वाटते मजला भिती -

जीवनाची सांगता ही वाटते मजला भिती
ऐकण्याला कोणि नाही वाटते मजला भिती

सागरावर का उसळती जीवघेणी वादळे
हा किनारा एकटा ही वाटते मजला भिती

ढोलताशा ऐकुनी मज खूप होतो त्रास हा
देवळातिल शांततेची वाटते मजला भिती

वाटले घ्यावा विसावा टेकुनी खांद्यावरी
वाट ती अडवील कोणी वाटते मजला भिती

माजलो पैशात लोळत चेहरा सुजला किती
ओळखेना आरसाही वाटते मजला भिती

जागणे अन् झोपणे का फरक नाही राहिला
जीवनाची ओढ नुरली वाटते मजला भिती
.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

मला सोप्या कविता वाचायला आवडतात. ही कविता सोपी आहे म्हणून आवडली.
तरीही आपली पहिली ओळ मी अनेकदा वाचूनही सांगता म्हणजे 'शेवट' कि 'सांगताना' हे कळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रतिसादाबद्दल आभार .
सांगता म्हणजे शेवट,समारोप या अर्थी तो शब्द वापरला आहे .
जीवनाची अखेरची घरघर लागली आहे .....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0