महाभारत युद्धामागील राजकीय समीकरणे

हस्तिनापूरचे राज्य हे तसे छोटेसेच. या एवढ्याश्या राज्याच्या वाटणीवरून जे युद्ध झाले, ते मात्र एवढे विराट. त्यात तात्कालीन भारतवर्षातील जवळ जवळ सर्व राजे आपापल्या सैन्यासह लढायला आले. वस्तुत: हा तंटा एकाच कुलातील दोन शाखांचा असताना दूर-दूरच्या राजांना त्यात काय स्वारस्थ्य होते? या युद्धातून त्यांचा काही लाभ होण्यासारखा होता का? त्यातील काही राजांनी दुर्योधनाची बाजू घेतली, तर काहींनी युधिष्ठिराची. यामागे त्यांची काय भूमिका होती? त्यात काही राजकीय समीकरणे होती का? या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.
* * * * *
महाभारतकालीन भारतवर्षात अनेक लहान-मोठी राष्ट्रे (वा राज्ये) अस्तित्वात होती: पूर्वेकडील कोसल, मगध, चेदि, अंग, विदेह, हैहय, पौंड्र, वंग, वगैरे राष्ट्रे, मध्य प्रांतातील कुरु, पांचाल, भोज, मत्स्य वगैरे राष्ट्रे, तसेच पश्चिम व दक्षिणेकडील अनर्त, विदर्भ, गांधार, अश्मक व अन्य राष्ट्रे.
या राष्ट्रांत आपसातील भांडण-तंटे, लढाया नेहमीच होत असत, शिवाय अधून मधून आर्यावर्ताच्या बाहेरील संस्कृतींशी त्यांचे संघर्ष घडून येत. या राष्ट्रांच्या जडण-घडणीत दोन प्रकारच्या प्रवृत्ती कार्यरत होत्या. पहिल्या प्रवृत्तीचे स्वरूप हे 'एकछत्री साम्राज्य' निर्माण करण्याच्या प्रयत्नातून व्यक्त होत होते, तर दुसरीचे अश्या साम्राज्यापासून स्वतंत्र होण्याच्या/राहण्याच्या प्रयत्नातून.


ही राष्ट्रे एकछत्री साम्राज्याच्या अधिपत्याखाली पाच वेळा आलेली दिसतात:

१. (इक्ष्वाकु कुल) युवस्वानचा पुत्र मांधाता याचे साम्राज्य
२. (इक्ष्वाकु कुल) राजा मरुत याचे साम्राज्य
३. (हैहय वंश) कार्तिवीर्यार्जुनाचे साम्राज्य
४. (इक्ष्वाकु कुल) सागर - भगिरथाचे साम्रज्य
५. (कुरुवंश) राजा भरत याचे साम्राज्य.

यापैकी हैहय साम्राज्याचा काळ हा प्राचीन यज्ञप्रधान वैदिक संस्कृतीच्या वाताहतीचा ठरला...हैहय हे भारतवर्षाच्या पूर्वेकडील लोक असून त्यांचा कल आर्य संस्कृतीपासून असलेले स्वतःचे वेगळेपण जपण्याचा होता. पुढे ब्राम्हणांशी घडून आलेल्या हिंसक संघर्षात, जमदग्नि-पुत्र परशुरामाचे हातून त्यांचा संहार होऊन (एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय इ.) त्यांचे साम्राज्य विलयाला गेले.

हैहय साम्राज्याच्या पतनानंतर इक्ष्वाकु आणि कुरु या दोनच प्रबळ सत्ता उरल्या, आणि भगिरथापासून दाशरथी रामापर्यंतचा काळ इक्ष्वाकु कुळाचे सुवर्णयुग ठरला. त्यानंतर मात्र त्या कुळाचा र्‍हास होऊन कुरुवंशीय भरताचे साम्राज्य आले.

