ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई

मंडळी खालील गीत हे अहिराणी भाषेत (खानदेशी नव्हे) लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. ही भाषा मला ऐकून ओळखीची आहे परंतु त्यावर माझे प्रभुत्व नाही. यास्तव काही शब्द कमीजास्त असतील तर ते सांगावेत. (अहिराणी भाषेबद्दल येथे माहीती आहे.)

ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई
तू मन्हाकडे का पाहत नाही?
ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई ||

तुन्हा गळा मा सोनानी माळ
तू पायमा बांधस चाळ
तू लाजत लाजत जाई
ग बाई तुन्ह नाव सुपडाबाई ||

तुन्हा घरावर मी मारस चकरा
तुन्हा बाप व्हई का मना सासरा?
मन्ह प्रितेम का तुले दिसत न्हाई
ग बाई तुन्ह नाव सुपडाबाई ||

तुले पाहीनसन व्हयनू मी येडा
तुन्हासाठी मी बाजार धंदा सोडा
जीव जळस मन्हा थोडा थोडा
एखादडाव मनाकडे जरा लय पाही
तुन्ह नाव शे सुपडाबाई ||

तु सकाळ सकाळ बकर्‍यान्सामांगे जास
मी तठे तुन्हा मांगे मांगे येस
तूले तरीबी मना पत्ता कसा लागत नाही
तुन्ह नाव ग सुपडाबाई ||

तुन्हा भावाले मी मित्र करी लेस
तो पैलवान गडी शे मी घाबरस
आप्ला कार्यमा त्यानी ढनढन परवडणार नाही
तुन्ह नाव ग सुपडाबाई ||

आते पाऊसपानी बरा व्हयेल शे
डांळींबनी बाग मी आता लावेल शे
कांदास्ना पैसाबी मना खिसामा शे
यंदा मोसममधार लगीनले मन्ही काही हरकत नाही
तुन्ह नाव ग सुपडाबाई ||

- पाभे

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

अहिराणीबद्दल मला कल्पना नाही, पण कवितेची थिम फार आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>> कवितेची थिम फार आवडली.
धन्यवाद.

मराठीत अनेक बोलीभाषा आहेत जसे मालवणी, आगरी, वर्‍हाडी, अहिराणी आदी. खानदेश परिसर म्हणजेच जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा व नंदूरबार जिल्हा तसेच या जिल्ह्यांलगत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालूका (सटाणा), मालेगाव तालूका, कळवण तालूका आदी जिल्ह्यांमध्ये ही बोलीभाषा बोलली जाते. या भागांमध्ये गुजरात तसेच मध्यप्रदेशातील काही भागही येतो. ह्या भाषेवर गुजराती भाषेचे काही संस्कार आढळतात. ऐकायला गोड वाटणारी ही बोलीभाषा प्रमाण मराठी बोलणार्‍याला सहज समजू शकते.

वर उल्लेखलेल्या प्रांतांमध्ये या भाषेचे पोटभेद देखील आहेत. नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागात, तसेच नंदूरबार धुळे जिल्ह्यात अहिराणी बोली आढळते. जळगाव जिल्ह्यात खानदेशी बोलीचा प्रभाव आढळतो. या भागांमध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून आहे. येथील निसर्ग अजूनही संपन्न आहे. नागर संस्कृतीचे अतिक्रमण या भागांमध्ये कमी प्रमाणात आहे. सर्वसाधारण पुर्वपरंपरा, देवआचरण, रितभात या भागातले लोक पाळतांना आढळतात.

ही बोलीभाषा लिहीण्यासाठी मराठी वर्णमाला वापरली जाते.

बोलीभाषांना स्वत:चे असे व्याकरण, शब्दांचे भांडार, उच्चारण शैली असते. असे असतांना प्रमाणभाषेचे बोलीभाषेवर प्रभुत्व जाणवते. बोलीभाषा साधारणत: एखाद्या प्रदेशात बोलली जाते. ती भाषा बोलणारे लोक इतर सरकारी, व्यावहारीक, शैक्षणिक व्यवहार पार पाडतांना प्रमाणभाषेचे सहाय्य घेतात. प्रमाणभाषा कायम बोलणारा व्यक्तीसमूहात मात्र बोलीभाषा बोलणारा व्यक्ती गावंढळ, गावठी, अशिक्षीत आहे असा समज होतो. असे पायंडे पडणे हे बोलीभाषांना मारक आहे.

बोलीभाषांचा योग्य सन्मान हाच भाषाविकासाचा पाया आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

या किंवा दुसर्‍या धाग्यात आपण सगळे महाराष्ट्रातील तालुके आणि/किंवा जिल्हे दाखवून 'बोलीभाषा नकाशा ऑफ महाराष्ट्र' बनवू शकू काय? मी लातूरची माहिती देऊ शकतो. नंतर हा नकाशा कोणाही जालवाचकास आरामात सापडेल काय?

बाकी बोलीभाषेतून प्रमाणभाषा शिकणे कष्टदायक असते असा स्वानुभव आहे. जे केवळ प्रमाणभाषाच लहानपणीपासून वापरतात ते सामान्यतः अशा लोकांची 'अवहेलना'(शब्द अयोग्य झाला, असो)करतात असाही अनुभव आहे. मी बोलताना कितीही प्रमाणभाषा ओतली तरी तीन चार ओळीनंतर 'तुम्ही लातूरचे का?' असा प्रश्न समोरुन येतोच येतो. आणि इथे लातूरचे असणे इतके सन्माननीय नसते. आता मी जर लहानपणी उदगीरला असताना जसं बोलायचो तसं बोलू लागलो तर मजाच येईल.
उदा.
'का मंडालाव?' - काय म्हणत आहात?
'कुंकड गेल्तो?' - कुणी कडे गेला होता?
'अssssई , देताव?' - देणार नाही.

बाकी कविता वाचणेही माझा प्रांत नाही, पण ही कविता ज्याला ग्रामिण जीवन अनुभवून माहित आहे त्याला मस्त वाटते हे पुन्हा नोंदवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या किंवा दुसर्‍या धाग्यात आपण सगळे महाराष्ट्रातील तालुके आणि/किंवा जिल्हे दाखवून 'बोलीभाषा नकाशा ऑफ महाराष्ट्र' बनवू शकू काय?

अगदी नकाशा नसला तरी अशी माहिती संकलीत करण्याचे काम PLSI ह्या संस्थेतर्फे सुरू आहे. मराठी विषयीचा कोश सप्टेंबर २०१२ साली पूर्ण व्हायचा होता परंतु अद्याप त्यावर काम चालू आहे असे दिसते.

http://peopleslinguisticsurvey.org/view_Publication_Details.aspx?id=11

ग्रियर्सननंतर शतकाभराने पुन्हा एकवार असे संकलन होत आहे, ही चांगली गोष्ट आहे.

पाभे यांनी अहिराणी आणि खानदेशी यांतील फरक समजाऊन द्यावा ही विनंती. बहिणाबाईंची कविता ही अहिराणी की खानदेशी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकस्त्तेच्या लोकरंग पुरवणीत दर रवीवारी ’मायबोली’ नावाचे सदर येते. त्यात महाराष्ट्रातल्या विवीध भागात बोलल्या जाणार्‍या बोलीभाषेविषयी छान प्रकारे सांगीतले जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम सुरूवात!

पालकनितीच्या फेब्रुवारीच्या अंकातल्या संवादकीयाची आठवण ही कविता वाचून झाली. त्यात तालुका मुखेड, जिल्हा नांदेड इथल्या कमळेवाडी नावाच्या तांड्यावर विद्यानिकेतन नावाची आश्रमशाळा आहे. तिथे शिकवणार्‍या शिवाजी आंबुलगेकर सरांची माहिती या लेखात दिली आहे.

मातृभाषेतून शिक्षण आणि प्रमाणभाषेतून घ्यावे लागणारे शिक्षण यातील तिढा सोडवायचा हा प्रयत्न वाचनीय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कवितेची लय आवडली.

तुन्हा भावाले मी मित्र करी लेस
..........या ओळीतील 'लेस'चा अर्थ काय ?

आप्ला कार्यमा त्यानी ढनढन परवडणार नाही
.........या ओळीचा अर्थ थोडा-थोडा लावला पण नीट कळले नाही. नक्की काय अर्थ आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>> तुन्हा भावाले मी मित्र करी लेस
>>> ..........या ओळीतील 'लेस'चा अर्थ काय ?

'करी लेस' = करून घेतो =~ तुझा भाऊ पैलवान आहे. तो माझे हातपाय तोडील. मला भिती वाटते. त्याकारणामुळे मी त्याला माझा मित्र करवून घेतो जेणे करून मारहाणीचा, जखमी होण्याचातरी प्रसंग माझ्यावर येणार नाही.

>>> आप्ला कार्यमा त्यानी ढनढन परवडणार नाही
>>> .........या ओळीचा अर्थ थोडा-थोडा लावला पण नीट कळले नाही. नक्की काय अर्थ आहे ?

"कार्यमा ढनढन" = कार्यामध्ये ढनढन = कार्यामध्ये ढणढण =~ चांगल्या कार्यात विघ्न/ व्यत्यय येणे/ आडकाठी येणे
हा एक स्थानिक बोलीभाषेतील वाक्यप्रचार आहे.
उदा. राम गावात तालमीचे काम करत असतांना रावणाने त्यात राजकारण करून अडथळा आणला.
राम गावमधार तालीम्न काम करी र्‍हायना अन रावनना राजकारमुळे कार्यमा ढनढन व्हयनी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाभे भो,
बरी शे तुम्हनी कविता.
इत्लं तित्लं गल्लत शे, पन चाली. अहिरानी तुम्हनी भासा नै आसं लिखेल शे तुम्ही. थे माबोवर देसले आबा शेतस. त्यास्ले इच्चारी ल्यात का काय बरोबर शे अन काय कराले जोइये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-