सोनई दलित हत्याकांड !!

सोनई दलित हत्याकांड !!

"माझ्या पोराचे तुकडे या डोळ्यांनी पहाव लागल,
मला म्हातारीला आता हे दुख सहन होत नाय.
मराठ्याच्या पोरीसंग प्रेम करून माझ्या पोरान गुन्हा केल्ता का?
ते दोघ बी लगीन करणार होते, पर त्या लोकांनी तेला मारून टाकल ,
ती माणस नायीत हैवान हायीत"

- कलाबाई घारू ( मृत सचिन घारू याची आई)

ही कलाबाई यांची वेदनामय आणि संतप्त प्रतिक्रिया, केवळ प्रतिक्रिया नाही. तर तो थेट सवाल आहे, भारतीय संस्कृतीच्या नावाखाली पोसलेल्या सरंजाम जातीय विकृतींना, हिंसक धर्मवादाचे विष पेरलेल्या ब्राह्मणी विचारांना, लोकशाहीचा डांगोरा पिटणाऱ्या बुद्धिमंतांना, 'फार वाईट झाले' म्हणत जातीय अहंकारात आंधळ्या होणार्या समाजाला. त्यांचा थेट सवाल आहे, माणसाचे माणूसपण नाकारणाऱ्या या सकल ब्राह्मणी व्यवस्थेला! कलाबाईच्या सवालाने इथल्या पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या समाजाचा खरा भयाण, अमानुष चेहरा समोर आला आहे, असंवेदनशीलतेच्या धुक्यात हरवलेल्या अहमदनगर मधील सोनई दलित हत्याकांडाचा हा सत्यशोधन रिपोर्ट.

जातीयवादाचे बळी-

नवीन वर्षाची सुरवात होत असताना अहमदनगर मधील सोनई येथे संदीप थनवर, सचिन घारू आणि राहुल कंधारे या तीन मेहतर ( वाल्मिकी) जातीच्या तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडात आरोपी असलेले रमेश,पोपट, प्रकाश, गणेश ( सर्व दरंदले ), अशोक नवगिरे, दरंदले यांचा भाचा संदीप कुऱ्हे आणि अशोक फलके यांना आजपर्यंत अटक करण्यात आली आहे. हत्येमागील कारण अगदी स्पष्ट आहे, सचिन घारू व दरंदले यांची मुलगी यांचे एकमेकांवर प्रेम होते, परंतु सचिन हा दलित ( मेहतर जातीचा ) आणि दरंदले यांची मुलगी ही मराठा जातीची( कथित उच्च) असल्याने दरंदले यांना हे प्रेमसंबंध मान्य नव्हते, त्यांच्या लग्नाच्या निर्णयाने दरंदले यांच्या खोट्या प्रतिष्ठेला यामुळे धक्का बसणार होता. (विशिष्ट व्यक्तीवर जाहीर आरोप करणारं एक वाक्य काढून टाकलेलं आहे. - संपादक)

संदीप, सचिन आणि राहुल-

संदीप, सचिन आणि राहुल हे तीनही युवक नेवासा फाटा येथे असलेल्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान च्या शाळा आणि महाविद्यालयात रोजी-रोटीसाठी सफाईचे काम करीत होते, त्यांच्या उत्पन्नाचे तेवढेच एकमेव साधन होते. संदीप हा अनेक वर्षापासून या संस्थेत सफाईचे काम करीत होता व त्याचा आंतरजातीय विवाह झाल्यानंतर आपल्या पत्नी व एक वर्षाच्या मुलासह कर्मचारी निवासात राहत होता. संदीपने दीड वर्षापूर्वीच सचिनला देखील याच संस्थेत कामाला लावले व त्याला देखील कर्मचारी निवासात घर मिळाले होते, त्याची आई व तो तिथे राहत होते. राहुल मात्र हत्येच्या ५ दिवसापूर्वीच नवीन कर्मचारी म्हणून संस्थेत आला होता व त्याला होस्टेलवर एक छोटी रूम मिळाली होती. संदीप सर्वांचा प्रमुख होता. याच महाविद्यालयात दरंदले यांची मुलगी शिकत होती व तेथेच सचिन आणि तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले, ते दोघेही एकमेकांना भेटत असल्याची त्याची माहिती दरंदले यांना मिळाली. तेव्हा दरंदले यांनी सचिनला तिचा विचार सोडून दे नाहीतर जीवानिशी जाशील अशी धमकी दिली होती . कलाबाई घारू सांगतात कि सचिनला धमकी दिल्याचे सचिननेच त्यांना सांगितले होते तेव्हा सचिन घाबरलेला होता, तरीही त्याने लग्न करण्याचे ठरवले होते. या धमक्यानंतरही ते दोघे भेटत होते हे लक्षात आल्यावर या प्रकरणावर चर्चा करायला दरंदले यांनी अशोक नवगिरे यांच्या कडून संदीपला सचिनसह येण्याचा निरोप पाठवला. दरंदले, संदीप आणि अशोक हे तिघेही मित्र होते, संदीप, सचिन आणि राहुल अशोकने दिलेल्या निरोपानुसार दरंदले यांना भेटायला गेले.

भारतीय सेनेत जवान असलेला संदीपचा भाऊ पंकज थनवर सांगतो कि " १ जानेवारी ला दुपारी ४ पर्यंत दोघांचे फोन लागत नव्हते, वहिनी पूर्ण घाबरलेली होती, त्याच वेळेस पोलिसांकडून तिघांची हत्या झाल्याची बातमी आम्हाला कळाली,याचा खूप मोठा धक्का आम्हाला बसला कारण संदीपचा स्वभाव खूप शांत होता, त्याचे कुणाशी भांडण पण नव्हते"

आरोपी रमेश आणि प्रकाश यांनी स्वताहून पोलीस स्टेशनला जाऊन सेफ्टी टंक साफ करताना संदीपचा बुडून मृत्यू झाल्याचा रिपोर्ट दिला . पोलिस तपासासाठी आले तेव्हा त्यात सेफ्टी टंक मधून त्यांनी ६ फुट उंची असलेल्या संदीपचा मृतदेह बाहेर काढला, २च फुट भरलेल्या सेफ्टी टंक मध्ये ६ फुट माणूस बुडून कसा मरेल? याचा संशय आल्याने पोलिसांनी रमेश दरंदले यांची चौकशी केली तेव्हा दरंदले यांनी संदीप बरोबर आलेल्या दोघांनी ( सचिन आणि राहुलने) त्याला मारून त्यात टाकून पळून गेल्याचे खोटे सांगितले पण पोलिसांनी आजूबाजूचा परिसर तपासला तेव्हा कोरड्या विहिरीचा त्यांना संशय आला त्यात पोलिसांना डोक, हात आणि पाय नसलेले मृत शरीर सापडले, बाजूलाच त्यांचे इतर अवयव देखील पुरले होते, प्रथम सचिन आणि राहुल यांचा मृतदेह ओळखण्यात अडचणी आल्या, कोणता मृतदेह कोणाचा आहे हे कळेना परंतु सचिनच्या छातीवर दरंदले यांच्या मुलीचे नाव गोंदलेले होते त्यामुळे सचिन आणि राहुल यांच्या मृतदेह ओळखता आले. कडबा कापण्याच्या विळ्याने दोघांचे तुकडे करण्यात आल्याचे लक्षात आले, त्या वेळेस रमेश, पोपट आणि प्रकाश (सर्व दरंदले) यांना अटक करण्यात आली. भा.द.वि.च्या ३०२ च्या कलमाखाली खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला पण त्याच वेळेस दलित अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत कोणताही गुन्हा नोंद पोलिसांनी केला नाही. हा गुन्हा ५ दिवसांनी नोंदवण्यात आला.

पोलिसांच्या तपासावर संशय -

१) पोलिसांनी FIR मध्ये दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा हत्या झाल्यावर ५ दिवसांनी दाखल केला हा उशीर का झाला याचे उत्तर पोलिसांकडे नाही

२) हत्येचा गुन्हा नोंदवत असताना हत्येचा हेतू आणि कारणांचा उल्लेख मात्र पोलिसांनी त्यांच्या FIR मध्ये केलेला नाही.

३) हत्या करण्यासाठी आरोपींनी त्या तीन दलित तरुणांना बोलवून घेतले म्हणजे हा हत्येचा कट पूर्व नियोजित होता याचा ही उल्लेख आणि त्या अंतर्गत कलम पोलिसांनी लावले नाही.

४) सचिनच्या छातीवर दरंदले यांच्या मुलीचे नाव गोंदलेले होते पण मृतदेहाच्या पंचनाम्यात पोलिसांनी त्याचा उल्लेख करायला टाळाटाळ केली आहे.

५) दि.१ रोजी जेव्हा या प्रकरणाला वाचा फोडली गेली तेव्हा जिल्हा पोलिस प्रमुख रावसाहेब शिंदे हे मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना संरक्षण दिले गेले आहे असा दावा करीत होते, मात्र गावातील राजकीय दबाव व भीतीमुळे संदीपचे कुटुंबीय हे त्यांच्या नातेवाईकांकडे मालेगाव, नाशिक व सचिन ची आई त्यांच्या मुलीकडे एरंडोल, जळगाव येथे सुरक्षेच्या कारणाने निघून गेले होते.

६) मृत कुटुंबियांचे जवाब पोलिसांनी नोंदवून घेतले नाही.तशी गरजही त्यांना वाटली नाही.

७) जिल्हा पोलिस प्रमुखांनी १ महिना होऊ पर्यंत या हत्याकांडाची माहिती गृहमंत्र्यांना दिली नव्हती, आणि पालकमंत्र्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची माहिती पुरवली नव्हती.

८) जिल्हा पोलिस प्रमुख,जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री या सर्व दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महिनाभरानंतर देखील घटना स्थळाला आणि मृत कुटुंबियांच्या परिवाराची भेट घेतली नव्हती.

९) महिनाभर या प्रकरणातील तपासात कोणतीही प्रगती झाली नाही. दि.७ फेब्रुवारी रोजी गणेश दरंदले आणि अशोक फलके यांना अटक झाली मात्र या हत्याकांडात अनेक लोक असण्याची शक्यता आहे.

या सर्व तृटी नाहीत तर हे जाणून-बुजून झाले आहेत. स्थानिक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या राजकीय नेत्यांचे या प्रकरणात दबाव आहे. त्यामुळे मानव हक्क चळवळीच्या कार्यकर्त्या मनीषा टोकले यांनी कलम ४ नुसार कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलिसांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे.

मीडियाची परिणामकारक व प्रभावी भूमिका -

पंकज थनवर (in military suit)

हत्याकांड झाल्यावर अहमदनगर जिल्ह्यात या प्रकरणाबाबत चर्चा झाली होती मात्र काही दिवसांनी त्याबाबत कोणत्याही बातम्या बाहेर आल्या नाही. पोलिस तपास चालू आहे असे सांगत होते जवळ जवळ दुर्लक्ष करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न राजकीय नेते, जातीय संघटनांचे नेते आणि पोलीस मिळून करत होते. परंतु मानवी हक्क चळवळीच्या कार्यकर्त्या मनीषा टोकले, प्रियदर्शनी तेलंग, सिद्धार्थ शिंदे, राजस्थान काळे, संदीप म्हस्के यांनी हे प्रकरण लावून धरले व आय.बी.एन.लोकमत या लोकप्रिय मराठी वृत्त वाहिनीतून त्यात घमासान चर्चा झाली.तसेच अनेक वृत्त वाहिन्यांनी या बातमीला प्रसिद्धी दिली त्यामुळे ते प्रकरण महाराष्ट्राला आणि देशाला कळू शकले. मिडीयाच्या या परिणामकारक आणि प्रभावी भूमिकेमुळे गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घातले तसेच निवृत्त न्यायाधीश व राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी.एल.थूल यांनी देखील येथे भेट देऊन हत्येच्या कारणाला केंद्र करून तपास करण्याचे आदेश दिले.

सी.आय.डी. तपासाचा सावळागोंधळ-

दि.५ फेब्रुवारी रोजी गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास हा सी.आय.डी कडे सोपवला असल्याची घोषणा केली तर दि.१० रोजी पालकमंत्री बबनराव पाचपुते आणि मंत्री लक्ष्मनराव ढोबळे यांनी सी.आय.डी तपासावर मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल असे सांगितले त्यामुळे सरकार या प्रकरणात गंभीर तर नाहीच पण दिशाभूल करीत असल्याचे समोर आले आहे.

