पंचमी

थेंब थेंब दहिवर
अंग अंग गहिवर
ओते चान्दण्याचा घडा
शुभ्र लाह्या भुईवर

लाह्या दुधाचा वाडगा
नाग चपळ बुजतो
केवड्याच्या पाना आड
हुंकार गतीचे भरतो

रत्ने थेंबांची वेचत
श्रावण उत्सवी नाग
पंचामृते ओसंडली
स्वप्नांना मन्दशी जाग

*****

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

शृंगारिक प्रतिमांनी भरलेली कविता आवडली.

अष्टाक्षरीची लय काही ठिकाणी ढळलेली आहे. ती सुंदरीच्या ढळलेल्या पदराप्रमाणे न वाटता नागाच्या हुंकारांच्या चुकलेल्या ठेक्याप्रमाणे वाटते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

Smile Wink
लयीबाबत केलेली तुलना उचित (मार्मिक) आणि पर्याप्त वात्रट...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर!!! आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0