.
.
काही संभाव्य फायदे.
सर्वसाधारणपणे लोक लग्न कायदेशीर फायद्यांसाठी करतात असे वाटत नाही.
१) भाड्याच्या घरात रहाणे एखाद्या अर्थव्यवस्थेत अधिक आर्थिक सूज्ञपणाचे आहे हे माहित असूनही जेंव्हा लोक स्वतःचे घर घ्यायचा निर्णय घेतात यामागचे मुख्य कारण असते 'स्थैर्य'! असेच स्थैर्य लग्नसंस्थेच्या मुळाशी आहे असे मला वाटते. पुढे गरजा बदलतील त्याप्रमाणे नवीन घर घेण्याचा पर्याय असतोच पण भाड्याच्या घरात रहाताना घरमालकाच्या मर्जीप्रमाणे करार वाढवून मिळणार की नाही, भाड्याचा दर वगैरे जी अनिश्चितता असते ती स्वतःचे घर घेण्यात नसल्याने अनेक जण तो पर्याय निवडतात पण या निर्णयात बांधिलकी असते पण अनेकांसाठी ही बांधिलकीच महत्वाची असते. खालील अनेक मुद्द्यातही हा मूळ मुद्दा महत्वाचा ठरतो.
२) मुले जन्माला घालायची असतील तर त्यांना सुरक्षित बालपण देता यावे यासाठी ज्या नात्यात बांधिलकी आहे असे नाते निवडणे अनेकांना महत्वाचे वाटते. एखाद्याशी लग्न करताना निदान सुरवातीला तरी आता आपण कायमचे एकत्र राहू अशी वचने जाहीरपणे एकमेकांना दिली जातात आणि ज्यांची असे करण्याची तयारी असते तेच लग्न करतात अशी धारणा असल्याने लग्न हा अधिक स्थैर्य देणारा पर्याय म्हणून अनेकांना सोयीचा वाटतो.
३) मुले असल्यास एकत्र रहाणारे आईवडील हा आर्थिक दृष्ट्या सर्वात किफायतशीर पर्याय असतो, अर्थात लग्न न करताही एकत्र रहात असल्यास तेच साध्य होते पण लिव्हीन नात्यात विभक्त होणे अधिक सोपे असते.
४) दोघांच्या नावावर अर्धे कर्ज घेऊन मोठे घर विकत घेणे शक्य होते जे मुले असलेल्या जोडप्यांसाठी महत्वाचे असते. हा मुद्दा दोघेही कमावते असलेल्या स्त्री-पुरुषांसाठी लागू आहे. लग्न न करता असे कर्ज घेण्यात कायदेशीर अडचणी येऊ शकतात. नाते संपल्या वर त्या एकत्र घराचे काय करायचे आणि आर्थिक व्यवहार कसे वेगळे करायचे हे त्रासदायक काम होते. लग्न संपल्यावरही हेच प्रश्न तयार होतात पण वर लिहिल्याप्रमाणे लग्न संपण्यापेक्षा लिव्हिन संपण्याच्या शक्यता अधिक असतात.
५) 'लग्न कायमचे' अशी धारणा असल्याने वृद्धापकाळातही आपल्या बरोबर कोणीतरी असेल आणि शारीरिक आकर्षण संपले तरी सहजीवन कायम असेल ही कल्पना अनेकांना सुरक्षितता देते.
६) याचप्रकारच्या सुरक्षिततेतून मानसिक स्वास्थ्य मिळाल्याने असेल पण विवाहित स्त्रीपुरुष अधिक जगतात असे अलिकडे वाचल्याचे आठवते.
एकूण काय तर मुले नको असतील,सुरक्षितता ओव्हररेटेड वाटत असेल, बांधिलकी नको असेल, नात्यांच्या कायमपणावर विश्वास नसेल किंवा जोडीदाराबद्दल खात्री नसेल तर लग्नाच्या भानगडीत न पडलेलेच चांगले पण या गोष्टी हव्या असतील तर लग्न करणे हाही एक चांगला पर्याय असू शकतो. पोटगी, वारसाहक्क वगैरे गोष्टी आता फक्त लग्नापुरत्याच मर्यादित आहेत असे वाटत नाही.
अनेक मित्रमंडळी लग्न न करता एकत्र रहातात, काहींना मुलेही आहेत. काही मित्रमंडळींनी मुले होण्याआधी लग्न केले आहे. काहींनी मुले आहेत पण ते आता विभक्त झाले आहेत. त्यांच्यातली नाती केवळ त्यांनी लग्न केले आहे किंवा नाही आणि केले असल्यास का केले आहे वगैरेवरून न जोखण्याचा शहाणपणा आला आहे. दुसर्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे तुम्हाला काय हवे यात स्पष्टता हवी.
मूळ प्रश्नात "नोकरी करणार्या
मूळ प्रश्नात "नोकरी करणार्या स्त्रीला" असा जो सरसकटपणा आहे त्याचे भाग पाडायला हवेत असे वाटते म्हणजे जी काय उत्तरे येत आहेत त्यावरून एखादी स्त्री स्वतःचे इंडिपेण्डंट आर्थिक स्थैर्य विचारात घेऊन लग्न संस्थेचे मूल्यमापन करू शकेल.
