वटवटहुकूम

लेकाची इयत्ता दुसरीच्या वर्गात वर्गप्रतिनिधी म्हणून निवड झाली. (तसा तो पूर्वीपासूनच गुणी बाळ हो.)

मी त्या रात्री त्याच्या खोलीत जाऊन खूप रडले. 'लेकरा, सत्ता म्हणजे विषाचा प्याला हो. कधीही विसरू नकोस बरं. कायम लक्षात ठेव,' हिंदी सिनेमातल्या निरूपा रॉयच्या खास रडक्या स्वरात मी त्याला म्हटलं. लेकरू पुस्तक वाचण्यात दंग होतं. त्याने फक्त मख्खपणे माझ्याकडे एकवेळ बघितलं आणि परत पुस्तकात डोकं खुपसलं.

वर्गप्रतिनिधी म्हणून आख्ख्या वर्गाचा गृहपाठ द्यायची त्याची जबाबदारी होती. त्याप्रमाणे त्याने प्रश्न काढून दिलेही. पण स्वतःच दिलेला गृहपाठ करता करता स्वारी बरीच चिरडीला आली.

'एकदम बकवास आहे हा गृहपाठ. फाडून फेकून दिले पाहिजेत हे पेपर', गृहपाठ करता करता लेक तणतणला.

'बाळा, असे कठोर शब्द वापरू नयेत. लोकांच्या भावना दुखावतात. नेहमी गोड बोलावं', मेणाहूनही मृदु शब्दात मी माझ्या लाडक्याला समजावलं.

'पुरे गं आई आता. सारखी सारखी काय मागे लागतेस माझ्या? मला कळतं कुठे काय बोलावं ते. पूर्ण सात वर्षांचा झालोय मी. मला काय तू अजून त्रेचाळीस वर्षांचं कुक्कुलं बाळ समजतेस काय?' लेक वसकन्न ओरडला!

कस्काय करावं बाई आता? काही काही आयांच्या नशिबी मेल्या गालातल्या खळ्या कश्या त्या नाहीच्च, नुसत्याच कपाळातल्या आठ्या!

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (4 votes)

प्रतिक्रिया

मस्तं राजकीय प्रहसन.
आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तं राजकीय प्रहसन.

?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कस्काय करावं बाई आता? काही काही आयांच्या नशिबी मेल्या गालातल्या खळ्या कश्या त्या नाहीच्च, नुसत्याच कपाळातल्या आठ्या!

हे ऐकून तुमचे युवराज, "आमच्या मॉ साहेबांच्या गालावर खळ्या असत्या, तर आमच्या ही गाली त्या (खळ्या) असत्या" असे शिवबा राजेंच्या बाणेदारपणे म्हणतील की काय? असे वाटते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

खुसखुशीत चकलीप्रमाणे, पण एकच तुकडा खाल्ल्याचं फीलिंग आलं. अजून रंगवावं ही विनंती. म्हणजे फाडून फेकून देण्यासाठीच मुद्दाम चुकीचा गृहपाठ निवडला होता, आणि इतर मुलांनी किंवा मास्तरांनी हा गृहपाठ उत्तम आहे वगैरे म्हणायला सुरूवात केली होती वगैरे वगैरे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"'पुरे गं आई आता. सारखी सारखी काय मागे लागतेस माझ्या? मला कळतं कुठे काय बोलावं ते. पूर्ण सात वर्षांचा झालोय मी. मला काय तू अजून त्रेचाळीस वर्षांचं कुक्कुलं बाळ समजतेस काय?' लेक वसकन्न ओरडला! "

हे वाक्य नसतं तर हे राजकीय प्रहसन आहे हे कळलं देखील नसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

'मी त्या रात्री त्याच्या खोलीत जाऊन खूप रडले. 'लेकरा, सत्ता म्हणजे विषाचा प्याला हो. कधीही विसरू नकोस बरं.' ह्यवरुन नाही समजल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही बॉ. साधा मॉनिटर झाल्यावर आईने मुलाला असं सांगणं सामान्यपणेही शक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ओहो फारच उशिरा ट्युबलाइट पेटली आमची.
मस्त आहे ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्कड .. ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राहुल राजीव गांधी, किंवा एकंदरच गांधी खानदान हे राजकिय पाचपोच नसलेले लोक आहेत हा भाजपेयी प्रचार आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. इंदिराबाईंनी देशाच्या राजकारणात केलेले कर्तृत्व, राजीवनी आणलेली आय.टी. सुधारणा, अन सोनियानी पंप्रपद नाकारून विदेशी मुद्द्याला मारलेली धोबीपछाड हे या मतापाठी आहेत.

राहुल हा ४३ वर्षे वयाचा कर्ता माणूस अजूनही पप्पू आहे हा प्रचार कशाच्या जोरावर करण्यात येतो??

खासदार म्हणुन निवडून येणे सोडा, खरेच क्लास मॉनिटर व्हायची लायकी प्रहसने लिहिणार्‍या किती लोकांची असते?? निवडणूका येताहेत. सेन्सिबल विचार करा ना? देवळापेक्षा संडास बांधा असे म्हणायची वेळ त्यांच्यावरही आलीच ना?? हे नाटक नाहिये का? की मोदींनी वाढदिवसानिमित्त त्यांच्या मातोश्रींचे आशिर्वाद घेतल्याचे फोटो आलेच नाहीत प्रेस मधे?

हे कोणते प्रहसन? he happens to have an influencial mother. what is wrong in him seeking her advise, or both of them deciding policies?

"काँग्रेस" सरकारने वटहुकूम पारित केला. म्हणे. मग राहुल यांनी त्याला नॉनसेन्स म्हटले.

काँग्रेस सरकारात टेकू किती? नॉनसेन्स ठरविल्यानंतर कोणता टेकू जेलीत गेला? माणीकचंद खाणार्‍या कोणत्या टेकूला झटका बसला?

देशाच्या राजकारणात प्रूव्हन क्रिमिनल्स नकोत. ह्या मुद्द्यावर त्या माणसाने थोडा आक्रस्ताळेपणा केला. थोडं नाटक केलं. ओके.

