बॉम्बे डक - आगरकर निवृत्त!

२००३ मधली ब्रिस्बेन कसोटी. भारताचा स्कोर ऑस्ट्रेलियाच्या स्कोरच्या पुढे नेऊन व स्वतः शतक मारून दादा नुकताच आउट झालेला. आगरकर खेळायला आला. मग एक दोन बॉल्स नंतर एक रन काढला आणि जणू शतक मारल्यासारखे बॅट उंचावून सर्वांना दाखवली. स्वतःच्याच अपयशाबद्दल इतक्या सहजतेने सेन्स ऑफ ह्यूमर दाखवणारा खेळाडू क्वचितच कोणी असेल. येथे बॅट दाखवण्याचे कारण म्हणजे त्यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अजित आगरकर त्यांच्या विरूद्ध सलग ७ वेळा शून्यावर आउट झाला होता. त्यातील चार वेळा 'गोल्डन डक' म्हणजे पहिल्याच बॉलवर! तेथेच त्याला 'बॉम्बे डक' नाव पडले. त्यामुळे मग जेव्हा त्याने त्यानंतर पहिल्यांदा तेथे रन काढला तेव्हा मोठीच कामगिरी होती ती!

पण त्याला 'डक' समजण्यातला धोका कांगारूंना पुढच्याच अ‍ॅडलेड कसोटीत दिसला. पहिल्या डावांत साधारण बरोबरी झालेली असताना दुसर्‍या डावात त्यांचे सहा लोक उडवून आगरकरने मॅच ओपन केली. मग द्रविड ने दुसर्‍या डावातही शेवटपर्यंत राहून ती जिंकून दिली. पण चौथ्या दिवशी आगरकरने त्या विकेट्स काढल्या नसत्या तर भारताला संधीच मिळाली नसती.

अमेरिकेतील वर्ल्ड सिरीज किंवा इंग्लंड मधली काउंटीची चॅम्पियनशिप आधीच्या सीझन मधे जिंकून देणारा कप्तान जेव्हा निवृत्त होतो तेव्हा मीडियामधले रकाने च्या रकाने त्याला वाहिले जातात. अमेरिकेत पुढे त्यांच्यावर चित्रपट निघतात. आपल्या रणजी ला तेवढी किंमत दिली जात नाही. पूर्वी तेथे धावांचा पाऊस पाडणारे लोक आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकत नसत तेव्हा ठीक होते. पण आता तसे नाही. नाहीतर मागच्या वर्षी अंतिम सामन्यात महत्त्वाच्या वेळेस जबरी बोलिंग करून मुंबईला करंडक जिंकून देणारा खेळाडू इतका दुर्लक्षित राहिला नसता.

मागच्या सीझन च्या आधी आगरकरचे मुंबई व्यवस्थापनाबरोबर काहीतरी वाजले, व तो अचानक संघ सोडून निघून गेला. मग त्याला पटवल्यावर आला, कप्तान झाला व रणजी करंडकच जिंकून दिला. ही खास पाकिस्तानी स्टाईल - आज सर्वसाधारण खेळाडू, उद्या संघाबाहेर्/निवृत्त/बंदी, तर परवा विजयी कप्तान!

आगरकर बद्दल एकदम चपखल कॉमेण्ट एक क्रिकइन्फो वर परवा वाचायला मिळाली - "He would have been the best bowler if an over had only five balls!" Smile ओव्हर मधे चार-पाच जबरी भेदक बॉल टाकायचे व त्यातून वाचल्याबद्दल बॅट्समनला बक्षिस दिल्यासारखा एक बॉल द्यायचा ही आगरकरची खासियत. त्यामुळेच तो कधी प्रचंड आवडायचा तर कधी त्याचा प्रचंड राग यायचा.

कौशल्याबद्दल बोलायचे तर फास्ट बोलर चे 'फिजिक' अजिबात नसूनही बर्‍यापैकी चांगला वेग (आणि ९८ साली तो आला तेव्हा असलेल्या आपल्या बोलर्सच्या मानाने तर खूपच चांगला), खतरनाक स्विंग, चांगला यॉर्कर या जमेच्या बाजू. ओव्हर मधे एक 'हिट मी' बॉल देणे हा मेन प्रॉब्लेम. मात्र इतर सर्व बोलर्सच्या तुलनेत अत्यंत चांगली फिल्डिंग, आणि 'ऑल राउंडर' मधे गणना होण्याएवढी नाही, पण अचानक चमक दाखवणारी बॅटिंग. लॉर्ड्स च्या ड्रेसिंग रूम मधे तेथे कसोटी शतके मारणार्‍यांची नावे लिहीलेली आहेत तेथे असलेले त्याचे नाव तेथील टूर गाईड आवर्जून दाखवतो.

त्याच्या स्विंगचे एक खतरनाक उदाहरण. रिप्ले मधे लक्ष देऊन बघितलेत तर अफाट स्विंग लक्षात येइल. कालिसचा ऑफ स्टंप उडवणे इतके सोपे नाही.
http://www.youtube.com/watch?v=010HkflyuI4

स्टीव वॉ ने त्याच्या आत्मचरित्रात लिहीले आहे की त्याच्या करीयर च्या सुरूवातीला रिचर्ड्स ला बोलिंग करताना मुद्दाम खुन्नस उकरायला त्याने त्याला बाउन्सर टाकला होता. ही त्याचीच मात्रा वॉ विरूद्ध, त्याच्याच सेलेब्रेटरी शेवटच्या सिरीज मधे
http://www.youtube.com/watch?v=l4v1e_WgYh4

जयसूर्या ९६-९७ मधे पाटा विकेट्स वर व्यंकटेश प्रसाद ई ना ठोक ठोक ठोकायचा (अर्थात प्रसादही आपण हेडिंग्ले च्या स्विंग वाल्या किंवा पर्थच्या बाउन्स वाल्या पिचवर बोलिंग करत आहोत अशा भ्रमात मुंबई व कोलंबोत त्या लाईन-लेन्थ वर जयसूर्याला बोलिंग करायचा). मात्र माझ्या आठवणीत आगरकरने त्याला कधीच जास्त खेळू दिला नाही.
http://www.youtube.com/watch?v=U6GJjE1a6Tw

भारताकडे 'बोल्ड' घेणारे बोलर्स फारसे नव्हते तेव्हा. त्यामुळे याचा यॉर्कर व त्याने उडवलेले बोल्ड व एलबीडब्ल्यूज उठून दिसत. मग नंतर झहीर, इरफान, आरपी सिंग ई. आले.

आगरकरला मॅन ऑफ द मॅच न दिल्याचे मला सर्वात वाईट वाटले होते ते १९९८ च्या श्री लंकेतील 'इंडिपेण्डन्स कप फायनल' ला. याची थोडी पार्श्वभूमी म्हणजे १९९६ मधे वर्ल्ड कप जिंकल्यावर पुढे दोन वर्षे वन डेज मधे लंका सर्वांनाच भारी पडत होते. जुलै १९९८ मधे तेथे ही एक 'इंडिपेण्डन्स कप' स्पर्धा झाली. त्याच्या फायनलला सचिन व दादा दोघांनीही शतके ठोकून भारताला ३०० च्या पुढे नेऊन ठेवले होते. पण लंकेकडे अजूनही फॉर्मात असलेले वर्ल्ड कपचे हीरो होते. त्यांना घरच्या पिच वर ३०० बनवणे तेवढे अवघड नव्हते. पण गोलंदाजीला इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आगरकरने जयसूर्या, कालुवितरणा, रणतुंगा व अरविंदा डीसिल्वा या चार सर्वात महत्त्वाच्या विकेट्स प्रत्येक मोक्याच्या वेळी उडवल्या. त्यामुळेच भारत जिंकला. 'मॅन ऑफ द मॅच' नक्कीच आगरकरला मिळायला हवे होते. प्रत्यक्षात सचिनला दिले गेले. तो चांगला खेळला होताच, पण शतके तर गांगुली व डीसिल्वाने ही मारली होती. हे स्कोरकार्ड बघितल्यावर अंदाज येइल.
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/66157.html

याखेरीज आगरकरच्या बर्‍याच बोलिंग व बॅटिंग मधल्या खेळी लक्षात आहेत. तुमच्याही असतील. अझर, सचिन, गांगुली व द्रविड या चार कप्तानांच्या कारकीर्दीत अनेक वेळा तो संघात आला ते प्रत्येक वेळेस काहीतरी पोटेन्शियल दिसल्यानेच. बर्‍याच संघनिवडींनंतर "अब ये कहाँसे आ गया?" हा माझ्या एका मित्राचा पेटंट प्रश्न असे. सध्याच्या बोलर्स चा फिटनेस पाहता अजूनही कदाचित आला असता. खरे म्हणजे यावर्षीही त्यालाच मुंबईचा कप्तान करणार होते असे वाचले. रणजीची पहिली मॅच सचिनही खेळणार आहे, तर आगरकरलाही का आग्रह केला नाही कळत नाही. त्याने आधीच निवृत्ती जाहीर केल्याने बॉम्बे डक चे स्वॅन साँग आपल्याला बघायला मिळाले नाही.

एकूण एक बर्‍याच वेळा डोक्याला ताप देणारा पण तितक्याच वेळा थक्क करणारा खेळाडू. अजित - आम्हा फॅन्स तर्फे धन्यवाद व शुभेच्छा!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

आजित आगरकरचा अल्प परिचय आवडला....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आगरकर मला फार आवडायचा नाही तो वर म्हणल्याप्रमाणे दर ओवर मध्ये एक चौका-बॉल तो देत असे म्हणूनच. २००३ ची अ‍ॅडलेची कामगिरी कायम लक्षात राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

छान लेख. तेंडुलकरसारख्या अनभिषिक्त सम्राटाबद्दल लिहिणं सोपं असतं. पण आगरकरसारख्या - ज्याने आपली चमक दाखवतानाच डोक्याला तापही दिला आहे - खेळाडूबद्दल लिहिणं कठीण असतं. ते आव्हान समर्थपणे पेललेलं आहे. मधूनच सेंच्युरी करण्याची क्षमता असतानाही इतक्या वेळेला इतके कमी स्कोअर येणं हे खरोखरच वैैतागवाणं असायचं. बॅटिंग करताना बघितलं तर तो अगदी तंत्रशुद्ध खेळायचा. त्याला

मलाही आगरकरने काढलेल्या सहा विकेट्सची इनिंग आठवते आहे. पहिल्या दोन विकेट झटपट काढल्या, आणि शेपटी दहाबारा रन्समध्ये गुंडाळून टाकली. त्यावेळी आणखीन २०-२५ रन्सही भारी पडल्या असत्या.

मॅन ऑफ द मॅचसाठी बॅट्समनना नेहमीच झुकतं माप मिळतं असं माझं निरीक्षण आहे. चार विकेट काढणं हे सेंचुरी करण्याइतकं कठीण असावं. याचं मुख्य कारण म्हणजे बॅट्समनसाठी रन्स किती होतात हे पूर्णपणे त्याच्या हातात असतं. याउलट बोलरला इतरांनी घेतलेल्या विकेट्सपैकीच विकेट्स घेता येतात. (१० विकेट घेणं हे ४०० रन करण्याइतकं, ८ विकेट घेणं हे साधारण ३०० रन करण्याइतकं, तर ६ विकेट घेणं २०० रन करण्याइतकं कठीण आहे बहुतेक)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मॅन ऑफ द मॅचसाठी बॅट्समनना नेहमीच झुकतं माप मिळतं

सहमत. पण नुस्तं किति विकेटा घेतल्या हे महत्वाचं नहिये. कोणाच्या घेतल्या हे पण महत्वाचय. त्यामुळे रन्सा आणि विकेटांच वरीलप्रमाणे गणित तयार करणं फसवं होईल. रन्सा या रन्सा असतात. त्या कोणत्या गोलंदाजाविरुद्ध काढल्या याचा डायरेक्ट फरक नाही पडत. ( प्रतिस्पर्ध्याच मानसिक खच्चिकरण वगैरेचा फरक असु शकेल. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

परिचय आवडला.
आगरकर हा काही माझा फार आवडता खेळाडू नव्हे (खरं तर 'त्या' धावा बहाल करणार्‍या चेंडूंमुळे वैतागच आणायचा)
पण त्याचे ज्याने सर्वात कमी मॅचेसमध्ये २०० विकेट्स आणि १००० रन असे दोन्ही टप्पे पार करण्याचे (१३३/१३४ मॅचेस - चुभुद्याघ्या) नेहमीच कौतूक वाटत आले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

एकदिवसीय क्रिकेटमधे झटपट ५० विकेट्स घेण्याचा मानही त्याच्या नावावर होता. (अलिकडे मीच क्रिकेट बघितलेलं नाही त्यामुळे सध्या कोणाच्या नावावर हा विक्रम आहे हे माहित नाही.)

बाकी घारा-गोरा, व्ही-आकाराचा आगरकर बघायलाही आवडायचा.

(अवांतर - अजित आगरकरची गर्लफ्रेंड मुस्लिम होती याबद्दल काही 'कट्टार' कोकणस्थ मित्रांना अभिमान होता. पुढे त्याने तिच्याशीच लग्न केलं. मग मात्र त्यांना आगरकरचा राग येत असे. त्यातला एकजण अभिमानाने "तिला हिंदू बनवेपर्यंत कुलदैवताच्या देवळात त्यालाही प्रवेशबंदी केली", असं सांगत होता. मी दगडावर डोकं आपटण्याचा फार प्रयत्नही केला नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(अवांतर - अजित आगरकरची गर्लफ्रेंड मुस्लिम होती याबद्दल काही 'कट्टार' कोकणस्थ मित्रांना अभिमान होता. पुढे त्याने तिच्याशीच लग्न केलं. मग मात्र त्यांना आगरकरचा राग येत असे. त्यातला एकजण अभिमानाने "तिला हिंदू बनवेपर्यंत कुलदैवताच्या देवळात त्यालाही प्रवेशबंदी केली", असं सांगत होता. मी दगडावर डोकं आपटण्याचा फार प्रयत्नही केला नाही.)

कुणाला कशाचं आणि यांना गर्लफ्रेंडचं. आयला, स्वतःत दम आहे तर करा की मुस्लिम/क्रिश्चन गर्लफ्रेंड आणि मग हवे तर तोरा मिरवा. (त्यात- अ‍ॅज इन ग.फ्रे. मुस्लिम इ. असण्यात काय मिरवण्यासारखे आहे हा भाग अलाहिदा पण किमानपक्षी ते स्वतःचे कर्तृत्व तरी आहे.) वायझेड जमात आहे झालं. या लोकांना बाजीरावाच्या स्वार्‍याशिकार्‍यांपेक्षा मस्तानी 'मिळवल्या'चाच अभिमान असतो. अशी लोकं जवळून पाहिल्यामुळे चांगली लक्षात आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वेगवान गोलंदाजा मध्ये आगरकरला सर्वात जास्त ९ वेळा मेन ऑफ द मॅच हा खिताब मिळाला आहे. कपिलदेवला फक्त ३ वेळा.
प्रती विकेट सर्वात कमी चेंडू आणि सर्वात कमी रन देऊन विकेट घेणारा गोलंदाज

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याचा strike rate मस्त होता (३२-३३) पण economy rate वैताग (५+)
एका मुंबईतल्या मॅचच्या वेळी गिलख्रिस्टने त्याल मिडऑनवर २ (उत्तुंग म्हणे!) सि़क्स मारलेल्या आठवतात. अतिशय वाईट धुतला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0