनिया वूल्फ (१९४१), स्वातंत्र्य चळवळीतील पुढारी भाऊसाहेब रानडे (१९८४), चित्रकार मार्क शगाल (१९८५), 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप'चे एक प्रणेते, चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा (२००२)

---

राष्ट्रीय नौका दिन.

१७३७ : बाजीराव पेशवे यांनी मोगलांचा पराभव केला
१९१० : हेन्री फाबरने प्रथमच समुद्रावरून विमान उडवलं.
१९३० : काँस्टँटिनोपल आणि अंगोरा या तुर्की शहरांची नावं इस्तांबूल आणि अंकारा अशी बदलण्यात आली.
१९३३ : घातपातामुळे विमान पडण्याची पहिली दुर्घटना, प्रवाशाने विमानात आग पेटवल्यामुळे इंपिरियल एयरवेजचं विमान पडलं.
१९४२ : भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जपानमध्ये 'इंडियन इंडिपेडन्स लीग'ची स्थापना; त्यात 'आझाद हिंद सेने'ची मुळं होती.
१९५९ : चीनने तिबेटी सरकार बरखास्त करून तिबेट बळकावलं.
१९७९ : अमेरिकेत 'थ्री-माईल आयलंड' अणूदुर्घटनेत अणूइंधन अंशतः वितळलं, किरणोत्सारी रेडॉन वायू पसरला, जीवितहानी नाही.
१९९८ : सी-डॅकने पूर्ण भारतीय बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.

२९ मार्च
जन्मदिवस : 'वॉलमार्ट'चा जनक सॅम वॉल्टन (१९१८), अॅस्पिरीनचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन व्हेन (१९२७), अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार उत्पल दत्त (१९२९)
मृत्युदिवस : चित्रकार जॉर्ज सरा (१८९१), दिग्दर्शिका आन्येस वार्दा (२०१९)
---
---
१८४९ : ब्रिटिशांनी पंजाब आपल्या साम्राज्याला जोडून घेतले.
१८५७ : ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडून मंगल पांडेने १८५७च्या लढ्याला सुरुवात करून दिली.
१८७८ : वृत्तपत्रकारांची परिषद मुंबईत सुरू झाली.
१८८६ : जॉन पेंबरटनने पहिले कोकाकोला बनवले.
१९७३ : अमेरिकेने व्हिएतनाममधून सैन्य मागे घेतले.
१९७४ : नासाचे मरिनर-१० हे बुधाच्या जवळून जाणारे पहिले यान ठरले.
१९९९ : उ. प्रदेशातील चमोली जिल्ह्यात भूकंपात १०३ जणांचा मृत्यू.
२०१४ : इंग्लंड आणि वेल्समधले पहिले समलिंगी लग्न.

३० मार्च
जन्मदिवस : चित्रकार फ्रान्सिस्को गोया (१७४६), चित्रकार व्हिन्सेंट फॅन गॉ (१८५३), साहित्यिक शरदिंदू बंदोपाध्याय (१८९९), लेखक वसंत आबाजी डहाके (१९४२), गायक व संगीतकार एरिक क्लॅप्टन (१९४५), गायिका सेलीन डिआँ (१९६८), दिग्दर्शक, पटकथाकार अभिषेक चौबे (१९७७), गायिका, संगीतकार नोराह जोन्स (१९७९)
मृत्युदिवस : सरदार मुरारबाजी देशपांडे (१६६५), कोळशापासून कृत्रिम इंधन बनवणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक बर्गियस (१९४९), संप्रेरक कॉर्टिझोन आणि त्याचा आर्थ्रायटीससाठी उपयोग शोधणारा नोबेलविजेता फिलिप हेंच (१९६५), चित्रकार रघुवीर मुळगावकर (१९७६), चित्रकार एस. एम. पंडित (१९९३), पोर्शं कंपनीचे संस्थापक फर्डिनांड पोर्शं (१९९८), चित्रपट गीतकार आनंद बक्षी (२००२)
---
१८४२ : इथर ॲनास्थेशियाचा पहिला वापर.
१८९९ : जर्मन रसायनशास्त्र समितीने जगातल्या इतर संस्थांना अणूंची वजने निश्चित करण्यासाठी आमंत्रणे पाठवली.
१९३९ : डिटेक्टिव्ह कॉमिक्स क्र २७ मध्ये बॅटमॅनचा जन्म.

३१ मार्च
जन्मदिवस : गणितज्ञ, तत्त्वज्ञ रेने देकार्त (१५९६), संगीतकार योहान सबास्टीयन बाख (१६८५), लेखक निकोलाय गोगोल (१८०९), मराठी संगीत नाटकांचे प्रवर्तक बलवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर (१८४३), पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी (१८६५), क्ष-किरणांचे विकीरण शोधणारा नोबेलविजेता विल्यम ब्रॅग (१८९०), लेखिका, कवयित्री कमला दास सुरैय्या (१९३४), 'ट्विटर'चा सहनिर्माता इवान विल्यम्स (१९७२), पंधराव्या वर्षी बुद्धिबळ ग्रँडमास्टर झालेली कोनेरू हंपी (१९८७)
मृत्युदिवस : भौतिकशास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन (१७२७), इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत पारसनीस (१९२६), रक्त, पित्त, क्लोरिफिलमधल्या रंगद्रव्याचा अभ्यास करणारा नोबेलविजेता हान्स फिशर (१९४५), अभिनेत्री, कवयित्री मीनाकुमारी (१९७२), न्यूट्रॉन विखरण्याचा अभ्यास करणारा नोबेलविजेता क्लिफर्ड शल (२००१), चित्रकार, कलादिग्दर्शक गणपतराव वडणगेकर गुरुजी (२००४)
---
१८६७ : मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना.
१८८९ : आयफेल टॉवरचे अधिकृत उद्घाटन.
१९०९ : टायटॅनिक जहाजाच्या बांधकामाला सुरुवात.
१९२७ : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.
१९४२ : हिन्दी स्वातंत्र्य संघाची स्थापना झाली.
१९५९ : चीनने तिबेट गिळल्यामुळे दलाई लामांनी चालत भारतीय सरहद्दीमध्ये प्रवेश केला.
१९६६ : रशियाने पहिला मानवनिर्मित उपग्रह ‘ल्युना १०’ अवकाशात सोडला.
१९५५ : पक्षशिस्तीच्या नावाखाली चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षातून बंडखोर विचारांच्या लोकांची हकालपट्टी.
१९९४ : ऑस्टलोपिथेकस आफरेन्सिस या मानवांची पहिली संपूर्ण कवटी इथियोपियामध्ये सापल्याची घोषणा करण्यात आली.
२००१ : फलंदाज सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेट प्रकारामध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या.