इथे अक्खी बाबरी मशीद पाडण्यासाठी स्टेजवरून एक धक्का और दो वाली नाटकं खपतात. राजधर्म आठवून द्यावा इतक्या दंगली खपतात.

मग राहुल यांचं पत्रकारपरिषदवालं, (असलंच तर) नाटक का नाही खपत??? मुद्दा लक्षात घ्या ना? मुद्दा आहे, राजकारणात गुन्हेगार नकोत. सत्ताधारी आघाडीचे टेकू असलेले लालू जेलीत गेले ते विधेयक परत बोलावलं म्हणून. तरीही गरळ का ओकले जाते आहे? लोकमतचा मथळा होता, 'वट त्याचा. हुकूमही त्याचाच.'

असे असताना ही जालिय जळजळ का?

(भारताच्या निर्वाचित संसदसदस्याच्या राजकिय व क्रोनॉलॉजिकल वयाबद्दल प्रहसन लिहिणार्‍यांचे जालिय वय दीड अठवडाही नाही, हे या निमित्ताने इथे नोंदवू इच्छितो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अहो साहेब, ते लिखाण "मौजमजा" सदराखाली आहे.

वाचायचं नि सोडून द्यायचं. एवढं "सिरियस" व्हायचं काय कारण, म्हणतो मी? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे.

अशी प्रहसने म्हणजे पराभूतांची वाङमये असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अशी प्रहसने म्हणजे पराभूतांची वाङमये असतात.

क्या बात है!

अँड, (टू मिक्स मेट्याफर्स), हियर कम्स द प्रूफ ऑफ द पुडिंग, स्ट्रेट फ्रॉम द हॉर्सिज़ (की मेअर्ज़?) माऊथ!

क्वॉड एराट डेमन्स्ट्रँडम. ओह, क्वाइट ईझिली डन! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अँड, (टू मिक्स मेट्याफर्स), हियर कम्स द प्रूफ ऑफ द पुडिंग, स्ट्रेट फ्रॉम द हॉर्सिज़ (की मेअर्ज़?) माऊथ!

You are being deterministic, I must say. Fuzzier may be better.

आता मुख्य विषयाबद्दल.

प्रहसने परवडली अशी परिस्थिती आहे सध्या. 'गरीबी ही मनाची एक अवस्था आहे' अशी मुक्ताफळे उधळणारे सत्तेच्या उंबरठ्यावर बसले आहेत, नव्हे पडद्यामागचे सूत्रधार बनले आहेत. ते कोणत्या पक्षाचे आहेत, हाच पक्ष कसा जुना (आणि म्हणुन जाणता!) आहे, दुसर्‍या बाजुला मते देणे म्हणजे जनतेने हात दाखवुन अवलक्षण करणे वगैरे विचार जरा बाजुला ठेऊ. बाकी हमाम मे सब तथाकथित नंगे (हुशारसुद्धा!!) असल्यामुळे हा अर्धवट डोक्याचा नंगाही खपून जावा ही अपेक्षा अगदीच चुकीची म्हणता येणार नाही!

पण म्हणुन जरा बाजुला उभे राहुन हा सगळा तमाशा पहाणार्‍या आणि आपल्याच नशिबावर हसून वेळ मारु इच्छिणार्‍या लोकांना चक्क 'खामोश!' बजावणे हा फॅसिस्ट खाक्या मला वाटतो. तसा तो नसेलच आणि मी चूक असेन. कारण पक्ष जुना आहे, थोरामोठ्यांच्या पुण्याईवर आणि सामान्य लोकांच्या पापांवर चालला आहे.

तस्मात तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी पैशाने रईस आहे.
पण माझ्या घरी मुन्शीपाल्टीचे पाणी जर ३ दिवस आले नाही तर मला फार गरीब अस्ल्याचे 'फीलींग' येते.
मेट्याफोर्सच मिक्स करताहात ना? मानसिक अवस्थेचं मेट्याफोर आहे हेच विसरून टीप्पणी करताहात.
ज्यांनी ते मेट्याफोर वापरले, त्यांनीच अन्नसुरक्षा आणली. ती का आणावी लागते, हे आपल्यासारख्या मानसिक श्रीमंतांना समजत नाही. जरा ८-१५ दिवस रोज सायंकाळी जवळच्या फाईव्हस्टार हॉटेलच्या रेस्त्राँ मधे गप्पा मारायला (कंपनीचे क्रेडीट न वापरता) येता का? आपली दोघांचीही मानसिक वा भौतिक श्रिमंती आपल्यालाच उमजेल.
त्यांनी बोललेल्या वाक्यासहचे पूर्ण भाषण संदर्भासहित इथे डकविणार का जरा? मग पुढे बोलू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मूळ प्रहसनपेक्षा कितीतरी पटीने इनोदी प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार! तो 'जालिय वया'चा मुद्दा तर एकदमच भारी! इथे लिहायला देखील 'जालीय' दृष्ट्या 'सज्ञान' वगैरे व्हावं लागतं हा एक नवीन मुद्दा समजला ह्या निमित्ताने. किती असावं लागतं हो नेमकं 'जालीय वय' इथे? म्हणजे कविता लिहायला अमुक, ललित लिहायला अमुक, राजकीय प्रहसन लिहायला अमुक अश्या वेगवेगळ्या श्रेणी असतात का त्याच्यात? जरा एक 'जालीय सिव्हील कोड' लिहूनच टाका ना एक! अजून थोडा काहीतरी इनोदी वाचायला मिळेल आम्हाला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन ७ वर्षे राजकारणात झाली,
हे जेव्हा समजतं,

तेव्हा या 'प्रहसना'ला मी भाजपेयी गरळ असेच म्हणतो.

त्यावरून, समोरच्याचे वय काढणार्‍याचे वय नक्कीच विचारता येते.

प्रतिसाद व्यक्तिगत रोखाचा आहे, कारण प्रहसन एका राजकीय व्यक्तिबद्दल व्यक्तीगत रोखाचेच आहे. वयाच्या हिशोबात तुम्ही एकट्याच उतरू शकत नाही. आम्हालाही वय विचारता येतेच.(द्विरुक्ती)

सिव्हिल कोड बनवणे हे भारताच्या निर्वाचित खासदारांचे काम असते. राहुल गांधी निर्वाचित खासदारांपैकी आहेत. तेव्हा सिव्हिल कोड बनविण्याची जबाबदारी त्यांना द्या. माझा काय बी संबंध नाय.

फकस्त, विनोदाच्या नावाखाली राजकिय व्यक्तिंची नाचक्की करणे थाम्बवा अशी विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

फकस्त, विनोदाच्या नावाखाली राजकिय व्यक्तिंची नाचक्की करणे थाम्बवा अशी विनंती.

हे काही फारसं आवडलं नाही. तुम्ही विनोदी लेखक लोकांच्या पोटावरच उठला आहात! अहो आधीच कोणावर विनोद करायचा याची मर्यादा गेले काही दशकं आकुंचते आहे. त्याचं कारणच मुळात 'पोलिटिकल' करेक्टनेस. आता तुम्ही हक्काच्या पोलिटिशियनांवरही विनोद करू नक म्हणता आहात. हेही खरंच की, तुम्ही नाचक्की करू नका म्हणता आहात, पण विनोद म्हटला की थोडीफार नाचक्की व्हायचीच की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घासकडवीजी,
विनोदी लिहावे. राजकारण्यांची खेचावी. त्यात मज्जा येते. असंख्य दर्जेदार पोलिटीकल सटायर्स उपलब्ध आहेत. ती अती मार्मिक व कित्येकदा प्रचण्ड बोचरीही आहेत. माझी ना नाही. फक्त, धागाकर्ती यांनी मोदी वा तत्सम नॉनकाँग्रेसी लोकांवर तितक्याच निष्पक्षपणे केलेली सटायर्स मला दाखवावीत ही विनंती. तसे असल्यास मी माझी सर्व विधाने प्रिण्टाऊट काढून खाऊन दाखवीन.

राहूल गांधी यांचेवर अशी व्यक्तिगत टीका का करावी लागते?

मोदी यांच्याबद्दल विकासाची फसवी आकडेवारी येते. उत्तराखंडातले एयरड्रॉप मेडिकल टीमसकट गुजरात्यांचा रेस्क्यू नेटवर फिरलेला चालतो. इथे मात्र राहूल = आईच्या पदराखालचं कुक्कुलं बाळ? कशावरून हो? अभ्यास करा अन आकडेवारीसकट सिद्ध करा. माझे दात घशात जातील. त्या माणसाबद्दल वाईट बोलायला त्याच्या तुलनेनेन कमी वयाखेरीज काहीच नाहिये. पण चाळीशीतले पुरुष/स्त्री हेच समाजधुरिण असतात. ७० अन ८० वर्षांच्या म्हातार्‍यांना सक्रिय राजकारणातून रिटायरच करायला हवे अस माझे मत आहे.

सेन्सिबल प्रहसन लिहा. वटवटहुकूम टायटल आहे ना? मग राहूल गांधी यांनी वटहुकुमाला नॉनसेन्स म्हटले याबद्दल काही इंटेलिजंट भाष्य करून दाखवा. मी एन्जॉय करीन. पण या "प्रहसनात" काय??

तर 'लेकरा, सत्ता म्हणजे विषाचा प्याला हो. कधीही विसरू नकोस बरं. कायम लक्षात ठेव,' एकच गांधी स्टाईल बसलीये ती इतकी जोरात लागलिये का? अजूनही थप्पडकी गूँज ऐकू येतेय?

'बाळा, असे कठोर शब्द वापरू नयेत. लोकांच्या भावना दुखावतात : "हम जनता की अदालत में जायेंगे" हा वाक्प्रचार कुणाचा व का? मग लोकानुनयाचा दोष राहुल यांचेवरच का? धोब्याच्या बोलण्यावरून सीता त्यागणारे, लोकानुनयास्तव केले, असे म्हणणारे श्रीराम आप्ले आदर्श आहेत ना?

प्रहसनाचे कारण म्हणजे, राहूल यांनी एकहाती, स्वतःच्या पोझिशनचा वापर करून संसदेत व मंत्रीमंडळात पारित होऊन राष्ट्रपतिंकडे सहीसाठी गेलेला एक बावळट प्रकार उधळून लावला. या चांगल्या बाबीबद्दल फक्त 'नानी याद दिला देंगे' स्टाईल गदारोळ उठवणे मला तरी पचत नाही.

शिवाय, हुकुमशाही नाहीच तर किमाण प्रेसिडेन्शियल सिस्टीम हवी असला विचार फार पूर्वीपासून पसरवणार्‍या भाजप्/संघीष्टांना किमान मेडिया तरी फशी पडून येती निवडणूक फक्त मोदि वि. राहूल अशी पंतप्रधानपदाची निवडणूक आहे अशी हवा तयार करण्यत सध्या मश्गूल आहे. भारतातली निवडणूक व राज्यपद्धती सांसदिय लोकशाही आहे. अध्यक्षिय नव्हे, हे आपण विसरतो आहोत. याचसाठी दोन व्यक्तींत कमीअधिक दाखवणे सुरू आहे. या बाबीला माझा विरोध आहे.

असो. न्यूट्रल अन इंटेलिजंट सटायर इज अँड विल ऑल्वेज बी अ‍ॅप्रिशिएटेड. फेसबुकी प्रचारकी थाटाची लेखणी मला सहन होत नाही. कितीही हिंग लावला तरीही.

