गूगलं शरणं व्रज|

“कुत्र किं क्रीयते वस्तु कुत्र विक्रीयते च तत् ।
किं मूल्यं च भवेन्मित्रं” “गूगलं शरणं व्रज” ॥ १ ॥
“अस्वस्थमद्यमेऽपत्यं को गदः किं च भेषजम् ।
कुत्रास्ति वैद्यो मे ब्रूहि” “गूगलं शरणं व्रज” ॥ २॥
“भोजनाय क्व गच्छाम किं खाद्यं तत्र लभ्यते ।
किं मूल्यं च कियद्दूरं” “गूगलं शरणं व्रज” ॥ ३ ॥
“चलचित्रालयं कुत्र तत्र किं चित्रदर्शनम् ।
तत्र दर्शनवेला का” “गूगलं शरणं व्रज” ॥ ४ ॥
“कुत्रास्म्यहमिदानीं भोः कियद्दूरं हि मद्गृहम् ।
वर्त्मना केन गच्छामि” “गूगलं शरणं व्रज” ॥ ५ ॥
“विश्रान्त्यै कुत्र गच्छाम तत्रासीदाम वा कथम् ।
तत्र पश्याम किं मित्रं” “गूगलं शरणं व्रज” ॥ ६ ॥
“कोऽर्थः पदस्य तत् वाक्ये कथं सम्यक् प्रयुज्यते ।
समानार्थपदं किं स्यात्” “गूगलं शरणं व्रज” ॥ ७ ॥
“चित्राणि द्रष्टुमिच्छामि श्रोतुमिच्छामि गायनम् ।
इच्छामि पठितुं ग्रन्थं” “गूगलं शरणं व्रज” ॥ ८ ॥
“शालायां सहपाठी मे कुत्राद्येति कुतूहलम्” ।
“देशकालततायामं गूगलं शरणं व्रज” ॥ ९ ॥
“चेतुमिच्छसि किं पत्नीं पतिं जामातरं स्नुषाम् ।
नवोद्योगं तदा सद्यः गूगलं शरणं व्रज” ॥ १० ॥
“विमानरेलयानानां गमनागमनेषु किम्।
विलम्बं सूच्यते मित्रं” “गूगलं शरणं व्रज” ॥ ११ ॥
“कुत्र वर्षति पर्जन्यः कुत्र शैत्यं कियन्मितम् ।
कुत्र सूर्यप्रखरता” “गूगलं शरणं व्रज” ॥ १२ ॥
“नगरे मम का वार्ता मद्देशे वा महीतले ।
क्रीडासु जनसौख्ये च” “गूगलं शरणं व्रज” ॥ १३ ॥
“तत्त्वार्थशास्त्रविज्ञानगणिताध्ययने स्पृहा” ।
“सर्वज्ञानमहाद्वारं गूगलं शरणं व्रज” ॥ १४ ॥
“आत्मानन्दं मनःशान्तिं तृप्तिं वाञ्छसि वा यदि ।
गूगलं संपरित्यज्य श्रीहरिं शरणं व्रज” ॥ १५ ॥

मी सदस्य असलेल्या एका संस्कृत भाषासंबंधी गटात वरील कविता वाचली. सुबोध भाषेत असल्याने अर्थ न करताच येथे देत आहे.

(पहा http://simplesanskrit.blogspot.ca/)

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (4 votes)

प्रतिक्रिया

शेवटच्या कडव्यातला सल्ला विशेष आवडला, पण स्वानुभव असा की मनावर तितका लगाम राहात नाही. कवी/कवयित्री कोण आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

कवितेचे मराठीत भाषांतर मिळेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

छान आहे.
कोणी समश्लोकी भाषांतर करणार असेल तर मजा येईल.

बॅट्या?

खाली श्रेयाव्हेर आहे तरी कवी/कवियीत्रीचे नाव द्यावे ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला वाटतं मराठीत यमक हवं. हे पहिलं कडवं (पॅटर्न अ-ब-अ-ब):

कुठे वस्तू जाते विकली
अन् कुठे होते तिची खरेदी
कितपत होतो खिसा खाली
ऐक सांगते गूगलदीदी ||१||
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

“कुत्र किं क्रीयते वस्तु कुत्र विक्रीयते च तत् ।
किं मूल्यं च भवेन्मित्रं” “गूगलं शरणं व्रज” ॥ १ ॥
कोठे काय मिळे चीज कोठे काय विकावया?
काय त्यास असे मूल्य “गूगलं शरणं व्रज” ॥

“अस्वस्थमद्यमेऽपत्यं को गदः किं च भेषजम् ।
कुत्रास्ति वैद्यो मे ब्रूहि” “गूगलं शरणं व्रज” ॥ २॥
अपत्याला असे रोग काय त्या देउ औषध।
कोठे वैद्य तया शोधू “गूगलं शरणं व्रज”॥

“भोजनाय क्व गच्छाम किं खाद्यं तत्र लभ्यते ।
किं मूल्यं च कियद्दूरं” “गूगलं शरणं व्रज” ॥ ३ ॥
भोजनासि कुठे जावे आणि काय तिथे मिळे।
किती पैसे किती दूर “गूगलं शरणं व्रज” ॥

“चलचित्रालयं कुत्र तत्र किं चित्रदर्शनम् ।
तत्र दर्शनवेला का” “गूगलं शरणं व्रज” ॥ ४ ॥
सिनेमाला कुठे जावे काय आज तिथे असे।
’शो’च्या वेळा तिथे कैशा “गूगलं शरणं व्रज” ॥

“कुत्रास्म्यहमिदानीं भोः कियद्दूरं हि मद्गृहम् ।
वर्त्मना केन गच्छामि” “गूगलं शरणं व्रज” ॥ ५ ॥
कोणती ही असे जागा माझे गेह कुठे असे।
कोणत्या जाउ मार्गाने “गूगलं शरणं व्रज”॥

“विश्रान्त्यै कुत्र गच्छाम तत्रासीदाम वा कथम् ।
तत्र पश्याम किं मित्रं” “गूगलं शरणं व्रज” ॥ ६ ॥
सुट्टीसाठी कुठे जावे आणि खर्च तिथे किती।
तिथे काय पाहावे म्या “गूगलं शरणं व्रज” ॥

“कोऽर्थः पदस्य तत् वाक्ये कथं सम्यक् प्रयुज्यते ।
समानार्थपदं किं स्यात्” “गूगलं शरणं व्रज” ॥ ७ ॥
शब्दाचा अर्थ ह्या काय तो कसा ठीक वापरू।
समानार्थी तया काय “गूगलं शरणं व्रज” ॥

“चित्राणि द्रष्टुमिच्छामि श्रोतुमिच्छामि गायनम् ।
इच्छामि पठितुं ग्रन्थं” “गूगलं शरणं व्रज” ॥ ८ ॥
चित्रप्रदर्शना कैसा जाऊ तैसाच गायना
कोठल्या पुस्तका वाचू “गूगलं शरणं व्रज” ॥

“शालायां सहपाठी मे कुत्राद्येति कुतूहलम्” ।
“देशकालततायामं गूगलं शरणं व्रज” ॥ ९ ॥
शाळेतील सखा माझा आता कोठे बरे असे।
कोठल्या तो असे देशी “गूगलं शरणं व्रज” ॥

“चेतुमिच्छसि किं पत्नीं पतिं जामातरं स्नुषाम् ।
नवोद्योगं तदा सद्यः गूगलं शरणं व्रज” ॥ १० ॥
पाहिजे का तुला भार्या पति वा सून जावई।
व्यवसाय नवा शोधू “गूगलं शरणं व्रज” ॥

“विमानरेलयानानां गमनागमनेषु किम्।
विलम्बं सूच्यते मित्रं” “गूगलं शरणं व्रज” ॥ ११ ॥
विमान-रेलगाडीने जावयाचे असे कुठे।
लेट आहे किती त्यांना “गूगलं शरणं व्रज” ॥

“कुत्र वर्षति पर्जन्यः कुत्र शैत्यं कियन्मितम् ।
कुत्र सूर्यप्रखरता” “गूगलं शरणं व्रज” ॥ १२ ॥
कोठे किती असे वर्षा शीताचे अंशमान वा।
उष्णता वा किती कोठे “गूगलं शरणं व्रज” ॥