मराठा जात-संघटनांची प्रतिक्रिया -

हत्याकांडाची महिनाभरानंतर सगळीकडे चर्चा सुरु झाल्यावर आणि नागरिकांचा दबाव वाढायला लागल्यावर मराठा संघटनेचे नेते संभाजी दहातोंडे यांनी "मराठ्यांना बदनाम करू नका" अश्या प्रकारे उलटाच पाढा वाचला. इतर वेळी याच संघटना दलित अत्याचार विरोधी कायद्याला तीव्र विरोध करीत असतात. फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ कायम दलित-बहुजन यांना मित्र असल्याचे सांगत असतात पण या घटनेचा विरोध करण्यासाठी मात्र या संघटना रस्त्यावर का उतरल्या नाहीत? असा प्रश्न विचारला जात आहे. सोनई येथे गावात गेल्यावर काही मराठा जातीतील लोक दरंदले यांच्या मुलीवर ज्यांची हत्या झाली आहे ते दलित मुल बर्याच दिवसापासून लैंगिक अत्याचार करीत होते अश्या अफवा पसरवीत होते परंतु या हत्येच्या केवळ काही दिवस अगोदर राहुल कामावर नवीन कर्मचारी म्हणून रुजू झाला होता, तसेच दरंदले यांच्या मुलीने याबाबत कोणताही जबाब पोलिसांना दिला नाही, तसेच सचिन ने स्वताच्या छातीवर त्या मुलीचे नाव गोंदलेले होते आणि ते लग्न करणार होते, सचिनचे तिच्यावरील प्रेम आणि बाकीच्या घटना पाहता ही अफवा जाणीव पूर्वक पीडितांना सहानभूती मिळू नये आणि या अत्याचार विरोधी आंदोलनाचे नैतिक खच्चीकरण करता यावे यासाठी काही जातीयवाद्यांचे कारस्थान आहे.

"त्या"मुलीचे काय झाले?

दरंदले यांच्या मुलीला पोलिसांनी २ वेळा जबाब नोंदवायला बोलावले होते पण भीती आणि मानसिक दबावाखाली तीने कोणताही जबाब दिला नाही, संदीपचे कुटुंबीय जेव्हा घटना स्थळ पाहण्यासाठी गेले तेव्हा त्यांना पाहून ती बेशुद्ध पडली असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. जे लोक खोट्या जातीय प्रतिष्ठेसाठी तीन दलित युवकांचा खून करू शकतात ते आपल्याला ही मारून टाकू शकतात याची भीती असल्याने तीने काहीही बोलण्यास नकार दिला आहे. पण तीचे अश्रू बरेच काही सांगून जातात.

पंकज थनवर याच्या सरकारकडे मागण्या-

संदीपचा भाऊ पंकज याने सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत

१) राजकीय दबाव प्रचंड असल्याने या प्रकरणाचा तपास एक तर सी.आय.डी. कडे द्यावा किंवा संवेदनशील, निरपेक्ष आणि प्रामाणिक पोलिस उप-अधीक्षक या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमावेत.

२) या प्रकरणाचा खटला हा अहमदनगर जिल्ह्याबाहेर नाशिक किंवा जळगाव जिल्ह्यात चालवला जावा.

३) हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा.

४) या खटल्यात मृत व्यक्तींच्या बाजूने सरकारी वकील उज्ज्वल निकम नियुक्त व्हावेत.

५) कुटुंबियांना खटला पूर्ण होईपर्यंत जिल्ह्य बाहेरही संरक्षण द्यावे. पुनर्वसनाची मागणी

या दलित हत्याकांडात जे तरुण मारले गेले ते तीघेही घरातील कर्ते आणि कमावते होते, संपूर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबून होत. त्यांच्या हत्येने त्यांच्या कुटुंबियांचा आधार गेलाय, समाज कल्याण खात्याकडून दिली गेलेली मदत पुरेशी नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निधीतून प्रत्येक कुटुंबाला किमान १० लाखाची मदत करावी, संदीपची पत्नी ही शिकलेली आहे आणि तिच्यावर त्यांच्या एक वर्षाच्या मुलाची जवाबदारी ही आहे त्यामुळे सरकारने तिला नौकरी द्यायला हवी. सचिन घारू याला कुणीही भाऊ नाही त्यामुळे तिची आई आता मुलीकडे एरंडोल जळगाव येथे राहते आहे तिलाही सरकारने उत्पादनाची साधने द्यावीत किंवा त्याच गावात जमीन द्यावी जेणे करून त्या मुलीच्या आधाराने जगू शकतील. आरोपींना शिक्षा आणि पुनर्वसनाशिवाय कुटुंबियांना आणि जातीयवादाला बळी पडलेल्या तीनही तरुणांना न्याय मिळणार नाही.

Honour killing (?)

Honour killing या शब्दाला माझा आक्षेप आहे, त्यामुळे या प्रकरणाला मी Honour killing म्हणणार नाही किंवा तसा शब्द वापरणार नाही. कारण प्रतिष्ठेसाठी बळी (?) म्हणजे कोणाची प्रतिष्ठा? आणि कशाच्या आधारावर? तर त्याचे उत्तर याच संकल्पना मधून सुचित होते कि उच्च जातीय लोकांची प्रतिष्ठा आणि ती देखील जातीच्या आधारावर. मग जे लोक दलित-बहुजन स्त्री-पुरुष आहेत आणि जात-उतरंडीत खालच्या स्तरावर आहे त्यांना माणूस म्हणून प्रतिष्ठा- आत्मसन्मान- अस्मिता नाही काय? हा शब्द जातीय उतरंडीमुळे होणार्या अत्याचारावर बोळा फिरवतो आणि स्त्रीला तिचा जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे याला जातीयवादातून झालेली हत्याच म्हणावे लागेल.मनुस्मृती मधील ३/१२ चा श्लोक हा शूद्रांना उच्च वर्णातील स्त्रीशी विवाह करण्याला बंदी करतो हे लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे या शब्दाच्या वापरातून जात-पित्रुसत्तेने निर्माण केलेले संरचनात्मक दुय्यमत्व आणि शोषणाकडे दुर्लक्ष होते आणि धर्म-राजकीय-सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक अश्या सर्व घटकांशी याचा संबंध नाही असे सुचित होते.परत्नू अश्या जातीय अत्याचाराची बीजे ही याच ब्राह्मणी व्यवस्थेत आहे हे लक्षात घ्यावे लागेल.

आपण काय करू शकतो?

१) आपण या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना याबाबत कायम विचारणा करू शकतो, न्याय मिळावा यासाठी आंदोलने, मोर्चे यातून नैतिक दबाव सरकारवर आणावा लागेल.

२) सरकारकडे कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी आग्रह धरावा लागेल.शक्य असल्यास आपण त्यांना मदत करू शकता.

३) सर्वात महत्वाचे अश्या प्रकारच्या कोणत्याही अत्याचाराबाबत कायम आवाज उठवावा लागेल, आंतरजातीय-धर्मीय विवाह करणाऱ्याना पाठींबा, संरक्षण आणि प्रतिष्ठा द्यायला हवी. संघटीतपणे अश्या जातीयवादाच्या हिंसाचाराविरोधात आणि ब्राह्मणी व्यवस्थेविरोधात एकजूट होऊन लढा उभारावा लागेल.

पंकजशी या विषयावर माहिती घेताना तो भावनाशील झाला आणि शेवटी म्हणाला "देशाचं संरक्षण करताना आम्ही जात-धर्म विसरून आपल कर्तव्य पार पाडीत असतो. पण जर याच जाती-धर्मांमुळे आमच्या कुटुंबियांच्या हत्या होत असतील तर मग आम्ही देशाचे रक्षण का करायचे? आम्ही शत्रूच्या सैनिकाला पकडल्यावर देखील त्याचे देखील हात,पाय आणि डोक तोडून टाकण्याइतकी अमानुष शिक्षा आम्ही त्याला देत नाही, माणूस म्हणून जर समाज जगूच देत नसेल तर काय करायचं? त्यांची ताकद खूप आहे, आम्हाला न्याय मिळाल का? पंकजच्या या प्रश्नच उत्तर माझ्याकडे नाही, तुम्ही देऊ शकता का त्याच्या प्रश्नाला उत्तर.

( हा रिपोर्ट लिहिताना मानवाधिकार चळवळीच्या मनीषा टोकले यांच्याशी झालेल्या चर्चेची मदत झाली)
-------------------------------------
लेखं- कुणाल शिरसाठे.
(अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा कार्यकर्ता.)
ब्लॉग - http://glocalmanus.blogspot.in/2013/02/blog-post_6784.html
प्रसारक - निलेश रजनी भास्कर कळसकर.
https://www.facebook.com/nilesh.kalaskar2
---------------------------------

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

झालं हे अत्यंत वाईट झालं. निषेध करावा तितका कमीच!
मात्र, आता प्रकरण कोर्टात आहे तेव्हा जनाअंदोलनाइतकेच किंबहुना त्याहुन बरेच अधिक महत्त्व योग्य ते साक्षी-पुरावे गोळा करणे, साक्षीदारांचे संरक्षण वगैरेला द्यायला हवे असे वाटते.

बाकी, समाजात एकेकाळी केवळ जातींमुळे हक्क नाकारले गेलेल्या समाजातील व्यक्ती आता संघटित होऊन न्याय मिळवू पाहत आहेत हे पाहिले की बाबासाहेबांच्या कार्याचे महत्त्व दिसून येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+११११११११११११११११११.

बाकी, समाजात एकेकाळी केवळ जातींमुळे हक्क नाकारले गेलेल्या समाजातील व्यक्ती आता संघटित होऊन न्याय मिळवू पाहत आहेत हे पाहिले की बाबासाहेबांच्या कार्याचे महत्त्व दिसून येते.

प्रचंड सहमत!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इन द आउटसेट, ही एक घृणास्पद घटना आहे. त्यात जात कोणतीही असो.. त्या त्या जातिसमाजाला आणि एकूण समाजालाही लाज वाटण्यासारखीच घटना आहे.

आता इंटरप्रिटेशनबद्दल..

ब्राह्मणी विचार, ब्राह्मणी विचार असं वारंवार म्हटलं जातंय. पण लेखात ब्राह्मण समाजाने काही केलेलं दिसत नाही. म्हणजे रुढ अर्थाने "ब्राह्मण" असं ज्याला म्हटलं जातं तोच नव्हे तर इतरही सर्वच उच्चवर्णीयांना यात धरलेलं आहे असं गृहीत धरावं लागतंय.. हेही ठीक.. उच्च्वर्णीय असलेल्या सर्वांचीच मानसिकता एकच आहे असंहे सध्यापुरतं मान्य करु..

मग या केसमधे सुरुवातीला "ब्राह्मणी विचार" असं म्हणून मराठा समाजातील काहीजणांनी केलेल्या हत्याकांडाची माहिती दिली आहे. ब्राह्मणी या शब्दात जर रुढ अर्थाचे ब्राह्मण मोजायचे झाले तर त्यांनी यापूर्वी कधीकाळी केलेल्या जातिभेदाला आत्यंतिक विरोध करुनही आजरोजी असं म्हणावं लागेल की ब्राह्मणाच्या मुलीशी अन्य जातीतल्या कोणी लग्न करु पाहिलं तर काही केसेसमधे विरोध जरुर होतो, पण अधिकाधिक केसेकमधे कमीजास्त नाखुषीने तडजोड करुन का होईना पण लग्नाला परवानगी मिळण्याचं प्रमाणही ब्राह्मणी समाजातच जास्त वाढताना दिसतं. अगदी खुषीने परवानगी दिली नाही तरी ब्राह्मणी समाजात अशा कारणाने हत्याकांड घडवून आणलं गेल्याचं काही ऐकण्यावाचण्यात नाही. .. ऐकण्यावाचण्यात शब्द अशासाठी की उपरोक्त घटनादेखील ऐकण्यावाचण्यानेच आपल्याला माहीत झाली आहे आणि आपण साधारण याच सोर्सने माहिती मिळवू शकतो.

अशा वेळी जे काही होईल त्याला घाऊकपणे ब्राह्मणी म्हणणं योग्य वाटतं का? घटनेच्या निंदनीयतेशी संपूर्ण सहमती दर्शवून हे म्हणू इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण भावनिक धाग्यावर हेच म्हणायचं मी टाळत होतो. संयत शब्दांत अचूक मुद्दे जमले नसते म्हणून गप्प बसलो.
बादवे, वरती ऋ म्हणतात तसं कायदेशीर पद्धतीनं न्याय मिळवण्यासाठी आता योग्य ती तयारी करणं अत्यावश्यक आणी इष्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

एक्झॅक्टली मनोबा... भावनिक ..

भावनेच्या भरात(च) असे घाऊक विचार मूळ धरतात. तर्कशुद्धतेच्या मार्गाने नाही हेच सांगण्याचा प्रयत्न आहे.