**

वैद्य काकू,
तुमच्य हिंगाच्या डबीचे पैसे मी दिलेले नाहीत. तुम्ही हिंग लावा, की गूळ. मला काडीचाही फरक पडत नाही. पण तुम्ही हिंग लावून विचारत नाहीत, तर इतके उप-प्रतिसाद, प्लस वेगळ्या धाग्यावर ह्याचा उल्लेख कशासाठी? तो काय कस्तुरी लावून केलाय का?
तुम्हाला हवे ते तुम्ही लिहा. आम्हाला हवे ते आम्ही लिहू. हिंग लावायचा की कस्तुरी की इतर काही फासायचे, ते वाचक पाहून घेतील Wink
कळवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

तुम्ही काहीही समजा हो. प्रत्येकाला कशालाही काहीही समजायचा अधिकार आहेच इथे. हा भाजपिय प्रचार आहे हे तुम्हाला वाटतंय, तुम्ही ओकलेली जलिया मळमळ (की जळजळ) हा टिपिकल काँग्रेसी अपप्रचार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. झाली फ़िट्टमफ़ाट. राहिला मी काय लिहावं आणि काय लिहू नये ह्याबाबतचा तुमचा सल्ला. त्याला मी हिंग लावून विचारत नाही. कळावे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कृपया हलकेच घ्यावे. आपण मोदींवर विनोद करू शकताच. फक्त असे विनोद केले तर इतरांवरच्या विनोदावर बेहोष होणा-यांना फारसे रूचत नाहीत असा अनुभव आहे. कुठल्याही वृत्तपत्रातल्या बातम्यांवरच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर कळेल..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

अन सोनियानी पंप्रपद नाकारून विदेशी मुद्द्याला मारलेली धोबीपछाड

हा मुद्दा अयोग्य वाटतो,
सोनिया गांधी पंतप्रधान व्हायचेच म्हणून २७३ (कि किती?) खासदारांची यादी घेऊन राष्ट्रपतींकडे (ए पी जे कलाम) गेल्या होत्या पण त्यांना काही कायदेशीर बाबींमुळे पंतप्रधान होता आले नाही असे माझ्या माहितीत आहे; तथापि खात्री नाही. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
पुढील लिंक पहा:

सुब्रह्मण्यम् स्वामी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा वल्गना (अनेकांनी केल्या) होत्या.
मात्र नंतर खुद्द कलाम यांनी स्पष्ट केले होते की डॉ.कलाम सोनियांना पंतप्रधान बनवायला तयार होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१. 'यवडी गोर्‍याली बाई, तिबी परदेसी, इतक्या उनातानाचं भारतातल्या गावागावात हिंदीतून भाषणं करत फिरतिया' हे २००४ च्या विजयाचं मुख्य कारण आहे. १९८४ मधे नवख्या राजीवला ३/४ सीटा मिळाल्या. कारण - 'जब तक सुरज चांद रहेगा, इंदीरा तेरा नाम रहेगा' गाणे. काय गावातल्या बाया रडायच्या हे गाणं लागलं कि! भावकिच्या बाइचं, नि तिच्या ४-६ वर्षाच्या लेकराचं, १२ वर्षात जमिनीच्या, भिंतीच्या वादावरुन एकदाही तोंड न पाहणारी बाई हे गाणं लागलं कि धाय मोकलून रडायला लागायची, उपाशी राहायची. अशा बर्‍याच बायांना समजावून जेऊ घातल्याचं पुण्य मी १०-११ वर्षाचा असताना घेतलं आहे. राजपरिवाराशी भावनिकता किती असावी या विषयात भारतासमोर कोणताही देश झक मारतो, म्हणून विकास वैगेरे मुद्दा इथे निवडणूकांत फोल ठरतो.

२.सोनियाजींना जो 'आतला आवाज (inner voice)' २००४ मधे ऐकू आला त्याचे पडसाद २००९ च्या निवडणूकीत उमटले. असा त्यागाचा धक्का भारताला पूर्वी कधीच बसला नव्हता अशी चर्चा झाली. मंजे गांधीजींचे, प्रसादांचे, शास्त्रीजींचे, पटेलांचे, नेताजींचे इ इ चे सुपुत्र/त्री राजकारणात आले नाहीत आणि त्यांनी केलेला त्याग तो त्याग नव्हता असे चित्र पसरवण्यात आले. पटेलांनी स्वतः भारताच्या पहिल्या पंतप्रधानपदाचा त्याग केला तो तर कोणाच्याही खिजगणतीतही नाही. सोनियाजींच्या त्यागाने प्रभावित होऊन कितीतरी कडव्या काँग्रेसविरोधी मित्रांनी 'राजधर्मपरिवर्तन' केलेले पाहिले आहे.

३. मनमोहन सिंगाना पंतप्रधान बनवून सोनियाजींनी एका दगडात हजार पक्षी मारले. १९८४ च्या दंग्याचा डाग पातळ झाला. मनमोहन सायेबांचा सीव्ही तर खुद्द मीच ४०-५० ठिकाणी फॉरवर्ड केला (मंजे बघा आमचे पी एम किती शाने सांगण्यासाठी). त्यागाच्या झटक्याने कितीतरी कडवे विरोधक मवाळ झाले. आणि शेवटी सत्ता आपल्याच हातात राहिली - मंजे मनमोहनात ते परवेज किंवा कयानी टाईप गुण मुळीच निघाले नाहीत. त्यांना स्वतःची लाज आणि अक्कल आहे कि नाही आणि असली तरी देश नक्की कोणाच्या अकलेने चालतो ते सिक्रेटच राहिले.

४. काँग्रेस पक्ष फार हुशार लोक चालवतात. मंजे कोणत्याच बाबतीत सोनियाजींवर टिका करता येत नाही. 'आतला आवाज' नव्हता कसे सिद्ध करणार? आणि भारतीय लोक असा कुठलाही आवाज, विशेषत: आतला, ऐकण्यास अत्यातुर असतात. वटहुकुमावरही राजीव गांधीना आतला आवाज ऐकू आला म्हणे. काँग्रेसवाल्यानी असा फूलप्रूफ पक्ष बनवला आहे कि त्याच्यावर टिकाच करता येत नाही. रेल्वे घोट्याळ्यात जनमत माजले कि सोनिया स्वतः मनमोहनांच्या घरी जाऊन फोन करुन राजीनामे घेतात. शेवटी बाजू अशी सावरुन घेतात कि त्यांच्यावर टिका करता येत नाही. याऊलट गुजरातच्या सगळ्या उणिवा आता सगळ्या जगाला माहित झाल्या असतील. आणि केंद्रात कोणती चांगली गोष्ट झाल्याचे श्रेय, विरोधक म्हणून, भाजपला देण्यासारखे आहे? काही आठवतच नाही. अगदी हौसेने नेमलेले कलाम यांनी पण शेवटी भाजपचे टायर पंचर केले.

५. सोनियाजींवर अकारण टिका होते असे माझे व्यक्तिगत मत आहे. नवरा आणि सासू ज्या क्रूर पद्धतीने मारले गेले ते पाहून त्यांनी पदापासून दूर राहायचा निर्णय घेतला असावा असे मला वाटते. Simple fear of death! जोडीला आतला आवाजही शुद्धच असावा असेही मानायला हरकत नाही. राजीव गांधींच्या हत्येपासून ते २००९ पर्यंत 'मेरे पति का बलिदान' हाच त्यांच्या भाषणात मुख्य विषय दिसतो. सर्व धूर्तांनी मिळून एका मूर्खाचे ऐकायचे असे ठरवलेले लोक म्हणजे काँग्रेस. विस्तार करताना हजार compromises करावे लागलेले लोक म्हणजे भाजप.

६. भाजपने 'त्यांच्या नसलेल्या' कलामांना नेमून चूक केली, पायावर कुर्‍हाड पाडून घेतली. म्हणजे कलामांना वाटायला लागले कि माझ्या राजकीय सामर्थ्याने राष्ट्रपती झालो आहे आणि आता मी माझा आदर्शवाद एन डी ए वर लादू शकतो. सत्ता सोडल्यानंतर आपले संबंध जपायला नेहमी काँग्रेस आपला राष्ट्रपती मागे ठेवते. भाजपला अक्कल कमी!

७. दोन देशांचे नागरिकत्व भारताला अमान्य/बेकायदेशीर असताना सोनियांचे अजूनही तसे असणे म्हणजे नवल! विमानतळावरची रॉबर्ट वाध्राची, चेकिंगची त्याला गरज नाही म्हणणारी पाटीही नवल! आणि काँग्रेसचे समर्थन केले कि आपण शुद्ध सर्वधर्मसमभाववादी सिद्ध होतो ही भावनाही नवल!!

http://www.firstpost.com/politics/sonia-as-pm-in-2004-has-kalam-backtrac...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

७. दोन देशांचे नागरिकत्व भारताला अमान्य/बेकायदेशीर असताना सोनियांचे अजूनही तसे असणे म्हणजे नवल! विमानतळावरची रॉबर्ट वाध्राची, चेकिंगची त्याला गरज नाही म्हणणारी पाटीही नवल! आणि काँग्रेसचे समर्थन केले कि आपण शुद्ध सर्वधर्मसमभाववादी सिद्ध होतो ही भावनाही नवल!!

१९९३ पर्यंत इटलीत दुहेरी नागरिकत्त्व मान्य नव्हतं. सोनिया १९८० च्या दशकातच भारतीय नागरिक झाल्या. जेव्हा त्यांनी भारतीय नागरिकत्त्व घेतलं तेव्हा आपोआपच त्यांचं इटालियन नागरिकत्त्व रद्द झालं. -- इति विकीपीडीया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. 'यवडी गोर्‍याली बाई, तिबी परदेसी, इतक्या उनातानाचं भारतातल्या गावागावात हिंदीतून भाषणं करत फिरतिया' हे २००४ च्या विजयाचं मुख्य कारण आहे.

असहमत. भाजपाला आपले सहयोगी पक्ष टिकवता न येणे हे २००४ मधील पराभवाचे मुख्य कारण आहे

१९८४ मधे नवख्या राजीवला ३/४ सीटा मिळाल्या. कारण - 'जब तक सुरज चांद रहेगा, इंदीरा तेरा नाम रहेगा' गाणे. काय गावातल्या बाया रडायच्या हे गाणं लागलं कि!

सहमत.. म्हणजे या गाण्याबद्दल नाही पण त्या विजयात सहानुभूतीचा मोठा वाटा होता असे म्हणता येईल.

राजपरिवाराशी भावनिकता किती असावी या विषयात भारतासमोर कोणताही देश झक मारतो, म्हणून विकास वैगेरे मुद्दा इथे निवडणूकांत फोल ठरतो.

गेले ते दिन गेले Wink

२.सोनियाजींना जो 'आतला आवाज (inner voice)' २००४ मधे ऐकू आला त्याचे पडसाद २००९ च्या निवडणूकीत उमटले.

असहमत.
२००९च्या निवडणूकीत विरोधकांचा मवाळ पवित्रा - मुद्यांची कमतरता + मनमोहनसिंगांचे अमेरिकेशी करार करताना दाखवलेले साहस व बर्‍यापैकी सुद्धृढ झालेली अर्थव्यवस्था+ आपले सहयोगी पक्ष बर्‍यापैकी टिकवता येणे + एन्डीए सरकारने घेतलेल्या निर्णयाची फळे जनतेला मिळू लागली पण ते निर्णय एन्डीएचे आहेत हे त्यांना पटवता आले नाही ही कारणे अधिक असावीत. पहिले सर्वाधिक.

असा त्यागाचा धक्का भारताला पूर्वी कधीच बसला नव्हता अशी चर्चा झाली.

म्हणजे असा त्याग कोणी केला नव्हता असे होत नाही. याचा अर्थ एखादी ठराविक व्यक्ती इतका त्याग करेल अशी अपेक्षा नसताना तसे घडले असे दुसरे उदाहरण स्वतंत्र भारताच्या इतिहासात नाही हे खरे आहे.

३. मनमोहन सिंगाना पंतप्रधान बनवून सोनियाजींनी एका दगडात हजार पक्षी मारले.

सहमत.

४. काँग्रेस पक्ष फार हुशार लोक चालवतात.

सहमत आहे. आणि पक्षात एकी टिकवायला गांधी घराण्यातील कोणीतरी वर आहे असे दाखवायला लागते, अश्या प्रकारचे नितिन थत्ते यांचे मत ग्राह्य आहे. गांधी परिवार हा सत्ताधीश असण्यापेक्षा पक्षाचे अधेजीव् आहे. बाकी सर्वायविंग इन्स्टिक्ट या पक्षात इतर पक्षांपेक्षा बरेच अधिक आहे.

(क्रमशः)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वरच्या फर्स्ट्पोस्ट्च्या लिंकमध्ये "एकतर कलाम यांनी आपले व्हर्जन बदलले आहे किंवा स्वामी चुकीचे बोलताहेत" असा पॉइंट लिहिला आहे. पण कलाम यांनी त्या आधी काहीही व्हर्जन सांगितले असल्याचे ऐकलेले नाही. त्यामुळे कलाम यांनी आपले व्हर्जन बदलले आहे हा मुद्दा मुळातच निकाली निघतो.

शिवाय कलाम यांच्या पुस्तकाच्या आधी काही काळ राष्ट्रपतीभवनातील त्यांचे सहकारी असलेल्या पी एम नायर यांनी आपल्याही आठवणी पुस्तकरूपात प्रसारित केल्या होत्या. त्यातही त्यांनी सोनिया गांधींना पंतप्रधानपदासाठी निमंत्रित करणारे पत्र तयार ठेवलेले होते असेच लिहिले होते.
http://www.indianexpress.com/news/in--04-kalam-had-sonia-s-appointment-l...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सर्व धूर्तांनी मिळून एका मूर्खाचे ऐकायचे असे ठरवलेले लोक म्हणजे काँग्रेस.

सर्व मूर्खांनी मिळून एका धूर्ताचे ऐकायचे असे ठरवलेले लोक म्हणजे भाजपा.

असे विधान याचा व्यत्यास म्हणून कसे राहिल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

भाजपमधल्या त्या मूर्ख सुपार्‍यांची आणि त्या 'सर्व ऐकत असलेल्या' शहाण्या सुपारीचे नावे/नाव सांगाल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काय राव तुम्ही बी! आडकित्त्याले सुपारीचं नाव इच्चारून राहिले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

>>विमानतळावरची रॉबर्ट वाध्राची, चेकिंगची त्याला गरज नाही म्हणणारी पाटीही नवल!

भाषा पूर्ण माहिती देण्यास असमर्थ असते हे आपले म्हणणे रास्त असेलही. पण दिलेली पूर्ण माहिती वाचलीच नाही तर जे गैरसमज होतात त्याला काय म्हणावे?

तुम्ही ती पाटी वाचली असेल तर चेकिंगची गरज नसलेल्यांच्या यादीत रॉबर्ट वड्राचे जे नाव असले त्याच्या पुढे "When travelling with SPG Protectees" असे लिहिलेले आहे. ज्यांना एसपीजी संरक्षण देण्यात आलेले आहे (म्हणजे बहुधा सोनिया, प्रियांका आणि राहुल असावेत) त्यांच्यासह प्रवास करीत असल्यास तपासणीतून सूट आहे. रॉबर्ट वड्रा एकटा प्रवास करीत असेल तर त्याला सूट नाही.

येथे पहा पॉईंट नं २ मधील बोल्ड केलेले वाक्य पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एस पी जी प्रोटेक्टीसोबत अरुणजोशी असले तर त्यांची झडती घेऊ नये ही पाटी देखिल मला तितकीच गोड वाटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्याला आता फार उशीर झाला. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

I am not taking this as a personal challenge. अन्यथा ६० वर्षाच्या बाबाने १८ वर्षाच्या बाबीशी लग्न केले अश्या बातम्या तुरळक प्रमाणात मिळतात. Fool

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

की मोदींनी वाढदिवसानिमित्त त्यांच्या मातोश्रींचे आशिर्वाद घेतल्याचे फोटो आलेच नाहीत प्रेस मधे?

या वाक्याचे विनोदमूल्य प्रचंड दुर्लक्षित झाले आहे. राहुल नेहमी आईसोबत दिसतो (आणि म्हणून त्याला लोक मत देतात/ देणार आहेत) हे पाहून मोदींनी आपल्या आईचा आशिर्वाद घेतला असे काहिसे इथे ध्वनित होत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अहो, देवालया सोबत आलय असलेले काहीबाही र्‍हाईम करण्याची वेळ येणे, हे कसले लक्षण आहे? शौचाचे??

लिंक न क्लिकणार्‍यांसाठी:
शौच को अंग्रेजी में Purity कह सकते हैं। अष्टांग योग के दूसरे अंग 'नियम' के उपांगों के अंतर्गत प्रथम 'शौच' का जीवन में बहुत महत्व है। शौच अर्थात शुचिता, शुद्धता, शुद्धि, विशुद्धता, पवित्रता और निर्मलता। शौच का अर्थ शरीर और मन की बाहरी और आंतरिक पवित्रता से है।

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आवडलं.

(फेसबुकावर, काही महिन्यांपूर्वी तुम्हीच लिहीलेली त्रेचाळीस वर्षांच्या बाळाच्या मातेची महती वाचली होती. त्यातला पंचही मस्त होता.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'वट त्याचा. हुकूमही त्याचाच.'

मला वाटतं सकाळमध्ये पण जवळ जवळ याच शिर्षकाची बातमी होती. सकाळी सकाळी हे वाचलं तेव्हा दुसर्‍या दिवशी पासून सकाळ बंद करायची अनिवार उर्मी दाटून आली.

मला वाटते, राजीव गांधीच्या हत्येनंतर सोनिया गांधी राजकारणापासून बरेच वर्षे दूर होत्या त्याचे कारण होते की ८-९ वर्षाच्या काळात प्रथम सासू मग नवरा राजकारणापायी गमावल्यानंतर मुलांनी पण त्याच मार्गाने जावे अशी त्यांची इच्छा नसावी. पण त्यांचे सुपुत्र इतर कुठलेही करिअर करण्यात अयशस्वी ठरल्यावर आणि काँग्रेस पक्ष गांधी आडनावाच्या करिष्म्याकडे अजून डोळे लावून बसला आहे हे पाहिल्यावर "चला इकडे तरी निदान याचं घोडं मार्गी लागू देत" हा विचार करून ती सूज्ञ बाई राजकारणात आली असावी. (सोनिया नक्कीच सूज्ञ वाटतात पण राहुलला स्वतःला फारशी अक्कल आहे असे मला व्यक्तिशः वाटत नाही.)

बाकी काही नाही तरी सोनियांनी राहुलसाठी बरेच चांगले सल्लागार आणि प्रसिद्धीप्रमुख नेमून दिले असावेत त्यामुळेच अशी "मोक्याच्या वेळी योग्य वक्तव्ये" आणि "बळेच महती गाणारे मथळे" छापून येत आहेत.

अर्थात मोदींसाठी स्वतः मोदी किंवा त्यांचे सल्लागार आणि प्रसिद्धीप्रमुख हेच करत असतात म्हणा! फक्त मोदींच्या बाबतीत "बळेच महती गाणारे मथळे" प्रसिद्धीप्रमुख सांभाळत असावेत. "मोक्याच्या वेळी योग्य वक्तव्ये" आणि "मोक्याच्या वेळी योग्य कॄती" ही अक्कल स्वतः मोदींकडे बरीच जास्त असावी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

पण त्यांचे सुपुत्र इतर कुठलेही करिअर करण्यात अयशस्वी ठरल्यावर
<<<
तुम्हा आम्हाला पोट भरायची काळजी असते अन करिअर करावी लागते.
'यांची' डिक्लेअर्ड इस्टेट किती आहे, यांची शैक्षणीक क्वालिफिकेशन्स काय आहेत, यांना करियर करायची गरज आहे का? हे जरा गूगलून पहाता का??

रच्याकने :
१. मोदींना 'इतरत्र' करिअर करता आली नाही म्हणून राजकारणात यावे लागले असावे काय?
२. आमची अक्कलहुशारी जास्त आहे हे सांगण्यासाठी समोरचा मूर्ख/पप्पू असे कानीकपाळी ओरडत रहाणे ही भाजपेयी/संघीष्ट नीती आहे. आम्हाला जास्त पाचपोच आहे असे दाखविण्यासाठी प्रत्येकच वेळी काँग्रेसच्या लोकांबद्दल हीन पातळीवर जाऊन मौनमोहन इत्यादी व्यक्तिगत निंदेचे शब्द वापरीत बोलणे हे यांचे नेहेमीचे डावपेच आहेत. त्यापैकीच एक डाव या प्रहसनात मला तरी दिसतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आमची अक्कलहुशारी जास्त आहे हे सांगण्यासाठी समोरचा मूर्ख/पप्पू असे कानीकपाळी ओरडत रहाणे ही भाजपेयी/संघीष्ट नीती आहे.

याबाबत साशंक आहे.

म्हणजे, विधानातील तथ्याबाबत शंका नाही. फक्त, ही नीती केवळ भाजपेयी/संघिष्टांपुरती मर्यादित नसावी. किंबहुना, ही अखिलजागतिक उजव्यांची नीती असावी, अशी शंका मला येते. (चूभूद्याघ्या.)

'आमच्या'कडील राइट-विंग टॉक रेडियो/फॉक्स 'न्यूज' हा बहुधा त्यातलाच प्रकार मानता यावा. (पुन्हा चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तथ्याबद्दल नाही पण व्याप्तीबद्दल शंका आहे.
सदर नीती हे भाजप किंवा उजव्यांपुरतीच मर्यादित नसून डाव्या विचारसरणीला मानणार्‍या पक्षांतही (व अनेकदा काँग्रेससारख्या 'मध्याच्या डावीकडचा' असा समज बाळगणार्‍या पक्षातही) हाच भाव दिसतो. किंबहुना, कोणत्याही एकच बाजु योग्य असे ठरवून त्या-त्या बाजुला थोडेतरी झुकल्यावर आपल्या बाजूला अधिक वजन आहे हे पटवण्यापेक्षा समोरची बाजु कशी हलकी आहे हे पटवणे - तसा आभास निर्माण करणे - सोपे जात असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुण्यात नोकरी करत असताना, एकदा सुट्टी घेऊन महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान करायला (भावाच्या) घरी गेले.

"कशाला आलीस, सुट्टी बिट्टी घेऊन?" होय, आमच्यात असंच स्वागत करतात. बहिण एवढ्या आठवड्यांनी घरी आल्ये म्हणून आरती ओवाळायची पद्धत नाही. "नाहीतरी तो नेहेमीचा शिवसैनिकच जिंकून येणार. यावेळेला महापौरपद राखीव झालंय महिलांसाठी. तेव्हा आठव्यांदा निवडून आला तरी त्याच्या हातात वाडगाच येणार. आणि आपल्या भागातला, साचणार्‍या पाण्याचा प्रश्नही तसाच रहाणार. नाले, गटारं वाढवणारेत का हे लोक?"
"अरे, पण मतदान नको का करायला आपण? शिकलेल्या लोकांनीच असं वार्‍यावर सोडलं तर?"
"मतदान गेलं खड्ड्यात! या दिवसात प्रवास टाळण्याचा शहाणपणा दाखव. निदान दुपारी गावभर उंडारलीस तर रात्री माझ्या डोक्याशी किरकिर करू नकोस." अशी सुरूवात झाली होती.