“नगरे मम का वार्ता मद्देशे वा महीतले ।
क्रीडासु जनसौख्ये च” “गूगलं शरणं व्रज” ॥ १३ ॥
बातमी काय गावाची देशाची जगताचि वा।
खेळाची कर्मणूकीची “गूगलं शरणं व्रज” ॥

“तत्त्वार्थशास्त्रविज्ञानगणिताध्ययने स्पृहा” ।
“सर्वज्ञानमहाद्वारं गूगलं शरणं व्रज” ॥ १४ ॥
तत्वार्थ शास्त्र विज्ञान गणिताची असे रुची।
कवाडा सर्व ज्ञानाच्या “गूगलं शरणं व्रज” ॥

“आत्मानन्दं मनःशान्तिं तृप्तिं वाञ्छसि वा यदि ।
गूगलं संपरित्यज्य श्रीहरिं शरणं व्रज” ॥ १५ ॥
आत्मानन्द मन:शान्ति तृप्ति वा यदि इच्छसी।
टाकुनी गूगलाला तू "श्रीहरिं शरणं व्रज” ॥

मूळ संस्कृत कवि आमचे मित्र जी. एस. एस. मूर्ती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाढम्|

किं मूलं चानुवादो हि किमिति प्रश्न उद्भवेद्-
एवं चानुदितं ह्यत्रभवता साधुसाध्विति|

अपि तु ' किमत्रैकादशतमे श्लोके 'विलम्बं सूच्यत-'इत्यत्र कर्मणिप्रयोगानुरूपं 'विलम्ब'शब्दस्योपयोग: प्रथमात्वेन अपेक्षित: ?' इत्येका शंका | अन्यच्च <<“विश्रान्त्यै कुत्र गच्छाम तत्रासीदाम>> इत्यत्र विसर्गनियमा: द्रष्टव्या खलु?

धन्यवादान् व्याहरामि|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

'विलम्ब'शब्द मोनियर-विल्यम्स अनुसारे नपुंसकलिंगी असू शकतो. मूळ लिखाणात तो तसाच असल्याने मी त्याला हात लावलेला नाही.

'विश्रान्त्यै कुत्र गच्छाम तत्रासीदाम वा कथम्।' ह्या जागी 'विश्रान्त्यै कुत्र गच्छामस्तत्रासीदाम वा कथम्।' असे हवे होते हे पटले. हेहि मुळातच होते आणि माझ्या नजरेतून सुटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गच्छाम
गच्छामेति लोड्रूपं भवेन्, न वा? विप्रश्नेषु लोडपि दृश्यते कदाचिद् उत्तमे पुरुषे कर्तरि |

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रारम्भिकश्लोकद्वयं यदि पश्यामश्चेत्तत्र मित्रमिति पदं मध्यमपुरुषात्मकसंबोधनत्वेन विहितमिति भाति कविना| तद्भावात्तत्र द्विवचनं विधेयमिति मे मति:|अत एव तत्र लड्रूपमेवानुयोज्यमिति मन्ये|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

"गूगलवरून/गूगलकडून माहिती मिळवणे" हा वाक्प्रचार आता चांगलाच रूढ झाला आहे. ज्यांचा काम्पुटर किंवा इंटरनेटशी कधीच संबंध आला नाही किंवा माफकच संबंध आला आहे अशांना, या वाक्प्रचाराचा अर्थ गूगल नावाच्या व्यक्ती/कंपनी/एण्टिटी कडे जगातली यच्चयावत माहिती साठवलेली असते असा वाटतो.

गूगल एखाद्या लायब्ररियनसारखा आहे. लायब्ररियनने तुम्हाला हवी असलेली माहिती कुठच्या पुस्तकात कुठच्या पानावर मिळेल हे सांगावे तसे गूगल हवी ती माहिती(?)* कुठच्या वेबपेजवर उपलब्ध आहे ते सांगतो. पुढे जाऊन असे म्हणता येईल की गूगल ती पुस्तके त्याच्या पानात खूण ठेवून तुमच्यासमोर आणून ठेवते.

*लायब्ररियनला निदान जी माहिती विचारली आहे ती माहिती कुठे आहे हे ठाऊक असते. गूगल तर माहिती शोधतच नाही तुम्ही माहिती म्हणून विचारलेले शब्द ज्या वेबपानांवर आहेत ती पाने तुमच्या समोर आणून टाकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सर्वेञ्जिनान् परित्यज्य गूगलं शरणं व्रज |
तत्त्वामज्ञानतिमिरान्मोक्षयिष्यति मा शुचः ||
गूगोल नाम संख्या सा शतशून्यनभोवती |
नामापभ्रंशात्तस्यास्तु गूगलं अभवत् खलु ||
कीर्ति: शोधनसामर्थ्ये न हि खल्ववडंबरे |
शिखरस्थोऽपि तु मैक्रोसॉफ्ट् न तु सः गूगलायते ||
दृष्ट्वैतत् गूगलसूक्तं हृषितोऽस्मि मुहुर्मुहु:|
एतादृशानि काव्यानि लिखेयु: कवयोऽधुना ||
प्राकृते "मूर्ति"काव्यं हि आनीतं सुसमाहितम् |
पण्डितेनारविन्देन तदपि ननु शोभनं ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अडाण्यांना न समजणार्‍या अशा भाषेत - संस्कृत मध्ये लेख लिहीण्याची वाईट प्रथा रुढ होऊ घालतेय Wink
- (हसून/हलके घ्यावे)

अवांतर - कोणीतरी संस्कृतच्या शिकवणीची लेखमाला चालू करा बुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थ दिला होय! मी उगाच गूगलवर एकेक शब्द शोधत बसलो होतो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

सुरूवातीला थोड्या नेटाने संस्कृत काव्य वाचलं; पण नंतर अर्थच वाचला. कविता आवडली.

शिखरस्थोऽपि तु मैक्रोसॉफ्ट् न तु सः गूगलायते ||

बॅटमॅन, याचा अर्थ मिक्रोसॉफ्टचा मार्केट शेअर गूगलपेक्षा वर आहे असा का? असा अर्थ असेल तर असं का बरं म्हटलंस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इल्ले. शिखरस्थ म्हंजे सॉफ्टवेअर कंपन्यांतील टॉपची अशा अर्थी म्हटले, मार्केटमधली शेअर प्राईस अशा अर्थी म्हटले नाही. तसे असूनही त्यांचे एम एस एन गूगल इतके भारी नाही. हाच आणि इतकाच तथ्यांश, कारण मला त्यातले इतकेच कळते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किती मेलं ते कुत्र कुत्र करायचं.
आमच्या गाई म्हशींनी तुमचं काय घोडं मारलंय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

बरं भो: भो: करा मग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजकाल मराठीत 'हम्म' असं लिहीण्याची फॅशन आहे. ते तर नाहीच पण सगळीकडे "कुत्र कुत्र" लिहील्यामुळे बैलांच्या भावना दुखावल्या असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या विक्षिप्त अदिती बाई सुद्धा नं...!! 'कधी कुणाच्या भावना दुखावतायत आणि कधी त्यांची बाजू घेतेय' असं त्यांना होत असतं! त्या मधूनच फेमिनिष्ट होतात हे एकवेळ मी समजू शकतो. पण आता बैलिष्टही झाल्या! हर..हर...!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

मार्मिक श्रेणी दिल्या गेली आहे Wink ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

I drink (milk) therefore I oxist.

फेमिनिस्टांतली अग्रणी "फेमिनर्षभ" अशी अदिति.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL ROFL

बाकी, उपमा पुल्लिंगी दिल्यामुळे नाराज तर नै ना होणार विक्षिप्तबै Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बैलांचाच विषय निघाला म्हणून एक पीजे देतो.

एक अमेरिकन बैल फिरायला गेला असता त्याला उलटया बाजूने येणारे काही भारतीय बैल दिसले. अमेरिकन 'Hail fellow, well met' स्टाइलमध्ये अमेरिकनाने त्यांना हाकारले, 'Hi Guys!' त्यामुळे भारतीय बैल चवताळले आणि त्याच्यावर चालून आले, "साल्या, आम्ही गाई आहोत का?" असे विचारत त्यांनी अमेरिकन बैलाला बदड बदड बदडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"गाई गाई" मनबैलाचा कस्सा तो चेहेरा फुलला Wink

(इथे ही थीम फिट होत नाही पण आदतसे मजबूर.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं