भाषाशास्त्राची ऑलिंपियाड स्पर्धा

नमस्कार मंडळी,

गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र या विषयांप्रमाणेच भाषाशास्त्र या विषयातही ऑलिंपियाडची स्पर्धा घेतली जाते. २००९ सालापासून भारताने या स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली आहे आणि काही पदकेही मिळवली आहेत. यावर्षीपासून या स्पर्धेसाठीचे भारतीय प्रतिनिधी ठरवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर निवड चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी २ फेब्रुवारी २०१३ रोजी होईल. त्यातून मुख्य स्पर्धेसाठी ४ विद्यार्थ्यांची निवड केली जाईल .

त्याआधी एक कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे तपशील पुढीलप्रमाणे-
कालावधी: ६ दिवस (२४ ते २९ डिसेंबर, २०१२)
वेळः सकाळी १० ते दुपारी ४
स्थळः भाषाशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ, कालिना

अधिक माहितीसाठी कृपया या संस्थळाला भेट द्या- https://sites.google.com/site/paninilinguisticsolympiad/

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यशाळेत भाग घेण्यासाठी वयाचे बंधन नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचे आई-वडिल, शिक्षक, भाषा या विषयात रुची असणारे सर्वच भाग घेऊ शकतात.

’ऐसी...’कर या माहितीचा उपयोग करून घेतील अशी आशा आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

रोचक आणि उपयुक्त अशी माहिती.
धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतर विषयांच्या आँलिपियाडसाठी इंग्लिशचा वापर (आपल्याकडे) होतो. कदाचित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत काही देशांचे स्पर्धक भाषांतरताकार वापरत असतील. भाषाशास्त्र या विषयाची अजिबात ओळख नाही त्यामुळे त्या संदर्भात कुतूहल आहे. राधिका, तुला काही माहिती आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुझा प्रश्न कळला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

लिंग्विस्टिक्स की भाषाशास्त्र?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्पर्धेचे नाव 'इंटरनॅशनल लिंग्विस्टिक्स ऑलिंपियाड' असे आहे.
हे संस्थळ मराठी आहे असा समज झाल्याने 'भाषाशास्त्र' हा शब्द वापरला. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

समज बरोबरच आहे. पण मग, ऑलिंपियाडचे काय करता येईल?
ते असो, सरळ उत्तर देऊन टाक की... तूही ना...
स्पर्धा कोणत्या भाषेत होणार आहे? किंवा, स्पर्धेचे माध्यम काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रश्न असा होता होय!

माझ्या माहितीप्रमाणे २०१२च्या मुख्य स्पर्धेतले प्रश्न इंग्रजीसोबत बल्गेरियन, झेक, डच अशा एकूण १५ भाषांत भाषांतरित केलेले होते (भाषांची यादी सहभागींच्या देशांनुसार बदलत असल्यास त्याची कल्पना नाही). या यादीत एकही भारतीय भाषा नव्हती.

आपल्याकडे राष्ट्रीय पातळीवर जी निवड चाचणी घेतली जाणार आहे, ती इंग्रजीत असेल. कार्यशाळा मुख्यत्वे इंग्रजीत असेल. परंतु पुरेसे मराठी विद्यार्थी मिळाल्यास मराठीतही काही वर्ग घेतले जातील.

ट्युबलाईटत्वाबद्दल क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

प्रश्न थोडा रँडम होता हे आता उत्तर मिळाल्यावर लक्षात आलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यावर्षीच्या भाषाशास्त्र ऑलिंपियाड स्पर्धेसाठी भारताकडून गेलेल्या चमूने विशेषोल्लेख (प्रचेतोस मित्रा), सर्वोत्कृष्ट उत्तर (निलय सारडा), कांस्यपदक (निलय सारडा), रौप्यपदक (यश सिन्हा) असे चार बहुमान पटकावले आहेत.

यावर्षीही यासाठीच्या कार्यशाळा, प्रवेशपरीक्षा इ. आयोजित करण्यात येतील. मुख्य म्हणजे, यावर्षी एक कार्यशाळा मराठी भाषेतही घेण्याचा विचार आयोजक करत आहेत. हे सगळे कार्यक्रम घोषित झाल्यावर 'ऐसी...'वर त्याची माहिती देईनच.

राधिका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका