मध्यमवर्गीय कूपमंडुकोपनिषद !!

अनादी, अनंत कालापासून मध्यमवर्गाला स्वतःच्या सामाजिक स्थानाविषयी फाजील अहंकार असून , त्याला खतपाणी घालून जोपासण्याचे काम महाराष्ट्रात म्हणजेच पुण्यात लेखनकला अस्तित्वात आल्यापासूनच जोमाने सुरु आहे. सर्वप्रथम त्यांनी ठरवून टाकले की त्यांची भाषा अमृताशीही पैजा जिंकते. ही अमृता कोण आहे आणि तिच्याशी पैजा जिंकल्याने मराठी भाषा श्रेष्ठ कशी काय ठरते ते मात्र कुणालाच ठाऊक नाहीये. महाराष्ट्रातले "पुणे" हे शुद्ध तुपातल्या मराठीच्या प्रवाहाचे उगमस्थान असून तो प्रवाह आता सरस्वती नदीप्रमाणे गुप्त झाल्याचीही वदंता आहे. मध्यमवर्गीय मूल्ये सर्वश्रेष्ठ असणे हे तर अध्याहृतच आहे. पुण्याखालोखाल मुंबई सोडले तर उर्वरित जग फार फार धोकादायक असून शक्यतो पुण्याच्या कुपात रहाण्यातच जीवनाचे सार्थक आहे असे मध्यमवर्गीय कुपमंडूकोपनिषदात वर्णिले आहे. सोयीस्कर मूल्यांचे पालन करण्यातच अंतिम फायदा असल्याने मूल्यनिष्ठ मध्यमवर्गीय बेडके शक्यतो पुण्यात वास्तव्यास असतात. फारच धाडसी असले तर एखादे बेडूक मुंबईत राहून डरकावु लागते. याशिवाय ते पृथ्वीवर अन्य कुठेही गेले तरी त्यांची गणती वर्गबाह्य प्रजातीमध्ये करण्यात येते. मध्यमवर्गीय संस्कार, मूल्ये, सामाजिक जाणिवा यावर जमेल तितके लेखन, चिंतन, तोंडाची वाफ दवडणे व प्रामुख्याने कृतीशून्यता हे या वर्गाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. चला, साहित्यजगतातील एका प्रातिनिधिक मध्यमवर्गीय दिनक्रमाच्या उदाहरणाने आपण हे मोहक सत्य जाणून घेऊया.

एकमेवाद्वितीय पुणे शहरात डेक्कन पलीकडे जग असून नसल्यासारखे आहे. तिथले रुपाली हे प्रागैतिहासिक डबके आकाशगंगेतले सर्वोत्तम असून तिथे पुण्यातली मध्यमवर्गीय बेडके कायम जगातले सर्व अवघड प्रश्न डरावसरशी सोडवून उत्तेजक पेयपान करताना चिकण्या चिटबेडक्या नजरेनेच मटकावत बसतात. घरी बेडकिणीपुढे यांचे एक ढेकूण शिजेल तर शप्पथ!! त्यामुळे आयुष्यातला बहुतांश काळ इथल्या चिखलात लोळून काढण्याशिवाय पर्याय आणि अंतिम सुखही नसतंच. एक साहित्यिक बेडूक रुपालीच्या डबक्यात डराव डराव करत निवांत बसले होते. तिथे एकही देखणी चिटबेडकी आली नसल्याने त्याला कंटाळा आलेला होता. इतक्यात एक ढेकुण संपादक अवतीर्ण झाला.तो साहित्यिक बेडकाला," मध्यमवर्गीय डबके आणि जगातील अनावश्यक प्रगती वगैरे" यावर " मर्मड्रावक " शिंतोडे उडविण्यास सांगू लागला. हे साहित्यिक बेडूक तर कडेलोट आळशी! आधीच घराबाहेर पडून रोज फाफलत रुपालीपर्यंत यावे लागते म्हणून त्याला दरदरून घाम फुटे. त्याला माहित असलेले एकमेव झिंग च्याक पेय "बिअर" पिऊन वाढवलेली ढेरी कुरवाळून, शिळे पुलकट जोक्स मारत तो जीवन कसेबसे सार्थकी लावत असे. घरी फेसडबकीवर चाटकाम करून कंटाळा आला की चेंज म्हणून रूपालीत डायरेक्ट फेस टू फेसबेडकीणी असा त्याचा काटेकोर दिनक्रम असे. फेसडबकीतल्या आवडत्या 'अहो रूपं अहो ध्वनी' बेडकिणीना तिथे भेटून एकमेकांच्या यथेच्छ आरत्या ओवाळून तसेच जीवाच्या कुरवंड्या (म्हणजे नक्की काय हो?) करून करूनच ते सगळे दमायचे. शब्दांशिवाय कमाल अपमानाची किमया साधलेल्या या साहित्यिक बेडकाने ढेकूण संपादकाकडे इतक्या तुच्छ नजरेने पाहिले की तो परोपजीवी कीटक मरूनच गेला. फेसबेडकीणी रूपालीत येताच त्यांना बघायला मिळालेल्या या बेडूक-ढेकूण "न" नाट्यावर दोघीही फिदाच झाल्या. त्यांनी टाळ्यांचा मधुर कड्कडाट केला.

साहित्यिक बेडकाला लग्गेच माज आला आणि तो दुसरी शिकार टेहळू लागला. इतक्यात एक भटजी बेडूक कूपमंडूक श्लोक पुटपुटत घाईघाईने तिथून जाऊ लागला. रूपालीचा नियमित चहा पिऊन त्याला दुय्यम दर्जाच्या वैशाली नामक डबक्यात पुणेचहवेवाचन (मूर्ख लोकं त्याला पुण्याहवाचन म्हणतात) आणि कूपमंडुकोपनिषद पठण करायचे होते. साहित्यिक बेडकाने शिताफीने झटकन भटजी बेडकाचा कासोटा सोडला. भटजी उघडाच उताणा पडला आणि त्याचे मूल्याचे धोतर निसटल्याने तात्काळ मेला. हा अल्टिमेट क्लायमॅक्स पाहून रोमांचित झालेल्या फेसबेडकीणी चेकाळून साहित्यिक बेडकाचा जयजयकार करू लागल्या. साहित्यिक बेडकाच्या मेंदूला डराव झिणझिण्या आल्या. तो बिअर ढोसून टल्ली झाला आणि आपला विजयोत्सव साजरा करू लागला.

तात्पर्य : मध्यमवर्गीय बेडूक कितीही बावळट दिसला तरी कमावलेल्या मूल्यांच्या दहशतीच्या जोरावर दुर्बल घटकांवर राज्य करू शकतो.

इडा पीडा टळो आणि मध्यमवर्गीय मूल्यांचे धोतर टिको!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (5 votes)

प्रतिक्रिया

मराठी आंतरजालावरच्या काही सदाबहार विषयांपैकी एक म्हणजे पुणं : हिरीरीने त्याच्या वतीने भांडणारे आणि पुण्याला खडे मारणारे. हा धागा दुसर्‍या वर्गातला. लगे रहो Smile

उदाहरणार्थ हा गमतीने काढलेला धागा आणि त्याचे झालेले पर्यवसान पहावे : http://www.misalpav.com/node/13183.

बहुत काय लिहिणें. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

नुसत्या पुस्तक खरेदीच्या अनुभवाबद्दल वाचूनच मिसळपाववर पुणेकर फारच संतापलेले दिसताहेत . Fool
रुपालीबद्दल लिहिल्यामुळे माझी हत्या होणे निश्चित झाले . बचेंगे तो और भी खडे फेकेंगे . Biggrin Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या पुण्यावर आणि पुणेरीपणावर केलेला वार (वार करतात अन घाव घालतात. चुकून घातलेला वार लिहीले होते Wink ....... पुणेरी हो आमची पुणेरी भाषा!!!!) सोडला तर लेख खरच रोचक आहे. आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरारारारा, पार बलात्कारच केलात की हो बिचार्‍या पुण्यपत्तनकूपस्थ मंडूकांवर!!!!!!! म्हम्मद अली काय मारेल इतके पंचेस आहेत-रादर सगळ्यांचे पंचे काढून घेतलेले आहेत. पैकी मर्मड्रावक आणि चाटकाम व मत्कुणपाकसिद्धी हे तूर्तास आवडलेले पदार्थ.

अवांतरः काही ठिकाणी हा लेख टाकल्यास "कौरवपांडव संगरतांडव द्वापरकाली होय अती | तसे पुण्याचे नॉनपुण्याचे नेटिं लढले गुंग मती ||" अशी धुमश्चक्री झाली असती Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा मस्त!!! बॅट्या तुझी तू मिसळ घेऊन खा रे इतक्या मस्त प्रतिक्रियेबद्दल. माझ्याकडून पार्टी तुला, ऐष कर Wink
तू भी क्या याद रखेगा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खा रोज शिक्रण खा, मटार उसळ खा????

किंवा मिसळ नसेल तर खा तंदुरी चिकन (मराठी आंत्वानेत) Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मिसळ नसेल तर खा तंदुरी चिकन (मराठी आंत्वानेत)

पुण्यात मिसळ नसण्यासाठी काय झालं? काही शक्यता:
१. जकातीच्या जागी नवा कर आणल्यामुळे मिसळीच्या दुकानदारांची संप सुरू केला का?
२. आम्ही खाटुमखुटुम खाणार्‍यांना मिसळ विकत नाही, (संदर्भ) असा पवित्रा पुस्तकविक्रेत्याचा आदर्श ठेवून मिसळ विकणार्‍यांनी घेतला का?
३. पुण्यातली मिसळीची चव गिर्‍हाईकांच्या अनास्थेमुळे हरपते आहे काय? (संदर्भ)
४. ज्यांना मिसळीचा तिखटपणा परवडतो त्यांना तंदुरी चिकनचा मसालेदारपणा परवडत नाही काय?
५. "पुन्यात सदाशिव पेठेत बामनांनी मटन चिकन महाग केल" (संदर्भ) असेल तरीही हे फक्त सदाशिव पेठेतच असल्याचा दावा आहे. पण त्याआधी तंदुरी चिकन परवडत होते काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सर्व शक्यतांना जागा द्यायला हवी, नैतर कोल्मोगोरोव मानगुटी बसेल ना Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मिसळीवरून आठवले.

'मिसळ मिळण्याची सुप्रसिद्ध ठिकाणे' असा सदाबहार धागा, जो सर्व संस्थळावरती असणे मस्ट आहे, तो ऐसी वरती आकसाने येऊ दिला नाही म्हणे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

१. झेपला पाहिजे ना तो झणझणीतपणा!
२. जिथे तिथे आपला वेगळेपणा दाखवण्याची हौस हो, दुसरं काय!
३. असे धागे काढणार्‍यांनीच ऐसीचे मिळमिळीत रंग पाहून "असे रंग असणार्‍या संस्थळावर आम्ही आमची यादी देणार नाही." (पुन्हा एकदा पुस्तकाच्या दुकानाचा आदर्श) अशी घोषणा केली.
४. "मराठी फूड इज सो डिसगस्टींग. सो मच ऑईल अँड तिखट इन इट. माझ्या डाएटची केअर कोण करणार?", असं संस्थळ व्यवस्थापकांपैकी, स्वतःला फार तरूण आणि आकर्षक समजणारी अवदसा कडाडली.
५. आत काय राजकारण चालतं तुम्हा सदस्यांना कल्पना नाही येणार. संस्थळाच्या भल्यासाठी असं काही करावं लागतं.
६. मिसळ हे मराठी बहुजनांच्या कणखर मराठी अस्मितेचं प्रतीकच आहे. पण भंजाळलेल्या अस्मितांचा* नव्वदोत्तरी जाणीवांसकट शोध घेताना जगाचा जो व्यामिश्र आणि संक्षेपी पट समोर उलगडत जातो त्यात मिसळ आणि फ्व ग्रा यांच्यातला फरक जाणवेनासा होतो. काही समीक्षक याला जिव्हाकलिकांचं सपाटीकरण समजतात तर काही समीक्षकांच्या मते हाच तो भंजाळलेपणा आहे.
.
.
.

