जरतारी लॉन मो(अ)र

वैधानिक इशारा :
या कथेतली पात्रे पूर्णतः काल्पनिक असून कुठल्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी साम्य आढळल्यास निव्वळ हास्ययोग समजावा.
…………………

आपल्या कथेची नायिका चिक्की जगप्रसिद्ध आहारात अज्ञ असून तिचा नवरा चिकट्राव हा फार्माशिष्ट आहे .हे पतीपत्नी प्राणपणाला लावून महान भारतीय संस्कृतीचे संरक्षण व संवर्धन करत अमेरिकेत निव्वळ देहानेच वास्तव्यास आहेत. चला सुक्काळी त्यांच्या घरात डोकावूया.

ओझार्कच्या टेकड्यांमधून टुणकन उडी मारून सूर्याजी खट्याळ उष्ण,विकट हसू लागला. नेटिव्ह अमेरिकन पक्षी मायकेल ज्याकसनच्या ब्याड ब्याड अमर भुपाळ्या किल्बिलून दंगल करू लागले तरी चिक्कीची मालनरिश्ड झोप उघडेल तर शप्पथ! चिकट्राव कधीचेच चहाचे कप भरून अफलातून बायको उठायची वाट पहात होता. शेवटी दंगलीच्या आवाजाने जाग येउन चिक्की, " साली सकाळ झाली वाट्टे" म्हणत कुरकुरत उठली. ही उठली तरी पक्ष्यांचा दंगा सुरूच होता. तिचं डोकंच फिरलं. "अबे मायकेल ज्याकसन की अवलाद श टा प!" असे नेटिव्ह पक्ष्यांवर ओरडत शिवीगाळीने दिवसाची सुरूवात तर झकास झाली. चिक्कीसारख्या जगप्रसिद्ध आहारात अज्ञाच्या पावलांनी पुलकित परिसरात गवत इतक्या वेगाने वाढत होते की, चिकी झोपल्यावर केंटकीतले हत्ती ते चवदार न्युट्रीशस गवत खायला यायचे. हिच्या शटापने एक हत्ती दचकला आणि त्याने सोंडेतून पाण्याचा फवारा तिच्यावर उडवला. ही जोरात किंचाळली, "अबे गांडू, चल चालता हो इथून". या झणझणीत मराठी आरोळीने पुचाट अमेरिकन हत्ती घाबरून पसार झाला.
चिकट्राव फार्माशिष्ट नेहेमीप्रमाणे विस्मयचकित होऊन हे दृश्य पहात होता. अजातशत्रू अन् लोकप्रिय चिकट्रावला जगावेगळ्या गोष्टी आवडत असत. अनेकदा विश्वभ्रमण करूनही त्याला चिक्कीसम दुर्मिळ रत्न कुठेही आढळून आले नाही. हे रत्न लाभल्याबद्दल त्याने मनोमन देवाचे आभार मानत विनयाने चहाचा कप पुढे केला. चिक्की चहा पिताना हत्ती आणि गवताचा विचार करू लागली. तिने" स्साला चहा तर थंड आहे बे", म्हणताच थरथर कापत चिकट्रावने पुन्हा चहा गरम करून दिला. चिक्की कधी प्रेमाच्या पाकात बुडवेल आणि कधी वस्सकन ओरडेल हे तिलाच माहित नसल्याने ब्रम्हदेवाला माहित असण्याची सुतराम शक्यता नाही.

इतके दिवस ते सुखात एका फ्ल्याट मध्ये रहात होते. घर विकत घेतले तर गवत उर्फ लॉन लावा आणि त्याची मशागत करा. गवत वाढलं तर त्यावर दंड भरावा लागेलच शिवाय सतत वाढणारे गवत कापायला लॉन मोअर घ्यावं लागेल या भीतीने चिकट्राव घर घ्यायला टाळाटाळ करे. शेवटी जड अंतःकरणाने नेटिव्ह अमेरिकनाच्या घशात डॉलर ओतून एकदाचं घर विकत घेतलं. निरंतर जोमाने फोफावणाऱ्या गवताचा हिरवा भस्मासुर त्याला झोपू देईना. चिक्कीला कुंभकर्ण प्रसन्न असल्याने सुशेगाद अष्टौप्रहर ढाराढूर झोपा यायच्या. लॉन मोअरच्या भीषण किमती आणि प्रकार यावर घरात घनघोर काथ्याकूट सुरु झाला. वर्ल्ड बँकेकडून या खरेदी प्रकल्पासाठी वित्तसहाय्य किंवा विशेष अनुदान मिळेल का याची चाचपणी सुरु झाली. तिथेही यांच्या तोंडाला गवताची पाने पुसण्यात आली.

चिक्की दोन दिवस मैत्रिणीच्या डोहाळजेवणाला गाणीगिणी म्हणायला जवळच्या गावात किणकिणाटीला गेली होती. तिथं तिचं …
मला लागले ग डोहाळे आगळे येगळेच…।
चहा णको काफी णको मला हव्व सर्रबत्त गुल्लाबाच ...
हे गाणं तर सुपरहिट झालंच शिवाय महान भारतीय संस्कृतीचं संवर्धनही झालं म्हणून ती तरंगतच घरी आली.

दरम्यान चिकट्रावने चिक्कीच्या अनुपस्थितीची संधी साधून चटकन ,एकदम स्वस्तातला, हाताने ढकलायचा लॉन मोअर खरीदला. प्रचंड पैसे वाचवल्याच्या आनंदात तो गवतरुपी भस्मासुराची त्वेषाने कत्तल करू लागला. पण, हाय रे दैवा! कष्टाची सवय नसल्याने हातातून असह्य कळा येउन कंबरही ठणकायला लागली. आता हुश्शार बायकोची वाट पहात पेनकिलर्स खात बसण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. चिक्कीने येताक्षणीच चलाखीने ते अवजड यंत्र तर परत केलंच शिवाय कुजकट बोलण्याची सुवर्णसंधी सोडून एक नवाच विक्रम नोंदवला. गवत कापायचे भिज्जत घोंगडे वाळायची सुतराम शक्यता दिसेना. दोघे एकमेकांवर चिक्कुपणाचे आरोप करू लागले. चिकट्राव. कै च्या कै रोम्यांटिक होऊन म्हणे, "मी तुला मस्तपैकी," पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा" अशी ५६००० रुपयांची पैठणी घेऊन देत होतो तर तूच नाही म्हणे", छप्प्पन हज्ज्ज्जार ऐकून चिक्कीला चक्करच आली, ती एकदम वर्हाडीत गर्जू लागली.
"अबे एक शून्य कायले वाढवतं बे ? तीन डालरच्या लिटलिट्या शेकंड ह्याण्ड सायकली घेनारा तू चिक्कट, मले ५६००० रुपयांची पैठणी कायले घेशीन ? मले कोमात पाठवतं काबे ? हित मले थे जरतारी मोर का कराचे हायेत बह्याडा ? असलं हिम्मत तर जरतारी लान मोर घे, फकस्त १८०० डालरचा!"

अठराशे डॉलर हा भयंकर आकडा ऐकताच चिकट्राव फार्माशिष्ट एकदम प्राणांतिक भोवळ येउन खाली पडला. तो शुद्धीवर येउन पहातो तर काय चतुर चिक्कीने फक्त तीस डॉलर देऊन भाड्याच्या गवतकाप्या कडून समस्त गवताचा नायनाट केला होता. दोघेही निश्चिंतपणे नवव्या ढगावर तात्काळ गाढ झोपी गेले.

तदनंतर कृतकृत्य होऊन पुन्हा गवत वाढेपर्यंत ते सुखाने नांदू लागले.

पुचाट अमेरिकन हत्ती मात्र चवदार, न्युट्रीशस गवताच्या अभावाने केंटकीतून नामशेष झाले.

field_vote: 
4.142855
Your rating: None Average: 4.1 (7 votes)

प्रतिक्रिया

ROFL ROFL ROFL

जास्त हसू कशामुळे आले हे सांगणे कठीण आहे. लोलून रिकव्हरलो की मग टेलतो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त लेख. भारतीय संस्कृतीची जपणूक वगैरेंवरील टिप्पण्या विशेष आवडल्या. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बस्स, चिकट्रावाला फार्माशिष्ट केलंत हा योगायोग वाटला.
हसलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त.

