वासेपूर

आत्ता पहायला मिळाला.

गँग्ज ऑफ वासेपूर पाहताना त्यातील अनेक गोष्टी आपण प्रथमच पहात नसलो तरीही अंगावर येतात. शिवराळ बोली भाषा आणि मॅटर ऑफ फॅक्ट व्हायलन्स अनेक सिनेमांमधून पहायला मिळतो. वासेपूरचे ते काही यूएसपी नाही. प्रकाश झाच्या अपहरण, गंगाजल मधून व्यवस्था, गुन्हेगारी, राजकारण यांचे पद्धतशीर आकलन करवून देणारे दर्शन घडते. वासेपूर त्या बाबतीतही काही अगदी वेगळा, उठून दिसणारा किंवा पहिलाच सिनेमा नाही. कथानक म्हणाल तर खानदानी दुश्मनी, रोमिओ जुलिएट स्टाइलचे दुश्मन खानदानांतील प्रेमप्रकरण, माफिया धंदापद्धती या गोष्टीही नव्या नाहीत. अनेकानेक हिंदी सिनेमांच्या कथानकांमध्ये वासेपूरमधील प्रत्येक गोष्ट येऊन गेलेली आहे. त्यातही नवीन काहीच नाही. गॉडफादरच्या कथानकाची भ्रष्ट नक्कल असलेला सरकार असो, की सत्या-कंपनीसारखे, सेहर सारखे वास्तवाच्या जवळ जाऊन थेट शैलीत माफिया अंडरवल्ड दाखवणारे सिनेमे असोत - कथेत किंवा सादरीकरणातही "प्रथमच आपल्या शहरात" असलाही प्रकार नाही. असे असतानाही हा सिनेमा मला "हाँटिंग" वाटला. स्टाइल नवीन नाही; कथानक नवीन नाही. मग नवीन आहे तरी काय?

विशेष आहे आकलन, आणि ते आकलन सादर करण्याची शैली यांचा सुरेख संगम. कथानक घोटाळते मायक्रोलेव्हलवर. धनबाद - वासेपूर भागातील स्थानिक माफियागिरी - राजकारण. पण पट प्रचंड व्यापक आहे. पूर्व भारतातील म्हणा, किंवा एकंदरच भारतातील म्हणा, गव्हर्नन्स (फॉर दॅट मॅटर अ‍ॅबसेन्स ऑफ गव्हर्नन्स) वर हा सिनेमा म्हणजे एक जबरदस्त टिप्पणी आहे. ज्या कुणी आपली कायदा आणि न्यायव्यवस्था आणि त्यासंदर्भात राजकारण थोडे जवळून पाहिले आहे त्याला या सिनेमा निर्मात्यांच्या आकलनाचे कौतुक वाटल्याखेरीज राहणार नाही.

इतिहासाचे पद्धतशीर संदर्भ देत स्वातंत्र्यपूर्व काळापासून सद्य काळापर्यंतचा पट हे कथानक व्यवस्थित गोंधळ न घालता उलगडत नेते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून राजकारण, पोलीस, माफिया, सामाजिक उतरंड - सगळे खाडकन असे समोर येते. अन्स्टेटेड नॅरेशन - न सांगता बरेच काही सांगायचे, आणि तेही निष्कर्ष न काढता - हे या सिनेमाला उत्तम साधलेले आहे.

शाहिद पठाण डकैती सोडून बायकोला वचन दिल्याप्रमाणे इमानदारीत कोळशाच्या खाणीमध्ये मजूरी करु लागतो. आपल्यावरचा अन्याय सहन न होऊन तिथल्या खाणमालकाच्या पैलवानाचा तो मालकासमक्ष खून करतो. बेरकी मालक त्यालाच आपला पैलवान बनवतो, आणि आपली खाण चालवू लागतो. मजूरांना दम देणार्‍या शाहीदला एक मजूर म्हणतो, भाई तू तर आमचाच...तर त्याला शाहीद खाड्कन मुस्काटात ठेऊन देतो. शाहीदचा भाऊ फरहान त्याला म्हणतो, हे गरीब मजूर तर आपलेच सगे. त्यांच्या जमिनी हिसकाऊन घ्यायच्या, त्यांना वेठीला धरायचे हे तुला योग्य वाटते का? शाहीद उत्तरतो, यहाँ कोई किसीका सगा नही होता. बास. एका क्षणात राष्ट्रीय नेत्यांच्या भाबड्या समाजवादाच्या चिंध्या. चिंध्या अशासाठी की पंडीतजींचे "ट्रिस्ट विथ डेस्टिनी"चे शब्द अजून विरलेलेही नाहीत. हे असले खाणमालक, आणि त्यांचे पैलवान म्हणजे ग्रासरुटमधून येणारे लोकशाहीतील नेतृत्व. आपल्या देशातील राजकारणाची "हळूहळू" अधोगती होत गेली असे समजायचे काही कारण नाही. कधी कधी वाटते, आपल्या घटनाकारांनी ज्या न्याय समता बंधुता इत्यादि उदात्त विचारांवर आधारीत व्यवस्थेची मांडणी केली, ती नको तेवढी भाबडी तर नाही? लोकशाहीच्या आदर्श स्वप्नापुढे आपण कायदा सुव्यवस्था, न्यायव्यवस्था यांचा बळी तर दिलेला नाही? ज्या समाजामध्ये बळी तो कान पिळी हे तत्व सत्य म्हणून स्वीकारले गेले आहे, नाईलाज म्हणून नव्हे; तर वास्तव म्हणून, मूलभूत धारणा म्हणून, त्या समाजावर फ्रेंच राज्यक्रांतीतून निघालेले आणि मॅग्नाकार्टापासून विकसित होत असलेले युरोपियन सिद्धांत आपण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी सरळ सरळ थोपून दिले. एखाद्या जुन्या भिंतीला वरवर गिलावा द्यावा तसे. त्याचे पद्धतशीर पोपडे पडताना आपल्याला वासेपूरमध्ये दिसतात. इंग्रज निघून गेले, आणि खाणवाटपाची बंदरबाँट चालू झाली. इंग्रज मजूर ठेवायचे, पण छत द्यायचे, हमारी वो औकात नही थी...असे आपल्याला निवेदक फरहान सांगतो. त्या पार्श्वभूमीवर शाहीद पठाण मजूरांच्या झोपड्या जाळताना आणि त्यांना खाणीसाठी हुसकावून लावताना दिसतो. याला सामाजिक परिस्थिती म्हणायचे की राजकीय परिस्थिती, की गवर्नन्सचे अपयश म्हणायचे हे बघणार्‍याने ठरवावे.

माफियागिरी अर्थात संघटित गुन्हेगारी म्हणजे केवळ पोटे भरण्याचे साधन नसून सत्ताकारणाचा एक अविभाज्य अंग आहे. आता सत्ताकारणाच्या सोयीसाठी गुन्हेगारी; की गुन्हेगारी धंद्यांच्या सोयीसाठी सत्ताकारण हे वेगवेगळ्या परिस्थितीनुसार ठरेल. वासेपूरमध्ये आपल्याला दुसरा प्रकार पहायला मिळतो. विधायक रामधारी सिंग हा मुळात ठेकेदार, खाणमालक, आणि आपल्या व्यावसायिक हितांना जपण्यासाठी सत्ताकारण करणारा. धान्याने भरलेल्या ट्रेन लुटणारे कुरेशी, पठाण हे मुळात वाटमारी करुन पोटे भरणारे. पण गव्हर्नन्सच्या अभावी सत्तेची आणि नेतृत्वाची पोकळी भरुन काढून आपापल्या भागातील सत्तेची सूत्रे हातात ठेवणारे. मोहर्र्मच्या छाती पिटण्याच्या उन्मादक विधीत कुरेशी मंडळी मग्न असताना वासेपूरमध्ये अगदी निवांतपणे सरदार पठाण मोटरसायकलवरुन आपल्या भावासोबत फिरत कुरेशांच्या घरां-दुकानांवर गावठी बाँम टाकत फिरतो. कसायांचे सुरे घेऊन अगदी थंड डोक्याने एकेकाला धरुन खाली पाडून मारुन अक्षरशः खांडोळी करतात. बारीक बारीक तुकडे करुन शव नाहीसे करतात. या प्रकाराला केवळ गुन्हेगारी म्हणताच येत नाही. हे तर सत्ताकारण. स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा संघर्ष. आणि येथे कायद्याच्या राज्याला स्थान नाही. या सर्वांची ऐतिहासिक मुळे शाहीद पठाणाच्या इंग्रजी काळात ट्रेन लुटण्याच्या "पेशा"पासून आपल्याला हा सिनेमा दाखवतो. कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण करुन प्रशासक नेमला जातो. त्या कोल इंडियाच्या अधिकार्‍याचा सिंग मंडळींना ताप होऊ लागतो, तर त्याला सरळ कापून काढतात. ही केवळ गुन्हेगारी नव्हे. निव्वळ माफियागिरीही नव्हे. कारण ही कापाकापी करणारा रामाधीर सिंग आमदार होतोय. मंत्री होतोय. एस्पीला हाताशी धरुन डोके वर काढणार्‍या सरदार पठाणाला चेपू पाहतोय. स्वतःच्या धंद्यासाठी सत्ता राबवतोय.

एका अर्थाने ही सध्याच्या राजकारणावरील टिप्पणी आहे. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा (़किंवा गुन्हेगारीच्या राजकियीकरणाचा) हा प्रकार केवळ बिहारपुरता मर्यादित होता, आणि नंतर सगळीकडे पसरला असे काही नाही. टगेगिरीचे राजकारण हा शब्दप्रयोग महाराष्ट्रात अलीकडे आला असला, आणि "इलेक्टिव्ह मेरिट" च्या नावाखाली भाई ठाकूर्स आणि पप्पू कलानीजना काँग्रेससारख्या पक्षाने तिकीटे देणे हे प्रकार नव्वदीच्या दशकानंतर प्रचंड वेगाने देशभर (आणि सर्व पक्षांमध्ये) फोफावले असले तरी स्थानिक राजकारण हे कायमच टग्यांच्या हातात होते. थिंकिंग पॉलिटिशियन (प्लेटोचा फिलॉसफर किंग) हे अगदी वरच्या पातळ्यांवरच मर्यादित राहिले. पंडित नेहरु म्हणा, किंवा यशवंतराव चव्हाण म्हणा. आता तर त्या पातळीवरही वासेपुरी राजकारण स्थिरावत चालले आहे. वासेपूरमध्ये राजकारणाचा हा प्रकार थेट सामोरा येतो.

वासेपुरचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सिनेमातील पात्रे आपल्याला त्यांच्या विचारांची मीमांसा त्यांच्या संवादांमधून सांगत बसत नाहीत. अनस्टेटेड नॅरेशन. "हमारे धंदेमे डर रहना जरुरी है" असली फिलॉसफी समजावणारी वाक्ये नाहीत. ही शैली भिडणारी आहे. तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडरमध्ये ही शैली दिसली होती. सखाराम असे का वागतो, चंपा असे का वागते - याची स्पष्टीकरणे/ अंदाज कुठेही कुणाच्याही संवादांमध्ये येत नाहीत. धिस स्टाइल ऑफ नॅरेशन मेक्स द शो हाँटिंग. (तरी नाटक माध्यमाच्या मर्यादांमुळे सखाराम स्वतःविषयी बरेच काही बडबडतो. सिनेमा माध्यमाला तेवढ्याचीही गरज नाही.)

चित्रपट पाहून मूळ कादंबरी वाचायची उत्सुकता लागून राहिली आहे. बिमल मित्रांच्या साहेब बिबी गोलाम या कादंबरीचा पट असाच विशाल आहे (त्यावरचा सिनेमा हा त्या कादंबरीची थट्टा आहे). हा सिनेमा एक सबंध कालखंड उजळून टाकणारा आहे. आपल्या आकलनातील कच्चे दुवे सांधणारा आहे. बाकी चित्रपटातील तांत्रिक बाबींविषयी अज्ञान असल्याने मौन बाळगतो. सिनेमातील सगळेच आवडले, संगीत विशेष आवडले, हे आवर्जून नमूद करतो. कथानकाची ताकदच एवढी जबरदस्त आहे की सादरीकरण कसलाही सिनेमॅटिक इफेक्ट न वापरता केले तरी प्रभावी ठरते. छोटे छोटे कमी कालखंडांचे अनेक तुकडे करुन एकेक प्रसंग रंगवला आहे. त्यामुळे सिनेमात वेग प्रचंड राहतो, आणि कंटाळा येत नाही.

थोडक्यात - मस्ट वॉच.

पोस्ट स्क्रिप्ट - या ब्लॉगवर या चित्रपटावर अतिशय वाचनीय लेख आहे, बिशेषकरुन या चित्रपटात बारकाईने दाखवलेल्या सामाजिक दैनंदिन व्यवहारांच्या चित्रणाविषयी, लोकसंगीताच्या बाजाने दिलेल्या संगीताविषयी.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

सुरेख परिचय. पहायला केंव्हा मिळेल माहीत नाही पण आपण लिहिलेले परिक्षण वाचून कुतुहल जागे झाले आहे. आभार.
दुसरया एका धाग्यात चिंजंनी परिक्षणाच्या मूल्याबद्दल,

<< परीक्षण करताना १) संदर्भचौकट पक्की हवी, २) दिलेल्या द्रव्याचं (मटीरिअल*) पृथक्करण करून त्यात डावंउजवं करता यायला हवं आणि ३) परीक्षण वाचणारा माणूस पुस्तक वाचावं की वाचू नये याचा निर्णय करू शकेल इतपत सामग्री त्यात असावी. म्हणजे निव्वळ 'मला हे आवडलं' किंवा 'हे जमलेलं नाही' असे शेरे नकोत, तर त्यांना ठोस मुद्द्यांचा आधार हवा. 'पुस्तक वाचू नये' असा परीक्षणवाचकाचा अखेर निर्णय झाला तरी हरकत नाही; पण परीक्षणामुळे त्या पुस्तकाविषयीच्या किंवा लेखकाविषयीच्या किंवा पुस्तकविषयाविषयीच्या वाचकाच्या दृष्टीत काही भर पडली तर ते उत्तम.>>

असे म्हटले होते. आपले परिक्षण वाचून त्यातल्या सगळ्या मुद्दयांसमोर टिकमार्क केली गेली आहे असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका अर्थाने ही सध्याच्या राजकारणावरील टिप्पणी आहे.

तुमची टिप्पणी आवडली, पण हेच अनुरागला म्हणायचं होतं असं मात्र दुसरा भाग बघितल्यावर वाटत नाही.

वासेपुरचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सिनेमातील पात्रे आपल्याला त्यांच्या विचारांची मीमांसा त्यांच्या संवादांमधून सांगत बसत नाहीत.

पात्रं सांगत नसली तरी फरहानचं नॅरेशन हे पात्रांबद्दल व सिनेमाबद्दल कायमच सांगत असतं, बहूदा गोष्ट पाहण्यापेक्षा एकतोय असचं बर्‍याचवेळेला वाटावं एवढ नॅरेशन आहे, पण ते नॅरेशन किंवा फरहानचा आवाज कुठेच त्रासदायक होत नाही. "धिस स्टाइल ऑफ नॅरेशन मेक्स द शो हाँटिंग." सहमत.

भाग १ बरा आहे, बराच परिणामकारक आहे, विस्तृत कथेचा एक भाग वाटतो पण लगेच अपेक्षाभंग होतो कारण भाग २ बराचसा अनावश्यक व फिल्मी वाटत रहातो, तुम्ही भाग २ पाहिला आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अफाट आहे लेख. जवळ जवळ सिनेमाइतकाच परिणामकारक. फार आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

रुची, मेघना - आभारी आहे.

मी - हा लेख लिहिला तेंव्हा दुसरा भाग पाहिला नव्हता. नुकताच दुसराही भाग पाहिला. माझ्या मतामध्ये फरक पडला नाही. मुळात हा दुसरा भाग नसून एकाच सलग सिनेमाचे केवळ प्रेक्षकांच्या (आणि थेटरांच्या) सोयीसाठी केलेले विभाजन आहे. ओढून ताणून बनवलेला दुसरा भाग नाहीये. एक सलग कालखंड पुढे सरकतोय. नवीन काळासोबत शस्त्रे आधुनिक होतायत - रक्तपात अधिक सोपा होतोय; व्यवस्था तशीच माफियांची बटीक आहे. पेजर येतोय, मोबाइल येतोय. बच्चनच्या जागी संजय दत्त येतोय; पण इसेन्शियली सारे तसेच आहे. सरदार वासेपूरमध्ये गावठी बॉम फेकत फिरत होता तेंव्हाही पोलीस मूकनायक होते, आणि सरदारचा तोंडात ब्लेड ठेऊन दुकाने लुटणारा मुलगा (पर्पेण्डिक्युलर) देखील पोलीसांना भीक घालत नाहीये. दुसर्‍या भागात बर्‍याच अनस्टेटेड गोष्टी स्पष्ट होतायत. पहिल्या भागात पोलीस कमी दिसतात. नंतर थोडे अधिक दिसतात. मंत्री बनलेला रामधारी वासेपुरी माफियांना वेसण घालण्यासाठी थोडी धमक असणारा फौजदार धनबादमध्ये आणतोय. स्वतःचा प्रभाव वापरुन डेफिनेटला आपल्या सोयीच्या जेलमध्ये हलवतोय...फैजलसारख्या अडाणी गुंडांना धंद्यातले काही कळत नाही हे जाणून धंदा, ऑक्शन जाणणारी शिकलेली मंडळी त्याच्याभोवती पेरतोय...शाहीदच्या काळातील क्रूड गुंडगिरी थोडी थोडी कॉम्प्लेक्स होत चाललीय. पण ऑटोमॅटिक वेपन्स हातात येऊनही मेंदू आदिमानवाचाच राहिलेले सुलतान, फैजल हे अजून मुडदे पाडण्याचाच संघर्ष करत राहतायत. रामधारी डोक्याने त्यांना कंट्रोल करु पाहतोय - स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी. फैजल स्वतःच राजकारणात येतोय. रामधारीला सरळ टक्कर देतोय. "आता मी निवडणूक जिंकलो तर या सगळ्या लफड्यात अजूनच फसत जाईन" अशी मनमोकळी कबुली आपल्या बायकोजवळ देत रडतोय- माफियेगिरीचे लॉजिकल कन्क्लूजन राजकारणच आहे हे ठळकपणे अधोरेखीत करतोय. या भीषण हाणामारीमध्ये व्यवस्था पक्षाघाताने पांगळी झाल्यासारखी असल्याने शेवटी निष्कर्ष काय निघणार कप्पाळ. याची गोळी त्याला. आणि त्याला अजून तिसर्‍याची गोळी.

सगळाच सिनेमा अडीच तासांत बसवता आला असता तर प्रचंड परिणाम झाला असता हे मात्र खरे. दुसरा भाग पाहताना 'हे एवढा वेळ दाखवायची काय गरज होती' असे वाटत राहते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"प्रथम तुज पाहता" असे वाटणे सहाजिक आहे, पण मूळ गॉडफादर किंवा/व सिटी ऑफ गॉड वर बेतलेला वासेपुर तेवढा सेन्सिबल वाटत नाही, पहिल्या भागाच्या परिणामकारकतेपासून दूर नेणारे प्रसंग व पात्र दाखवण्याचा मोह अनुरागला का पडावा असा प्रश्न पडतो. पर्पेन्डिक्युलर/डेफिनेटशी निगडीत बरेच प्रसंग अनावश्यक वाटतात, ते व तत्सम टाळून व बराचसा रक्तपात टाळून सिनेमा अधिक परिणामकारक झाला असता असं माझं मत आहे.

सगळाच सिनेमा अडीच तासांत बसवता आला असता तर प्रचंड परिणाम झाला असता हे मात्र खरे. दुसरा भाग पाहताना 'हे एवढा वेळ दाखवायची काय गरज होती' असे वाटत राहते.

ह्याच्याशी मात्र अगदी सहमत.

* तिग्मांशूचे सिनेमातले नाव रामाधीर आहे, तुम्ही बहूदा टायपोने रामधारी लिहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गॉडफादर किंवा सिटी ऑफ गॉड वर कुठल्या एखाद्या प्रदेशाची मक्तेदारी नाही. युनिवर्सल फेनॉमिनन आहे. कुठेही घडू शकते असे कथानक. वासेपूरसारख्या ठिकाणी तर नक्कीच.