*. अस्मिता या सदस्येबद्दल ही चर्चा नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या प्रतिसादासाठी ROFL
आणि
*. अस्मिता या सदस्येबद्दल
ही चर्चा नव्हे. यासाठी हाभार्स

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

< जिव्हाकलिकांचं सपाटीकरण > ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Tastebud साठी रुचिकलिका असा सुंदर शब्दप्रयोग मराठीत आधीच प्रचलित आहे, हे सविनय निदर्शनास आणून देऊ इच्छितो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पंच्याईत झाली की काय तुमची . Smile
आभारी आहे . युद्ध झाल्यास आपल्या बाजूने चार पंचेस तुम्हीही लगावून द्यावे अशी इच्छा आहे . Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा अगदी Wink चारदोनच कशाला, लै पंचेस लावू, हाकानाका ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"कौरवपांडव संगरतांडव द्वापरकाली होय अती | तसे पुण्याचे नॉनपुण्याचे नेटिं लढले गुंग मती ||"

हेही भारीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मध्यमवर्गाची टर उडवली असल्यामुळे हसावं का आमच्या अतिलाडक्या पुण्याला नावं ठेवण्याबद्दल लेखाला नावं ठेवावीत याचा निर्णय झाला की प्रतिक्रिया देईन. तोपर्यंत न बोलण्याचे ठरवले आहे.

-- नॉन रेसिडेंशियल नॉन पुणेकर
अदिती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बचेंगे तो और भी खडे फेकेंगे .

तुम्हाला असे म्हणावेसे वाटते आहे याचा अर्थ तुम्हाला तुमची सांस्कृतीक् आणि साहित्यिक मुल्ये तपासायची जरूरी आहे.

(पुणेरी प्रतिक्रिया)

खोचक पण मजेशीर लिहिण्याची कला तुम्हाला चांगलीच अवगत झाली आहे. (त्या मुळे अशी शंका येते की तुम्ही स्वतःच पुणेकर असणार).
(जनरल प्रतिक्रिया)

...पण तरीही लेख आवडला असे अजिबात म्हणणार नाही.
(जाज्वल्य अभिमानी पुणेकर)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

(त्या मुळे अशी शंका येते की तुम्ही स्वतःच पुणेकर असणार).

नवपुणेकर, हो! Wink

बचेंगे तो और भी खडे फेकेंगे .

आगे बढो, हम पिछेसे बघेंगे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

घरी बेडकिणीपुढे यांचे एक ढेकूण शिजेल तर शप्पथ!!

हे वाचून हसता हसता पडलो, कोणीतरी उचलले की पुढे वाचण्याचे धाडस करेन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हे 'प्रेरीत' वाटले. अर्थात 'कावळ्याला गरुडाचे पंख लावल्याने...'

असो..

मूळ लेखन :-
पुण्यातील टांगेवाला " पंचशील " धोरण समजावीत "स्वाऱ्या" आणतो , तर इंग्रजीचा प्रोफेसर "बागेश्रीला पंचम लागलाच तर कसा माफक लागतो " हे एखाद्या गवयाला पटवून देत असतो . गवयी ग्रहलाघवमंडळाचा उपाध्यक्ष असतो आणि एखादा धावडीकरशास्त्री बिलीयर्डच्या जागतिक विक्रमाबद्दल बोलतो . वकील चरक आणि सुश्रुत वाचतो आणि डॉक्टर गाफील पेशंटला कुळकायाधातल्या खाचाखोचा समजावून देत असतो . हे सारे पुण्यात घडते - किंबहुना पुण्यातच घडते . कारण पुणे हे बुद्धिमंताचे आगर आहे . इथला प्रत्येक जण बुद्धिमंत आहे . स्वयंप्रज्ञ आहे , अलौकिक आहे .