भरताने स्थापन केलेले कुरु साम्राज्य पुढे खिळखिळे, विघटित होत, शंतनु-विचित्रवीर्य-पंडु च्या काळापर्यंत हस्तिनापुरच्या लहानश्या राज्याएवढेच काय ते उरले होते. असे असले, तरी कुरुवंश हा अद्याप अग्रगण्य मानला जात असे.
या काळापावेतो इतर बरेच राजे सामर्थ्यसंपन्न झालेले होते, उदा. पांचालाधिपती द्रुपद, भोजांचा भीष्मक, चेदींचा प्रमुख शिशुपाल, मगधाधिपती बृहद्रथ व जरासंध, सिंध प्रांतातील जयद्रथ, वंग देशातील पौंड्रवंशी वासुदेव ( हा कृष्णासारखी वेशभूषा करून मीच खरा वासुदेव असे म्हणत असे. याला कृष्णाने अनेकदा "जादा शानपंती दिखानेका नै, वरना इधरिच डाल दूंगा… समझा क्या ? अशी तुंबी दिली होती. तरी तो ऐकेना, म्हणून शेवटी त्याचा गेम केला होता Smile ). तसेच यादवांचे लष्करी सामर्थ्य आणि हुशारी यामुळे तात्कालीन राजकारणात त्यांचे स्थान निर्णायक ठरण्यासारखे असले, तरी त्यांच्यात एकीचा अभाव होता.
सारांश, त्याकाळी अनेक राजे सामर्थ्यसंपन्न असले, तरी कुरूकुलास आव्हान देऊन स्वत:चे मोठे साम्राज्य स्थापित करण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती.

जरासंधाने आपले सामर्थ्य वाढवत नेऊन शिशुपालाच्या सहकार्याने साम्राज्य- स्थापनेचा प्रयत्न चालवला होता. अनेक राजांवर आक्रमण करून त्यांना बंदी बनवले होते, आणि नरमेध यज्ञ करून त्यात त्यांना बळी द्यायचे ठरवले होते. (शतपथ ब्राम्हणादि ग्रंथात वर्णिल्याप्रमाणे-) नरमेध यज्ञ हा अश्वमेध यज्ञापेक्षा वरचढ असून तो करणार्‍याला अमर्याद सत्तेचा लाभ होतो, असे फळ सांगितले गेलेले होते.

परंतु श्रीकृष्णाने भीमाकरवी जरासंधाचा, आणि स्वत: शिशुपालाचा वध करून त्या साम्राज्याची शक्यताच नष्ट केल्याने आता नवीन साम्राज्याचा उदय झाला, तर तो कुरुवंशातूनच होणार, असेच सर्वांना वाटत होते.

खुद्द कुरुवंशात मात्र, दुर्योधनाने पाडवांना राज्याचा वाटा देण्यास दिलेला नकार, युधिष्ठिराने केलेला राजसूय यज्ञ, द्यूतात झालेली पांडवांची हार, द्रौपदीची कौरवांनी केलेली विटंबना, वगैरे घटनांतून कौरव-पांडवातील वैमनस्य वाढत जाऊन त्यांच्यातील युद्ध अटळ झाले होते, आणि त्या दोन्ही पक्षांनी अन्य राजांची मदत आपणासच लाभावी, असा प्रयत्न चालवला होता.
या राजांपैकी काहींचे कौरव वा पांडवांशी नातेसंबंध होते, जसे पांचाल-नरेश द्रुपद हा द्रौपदीचा पिता, विराट हा अभिमन्यूचा सासरा, यादव हे सुभद्रेचे माहेर, श्रीकृष्ण हा कुंतीचा आतेभाऊ, शल्य हा नकुल-सहदेवांचा मामा, जयद्रथ हा धृतराष्ट्राचा जावई, गांधार हे गांधारीचे माहेर… इत्यादि.

अश्या नातेवाइकांनी त्या त्या पक्षात जाणे साहजिकच असले, तरी याला काही अपवादही होते. उदा. यादवांनी, तसेच शल्याने दुर्योधनाचा पक्ष घेतला, तर कौरवांपैकी विकर्ण हा पांडवांकडे गेला. त्रिगर्ताचा राजा सुशर्मा (याचेकडे 'संशप्तक' हे कडव्या योद्ध्यांचे दल होते) याने अर्जुनाशी असलेल्या वैयक्तिक वैरामुळे दुर्योधनाचा पक्ष घेतला.

श्री अरविंद यांनी (१९०१ च्या सुमारास) मांडलेल्या सिद्धांतानुसार,तात्कालीन राष्ट्रे ही खालील तीन प्रकारच्या विचारांपैकी कोणत्या ना कोणत्याने प्रेरित होऊन युद्धात सहभागी झालेली होती:

१. कांही झाले, तरी स्वत:चे स्वातंत्र्य जपण्याची इच्छा असणारी राष्ट्रे. (शल्य, यादव इ. ??)
२. कुरुकुलाच्या मोठेपणावर मात करून स्वत:चे वर्चस्व स्थापित करण्यास आतुर राष्ट्रे. (मत्स्य, पांचाल ??)
३. पूर्वीच्या वैभवशाली साम्राज्याची स्मृती जपणारी, आणि तश्या एकछत्री साम्राज्याचा पुरस्कार करणारी राष्ट्रे. (चेदी,मगध, कुंतिभोज ??)

यातील पहिल्या वर्गातील राष्ट्रे दुर्योधनाच्या पक्षात गेली. कारण त्यांना असे वाटत असावे, की दुर्योधनाचे राज्य हे फार काळ टिकणारे नव्हे. याउलट युधिष्ठिराचे वर्धिष्णु राज्य मात्र दीर्घकाळ टिकेल... असे वाटण्यामागे दुर्योधनाच्या मर्यादा, तसेच युधिष्ठिराने केलेल्या राजसूय यज्ञातून दिसून आलेले त्याचे वाढते सामर्थ्य, आणि या सामर्थ्यामागे असलेले श्रीकृष्णाचे सूत्र-संचालन या गोष्टी असाव्यात.

श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्व हे काहींच्या मनात भक्तियुक्त आदर निर्माण करणारे, तर काहींच्या मनात तिरस्कार, द्वेष आदि निर्माण करणारे होते. कारण, त्यांच्या मते श्रीकृष्ण हा तात्कालीन नीति, धर्म आणि राजकारणात नको नको ते बदल घडवून आणू पाहणारा धूर्त, कपटी, कावेबाज आणि अविवेकी माणूस होता ( हे शिशुपालाने केलेल्या आगपखडीतून, तसेच भूरिश्रवा सारख्या आदरणीय, सर्वमान्य बाल्हिक राजाने केलेली श्रीकृष्णाची निंदा यातून दिसून येते).
श्रीकृष्ण आणि पांडव यांच्या युतीतून आकारास येत असलेल्या साम्राज्याचे मांडलिक होण्याच्या भीतीने ग्रस्त झालेली, साधारणत: आर्यावर्ताच्या बाह्य परीधीवरील राष्ट्रे (मद्र, सिंधु, अवंती, गांधार, यादव ???), तसेच गंगेच्या दक्षिण खोर्‍यात वसलेले आर्य राजे दुर्योधनाच्या पक्षात गेले.

जरासंध आणि शिशुपाल यांचे वध भीम-श्रीकृष्ण यांनी केलेले असूनही ( की त्यामुळेच ?) वधानंतर त्यांची राष्ट्रे मात्र पांडवांच्या पक्षात गेली.

भीष्म व द्रोण यांना पांडवांविषयी ममत्व होते, आणि पांडवांचा हक्कही मान्य होता, तरीही युद्धात पांडवांकडून न लढता कौरवसेनेचे नेतृत्व करून त्यांनी पांडव-सेनेचा संहार केला. याचे कारण, त्यांना पांडवांच्या पाठीशी सर्व शक्तीनिशी ठाकलेले द्रुपद आणि विराट हे बलाढ्य राजे भविष्यात सर्व सत्ता काबीज करतील, अशीही भिती वाटत असावी.

* * * * * *

वाचकहो, माझ्या अल्पमति आणि अतिअल्प अभ्यासाच्या आधारे हे सर्व लिहिले आहे. या विषयावर अन्य लेखकांनी काय सांगितले आहे, मूळ महाभारतात याविषयी कोणते उल्लेख आहेत, तसेच श्री अरविंद यांचा सिद्धांत कितपत ग्राह्य मानला जाऊ शकतो, असल्यास त्यानुसार कोणकोणते राजे त्या त्या पक्षात गेले, वगैरेंवर विद्वान अभ्यासक अधिक प्रकाश टाकतील, अशी आशा आहे.
सदर लेखनात काही त्रुटि असतील, तर त्या अवश्य नजरेस आणून द्याव्यात.