बाकी रामाधीर. येस. माय मिस्टेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'वासेपूर' पाहिला. नुसतीच तिखट म्हणून म्हणून चविष्ट असा गाजावाजा असलेली एखादी बेचव मिसळ खावी आणि मळमळत राहावे, पण तोंड बाकी फक्त तिखटाने हुळहुळावे तसे झाले. चित्रपटातील रक्तपात आणि हिंसाचार याशिवाय काहीच लक्षात राहिले नाही. अगदी नवाजुद्दीन सिद्दीकीसुद्धा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

पुन्हा एकदा पाहिला आणि यावेळी खूप आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंत टाकावू अशा गटात टाकायच्या लायकीच्या एखाद्या कलाकृती {कलाकृती तर कशासाठी म्हणायचे ?} बाबत कुणी तिची भलावण करत असेल तर तो त्या व्यक्तीचा नक्कीच अधिकार आहे हे जरी मान्य केले जात असेल तर ती भलावण करणारी व्यक्ती दुसर्‍या अन्य कारणासाठी इतरांच्या कौतुकास्/आदरास पात्र असेल तर मग ती भलावण काहीशी खुपतेच.....'वासेपूर' चे वरील परिक्षण वाचताना मन विषण्ण झाले हे आग्रहपूर्वक नमूद करीत आहे....त्यातही तीव्रतेने बोचलेली बाब म्हणजे आ.रा.सरांनी लेखाचा 'मस्ट वॉच' या फ्लॅगने केलेला शेवट.

चित्रपटाची सुरुवातच अशी की, दुसर्‍या महायुद्धात जर्मनीने दोस्तांचे वा दोस्तांनी जर्मन सैन्य मारण्यासाठी जितक्या गोळ्या सोडल्या नसतील तितक्या गोळ्या अथक अशा मशिनगनमधून एका घरातील कुटुंबाला खत्म करण्यासाठी सोडल्या जातात....हरेक वस्तूची अक्षरशः चाळण....गोळ्यांच्या वर्षावातही मोकाटपणे तोंडातून बाहेर पडणारा तो अक्रालविक्राळ आणि अत्यंत बिभत्स शिव्यांचा ओघ. डोके भणाणून जात असताना....मग कश्यपराव तीन पिढ्यांची 'वाट' लावत राहतात. काय बोध घ्यायचा असल्या चित्रपटातून सर्वसामान्यांनी ? होय, माहीत आहे आम्हाला...या देशातील कित्येक राजकीय नेत्यांची जडणघडण असल्या मुशीतच तयार झाली आहे....हे दाखवायला अजून किती चित्रपटांची आणि कशासाठी गरज आहे या समाजाला ? बरे, झाले दाखवून...म्हणून काय आम्ही उद्या मतदानाला बाहेर पडायचे नाही ? या देशाने 'लोकशाही' च्या वाटचालीसाठी जो मार्ग स्वीकारला आहे त्या मार्गावर साव जसे येणार तसे चोर येणारच...त्याला कोण अटकाव करेल ? अटकाव करणारा 'मतदार राजा' आहे, त्याला आपल्या हाताखाली घेणारी प्रत्येक व्यक्ती 'वासेपूर' मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या विधायकासारखीच असेल ?

मनोजने साकार केलेली व्यक्तीरेखा ! काय दाखविते रंगरंगोली हे पात्र ? बापाच्या हत्येचा बदला घ्यायचा आहे म्हणे या श्रावणबाळाला. ठीक आहे....मग याचा बाप म्हणजे कुणी दशरथ होता की लाला लजपतराय ? तोही असाच एक दोन पैशाचे मटण आणि दोन पैशाची दारू यावर गोरगरीब मजुरांच्या माना मुरगाळणाराच होता ना ? मग, त्याचाही तशाच परंपरेत खातमा होणार हे सांगायला कुठल्या हिरव्या पोपट ज्योतिषाची गरज आहे ? हा पुत्रही त्याचाच मार्ग चोखाळल्याचे दाखविताना मग तशाच शिव्या....तोच हिंस्त्रपणा....तोच बाईच्या मागे लागण्याचा सोस....पत्नी मुलेबाळे असूनही दुसरीकडे एक मस्त रखेलही हवीच....अशी रंगल्या रात्रीमध्ये हा पठ्ठ्या बदला घेणार ? छ्या !!

पुढे याचा मृत्यूही थेट "गॉडफादर" मधील सॅन्टियानोच्या धर्तीचा....तोच प्रसंग कॉपी पेस्ट करायचा असेल तर मग त्या ठिकाणी अनुराग कश्यपच कशाला हवा...त्याचा क्लॅपर बॉयही चालला असता. कॉपीत बदल काय ? तर सोनीचा मृत्यू टोल नाक्यावर पावती करताना, तर मनोजचा पेट्रोल पंपावर......ह्याने एक गोळी झाडली की समोरच्याने तत्क्षणी 'राम' म्हटले पाहिजे हा आग्रह, मात्र याच्यावर सहा हत्यारांच्या अत्याधुनिक पिस्तूल मशिनगन्स मधून गोळ्यांचा पाऊस पडूनही पुढील अर्धा एक तास मनोजराव आपण म्हणजे जणू काही 'बाबू गेनू' वा 'भगतसिंग' असल्याचा आविर्भाव करत करत इंचाइंचाने वाटचाल करीत मोटार ते तो टांगाघोडा प्रवास करीत राहातात.....जोडीला खानविलकरताईंचे बॅकग्राऊंड म्युझिक आहे....एखाद्या देशभक्ताचा अंत दाखविण्याच्या तारेचे.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाटीलसाहेब, आपला मनमोकळा प्रतिसाद आवडला. ज्या शैलीत लिहिले आहे ते वाचताना हसूही आले, आणि आपली निराशा स्पष्ट जाणवली. आमचे एक सर एक मॉक इंटर्व्ह्यू घेताना एका उमेदवाराचा "सिनेमा पाहणे" हा छंद ऐकून असेच विषण्ण झाले होते, आणि अगदी अशाच शैलीत "हा काय छंद आहे काय" असे उद्वेगाने म्हणाले होते, त्यांचा चेहेरा समोर आला. (साम्य केवळ विषण्णतेचे, अपेक्षाभंगाचे, आणि निराशेचे. आणि प्रतिक्रियेचे!बाकी तुमची साहित्यातील आणि संस्कृतीमधील सखोल जाण आणि आमच्या त्या सरांचे एकसुरी सिंगल ट्रॅक माइंड यांची तुलना होऊ शकत नाही. असो.)

ती भलावण करणारी व्यक्ती दुसर्‍या अन्य कारणासाठी इतरांच्या कौतुकास्/आदरास पात्र असेल तर मग ती भलावण काहीशी खुपतेच.

नॉट फेअर. नॉट फेअर. लेट्स नॉट बी पर्सनल. वस्तुनिष्ठपणे (या) सिनेमाकडे, आणि (या) सिनेमाकडे पाहण्याच्या निरनिराळ्या दृष्टीकोनांकडे पाहूया. आणि ते दृष्टीकोन ठीक आहेत की कसे ते त्यानंतर पाहू. तुम्हाला माझे कौतुक वाटत असेल, आणि म्हणून मला काही अपेक्षांमध्ये बांधत असाल, तर ते अन्यायाचे आहे. (माझ्यावरही आणि पुअर डियर अनुरागवरही!)

काय बोध घ्यायचा असल्या चित्रपटातून सर्वसामान्यांनी ? होय, माहीत आहे आम्हाला...या देशातील कित्येक राजकीय नेत्यांची जडणघडण असल्या मुशीतच तयार झाली आहे....हे दाखवायला अजून किती चित्रपटांची आणि कशासाठी गरज आहे या समाजाला ?

१. लोकांनी बोध वगैरे घेतलाच पाहिजे असे काही नाही. कशाला घ्यायला पाहिजे बोध? बोध म्हणजे मी अशा अर्थाने म्हणतोय, की "अमुक अमुक करु नये/ करावे ब्वा". असला बोध घेणेदेणे - सिनेमातून- माझ्या मते मुळीच आवश्यक नाही. काहीतरी "जाणवले", "समजले" अशा अर्थाने बोध हा शब्द असेल, तर बोध घडवण्याच्या योग्यतेचा सिनेमा असेल, आणि खुल्या मनाने पाहिला सिनेमा तर होऊ शकतो बोध.
२. समाजाला काय गरज आहे - आणि अशा किती चित्रपटांची गरज आहे:- आपण असे समजू की नाही गरज. ठीक आहे. समाज नाही बघणार. नाकारील. म्हणून ज्याला सांगावेसे वाटतेय त्याने सांगूच नये की काय. हे पण नॉट फेअर. तुम्हाला सगळेच "पहिल्यांदा" सांगितलेले हवे आहे; परत परत सांगितलेले नको आहे. कसे काय शक्य आहे हो? हे सगळे जग रिपीटिशनच आहे. तेच ते आणि तेच ते. पुन्हा पुन्हा. काय नवीन आहे या जगात? प्रत्येक गोष्ट कुणीतरी पूर्वी सांगून गेलेले आहे. पण अनुभव घेणारे प्रत्येक मन प्रत्येक अनुभव घेताना स्वतःशी ताडून घेऊन ते रिपीटिशन स्वीकारत किंवा नाकारत असते. आता रामायण घ्या. (माझ्या बाबतीत, ऑफ कोर्स). मला त्या गोष्टीचा कंटाळा म्हणून येत नाही. केंव्हाही वाचायला घेतो. फार आवडते मला ती गोष्ट. दुसर्‍या एखाद्याला वाटेल काय माणूस आहे, किती वेळा ते खोटे आदर्श कथानक चघळत बसणार आहे? काय उपयोग आहे त्याचा या जगात? असे कधी होत असते काय? इत्यादि. कुणी त्यातून "अमुक करावे/ करु नये" असले बोध काढत बसेल. तर कुणी बोध वगैरे काढायच्या भानगडीत न पडता त्याचा आपल्या परीने आपल्या अनुभवांशी ताडून पहात काही ससंदर्भ अर्थ लागतो काय ते पाहील.

बरे, झाले दाखवून...म्हणून काय आम्ही उद्या मतदानाला बाहेर पडायचे नाही ? या देशाने 'लोकशाही' च्या वाटचालीसाठी जो मार्ग स्वीकारला आहे त्या मार्गावर साव जसे येणार तसे चोर येणारच...त्याला कोण अटकाव करेल ? अटकाव करणारा 'मतदार राजा' आहे, त्याला आपल्या हाताखाली घेणारी प्रत्येक व्यक्ती 'वासेपूर' मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या विधायकासारखीच असेल ?

असे का म्हणता? हा सिनेमा म्हणजे काही "जनहितमें जारी" सरकारी संदेश नाही. मतदान करा, करु नका. एक कथा सिनेमाच्या स्वरुपात दाखवली म्हणजे काही कुणाचे मतपरिवर्तन होणार नाहीये. प्रत्येकजण आपापल्या "अनुभवांवर" आधारीत मत बनवत असतो. एखाद्याला असल्या एखाद्या कथेत दाखवल्याप्रमाणे आला अनुभव, तर बदलेल त्याचे मत, किंवा बनेल त्याचे मत. ज्याला अतिरंजीत वाटेल, अवास्तव वाटेल, तो असल्या सिनेमाला टाकावू म्हणेल. ठीक आहे. काहीच हरकत नाही.