एखाद्याच्या प्रिय नजिकच्या व्यक्तीचा भेळ खाऊन विषबाधेने मृत्यू झाला, तर दु:खातिरेकामधे "सर्व यूपीवाले भैय्ये भेळवाले बनून इथे आले आहेत आणि त्यांनी इथल्या मराठी माणसाचा विष चारुन बळी घेतला" अशी भावना जन्म घेऊ शकते. याचा अर्थ विषबाधा फक्त भैय्ये करतात किंवा मराठी मनुष्यांनाच ती होते असा नव्हे. भावनाशील धाग्यांवर जर अशी विधानं झाली तर हे समज दूर करण्याचा प्रयत्न तिथेच, म्हणजे जागच्या जागी झालेला बरा.. नाही का?

जात्याधारित हत्येबाबत वर दिलेलं उदाहरण चपखल नाही हे मान्य आहे. कारण पूर्वीपासून उच्चवर्णीयांकडून झालेल्या अन्यायाची पार्श्वभूमी सत्य आहे. उदाहरण हे उदाहरण म्हणूनच पहायचं आहे..

कायदेशीर पद्धतीने न्याय मिळवण्याविषयी वर व्यक्त केलेली मतं अत्यंत योग्यच आहेत, त्यांच्याशी बाय डिफॉल्ट सहमती. कोणीही अन्यायग्रस्त झाल्यावर न्याय मिळवलाच पाहिजे. आणि कायद्याने न्याय मिळवताना तो "खुनी लोकांना शिक्षा होणे" या स्वरुपाचाच असेल, "ब्राह्मणी विचारांना शिक्षा", "ब्राह्मणांवर किंवा मराठा समाजावर सूड" अशा स्वरुपाचा नसेल याचीही खात्री आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा वेळी जे काही होईल त्याला घाऊकपणे ब्राह्मणी म्हणणं योग्य वाटतं का? घटनेच्या निंदनीयतेशी संपूर्ण सहमती दर्शवून हे म्हणू इच्छितो.

ब्राह्मणवाद, ब्राह्मणी व्यवस्था, इ. शब्द म्हंजे मस्त लेबल्स झालीयेत अलीकडे. अर्थातच, घाऊकपणाबद्दल पूर्ण सहमत. असा नुअ‍ॅन्स्ड अ‍ॅप्रोच एकाच जातीची मक्तेदारी असावा काय? हा वदतोव्याघात आहे याचे भान असले तरी लै झाले. पण फारसे हे भान दिसत नाही हे खरेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुलगा झाला मुलगा झाला
पेढे काढा राव ;
मंत्री महोदय तात्काळ उत्तरले
हा तर विरोधकांचा डाव !
प्रत्येक बाबतीत ब्राह्मणांनाच जबाबदार धरणं आणी झोडणं हा अप्रतिम च्यूत्यापणाच नव्हे काय ?
उच्चवर्णिय म्हणुन एकच जात, आणि दलित म्हणुनही एकच जात ?
च्यायला कसली स्क्रुटीनी ही ? भोकाची ?
बिन बिचकता गाढव चढवला पाह्यजे. हा गाढवंच !

हा लेख मी लिहिलेला नाही. शेअर केलाय. माझा स्वतःचा निव्वळ कुठल्याही कारणास्तव ब्राह्मणसमाजालाच टार्गेट करण्यास प्रचंड विरोध आहे.
माझा याच विषयावरचा एक महिन्यापूर्वीचा ऎसी वरील लेख वाचावा. ही विनंती.
कारण संदर्भ नवे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सतीश वाघमारे यांनी वरच्या प्रतिसादात दिलेले त्यांचे मत वाचले. हेच मत त्यांनी कायम ठेवावे आणि समस्त पुरोगामी मंडळींना पटवून द्यावे हे विनंती.

जातीयवादाचा जाहीर आणि तीव्र निषेध.
जातीवरून रोटीबेटीच्या व्यवहारात हत्या होणे घृणास्पद आहे.
हे कृत्य करणार्‍यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे.

परंतु-

"भारतीय संस्कृतीच्या नावाखाली पोसलेल्या सरंजाम जातीय विकृतींना, हिंसक धर्मवादाचे विष पेरलेल्या ब्राह्मणी विचारांना, लोकशाहीचा डांगोरा पिटणाऱ्या बुद्धिमंतांना, 'फार वाईट झाले' म्हणत जातीय अहंकारात आंधळ्या होणार्या समाजाला. त्यांचा थेट सवाल आहे, माणसाचे माणूसपण नाकारणाऱ्या या सकल ब्राह्मणी व्यवस्थेला!"

-या मांडणीत असलेला पोकळपणा मूळ लेखकाच्या (कुणाल शिरसाठे) लक्षात येत नाही काय?
उदाहरणार्थ, सतीश वाघमारे यांनी (आणि इतर दलित विचारांच्या लेखकांनी) येथे तसेच इतरही माध्यमातून दलितांचे प्रश्न मांडणारे, दलितांचा कैवार घेणारे लेखन केले आहे. त्याला किती वाचकांनी विरोध केला? उलट अशा लेखनाचे कौतुकच झालेले दिसते. नुसते कौतुकच नव्हे तर दलितांचे उत्थापन व्हावे असेही सर्वांना मनापासून वाटते. येथे अथवा इतरही संकेतस्थळांवर या वाचकांमध्ये अनेक जातींचे लोक असतील. त्यांच्यात अर्थातच ब्राह्मणही असतील. परंतु त्यांचे विचार 'हिंसक धर्मवादाचे विष पेरलेले', त्यांची व्यवस्था 'माणसाचे माणूसपण नाकारणारी' हे कसे काय? उलट आजचा ब्राह्मण समाजच जास्तीतजास्त आंतरजातीय विवाहांना मान्यता देताना दिसतो,कोणा दलितास/इतर जातीच्या मनुष्यास स्वतःच्या घरी जेवायला घालताना जातीवरून वेगळे काढत नाही. नव्हे, तसा विचारही करत नाही. अशा ब्राह्मण समाजाविरुद्ध विखारी भाषा वापरून कदाचित राजकारण्यांची मर्जी बहाल Wink होत असेल पण जातीयवादाला खतपाणीच मिळते- हे या प्रकारचे विखारी लेखन करणार्‍या दलित विचारांच्या लेखकांना समजतच नाही काय? या पद्धतीच्या मागासवर्गीय लेखकांनी तरी जात विसरून लिखाण केले आहे काय?

उपरोक्त घडलेल्या घटनेत जे दोन समाज एकमेकांविरुद्ध लढत आहेत त्यात ब्राह्मणांचा काहीच संबंध नाही. तरीही अत्याचार करणार्‍या समाजाविरुद्ध लिहिताना ब्राह्मण समाजाला मध्ये गोवल्याशिवाय तथाकथित पुरोगामी लेखन पूर्ण॑च होत नाही असे दिसते. तुमच्या हत्तीच्या धडका थेट अणकुचीदार खिळे बसवलेल्या महाद्वारावर द्या. जातीयवादाचा किल्ला फोडताना मधल्यामध्ये उंटाचा बळी देऊ नका. बहुतांश ब्राह्मणांनी मनुवाद कधीच सोडला. ते या युद्धात तुमच्या बाजूने आहे हे समजून घ्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना त्यांचेच अनुयायी मातीत घालत आहेत. या अनुयायांच्या अज्ञानाला आणि स्वार्थाला खतपाणी घालून त्याचा फायदा उपटण्याचे कारस्थान सुरू आहे. साप-साप म्हणून भूई धोपटू नका. शिका, वाचा, जागे व्हा आणि पहा की जातीयवाद राजकारण्यांनी जोपासला आहे. अर्थात, झोपल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही, हेही खरे म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ सतीश - जरी तो लेख तुमचा नसला तरी तुम्हाला तुमची comment टाकायला हरकत नव्हती. ४-५ प्रतिक्रिया आल्या म्हणुन लगेच तुम्ही स्वता ला बाजुला काढलेत. हे जर तुम्ही आधीच केले असते तर ते पटले असते.

खरे तर ग्रामिण भागात ब्राह्मण च दलिताचे जीवन जगत आहेत हल्ली. ते सुद्धा त्यांना गावात साहुन दिले तर. शक्य तो हुसकवुन च लावतात.

जे खरे दलित आहेत ( OBC नव्हेत ), त्यांना खरे तर हे समजायला पाहिजे की ब्राह्मण त्यांचे शत्रु नाहीयेत. खरे शत्रु वेगळे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाडी मुळपदावर आली.

आता 'समर्थक' हे लेखन कसे जायीतवादी नाही हे पटवण्यासाठी धावतीलच.

बाकी हा लेख इथे देण्याचे प्रयोजन कळाले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

तुम्ही संस्थळाची मार्गदर्शक तत्त्वेच (मला न कळलेली)पटतील अशी सांगा बरे. हा लेख इथे देण्याचं प्रयोजन काय? यासारखा होपलेस आणि बालीश प्रश्न कसा काय विचारता ? तुम्ही चांदोबाच्या दुनियेत राहत असाल पण सगळ जग नाही राहत हो. तुमच्या भवतालकडे तुम्ही कसं पाहता ? सगळं गुडीगुडीच असेल तर तुमचा ग्रह तुम्हाला लखलाभ !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही संस्थळाची मार्गदर्शक तत्त्वेच (मला न कळलेली)पटतील अशी सांगा बरे

.
काय संबंध ? ह्या लेखाने संस्थळाची ततवे वैग्रे उल्लंघली असे मी कधी म्हणालो ? आणि तुम्हाला मी काही सांगावे आणि तुम्ही ते ऐकावे ह्याची आवश्यकता काय?

हा लेख इथे देण्याचं प्रयोजन काय? यासारखा होपलेस आणि बालीश प्रश्न कसा काय विचारता ?

होपलेस आणि बालीश? का अंमळ तुमचा हेतू उघडे पाडणारा प्रश्न ?
अर्थात कसाही असला तरी त्याचे उत्तर मिळालेले नाहीच.

तुम्ही चांदोबाच्या दुनियेत राहत असाल पण सगळ जग नाही राहत हो. तुमच्या भवतालकडे तुम्ही कसं पाहता ? सगळं गुडीगुडीच असेल तर तुमचा ग्रह तुम्हाला लखलाभ !

मी कुठे राहतो आणि काय करतो, मला जग कसे दिसते ह्या विषयी टिपणी करण्या आधी आपण कुठे आणि काय लिहितो, कशासाठी लिहितो, आपल्यात किती द्वेष भरलेला आहे ह्याची देखील थोडी काळजी का घेत नाही ?

आमच्या भोवतालचे जग कसे आहे आणि काय आहे ह्याची आम्हाला चांगलीच जाणीव आहे. रादर आमच्या दृष्टीने ते बरेच चांगले आहे. ह्या जगात उगाच वडाची साले पिंपळाला लावून 'अन्याय अन्याय' म्हणून गळे काढण्याची आम्हाला नक्कीच गरज पडत नाही. समोरच्याकडे माणूस म्हणून बघता येते आणि त्याची 'जात' हा मुद्दा कधीच मध्ये येत नाही हे देखील आमच्या जगात एक चांगले आहे बघा.

बाकी आम्ही 'लेखन' ह्या विषयावरती प्रतिसाद दिलेला असताना, आपण वैयक्तिक उत्तर दिलेत म्हणून वरचे सर्व लिहिण्याचे कष्ट घेतलेले आहेत. सार्वजनीक ठिकाणी लेखन आले की त्याविषयी चार प्रश्न विचारले जाणारच. मुख्य म्हणजे बालीश आणि होपलेस लेखनावरती प्रश्न देखील बहूदा त्याच प्रकारचे येतात.

असो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

बहुतांश ब्राह्मणांनी मनुवाद कधीच सोडला. ते या युद्धात तुमच्या बाजूने आहे हे समजून घ्या. >> आणि जाती बाहेर च्या विवाहास टोकाचा विरोध तर ब्राह्मण कुटुम्बात अजिबात होत नाही. बाकिच्या जातींमधे जसे वाळीत टाकणे, भावंडांची लग्न न होणे असले प्रकार तर अजिबात होत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अप्रतिम च्यूत्यापणाच नव्हे काय ?

मधे तुमच्या एका लेखाबद्दल मी लिहिले होते की अनावश्यक शिव्यांची काय गरज. तेन्व्हा तुम्ही काहीतरी कारण दिले होते ( जे मला पटले नव्हते ).
आता तुम्हीच शिव्या वापरता आहात, त्याचे ही कारण द्या.

शिव्या देणे आणि त्यासुद्धा स्त्रीयांवरुन हे तुम्हाला फार भुषणावह वाटते का? घरी पण अशाच शिव्या देता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिव्यांवरून अनावश्यक वैयक्तिक कमेंट्स आवरा. लेखकाने तुम्हाला शिवी दिलीय का? नसल्यास उगा फुकाचा थयथयाट कशाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला नाही वाटत की हे दुर्लक्ष करण्या सारखे आहे, आणि स्त्री म्हणुन तर नाहीच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संदर्भहीन अस्मितेची गळवे फुटल्यास फुटूदेत बापडी. दरवेळेसच्या असल्या चीत्कारांना फाट्यावर मारणेच योग्य. आणि तथाकथित संस्कृतिरक्षणाच्या नादात तुम्ही चारित्र्यहननाकडे झुकलात, शोभते का हो हे आँ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिव्यांवरून अनावश्यक वैयक्तिक कमेंट्स आवरा. लेखकाने तुम्हाला शिवी दिलीय का? नसल्यास उगा फुकाचा थयथयाट कशाला?

वैयक्तिक कमेंट्स आवरा. Wink

बॉलमॅन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

वैयक्तिक का जवाब वैयक्तिक से Smile

हंपरम्यान Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाही बाम्या.. लिखाणातल्या पात्रांनी तशी भाषा वापरणं वेगळं आणि प्रतिसादात लेखक हा व्यक्ती म्हणून समोर येताना वापरलेली भाषा यात फरक आहे.

त्याला हरकत घेण्याचा हक्क कोणाला नसला तरी ते न आवडण्याचा आणि तसं म्हणण्याचा हक्क नक्कीच आहे. यात कोणाला उद्देशून शिव्या आहेत तो प्रश्न नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याला हरकत घेण्याचा हक्क कोणाला नसला तरी ते न आवडण्याचा आणि तसं म्हणण्याचा हक्क नक्कीच आहे.

सिमिलर हक्कच मीही बजावतोय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्याही पेक्षा महत्वाचे हे आहे की आपण सर्व मिळुन चांगल्या दिशेनी जायचे आहे की नाही. आपल्यात असलेल्या चुकिच्या सवयी सोडुन पुढे जायचे आहे का, त्याच सवयींना गोंजारत रहायचे आहे.
हा public forum आहे, २ मित्रातल्या गप्पा नव्हेत.

सतीश वाघमारे प्राध्यापक आहेत. ही गोष्ट तर मला जास्त काळजी करण्यासारखी वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय सांगितले आहे यापेक्षा कसे सांगितले आहे याकडे अनाठायी लक्ष दिले तर असे होते. उच्चवर्णीय दिसले की काहीजणांचे पित्त खवळते, काहीजणांना दलित सहन होत नाहीत, तर काहीजणांना शिव्या. त्यापैकीच हा प्रकार आहे. आणि हा पब्लिक फोरम आहे म्हणूनच सांगतो, तुमच्यासारख्या स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांची या किंवा अन्य कुठल्याही फोरमला काडीमात्र गरज नाही. तुमच्यासारख्या सुशिक्षित व्यक्तींनी उचलले बोट, दाबली कळ असे करणे ही गोष्ट जास्त चिंतेची वाटते. सतीश वाघमारेंचे बोलणे काय कसे आहे यावर खल पाहिजे आणि तो इथे ऑलरेडी चालूच आहे. पण एक शिवी दिसली की आशयाकडे दुर्लक्ष करून हिरवेपिवळे होऊन गळे काढणे हा प्रकार तद्दन मूर्खपणाचा आहे.

अर्थात मी अनिर्बंधपणे शिव्यांचा पुरस्कार करतो असेही नाही. पण इतरांच्या संयमाची अपेक्षा करणार्‍यांनी स्वतःचे उदाहरण घालून दिले तर बरे. अन्यथा निव्वळ अवांतर, संदर्भ सोडून केलेल्या थयथयाटापलीकडे इथे काय दिसते? तेही सांगावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझा आक्षेप शिव्यांवर नाहीये तर स्त्रीयांवरच्या शिव्यांवर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते वाटलंच होतं. मग तर अजूनच विनोदी आक्षेप आहे. लैच हसवता ब्वॉ तुम्ही ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बँटमँन धन्यवाद ! अगदी तंतोतंत .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनूराधा तडफडून मरणार्या माणसाचं दुःखही तुम्हाला कलात्मकच हवं का ? मरताना वेदनेनं व्याकुळ होऊन देवाला शिव्या घातल्या म्हणजे त्याचं मरण दर्जाहीन !रागात सुध्दा कलात्मकता ? मनोरंजनाच्या पलिकडे पाहिल्यावर हे प्रश्न पडणार नाहीत. तुम्ही तुमच्या आयुष्यात मनात सुध्दा कधी शिवी उच्चारली नाही का ? याचं खरं उत्तर तुम्ही स्वतःलाच द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनूराधा तडफडून मरणार्या माणसाचं दुःखही तुम्हाला कलात्मकच हवं का ? मरताना वेदनेनं व्याकुळ होऊन देवाला शिव्या घातल्या म्हणजे त्याचं मरण दर्जाहीन !रागात सुध्दा कलात्मकता ? मनोरंजनाच्या पलिकडे पाहिल्यावर हे प्रश्न पडणार नाहीत. तुम्ही तुमच्या आयुष्यात मनात सुध्दा कधी शिवी उच्चारली नाही का ? याचं खरं उत्तर तुम्ही स्वतःलाच द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>हा अप्रतिम च्यूत्यापणाच नव्हे काय ?<<

>>कसली स्क्रुटीनी ही ? भोकाची ?<<

>>बिन बिचकता गाढव चढवला पाह्यजे<<

घडलेली घटना निषेधार्ह आहे आणि घृणास्पदही आहे. पण वाचकांची सहानुभूती मिळवायची असेल, तर हे लक्षात ठेवावं लागेल की ह्या प्रकारची शिवराळ भाषा वापरून तुम्ही काही वाचकांच्या दृष्टीनं निषेधार्ह आणि असभ्य वर्तन करताहात. ह्यात तुमचाच तोटा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आंगाश्शी. अशा शब्दांत सांगितले तर कोण ऐकणार नाही? हे बरोबर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्या लेका आज फुलटॉस वरती फुलटॉस देतो आहे.

एकदा म्हणतोस की :-

काय सांगितले आहे यापेक्षा कसे सांगितले आहे याकडे अनाठायी लक्ष दिले तर असे होते.

आणि मग स्वतःच म्हणतोस की :-

आंगाश्शी. अशा शब्दांत सांगितले तर कोण ऐकणार नाही? हे बरोबर.

म्हणजे वरच्या प्रतिसादात तू देखील 'काय सांगितले आहे यापेक्षा कसे सांगितले आहे' याकडे अनाठायी लक्ष दिलेस. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

नाही. योग्य शब्दांत सांगितल्यामुळे लक्ष दिले, म्हणूनच मान्य केले ना Smile त्याला अनाठायी कसे म्हण्णार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटमॅन फक्त बॅटींग करतोय. बॉल कुठुनही येउदे, बॅट फिरवायची.
चांगले आहे, कोणीतरी enjoy करतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची इनिंग संपली बरे एवढ्यात? चालूद्या की, अजून कित्ती कित्ती मनोरंजन होईल! असे नका करू हो, तसेही इथे तुमच्यासारखे मनोरंजन करणारे विरळाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे पराषेट म्हणजे एक पीडाच आहेत. बारीक लक्ष ठेवून असतात, आणि स्मरणशक्तीही तीक्ष्ण.. इथे तर निदान याच धाग्यावरचा आधीचा प्रतिसाद दाखवलाय. एरवी कधीकधी तीन वर्षापूर्वी आपण कुठेसा दिलेला प्रतिसाद काढूनही पिडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@चिंजं आणि बॅमॅ,

"मुलगा झाला मुलगा झाला...
....
...बिन बिचकता गाढव चढवला पाह्यजे. हा गाढवंच !"

ही एक कविता असावी असे माझे मत आहे. अर्थात,कवीकडून तसा खुलासा अपेक्षित आहेच. तो तसा झाल्यास, कविता हा साहित्याविष्कार असल्याने त्यात येणारे शब्द हे अपरिहार्य असावेत असे कवीला वाटत असावे असे म्हणता येईल.
(साहित्य हा साहित्यिकाच्या आत्म्याचा हुंकार असतो, नाही का?)
ते नाही का, तुम्ही 'गोलपिठा' नाही का वाचले?

त्यामुळे कवीने वापरण्याच्या शब्दांवरचा त्याचा अधिकार मान्य करायला हरकत नसावी. त्या कवीच्या भूमिकेतून बाहेर आल्यावर 'प्राध्यापक' सतीश वाघमारे तसे असभ्य शब्द वापरणार नाहीत अशी आशा बाळगायलाही हरकत नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसूनानाशी हजार टक्के सहमत !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाला हवीय तुमची सहानुभूती ? व्यक्त होणं हे फायद्या तोट्याच्या पलिकडचं असतं. हे ही मान्य करा हो. सहानुभूती व्यक्त करुन भांडायला रस्त्यावर उतरणार आहात का ? शाब्दिक सहानुभूतीसाठी तुम्हाला अपेक्षित रंगबिरंगी गुडी गुडी अभिव्यक्ती स्वीकारणं अवघड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>कुणाला हवीय तुमची सहानुभूती ? व्यक्त होणं हे फायद्या तोट्याच्या पलिकडचं असतं. हे ही मान्य करा हो. सहानुभूती व्यक्त करुन भांडायला रस्त्यावर उतरणार आहात का ? शाब्दिक सहानुभूतीसाठी तुम्हाला अपेक्षित रंगबिरंगी गुडी गुडी अभिव्यक्ती स्वीकारणं अवघड आहे.<<

वाचकवर्गाबद्दल एवढा जर अ‍ॅटिट्यूड असेल तर मग सार्वजनिक ठिकाणी चार वाचकांच्या अ‍ॅटिट्यूडनं फार त्रस्तही होऊ नये. ह्या धाग्यावर पाहिलं तर असं दिसतंय, की तुम्ही धारदार शब्द वापरता, पण इतरांनी आक्षेप घेतले की ते मात्र तुम्हाला पसंत पडत नाहीत. आता पुन्हा 'बालिश' आणि 'होपलेस'सारखी विशेषणं तुम्ही वापरली आहेत असं दिसतंय. ह्या प्रकारच्या व्यक्तिगत टिप्पणी आणि उद्धट अ‍ॅटिट्यूडमुळे पुन्हा तुमच्याच धाग्यावर अवांतर होत राहिलं तर मूळ प्रश्न बाजूलाच पडेल. अशी चिडचिड करून प्रश्न सुटतात असं तुम्हाला वाटत असेल तर असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अजय देवगण, अक्षय खन्ना यांच्या भूमीका असलेल्या आक्रोश सिनेमाची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही धारदार शब्द वापरता>> धारधार शब्द वापरायला काहीच हरकत नाही, पण स्त्रीयांवरच्या शिव्यांना नक्कीच आहे.
जर प्राध्यापकांची ४५% मानव जाती बद्दल( स्त्रीया, आणि आता त्या ५०% पण राहील्या नाहीत )अशीच घाणेरडी मते असतील तर त्यांनी इतरांना जातीयवादी का ठरवावे?

