धर्म-अर्थ-पोर्न-मोक्ष: देशी आणि विदेशी

भारतीय संस्कृतीतील 'धर्म-अर्थ-काम-मोक्ष' या संकल्पनेचा सहजगम्य, सुटसुटीत अर्थ "वैयक्तिक जीवनात आपल्या धर्माचे पालन करत (वा विशिष्ट गुणांची जोपासना करत), अर्थप्राप्ती करून घेत, हरघडी उत्पन्न होणार्‍या नानाविध कामनांची पूर्ती करत जीवन व्यतीत करावे आणि शेवटी या सर्वातून निर्माण होणार्‍या गुंत्यातून, व्यापातून, बंधनातून स्वत:ला मुक्त करत उर्वरित आयुष्य पाशरहित, निष्काम, तणावामुक्त असे घालवावे" असा लावता येइल.परंतु या चर्चेपुरते जरा वेगळ्या अंगाने याकडे बघूया:

'धर्म' म्हणजे ख्रिस्ती, हिंदु, इस्लाम, जैन इ. धर्म, आणि 'काम' म्हणजे कामवासना, मैथुन चित्रण, पोर्नोग्राफी, असे अर्थ घेऊन या धर्म-अर्थ-काम-मोक्षाच्या परस्पर-संबंधाचा वेध घेताना सहजपणे सुचणारे काही मुद्दे :

१. धर्म आणि अर्थ यांचा परस्पर-संबंध: चर्च, मंदिरे इ. कडे साठणारी अमाप संपत्ती, आणि ती गोळा करण्यासाठी अमलात आणले जाणारे भले-बुरे उपाय, उदा. 'इन्क्विझिशन' द्वारे संपत्ती जप्त करणे, मृत्युनंतर परलोकात मिळावेत म्हणून दिलेल्या पैश्यांची हुंडी लिहून देणे, वगैरे.
२. धर्म आणि कामवासना, काम-चित्रण इ. तील परस्पर संबंध: खजुराहो इ. च्या काळातील भारतातील एकंदरित परिस्थिती, पुढील काळात घडून आलेले बदल, मोगली व इंग्रजी अंमलाचा परिणाम, आधुनिक काळात सिनेमा इ.तून पुन्हा काम-चित्रणाकडे होत जाणारी वाटचाल इ. तसेच ख्रिस्ती धर्माचा या विषयाबद्दलचा दृष्टिकोण आणि पाश्चात्य कलेतील नग्न-चित्रणाची परंपरा, एकेकाळी ख्रिस्ती धर्माचे प्राबल्य असलेल्या देशांत आता असलेली पोर्नोग्राफीची वैधता, समाज-मान्यता, वगैरे. यहूदी, जैन, बौद्ध, इस्लाम इ.चे याविषयी काय म्हणणे आहे?
३. अर्थ आणि कामवासना यातील संबंध: उदा. पाश्चात्य देशात अठरा वर्षे वयाची मुले-मुली पालकांपासून वेगळी, स्वतंत्र रहातात, तर भारतात मुलांचे शिक्षण, लग्न इ.ची आर्थिक जबाबदारी पालक निभावतात. याचा त्या त्या संस्कृतीतील काम-जीवन, काम-चित्रण इ. वर काय परिणाम होत असतो, या विषयाचा आर्थिक पसारा किती मोठा आहे, गरीब व संपन्न समाजात याबद्दल काय फरक दिसून येतात, वगैरे.
४. मोक्ष: विविध संस्कृतीत 'मोक्ष' ही संकल्पना कोणकोणत्या स्वरूपात मांडली गेली आहे? मोक्षाचा धर्म, अर्थ, काम यांचेशी काय संबंध त्या त्या संस्कृतीत लावला गेलेला आहे?

हे आणि असे अन्य काही मुद्दे लक्षात घेत या विषयावर चर्चा घडून यावी म्हणून हा लेखन प्रपंच. त्या-त्या विषयातील जाणकार मंडळीनी यावर प्रकाश टाकावा ही विनंती.
----------------------------------------
टीप : हा धागा अप्रस्तुत वाटल्यास उडवून टाकावा.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

आज एक सुंदर वाक्य वाचलं - मनी टॉक्स अँड फायनॅन्शिअल सेक्युरीटी सिंग्स Smile

पैसा अन कुटुंब (= काम + धर्म ) ही मूल्ये निव्वळ वंदनीय वाटतात. या दोहोंची काळजी घेऊन, निगा राखल्यास, मोक्ष (=अतीव समाधान, शांती) मिळेलच मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधीच या विषयात गती नाही त्यात (किंवा त्यामुळेच?) एकूणच चर्चाप्रस्ताव समजला नाही. क्षमस्व! Sad
इतरांच्या प्रतिसादांची वाट पाहतो, त्यातून काही कळले तर लिहिनच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काम म्हणजे कामना /महत्त्वाकांक्षा/वासना असा व्यापक अर्थ असावा .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0