मनोजने साकार केलेली व्यक्तीरेखा ! काय दाखविते रंगरंगोली हे पात्र ? बापाच्या हत्येचा बदला घ्यायचा आहे म्हणे या श्रावणबाळाला. ठीक आहे....मग याचा बाप म्हणजे कुणी दशरथ होता की लाला लजपतराय ? तोही असाच एक दोन पैशाचे मटण आणि दोन पैशाची दारू यावर गोरगरीब मजुरांच्या माना मुरगाळणाराच होता ना ? मग, त्याचाही तशाच परंपरेत खातमा होणार हे सांगायला कुठल्या हिरव्या पोपट ज्योतिषाची गरज आहे ? हा पुत्रही त्याचाच मार्ग चोखाळल्याचे दाखविताना मग तशाच शिव्या....तोच हिंस्त्रपणा....तोच बाईच्या मागे लागण्याचा सोस....पत्नी मुलेबाळे असूनही दुसरीकडे एक मस्त रखेलही हवीच....अशी रंगल्या रात्रीमध्ये हा पठ्ठ्या बदला घेणार ? छ्या !!
पुढे याचा मृत्यूही थेट "गॉडफादर" मधील सॅन्टियानोच्या धर्तीचा....तोच प्रसंग कॉपी पेस्ट करायचा असेल तर मग त्या ठिकाणी अनुराग कश्यपच कशाला हवा...त्याचा क्लॅपर बॉयही चालला असता. कॉपीत बदल काय ? तर सोनीचा मृत्यू टोल नाक्यावर पावती करताना, तर मनोजचा पेट्रोल पंपावर......ह्याने एक गोळी झाडली की समोरच्याने तत्क्षणी 'राम' म्हटले पाहिजे हा आग्रह, मात्र याच्यावर सहा हत्यारांच्या अत्याधुनिक पिस्तूल मशिनगन्स मधून गोळ्यांचा पाऊस पडूनही पुढील अर्धा एक तास मनोजराव आपण म्हणजे जणू काही 'बाबू गेनू' वा 'भगतसिंग' असल्याचा आविर्भाव करत करत इंचाइंचाने वाटचाल करीत मोटार ते तो टांगाघोडा प्रवास करीत राहातात.....जोडीला खानविलकरताईंचे बॅकग्राऊंड म्युझिक आहे....एखाद्या देशभक्ताचा अंत दाखविण्याच्या तारेचे.
असो.

एखाद्या कथावस्तुकडे "तुम्ही" जसे पाहता तसेच अनुराग कश्यपने किंवा आळश्यांच्या राजाने पाहिले पाहिजे ही अपेक्षा गैर आहे. हे एक. आणि दुसरे म्हणजे, मनोजची व्यक्तीरेखा ही काही आदर्श घेण्याच्या लायकीची व्यक्तीरेखा आहे, तिचे अनुकरण लोकांनी करावे असा आव (मलातरी) सिनेमात कुठेच दिसला नाही. तो काही रामायणातील राम नाहीच आहे. हे आहे ते आहे. ही गोष्टच मुळात "असल्या" मंडळींची आहे. राम विरुद्ध रावण असा सामना नाहीच आहे मुळात. नो साइड्स टेकन. एक व्यक्तीरेखा केंद्रस्थानी ठेऊन कथानक फिरते त्याचा अर्थ असा नाही की ती व्यक्तीरेखा आदर्श आहे, किंवा त्या व्यक्तीरेखेचे गौरवीकरण केले गेले आहे.

प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संजोप राव व अशोक पाटील यांच्याशी संपूर्ण असहमत.

आपल्याला जे सवयीचे नाही, पटत नाही, आवडत नाही अशा अनेक गोष्टी जगात असतात. त्या गोष्टींचे प्रतिबिंब सिनेमातून पडणार, याचा इतका त्रास का व्हावा? आणि दरेक माध्यमातून काही बोधप्रद (पारंपरिक अर्थाने: सकाळी लवकर उठावे, वडीलधार्‍यांचा आदर करावा आणि तत्सम) कल्याणकारी संदेशच मिळाले पाहिजेत ही तरी काय जबरदस्ती आहे? अजून एक न सुटलेले कोडे - एखाद्या व्यक्तिरेखेचा बाप दशरथ किंवा लाला लजपतराय असेल, त-र-च त्याला सूडाची भावना मनात जागवण्याचे लायसन असणार आहे का? एक स्खलनशील माणूस म्हणून कुणी त्याची / त्याला त्या परिस्थितीपर्यंत पोचवणार्‍या समाजाची / व्यवस्थेची गोष्ट सांगता कामा नये, कारण त्यात फार बॉ रक्तपात, हिंसा, गटारगंगा आहे, शिवाय पूर्वसूरींचा प्रभावही आहे, ते आम्हांला सोसत नाही व पचतही नाही, तर त्याने सिनेमा काढू नये - हे काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आळश्यांच्या राजाशी आळस न दाखवता सहमती!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आ.रा.सर....नमस्कार.

तुमचा विस्तृत तसेच मूळ लेखाच्या पुष्ठ्यर्थ मांडलेल्या भूमिकेचा पाठपुरावा करणारा प्रतिसाद वाचला. मुद्द्यापुरता नवीन मुद्दा असे उत्तर न देता मी मुद्दाम 'चित्रपटातील हिंसाचाराची पातळी' या घटकाला केन्द्रस्थानी ठेवून हा विषय पुढे नेण्याचा प्रयत्न करतो.

वस्तुस्थिती अशी आहे की मी गेली ४०-४५ वर्षे 'सिनेमा' या विषयावर प्रेम केलेली व्यक्ती असून सर्जेई आईन्स्टीनच्या 'बॅटलशिप पोटेम्किन' [सन १९२५] सिनेसृष्टीतील लॅण्डमार्क समजल्या जाणार्‍या च्या चित्रपटापासून अगदी आजच्या अनुराग बसूच्या 'बर्फी' पर्यंतचे चित्रपट मी अव्याहतपणे पाहात आलो आहे. त्यामुळे चित्रपट सादरीकरणाबाबत माझ्या मताची एक पक्की अशी बैठक झाली आहे. विविध भाषांतील हजारो चित्रपट मी पाहिले आहेत, पण याचा अर्थ असा बिलकुल नव्हे की मी अगदी बाबुराव पटेल, रौफ अहमद, राजू भारतन वा गेला बाजार इसाक मुजावर यांच्यासारख्यांच्या पंगतीत बसून समीक्षा करण्याच्या पात्रतेचा झालो आहे. फक्त दिग्दर्शकाची चित्रपट कथानक हाताळणी योग्य झाली आहे की नाही यावर मात्र मी मत मांडू शकतो.

फरहान अख्तर, अनुराग कश्यप, अनुराग बसू अशी नावे सध्याच्या काळात चित्रपट निर्मात्यांना फार आश्वासक वाटात आहेत याचे गमक या युवांच्या शिदोरीत असलेली कल्पकता होय. कश्यपने "....विट्टोरीओ डी सिकाचा 'बाईसिकल थीफ' मी पाहिला आणि जीवनाकडे पाहाण्याचा माझा दृष्टिकोण पार बदलून गेला..." असे उदगार एका मुलाखतीत काढले होते, त्या क्षणापासून तो मला आवडत गेला. 'ब्लॅक फ्रायडे' ही तर सत्यघटनेवर आधारित निर्मिती....जिच्यामुळे कश्यपचे नाव चांगलेच गाजले, त्यानंतर त्याच्या 'देव डी.' आणि 'गुलाल' ने समीक्षकांना प्रेमात पाडले होते. अशा चित्रपटातील अनुराग आणि 'वासेपूर' मधील कश्यप यांचा मेळ बसत नाही. 'वास्तव' दाखवायचेच आहे तर मग ते 'सत्या' सारखे थेट दाखवावे [योगायोग म्हणजे 'सत्या' ची पटकथा अनुराग कश्यप याचीच होती]. तिथेही वासेपूरमधील नायक सरदारसदृश्य भिकू म्हात्रे आहेच आणि ज्याला नवनिर्वाचित आमदार डोळ्याचे पाते लवते ना लवते तेवढ्यात एका गोळीत यमसदनाला पाठवितो.....ही वास्तवता भावते. खुद्द सत्याचाही शेवट असाच चोळामोळ्याचा होतो. या दोन 'हीरों' च्या आयुष्याचे शेवट ज्यारितीने रामूने दाखविले होते ते प्रेक्षकाला अजिबात खटकत नाहीत कारण अशा प्रवृत्तीच्या किडीच नाशही असाच होणे हे एकूणच समाजाच्या दृष्टीने सुयोग्य ठरते. पण 'वासेपूर' मधील सरदाराचा मृत्यू म्हणजे या देशाचे जणू फार प्रचंड असे नुकसान होत आहे की अशा आविर्भावात कश्यपने तो प्रसंग चितारला आहे....त्याची काहीही जरूरी नव्हती. तुम्ही 'वास्तववादी' चित्रपट काढत आहात ना....? मग दाखवा ना थेट असे जीवन जगणार्‍यांचा शेवटही तसाच तडकाफडकी होत असल्याचे.

महाराष्ट्र म्हटले की, परराज्यातील लोकांना स्थानिकाकडून त्रास होत असल्याचे दाखविणे, चित्रपटात मराठी कलाकारांना कायम फालतू जोकर, ड्रायव्हर, कामवाली बाई, तसेच नायकाचा उल्लू मित्र, येडा मामा अशा रंगाने रंगविणे सर्रास चालत असल्याचे आपण पाहतो. आता 'हिंसाचार, रक्तपात, गॅन्ग्ज, माफिया वॉर...' म्हटले की बिहार झारखंड दाखवायचे.....आणि 'यातील ८०% भाग सत्य असून २०% काल्पनिक' अशी आरास मुलाखतीत करायची [प्रकाश झा आणि वर्माही अपवाद नाहीतच] आणि मग त्या दोन राज्यांचे रक्तरंजीत चित्र समोर असे आणायचे की उर्वरित देशाला या दोन राज्यात उठसूट मशिनगन्स, एके ४७, मुलींना बळजबरीने पळवून नेणे, बापाच्या खुनाचा बदला घेणारी पोरे....अशाच घटना २४x७ चालू आहेत असे वाटावे. झारखंडमधल्या धनबाद स्टेशनपासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या वासेपूरची लोकसंख्या मुख्यत: मुस्लीम आहे. पठाण व कुरेशी या दोघांमध्ये वैर सुरू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. आजही असेल, पण अशी कौटुंबिक घराणेशाहीतील उलाढाली भारताच्या अन्य प्रांतात घडत नसतील ? कुरेशा जमात खाटिक आहे म्हणून त्यानी माणसेही बकर्‍यासारखीच मारायची...इतका भडकपणा ? या दोन घराण्यातील लोकांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाचे खूप भडक आणि विकृत चित्रण केल्याचे स्पष्ट असताना त्यात 'हिंसाचाराचा आगडोंब' इतक्या प्रखरतेने दाखविण्यची काहीही गरज नव्हती

"यहाँ एक से एक हरामजादे रहते है...." ही चित्रपटाची आणि त्या अनुषंगाने 'वासेपूर' ची सुरुवातीची ओळख निवेदक करून देतो. आजच्या तेथील शिक्षित पिढीला टोचणारीच आहे आपल्या गावाची अशी ओळख. घाणेरडी भाषा मुंबईच्या अनेक झोपडपट्टीच्या डबक्याडबक्यातून नित्यदिनी वाहत असते, पण म्हणून ती वास्तववादी आहे हे दाखविण्यासाठी जशीच्यातशी पडद्यावर आणली म्हणजे 'दिग्दर्शकाची काय कमाल आहे...!" असे कौतुकोउद्गार काढावेत का ? आज धनबादच काय पण दस्तुरखुद्द वासेपूरमधून डॉक्टर, इंजिनीअर्स, प्रोफेसर्स, युपीएससी लॉट्स मधील अधिकारी लोक निर्माण झाले नसतील ? त्यांच्या स्वप्नात असले वासेपूर या क्षणी असेल तिथे ? नसेल, तर मागच्या शतकाची घाण आज उपसण्याचे काय कारण ?

चित्रपट माध्यम हे असे एक प्रभावी उपकरण आही की ज्याचा वापर सुबुद्धपणे करणेच समाजाच्या दृष्टीने हितकारक होऊ शकते. 'हिंसाचार' समाजात प्रतिदिनी जरूर घडत असतो पण म्हणून त्यावर बेतलेल्या चित्रपटात त्या हिंसाचाराची भलावण केली जात असेल तर ती बाब नि:संशय गृहणीय होते. 'वासेपूर' पासून स्फुर्ती घेऊन त्याच्या पाठोपाठ आलेल्या विवेक ओबेरॉयच्या 'रक्तचरित्र' मध्ये तरी काय दाखविले जात आहे याच्याशिवाय वेगळे ? बिहारच्या धनबादच्या ठिकाणी तसाच आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील द्वेषाचा प्लॉट, स्थानिक राजकारण, आमदारांची अरेरावी, दिवसाढवळ्या सर्वांच्या नजरेसमोर एका कार्यकर्त्याचा रस्त्यावर कोथळा बाहेर काढणे, जातीजातील उच्चनीचतेचे तेच तेच दळण, मग इकडे शहरात शिक्षण घेत असलेल्या कॉलेजकुमाराने आपल्या बापाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गावात परतणे....आपली गॅंग तयार करणे....परत तोच अंगावर शहारे येणारा रक्तपात.....सारे सारे काही छत्तीसगडी 'वासेपूर' ची आंध्र आवृत्ती.

हे कुठपर्यंत चालणार....आ.रा.सर ? काय लोकशिक्षण करीत आहोत आपण या माध्यमाद्वारे ? २५०-३०० रुपयांचे तिकिट काढून आपण केवळ 'मनोरंजन' या नावाखाली या सार्‍या भडक आणि भडखाऊ गोष्टी नजरेआड करणे असाच होत असेल तर मग आपण जे शिक्षण घेतले त्याला कसलाच अर्थ नाही का ? मल्टीपल ऑस्कर्स विजेत्या कपोलाच्या 'गॉडफादर' मध्ये, स्पीएलबर्गच्या 'सेव्हिंग प्रायव्हेट रायन' मध्ये, ऑलिव्हर स्टोनच्या 'प्लटून' मध्ये, इतकेच काय डेव्हिड लीनच्या 'ब्रिज ऑन द रिव्हर क्वाई' मध्ये हिंसाचार नाही ? जरूर आहे, पण त्यांच्या चित्रीकरणाच्या संयत हाताळणीमुळे तो कधीच बटबटीत वाटत नसून उलटपक्षी कथेच्या फुलण्यासाठी तितपत तो आवश्यक वाटतोच. 'वासेपूर' मधील सुरुवातीच्या असह्य वाटणारा गोळीबाराने असे वाटते की खरेच असे धनबाद जिल्ह्यात घडत असेल ? ही भावना निर्माण होणे म्हणजे दिग्दर्शकाची असल्या प्रसंगाची कमकुवत हाताळणी अधोरेखीत करते.

आजच्या तरुणाईला जर 'मी गँगस्टर झालो तर मस्तच होईल.....' असा संदेश जर वासेपूर/रक्तचरित्रसम चित्रपटातून जाणार असेल तर ते नक्कीच धोकादायक आहे.......[सेन्सॉरच्या कैचीतून सुटण्यासाठी 'गॅन्गस्टर' धर्तीच्या चित्रपटांचा शेवट असाच दाखवायचा असतो....म्हणजे वाईटाचा शेवटही वाईटच.....काल की परवाच 'रक्तचरित्र' ची भलावण करताना शत्रुघ्न सिन्हा बोललेच की, "जरी या चित्रपटात हिंसेचा भडिमार दाखविला गेला असला तरी शेवटी या देशाचे भले महात्मा गांधींच्या अहिंसेच्या शिकवणीतूनच होईल असा संदेश आम्ही चित्रपटाच्या शेवटी दिला आहेच...." ~ हा शुद्ध बकवास असतो या बिलंदर निर्मात्या दिग्दर्शकांचा....२० रीळापैकी १९ रीळे रक्तमांसाच्या पाटाने वाहून गेल्यावर '...चला आता अहिंसेचे गोडवे दाखवू या काही...' म्हणत शेवटच्या रीळात गांधीबाबाना आणायचे....मग सरकारही खुश]. तरुणाईला वेड वाटते ते पहिला १९ रीळांचे.

असो.

[अ‍ॅडेन्डा : तुमच्या प्रतिसादातील काही 'वैयक्तिक"....पर्सनल...समजल्या जाणार्‍या मुद्यांना मुद्दाम स्पर्श केलेला नाही....जो मी नंतर इथेच करीन.]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे पहा पाटीलसाहेब, आपल्या प्रतिसादांमध्ये मला अनुराग कश्यपवर लादलेल्या आपल्या अपेक्षाच दिसत आहेत. कशा, ते आपण पाहू.

तुमचा फार मोठा आक्षेप आहे - "जिया हो बिहार का लाला...जिये तू हजार साला..." या गाण्याच्या पार्श्वभूमीवर मरताना दाखवलेल्या सरदार खानच्या (तुम्हाला वाटत असलेल्या) गौरवीकरणाला. सत्यामध्ये एका गोळीत मरणार्‍या भिकू म्हात्रेविषयी तुम्हाला प्रॉब्लेम नाही. हे काय आहे साहेब? हाही गुंड, तोही गुंड. तुम्हाला पार्श्वसंगीताशिवाय मरणारा म्हणजे वास्तव वाटतो. मागे संगीत वाजले की मात्र प्रॉब्लेम. अहो त्या बिचार्‍या अनुरागला करु देत ना प्रयोग. तेवढे गाणे वाजवल्याने आणि तो लडखडत गाडीच्या बाहेर आल्याने सरदार खान काही नॅशनल रोल मॉडेल होत नाही. आणि समजा होत असेल, तर सत्या/ भिकू म्हात्रे जेवढा होईल, तेवढाच होईल. मग तुमचा आक्षेप भिकू म्हात्रेलाही का नाही लावत?

वास्तववादी चित्रपट वगैरे हे तुम्ही (म्हणजे- बघणार्‍याने) लावलेले लेबल आहे. उदा. मी काही हे लेबल लावणार नाही. माझ्यासाठी हे एक रूपक आहे. (रूपक आहे असे नाही; पण रूपकही आहे). किंवा अजून एका दॄष्टीने पहायचे म्हटले तर पात्रांच्या मनात वाजत असलेली गाणी (त्यांच्यावरील बॉलीवुड प्रभाव) प्रेक्षकांना ऐकवून एकाच वेळी प्रसंग, आणि त्या प्रसंगाकडे ते पात्र कसे पहात असेल हे दाखवणे - असेही असू शकते. सरदार खान मरताना कदाचित त्याच्या मनात असलेले विचार त्या "जिया हो बिहार का लाला..." अशा आत्मप्रौढी मारणार्‍या गीतातून व्यक्त होत असेल. सरदार खानचे पात्र अशी शेखी मिरवणारेच आहे. "तेरी केहके लूंगा", "हमरा नाम है सरदार खान...हम विधायक को कूट दिये एस्पी ऑफिसमे...उसके बाप के सामने...क्या किये? कूट दिये! याद रखिये हमरा नाम" अशा संवादांतून ते व्यक्त होत असते. रामधारीला संपवल्याशिवाय डोईवर केस ठेवणार नाही ही कसम; "कसम पैदा करनेवाली की" या सिनेमाच्या जाहिरातीच्या तालावर गाडीच्या टपावर बसून हातात माईक घेऊन रामधारीच्या ऑफिससमोर जाऊन संगीतमय धमकी देणे - या त्या पात्राच्या व्यक्तीरेखेशी ते शेवटचे मरतानाचे गाणे अगदी सुसंगत आहे. अशी कीड संपणे हे समाजाच्या हिताचे आहे वगैरे जे म्हणता ते ठीक आहे. पण तसा "संदेश" द्यायला हा सिनेमा काही समाजकल्याण खात्याने स्पॉन्सर केलेला नाही. दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे ते सांगू द्या ना बिचार्‍याला. तुमच्या अपेक्षा त्याच्या डोक्यावर कशाला ठेवताय? एनीवे, सरदार काय, फैजल काय- सगळेच शेवटी मेलेलेच आहेत. यू हॅव अ रीझन टु बी हॅपी. सगळीच कीड अनुरागने संपवली आहे! (एक डेफिनेट नावाचा किडा जेपीसिंग या मोठ्या किड्यासोबत टिकलाय म्हणा! ऑबजेक्शन कुड सस्टेन!)