काही चित्रे:
बलराम-जरासंध युद्ध:

जरासंधवध:

कृष्णाची द्वारका.....कौरव-पांडव युद्ध:

संपादकः कृपया height="" व width="" या टॅग्जचा वापर करतेवेळी " " च्यामध्ये योग्य ती संख्या द्यावी किंवा तो टॅग काढून टाकावा. त्यामुळे काही ब्राऊझर्सवर चित्रे दिसत नाहीत. या लेखात ते टॅग्ज काढून सुधारणा केली आहे

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

तत्कालीन राजकारणाचा पट मांडण्याचा प्रयत्न आवडला. दुर्दैवाने जिथे इतक्या संख्येने राज्यं एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करत असतात त्यांची राजकारणं इतिहासातल्या बखरी, पत्रं यांसारख्या साधनांशिवाय उकलणं ही सोपी गोष्ट नाही. नुकतंच नंदा खरेंचं 'अंतकाळची बखर' वाचलं. त्यात बखरकर्ता म्हणतो 'काल अ आणि बएकत्र येऊन क वरती हल्ला केला आज त्या क च्याच मदतीने ब आणि ड च्या जोडगोळीव जरब बसवतात. अरे हे राजकारण आहे की गंजिफा पिसणं?' (अ, ब, क, ड नक्की कोण ते आठवत नाही, पण पेशवे, भोसले, निजाम वगैरे वगैरे तत्कालीन सत्ताधीश) कोण कोणाबरोबर आणि कोणाविरुद्ध का लढतो याची गणितं दर दोन पाच वर्षांनी बदलत असल्यामुळे इतक्या वर्षांनंतर हा प्रयत्न करणं खूप कठीण आहे.

चित्रं आवडली. विशेषतः दुसरं आणि तिसरं खूपच छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणतो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रयत्न आवडला.. या विषयातील जाणकारांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यातली चित्रे छान आहेत.
इतिहास कि काव्य हाच प्रश्न सुटला नसल्याने या विषयात जास्त रुचि घेववत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

संस्कृत भाषेतील जुने सर्वच ग्रंथ काव्यात असायचे... इतिहास, वैद्यक, ज्योतिष, व्याकरण, गणित, योग, रतिशास्त्र...वगैरे
काव्य म्हणजे ते कपोलकल्पितच असणार, हे संस्कृत काव्याच्या संबंधात खरे नाही.
आज ज्या स्वरूपात महाभारत आहे, ( जय - भारत - महाभारत असे वाढत गेलेले).. त्यात सर्वच निखळ इतिहास नसला, तरी मूलतः खरोखर घडून गेलेल्या घटनांवर आधारित ही रचना आहे, असे मानले जाते. त्यामुळे त्या दृष्टीने त्याचा अभ्यास करण्यात काहीच गैर नाही.
उत्खननात मिळाले, तरच त्यावरून केलेल्या तर्कांना खरा इतिहास मानण्याची पद्धत सुद्धा बर्‍याच अंशी सदोषच म्हणावी लागेल.
आजवर जे उत्खनातून मिळाले, त्याच्या हजारो पटीने आणखी अद्याप जमिनीत दबलेले नेहमी राहणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्रोजन युद्धाशी संबंधित जगड्व्याळ उत्खनने गेल्या दीडेकशे वर्षांपासून होत आलेली आहेत. त्यात हेन्रिक श्लीमानच्या आधी युरोपही असेच मानत होता की ट्रोजन युद्ध ही कविकल्पना आहे. पण श्लीमान, विलियम डोर्पफेल्ड, कार्ल ब्लेगन, आर्थुर ईव्हान्स, इ. असंख्य लोकांनी ग्रीस, पश्चिम तुर्की अन क्रीटचा कोपरान्कोपरा विंचरून काढला तेव्हा कुठे होमरच्या काव्यातील सत्याबद्दल खात्री पटली.