पु.ल
गणगोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

फारच छान. काही शब्दप्रयोग आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

पुणेकरांची मज्जाय ब्वॉ आता.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20265042.cms

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऐला !!! म्हणजे पुढचा चित्रपट "मी बाजीराव(१) पेशवे बोलतोय" असा येणार का काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मध्यमवर्ग हा सगळ्या प्रांतात असतो हे ध्यानात न घेता,मध्यमवर्गीय म्हणजे फक्त मराठी मध्यमवर्गीय, असा सोईस्कर समज करुन घेत हा लेख लिहिला गेला आहे. त्याहून पुणेकरांवरचे बरेच वार हे निसटते लागले आहेत. सुरवातीचे काही उत्कृष्ट लेख वाचल्यानंतर ज्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या त्याला हल्ली तडा जाऊ लागला आहे.

- तिमा (मुंबईत राहूनही पुणेरी बाणा चालवणारा एक नॉन पुणेकर)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मध्यमवर्गीय संस्कार, मूल्ये, सामाजिक जाणिवा यावर जमेल तितके लेखन, चिंतन, तोंडाची वाफ दवडणे व प्रामुख्याने कृतीशून्यता हे या वर्गाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

हे आणि लेखाचे शीर्षक एकाच आशयाचे असल्याचे वाटते, त्यावरून तुम्ही जो काय मध्यमवर्ग विषद केला आहे त्यात तुमचा समावेश करता येईल हे नक्की. बाकी बरेचजण कायमच लिहित असतात, जमेल कोणालातरी नक्की जमेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा एक पुण्यात घडलेला किस्सा..

एकदा तर गंमतच झाली. मराठी नाटकांच्या सीडीज आणायला पुण्यातल्या कुठल्यातरी गल्लीतल्या एका दुकानात ती गेली. तिला हव्या त्या सीडीज मिळाल्याने खुश होउन, बिलाकडे न बघता तिनं त्या खरेदी करुन टाकल्या. आणि दुकानाच्या बाहेर पाऊल टाकताच तिच्या लक्षात आलं, की तिच्या बोसच्या डीव्हीडी प्लेअरवर या सीडीज चालणार ही नाहीत कदाचीत! ती पटकन दुकानात शिरली, आणि त्यांना तिनं तो प्रॉब्लम सांगितला.
"मला डीव्हीडीज दाखवा बघू" ती म्हणाली. त्यांनी तिच्यासमोर चार-पाच डीव्हीडीज टाकल्या.
"एव्हढ्याच!"
"बाई, हे सीडीजचं दुकान आहे, डीव्हीडीचं नाही" पुढचा माणूस उर्मट्पणे म्हणाला. तिला त्यातली एकही पसंत पडली नाही. नकारार्थी मान हलवुन, "मला ह्या सीडीज रिटर्न करायच्या आहेत" असं तिनं त्यांना सांगितले.
"आम्ही एकदा विकलेला माल परत घेत नाही" चेहर्यावरची रेषाही न हलवता त्यानं दुकानाबाहेर लावलेल्या पाटीकडे हात केला. पाटीवर दुकानाच्या भल्यामोठ्या नावाखाली बारीक अक्षरात ते वाक्य लिहलं होतं.
"अहो, मी आत्ता दोन सेकंदापूर्वीच घेतल्यात ह्या. याला मी हातही नाही लावला. आणि तुम्हाला त्या माघारी घ्यायला काय प्रोब्लेम आहे?" तिला ते कळेना.
"आमचा नियम आहे मॅडम" तो पून्हा निर्विकार चेहर्यानं म्हणाला.
"पण माझ्याकडे बोसचा डीव्हीडी आहे आणि त्याच्यावर या नाही चालणार. मला या अमेरिकेला घेऊन जायच्यात" अमेरिकेचं नाव ऐकुन तरी तो नरम येईल म्हणून तिनं मुद्दाम सांगितलं.
"तुम्ही अमेरिकेला घेऊन जा, नाहीतर फ़ॉरेनला घेऊन जा, सगळ्या डीव्हीडी प्लेअर वर या चालणार म्हणजे चालणार." अमेरिका फ़ॉरेनमधे नसून, जणू पलीकडच्या गल्लीतच असल्यासारखी तो म्हणाला.
"तुम्हाला काही माहीताय का बोसच्या डीव्हीडी प्लेअरबद्दल? तो भारतात मिळतही नाही. मला माहीताय या नाही चालणार त्या!" ती वैतागून म्हणाली. त्यानं खांदे उडवले. तिला संताप आला. दिवसाढवळ्या ग्राहकांना लुबाडायचं चाललयं! अमेरिकेत वॉलमार्ट मधे 'वापरलेल्या' गोष्टीही तिने किती ताठ मानेने रिटर्न केल्या होत्या!
"हा तर सरळसरळ अन्याय आहे! तुमच्या मॅनेजरला बोलवा बघु." तिनं मागणी केली. दुकानात काम करणारी दोन मुलं यावर खुऽऽ करुन हसली. त्या माणसालाही काय बोलावं ते कळेना. त्याच्या आख्ख्या कारकिर्दीत हा प्रश्न बहुतेक त्याला पहिल्यांदा विचारला गेला असावा.
"मीच मॅनेजर आहे" तो म्हणाला.
"मग मला मालकांना भेटायचंय." या गोष्टीचा आज निकाल लावायचाच असं तिनं ठरवलेलं.
"तो ही मीच." तो निर्ल्लजपणे म्हणाला.