आणि त्यांना शिव्या देणे ह्यातच मोठेपणा वाटत असेल तर मी तरी काय करणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुराधा तुम्ही जबर गफलत करताय. शिवी म्हणजे स्त्रीवादीच ही तुमची धारणा चुकीची आहे. मी नेतृत्वावर गाढव चढवला पाहिजे म्हटलय. कुठेही त्यांच्या आईचा बहिणीचा बायकोचा उच्चार केलेला नाही.भले माझ्या शिवीतील क्रिया अनैसर्गिक आहे. पण चीड व्यक्त करायला ती सक्षम वाटतेय. कुठल्याही स्त्रीचा मी उल्लेख केलेला नाही.तुम्ही खोटा आणि चूकिचा आरोप करत आहात.स्त्रीचा उल्लेख तुम्ही दाखवून दिल्यास मी जाहिर माफी मागेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला या लेखाच्या मांडणीवरुन लेख कुणाचा आहे हे लगेच लक्षात आले. मी तो ब्लॊग वाचला होता. मी कुणाल शिरसाठे यांच्या साधना अभ्यास वर्गाच्या फेबु वर खालील प्रतिक्रिया दिली होती.ती प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेच्या अनुषंगाने होती. पण अन्यबाबतीत ही ती अस्थानी ठरत नाही असे मला वाटते.
"मला चळवळींमधे तसेच आंतरजालावर काही ठिकाणी एक गोष्ट जाणवली. जातीअंताच्या लढ्या ऐवजी जातीय अस्मितेचच राजकारण होताना दिसते आहे.अनेक बुद्धीदांडगे जातीय दरी कमी करण्याऐवजी विश्लेषणाच्या बहाण्यातून जातीय त्वेष व द्वेष फुलत राहतील याचीच व्यवस्था करतात. तरुणांची माथी सतत भडकत राहतील याची व्यवस्था करतात.विवेकी व विचारी अशी भूमिका कुणी घेतली वा घेण्याचा प्रयत्न केला कि त्याला 'भटाळला' विचारांचे बामनी करण झाले अशी दूषणॆ द्यायला सुरवात करतात. असो. विवेक व विद्रोह हे एका ठिकाणी नांदत नाही".
बाकी माझ्या मनातील मुद्दे विसुनाना चिजं व गवि यांनी व्यवस्थित मांडले आहेत. आमचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे ही शब्दरचना तर मी कित्येक वर्षे ऐकतो आहे. यात ब्राह्मण्य म्हणजे काय तर अज्ञानाचा फायदा घेउन केलेले शोषण, समाजात जेजे काही विषमता पसरवणारे आहे ते म्हणजे ब्राह्मण्य. अन्यायाचे जे समर्थन करते ते ब्राह्मण्य.जे जे सकल कुटील ते ब्राह्मण्य. असा तो ब्राह्मण्याचा अर्थ अभिप्रेत आहे. सहवेदनेचा विचार तुम्ही मांडलात की त्याला ब्राह्मणी कावा म्हणतात. अंनिस चे नरेंद्र दाभोलकर देखील या आरोपातून सुटले नाहित. त्यांच्या तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाच्या मनोगतात पान ७ वर वाचा.
सोनई प्रकरणात तुम्ही वा पुरोगाम्यांनी निषेध जरी व्यक्त केलात तरी तो तोंडदेखला आहे ही भावना संतापाने चिडून उठलेल्यांच्या मनात असणारच आहे. त्याला इलाज नाही. उद्या तुमच्यावर जर ही वेळ आली तर तुमचेही संतुलन बिघडणारच आहे. तिथे विवेक काम करणार नाही. सध्या मेंदुच्या मनात हे सुबोध जावडेकरांचे पुस्तक वाचतो आहे. त्यात माणसे शिव्या का देतात? हे तशीच अनेक प्रकरणे वाचण्यासारखी आहेत.
सोनई प्रकरणातील पिडिताच्या आईची हाक काळजाला हात घालणारी आहे.कुठल्याही जातीजमातीत घडली तरी माणुसकीला काळिमा फासणारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

काही सुटे सुटे प्रतिसाद देतो. ते व्यक्तींना उद्देशून नाहीत. मुद्द्यांना आहेत (अशी आशा. )

- मूळ लेखातल्या घटनेचा निषेध. मूळ लेख इथे दिल्याबद्दल आणि पर्यायाने अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवल्याबद्दल वाघमारे यांचे अभिनंदन. हा प्रयत्न त्यांनी इंटरनेटच्या संदर्भात करत राहावं अशी आशा.

- "ब्राह्मणी व्यवस्था, ब्राह्मणी विचार" यांसारख्या संज्ञा, शिव्यांचा वापर , चटकन् एकेरीवर, हमरीतुमरीवर येणं हे सर्व लेखाच्या आणि समाजातल्या एकंदर देवाणघेवाणीला मारक आहे. मूळ लेखकाला, वाघमारे यांच्या सारख्यांना "वाचकांच्या सहानुभूतीची आवश्यकता नाही" यांसारखी विधानं spur of the moment आणि भावनिक स्वरूपाची असली तरी अंती खरी नव्हेत. ज्यांच्यावर अन्याय होतो आहे त्या समाजाच्या प्रश्नाकडे अन्य समाजाचं लक्ष वेधून घ्यावं, त्या अन्यायाच्या विरोधात अन्य लोकांना सामावून घ्यावं हाच शेवटी या अशा प्रकारच्या साहित्याचा, चर्चेचा, देवाणघेवाणीचा उद्देश आहे असं मी मानतो. "तू मला मेलास" असं जरी एखाद्या भावाने संतापाच्या भरात म्ह्ण्टलं तरी शेवटी राग शांत झाल्यावर त्याच भावाशी बोलायला जाण्यासारखंच ते आहे.

- जितक्या लवकर आपण भावनेच्या भरात अद्वातद्वा बोलायचं थांबवू तितक्या लवकर प्रश्नांच्या जटिलतेचा अभ्यास, त्या प्रश्नांना सोडवण्यासाठीचा संवाद, सामावून घेण्याची प्रक्रिया या गोष्टीना वेग येईल. त्या परिणामाकरकरीत्या घडतील.

अशा स्वरूपाचे लेख वेळोवेळी येथे यावेत. अधिकाधिक लोकांपर्यंत या प्रश्नांचं वास्तव पोचावं. विद्रोह, प्रबोधन आणि परिवर्तनाची चळवळ अधिकाधिक समावेशक बनो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

लेखकाला याचकाच्या भुमिकेत उभं करणं जबरदस्त अयोग्य वाटत. सहानुभूती हवी तर अभिव्यक्तीत तडजोड कर. काय हे ? कशाला हवी सहानुभूती ? माझ्यापुरता मी लेखनावर पोटार्थी आणि लेखनाच्या इतर फायद्यांचा भुकेला निश्चितच नाही. कृपया गैरसमज नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>. सहानुभूती हवी तर अभिव्यक्तीत तडजोड कर. काय हे ? कशाला हवी सहानुभूती ?
हाण्ण्ण... हा जोरदार आहे. Smile सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>> लेखकाला याचकाच्या भुमिकेत उभं करणं जबरदस्त अयोग्य वाटत. सहानुभूती हवी तर अभिव्यक्तीत तडजोड कर. काय हे ? कशाला हवी सहानुभूती ? माझ्यापुरता मी लेखनावर पोटार्थी आणि लेखनाच्या इतर फायद्यांचा भुकेला निश्चितच नाही. <<<

कुणीही कुणाला याचकाच्या भूमिकेत उभं केलेलं नाही. त्याकरता तडजोड करा हेही म्हण्टलेलं नाही. आणि तुम्हाला कुणी पोटार्थी किंवा "इतर फायद्यांचा भुकेला" असंही म्हण्टालेलं नाही. जे म्हण्टलेलंच नाही त्याचा प्रतिवाद करणं म्हणजे डॉन क्विक्झोट (की "किओटे" ?) सारखं तलवारी चालवणं झालं. पण असो.

अवांतर : तुमच्या असल्या प्रतिसादांना "हाण्ण्ण जोरात..."सारखे score settling प्रतिसाद येणं हे "लेखनाचे इतर फायदे" या सदरात येतं का हो ? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

>>. अवांतर : तुमच्या असल्या प्रतिसादांना "हाण्ण्ण जोरात..."सारखे score settling प्रतिसाद येणं हे "लेखनाचे इतर फायदे" या सदरात येतं का हो ?
(तिरपा आणि जाड ठसा माझा)
हाहाहाहा... नाही जमला हा कावा. सबब पास, माझे मूळ मत कायम!
माझ्यावर इथे एक स्कोअर झाला हे मात्र मान्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहाहा... छानच चाललंय... चालू द्या...
एका ऐतिहासीक प्रक्रियेची आठवण झाली. अलीकडच्याच काळात निधन पावलेले एक भारी व्यक्तीमत्त्व तशा प्रक्रियेतून कसे आकाराला येते याचे दर्शन एका नाटकातून झाले होते, असे आठवते.
(आता इथं मी सोनई हत्याकांडाचा निषेध वगैरे केला नसल्याने माझ्यावर आगपाखड होईल... पण तोही त्या प्रक्रियेचाच एक भाग मानला पाहिजे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>कुठेही त्यांच्या आईचा बहिणीचा बायकोचा उच्चार केलेला नाही.भले माझ्या शिवीतील क्रिया अनैसर्गिक आहे. पण चीड व्यक्त करायला ती सक्षम वाटतेय. कुठल्याही स्त्रीचा मी उल्लेख केलेला नाही.तुम्ही खोटा आणि चूकिचा आरोप करत आहात.स्त्रीचा उल्लेख तुम्ही दाखवून दिल्यास मी जाहिर माफी मागेन.<<

तुम्ही जितके अधिक व्यक्त होत आहात तितके अधिक अडचणीत सापडता आहात असं दिसतं आहे. आता वर तुम्ही योजलेले 'च्यूत्यापणा' आणि 'भोकाची स्क्रुटीनी' ह्या शब्दप्रयोगांचा मराठीत शिवी म्हणून वापर होतो त्यामागे दोन गोष्टी आहेत - १. स्त्रीच्या गुह्यांगासाठी योजले जाणारे शब्द त्यात आहेत. २. एखाद्याच्या (तथाकथित) मालकीच्या स्त्रीशी बळजबरी संभोग केला तर तो त्याचा अपमान होतो ही पुरुषप्रधान संकल्पना त्यात अंतर्भूत आहे. तसाच मुद्दा 'च्यायला' ह्या शब्दाबाबतीत आहे. तिथे एखाद्याच्या आईशी केलेल्या अपवर्तनाचा संदर्भ आहे.

आता असं दिसतंय, की एकीकडे तुम्ही कवित्वाचा परवाना (पोएटिक लायसेन्स) मागताय, पण दुसरीकडे आपणच वापरत असलेल्या तथाकथित सक्षम शिव्यांमध्ये स्त्रियांचा अपमान करण्याची क्षमता का आहे, हेच तुम्हाला कळत नाही. म्हणजे शब्द वापरायचं स्वातंत्र्य तर हवं, पण त्यांची जबाबदारी नको आहे, किंवा ती जबाबदारी आपल्यावर पडते हेच समजत नाही आहे. तुमचा हा सगळा पवित्रा तुम्हीच मांडत असलेल्या विषयाच्या गांभीर्याला मारक ठरतो आहे असं वाटत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

च्यायला ! पुढे काय ? काहीच नाही. हे इथच संपल. मी वाढलेल्या ग्रामीण भागात तरी (इतर भागांचे उल्लेख तूर्तास टाळू) संडासला वावरात जोडीने गलेले मित्र ज्याची आधी होते. तो दुसर्याला विचारतो झाली का ? तो जर हो म्हटला तर विचारणारा म्हणतो गांड धुतली का ? च्यूत हा शब्द कदाचित इथे फक्त स्त्रीशी बांधलाय . त्याचं मराठी रुप 'गांड' हे माझ्या भवतालात चौखूर आढळते. म्हणुन मी वापरले . कुठल्याही स्त्रीला गृहीत न धरता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो गाव तर मागे सोडून आलो ना. Smile

संवादाचे काही संकेत निर्माण होण्यामागे गैरसमजांमुळे क्षुल्लक बाबींवरच वेळ दवडावा न लागणे हेही एक कारण असते. तुम्ही वर्गात विद्यार्थ्यांशी बोलतांना काही संकेत पाळत असालच. प्रतिसाद देतांना येथेही काही संकेत पाळले जावेत ही वाजवी अपेक्षा आहे. तुमच्या ललित लेखनात आढळणार्‍या भाषेविषयी हा आक्षेप नाही, हे कृपया ध्यानी घ्यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रस्तुत घटनेचा निषेध नोंदवावा तितका थोडाच आहे. श्री. कुणाल शिरसाठे व सतीश यांनी तपशीलासकट सदर घटनेची माहिती दिल्याबद्दल त्यांचे आभार.

<नंदीय विश्लेषण>महाराष्ट्राच्या ग्रामीण व निम्नशहरी भागांत जातीभेद प्रकर्षाने जाणवतो. शहरांत तो तसा जाणवत नाही. ब्राह्मण समाज मूख्यतः शहरी भागांत असल्याने त्यांचा वावर होत असलेली सोशल नेटवर्क्स निराळी आहेत तसेच या नेटवर्क्समध्ये आढळून येणारा जातीभेदही. तेव्हा 'ब्राह्मणेतरांचा' जातीभेद 'जाणवतो' कारण त्यांची नेटवर्क्स व त्यांत दिसणारा तीव्र जातीभेद हे अधिक व्हिजिबल आहेत म्हणून.<नंदीय विश्लेषण>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्राध्यापक सतीश वाघमारे ह्यांच्या लेखनातील नित्याची शिवीगाळ आणि त्याचे समर्थन ज्यांना आवडत नसेल त्यांनी सन्माननीय प्राध्यापकांच्या असल्या लिखाणावर प्रतिक्रिया देऊ नये असे मी सुचवितो.

मागे 'उपक्रम'मध्ये एका सदस्याने स्त्रियांबद्दल असेच अनुदार उद्गार काढले आणि त्याचे निर्लज्ज समर्थनहि केले. तेव्हांपासून त्यांच्या लिखाणाकडे दुर्लक्ष करायला वाचकांनी सुरुवात केली आणि त्या सदस्याचे लिखाण त्यामुळे बंद झाले असे आठवते. कोणीहि काहीहि आव आणला आणि बेपर्वाई दाखविली तरी आपले लिखाण लोकांनी वाचावे आणि त्यावर लिहावे असे प्रत्येक लेखकास वाटते आणि म्हणूनच तो आपला वेळ खर्च करून येथे लिहीत असतो. निष्काम कर्मयोगी कोणीच नाही.