तुलनेने रामायण-महाभारताशी संबंधित किती उत्खनने झालेली आहेत? हस्तिनापूर, राजगीर, द्वारका, अहिच्छत्र, इ. ठिकाणी उत्खनने झालेली आहेत, पण ट्रॉय, मायसीनी, इ. च्या तुलनेत त्यांची व्याप्ती किती आहे काय माहिती. अन झालेल्या उत्खननातून पेंटेड ग्रे वेअरवाली पॉटरी सापडलेली आहेच. पण खूप मोठ्या प्रमाणावर हे काम झाल्याशिवाय महाभारत आणि रामायणाबद्दल नक्की काही विधान करणे लैच अवघड आहे. रामायण-महाभारत वाट पाहताहेत अजून एका श्लीमानची. बडी बेसबरीसे मलाही त्याचाच इंतजार आहे. काही ना काही नक्की हाताशी लागेल हे नक्की.

पण या काळाशी संबंधित अजून एक मोठी अडचण आहे. हा काळ हडप्पा संस्कृतीच्या नंतरचा आणि बुद्धापूर्वीचा आहे. या जवळपास १०००-१२०० वर्षांच्या कालखंडात (इसपू १७००-इसपू ५००) लिखित पुरावे कसलेच सापडत नाहीत. ट्रोजनवाले साले इथेही भाग्यवान- हिटाईट, इजिप्शियन आणि खुद्द लिनिअर बी मध्ये लिहिलेल्या ग्रीक टॅब्लेट्स खंडीने उपलब्ध असल्याने लै मदत झाली. आपल्याकडे च्यायला ब्राह्मीच्या आधी काही सापडायची मारामार. हे झेंगट कधी निस्तरेल देवाला ठाऊक. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भैरप्पांच्या 'पर्व' ह्या कादंबरीमध्ये महाभारताकडे एका वास्तववादी दृष्टिकोनातून पाहिलं गेलं होतं. त्या काळच्या वर्ण-जाती, उच्चनीचता वगैरेंच्या विश्लेषणाच्या आधारे युद्धात कोण कुणाच्या बाजूनं आणि का लढलं असे तपशील (किंवा अर्थनिर्णयन) त्यात होते. गांधारापासून मद्रदेशापर्यंत युद्धाची झळ पोहोचली. त्यातून जो पुरुषांचा दुष्काळ निर्माण झाला त्यामुळे नंतरच्या पिढ्यांत मोठा वर्णसंकर झाला, आणि होती नव्हती ती वर्णशुचिता नाहीशी झाली असाही उल्लेख त्यात असल्याचं आठवतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

+१११११११११११११११.

या सर्व गोष्टींचे पर्व मधले वर्णन फारच बहारीचे आहे. अर्थात राजकीय गोष्टींपेक्षा सामाजिक गोष्टींवर भैरप्पांनी जास्त फोकस केलेय असे असूनही जे वर्णन आहे त्यापेक्षा अजून वास्तववादी वर्णन कुठेही वाचलेले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हस्तिनापूर,हे छोटे राज्य का झाले असावे याविषयी मनांत गोंधळ उडतो. जर त्यांच्याकडे आग्नेयास्त्र, ब्रह्मास्त्र अशी दैवी अस्त्रे होती तर त्यांचे एवढे बलाढ्य साम्राज्य लयाला जाऊन एवढेसे छोटे हस्तिनापूरचे राज्य का बनावे ?
अरुण जोशी म्हणतात त्याप्रमाणे, हे काव्य की इतिहास, हेच नक्की ठरवता येणे कठीण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वतः अवास्तवी आणि ती काढून टाकल्यानंतर अवास्तवी बनणारी अशी विधाने/भाग काढून टाकले तर किती ट्क्के (८०? ९०?) प्रॅक्टीकल भाग उरला पाहिजे जेणेकरून महाभारत अंशतः ऐतिहासिक मानता येईल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अशी टक्केवारी सांगणे कठीण आणि चुकीचेही आहे. महाभारतातील एकही उल्लेख जरी अन्य ग्रांथिक किंवा उत्खननातील पुराव्याशी मॅच झाला तरी त्या उल्लेखापुरते महाभारत ऐतिहासिक आहे असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अन्य ग्रांथिक म्हणाल तर सर्वच धार्मिक साहित्य consistent within itself आहे. त्याचा साधारण लोजिकशी संबंध शून्य आहे हा भाग वेगळा. आणि महाभारतकालीन प्रत्येक गोष्ट जमिनीखाली का असावी? दिल्लीत पांडवांचा किल्ला आहे. हस्तिनापूर मधे हजारो वर्षांपूर्वीचं बांधकाम आहे. मथुरा आणि वृंदावनाचे तेथिल वर्णन आताच्या वर्णनाशी न जुळतं नाही. किमान ती यमुना तरी खरी आहे.
असं असूनही मला प्रत्येक गोष्टीत किमान एक गोष्ट अतार्किक असतेच. म्हणजे एखाद्या मोठ्या संख्यला ० ने गुणल्याचा अनुभव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

