मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा...!!

मराठी भाषा अभिजात व्हावी या संबंधीच्या मागणीविषयीची चर्चा इथे ऐकली/पाहिली.
त्यासंदर्भांने पडलेले काही प्रश्न:

१) अभिजात भाषा असल्याचा दर्जा प्रदान करण्याचा पायंडा कधीपासून /का पडला? केवळ 'भाषेचा विकास करायचा' हे उद्दिष्ट असेल तर असले मुद्दे (आधीच इतर राजकारण-विषयांचा गलबला असताना) पुढे आणण्याचे कारण काय?

२) तमिळ-संस्कृत या भाषा जुन्या आहेत(प्राकृत भाषासमूहातील अनेक भाषाही ! शिवाय संस्कृत-प्राकृत यांचा सहसंबंध हा निराळाच वादाचा मुद्दा). पण वरील चर्चेत मराठीचे अभिजातत्व सिद्ध करताना माहाराष्ट्री प्राकृत ही मराठीच असल्याचे सांगण्यात आले. त्रिमहाराष्ट्र या नावाने पूर्वी ओळखला जाणारा प्रदेश किंवा महाराष्ट्री प्राकृत बोलली जाणारा आजच्या मध्य-भारताचा भाग हा आजचा महाराष्ट्र व तेथील बोली ही मराठीच असेही सांगण्यात आले! हाल सातवाहनाचा 'गाथा-सप्तशती'देखील मराठीतच लिहिला गेला असेही सांगण्यात आले. विनयपीटकात मराठी भाषिक प्रदेशाचा उल्लेख असल्याचे सांगण्यात आले. नाणेघाटातील दीड-दोन हजार वर्ष जुने शिलालेख हे मराठीत असल्याचे सांगितले गेले. आजची मराठी त्या युरो-भारतीय भाषासमुहातील असल्याने असे निष्कर्ष ऩिघू शकत असतील तर असेल तर मग ऋग्वेददेखील मराठीतच लिहिला गेला आहे, असंही म्हणता येईल. आणि मग काय, इंडोयुरोपीय भाषासमूहातील सर्वभाषा या मराठीच! हिंदीसुद्धा मराठीचेच एक रूप. (हर..हर..आमचे फार्फार आदरणीय जे की राजसाहेब ठाकरेंच्या मराठी अजेंड्याचे कसे होणार?)

३) मराठी भाषा अभिजात म्हणून घोषित झाल्यास तिच्या विकासासाठी २०० की ३०० कोटी रुपये प्रतिवार्षिक अनुदान देण्यात येईल. तमिळभाषेसंबंधी या अनुदानातून फारसे काही निष्पन्न न झाल्याचेही याच चर्चेत मांडण्यात आले. संस्कृत भाषेसाठी मिळालेल्या ३०० कोटीतून काय उपक्रम राबवले गेले हे संस्कृताभ्यासाकांना अजूनही समजलेले नाही.म्हणजे बहुधा अनुदान मिळाल्याखेरीज मराठीचा विकास होऊ शकत नाही की काय? भाषाविकासाच्या कामासाठी दरवर्षी काही-शे कोटी रुपये खर्च येतो/होतो? पुण्यात झालेल्या साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षांना मराठी भाषेच्या विकासासाठी डॉ.सतीश देसाईंनी एक लाख रुपये दिले, त्याचा हिशेब लागत नसल्याची बातमी मध्यंतरी वर्तमानपत्रात वाचल्याचे स्मरते.

असो. मराठी भाषेवर प्रेम असले तरी तिचे अभिजातत्व सिद्ध करण्यासाठी असले भोंगळ अनैतिहासिक पुरावे द्यावे लागावेत, हे पटत नाही. हे अस्वस्थकारक आहे ! Sad पुन्हा, असो...!

विषय चर्चेसाठी खुला आहे. चुभूद्याघ्या.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

अरविंद कोल्हटकरांनी काही महिन्यापूर्वी या विषयावर भारतीय अभिजात भाषा - राजकारण्यांचा खेळ हा लेख लिहीला होता. भारतात एखाद्या भाषेला अभिजात असा दर्जा मिळून काय फरक पडला आहे याबद्दल उत्सुकता आहे.

आणि मग काय, इंडोयुरोपीय भाषासमूहातील सर्वभाषा या मराठीच! हिंदीसुद्धा मराठीचेच एक रूप. (हर..हर..आमचे फार्फार आदरणीय जे की राजसाहेब ठाकरेंच्या मराठी अजेंड्याचे कसे होणार?)

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद अदिते!! Smile वाचतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

तुमचे मुद्दे पटण्यासारखे आहेत.. सहमत आहे..
मी मराठीला अभिजात वगैरे मानत नाही, त्यामुळे मुद्यांच्या खंडनासाठी फारसा उत्सूक नाही

बाकी, सध्या येथील अ‍ॅक्टीव्ह सदस्य विचारात घेता इथे या विषयावर गमरागरम चर्चा व्हायची शक्यता फार धुसर वाटते. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

http://aisiakshare.com/node/1792
हा धागा, आणि या प्रतिसादातले दुवे देखील पहावेत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद रोचनाजी! Smile वाचतो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

इनक्रेदिबल...! धन्यवाद! उत्तम लेख शेअर केल्यबद्दल! _/\_ Smile
यासम्बन्धी शेल्डन पोलॉक यांच्या भाषणाचा व्हिडिओ पाहिला होता. The Great Chain of Academic Being या नावाने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||