गारुडी

गारुडी

गारुडी डमरु वा जवतो
लोक शहाणपणा
सोबत असतात ,
भुक देखील खोटी
वाटावी ईतक्या.
ते त्याच्या तालाला
भूलत नाहीत ,
आकर्षणावर
झुलत नाहीत.
चिमुटभर व्यथेच्या
मणभर फारकतीसाठी
थांबतात आणि
साधतात ,
डोंगराएवढा
दांडगा उपकार.
चेकाळतात जहरी,
गारुड्याची फिरकी
घेणार्या गड्यावर .
खपाटी गेलेलं पोट
खाली सरणारी पँट,
सावरत गारुडी
करतो व्याकूळ
परफाँरमन्स.
परडीतल्या थिजलेल्या
सापला डिवचत.
डमरूला प्रतिसाद
देणार्या मुलाचा ,
बाहेर पडलेला
खोल कष्टी आवाज
भेदू शकत नाही.
शहाणपणांचं अभेद्य
कवच.
लोकांच्या काना मनावर
तगडं पोलादी चिलखत
अलगद.
दर्शनोत्सूक डोळे ,
हरकतात थाळीतल्या
आवाजा ईतक्याच
नाण्यानं.
एकावर एक परडी
वळतो गठडी..
एकमेकांना आधार देत ;
नव्या चौकाची वाट.
लटपटत्या पायांना
भुक कापत जाते,
डमरु घुमल्याचा
आवाज आता
कानात घुमतोय...

----------------------------------------------------
सतीश वाघमारे. पुणे.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

खूप आवडली ही कविता.कवितेतील भूकेचं, दैन्याचं वर्णन खूप चटका लावतं. खरच डोंबारी, गारुडी, वासुदेव वगैरे लोक कधी मुख्य प्रवाहात येणार, कशी येणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सारिका .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रभावी, व्यथित करणारे शब्द.
डोंगराएवढा दांडगा उपकार; तगडं पोलादी चिलखत; शहाणपणांचं अभेद्य कवच... चपखल.

अधिक वाचनीय होण्यासाठी योग्य formatting उपयुक्त ठरते. (जाणकारांनी मार्गदर्शन करावे)

शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0