या दोन घराण्यातील लोकांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाचे खूप भडक आणि विकृत चित्रण केल्याचे स्पष्ट असताना

असहमत आहे. आपली याबाबतची जाण माझ्याहून सखोल आहे असे मला जाणवते; पण मी असहमत आहे. अगदी असहमत आहे. या सिनेमात मला हिंसाचारापेक्षा हे सांस्कृतिक जीवनाचे चित्रणच अधिक भावले आहे. हिंसाचार तर मला अगदीच दुय्यम वाटलेला आहे. यातील गाणी तर मी पुन्हा पुन्हा ऐकतोय. इक बगलमे चांद होगा...तार बिजलीसे पतले हमारे पिया....हाजमोला हाजमोला....सगळीच गाणी अत्यंत समर्पक, पात्रांच्या मनस्थितीचे यथार्थ दर्शन घडवणारी आहेत. सिनेमा/ बॉलिवुडचे वेड - पर्पेंडिक्युलर, फैजल पासून ते 'दिलवाले..' बघायला जाणार्‍या मध्यमवयीन आमदार जे पी सिंग पर्यंत - खरे आहे. धनबादमधील ऑपेरा कल्चर - लग्नात, अंत्ययात्रेत, जेलमधून सुटून आल्यावर दाखवलेली बँड पार्टी, त्यात निवडलेली गाणी - त्यांचे र ला ड म्हणणारे उच्चार - धमाल आहे. निर्विकारपणे गुन्हे करणार्‍यांच्या घरातील फैजल वाराणसीमध्ये उल्लू बनतो, आपल्या प्रीतिपात्रासमोर कोकरु बनतो - अगदी वास्तव आहे. गुरासारखी माणसे कापणारा सुलतान कुरेशी रामाधीरसमोर खुर्चीवर बसायचे धैर्य दाखवू शकत नाही, पोलीसांचे, प्रशासनाचे त्याला भय असते - अगदी वास्तव आहे. इन फॅक्ट म्हणूनच तर गवर्नन्सचे अपयश अधोरेखित होते. असे सोडलेले आहेत मोकळे म्हणून तर हे जंगल राज सुरु आहे. नीट दावणीला बांधले की सगळे शिस्तशीर होईल.

एखाद्या गावाची ओळख. "हरामखोरांवरुन" धनबादची ओळख तिथल्या लोकांना खुपेल असे तुम्हाला वाटते. असे पहा, बापू बिरु वाटेगावकर ज्या गावचा त्याच गावचे शाहीर अण्णा भाऊ साठे. म्हणून काय फक्त अण्णा भाऊंचीच गोष्ट सांगायची का? बापू बिरुवर अनुरागने सिनेमा काढला तर तुम्ही म्हणणार, 'वाळव्यात काय फक्त गुंड असतात की काय? ही ओळख आम्हाला खपणार नाही. वाळव्यातून कितीतरी डॉक्टर्स, इंजिनियर्स, आयएएस बनलेत, स्वातंत्र्यसैनिक झालेत - ते दाखवा.' याला काय अर्थ आहे? (बंटी और बबली सिनेमात अमिताभ एक संवाद म्हणतो - आय रीड इन न्यूजपेपर दॅट ऑल अमेरिकन्स हॅव सेक्स ऑल डे, शुड आय बिलिव्ह इट? त्याची आठवण आली.) एखाद्या कथावस्तुला आवश्यक असेल तेवढा भाग कथाकार घेईल. बघणार्‍याने तेवढ्यावरुन पार्श्वभूमीविषयी काही चुकीचे अंदाज बांधले तर तो कथाकाराचा दोष नाही. एखाद्याला वाटले की धनबादमध्ये फक्त "हरामखोरच" राहतात, तर तसे वाटणारा या सिनेमाच्याच भाषेत "चुतिया" आहे. आता असल्या अजाण मंडळींचा विचार एखादा दिग्दर्शक करत बसला तर त्याला फक्त साने गुरुजींच्या गोड गोष्टींवर सिनेमे काढत बसावे लागेल.

काही सिनेमांची उदाहरणे देऊन त्यातील हिंसा "संयत" रीत्या, वास्तविकरीत्या दाखवली आहे असे म्हणता. कशावरुन? तुम्हाला धनबादमधील हिंसा अशी नसेल अशी शंका आली, हे त्या दिग्दर्शकाचे अपयश; तर मग अजून एखाद्याला सेव्हिंग प्रायव्हेट रायन मधील ओपनिंग सीनमधील हिंसा कंटाळवाणी वाटली, तर तो मात्र त्या प्रेक्षकाचा अजाणपणा का? का नाही अशी वासेपुरी हिंसा असू शकत? डिनायल मोडमध्ये का जाताय तुम्ही? होतात अशा गोष्टी. माया डोळसला पोलीसांनी किती गोळ्या खर्चून संपवले हे सगळ्यांना माहीत आहे. तुमच्याच भाषेत दुसर्‍या महायुद्धात वापरल्या नसतील एवढ्या गोळ्या तिथे वापरल्या गेल्या होत्या. तुकडे तुकडे करुन प्रेत नाहीसे करणे हा प्रकार अनेक ठिकाणी होत असतो. अगदी अलीकडे मुंबईमध्ये एका नेव्हल अधिकार्‍याने त्याच्या बायकोच्या याराचा खून करुन त्याच्या शरीराचे तुकडे करुन पोत्यात भरुन कचराकुंडीत फेकले होते. निठारी हत्याकांडाला तुम्ही नाकारु शकत नाही. तो काही पोलीसांचा किंवा प्रसारमाध्यमांचा कल्पनाविस्तार नव्हता. आता लोकशिक्षणास्तव अशा बातम्या वृत्तपत्रांनी देऊ नयेत असे म्हणू नका. मागच्या शतकातील घाण आज उपसू नका असे म्हणता - मग होलोकास्टविषयी तर कुणी काही बोलायचेच नाही; कारण आजच्या जर्मनीची ती ओळख नाही.

लोकशिक्षणाविषयी. म्हणजे काय? मुद्दा काय आहे? तुम्हाला मग गॉडफादर, सत्या या सिनेमांविषयीही आक्षेप असायला हवा. वीसपैकी एकोणीस हिंसक रिळांचे आकर्षण तरुणाईला वाटते असे म्हणता, तर मग हिंसक चित्रणावर मुळातच बंदी हवी असे तुम्ही सुचवत आहात.

आजच्या तरुणाईला "मी गँगस्टर झालो तर मस्तच" असे वाटले तर ते खेदजनक आहे हे खरे. पण त्याचे खापर या सिनेमांवर फोडू नका. ते अपश्रेय आपल्या कमकुवत न्यायव्यवस्था, पोलिसिंग, गव्हर्नन्स यांचे आहे. वासेपूर हा एक आरसा आहे. या आरशात बघायचे नाकारल्याने सत्य लपत नाही. फेस इट. ज्यांना डिनायल मोडमध्ये रहायचे आहे, त्यांच्यासाठी अनेक एस्केपिस्ट ऑप्शन्स उपलब्ध आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रा.रा. आ.रा. साहेब, आपले विवेचन नेहमीच मुद्देसूद, परखड आणि योग्य असते यात शंकाच नाही. पण या प्रतिसादात तर तुम्ही बैलाचा डोळा अगदी आरपार फोडलेला आहे. नमोनम: _/\_ कुडंट अग्री मोर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दोन्ही भाग लांबलेले वाटले. कलादिग्दर्शन, संवाद, संगीत आणि अभिनय या गोष्टी चांगल्या जमल्या आहेत पण संकलन ढिसाळ वाटले. चित्रपटातील हिंसाचाराची दृष्ये कंटाळवाणी होऊ लागतात. चित्रपट काही व्यापक-सखोल भाष्य करत आहे असे वाटले नाही. ऐंशी-नव्वदचा काळ अधोरेखित करण्यासाठी वॅक्युमक्लिनर, फ्रिझ, पेजर, मोबाइल फोन वगैरे गोष्टींचा वापर कल्पक वाटला. दोन्ही चित्रपट इतर हिंदी चित्रपटांच्या तुलनेत नक्कीच सरासरीपेक्षा वर आहेत पण 'सत्या' वगैरे जसे नाविन्यपूर्ण वाटला होते तसे मात्र वाटले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदी सिनेमांच्या तुलनेत वासेपूर सरस वाटला. सिनेमातील काही दॄश्यं कल्पक आणि धाडसी वाटली. पण काही ठिकाणी चित्रपट लांबला, घटना अपेक्षित घडल्या इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

दोन्ही चित्रपट इतर हिंदी चित्रपटांच्या तुलनेत नक्कीच सरासरीपेक्षा वर आहेत

वासरात लंगडी गाय शहाणी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आरा यांच्या परिचयाशी मी फारसा असहमत नाही. चित्रपटांतील पात्रे-समाजजीवन अस्सल आहेत. त्यात्या काळावर आणि सामाजिक जीवनावर काही मिश्किल टिप्पण्याही चांगल्याच जमून आल्या आहेत. मात्र ज्याप्रकारे व्यक्तिरेखा बदलतात त्याप्रकारे लोकशाहीतील सत्ताकेंद्रे बदलतांना आढळत नाहीत. रामाधीर सिंह कुठल्याशा कामगार पक्षाचा नेता असावा असे सूचित केले आहे पण कामगारांचे राजकारणातील बदल चित्रपटात कुठेच दिसत नाही, संघटीत गुन्हेगारी-टोळ्या यांच्या सतत अस्तित्त्वामागे काहीएक परिस्थितीकी असावी लागते ती नेमकी कोणती ते चित्रपटातून ध्यानात येत नाही. त्यामुळे चित्रपटाचा आवाका (पाच-सहा तास असूनही) थोडासा संकुचित वाटू लागतो पण 'लंगडी गाय' या वर्णनसंक्षेपापेक्षा दोन्ही चित्रपट बरेच सरस आहेत.

अवांतर: १९४१ मध्ये वीशीत असलेला रामाधीर सिंह २००५-६ मध्येही कोवळाच म्हातारा दिसतो असे काही वयांचे हिशोब चूकलेले वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार वेगात चित्रपट आहे असा भास एडिटिंगने जमवायचा फुटकळ प्रयत्न, मुळातली लांबलेली (काहिशी रटाळ - तेच ते आणि तेच ते देणारी) कहाणी उध्वस्त करून टाकते असे वाटते.
या चित्रपटात दिग्दर्शनापेक्षा मला पटकथालेखन, प्रकाश योजना आणि मुख्य म्हणजे संकलन असे तीन घटक आवडले नाहीत.

थोडक्यात चित्रपट मला लै भारी वगैरे काही वाटला नाही - नव्हता.

