बेटावरच्या कविता

बेटावरच्या कविता

१.

हे मिस्टर
यु लूक लॉस्ट
दोन इंग्रजी पोरं मला म्हणाली

मी विचारात पडलो
बहुतेक आपलं हरवलेपण
आजकाल चेहर्‍यावरही दिसून येऊ लागलंय

२.

डू यू गो टू द युनी ऑर समथिंग
मी तिला विचारलं
युनी...? आय हॅव अ बेबी
ती म्हणाली

गिव द लेडी वॉटेवर शी वाँटस
मी बार टेंडरला म्हणालो.

३.

हे देशी लोक स्वतःला आजकाल देशी समजत नाहीत
इनिट मेट वगैरे म्हणतात
खणाणा पाऊंड वगैरे मोजतात
पुण्याकडे घरं वगैरे विकत घेतात
वेदर बिदर च्या गप्पा मारतात

कडाक्याच्या थंडीत
नाताळाच्या सेलमधल्या
सगळ्यात स्वस्त वस्तू हडपण्यासाठी
सकाळी चार वाजेपासून
दुकानांबाहेर रांगा लाऊन उभे राहातात

अधून-मधून
माणसाला आयुष्यात कुठं थांबायचं
हे कळालं पाहिजे
असंही म्हणतात

- अनंत ढवळे

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

छान, अवडली.
आजकाल मुले असलेले विद्यार्थी विद्यापीठांत पुष्कळ असतात. दुसर्‍या कवितेतील बाईला मूल असले म्हणून काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अधून-मधून
माणसाला आयुष्यात कुठं थांबायचं
हे कळालं पाहिजे
असंही म्हणतात

अगदी खरं आहे.
बेटावरच्या कविता छान आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

तीन्ही कविता आवडल्या. (किंवा तीन कवितकांची एकच कविता आवडली.)
मूड साधला गेलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युनी चा अर्थ कळला नाही,
बाकीच्या २ आवडल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युनी म्हणजे युनीवर्सीटी/विद्यापीठ.
दुसरी कविता म्हणजे संतुर ची झैरात आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टँकू अस्मू Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहेत तिन्ही कविता. आवडल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'बेट' स्थिती नेमकी पकडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कमी वयातल्या सिंगल मदर्स - पब कल्चर एटसेट्रा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेखच!!
गिव्ह थे लेडी व्हॉटेव्हर शी वॉन्ट्स Smile मस्त!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१ आणि २ आवडले.
काळाच्या छोट्या तुकड्यांना चिमटीत पकडून क्षणभर निरखून पाहून सोडून दिल्यासारखे.
अगदी मोजक्या शब्दांत प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याची किमया साधली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिन्ही कविता फार आवडल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उ त्त म

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तिसरी सगळ्यात आवडली. रॅट रेसमध्ये भाग घ्यायला न मिळालेल्यांना धावण्याची हौस असते, तर त्या रेसेत धावणारे 'मी कधीतरी थांबणार आहे बरं का या सगळ्यातून' म्हणतात - पोकळपणे. आणि मग खूप पळून झाल्यावर, देव, अध्यात्म वगैरेकडे वळतात. थांबणं शिकण्यासाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता फार समजत नाहीत तरीही या कविता समजल्या आणि आवडल्या. प्रतिसादांमुळे अधिक आकलन झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.