माझ्यापुरते मी हे बरेच दिवस करीत आहे. येथे अगदीच राहवले नाही म्हणून इतरांनाहि ही सूचना करीत आहे. एखाद्याने आपल्यासमोर कपडे काढायचेच ठरविले तर आपण काय करू शकतो? फारसे काही नाही, कपडे काढणारा आणखीनहि चाळे सुरू करेल पण डोळे बंद करून घेणे हे तर आपल्या हातात आहे की नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखात एक हृदय पिळवटणारा अनुभव मांडलेला आहे. जरी स्वतःला हा रिपोर्ट म्हणवत असला तरी तसा निर्विकार रिपोर्ट नाही. एका भयाण घटनेने हेलावून जाऊन तिच्यातून दिसणाऱ्या जहाल सत्याचं ते भावनात्मक वर्णन झालेलं आहे. दुर्दैवाने भावनेच्या भरात एका उत्तम लेखात काही मोजके वाकडे शब्द आलेले आहेत. त्यातले विचार अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून तसेच ठेवलेले आहेत. एक बदनामीकारक ठरू शकेल असं विधान होतं, एका विशिष्ट व्यक्तीवर कटाचा आरोप करणारं, ते काढून टाकलेलं आहे.

अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपणं आणि त्याचबरोबर जातीय तेढ माजवणारे विचार येऊ न देणं ही तारेवरची कसरत आहे. तूर्तास संशयाचा फायदा लेखकाला देण्यात आला आहे. ते किंवा तसे विचार पुन्हा पुन्हा आले तर मात्र त्यांना तो संशयाचा फायदा मिळेलच असं नाही.

मूळ लेखातल्या काही विधानांवर वाचकांनी अनेक आक्षेप घेतले. याला काहीच हरकत नाही, पण अनेक ठिकाणी, अनेक सदस्यांमध्ये यावरची चर्चा अतिशय वैयक्तिक झाली. ऐसी अक्षरे वर हे होऊ नये अशी इच्छा आहे. गंभीर विचार मांडताना एक तटस्थता आवश्यक असते. विचार मांडणाऱ्याच्या हेतूंविषयी न बोलता त्या विचारांविषयी बोलणं आवश्यक असतं. त्यासाठी एक शिस्त असावी लागते. दुर्दैवाने या लेखावरच्या चर्चेत ही शिस्त अनेक ठिकाणी मोडली गेलेली दिसली. हे इथे विशेष दुर्दैवी आहे कारण लेखाचा नाजूक विषय लक्षात घेता खरं तर जास्त काळजीपूर्वक त्यावर चर्चा होण्याची गरज होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धाग्यातील बातमी वाचून त्या अन्यायाबद्दल मन आक्रोशले.
प्रतिक्रियांचे युद्ध वाचून विषाद वाटला.
ऐसी अक्षरे चे विवेचन वाचून आश्चर्य वाटले.
कुठल्याही संस्थळावर स्त्रिया सभासद असतातच. त्यांच्या उपस्थितीत जी भाषा वापरली गेली आणि त्याचे समर्थन केले गेले. या संस्थळाला तरी हे शोभले नाही.
राग,चिडचिड व्यक्त करण्याचे अनेक मार्ग असतात. त्यातील सुसंस्कृत मार्गच सर्वांनी आचरावा अशी अपेक्षा ठेवली तर ती गैर आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(विशिष्ट व्यक्तीवर जाहीर आरोप करणारं एक वाक्य काढून टाकलेलं आहे. - संपादक)

सदर लेख येथे देणार्‍या व्यक्तीची (वाघमारे)_आणि सदर लेखाच्या मूळ लेखकाची (शिरसाटे) या संपादनाला मान्यता आहे काय?
मूळ लेखात लिहिलेले वाक्य 'ऐसी अक्षरेचे'संपादक कसे काय काढू शकतात?
समजा ही कारवाई संपादकांनी परभारेच केली असेल तर मग एका विशिष्ट जातीचा किंवा सर्वच जातींचा आणि विशेष नामांचा उल्लेख लेखातून काढण्याची माझी मागणी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहूदा हे ’ब्राह्मणी संस्थळ’ नाही असे दाखवण्याचा हेतू असावा. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

नेमके काय संपादित झाले हे मला तरी समजले नाही. ब्राह्मणी व्यवस्था हे शब्द येथे दिसताहेत. ते संपादित व्हावेत, असे मला वाटत नाही. आडात आहे ते पोहऱ्यात येतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"यातूनच दरंदले यांनी हा हत्येचा कट रचला."

हे वाक्य संपादित झाले आहे. पण ते येथे आहेच.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे संस्थळावर कायदेशीर कारवाई होईल असे वाटत असेल तर मग हा पूर्ण लेखच इथून गायब करावा लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही गरज नाही त्या संपादनाची. मूळ लेखात (खरे तर, "सत्यशोधन अहवाला"त) तो उल्लेख आहे. तो येथे तसाच असला पाहिजे. तो काढला याचा अर्थ अप्रामाणिकपणा असा होतो. कारण, संदर्भ तोडून, संदर्भांना पूरक तपशील घालवून लेखन प्रसिद्ध करणे असे ते होईल, आणि त्यातून वाचकाला पूर्ण माहिती मिळणार नाही.
अशा लेखाच्या शेवटी 'या लेखात व्यक्त झालेल्या मताशी 'क्षयज्ञ' सहमत असतीलच असे नाही' असे स्पष्टीकरण टाकता येते.
न्यायप्रक्रिया वगैरेसाठी लेख येथून काढावयाचा असेल तर ते अधिक उत्तम. आपले पाय मातीचेच असतात, हे मान्य करणे केव्हाही श्रेयस. प्रेयस नसले तरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुराधा आणि परिकथेतील राजकुमार यांचे प्रतिसाद भयंकर आहेत. घडलेल्या क्रुर घटनेबद्दल निषेधाचे एक अवाक्षरही न काढता , प्रतिसादामधे मी लिहिलेल्या मुक्तछंदातील कवितेतल्या भाषेवर यांनी बराच खल केला. त्यांना बहूत चिंता वाटली मी प्राध्यापक असण्याची आणि वर्गातल्या भाषेची. मी वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विषय शिकवतो. ज्ञानेश्वर आणि तुकाराम तसेच बोरकर आणि ढसाळही बिनबिचकताच शिकवतो. उच्चारल्या जाणार्या शब्दामागची भावना त्या शब्दाचा मुळ अर्थ व्यक्त करते. कोल्हापूरात लहान बाळापासून म्हातार्या माणसापर्यँत 'रांडचा' हा शब्द वापरला जातो. तो केवळ शिवीच ठरत नाही ' च्यायला ' उच्चारल्यावर केवळ अज्ञात अपेक्षित ठरते कुणाची आई बहिण नाही . बाकी शारिर अवयवांचे समान उच्चार मी आधीच्या प्रतिसादात सांगितले आहेत. अनुराधा शिव्या केवळ स्त्रीवादीच असतात ही तुम्ही जबरदस्त चुकीची धारणा करुन घेतली आहे. स्त्रीवादी आणि पुरुषवादी हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. असो घडलेल्या क्रुर घटनेबद्दल तुम्हाला काहीच न वाटता, केवळ तुमचा जबरदस्त स्त्रीवाद दुखावला गेला. तोही लेखातून नव्हे तर माझ्या प्रतिसादातील कवितेतून ! तर त्या बद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो. Smile
मुक्तसुनित चिंतातूर जंतूच्या प्रतिसादामधे वाचकाची 'सहानुभूती हवी असेल तर ', असा उल्लेख आहे. म्हणुन मी लेखकाला याचक म्हणुन उभं करणं योग्य नाही. आणि सहानुभूतीकरीता अभिव्यक्तीत तडजोड अवघड आहे असं म्हटलं. त्यामुळे गैरसमज नसावा ही विनंती.
परिकथेतील राजकुमार हे अत्यंत अवघड प्रकरण ! यांच्या प्रतिसादाची सुरुवातच यांची बौद्धिक, वैचारिक, मानसिक कुवत दाखविणारी !
'आली गाडी मुळ पदावर ' ही त्यांची सुरुवात ! काय व्यक्त होतं याच्यातून ? इथले अँडमिन सांगू शकतील काय ? निव्वळ मला जातीयवादी ठरवणं ! म्हणुन त्यांनी लेख इथे टाकण्याचं प्रयोजन विचारणं हा प्रश्न मला ठामपणे होपलेस आणि बालिश वाटतो. या संस्थळावर लिखानाचे वेगवेगळे भाग आहेत. ललित, कथा, कविता, समीक्षा,चर्चाविषय. मी चर्चाविषय, सामाजिक या शिर्षकात हा लेख टाकला. सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीकोनातून काही सकस चर्चा व्हावी या हेतूने. परिकथेतील राजकुमार इथे माझ्यापेक्षा खूप जुने आहेत. त्यांना संस्थळाचे विभाग हेतु निश्चितच माहित असणार. म्हणुन त्यांना मार्गदर्शक तत्वे विचारली. ते म्हणाले सांगणारा मी कोण ? मग प्रयोजन विचारणारे तरी हे कोण ? माझे हेतु उघड पाडणारा अंमळ प्रश्न ? हा तुमचा दुसरा प्रतिसाद. परिकथेतील राजकुमार माझे हेतु आणि तुमची वृत्ती दोन्हीची तुलना करा. माझा हेतु निश्चितच विधायक जाणवेल. द्वेष कोणात किती भरलाय हे तुमच्या प्रतिसादाच्या सुरुवातीतूनच लक्षात येतं. क्रुरपणे मारले गेलेले तीन तरुण, जे दलित आहेत हा महत्त्वाचाच भाग आहे पण याही पलिकडे माणूस म्हणुन त्यांच्या दुःखाला जात नसावी. ते माणसाचं म्हणुनच जाणावं. आणि कमीतकमी तिव्र निषेध तरी व्यक्त करावा ही अपेक्षा देखील तुमच्या सारखा चांदोबाच्या दुनियेतील राजकुमार करु शकत नाही. याचं मला सखेद आश्चर्य वाटते. असो.
या संस्थळावर व्यक्त होण्यासाठीच्या आवश्यक निकषांमधे मी बसणारा नाही. तसेच ते निकष मला मानवणारे नाहीत. त्यामुळे यापुढे मी इथे लिहिणार नाही. कसलाही सहभाग घेणार नाही. माझ्याकडून ज्यांची मने दुखावली गेली त्यांनी त्यांची मने दुखावण्याचा माझा हेतु कधीच नव्हता. यावर विश्वास ठेऊन उदार मनाने मला माफ करावे ही नम्र विनंती. इथे खूप चांगल्याही व्यक्ती भेटल्या ज्यांच्या चर्चेतून निश्चितच माझे विश्व समृध्द झाले. त्यांचे मनापासून आभार मानतो. इथे लिहिण्याची संधी दिल्याबद्दल अँडमिन्सचे मनःपूर्वक आभार.
नमस्कार _____/\_____

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे देवा. तुम्ही तर फारच सिरियस झालात. अहो तुम्ही स्वतःचं असं एरवी जे लिहीता ते फार चांगलं आहे. अश्या प्रतिक्रियांच्या शाब्दिक युद्धावरुन थेट लिहीणं थांबवू नका. कोणत्याही संकेतस्थळावर हे असं चालायचंच. इथे कोणी तुमचे शत्रू आहेत असं मुळीच नव्हे. परिकथेतील राजकुमार किंवा अन्य व्यक्तिमत्वंदेखील बराच काळ अशा चर्चांमधे भाग घेत आहेत. परिकथेतील राजकुमार यांच्याशी अनेकांचे , अनेकांचे कशाला, माझेच अनेकदा मतभेद आणि भांडण झालेलं आहे. पण तरीही व्यक्तिमत्वाला अनेक बाजू असतात. हेच प.रा. एखाद्या आवडलेल्या लेखावर आवर्जून चांगली प्रतिक्रियाही देतात. याउपर त्यांनी व्हर्च्युअल आयुष्यातून लोकांना आपल्या वैयक्तिक आयुष्यातही घेऊन मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले आहेत. तेव्हा केवळ काही आंतरजालीय प्रतिसादावरुन एखाद्या आयडीला पूर्णपणे जोखू नका.

प्रत्येक सदस्याला आधीच्या चर्चा आणि आपापली बनत गेलेली मतं यांची पार्श्वभूमी असते. सर्वत्रच एकमेकांशी सहमती होईल असं नाही हे वेगळं सांगायला नकोच. तेव्हा माझी अशी विनंती आहे की तुम्ही इथे लिखाण थांबवण्याचा टोकाचा निर्णय घेऊ नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गविंशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

परिकथेतील राजकुमार हे अत्यंत अवघड प्रकरण ! यांच्या प्रतिसादाची सुरुवातच यांची बौद्धिक, वैचारिक, मानसिक कुवत दाखविणारी !

पुन्हा वैयक्तिक.

श्री.वाघमारे, माझी ’बौद्धिक, वैचारिक, मानसिक कुवत’ मोजण्याची तुमची खरच तयारी आहे का? मुळात तुम्हाला तो अधिकार आहे का?

'आली गाडी मुळ पदावर ' ही त्यांची सुरुवात ! काय व्यक्त होतं याच्यातून ? इथले अँडमिन सांगू शकतील काय ?

ती प्रतिक्रिया लिखाणाला उद्देश्यून होती. तुम्हाला का बोचली बरे ?

निव्वळ मला जातीयवादी ठरवणं ! म्हणुन त्यांनी लेख इथे टाकण्याचं प्रयोजन विचारणं हा प्रश्न मला ठामपणे होपलेस आणि बालिश वाटतो.

चोराच्या मनात चांदणे. ह्या आधी देखील वेगवेगळ्या विषयावरच्या काही धाग्यांवरती मी हा आणि हाच प्रतिसाद दिलेला आहे. मुळात ह्या प्रश्नात काय चुक आहे ? मी प्रयोजन विचारले, कारण तुम्ही नुसतेच कोणाचे तरी लिखाण इथे आणून डकवले होते. त्यावर तुमची स्वत:ची अशी काहीच प्रतिक्रिया नव्हती.

या संस्थळावर लिखानाचे वेगवेगळे भाग आहेत. ललित, कथा, कविता, समीक्षा,चर्चाविषय. मी चर्चाविषय, सामाजिक या शिर्षकात हा लेख टाकला. सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीकोनातून काही सकस चर्चा व्हावी या हेतूने.

काय सांगताय काय ? ’गांड, चुत्या..’ वैग्रे शब्द वापरुन ’सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीकोनातून काही सकस चर्च’’ घडू शकते हे माझ्यासाठी नवीनच आहे बघा.

परिकथेतील राजकुमार इथे माझ्यापेक्षा खूप जुने आहेत. त्यांना संस्थळाचे विभाग हेतु निश्चितच माहित असणार. म्हणुन त्यांना मार्गदर्शक तत्वे विचारली. ते म्हणाले सांगणारा मी कोण ? मग प्रयोजन विचारणारे तरी हे कोण ?

मी कोण ? मी तुम्ही इथे जे काही लेखन पाडता आणि ज्यांनी वाचावे म्हणून पाड्ता तो एक वाचक.

माझे हेतु उघड पाडणारा अंमळ प्रश्न ? हा तुमचा दुसरा प्रतिसाद. परिकथेतील राजकुमार माझे हेतु आणि तुमची वृत्ती दोन्हीची तुलना करा. माझा हेतु निश्चितच विधायक जाणवेल. द्वेष कोणात किती भरलाय हे तुमच्या प्रतिसादाच्या सुरुवातीतूनच लक्षात येतं.

खीक्क !! ROFL

क्रुरपणे मारले गेलेले तीन तरुण, जे दलित आहेत हा महत्त्वाचाच भाग आहे पण याही पलिकडे माणूस म्हणुन त्यांच्या दुःखाला जात नसावी. ते माणसाचं म्हणुनच जाणावं. आणि कमीतकमी तिव्र निषेध तरी व्यक्त करावा ही अपेक्षा देखील तुमच्या सारखा चांदोबाच्या दुनियेतील राजकुमार करु शकत नाही. याचं मला सखेद आश्चर्य वाटते. असो.

मग तसे लिहायचे ना लेखाखाली, की बाबांनो हे वाचा आणि ’कमीतकमी तिव्र निषेध तरी व्यक्त करा’. आम्ही आहोत दगड. आम्हाला कोणी मेले, जन्माला आले ह्याचे काही सोयर सुतक नाही. आम्ही आंतरजालावरती येतो ते चार क्षण करमणुक होण्यासाठी आणि लोकांची करण्यासाठी. उगा निषेध/ श्रद्धांजली / कौतुक करणे असल्या प्रकारात आम्हाला रस नाही. स्वत:चे पैसे खर्च करुन लोकाचे निषेध आणि कौतुके कसली करत बसायची ?

या संस्थळावर व्यक्त होण्यासाठीच्या आवश्यक निकषांमधे मी बसणारा नाही. तसेच ते निकष मला मानवणारे नाहीत. त्यामुळे यापुढे मी इथे लिहिणार नाही. कसलाही सहभाग घेणार नाही. माझ्याकडून ज्यांची मने दुखावली गेली त्यांनी त्यांची मने दुखावण्याचा माझा हेतु कधीच नव्हता. यावर विश्वास ठेऊन उदार मनाने मला माफ करावे ही नम्र विनंती. इथे खूप चांगल्याही व्यक्ती भेटल्या ज्यांच्या चर्चेतून निश्चितच माझे विश्व समृध्द झाले. त्यांचे मनापासून आभार मानतो. इथे लिहिण्याची संधी दिल्याबद्दल अँडमिन्सचे मनःपूर्वक आभार.
नमस्कार _____/\_____

हे लिहिण्याचे प्रयोजन कळाले नाही. तुमची लेखणी थांबल्यावरती ते आपोआप कळले असतेच की.

बाकी जाता जाता.. ’बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले..’ हे आठवले. आपण आपल्या वरील विचारांवरती ठाम राहिल्यास, आपल्या पदकमलांचा एक फटू पाठवावा. तो खरडवहीत आम्ही नित्यवंदनासाठी अवश्य लावू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

परिकथेतील राजकुमार या संस्थळावर फक्त लिहिने थांबवतोय. पदकमलांचा फ़ोटो कशाला मागताय ? फेसबुकच्या भिँतीवर मी बसलोच आहे. कधीही दर्शन घ्यायला या ! तुमचं स्वागतच आहे. अंगभर कपडे घालून तुम्हाला दर्शन देतो. हो बालमनाची काळजी घ्यायलाच हवी. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घडलेल्या क्रुर घटनेबद्दल निषेधाचे एक अवाक्षरही न काढता ,

मी मुद्दाम अवाक्षर काढले नाही कारण तुमचा हा लेख इथे देण्याचा उद्देश माहिती नव्हता ( आणि तो सरळ पण दिसत नव्हता ). बरे ही घटना पण सर्वांना ( कमीतकमी मला तरी ) माहिती होती. पेपर ला पण बरेच लिहुन आले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी स्त्रीयां वरच्या शिव्या असा शब्द वापरला होता. स्त्रीवादी शिव्या म्हणजे काय मला माहिती नाही.

तुमचा जबरदस्त स्त्रीवाद दुखावला गेला.

हे दुर्दैवी आहे, तुम्ही पण एका स्त्रीच्या पोटी जन्म घेतला आहे. तरी पण अश्या शिव्या देणे तुम्हाला बरोबर वाटते.

मी वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विषय शिकवतो. ज्ञानेश्वर आणि तुकाराम तसेच बोरकर आणि ढसाळही बिनबिचकताच शिकवतो

हे ही तुम्ही तुमच्या शिव्यांचा अमुल्य खजिना वापरुनच शिकवत असणार. तुम्हाला अभिव्यक्तीला शिव्या लागतातच पण बोरकर, तुकाराम, गाडगेबाबा, बहिणाबाई, नामदेव, सावता ह्यांना त्या न वापरता सुद्धा अभिव्यक्ती करता आली. आणि त्यांचे साहित्य शतकानु शतके टिकुन राहिले. हे लक्षात घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण जात आहात !
काही हरकत नाही !
आपण गेलात तर !
काही बिघडत नाही !
पण,
.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.
.
आपली जात बरोबर घेऊन जा ??????????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ लेखनातील 'ब्राह्मणी व्यवस्था' या शब्दांपुरते -
या संकल्पनेची व्याख्या या लेखनानुसार करावयाची का? करावयाची नसेल तर ते शब्द या लेखात येणेच अनुचित.
या लेखानुसार व्याख्या करावयाची झाली तर 'ब्राह्मणी' या शब्दांतून व्यक्त होणारी जात प्रस्तुत प्रकरणात कुठेच 'व्यवस्था' म्हणून दिसत नाही. आणि व्यवस्था म्हणून जी जात दिसते, तिला थेट आव्हान देण्याची लेखकाची, हे लेखन येथे आणणाऱ्या सदस्याची तयारी आहे का?
एक सूचक मापदर्शक देतो - अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली कोणत्या जातीच्या विरोधात किती गुन्हे दाखल झाले आहेत याचा अभ्यास करून ती सांख्यिकी मांडण्याचे धाडस दलित पुरोगामी चळवळी करणार आहेत का? प्रत्यक्ष परिस्थितीच्या चित्राताली काही रेषा किंवा एखादा रंग दाखवणारा सूचक मापदर्शक म्हणून ही मांडणी केली गेली पाहिजे. (तसे केल्याने ब्राह्मणांनी (जातीच्या) केलेल्या अत्याचाराचे परिमार्जन होत नाही, किंवा ते अत्याचार संपूनही जात नाहीत. त्याचे माप करावेच लागेल. पण) जातीच्या वास्तवाला भिडण्याची चौकट 'ब्राह्मणी व्यवस्था' या संकल्पनेत पुरेशी बसते का, याचा निकाल करता येईल, आणि कदाचित ती संकल्पना पुरेशी नाही हे जाणून घेतल्यानंतर जे निर्माण होईल त्यातून या लढ्याची व्याप्ती वाढेल. ते वाढवण्याची तयारी नाही, असे चित्र या 'ब्राह्मणी व्यवस्था' नामक संकल्पनेतून नेहमीच व्यक्त होत गेले आहे. त्यातून जी प्रतिक्रिया उमटते तिच्यावर तशाच टोकावर जाऊन प्रति-प्रतिक्रिया दिली जाते आणि जातीअंताचा लढा कुंठीत होत जातो.
पण लक्षात कोण घेतो...!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुलंच्या रावसाहेब या व्यक्तिचित्राची आठवण येते. रावसाहेबांना शिव्या दिल्या व्यतिरिक्त अभिव्यक्तच होता येत नाही. दलित साहित्यात ही असेच आहे. जर त्यातील शिव्या वगळल्या तर अभिव्यक्तीच्या अस्सलपणाला वा प्रामाणिकपणाला छेद जातो. ऐसी अक्षरे म्हणतात अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपणं आणि त्याचबरोबर जातीय तेढ माजवणारे विचार येऊ न देणं ही तारेवरची कसरत आहे याच्याशी सहमत आहे. येथील शिव्या हा प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा राग आहे. तो व्यक्त न झाल्यास व्यक्तिमत्वाचे विघटन होईल. कार्यालयातील एक प्रसंग आठवतो. एका व्यक्तिला दाराची चौकट डोक्याला लागते. ती व्यक्ती चिडून त्या दाराच्या चौकटीला आईबहिणीवरुन शिवी देते.मी त्यांना म्हणलो अहो ही चौकट निर्जिव आहे तिला कुठले आई बहिण. ती व्यक्ती ओशाळून हसते. आता इथे त्या व्यक्तीला काय माहित नाही का आपण निर्जीव गोष्टीला शिवीगाळ करतो आहोत. पण अशा अभिव्यक्त होण्याने त्यांची वेदना कमी होण्यास मदत झाली असते. लहान मुलाला जेव्हा एखादी वस्तू लागते व तो रडू लागतो त्यावेळी आपण त्या मुलाला समजावताना त्या निर्जीव वस्तुला हलकेच का होईना फटके देतो. मग ते मूल आपले रडणे विसरते. एखाद्या व्यक्तीबद्दल मुलाच्या मनात राग निर्माण झाला तर आपण त्याला म्हणतो कि त्या व्यक्तिच घ्रर आपण उन्हात बांधू. माणुस जसा प्रगल्भ वा उत्क्रांत होत जातो तस तशी त्याला अशा अभिव्यक्तिची गरज कमी होत जाते. वाघमारे या ठिकाणि स्थित्यंतराच्या अवस्थेत आहेत. कदाचित भविष्यात त्यांना अशा अभिव्यक्तीची गरज कमी होत जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सहमत.
शिव्या द्याव्याशा वाटणे आणि म्हणून देणे स्वाभाविक आहे. शिव्या द्याव्याशा वाटूनही त्या आटोक्यात ठेवणे आणि तसे ठेवल्याने अभिव्यक्तीचा संकोच न होऊ देणे हे मोठेपण. स्थित्यंतर हा शब्द यासंदर्भात नेमका. स्थित्यंतराची दिशा मात्र (माझ्या नजरेत) अद्याप स्पष्ट नाही, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तातडीने समजूतदारपणाविरोधी कायदा केला पाहिजे आणि वरील दोन्ही सदस्यांवर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा मराठी संकेतस्थळांच्या ट्यारपीचं काही खरं नाही.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हीसुद्धा आमच्यासोबत बाहेर पडाल. आत्ताच ठरवा काय ते... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>> कार्यालयातील एक प्रसंग आठवतो. एका व्यक्तिला दाराची चौकट डोक्याला लागते. ती व्यक्ती चिडून त्या दाराच्या चौकटीला आईबहिणीवरुन शिवी देते.मी त्यांना म्हणलो अहो ही चौकट निर्जिव आहे तिला कुठले आई बहिण. ती व्यक्ती ओशाळून हसते. आता इथे त्या व्यक्तीला काय माहित नाही का आपण निर्जीव गोष्टीला शिवीगाळ करतो आहोत. पण अशा अभिव्यक्त होण्याने त्यांची वेदना कमी होण्यास मदत झाली असते. लहान मुलाला जेव्हा एखादी वस्तू लागते व तो रडू लागतो त्यावेळी आपण त्या मुलाला समजावताना त्या निर्जीव वस्तुला हलकेच का होईना फटके देतो. मग ते मूल आपले रडणे विसरते. एखाद्या व्यक्तीबद्दल मुलाच्या मनात राग निर्माण झाला तर आपण त्याला म्हणतो कि त्या व्यक्तिच घ्रर आपण उन्हात बांधू. माणुस जसा प्रगल्भ वा उत्क्रांत होत जातो तस तशी त्याला अशा अभिव्यक्तिची गरज कमी होत जाते. वाघमारे या ठिकाणि स्थित्यंतराच्या अवस्थेत आहेत. कदाचित भविष्यात त्यांना अशा अभिव्यक्तीची गरज कमी होत जाईल.<<<
हो पन किति वर्षे हे सहन करायचे आंम्ही !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या संस्थळावर व्यक्त होण्यासाठीच्या आवश्यक निकषांमधे मी बसणारा नाही. तसेच ते निकष मला मानवणारे नाहीत. त्यामुळे यापुढे मी इथे लिहिणार नाही.

