म्रुत्यु...

आयुष्याचे भयाण रस्ते
सूर्याच्या तळतळत्या उन्हात
होरपळत
चालत
पार करत
बोचऱ्या काटेरी मार्गात
रक्ताळलेले तळवे भळभळू लागतात,

जखमांवर हळू हळू
खपली धरत
पण....
जखमांचे व्रण तसेच राहून
स्मृतींच्या भयाण आसमंतात
गिरक्या घेत
मनाला जाळू लागतात
अन......
अंधार भरल्या आयुष्यात
आशेच किरण शोधत

ग्रहणाचा खेळ
जगण्यात अनुभवत
चालत राहतो
अंधार
उजेडाचा खेळ
प्रत्येकाच्याच वाट्याला येतो
मनाला जाळणारी
आठवे निर्माण करत.

मग
त्यांच्या सोबत मी
चालत राहतो
पावले समोर जात राहतात
विचारही अविरत
चालत राहतात....

आयुष्याची तीच वाट
जी प्रत्येकाला
शेवटी
एकाच जागी नेऊन सोडते...

फक्त स्वरूप तेवढं बदलत असतं
तो अंत म्हणजे मृत्यू
क्षणार्धात
होत्याचं नव्हत करत
कुणाला भगभगत्या
सरणावर
तर
कुणाला पृथ्वीच्या पोटात
नेऊन फेकतो

अन.....
संपत ते शरीर
त्याच्या सोबत
ते नाव सुद्धा....

गौरव खोंड
वणी
९०२८४३१०६२
८८०५९८९८९५

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

खूपच छान

तो अंत म्हणजे मृत्यू
क्षणार्धात
होत्याचं नव्हत करत
कुणाला भगभगत्या
सरणावर
तर
कुणाला पृथ्वीच्या पोटात
नेऊन फेकतो

हे कडवे विशेष आवडले. सुरेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवर स्वागत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता चांगली आहे पण व्रण कसे गिरक्या घेतील असा रूक्ष प्रश्न पडलाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्रण कसे गिरक्या घेतील

सोपे आहे.

तुम्हाला व्रण आहेत काय? असल्यास एक प्रयोग करून पहा. स्वतःभोवतीच गिरक्या घ्या. व्रणदेखील तुमच्याबरोबरच गिरक्या घेतात की नाही, याचा एकदा पडताळा घेऊन पहाच.

एखादी सुयोग्य संदर्भचौकट घ्यायला मात्र विसरू नका, हं.

एखाद्या व्रणातून आरपार जाणारा एखादा (शक्य तोवर काल्पनिक) अक्ष घेऊन त्याभोवती गिरकी घेतल्यास अधिक बरे.

तुम्हाला जर व्रण नसतील, तर व्रण असलेला एखादा बकरा किंवा (व्रण असलेले एखादे) गिनीडुक्कर घेऊन त्यावर हा प्रयोग करण्यास हरकत नाही. आपल्याला काय, प्रात्यक्षिकच करावयाचे आहे. स्वतःवरच केले पाहिजे, असे बंधन नाही. मात्र, तसे करावयाचे असल्यास, अगोदरचाच एखादा व्रण असलेला एखादा बकरा अथवा (अगोदरचाच एखादा व्रण असलेले एखादे) गिनीडुक्कर घेण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे; बकर्‍यास किंवा गिनीडुकरास या प्रयोगाकरिता नव्याने व्रण पाडू नयेत. म्हणजे मग "No animals were harmed in the course of this experiment" असे विधान छातीठोकपणे करता येणे शक्य व्हावे.

इत्यलम्| (किंवा, सोप्या मराठीत सांगायचे झाले, तर "इतके पुरे झाले नाही काय?")

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@गौरव - तुमची कविता खुपच सभ्य भाषेत लिहली आहे. इथे लोकांनी तुमची कविता वाचुन त्याचे रसग्रहण करणे जर तुम्हाला अपेक्षीत असेल तर तुम्हाला प्रचंड असभ्य, अर्वाच्य अश्या भाषेत लिहावी लागेल. त्यात काही अर्थ नसला तरी चालेल, तरी पण सगळे त्यातुन अर्थ शोधुन काढतील आणि तुम्हाला वाह वाह म्हणतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयुष्याची तीच वाट
जी प्रत्येकाला
शेवटी
एकाच जागी नेऊन सोडते...

खरे आहे. कविता आवडली, पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0