थोडी गल्लत होते आहे असं वाटतं. महाभारतात उल्लेखिलेली मुख्य स्थळे म्ह.हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ इ. ठिकाणी एकाच कालखंडातील अन बुद्धपूर्व काळातील पॉटरीचे अवशेष मिळाले आहेत. साधारण ११००-९०० बीसी या टाईम फ्रेममध्ये हे सगळे बसविता येते. हस्तिनापुराला नंतर पूर येऊन ते नष्ट झाले होते असाही पुराणात उल्लेख मिळतो तर त्याचा पुरावाही मिळाला आहे.

या पुराव्यांवरून कमीतकमी महाभारतात उल्लेखिलेली काही मुख्य स्थळे एकदम काल्पनिक नसून खरी आहेत हे सिद्ध होते. अन्य मुद्द्यांचा खरेखोटेपणा जोखण्यासाठी आवश्यक तेवढे कामच झालेले नाही तस्मात काही बोलूच शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रामायण/महाभारत प्रत्यक्षात घडले किंवा कसे हे कसे सिद्ध करता यावे हे समजत नाही. ती स्थळे होती का हे एकवेळ समजू शकेलही मात्र तिथे त्याच घटना घडल्या, ती माणसे वावरली हे कसे समजावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अर्थातच. हस्तिनापूरचे अवशेष सापडले याचा अर्थ तिथे धृतराष्ट्राचे पुरावे आहेत असा दावा करणे शक्यच नाही-धृतराष्ट्राच्या नावाचे एखादे इन्स्क्रिप्शन इ. मिळाल्याशिवाय.
मुद्दा इतकाच, की रामायण-महाभारत इ. मध्ये उल्लेखिलेली परिस्थिती प्रत्यक्षात काही प्रमाणात का होईना होती हे सिद्ध झाले, तर त्या कथेला थोडासा का होईना आधार आहे असे म्हणावयास हरकत नसावी. म्हणजे त्यांची नावे तीच असतील कशावरून? वेगळीही असतील, पण हस्तिनापूरचा कोणी बलिष्ठ राजा होता, इंद्रप्रस्थही त्याच लेव्हलचे होते, आणि दोन्ही ठिकाणी एकाच काळातली पॉटरी सापडते या पुराव्यांनिशी महाभारतातल्या घटना घडणे-अतिशयोक्ती वजा जाता-शक्यतेच्या कोटीतले असावे या तर्काला जास्त पुष्टी मिळते.

ट्रोजन युद्धातही अ‍ॅगॅमेम्नॉनच्या नावाचा लिखित पुरावा सापडलेला नाही. पण मायसीनीचा प्रचंड कोट सापडलाय, तिथली पॉटरी ग्रीसमधल्या अनेक ठिकाणी सापडलीय, एकाच प्रकारचे स्टिरप जार्स सापडलेत आणि हिटाईट साम्राज्याच्या परराष्ट्र खात्यात कोणी "ग्रेट किंग ऑफ अहियवा" याचा उल्लेख सापडलेला आहे. यावरून मायसीनीला ब्राँझयुगीन ग्रीसमध्ये खूप महत्व होते आणि तिथल्या राजाचे स्वामित्व हिटाईट साम्राज्यासारखे बलशाली राज्यही मान्य करत होते. त्यामुळे मायसीनीच्या राजाने ट्रोजन मोहिमेचे नेतृत्व केले असणे अगदी शक्यतेच्या कोटीतले आहे.