न्यायप्रविष्ट प्रकरणात बदनामीकारक ठरू शकेल असं एक वाक्य सोडता तुमच्या मूळ अभिव्यक्तीला (त्यातल्या शिव्यांनादेखील) धक्का लागलेला नाही. काही प्रश्न मात्र उपस्थित केले गेले: १. जे शब्द तुम्ही वापरता त्यांचे अर्थ लक्षात घेऊन तुम्ही ते डोळसपणे वापरता आहात का? आणि २. त्या शब्दप्रयोगांचे जे परिणाम होतील (काही सदस्यांची सहानुभूती तुमच्या लिखाणात वर्णन केलेल्या घटनेला मिळण्यासाठी तुमच्या भाषेचा अडथळा होणं) ते स्वीकारायची तुमची तयारी आहे का?

ह्यावर प्रचंड त्रागा करून तुम्ही निघून जात आहात. तुमची मर्जी. एवढं मात्र नक्की सांगेन - अभिव्यक्तिस्वातंत्र्याबरोबर लेखकाला आपल्या अभिव्यक्तीचं समर्थन करण्याची जबाबदारी घ्यायला लागतेच. तिच्यापासून पळून चालत नाही. लेखकच जर एवढ्यातेवढ्यानं आपल्या भावना दुखावून घेऊ लागला (ज्या तुम्ही दुखावून घेतल्या आहेत, असं ह्या तुमच्या त्राग्यावरून दिसतं), तर मग आपल्या अभिव्यक्तीला हवा तो अवकाश मिळावा हा हट्ट करण्याचा अधिकार त्याला कितपत मिळतो, हा माझ्या मते खरा मननीय प्रश्न आहे. त्यावर थोडं चिंतन कराल तर ते तुम्हाला हितावह होईल असं वाटतं. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हेच लिहायचे होते. कष्ट वाचवलेत.
न्यायप्रविष्ट आणि बदनामी याविषयी मात्र मी सहमत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे बाहेरचे लेख ह्या संकेतस्थळावर का द्यावेत. जर अभिव्यक्ती बद्दल इतकी काळजी आहे तर जे लिहायचे असेत ते स्वता लिहावे. दुसर्‍यांचे लेख आम्हा सगळ्यांना त्या त्या संकेत स्थळावर जावुन बघता येतिलच ( जर बघायचे असतील तर ). दुसर्‍यांचे लेख टाकायचे आणि काही गोष्टींवर इतरांनी आक्षेप घेतले तर तो लेख माझा नाही असे म्हणुन मोकळे होयचे ( ब्राह्मणांवरच्या टिप्पणीवर )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या धाग्यामुळे ट्यार्पी वाढलेला दिसतोय संस्थळाचा! चक्क १५-१६ हजर सदस्य दिसतायेत. एरवी ४-५ च्या वर नसतात एका वेळी.

कोणीतरी उगाच चिमटे काढतंय, कोणी तावातावाने लिहीतंय , कोणी त्या दोन्ही प्रकारच्या लोकांना समजावतंय!

ऐसी वर असे काही वाचायला मिळणे म्हणजे, सात्विक पुणेरी मिसळीवर (हा शब्द इकडे वापरलेला चालेल ना?) कोल्हापुरी कट टाकलाय असे वाटतेय!

...चांगलं आहे. चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

संस्थळावरील प्रभावशाली व्यक्ती धागा पाहून लागलिच त्यातलं "स्फोटक" मटिरिअल ताडू शकतात.
धागा सुरु झाला तेव्हाच "उगा दुसरीकडे घेउन जाउ नका" असे म्हणून दमबाजी करुन (त्यांना) योग्य(वाटणार्‍या) लाइनीवरही ठेउ शकतात हे दिवाळीच्या आसपास जालावरच पाहिलं.
.
जालमित्र यक्कु गेला. लटकावून घेतलं म्हणतात त्यानं. त्याच्या मृत्यूचा धागा येताच लागलिच कोणी काही बोलायच्या आतच "आमच्या अध्यात्माला वगैरे उगीच काही म्हणायचे नाही; सांगून ठेवतो" असा सूर असणारा एक प्रतिसाद पाहून मला आश्चर्य वाटले होते. त्यांचा उद्देश चांगलाच असावा. पण पब्लिकनी काही बोलायच्या आत "असे काही बोलायचे नाही" असे म्हणून पब्लिकला सांगितले गेले. नि वरून पब्लिकही मग शिस्तीत व्यवस्थित प्रतिसाद देत बसली बव्हंशी. "थोतांड,भ्रमिष्ट" वगैरे शब्द न वापरता! सारं कसं गुडी गुडी.
निसरड्या उतारावर धावत निघालेल्या माणसाला आणखी खच्चून जोरात खाली ढकल्णारे, दुर्दैवी घटनेचे मूळ कारण भ्रम; त्या भ्रमाला bolster केलेले साळसूदपणानं नामानिराळे राहिले.
जो घसरला तो गेला. असे अजुन किती यक्कु in making आहेत हे (असलाच तर) यकुचा आत्माच जाणो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ह्या सगळ्या गोंधळात विसुनानांच्या ह्या टिप्पणीवर प्रतिसाद द्यायचा राहूनच गेला होता -

धागालेखक :

"मुलगा झाला मुलगा झाला...
....
...बिन बिचकता गाढव चढवला पाह्यजे. हा गाढवंच !"

विसुनाना :

>>ही एक कविता असावी असे माझे मत आहे. अर्थात,कवीकडून तसा खुलासा अपेक्षित आहेच. तो तसा झाल्यास, कविता हा साहित्याविष्कार असल्याने त्यात येणारे शब्द हे अपरिहार्य असावेत असे कवीला वाटत असावे असे म्हणता येईल.
(साहित्य हा साहित्यिकाच्या आत्म्याचा हुंकार असतो, नाही का?)
ते नाही का, तुम्ही 'गोलपिठा' नाही का वाचले?

त्यामुळे कवीने वापरण्याच्या शब्दांवरचा त्याचा अधिकार मान्य करायला हरकत नसावी. त्या कवीच्या भूमिकेतून बाहेर आल्यावर 'प्राध्यापक' सतीश वाघमारे तसे असभ्य शब्द वापरणार नाहीत अशी आशा बाळगायलाही हरकत नसावी.<<

धागालेखकाच्या ह्या ओळींमागची प्रेरणा ही अरुण कोलटकर यांच्या 'नाळेला गाठ मारून सुईण म्हणाली पेढे आणा हो पेढे आणा' ह्या कवितेची आहे, असा माझा अंदाज आहे. पण मुद्दा तो नाहीच. नामदेव ढसाळ किंवा नारायण सुर्वे किंवा मर्ढेकर वगैरेंच्या कवितेत येणाऱ्या तथाकथित असभ्य शब्दांशी मी परिचित आहे, आणि त्यांचं महत्त्वदेखील मी जाणतो. त्यामुळेच ह्या धाग्यावरच्या माझ्या मांडणीत मी कुठेही 'मला ही भाषा पसंत नाही', किंवा 'ते शब्द काढून टाका' वगैरे म्हटलेलं नाही. पण त्याबरोबर मला हे वास्तवदेखील माहीत आहे - विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात जन्मलेल्या माझ्या आजीनं शिवाशीव पाळली नाही. त्याचं कारण गांधीजींची अस्पृश्यतेविषयीची मांडणी. पण तिनं कधी ढसाळ किंवा सुर्वे किंवा मर्ढेकर किंवा भाऊ पाध्ये वाचले नाहीत, कारण त्यातली भाषा तिला रुचली नसती. गांधीजींची मांडणी तिच्यापर्यंत पोहोचली, कारण तिला रुचेल अशा भाषेत ती केली गेली. लेखकानं आपली अभिव्यक्तीची भाषा निवडताना हे लक्षात घेऊन मग आपला निर्णय घ्यावा, एवढंच मी म्हणत होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पण काही काही कवींना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हीच भाषा वापरली पाहिजे असे आजही वाटते, त्याला कोण काय करणार?
(खुलासा- अशा प्रकारच्या भाषेच्या वापराला माझा पाठिंबा आहे असे कोणीही मानू नये. सामान्य जीवनात अशी भाषा वापरू नये, होता येईल तितकी टाळावी असेच माझे मत आहे. परंतु इतर कोणी साहित्याचा अनिवार्य पैलू म्हणून ती तशी वापरली तर माझा विरोध नाही, इतकेच! )

आणि कोणी वापरलेली भाषा शिष्ट आणि कोणाची अशिष्ट हे कोण ठरवणार? - यावर एखादी चर्चा होऊ शकेल.
(म्हणजे पुलंनी मर्ढेकरांना 'वा,वा' म्हणेपर्यंत मर्ढेकर, तेंडुलकरांनी ढसाळांना 'वा,वा' म्हणेतोवर ढसाळ अश्लिल आणि दुर्बोध होते इ.इ.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>(खुलासा- अशा प्रकारच्या भाषेच्या वापराला माझा पाठिंबा आहे असे कोणीही मानू नये. सामान्य जीवनात अशी भाषा वापरू नये, होता येईल तितकी टाळावी असेच माझे मत आहे. परंतु इतर कोणी साहित्याचा अनिवार्य पैलू म्हणून ती तशी वापरली तर माझा विरोध नाही, इतकेच! ) <<

पण मी ह्यापुढे जाऊन असं म्हणतोय, की ह्या प्रकारच्या भाषेच्या साहित्यिक वापराला कवित्वाचा परवाना मी अगदी आनंदानं देईन; पण काही लोक देणार नाहीत हे वास्तव मी जाणून आहे. जिथे अभिव्यक्ती ही निव्वळ स्वान्त सुखाय नसून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी करायची आहे, तिथे ती कोणत्या भाषेत केली, तर किती लोकांपर्यंत पोहोचेल हे पाहणं मला स्वाभाविक वाटतं; तिथे मग 'मी वाट्टेल त्या भाषेत बोलेन; मला नकोच आहे कुणाची सहानुभूती.' हा पवित्रा मूळ हेतूलाच सुरुंग लावणारा वाटतो. अरुंधती रॉय यांचं उदाहरण इथे घेता येईल. त्यांचे विचार पटोत न पटोत; त्यांची अभिव्यक्ती इतकी काही कडेलोटाची असते, की त्यामुळे अनेक लोक त्यांना गांभीर्यानं घेत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||