मित्र

ही कविता वीaर-रस पूर्ण अशी शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेउन केलेली आहे. शिवाजी महाराजांच्या एका काल्पनिक लढाईचे चित्रण आहे जे की खुद्द महाराज आपल्याला सांगत आहेत अशी कल्पना यात केलेली आहे.

इतिहासात वेळोवेळी उल्लेख केल्या गेलेल्या त्यांच्या विश्वासू माणसांना माझ्या कडून एक भावपूर्ण आदरांजली!

तुम्हा सर्व रसिक वाचकांच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत!

वाजले रणवाद्य हे
सुरू झाली रणधुमाळी
निसटला चिलखताचा माझ्या
बंद कसा ऐनवेळी!

सूऽ सूऽ करीत बाण एक
जिरेटोप घेउन उडाला
माझ्या भात्यात बाणांचा
अवघा साठा संपला

दोन-चार घावानंतर
तलवारही झाली बोथट
पाच-सहांशी करता हातघाई
दिसू लागला ढालीचा शेवट

मोजले अगणित गनीम
जांबीया-कट्यारीने
ओलाचिंब झाला देह
भळभळत्या रक्ताने

शस्त्रांचा खणखणाट सुरू
उडतो धुळीचा कोट आकाशी
शेजारचा तो एकमेव सैनीक
होता लढत शर्थीने मघाशी

ध्वज-पताका जमीनदोस्त
नौबतीही थंडावल्या
अस्ताव्यस्त शरीरांवर
गिधाडांच्या सावल्या

गरगरली एका पळी
सभोवतालची सारी सृष्टी
भिरभिरली एकवार
थरथरती, विझती माझी दृष्टी

अचानक कसा उडाला
शत्रूसैन्यी हाहाकार
आले धावून मदती
माझेच ते मित्र चार

मूठ परत आवळली
घोड्यालाही दिली टाच
झाले पाय सैरावैरा
रणभूमीत उरले वीर पाच!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कवितेपूर्वीचे आपले मनोगत लिहायचे काही गरज नव्हती. तेवढं सोडलं तर कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

निष्ठावंत, विश्वासू माणसे म्हटली की ती शिवाजी महाराजांचीच अस आपल्याला लगेच कुठेतरी आठवल्यासारख वाटत म्हणजे ते तस मराठी मनावर कोरलं गेलेल आहे. पण तरीही कुणाला ही माणसे आणि हे चित्रण राजा आर्थरशी संबधीत वाटू नये म्हणून सारा खटाटोप. शिवाय आदरांजली वाहण्यासाठी मी थोडी :'लिबर्टी' घेतली इतकेच काय ते!

पण मी चुकलो हे मान्य करतो व त्याबद्द्ल दिलगीर आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी शब्दांचा जादूगार...

शिवाजीमहाराजांच्या वेळेस धनुष्यबाणाने लढाया होत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हत्तीवर बसलेले योद्धे धनुष्यबाण वापरत असे वाटते; पण शिवाजी महाराजांनी समोरासमोर फार कमी युद्धे केली त्यामुळे त्यांनी हत्तीवर बसून धनुष्यबाण वापरला असेल असे वाटत नाही.
अवांतर झालेच आहे तर:
परवा चेपुवर एक पोस्ट पाहिली त्यात विएतनामने अमेरिकेविरुद्धच्या युद्धात महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यास केला होता असा दावा केलेला वाचला.
हे खरे आहे की नाही ते आणि असल्यास अधिक माहिती ऐअवरची तज्ज्ञ मंडळी सांगू शकतील काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या वेळच्या लढाईच्या एका लढाईचे चित्र होते त्यात हत्तीवर बसलेल्या एकाच्या हाती ध्नुष्य-बाण होता!

पण शिवाजी महाराजांकडे धनुष्यबाण होता की नाही याबद्दल आता मलाच शंका यायला लागली आहे, त्यामुळे आताच काही ठामपणे सांगू शकणार नाही.

लवकरच यासंदर्भात मी बाबासाहेब पुरंदरे यांना भेटणार आहे, मग नक्की सांगतो.

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी शब्दांचा जादूगार...