तोच न्याय इथेही लावायला हरकत नाही. महाभारतात उल्लेखिलेली मुख्य स्थळे बह्वंशी आजही त्याच नावाने ओळखली जातात. अजून उत्खनन केल्यास बरेच काही सापडण्याची शक्यता आहे. आता रड अशी आहे की आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे उत्खननाचे अहवाल नेटवर तरी मला कुठे मिळालेले नाहीत. त्यांच्या त्रैमासि़कांत पाहिले पाहिजे. त्यासाठी त्यांच्या ऑफिसच्या चकरा तरी मारल्या पाहिजेत नैतर भाइसंमं मध्ये तरी बसले पाहिजे. ही माहिती इतिहासाच्या काही नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांत मिळते, पण विखुरलेल्या स्वरूपात. तस्मात ट्रोजन उत्खननासारखी ही माहिती तितक्या सोपेपणाने मिळत नाही. नेटवरून ही माहिती मिळण्याचा अजून काही मार्ग असेल तर तो मला तूर्त माहिती नाही. कळाला तर आनंदच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ए एस आय च्या साईटीवर केवळ धोलीवरच्या उत्खननाची माहिती फुकट आहे. बाकी सर्व रिपोर्ट विकत घ्यावे लागतात. ते कुरियरही करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

(चक्क Wink ) मथितार्थाशी सहमत आहे.
महाभारत घडलेच नसावे असा दृष्टिकोन ठेऊन शोध घेणे टाळण्यापेक्षा महाभारत घडलेही असु शकेल अश्या दृष्टिकोनातून अधिक अभ्यास व्हावा हे योग्यच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अपडेटः आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया तर्फे प्रकाशित केले जाणारे "इंडियन आर्किऑलॉजी" या वार्षिक म्यागझीनचे १९५३-५४ पासून ते २०००-०१ पर्यंतचे अंक फ्री पीडीएफ रूपाने आर्किऑलॉजिकल सर्व्हेच्या वेबसायटीवरच उपलब्ध आहे. काखेत कळसा अन नेटला वळसा. पण बाकी मात्र काही उपलब्ध नाही सायटीवर.

त्याची लिंक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

साईटवरचा 2002-2003 (in Press) हा स्टेटस प्रत्यक्षात आहे का कल्पना नाही. खरे असल्यास (२००२-३ अजून प्रकाशित व्हायचे असल्यास) अवघड आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तसे नसावे. ते रिप्रिंटबद्दल असावे. कंसातले आकडे रिप्रिंटचे वर्ष दर्शवितात असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्यामुळे जास्त काही लिहिण्यात सम(अर्थ)नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुहास

झाले गेले गंगेला मिळाले,
आता उदय नव्या रामाचा.
नमो नमो

उत्खननातून मिळालेल्या वस्तुंना निर्विविवाद पुरावे मानले जाते, परंतु यात बराच घोळ आहे. उदा. खापरे, गाडगी मडकी इ. प्रागैतिहासिक काळापासून आजपर्यंत बनवली जातात. अमूक खापर हे अमूक काळातील, असे कश्यावरून ठरवले जाते? कार्बन १४ वगैरेंच्याही मर्यादा आहेतच.
तसेच, समजा एकाद्या खोल विहिरीत वा बोअरिंगने केलेल्या कूपात एकदी व्यक्ती वा वस्तु पडून कालंतराने तो खड्डा बुजला, तर दोन-चारशे वर्षांनंतर भूस्तर-शास्त्राप्रमाणे ती वस्तु पन्नास हजार वा दोन लाख वर्षांपूर्वीची मानली जाऊ शकते.
महाभारताच्या संदर्भात बोलायचे झाले, तर उत्खननात काय मिळू शकते? आणि ते कौरव-पांडवांचेच, हे कसे ठरवणार? प्राचीन काळी मोठमोठे वाडे सुद्धा लाकडाचे बनवले जात. रथ, भांडी, अश्या अनेक वस्तु लाकडी असत. हे सर्व केंव्हाच नष्ट झालेले असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0