मात्र वरील चर्चेमुळे एकूणच चित्रपट रसग्रहणाविषयी बरेच शिकायला मिळते आहे. त्याबद्दल सर्वश्री आ.रा. आणि अ.पा. यांचे अनेक आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नमस्ते आ.रा.सर....

[मे बी धिस रीस्पॉन्स इज ऑफ डिफरन्ट काईन्ड....दो इन सम वे इट इज इन रीलेशन वुईथ अवर डिस्कशन]

~ मी सरकारी कर्मचारी आहे...प्रत्यक्षात आता 'होतो' म्हटले पाहिजे, कारण व्हीआरएस घेतली आहे...या नोकरीने मला जीवनात जसे स्थैर्य दिले त्याचप्रमाणे माझ्या पाठीच्या कण्याला बाकही दिला आहे. या बद्दल मी सरकारचा नेहमीच कृतज्ञ राहीन...राहिलोही आहे. मुंबई असो वा नवी दिल्ली असो...इथे तिथे सत्तेवर असणार्‍या पक्षाच्या झेंड्याशी मला कसलेही देणेघेणे नव्हते, नाही. अगदी अंतुले, शरद पवार, शिंदे असोत वा मनोहर जोशी, नारायण राणे....त्या त्या कालखंडात ते 'माझे सरकार' होते. मी एकाही निवडणुकीचे मतदान आजतागायत चुकविलेले नाही, मगे ते म्युनिसिपल कार्पोरेशनचे असो वा विधीमंडळाचे....तसे करणे म्हणजे या देशाचा नागरिक म्हणून माझे परम कर्तव्य आहे. ज्या गव्हर्नन्सची येताजाता खिल्ली उडविली जाते अशा 'गॅन्गवॉर' चित्रपटातून, ते पाहता मला निश्चित्तच यातना होतात. ही माध्यम हाताशी असलेली मंडळी ज्या लोकशाहीने याना अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे तेच त्याचा आधार घेऊन लोकशाहीचे धिंडवडे काढत असताना हे लक्षात घेत नाहीत की +एक अब्ज लोकसंख्या असलेल्या या देशात दुसरी कोणतीही '....शाही' अस्तित्वात येऊ (च) शकणार नाही. मग आहे त्या प्राप्त परिस्थितीतही आपले आमदार खासदार देशाचा हा जगन्नाथाचा रथ पुढे नेत आहेत त्यातील सारीच मंडळी चित्रपटात रंगविल्या जाणार्‍या आमदारांसारखी असतात हे कदापिही मान्य होणार नाही. पण दाखविताना कश्यप आणि तत्सम मंडळी त्या घटकाला अशी काही रंगरंगोटी करतात की चित्रपट पाहायला येणार्‍या नव्या पिढीतील मतदाराच्या अपरिपक्व मेन्दूवर तीच प्रतिमा खोलवर उमटते आणि त्याला असेच वाटत राहते की विधानसभेत तसेच लोकसभेत जायचे ते केवळ आपल्या तिजोर्‍या भरण्यासाठी आणि 'बाय हूक ऑर बाय क्रूक' रितीने मतदारसंघावर कब्जा राखायचा. रामू झा कश्यप मंडळींचे लोकप्रतिनिधी याच मुशीतील दाखविले जातात. कोल्हापूर जिल्ह्यातील १२ आमदारांना तसेच २ खासदारांना मी गेल्या ३० वर्षात या ना त्या निमित्ताने अनेकदा भेटलो आहे....मनमुराद गप्पागोष्टीही झाल्या आहेत.....यात जसे दोन्ही कॉन्ग्रेसचे तसेच शिवसेना आणि भाजपचेहे आमदार होते/आहेत. पण बिलिव्ह मी सर.....यापैकी एकही 'कश्यप रंगपेटी'तील रंगाने रंगलेला नाही. याचा अर्थ मी असाही करणार नाही की ही सारी मंडळी एरव्हीच्या जीवनात धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहेत....पण 'अतिरेक' या संज्ञेच्या चौकोटीत यांचे वर्तन नाही. अर्थात हे महाराष्ट्रातील चित्र आहे, म्हणून ते जसेच्या तसे सार्‍या बिहार आणि झारखंडला लागू होणार नसेलही, पण ज्याअर्थी याना निवडून देणारे लोक आहेत....दोन्ही, सुशिक्षित आणि अशिक्षित....त्याअर्थी केवळ बंदुकीच्याच धाकाने हे निवडून येत असतात यावरही चित्रपट पाहून विश्वास ठेवण्यात अर्थ नसतो.

या देशाच्या लोकप्रतिनिधींचे असे चित्रण जितके खेदजनक तितकेच संतापजनक चित्र ते हे की हा चित्रपटातून संदेश जातो तो हा... सर्वसामान्याने हातात शस्त्र घेऊनच आपल्याला हवा तो न्याय मिळविणे गरजेचे झाले आहे. सरदार खानच्या मृत्यूच्या वेदना आणि एका देशभक्ताच्या वेदना यात काहीच फरक न दाखविता सरदार मरत आहे म्हणजे ध्रुव ताराच आता निखळला आहे असा आभास निर्माण करणे ही दिग्दर्शकाची अशा व्यक्तिरेखांचा उदोउदो करण्याची वृत्ती स्पष्ट करते. तुम्ही ज्या गाण्याच्या उल्लेख केला आहे, त्याऐवजी मला तर चक्क आता रफीसाहेबांचे 'कर चले हम फिजा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवा ले वतन साथियो...!" ऐकू येईल की काय अशी भीती वाटत होती. मनोजचे त्यावेळेचे हावभाव तर 'हकीकत'शीच साधर्म्य दाखविणारे आहेत.

यातील अनुराग कश्यप आणि 'दॅट गर्ल वुईथ द यलो बूट' यातील कश्यप वेगळे आहेत. मला अभिप्रेत आहे तो असला दिग्दर्शक. यातही अनुरागने लंडनहून आलेल्या एका मुलीने भारतातील बापाचा घेतलेला शोध दाखविला आहे [बदल्यासाठी नव्हे, तर आपल्या आईला फसवलेल्या]....मुंबईच्या व्हिसा ऑफिस, पोलिस स्टेशन, टॅक्सीचालक, हॉटेल्स, मसाज केन्द्र, पोस्ट ऑफिस अशा सर्वसामान्य नागरिकांच्या रक्तशोषणाच्या जागा, व्हिसा मुदत वाढवून देण्याकरिता रुथला त्यासाठी द्यावे लागणारे विविध प्रकारचे 'मोल'..... मुंबईतील मसाज केन्द्रात घडत असणारे प्रकार....ड्ग्जच्या आहारी गेलेले तरुण रक्त....आणि सर्वात कळस म्हणजे मुलीला अगदी 'भयानक' रितीने....शॉकिन्गही.... झालेली बापाची ओळख.....यातील कथा आणि व्यथा अत्यंत रेखीवपणे [भडकपणाकडे झुकण्याची शक्यता असूनही संयतपणे हातील भावनिक उद्रेक दाखविणे....इ. इ...] मांडणारा अनुराग कश्यप कौतुकास पात्र होतोच होतो....त्यातही अवघ्या १३ (होय, तेरा) दिवसात मुंबईतील त्या त्या जागीच शूटिंग घेऊन चित्रपट पूर्ण करून दाखविणे कश्यपने यशस्वी केले आहे. या पार्श्वभूमीवरून 'वासेपूर' चा भडकपणा असह्य वाटू लागतो. [तुलना ही अपरिहार्य असतेच, हे तुम्हीही कबूल कराल, सर.]

चित्रपट हे समाजप्रबोधनाची गरज भागवू शकते की नाहे....तशा गरजेची अपेक्षा धरावी का ना धरावी... या मुद्द्यावर तुमच्यामाझ्यात....तसेच इथल्या अन्य सदस्यांतही...मतभेदाची भिंत उभी राहू शकते...अन् त्यात काही गैर आह असेही नाही. प्रत्येक चित्रपटात असे काही तपशील, काही प्रतिमा, काही रूपके आपली स्वतःची अशी सौंदर्यसाधाना दर्शवितात ज्या दाखविण्यामागे दिग्दर्शकाचा निश्चित असा एक हेतू असणे गैरवाजवी नाही. मात्र तोच तपशील कसा आणि किती प्रमाणात दाखविणे वाजवी आहे याचे भान त्याला ठेवावेच लागेल.

अजूनही खूप लिहायचे आहे मनात....पण त्या अगोदर तुमच्या पहिल्या प्रतिसादातील काही 'वैयक्तिक" मुद्द्याबाबत....क्रमवार :

१. नॉट फेअर. नॉट फेअर. लेट्स नॉट बी पर्सनल. तुम्हाला माझे कौतुक वाटत असेल, आणि म्हणून मला काही अपेक्षांमध्ये बांधत असाल, तर ते अन्यायाचे आहे.
~ काहीसे भावनिक होत असेल, पण मी हे टाळू शकत नाही, सर. तुमच्याचबाबतीत नव्हे तर एरव्हीच्या नित्याच्या वर्तनामध्येही समोर येणार्‍या व्यक्तींशी करावयाच्या वर्तनात अशा नैसर्गिक फरक पडतोच पडतो....."मी अपेक्षा बाळगतो....' हे जितपत सत्य, तितकेच त्या व्यक्तीला अपेक्षांमध्ये 'बांधून ठेवणे' अन्यायाचे होईल ही बाबही मला मान्य. एक चित्र असते नजरेसमोर.... कुमार गंधर्वाच्या गायनाला कोणत्याही घराण्याशी बांधणे जसे शक्य नाही तरीही ऐकणारा {स्वतःशीच} ते गायन त्याची भक्ती असलेल्या घराण्याच्या लयीशी ते गाणे जोडण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये ना कुमार यांच्यावर अन्याय ना त्या रसिकाच्या आवडीनिवडीवर.....हां, हे जरूर की त्या श्रोत्याने कुमारला हे सांगणे योग्य नाही जसे की, "कुमार जी, मघाची जयजयवंतीमधील बंदीश मला आग्रा घराण्याच्या परंपरेतील वाटले...." दॅट्स अनफेअर रीअली. पण लिखाणातून निर्माण झालेल्या अपेक्षातून त्या व्यक्तीच्या जडणघडणीबद्दल मात्र जे चित्र मनी तयार होते, त्याच्या विरोधात ब्रश गेला असेल आणि तसे सांगितले गेले तर ते अन्यायाचे होणार नाही असे आपल्या केसमधील चर्चेवरून तुम्ही समजावे, प्लीज.