मतदानानंतर चर्चा झालीच, "कोणाला दिलंस तुझं ३०० रूपये आणि एक सुट्टी एवढ्या किंमतीचं अमूल्य मत?"
"आठवत नाही. यादीत तेरावा उमेदवार मोजला आणि दिलं मत." अर्थातच भावाचा चेहेरा, "काय वायझेड बाई आहे ही!" असा झाला. "हां मग. नेहेमीचा 'आपला' शिवसैनिक काही करत नाही हे तू मला सांगायचं का मी तुला? काँग्रेस-राष्ट्रवादीवाला जितूभाई तिथे दहीहंडीच्या नावाखाली किती घडे, घागरी फोडतो याचा पाढा तूच वाचलास. मनसेवाला शिकलेला असला तरी त्याच्यावर मारामारी टाईप पोलिसकेसेस आहेत. मग कोणाला मत देणार? 'दहा-वीस' करण्यापेक्षा आवडत्या आकड्याला मत देऊन आले, झालं!"

लोकसभेच्या निवडणूकांमधे मत देण्याची वेळ आली तरी बहुदा मी असाच शंख करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यादीत तेरावा उमेदवार मोजला आणि दिलं मत.

दुष्काळात तेरावा महिना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वरील उलटसुलट टिप्पण्यांमधे मला अस्थानी वाटलेला मुद्दा म्हणजे "राहुल सुमार बुद्धीमत्तेचे आहेत हा भाजपेयी (हा शब्द आवडला Lol प्रचार असल्याचा. म्हणजे भाजपा त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी प्रचार करत असेलच पण कोणत्याही राजकीय पक्षाने अशी संधी का दवडावी? राहुल गांधी यांनी चेंबर ऑफ कॉमर्स मधे दिलेले खालील भाषण ऐकले तर मला फक्त एवढाच प्रश्न पडला की काँग्रेस मधे एवढे धूर्त आणि मुरलेले राजकारणी असताना त्यांनी या बापड्याला एक चांगला भाषणलेखक का नाही दिला? की राजकारणात कसलीही भाषणे दिली तरी काही फरक पडत नाही हेच त्यांना सिध्द करायचे आहे? बाकी पंतप्रधान पदासाठीचा दावेदार सुमार बुद्धीचा असला तरी काही फरक पडत नाही असे असेल तर मग मनमोहन सिंग यांच्या केंब्रिज शिक्षणाचा काँग्रेसला आणि देशाला नक्की काय उपयोग होतो?
"मोदींपेक्षा राहुल परवडेल" असा मुद्दा असेल तर तो तसा आणि त्याच शब्दांत मांडावा आणि त्याचा तसाच प्रतिवाद करावा. आपल्या राजकीय कलाच्या बाजूने कोणत्याही गोष्टीचे समर्थन करायला लागले तर आपणही कोणत्यातरी प्रकारचा प्रचारच करतो आहोत हे सिद्ध होते.
बाकी व्यक्तिगत हल्ले वगैरे ऐसीवर सहसा न दिसणार्या गोष्टी या धाग्याच्या रुपाने अगदी उघडपणे दिसल्याने वाईट वाटले हे नमूद करते. धागाकर्तीने काँग्रेसी राजकारणावर हल्ला करताना भाजपा धुतल्या तांदळासारखे आहे असे म्हणण्याआधीच (ते तिला म्हणायचे असले तरी तिने अद्याप म्हटलेले नसताना) तिच्यावर भाजपेयी प्रचाराचा आरोप करणे हे काही जालीय परिपवक्व्तेचे लक्षण आहे असे वाटत नाही.
टीपः ही खालील चित्रफीत "भाजपेयी" प्रचारासाठी वापरली जाते याची कल्पना आहे म्हणूनच कोणत्याही प्रकारचा राजकीय प्रचार करण्याचे पातक आपल्याकडून, आपल्या नकळतही होऊ नये म्हणून मी अद्याप इथे लावली नव्हती आणि शिवाय बर्याच जणांनी आत्तापर्यंत ती पाहीलीही असे. पण "Someone should call Spade a Spade" असे या धाग्यावरच्या प्रतिक्रिया वाचून वाटले म्हणून लावत आहे. बाकी तुमच्या राजकीय आस्था कोणत्याही बाजूच्या असतील तरी या भाषणाचे विनोदमूल्य सर्वांसाठी सारखे असावे असे वाटते. चु.भू.द्या.घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी व्यक्तिगत हल्ले वगैरे ऐसीवर सहसा न दिसणार्या गोष्टी या धाग्याच्या रुपाने अगदी उघडपणे दिसल्याने वाईट वाटले हे नमूद करते.

सहमत आहे.

एकावर टीका केली म्हणून लिखाण प्रमुख विरोधकाचं समर्थन आहे असं समजण्याची बायनरी विचारसरणीही पटली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आय कॉल अ स्पेड अ स्पेड.
"त्यांना म्हणायचे असेल तरी त्यांनी अजून म्हटले नाही तोपर्यंत" त्यांचा विनोद विनोदी आहे म्हणून सोडून देणे मला पचत नाही.
आता तुम्ही लावला त्याच न्यायाने, मी जोपर्यंत राहूलचा खुल्या शब्दांत प्रचार करीत नाही, तोपर्यंत मी त्यांचा प्रचार करतोय असे गृहित धरून पुढचे विवेचन करणे व व्हिडू डकविणे, हे स्पेड ला किल्वर म्हणणे असे म्हणावे काय? (im familiar with all the naunces and contexts in which the phrase 'call a spade a spade' is used, please note.)
एक पप्पूपेडिया नावाचे भाजपेयी विकी आहे. बघा गूगलून. नेक्स्ट टाईम व्हिडिओ देताना सगळे एका जागी सापडतील Smile

ता.क.
"आडकित्ता, तुम्ही मूर्ख आहात, मी इथे भाजपाच्या बाजूने बोलत नाहिये." इतके साधे वाक्यही माझ्या सर्व पोस्टी भुईसपाट करू शकते. पण तत्समही वाक्य आलेले नाहिये, हे प्लीजच नोट Smile

इत्यलम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

वरच्या भाषणाचा मेसेज लगेचच कळला कारण तो अगदी स्पष्ट आहे. भाषणाचा समारोप ०८.०० ते ०८.१५ ह्या वेळात पडतो आणि मेसेज शब्दशः असा आहे:

I have no interest in going bald, even though it's looking pretty likely at this stage. So that is my message. Thank you for coming here and listening to me.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0