तुमच्या दृष्टिकोनात एक छानशी वेडसर झाक आहे. त्यातून सगळ्याच गोष्टी गमतीदार दिसतात.

बाकी हा लेख थोडा लहान झाला असं वाटलं. ज्या तब्ब्येतीने चिक्की आणि चिकट्रावांच्या दिनक्रमाचं वर्णन सुरू झालं त्या मानाने मेन थीम दोनतीन परिच्छेदात आवरून टाकल्याबद्दल निषेध.

चिक्की-चिकट्रावांच्या आणखीन येऊद्यात कथा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजुन कथा येतिल हो पण लोकान्च्या पचनशक्तिचा मला अन्दाज नाहिये . Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक लंबर लिहिता तुम्ही!

बाकी हजार डालरची पैठणी आणि अठराशेचा लानमोर हा उफराटा हिशोब मस्त जमलाय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>>> पुचाट अमेरिकन हत्ती मात्र चवदार, न्युट्रीशस गवताच्या अभावाने केंटकीतून नामशेष झाले.
खी: खी: खी:, मस्त!

'चिक्कीचे सुकले लॉन, असून निगराणी' किंवा 'केंटकी पिवळी पडली' असा या लेखाचा झकास सिक्वेल होऊ शकेल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'चिक्कीचे सुकले लॉन, असून निगराणी'

रेशिष्ट!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निगराणी' Biggrin ही आफ्रीकेतली राणी असते का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'केंटकी पिवळी पडली' ROFL ROFL
स. त . कुडचेड्करान्ना सान्गुया ते पिवळे पाडण्यात तज्ञ आहेत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेहमीप्रमाणेच मजेदार.

एक शंका: तै, ओझार्कच्या टेकड्या केंटकीत कशा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सह्याद्री , हिमालय इतकेच काय पण आल्प्सच्या टेकड्या घुसणार होत्या . मला मात्र
ओझार्कच्या टेकड्याच आवडतात . जोर्ज . डब्ल्यु. वाशिन्ग्टनचा विजय असो !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>> एक शंका: तै, ओझार्कच्या टेकड्या केंटकीत कशा?
मिझुरी लव्ह्ज् कंपनी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे जे काही आहे ते जमले आहे. संदर्भ, क्रिप्टिक उल्लेख वगैरे समजून घेण्याच्या भानगडीत न पडताही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

सन्दर्भ आणि क्रिप्टिक उल्लेख कोण्ते ब्वा ? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेच तर क्रिप्टिक आहे....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

हा हा Biggrin मस्त! लै भारी!
पण अबरप्टली संपला लेख. अजुन थोडा मोठा हवा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिक्की आणि चिकट्राव काय...आहारात अज्ञ काय...केंटकीतले हत्ती काय...सगळंच उच्च दर्जाचं विनोदी लिखाण! मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एवढी वर्ष अमेरिकेत राहूनही चिक्कीताई डॉलर-रूपया असं कन्व्हर्जन करतात! भारतीय आहेत खर्‍या!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ROFL ROFL
ओझार्क, केंटकी आणि गांडू अमेरिकन हत्ती यातलं काही माहित नसतानाही चिक्की अन चिकट्रावाच्या पैसे (आणि जम्लं तर भारतीय संस्कृतीही) वाचवण्याच्या युनिवर्सल चिकचिकीने लै मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त आहे, बेळगावी चिक्कीला पण ह्या चिक्कीची सर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

णंदणभौंचा प्रतिसाद अन त्यावर उकरोन काढलेली कनोटेशन्स पण लैच भारी!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुमच्या लेखाचा आनंद घ्यायचा तर वास्तववादी राहून चालणार नाही. लेख फक्कड जमला आहे. फक्त अमेरिकास्थित कुणा मेंबराचा गेम करण्यात आला नाहीये नं अशी आपली शंका आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL
'
भारीच लिखाण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

Smile लेखन आवडले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!