२. सिनेमातून बोध.....- माझ्या मते मुळीच आवश्यक नाही.....
~ मुळात सिनेमाची संकल्पना केवळ "मनोरंजन" हा फ्लॅगपुरतीच प्रेक्षक धरणार असेल तर मग 'जय संतोषी माँ" हा सिनेमा पाहणे ही बाबदेखील मनोरंजनच्या चक्रात अडकविली जाऊ शकते. बोध प्रबोधनासाठी (च) निर्मिती असते असे जरी नसले तरी या क्षेत्रातून बोध हा सर्वसामान्य जनतेने घेतला पाहिजे अशीही समजूत अगदी आर्देशर इराणी, फाळके ते आजच्या अख्तरपर्यंत सर्वानीच मानली आहे.

(To be continued....)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे प्रतिसाद आणि एकंदर मत यांविषयी आदर आहे. मात्र एक शंका मनात आल्यावाचून राहत नाही. काही काही प्रतिसादांची सुरूवात "[मे बी धिस रीस्पॉन्स इज ऑफ डिफरन्ट काईन्ड....दो इन सम वे इट इज इन रीलेशन वुईथ अवर डिस्कशन]" अशी इंग्रजी वाक्याने का केलेली असते. साधारण अशाच काही ओळी आळश्यांच्या राजा यांनीही लिहिल्या आहेत (उदा. आय स्टॅंड करेक्ट वगैरे). ही मराठीतील लेखनाची प्रचलित नवी शैली आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद अ.श.....

~ अशी काही मराठीत नवीन लेखनशैली प्रचलित झालेली नाही, हे मी झटदिशी मान्य करतो. झाले आहे असे की शासकीय नोकरीतील वैविध्यतेमुळे अनेकदा मौखिक संवाद [बाहेरच्या राज्यातील अधिकारी/लोकप्रतिनिधी/खास पाहुणे यांच्यासोबत] दोन्ही भाषांत....कित्येकवेळी हिंदीतूनही....होत असतात. इतकेच नव्हे तर मंत्रालयातेल मुख्यालयात पाठविण्यात येणार्‍या अहवालातूनही अशा दोन्ही भाषांचा उपयोग केला जातो. अर्थात हे काही मुद्दाम घडते अशातील भाग नाही....नकळतही होत असते असे लिखाण. [आ.रा.सर - वा इथले अन्य कुणी सदस्य - हे जर शासकीय सेवेतील अधिकारी असतील.....तर त्याना असे द्विभाषिक लिखाण कसे सहजगत्या घडले जाते हे नक्कीच उमजेल.]

~ काही काही प्रसंगी जवळपास वीस वीस पानांचे [फूल्स्कॅप] मजकूर होईल इतके अहवाल पाठवावे लागतात.....तिथेही एखाद्या घडामोडीविषयीचे लिखाण करताना अपरिहार्यतेने तुम्ही वर निर्देश केल्यासम मजकूर टंकला जातो....मात्र जवळपास ९०% भाग हा मराठीत असतोच.

थोडक्यात 'आदत से मजबूर....' झाल्याने तसे वरील प्रतिसादात टंकले गेले आहे असे कृपया समजून घ्यावी ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्पष्टीकरणाबद्दल आभारी आहे. थ्यांक यू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशहाणा यांच्या प्रश्नामुळे मराठीची नवीनच उदयाला आलेली, आणखी एक बोलीभाषा कशी अस्तित्त्वात येते आहे हे समजलं.

बाकी चर्चा रोचक आहे. चित्रपट कधी-ना-कधी बघेनच, त्यासाठी बुकमार्क टाकून ठेवते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाटीलसाहेब,

तुम्ही जो मुद्दा मांडलेला होता, त्याला मी माझ्या परीने उत्तर दिलेले आहे. पुन्हा आपण तोच मुद्दा मांडत आहात. त्याला आता अजून पुन्हा तेच उत्तर देण्यात काही हशील नाही. तरीही.

या सिनेमातून असा अर्थ निघतो/ निघेल; असा संदेश जाईल/ जातोय असे आपण म्हणता आहात - या सिनेमात असे दाखवले आहे की सर्व लोकप्रतिनिधी लुटेरे/ डकैत असतात, एखाद्या देशभक्ताला साजेलशा पद्धतीने एका गुंडाचा मृत्यु दाखवला आहे, लोकशाहीत काही राम नाही आणि एखादी पर्यायी व्यवस्था असायला हवी, सामान्य माणसाला कुणी वाली नाही आणि न्याय हवा असेल तर बंदूकच हातात घेतली पाहिजे, इत्यादि.

तर मला हे मान्य नाही. असे काही या सिनेमात दिसत नाही असे माझे मत आहे. तुम्ही लावलेल्या न्यायाने अनेक कलाकृती बाद होतील. फक्त पॉझिटिव्ह गोष्टीच दाखवायच्या सिनेमात म्हणजे अवघड आहे. बॅण्डिट क्वीन बाद, पान सिंग तोमर बाद, शोले बाद, एवढेच काय - फॅण्टसीजदेखील बाद. कारण मग बघणार्‍याच्या मनावर असाही परिणाम होऊ शकतो की हे असेच असते - मग वास्तविक जगात तो जगायचा कसा! आणि आपली तरुण पिढी जगायची कशी, शहाणी व्हायची कशी. कोल्हापुरातील आमदार खासदार असतील हो सज्जनसिंग. वासेपुरातील काल्पनिक आमदार पण राजस सुकुमार सद्गुणाचा पुतळा असावा असा तुमचा आग्रह का? आणि एखादा वासेपुरी आमदार दाखवला काळ्या छटेत तर लगेच तुम्हाला घटनेचा अपमान झाल्यासारखे का वाटावे बरे? आजच्या घडीला संसदेत किती गुन्हेगार आहेत याची माहिती आपल्याला नसावी असे म्हणवत नाही. मग त्यातल्या एखाद्यावर आधारीत काही एक गोष्ट सांगीतली कुणी तर अडचण काय? की त्याला बॅलन्स करण्यासाठी एखादा लाल बहादूर शास्त्री तिथेच धनबादमध्ये उभा करावा अशी काही आचारसंहिता मांडत आहात?

मी माझे अनुभव मध्ये आणून या सिनेमाला जस्टीफाय करणे प्रयत्नपूर्वक टाळतोय. ते तर फारच सोपे. अगदी प्रत्यक्ष अनुभव नसला तरी यातील बर्‍याच गोष्टी मी फस्ट हॅण्ड ऐकलेल्या आहेत. तुलनेने थोडे कमी तीव्रतेचे गुन्हे प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. यात दाखवलेले गुन्हे अगदी शक्य आहेत. आणि ते का शक्य आहेत याचे कारणही मला या सिनेमात दिसले आहे - गव्हर्नन्सचा अभाव. ते खरेच आहे. तुम्ही शहामृगासारखे वाळूत डोके खुपसून म्हणत राहिलात की नाही नाही या देशात गव्हर्नन्स आहे, चांगला गव्हर्नन्स आहे, असले गुन्हे या देशात होत नाहीत, तर त्याने सत्य बदलत नाही. एक चक्कर एखाद्या तुरुंगात टाका आणि आरटीआय मध्ये एक साधी माहिती मागा - अंडर ट्रायल प्रिझनर किती आहेत, त्यातील दोन वर्षांपेक्षा जास्त काळ किती जण तुरुंगात आहेत, त्यांच्या गुन्हाचे स्वरुप काय आहे, त्याला कमाल शिक्षा किती आहे; मग तुम्हाला सेशन कोर्टे किती न्याय देतात याची एक झलक पहायला मिळेल. अजून एक माहिती राज्य सरकारला मागता येईल - एकूण किती नॉन बेलेबल वॉरंट्स न्यायालयांनी इश्यू केली, आणि पोलीसांनी त्यातील किती एक्झिक्यूट केली - एका वर्षात - मग आपल्या न्यायव्यबस्थेवर आणि पोलीसिंगवर किती भरवसा ठेवायचा अशी शंका मनात नाही आली तर मला सांगा. "बेल" (जामीन) नावाचा अत्यंत डिस्क्रिशनरी आणि ओपेक प्रकार आपल्या न्यायव्यवस्थेत का असावा यावर थोडा विचार करा. कायद्यापुढे सर्व समान असतील, तर बेल मंजूर होऊनही बेल देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे तुरुंगात वर्षानुवर्षे जे खितपत पडले आहेत, ते खरेच कायद्याच्या या समानतेचे लाभार्थी आहेत का यावर विचार करा. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भक्कम कायदे आणि यंत्रणा असतानाही बाबरी मशीद का पडते, मुंबईत बॉमस्फोट का होतात, गोध्र्यात ट्रेन का जाळली जाते, माणसे का कापली जातात यावर विचार करा. या देशात लग्नाचे वय कमी करा म्हणजे बलात्कार होणार नाहीत अशी सूचना करण्याचे साहस लोकप्रतिनिधी म्हणवणारे नेते कसे काय करु शकतात; एक कायदामंत्री जातीय दंग्याची आणि हत्येची गर्भीत धमकी कशी काय देऊ शकतो यावर विचार करा.

एक कथा म्हणून आणि एक सादरीकरण म्हणून, आणि एक टिप्पणी म्हणून सिनेमा उत्तम आहे असे माझे मत आहे. या बाबतीत तो कसा काय वाईट आहे/ किंवा उत्तम नाही हे तुम्ही सांगा. सिनेमातील संदेश वगैरे नंतर बघू. खरे तर तुम्हाला संदेशाची काळजी वाटते म्हणजे तुम्ही हे मान्य करत आहात की सिनेमा प्रभावी आहे. सिनेमा बकवास असेल तर कुणी संदेश (बरा किंवा वाईट) घ्यायचा प्रश्नच येणार नाही. त्याकडे दुर्लक्ष होईल किंवा त्याचे हसे होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आ.रा....सर,

सिनेमा राहू दे बाजूला....आपल्या वरील प्रतिसादातील खालून दुसर्‍या पॅरेग्राफच्या संदर्भात मी खूप काही लिहू शकतो, किंबहुना केवळ पुस्तकी नव्हे, तितका अनुभव मी प्रत्यक्ष घेतलाही आहे....; पण दिसत्ये आहे असे की आपल्या दोघांच्याही पदरी त्या वादातून उद्विग्नतेशिवाय काहीही पडणार नाही. फक्त एकच प्रामाणिकपणे कबूल करतो की, या देशाचे जे काही भले होणार आहे, व्हायचे आहे ते प्रचलित शासनव्यवस्थेतूनच होणार, होईलही....अन्य पर्याय नाही.

~ सो, डीफेन्स रेस्ट्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हं.
असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0