[व्हाईट कॉलर व्यवसाय/नोकर्याच इथे धरल्या आहेत].
-छोट्याश्या ऑफिसमध्ये ५ हजार पर्यंत पगार
-कंपनीत १० ते १५ हजार पर्यंत पगार
-छोटा स्वतःचा व्यवसाय १५-२० ह्जारापर्यंत मासिक उत्पन्न
-व्यवसाय/नोकरी ३०-४० हजार पर्यंत उत्पन्न
-व्यवसाय नोकरी ५० हजार ते १ लाख दरम्यान उत्पन्न
-१लाख ते २ लाख उत्पन्न
-२ लाखापेक्षा जास्त उत्पन्न
या गटांमध्ये पालकांचा लग्न करणे/ न करणे याला संपूर्ण पाठिंबा असणे आणि नसणे हे उपगट होतात.
असे गट पाडल्यावर असे लक्षात येईल की प्रत्येक गटाच्या नोकरी करणार्या स्त्रीला वेगवेगळ्या प्रकारे विचार करावा लागेल. प्रत्येक गटातल्या स्त्रीचे आर्थिक स्वातंत्र्य/ताकद वेगवेगळी आहे आणि त्यामुळे लग्न करणे आणि लिव्ह इन करणे या पर्यायांचे इव्हॅल्युएशन रत्येक गटासाठी वेगळे येईल.
प्रतिसाद आवडला. मुळ शंका
प्रतिसाद आवडला. मुळ शंका विचारताना माझ्यासमोर अशी स्त्री होती जी प्रोस्पेक्टीव पुरुषाइतकीच कमवतेय, स्वतःची प्रॉपर्टी आहे आणि घरखर्च, बाकीचे खर्च बरोबरीने शेअर करायला तयार आहे, एकमेकांच्या मालमत्तेचे आकर्षण नाहीय. आता तिला लग्न करण्याने नक्की फायदे काय मिळणार?जर कायदेशीर फायदे दिसत नसतील तर त्यांनी लग्न का करावे? लिव्ह इन का करु नये? म्हणजे मग जसजशा मुली शिकु कमवु लागतील तशी लग्नसंस्था रिडंडंटच होत जाइल ना?
+
>>मुळ शंका विचारताना माझ्यासमोर अशी स्त्री होती जी प्रोस्पेक्टीव पुरुषाइतकीच कमवतेय,
पुरुषाइतकी कमावणारी असली तरी दोघे १०००० च कमावतात असे असेल तर वेगळा विचार आणि दोघे १००००० कमावतात तर वेगळा विचार होईल (स्वतःची प्रॉपर्टी असली तरी.
दोघे १००००च कमावत असतील तर सहसा खर्च वाटून घ्यायला तयार नाही अशी शक्यता निर्माणच होत नसावी.
जोडिदार
जोडिदार कायदेशीर रित्या स्त्रीला बांधला जातो. तो इतर स्त्रीकडे जाउ शकत नाही ही कायदेशीर सोय नाही का?
(नेहमी आपल्या दावणीला बांधलेला नवरा. नवर्याची हक्कने घेतलेली भक्ती/एकपत्नीव्रतता)
.
.
वरच्या कोर्टाच्या उदाहरणात बाहेरचे जोडिदार दिसतात. पण त्या खूप स्पेसिफिक केसेस असाव्यात.
इतरत्र नवर्याचे बाहेर अफेअर आहे हे कळले तर कायदेशीर काएअवाई शक्य असावी.
नसली, तरी बाहेर अफेअर असणे हे घटस्फोटास पुरेसे कारण असल्यने, आणि घटस्फोटानंतर अधिकांश वेळा पैसे/संपत्ती देण्याची वेळ
पतीवरच येत असल्याने तो असले दु:साहस करण्याची शक्यता कमी होते.कॉस्ट्-बेनिफिटचा विचार करुन आहे त्या बायकोतच चालवून घेण्याची
भूमिका पतीला घ्यायची वेळ येते. कुरकुरणारी चाके कुरकुरत त्याच गाडीला जोडलेली राहतात त्याप्रमाणे.
हा मुद्दा वर आला असणे शक्य आहे. मला पुन्हा सगळी चर्चा वाचणे अशक्य आहे.
जोडिदार कायदेशीर रित्या
जोडिदार कायदेशीर रित्या स्त्रीला बांधला जातो. तो इतर स्त्रीकडे जाउ शकत नाही ही कायदेशीर सोय नाही का?
स्त्रीपेक्षा "एकमेकांना बांधले जातात" हे अधिक योग्य ठरावे. (स्त्रीचे बाहेरचे संबंधसुद्धा घटस्फोटाला पुरेसे कारण आहे, अश्यावेळी हे संबंध सिद्ध झाल्यास प्रसंगी पोटगीतून सुट मिळू शकते)
अन् होय ही लग्नाची 'प्रॉपर्टि' आहे. सोय/गैरसोय ते तुम्हीच ठरवा बॉ! ;)
मूल हवे असेल तर लग्न कारावेच.
मूल हवे असेल तर लग्न कारावेच. कारण "सिंगल पेरेंटींग" अवघड असावे असा कयास.