तात्पर्य: पुणेकर आपल्या नियमांचे बडे पक्के! तुम्ही अमेरिकेतून आला असाल नाहीतर मंगळावरून, ते सहजी इम्प्रेस होत नाहीत. आणि आपण त्यांच्याकडून काही विकत घेतो म्हणजे त्यांच्यावर काही उपकार करत नसून, आपल्याला ती गोष्ट विकून तेच आपल्यावर उपकार करतायत असा त्यांचा पावित्रा असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तात्पर्य: पुणेकर आपल्या नियमांचे बडे पक्के! तुम्ही अमेरिकेतून आला असाल नाहीतर मंगळावरून, ते सहजी इम्प्रेस होत नाहीत.

अगदी बरोब्बर. नियम म्हणजे नियम, शिस्त म्हणजे शिस्त Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

सदर उपनिषद हे मांडुक्य उपनिषद या उपनिषदात केलेले संशोधन व टिका आहे का?

पुण्यपत्तन नामक कूपस्थित मांडुकत्त्वाचे हे कूपमंडुकोपनिषद या नावाचे एक्सटेन्शन असावे असा कयास आहे.

अतिशय माहितीपूर्ण आणि डोळ्याच्या कडा पाणावणारं लेखन आहे.

अवांतरः ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

" एकमेवाद्वितीय पुणे शहरात डेक्कन पलीकडे जग असून नसल्यासारखे आहे. "

" रुपाली हे प्रागैतिहासिक डबके आकाशगंगेतले सर्वोत्तम असून तिथे पुण्यातली मध्यमवर्गीय बेडके कायम जगातले सर्व अवघड प्रश्न डरावसरशी सोडवून उत्तेजक पेयपान करताना चिकण्या चिटबेडक्या नजरेनेच मटकावत बसतात."

अगदी बरोब्बर ... अचूक आणि अप्रतिम निरि़क्षण आहे ...

पुढ्च्या अध्यायात पुण्यनगरीतील बाकीच्या बेडकांविषयी लिहा ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "